Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions

Maharashtra State Board Class 12th Marathi Sample Paper Set 1 with Solutions Answers Pdf Download.

Maharashtra Board Class 12 Marathi Model Paper Set 1 with Solutions

विभाग १: गद्य

प्रश्न १.

(अ) पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पुढील आकृतिबंध पूर्ण करा.

गेल्या पाच वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं, की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखळून पडताहेत. लडाखच्या भिन्न-भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या सैनिकांना भेटलं, की ‘आपली माणसं’ भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत. त्यांना आपण जपलं पाहिजे. त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे.

आम्ही पाच वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत, याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हांला भेटायला आवर्जून आले होते. १९९९ मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात, याच्यापरता मोठा सन्मान तो कोणता ?

आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हांला “म्हणाले, “तुम्ही पाच वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात, ह्याबद्दल अभिनंदन; पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या आमच्या तरुण जवानांना भेटा त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हांला त्यांची गरज आहे.

निदान पाच वर्ष तरी कमिशंड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात ! तरुण मुलींना सांगा, की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन दया, की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम थांबवणार नाही.”

वातावरणात नीरव शांतता! त्याचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, ‘नक्की सर हे काम मी कधीच थांबवणार नाही’. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेने जणू कानात हळूच म्हटले ‘तथास्तु’ भासच तो; पण अंगावर रोमांच उठले, नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला. माघारी वळले ते, ‘ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबावदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसे बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन’ असे सैनिकांना आश्वासन देऊनच! कारण ते म्हणतात,

‘माघारी जेव्हा जाल परतून, ओळख दया आमची त्यांना आणि सांगा तुमच्या ‘उद्या’ साठी ज्यांनी आपला ‘आज’ दिला.

(१)
(i) गेल्या पाच वर्षात लेखिकेला जाणवलेली गोष्ट ……………….
उत्तर:
लडाख इथे सरहद्दीवर गेल्यावर गेल्या पाच वर्षात लेखिकेला जाणवलेली गोष्ट म्हणजे तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव व प्रतिष्ठितपणाची चढलेली पूटं निखळून पडताहेत.

(ii) लेखिकेसाठी सन्मानाची गोष्ट म्हणजे ……………..
उत्तर:
म्हणजे १९९९ मधील कारगील युद्धाच्या वेळी कर्नल कुशल ठाकूर हे तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार ते लेखिकेला भेटले.

(२) सरहद्दीवरील सैनिकांबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे असे लेखिकेनुसार करावयाची कार्ये ?
(i) ……………
(ii) …………….
उत्तर:
(i) जवानांना भेटून त्यांचा हौसला बुलंद करा.
(ii) तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions

(३) स्वमत अभिव्यक्ती: ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी लेखिकेजवळ तरुणांसाठी कोणता संदेश दिला ?
किंवा
‘माघारी जेव्हा जाल परतून ओळख दया आमची त्यांना आणि सांगा तुमच्या ‘उदया’ साठी ज्यांनी आपला ‘आज’ दिला. या विधानाविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
अनुराधा प्रभुदेसाई लिखित ‘वीरांना सलामी’ या पाठात आपल्या सुरक्षेसाठी सरहद्दीवर उभे असलेले सैनिक, त्यांचे जीवन यावर प्रकाश टाकत असतानाच कारगील युद्धाविषयी काही न समजल्याची खंत आणि या युद्धात कामी आलेले सैनिक त्यांच्या वीरत्वाला सलाम करण्यासाठी लेखिका ५ वर्षासाठी ‘लडाख मिशन’ सुरू करते आणि त्यांच्यासमोर वीर सैनिकांचा जीवनपट त्यांच्यासमोर उलगडत जातो.

लेखिकेचे लडाखला जाण्याचे हे शेवटचे वर्ष आणि याच वर्षी कारगील युद्धात तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार कर्नल कुशल ठाकूर लेखिकेसारख्या सामान्य माणसाला भेटायला जातात हे लेखिका स्वतःचे भाग्य समजते.

ब्रिगेडियर ठाकूर जेव्हा लेखिकेशी संवाद साधतात तेव्हा आपल्या देशातील तरुणांसाठी महत्त्वाचा संदेश देतात तो पुढीलप्रमाणे- ‘तुम्ही हे लडाख मिशन बंद करू नका. तर सैनिकांना भेटण्यासाठी नेहमी येत चला. त्यामुळे आमच्या तरुण जवानांचा हौसला बुलंद होतो.

आणि शहरातील तुमच्या कुशाग्र बुद्धीच्या तरुणांनाही सांगा की, आम्हाला त्यांची गरज आहे. कमीतकमी पाच वर्षे तरी कमीशंड ऑफिसर म्हणून त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करावी. मगपुढील आयुष्यात तुम्ही तुमचे करीअर करू शकाल तसेच तरुण मुलींनीही जवानांशी विवाह करताना डगमगू नये तसेच लेखिकेने लष्कर आणि नागरिकांमध्ये भावनिक सेतू बांधण्याचे काम जे सुरू केले आहे ते थांबवू नये’

किंवा

अनुराधा प्रभुदेसाई लिखित ‘वीरांना सलामी’ या पाठामध्ये इ. स. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धाविषयीची माहिती न झाल्याने खंत व्यक्त करून या युद्धात कामी आलेल्या वीरांना सलामी देण्यासाठी म्हणून लेखिकेने लडाख मिशन सुरू केले. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सरहद्दीवर पाय ठेवून उभा राहिलेला सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असतो. तसेच कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकासोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्ययकारी अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेला प्रवास आणि या प्रवासात आलेले अनुभव याचा प्रत्यय येथे येतो.

जीवाची बाजी लावून सरहद्दीवर काम करणारे हे शूर जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करतात. देशाचे आणि देशातील प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून उभा असतो. देशाची सरहद्द म्हणजे एकाकी, रौद्र असा परिसर जिथे दूरान्वयानेही हिरवळीचा संबंध नसतो. अशा कठीण प्रदेशात राहून ममत्व, बंधुभाव जपणारे, नाती जोडणारे सैनिक प्रसंगी त्याग, आत्मसमर्पण करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेले हे सैनिक शत्रूला सरहद्दीवरच रोखून ठेववात.

त्यांच्या कोणत्याही कारवायांना चोख प्रत्युत्तर देतात, प्रतिकार करून आपल्या देशाचे तसेच देशातील प्रत्येक नागरिकांचे रक्षण करतात. क्वचित प्रसंगी युद्धात देशाच्या कामी ही येतात आणि म्हणूनच लडाख मिशन सुरू करणाऱ्या या लेखिकेस लडाख सरहद्दीवरील सैनिक लेखिकेस सांगतात की माघारी परतून जाल तेव्हा देशातील नागरिकांना आमची ओळख द्या आणि त्यांना सांगा की तुमच्या ‘उदयांसाठी ज्यांनी आपला ‘आज’ दिला. त्यांचा हा संदेश अतिशय सूचक असून सरहद्दीवरील सैनिकांमुळे देशातील प्रत्येक नागरिक हा सुखी आणि निश्चित असतो.

(आ) पुढील उताऱ्याच्या आधारे आकृतिबंध पूर्ण करा.
मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो. तिथेही या चित्रांचे स्त्रोतं मला सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलो होतो. बोलणारा माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. मला त्यात स्वारस्य नव्हतं.

मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार पाचसात वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली! हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं. कार्यक्रम संपला. घरी आलो. बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री दहानंतर मी समोर ड्रॉईंगपेपर घेऊन बसलो होतो. त्यावर चित्र चितारत गेलो ते अशा क्रमानं. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला.

तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याचबरोबर मी दुसरा एक हात दाखवलाय ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. ज्यांना लिहिता-व -वाचता येत नाही त्यांच्यापर्यंतही हा संदेश मला पोचवता आला. त्या समारंभाला मी गेलो नसतो तर मला हे सुचलं नसतं. व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून ! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात.

नहलता शांतपणे पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झाडप घालून ते पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते.

(i) चिमुरड्या मुलीचे डो …………..
(ii) जाळी किंवा गळ टाकून पकडली जातात ……………
उत्तर:
(i) नारळ
(ii) मासे

(२) लेखकानुसार या विधीने लोक मासे पकडतात.

(i) …………..
(ii) ………….
उत्तर:
(i) काही जाळी किंवा गळ टाकून मासे पकडतात
(ii) काही वाहत्या उथळ पाण्यामधे उभे राहून एखादा मासा त्यांच्या पायाजवळ आला की झाडप घालून हाताने मासे पकडतात लगेच.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions

(३) स्वमत अभिव्यक्ति:’ वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीने उभं राहिलं तर व्यंग्यचित्राची कल्पना अगदी जवळून जाते’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट कराकिंवा
किंवा
‘स्त्रीभ्रूणहत्या एक अपराध’ या विषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर:
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर लिखित ‘रंगरेषा – व्यंगरेषा’ या आत्मचरित्रात्मक पाठातील हे विधान असून व्यंगचित्रकाराला व्यंगचित्र कशाप्रकारे सूचतात याविषयी विवेचन करत असताना स्वतःच्या जडणघडणीच्या काळातील काही प्रसंग रेखाटले आहेत.

त्यांच्या व्यंगचित्रामध्ये सुधारणा होऊन त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी श्रेष्ठ चित्रकार दिनानाथ दलाल यांनी लेखकास केलेले मार्गदर्शन तसेच जाणकारांच्या मार्गदर्शनातून स्वत:ची केलेली प्रगती आणि कलाकार म्हणून मोठे व्हायचे असेल तर सतत शिकत राहिले पाहिजे हा संदेश लेखकानी या पाठातून दिला आहेसर्वसाधारणपणे आपण आपल्या जीवनामध्ये सर्वत्र वावरत असताना आपल्या भोवताली अनेक विषय असतात, घटना घडत असतात, हे चित्रकाराच्या सहज लक्षात येत असते.

त्यासाठी लेखक मासे पकडणाच्या व्यक्तीचे उदाहरण देतातकाहीजण जाळी टाकून तर काहीजण गळ लावून मासे पकडतातमात्र काही लोक हे उथळ वाहत्या पाण्यात उभे राहून बेसावध मासा पायापासून जात असता सहज हाताने पकडून जमिनीवर टाकतात. मानवी जीवनही असेच काहीसे आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळवायचे आहे हे ती व्यक्ती ठरवते व नंतर ते कशाप्रकारे मिळवायचे आहे.

याचाही ती व्यक्ती विचार करताना दिसते. माणसाला जे जे हवे आहे तो ते या नात्या मार्गाने व्हायचा प्रयत्न करत असतो व ते ते मिळवतो. ही थोडक्यात आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनातही निरीक्षण केले. सावधगिरीने उभे राहिले पाहिले तर अशा कितीतरी गोष्टी घडत असतात ज्या आपणास हव्या आहेत त्या आपणास सहज मिळतात. फक्त त्या माणसाने सावध असले पाहिजे. थोडक्यात माणसाला अशा कित्येक संधी मिळत असतात त्या संधीचे सोने करता आले पाहिजे असाही अर्थ लक्षात येतोकिंवा

किंवा

स्त्री भ्रूणहत्या हा एकोणीसाव्या शतकानंतर समाजाला लागलेली कीड असून ही प्रथा बंद करण्यासाठी पुढीलप्रमाणे कायदे केले गेले.
(अ) हुंडा विरोधी कायदा – १९६१
(ब) कन्या प्रशिक्षण प्रोत्साहन कायदा
(स) स्त्री अधिकार व अनुमोदन कायदा
(द) वडिलार्जित संपत्ती समान अधिकार कायदा

अशाप्रकारच्या कायदयातून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी स्त्रीभ्रूणहत्या का होते याविषयी कारणे शोधता-
(i) मुलगा-मुलगी भेदभावाची वृत्ती
(ii) मुलगी परक्याचे धन- मुलगा वंशाचा दिवा
(iii) हुंडा पद्धती….अशा कारणातून स्त्रीभ्रूणहत्या होताना दिसतेस्त्रियांना समान अधिकार दिले असले तरी तिचे मोठ्या प्रमाणात शोषण होताना दिसते. प्रसंगी तिच्यावर अन्याय-अत्याचार केले जातात. कुटुंबामध्येही सन्मानाने वागणूक दिली जात नाही तर दुय्यमस्थान दिले जाने. आजही एकविसाव्या शतकात लोकशाही प्रधान देशात स्त्री ही सुरक्षित नाही तिच्यावर होणारे भीषण हल्ले, बलात्कार, ॲसिडफेक, हत्याकांड अशा भयानक प्रश्नांना तिला सामोरे जावे लागते जो पर्यन्त पुरुषमनाचे प्रबोधन होत नाही.

त्यांच्यात जाणीव जागृती होत नाही तो पर्यन्त स्त्रीभ्रूणहत्या होतच राहणार. आज स्त्री कितीही शिकली तरी, स्वावलंबी असली तरी सामाजिक स्तरावरील असुरक्षितता, सर्वव्यापी दहशत, अविश्वास, भीती, अन्याय-अत्याचार अशा विकृत अवस्थेला तिला सामोरे जावे लागते. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या हा विचार बळावतो आहे. यासाठी कायदे नियमांत बदल करून स्त्रियांना संरक्षण, योग्य न्याय दिला पाहिजे. त्यांना योग्य त्या वयात स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. मुलांप्रमाणेच मुलींवरही जबाबदारी टाकली पाहिजे तरच ‘स्त्री-पुरुष समानता’ या मूल्याचे पालन होईल आणि स्त्रीभ्रूणहत्ये सारखाविषयही समूळ नष्ट होईल.

(इ) दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ‘कंदिलाची ज्योत मंद करून विश्वनाथ बिछान्यावर पडला. मुंबईत रात्री देखील सतत चालू असलेला रहदारीचा आवाज इथं नाही. रेडियो ओरडत नाहीत. मधूनच ब्रेकच्या कर्कश किंकाळ्या इथं ऐकायला येत नाहीत.

अशीच शांतता अंबेरीला आहे. अंधाऱ्या एकाकी घरात बाबा असेच बिछान्यात पडले असतील. आयुष्यात त्यांनी कुठंही तडजोड स्वीकारली नाही. मनात आलं तशी स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी उडी घेतली. तुरुंगवास पत्करला. कैद्यांना बरच काही सहन कराव्या लागतात. त्यापलीकडील हालअपेष्टा, तुरुंगाबाहेरही त्यांनी ताठ मानेने सोसल्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर राजकारण हा व्यवसाय झाला. आणि तुरुंगवास हे त्याचं भांडवल झालं, तसे ते ह्या सर्वांपासून दूर झाले. एस. टी. देखील अदयाप न पोहोचलेल्या अंबेरीसारख्या आडगावी जाऊन त्यांनी शिक्षकाचा पेशा पत्करला.

शेकडो मैल दूर असलेल्या वडिलांच्यात आणि आपल्यामध्ये हे एकटेपण, हा अंधार, ही शांतता एक जवळिकीचा धागा हळुवारपणे विणत आहे. हा हिमालय आपणा दोघांना एकत्र आणत आहे. आपण आजवर जे सोसलंत आणि तरीही निश्चयानं जपलंत, त्याचा प्रत्यय, कुणी सांगावं, मलादेखील इथं येईल. केवल रक्ताच्या ऐवजी विचारांचा आणि कृतीचा वारसा मला आपणाकडून लाभेल, हिमालयाची मला तिचमोठी देन होईल ! रात्री केव्हातरी कंदिलाची ज्योत हलकेच मालवली, आणि विचारात हरवलेल्या विश्वनाथच्या पापण्यांवरून झोप हल्केच डोक्यात उतरली.

(i)
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 1
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 6

(ii)
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 2
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 7

(२) कृत्रिम पायाच्या मदतीने दिव्यांगावर मात करता येते’ सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
आपल्या वडिलांपासून शेकडो मैल दूर असलेल्या हिमालयात जेव्हा लेखक नोकरीसाठी येतो येव्हा यांना त्यांच्या वडिलांचे एकाकीपण जाणवते. कारण जसे अंबेरीपासून दूर एकटे लेखक राहतात तशाचप्रकारे त्यांचे वडील अंबेरीला एकाकी घरात बिछान्यात पडले असतील असे लेखकास वाटते. हेच एकटेपण, अंधार आणि शांतता दोघांमध्ये जवळिकीचा धागा हळूवारपणे विणत आहे हे लक्षात येते.

कारण वडिलांनी जे आजपर्यन्त सोसले, भोगले आहे हे लक्षात येते आणि कदाचित त्याचा प्रत्यय लेखकास इथे येईल असे लेखकास वाटते शिवाय रक्ताऐवजी विचारांचा आणि कृतीचा वारसाही मला आपल्याकडूनच मिळेल हिच हिमालयाची मोठी देन असेल असे ‘विश्वनाथ’ ला (लेखकास) वाटते.

विभाग २: पद्म

प्रश्न २.

(अ) पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

रे थांब जरा आषाढघना
बघु दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंच हीं शेतें
प्रवाळमातीमधल औतें
इंद्रनील वेळूच बेटें

या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध- केतकी
फुटे फुल ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी

तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
उघड गगन, कर घडिभर आसर
आणि खुलें कर वासरमणि- घर
वाहू दे या तव किमयेवर

कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें

आणीत शहारा तृणपर्णा

आश्लेषांच्या तुषारस्नान
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं
रत्नकळा उधळित माध्यान्हीं

न्हाणोत इंद्रवर्णात वना

काळोखाच पीत आंसवें
पालवींत उमलता काजवे
करूं दे मज हितगूज त्यांसवें

निरखीत जळांतिल विधुवदना

(१) (i) खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
(a) शेतातील हिरवीगार पिके …………….
(b) फुलपाखरांच्या पंखावरील रत्नासारखे तेज दर्शविणारा शब्द …………
उत्तर:
(a) पाचू
(b) इंद्रवर्ण

(ii) एका शब्दात उत्तर लिहा.
(a) रोमांचित होणारी
(b) नव्याने फुलणारा
उत्तर:
(a) केतकी
(b) सोनचाफा

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions

(२)
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 3
उत्तर:
(i)
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 8

(ii)
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 9

(३)
अभिव्यक्ती आषाढघनाचे आगमन झाले नाही तर… या विषयावर निबंध लिहा.
उत्तर:
‘वैशाख वनवा पेटतो आणि पेटतो तसा सूर्यही
शांत करण्या सृष्टीला येतील मृग नक्षत्रही
आषाढझड अशीच येईल पडेल ती संतत थार
हिरवाईच्या नाना छटांनी निसर्ग दिसेल दिमाखदार ॥

नेहमीप्रमाणेच वाट पाहिली पण आषाढझड आलीच नाही. त्यामुळे माझे मन विचारात पडले मात्र वैषाखाची चाहूल लागलीच नाही फक्त होता सर्वत्र वैशाख वणवा उन्हाने जीव त्रासून गेला परंतु वैशाख वगण्यातून सुटका झालीच नाही. ज्येष्ठ महिन्यात मृग नक्षत्राचे आगमन होते.

श्रावणसरी मुळेतर श्रावणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र आश्लेषाला ही तिच्या सततधार झडीमुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण या पावसामुळे बळी राजा, शेतकरी आनंदतो. त्याच्या मशागतीमुळे व आषाढझडीमुळे शेतात धरतीला दुभंगून पीक जमिनीवर येते. वाऱ्यावर डुलते सर्वत्र हिरवे पाहून धरीत्रीने एखादी शाल पांघरल्यासारखी वाटते. पाचूची शेते दिसू लागतात. पणहे आषाढझड आली तर……

मात्र यावर्षी सर्वत्र रखरखीत वाटत होते. शेतकरीही हवालदिल झाला आहे शेतकरीही संतुष्ट नव्हता हिरवेरान नसल्याने निसर्गसौंदर्यापासून वंचित राहावे लागत होते. धर्मकार्य, शुभकार्य थंडावले होते. आषाडघनाचे आगमन नसल्याने सर्वत्र रोगराई वाढणार हे निश्चितच झाले होतेआश्लेषा नक्षत्र हे कृषिराजाला भरभरून दान देणारे या नक्षत्रात पाऊस पडला तर संपूर्ण सृष्टी नवचैतन्याने नटलेली दिसतेजलाशय पाण्याने काठोकाठ भरतात. सभोवतालच्या पाचूच्या रानांमुळे मन बेहोष होते.

मात्र आषाढ घनाचे आगमन झाले नाही तर आषाढाचे राजससुख अनुभवता येणार नाहीं. मेघांतून डोकावणारी इंद्रधनुषी माळ दिसणार नाही. जलाशयात चंद्रबिंब पाहता येणार नाही वृक्षवेलीतून प्रकाशफुले घेऊन चमकणारे काजवे दिसणार नाहींत. निसर्गसौंदर्याच्या आनंदापासून वंचित राहावे लागणार हे नक्की. हे सर्व आषाढघनाचे आगमन झाले नाही तर….. ..होणार आहे आणि.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकड़े क्षणात येते सरसर शिखे क्षणात फिरूनी उन पडे हे बालकवींच्या कवितेतील निसर्गाचे रूप आपणास दिसणार नाहीं.

(आ)
‘अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते
रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून
शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय
नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा’
– या ओळीतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे लिखित ‘आरशातली स्त्री’ या कवितेतील पद्यपंक्ती असून ही कविता त्यांच्या ‘फिनिक्स’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे. कवितेतील नायिका आपले प्रतिबिंब आरशात पाहते तेव्हा आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीशी संवाद साधते. तिच्या गतआयुष्यातील आठवणींना उजाळा देत नायिकेच्या वर्तमानस्थितीबद्दल तिच्या मनातील भावना ती प्रकट करते.

आरशातील प्रतिबिंब म्हणजे नायिकचे अंतर्मन आरशाबाहेरील स्त्रीला पाहून व्यथित होते. तिचे काळीज ठंबरते. तिला अनामिक भीती वाटते कारण आरशाबाहेरील स्त्रीच्या एकांतात आपले मनातील हुंदके कंठात दाटून ठिकठिकाणी फाटलेले हृदय शिवत असते व मनातील असह्य वेदना पदराखाली झाकून टाकते. फाटलेले हृदय, रात्रीचा एकांत, असह्य कळा, पदराखाली झाकणे असे सूचक शब्दप्रयोग मनाला अंतर्मूख होऊन विचारप्रवृत्त करतात. इथे नायिका समाजव्यवस्थेनुसार पारंपरिक वरदान म्हणून संसाराचा स्वीकार करते

तसे तिचे विश्व बदलते. तिचे स्वातंत्र्य, तिचे अस्तित्व, हरवून वाट्याला येतात फक्त संसारातील खडतर अनुभव आणि कष्टमयी जीवन, गतादुष्यातील स्वप्न, ध्येय, आकांक्षा, इच्छा संसाराच्या यज्ञकुंडात जळून भस्म होतात, आणि मग खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची धडपड सुरू होते. संसारात मिळालेले तिचे दुय्यम स्थान, संसाराचे ओझे ओढताना तिची होत असलेली ससेहोलपट, तिच्या मनातील इच्छा-आकांक्षांना यत्किंचितही न मिळालेली किंमत हे सारे पाहता तिच्या मनाचा कुठेही विचार केला जात नाहीं.

त्यामुळे तिला होणाऱ्या वेदना ती निमूटपणे सहन करते. संसाराची स्थिती गती सुधारताना तिच्या मनाला कितीतरी जखमा होतात. मात्र ती हे सारं निमूटपणे सहन करते. येथे स्त्री मनाचा शोध घेता स्त्री मनातील तिच्या अस्तित्वाविषयीचा संघर्ष पाहावयास मिळतो. ही नायिका स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करत असून कवितेतून व्यक्त झालेला हा विचार सर्वसमावेशक असून नायिकेच्या माध्यमातून कवयित्रीला आलेले अनुभव हे अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात हे स्पष्ट होते.

(इ)’स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा नि आज नखशिखांत तू…. तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी’ – या ओळीतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.
किंवा
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा ।
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ।
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा
राहती माझ्यासवें ही आसवें गीतांपरी
हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा ।
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ।’
– या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
उत्तर:
‘आरशातील स्त्री’ या कवितेच्या कवयित्री हिरा बनसोडे असून त्याच्याच ‘फिनिक्स’ या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध या कवितेत घेतला असून काव्यलेखनासाठी संवादात्मशैलीचा प्रभावी वापर केला असून ही कविता मुक्तछंदात्मक आहे.

प्रस्तुत काव्यपंक्तीत स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेत असताना तिला सहन कराव्या लागत असलेल्या व्यथावेदना शब्दबद्ध केल्या आहेत. ही कवितेची मध्यवर्ती कल्पना असून आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी साधलेला संवाद हा स्वःताशीच केलेला सार्थ संवाद आहे.

कवितेतील नाविका सहज आरशात पाहते आणि तिच्या मनात त्याक्षणी गतकाळातील आठवणी जाग्या होतात. तसे तिच्या लक्षात येते की, ‘मी ती हीच का ?’ आणि मग तिच्या लक्षात येते की आरशातील स्त्रीने आपले रूप घेतलेले दिसत असले तरी ती आपण नाही आहोत कारण आपल्यात अंतर्बाह्य बदल झालेला आहे आणि मग तिचे आरशातील प्रतिबिंब तिचे अंतर्मन तिच्याशी संवाद साधू लागते. तिच्या मनातील तिच्या पूर्वरंगाविषयीच्या स्मृतींना ती उजाळा देते. ती पूर्वरंगात कशी होती याचे एक जिवंत चित्र तिच्यासमोर उभे करते.

किंवा

कविवर्य गझलसम्राट सुरेशभट यांनी ‘रंग माझा वेगळा’ ही गझल लिहिली असून त्यांच्याच ‘रंग माझा वेगळा’ या मराठी गझल संग्रहातून घेतली आहे. सामाजिक आशय असलेला या कवितेत माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थीपणा, ढोंगीपणा, लाचारी, आणि ‘मी’ ची समाजाने केलेली मानहानी या विषयीच्या प्रखर संतापावर कवीने प्रकाश टाकला आहे.

प्रस्तुत गझलमध्ये मानवी जीवन जगत असताना मानवाचे अनेक पैलू पाहावयास मिळतात. त्यात रंगून जावे लागते.. असे असले तरी सर्व गुंत्यात गुंतूनही कवीचा पाय मोकळाच राहतो. येथे कवी सर्वांमध्ये गुंतूनही आपले वेगळेपण वस्तूनिष्ठपणे जपत आहे. आपले अस्तित्व, वेगळेपण जपणारा हा कवी कलंदर व्यक्तिमत्त्वाचा असून त्यांना येणारे अनुभव सुद्धा जगावेगळे आहेत. कवीपुढे येणाऱ्या सावल्या कोठून येतात हे समजत नसून या सावल्यांच्याही झळा कवीमनाला लागत आहेत.

अन्यायाखाली भरडल्या जाणाऱ्या वर्गासाठी कवीमनाचा संघर्ष चालू असतानाच त्यांना न्याय देण्यासाठी कवीमन कार्यतत्पर आहे. हे करत असताना त्यांच्यासमोर भौतिक सुख, प्रलोभनेसमोर येतात ज्यामुळे कवीला सुख, संपत्ती, ऐश्वर्य लाभणार असले तरी अशाप्रकारचे सुख कवीला नको आहे कारण अशा सुखाचा कवीमनाला त्रासच होताना दिसतो कारण अशा प्रलोभनामुळे आपण आपल्या कर्तव्यापासून दुरावले जावू असे मूल्यहीन लोकांना वाटते आहे. हे स्वार्थी समाजाचे रूप पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहात असली तरी या अश्रूरूपी शब्दांचे गीत होऊन ते चिरंतन बनते आहे.

आणि कधीकाळी मिळणारे सुख हे आनंदापेक्षा दुःखच देते. कारण असे कोणते दुःख आहे की ज्याला माझा म्हणजेच कवीमनाचा लळा लागला आहे. कदाचित या दुःखाचा हसतमुखाने स्वीकार करत असल्याने त्यास आपला लळा लागला असावा कारण या आणि अशा दु:खातूनच कवी जगण्याचे तंत्र शिकतात. वाट्याला येणारे दुःख पचवून कधी जगायला शिकलो हे कवीलाच कळता नाही. मात्र अचानकपणे आयुष्यच कवीमनाचा गळा कापत आहे. जगण्यास आताशी सुरुवात होत असतानाच आयुष्यच कवीमनाचा विश्वासघात करते आहे अशा परिस्थितीतही कवी आनंदाने आयुष्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करते आहे.

सामाजिक विषमतेत जगत असता कवी आपले अस्तित्व, वेगळेपण जपत असताना त्यांना येणारे अनुभव या गझल काव्यातून व्यक्त होताना दिसतात. जीवनातील वैविध्यपूर्ण पैलू, विविधरंग, आयुष्याचा गुंता, संघर्षात्मक जीवनात येणाऱ्या सावल्या, सावल्यांच्या झळा आसवांची गीते, दुःख जागविणारे क्षण आणि अशा संघर्षात्मक प्रवासात विश्वासघात करणारे आयुष्य या बाबींचा विचार करता ‘मी’ ची समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप व्यक्त करतानाची त्यांची मृद्, हळूवार शब्दयोजना प्रसंगी अधिक तीक्ष्ण, धारदार आणि उपरोधिक व परखड बनते.

तसेच प्रखर सामाजिक बांधिलकीचे भान कविमनात असल्याचे दिसून येते. अंतरात्म्याच्या शब्दसमातून प्रकट झालेले गीत आणि आयुष्य या प्रतिमा शाश्वत असून त्याचा कवीने अचूक असा वापर केला असून सावल्यांच्या झळा, दु:खाचा लळा, या परस्पर विरोधी भावछटांमुळे अर्थाच्या दृष्टीने गझल ही एका वेगळ्या उंचीवर पोहोचते आहे हे लक्षात येते.

विभाग ३: साहित्यप्रकार कथा

प्रश्न ३.

(अ) पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.

नाट्यमयता / संघर्षः कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो.

संवाद: कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होते असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात.

भाषाशैली: कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते.

वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्परविरोधी भूमिकांतून तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते.

(१)
(i)
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 4
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 10

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions

(ii)
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 5
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 11

(२) कथेतील ‘नाटयात्मता’ या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे’ स्पष्ट करा.
उत्तर:
कोणतीही कथा त्या लेखकाची अभिजात कला असून त्यामध्ये चांगल्या-वाईटाचा अनुभव हा असतोच कारण अशा अनुभवातूनच नाट्यात्मता निर्माण होते. अशा संघर्षातूनच कथा उत्कर्षाबिंदूपर्यन्त पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष वा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही तर आनंद आणि सुखातिला अशा घटनांतूनही नाट्यात्मता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो असे असले तरी कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे केलेला शेवट हा वाचकांची मने आकर्षित करत असते. आणि म्हणून कथेमध्ये नाट्यात्मता या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृतीसोडवाः

(१) टॅक्सी ड्रायव्हरचे स्वभावविशेष ‘शोध’ कथेच्या आधारे लिहा.
उत्तर:
‘शोध’ या कथेचे लेखक व. पु. काळे असून या कथेत ‘टैक्सी ड्रायव्हर’ महत्त्वाचे पात्र असून कथानकाच्या गतिमानतेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरते.

एज्युकेटेड असलेला हा टॅक्सी ड्रायव्हर मुंबईसारख्या शहरात टैक्सी चालविण्यासाठी नवशिका आहे त्यामुळे टॅक्सी चालवताना नियम पाळणारा, यत्किंचितही चुका न करणारा, अतिशय सालस आणि तितकाच विनम्र असा होता. मदतीला धावणे हा त्याचा स्वभाव असल्याने अनु इनामदारची एक रुयाची नोट तिला परत मिळवून देण्यासाठी आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर हॉटेलवाल्या पर्यन्त पोहोचतो व अनुला ती नोट परत मिळवून देतो.

त्या नोटेविषयीचा अनु सांगत असलेली आठवण तिची त्या पाठीमागची भावना समजून घेतो ती तटस्थवृत्तीने, तिच्या मनाची गुंतागुंत समजून घेऊन तिला मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगतो. मनाने पेशंटमध्ये गुंतून न राहता ड्रायव्हरसारखी नजर हवी असे सांगत असतानाच भूतकाळात अडकलात की संपला. त्याचा भविष्यकाळही खराब होतो. अशाप्रकारचा जीवनाकडे पाहण्याचा तटस्थ दृष्टिकोन सांगतो. टॅक्सीत बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे डेस्टीनेशन ठरलेले असते. त्यामुळे गाडीत बसलेल्या व्यक्तीने स्टॉप दाखविताच गाडी थांबवायची. आणि नवीन पॅसेंजरच्या स्वागतासाठी सज्ज व्हायचे.

अनुनेही असेच करायला हवे असे त्यास वाटते. पेशंट आला गेला विचार न करता आपण आपला कॉटचा नंबर सांभाळायचा. तसेच ज्या गोष्टी हातात आहेत त्यांचाच शोध घ्यायचा मात्र ज्या गोष्टी मिळणारच नाहीत त्याचे काय ? असे सांगून त्याने त्याच्या मुलीविषयी सांगितले की आपली मुलगी आपणास सोडून कायमची गेली. तिचा शोध आपण कसे घेणार? म्हणजेच एखादी गोष्ट मिळणारच नसेल तर त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही या वरून टॅक्सी ड्रायव्हरची जीवनाकडे पाहण्याची तटस्थवृत्ती दिसून येते.

अशाप्रकारे टॅक्सी ड्रायव्हरची जीवनाकडे पाहण्याची तटस्थवृत्ती दिसून येते. अशाप्रकारे टॅक्सी ड्रायव्हरचे स्वभावविशेष आपणास पाहावयास मिळते.

(२) ‘चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा’ या म्हणीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:
डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ ही कथा ‘अकसिदीचे दाने’ या कथासंग्रहातून घेतली असून ‘बापू गुरुजी’ च्या कार्यकर्तृत्वाचे मनोज्ञ दर्शन घडविले असून या कथेत वैदर्भी बोलीचे विशेषतत्व जाणवत असताना वैदर्भी लोकजीवनातील रीतिरिवाजाचाही प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.

‘बापू गुरुजींनी गावच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांना गावात विधायक योजना आणायच्या होत्या. त्यांनी गावासाठी शाळा सुरू केली. आता त्यांना गावासाठी पोस्ट चालू करायचे होते. परंतु गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांनी त्यांच्या कार्यास विरोध करायचे ठरविले. गावातून फक्त मुलाच्या जन्माची अन् माणसाच्या मृत्यूचीच चिट्ठी जर पोष्टातून जात असेल तर कशाला हवे पोस्ट ? या विचाराने गावात पोस्ट चालू करण्यास विरोध केला मात्र तरीही गुरुजींच्या प्रयत्नाने पोस्ट आले.

त्यातून पत्राची खरेदी, बिक्री होत नव्हती. यावरून पोस्ट खात्यालाही वाटू लागले की गावाला पोस्टाची गरज नाही. आणि गावातील लोकांनाही चांगले-वाईट समजत नव्हते. त्या गावातील लोकांची वृत्ती, किंमत न देता कोणालाही कामाला लावायचे अशीच होती. त्यामुळे त्यांना पोस्ट म्हणजे विनाकारण खर्च असे वाटत होते. लोकांची मानसिकता म्हणजे केलेल्या कामाचा मोबदला न देता काम करवून घेणे अशी होती. त्यामुळे ‘चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा’ ही म्हण प्रचलित झाली.

(३) तुम्हाला भावलेली भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी’ थोडक्यात लिहा.
उत्तर:
‘शोध’ या कथेचे लेखक व. पु. काळे असून मुंबईसारख्या महानगरीत दिवसेंदिवस माणुसकी हरवत असतानाच लेखकाने या कथेत जबावदार, कृतीशील असे ‘भिडे दाम्पत्य’ हे पात्र योजले असून कथेतील प्रमुख पात्र ‘अनु इनामदार’ असून ती मुंबईसारख्या महानगरीत के.ई.एम. हॉस्टिपटलमध्ये ‘नर्स’ म्हणून सेवा करत असल्याने ती हॉस्पिटल समोरच गल्लीतील तिसऱ्या मजल्यावर एक खोली घेऊन राहत असताना तिच्याकडे कथेतील नायक व मुक्ता काही कारणास्तव जातात.

तेव्हा त्यांना भेटण्यासाठी भिडे दाम्पत्य येते ते स्त्रीच्या वेळी व माघारी घरी जाताना उशीर झाल्याने टॅक्सीने जायचे ठरते. मात्र टॅक्सीला सुटे पैसे हवेत म्हणून ते पैशाची शोधाशोध करून त्यांना पैसे दिले जातात. त्यातच अनुने टेबलवर ठेवलेली एक रुपयाची नोट’ घेऊन ( ती घरात नसताना) ती त्यांना दिली जाते. भिडे दाम्पत्य त्यांच्या घरी नायकाला भेटून परत माघारी टॅक्सीने जात असता त्यांच्या घराजवळील चौकात अपघात होतो. एक म्हतारा टॅक्सी खाली येतो.

त्यावेळी त्या प्रसंगातून भिडे सहजपणे बाहेर पडले असते, सुटले असते मात्र त्यांच्यातील चांगुलपणामुळे त्यांनी सामाजिक बाधिलकीचे भान ठेवून टॅक्सीवाल्याला मदत करायची ठरवले कारण त्या अपघातात टॅक्सीवाल्याची चूक नव्हती शिवाय तो होतकरू, प्रामाणिक होता त्यासाठी टैक्सीवाल्याच्या बाजूने जबानी द्यायला भिडे पोलीस स्टेशनला जातात. त्याचवेळी ते त्या म्हता-यास इसमास नायर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करतात. अशाप्रकारे एका चांगल्या व्यावसायिक होतकरू टॅक्सीवाल्याच्या पाठीशी भिडे खंबीरपणे उभे राहून त्याच्या बाजूने जबाब देवून त्यास त्या अपघाताच्या प्रसंगातून सहीसलामत वाचवतात. अशाप्रकारे भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी दिसून येते.

(४) ‘गढी’ या प्रतीकातून लेखिकेने गुरुजींच्या कार्याशी जोडलेला सहसंबंध स्पष्ट करा.
उत्तर:
सुप्रसिद्ध कथालेखिका डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ या कथेत स्वांतत्र्यप्राप्तीनंतर विकासाच्या वाटेवरील गावगाड्या समोरील प्रश्न ते सोडविताना येणाऱ्या अडचणी व ग्राम- सुधारणेसाठी निष्ठापूर्वक काम करणारे समाजसेवक बापू गुरुजी. त्यांचे कार्य आणि कथेत योजलेली प्रतीके याचा धागा कथालेखिकेने संवेदनशील भावभावनांतून जोडण्याचे कार्य केले आहे. ‘गढी’ या प्रतीकातूनही गावातील चांगले वाईट स्थित्यंतरे आणि गुरुजींचे कार्य याचा सहसंबंध आपणास पाहावयास मिळतो.

गढी- सातपुड्याच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. शेजारून वाहणारी वाननदी आणि या गावातच गावाच्या पाटलाची ‘गढी’ उभी आहे ही गढी म्हणजे त्या गावाचे पूर्व वैभव पांढ-या शुभ्र मातीत बांधलेली, ऊनवाऱ्यात आपले वैभव जपत उभी असलेली मात्र अलीकडे दिवसेंदिवस खचत चाललेली ‘बापू गुरुर्जी’ च्या उमेदीसारखी. पाटलाचा वाडा पडला तशी तीही उघडी पडली मात्र अजूनही ती ऊनपावसात तग धरून उभी आहे. गुरुजीही गावाचा विकास करत होते.

मात्र गावातील उचापती करणारे लोक गुरुजींच्या कार्यात अडथळे निर्माण करू लागले त्यामुळे गुरुजींना वाईट वाटत असे परंतु विरोधकांसमोर, उचाफी करणाऱ्या लोकांसमोर ते तग धरू शकत नव्हते. तर ते फक्त मनातल्या मनात दुःख व्यक्त करत होते. तसेच ‘गढी’ ने ही आता ऊनपावसमोर हात टेकले होते. काठाकाठाने ती आता खचत चालली होती. त्या गढीची पांढरी मगी मिटत असल्या कारणाने गढी दिवसेंदिवस खचावी असेच गाववाल्यांना मनोमन वाटत असे.

आणि गुरुजींही विकास कामापासून दूर झाले तर तेच काम करण्याची संधी गावातील विरोधकांना मिळणार होती. गढ़ी दर पावसाळ्यात खचत होती आणि उन्हाळ्यात गावातील माणसे गढीची माती विल्याने खणून नेत होते. आता मात्र ती पुरती खचल्याने तिच्या जागी मोठ्ठ पांढरं मैदान तयार झाले होते. एकेकाळी तिचे उभे असलेले वैभव आज असे पायदळी पडले होते.

तेच गुरुर्जीच्या विकासात्मक कार्याचे झाले. त्यांना गावासाठी नवनव्या योजना आणून विकास करायचा होता. मात्र गावात उलापती करणाऱ्या, गुरुजींच्या कार्यास विरोध करणाऱ्यांना तो विकास नको होता. त्यामुळे प्रसंगावधान राखून गुरुजीही माकार घेत होते. आणि निवृत्तीच्या काळात तर ते स्वतः हून बाजूला सरू लागले. अशाप्रकारे ‘गढी’ या प्रतीकातून गुरुजींच्या कार्याशी सहसंबंध जोडला आहे.

विभाग ४: उपयोजित मराठी

प्रश्न ४.
(अ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१) मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.
उत्तर:
(a) मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत घेताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून मुलाखत देणाऱ्यास प्रश्न विचारावेत.
(b) प्रश्नांची उत्तरे देण्याचे वा न देण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे.
(c) मुलाखतीचे सादरीकरण ओघवते श्रवणीय वा उत्स्फूर्त असावे.
(d) संयम, विवेक व नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देवून मुलाखत रंगतदार करावी. अशाप्रकारे मुलाखत घेताना या चार गोष्टी कराव्या लागतात.

(२) माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी थोडक्यात लिहा.
उत्तर:
माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी करताना माहितीपत्रकामध्ये दिली जाणारी माहिती आकर्षक पद्धतीने मांडता आली पाहिजे.
(i) माहितीपत्रकातील मांडणी सरधोपटपणे न कसा दिसताक्षणी ती वाचण्याची इच्छा झाली पाहिजे.
(ii) माहितीपत्रकासाठीचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी.
(iii) मुखपृष्ठ व मलपृष्ठ आकर्षक असावे.
(iv) शब्दांचा आकार योग्य असावा, शीर्षक, बोधवाक्य ठसठशीत असावे.
(v) माहितीपत्रकातील मांडणी आकर्षक करण्यासाठी त्यात्या क्षेत्रातील कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञांची मदत घेता येईल.

(३) अहवाललेखनाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
अहवाललेखनाची एकूण पाच वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
(i) वस्तुनिष्ठता आणि सुस्पटता
(ii) विश्वसनीयता
(iii) सोपेपणा
(iv) शब्दमर्यादा
(v) निष्पक्षपातीपणा

(i) विश्वसनीयता अहवाललेखनामध्ये दिलेली विश्वासार्ह माहिती व तथ्यांच्या नोंदीमुळे अहवाललेखनास विश्वसनीयता प्राप्त होते. अशा विश्वसनीयतेमुळेच कित्येकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुराव्यासाठी ग्राह्य धरले जातात हेच त्या अहवालाचे खास वैशिष्ट्य होय.

(ii) वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टताः कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार अहवाल लेखनात तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्याची नावे, पदे, घटना, हेतू, संस्थात्मक माहिती, निष्कर्ष अशा अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूक पद्धतीने केल्या जात असल्याने अशा नोंदी अधिक प्रमाणात सुस्पष्ट असतात.

(४) वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.
उत्तर:
मुलाखतीच्या माध्यमातून मुलाखत त्याचे अंतरंग रसिक श्रोत्यांसमोर उलगडत असते. मुलाखतीत मुलाखतदाता संघर्षमय जीवनाचा कथापट उत्तरांतून मांडत असतो. विशिष्ट ध्येय गाठत असताना वाटेत आलेल्या खाचखळग्यांचा केलेला सामना, त्या त्या वेळी दाखवलेली जिद्द अशा विविध प्रसंगांचे जणू स्मरणच मुलाखतदाता सर्वांसमक्ष करीत असतो. मुलाखतीत आपले अनुभव सांगत असताना आनंद आणि वेदना यांचे मिश्रण शब्दरूपातून अवतरत असते. मुलाखतदाता आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, कार्य यांचा आढावा उत्तरांतून घेत असतो. थोडक्यात, व्यक्तीच्या आयुष्याचा काळपट जाणून घेणे म्हणजे व्यक्तीमधील माणूस समजून घेणे होय. मुलाखतीतून हे शक्य होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions

(आ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१) मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती………
मुलाखत दात्याचे कार्य ……… प्रश्नांची निर्मिती
उत्तर:
मुलाखत घेण्यापूर्वी मुलाखतीची पूर्वतयारी काही प्रमाणात करावी लागते कारण या पूर्वतयारीवर मुलाखतीचे यश अवलंबून असते म्हणून काही मुद्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी करावी लागते.

(i) मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती: मुलाखत घेणाऱ्याला मुलाखत देणाऱ्याची वैयक्तिक माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यामध्ये मुलाखतदात्याचे पूर्ण नाव असेलतर टोपणनाव, त्याचे वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्रा, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व हुद्दा, मानसन्मान, मिळालेले पुरस्कार, लेखनकार्य, संस्कार, पडलेला प्रभाव इत्यादीविषयीची माहिती असावी लागते.

(ii) मुलाखतदात्याचे कार्यः मुलाखतदाता करत असलेले कार्य – सामाजिक-राजकीय धार्मिक- शैक्षणिक साहित्यिक यापैकी कोणत्या स्वरूपाचे आहे तसेच ते राज्यापुरते मर्यादित आहे की राष्ट्रस्तरीय याची माहिती घेणे अत्यावश्यक असते. मुलाखतदात्याच्या कार्यावर कोणाची छाप, प्रेरणा तसेच कार्य करतानाचे आलेले अनुभव याविषयीची माहिती मिळविते मुलाखतीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. मुलाखतदात्याला त्याच्या कार्यासाठी काहीवेळी मदत मिळते ती मदत आर्थिक, मानवी स्वरूपातीलही असू शकते.

संघटना, शासनाने घेतलेली दखल, मुलाखतदाता करत असलेल्या कार्याचा विस्तार त्याविषयी मिळविलेले पुरस्कार, मानसन्मान याविषयीही माहिती मिळवणे महत्त्वाचे असते कारण अशी माहिती मुलाखतीची पूर्वतयारी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

(ii) प्रश्नांची निर्मिती: मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी मुलाखतकर्त्याने मुलाखतीसाठी जो विषय घेतला आहे त्या विषयानुसार मुलाखत देणाऱ्या व्यक्तीस कशाप्रकारे प्रश्न विचारता येतील याविषयी विचार करून प्रश्नांची निर्मिती करता येते. प्रश्नाच्या माध्यमातून मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जास्तीत जास्त प्रभावी कसे करता येईल याचा विचार करून प्रश्ननिर्मिती करावी लागते. प्रश्नांची निर्मिती करताना मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वातील सर्व पैलूंना स्पर्श होईल हे पाहावे लागते मात्र होकारार्थी, नकारार्थी उत्तरे येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. विचारलेल्या प्रश्नातून जास्तीत जास्त प्रभावी उत्तरे कशी मिळतील तसेच मुलाखतीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने प्रश्नांची निर्मिती करावी.

(२) आठवडी बाजाराचे माहितीपत्रक तयार करा. आठवडी बाजाराचे माहितीपत्रकाचा उद्देश……….त्यात कोणत्या माहितीला प्राधान्य………आववडी बाजार
माहितीपत्रकाची उपयुक्कता …….. सरळ भाषाशैली.
उत्तर:
आडवडी बाजाराचे माहितीपत्रक:
आठवडी बाजार! खास जनसामान्यांच्या आग्रहास्तव
‘सकस’ आठवडी बाजार
गोळीबार मैदान, सोलापूर
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 12 09420000020, Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions 13 02182-255537
वेबसाइट: http//www.bajar.com
ई-मेल: [email protected]
आठवडी बाजार खास तुमच्या भेटीला, भरगच्च भाजीपाला
रोजच्या जेवणासाठी असो वा पाटी, लग्न, सणसमारंभ
खास पार्टी, जेवण वा बुफेडिनरसाठी आवश्यक असे
सर्वकाही खास तुमच्या आठवडी बाजारात खरेदी करा

० आठवडी बाजाराची खास वैशिष्ट्ये ०
देशी गाईचे शेण आणि गोमूत्र यांचा शेतीमध्ये

वापर करून नैसर्गिक शेती पद्धतीने पिकवलेल्या विषमुक्त भाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय भाज्या तसेच कडधान्य विक्रीसाठी उपलब्ध

बटाटा, कांदा, आद्रक, टोमॅटो, मीरची, हिरवा वटाणा, शेवगा, फ्लॉवर, दुधी भोपळा, लाल भोपळा, चक्की भोपळा, भेंडी, भरताचे वांगे, गोसावळे, कोबी, काकडी, वांगे, आवळा, लिंबू, स्विटकॉर्न, गाजर, सोललेला ऊस, पावटा, वाल, घेवडा

० पालेभाज्या ०
पालक, शेपू, मेथी, कांदापात, मीक्सभाजी, बिट, मुळा, पुदिना, आळू, गवती चहा, कोथिंबीर

फळे
चिकू, सीताफळ, शहाळे, देशीबोरे, पपई, डाळींब, पेरू कडधान्ये हुलगे, चवळी, मटकी, तूर, जीवस, देशीतीळ, कारळे, बाजरी, मूग घरपोच डिलिव्हरीची मोफत सोय…….
तुम्हाला परवडतील अशा किफायतशीर किंमतीत
सकस खा! मनसोक्त आनंद लुटा !!
वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:००
वारः आठवड्यातील प्रत्येक रविवार
आठवडी बाजार…..सकस आहार…….
शेतकऱ्याच्या कष्टाचा खास पाहुणचार !

(३) तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन करा.
अहवालाचा उद्देश….अहवाल लेखनात सुस्पष्टता व नीटनेटकेपणा………वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी वस्तुनिष्ठता .. …….. त्यात विश्वसनीयता………कार्यक्रमाच्या प्रत्येक बिंदूला आवर्जून घेणे.
उत्तर:
वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन-
वृक्षारोपण कार्यक्रम सन २०१९-२०
शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०१९-२० रोजी
सकाळी ११:०० वाजता
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात

सन् २०१९ या शैक्षणिक वर्षात ‘वृक्षारोपण कार्यक्रम’
मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘अश्वस्थ’ संस्थेचे अध्यक्ष कुशल सावंत यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी ग्रामपंचायतीचे लाडके सरपंच आशुतोष पाटील उपस्थित होते. साला बादप्रमाणे याही वर्षीच्या वृक्षारोपण कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भिलवडी येथे कनिष्ठ महाविद्यालयात सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सरपंच आशुतोष पाटील यांनी सुमारे एकहजार रोपे सोबत आणलेली भिलवडी येथे गोरस गडाच्या परिसरात व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कुशल सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण केले, सन्माननीय प्रमुख पाहुणे, प्राचार्य यांनीही वृक्षारोपण केल्यानंतर ‘अस्वस्थ’ संस्थेच्या अध्यक्षांनी २७ सप्टेंबर हे जागतिक वृक्षारोपण दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

सर्व विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण दिंडी काढली, त्यामध्ये सन्माननीय पाहुणे, अध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. वृक्षारोपण दिंडी महाविद्यालयाच्या प्रांगणात येताच. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या समवेत सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. दोन विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे अलविती या अभंगातून वृक्षारोपणाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात वृक्षजोपासण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमात शेवटी विद्यार्थी प्रतिनिधी संकेत गाडगीळ याने आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व प्राचार्याच्यां अनुमतीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.
दिनांक : २७ सप्टेंबर, २०१९-२०
सचिव-
अध्यक्ष

(४) वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्य लिहा.
त्यातील मजकूर …….त्याची आकर्षकता …….. वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ……… आपलीशी वाटणारी…… कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी …….. वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.
उत्तर:
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. वेगवेगळया संस्था / कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक काढत असतात. माहितीपत्रक यामुळे एकावेळी मोठ्या जनसमुदायापर्यंत सविस्तर माहिती पोहोचवता येते. कमी खर्चात, कमी वेळेत अधिकाधि ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते. माहितीपत्रकाचे नीटनेटके स्वरूप ग्राहकाला आकर्षित करीत असते.

माहितीपत्रकात ‘माहिती’ला अधिक महत्त्व असते. त्यामुळे माहितीपत्रकाच्या हेतूशी सुसंगत माहिती ग्राहकांपंत पोहोचवली जाते. जनमत आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रक म्हणजे पहिली पायरी असते. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद माहितीपत्रकाने साधला जातो. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते, तर ग्राहकाला उत्पादनाचा विश्वासाई आढावा घेता येतो. माहितीपत्रक उत्पादनविषयी उतावळी निर्माण करून ग्राहकाला आपलेसे करीत असते. त्यामुळे माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरात असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही.

विभाग ५: व्याकरण व लेखन

प्रश्न ५.
व्याकरणघटक व वाक्यप्रचार

(अ) कंसातील सूचनेनुसार कृती करा.

(१) (i) विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथाचे वाचन करावे. (आज्ञार्थी करा)
(ii) त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी स्क्कम आहे. (नकारार्थी करा)
उत्तर:
(i) विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथाचे वाचन करा.
(ii) त्याच्यासाठी हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही.

(२) पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
(i) विनाकारण
(ii) लोकप्रिय
उत्तर:
(i) कारणाशिवाय अव्ययी भाव समास
(ii) लोकांना प्रिय-विभक्ती तत्पुरुष समास

(३) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.
(i) अस्मिता रोज क्रिकेट खेळते.
(ii) अथर्वने बक्षीस मिळवले.
उत्तर:
(i) कर्तरी प्रयोग
(ii) कर्मणी प्रयोग

(४) पुढील तक्ता पूर्ण करा.
अलंकाराची वैशिष्ट्ये (अलंकार)

(i) उपमेयाचा निषेध केला जातो.
उपमेय हे उपमेय असूनही ते उपमेय
नाही तर उपमानच
आहे असे सांगितले जाते …………
उत्तर:
………. अपन्हुती अलंकार

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions

(ii) ……….. अनन्वय अलंकार
उत्तर:
उपमेय हे गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते
उपमेयाला योग्य असे उपमान मिळत नाही तर
उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते

(५) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(i) मन समेवर येणे
(ii) मनातील मळभ दूर होणे
उत्तर:
(i) मन शांत व एकरूप होणे’
बागेत लावलेली गुलाबाची झाडे फुलांनी बहरलेली पाहताच माझे मन समेवर आले

(ii) मनातील गैर समज दूर होणे
विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक विचारांचे खतपाणी घातले तर त्यांच्या मनातील मोहमायेचे मळभ दूर होऊन तिथे विवेकरूपी दीप प्रज्वलित होतो.

(आ) पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

१. खेळांचे जीवनातील स्थान
उत्तर:
खेळांचे जीवनातील स्थान
“आई, मी खेळायला जाऊ का ? ”
“इंग्रजीचे शब्द पाठ झाले का ? विज्ञानाचा धडा वाचला का ? होमवर्क पूर्ण झालं का ? उद्याचं दप्तर भरलं का ? ”

आई आणि मुलं यांची ही प्रश्नोत्तरं रोज घराघरांत चाललेली असतात. यातून लक्षात येतं की, आईच्या दृष्टीने खेळाचा प्राधान्यक्रम सर्वात शेवटचा आणि मुलाच्या दृष्टीने तो सर्वात पहिला. आईला हेही माहीत असतं की, खेळायला गेलेला मुलगा परत येण्याची सक्ती केल्याशिवाय मनाने येणार नाही. कारण ती त्याची मनापासूनची आवड आहे. खेळात रंगून जाणं, हा त्याचा (माणसाचा स्वभाव आहे.

इतका अग्रक्रम ज्या विषयाला असतो तो विषय बाल्यावस्थेबरोबरच संपतो. जसजशा इयत्ता वाढत जातात तसतसा खेळ खाली-खाली, शेवटी ढकलला जातो. ‘सहामाहीचे मार्क्स बघा. आतातरी खेळ कमी करा.’, ‘नुसतं खेळून परीक्षेत पास होता येत नाही. ‘ ‘खेळ तुझ्या आयुष्याचा खेळखंडोबा करील.’ असं जाता-येता ऐकून घ्यावं लागतं आणि नाइलाजाने मूल खेळाला आपल्या जीवनातून हद्दपार करतं.

जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर खेळाचं जीवनातलं स्थान अनन्यसाधारण आहे. खेळ माणसाला तणावापासून दूर ठेवतात. जीवनातलं अपयश, दुःख, निराशा यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत देतात. त्या गोष्टींकडेही खिलाडू वृत्तीने पाहायला शिकवितात. खेळामुळे व्यायाम घडतो. स्नायू आणि सांधे लवचीक राहतात. त्यामुळे मनाचं बळ वाढतं आणि आत्मविश्वास मिळतो.

‘बालः तावत् क्रीडासक्त:’ आद्य शंकराचार्यांनी चर्पटपंजरीत आसक्त हे क्रियापद किती यथार्थ वापरलं आहे! बालपणात खेळाशिवाय त्याला दुसरं काहीच नको असतं. व्यसनासारखी ती आसक्ती असते. पण त्यातून लहान मूल कितीतरी गोष्टी शिकतं आणि जगाचा अनुभव घेतं. खेळातून शिक्षण इतकं सहजपणे घडतं, म्हणूनच माँटेसरीबाईंनी शिक्षणपद्धतीत प्लेवेचा आग्रह धरला. सृष्टीतली रहस्यं अशा आनंददायी शिक्षणातून मुलांना समजतील असा त्यांचा विश्वास होतात.

मुलं शाळेत जाऊ लागली की, त्यांच्या खेळांवर थोडी वेळेची बंधनं येतात. खेळाबरोबर अभ्यासही करावा लागतो. शाळेतही खेळांचे तास असतात. ते ठेवण्यामागेही मुलांमध्ये संघभावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावं, पराभव झाला तरी तो खिलाडू वृत्तीने स्वीकारावा, दुसऱ्याचा विजय आनंदाने साजरा करावा अशी मनोवृत्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी हा उद्देश असतो.

मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्यामुळे बहुतेक शाळांमध्ये खेळांचं चित्र निराशाजनक दिसतं. आनंदासाठी खेळ हा विचार दुर्लक्षित होतो. एक तर स्पर्धेसाठी खेळा नाही तर खेलाच्या तासाला अभ्यास करा. असा सल्ला दिला जातो आणि एकदा का मुलगा-मुलगी दहावीला गेले की, त्यांच्या खेळाच्याच नव्हे तर आनंद मिळविण्याच्या सर्व वाटा बंद होतात.

महाविद्यालयातही ज्यांना खेळाची विशेष आवड असते अशीच मुले फक्त खेळतात. शालेय स्तरावरच बहुतेकांच्या जीवनातला खेळ संपुष्टात येतो.

क्रीडा ही एक कलाच आहे. त्यामुळे कलेचं माणसाच्या जीवनात जे स्थान आहे तेच क्रीडेचं आहे. परंतु आपल्या लोकसंख्येच्या मानाने आपल्या देशात खेळण्याच्या सुविधा अपुऱ्या आहेत. सुट्टीच्या दिवशी रहदारीच्या रस्त्यावर क्रिकेटचे रंगलेले डाव पाहिले की, याची कल्पना येते. खेळाची साधनं आणि मैदानं ही मुलानां, घराजवळ सहज उपलब्ध झाली पाहिजेत. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला देश ऑलिंपिक पदकात खालून तिसरा- चौथा कुठेतरी असतो. ही एकच गोष्ट खेळाला आपण किती नगण्य स्थान दिले आहे याचा पुरावा आहे. स्पर्धा संपेपर्यंत त्याची चर्चा होत राहते. क्रीडासंस्कृती रुजविण्याच्या घोषणा होतात. परंतु मग पुढचं ऑलिंपिक येईपर्यंत सारं कसं शांत-शांत असतं !

भारतात क्रिकेटचं वेड फार आहे. त्यामुळे त्यापेक्षा अवघड, अधिक कौशल्य आवश्यक असणाऱ्या खेळांचीदेखील प्रचंड उपेक्षा होते. ज्या खेळांमध्ये कमी गुंतवणूक करावी लागते, असे खो-खो, कबड्डी आणि देशी खेळ यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ‘खेळ’ या विषयाच्या अनुषंगाने असे अनेक विचार मनात येतात. कारण त्याचं जीवनातलं महत्त्वच तेवढं आहे. या जीवनालासुद्धा परमेश्वराची क्रीडा म्हटलं जातं, ते काही उगीच नाही.

२. महात्मा फुले एक थोर समाजसुधारक
उत्तर:
महात्मा फुले – एक थोर समाजसुधारक

महात्मा जोतीबा गोविंदराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक होते. समाजपरिवर्तनाच्या चळवळीचा पाया त्यांनी घातला. मानवी समानतेचा पुरस्कार करणारी आणि जातिभेद व धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी जोतीरावांनी आवेशाने सांगितली. समाजातील कनिष्ठ वर्गाच्या आर्थिक व सामाजिक शोषणाविरुद्ध त्यांनी लढा दिला. समाजात अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे ते पहिले उद्धारक होते.

महात्मा फुले यांचा जन्म १८२७ साली माळी समाजातील गो-हे यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले, शाळेत घातले. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. परंतु घरून विरोध झाला. मार्गांत अनंत अडचणी आल्या तरीही जोतीरावांनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले.

‘ज्ञान ही एक शक्ती आहे’ अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध. पद्धतीने असा सांगितला आहे.

“विद्येविना मति गेली। मतीविना नीति गेली ।।
नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले ।।
इतके अनर्थ एका अविद्येने केले.

स्त्री-शूद्रांनी शिक्षण घेतले तरच त्यांच्यातील मानसिक गुलामगिरी नाहीशी होईल व त्यांची उन्नती होईल. या विचाराने जोतीबांनी मुलींसाठी शाळा स्थापन केल्या, प्रौढांसाठी रात्रीचे वर्ग काढले. पाच हजार वर्षांच्या भारताच्या इतिहासात मुलींसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय म्हणजे महात्मा फुले हे भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक म्हणून ओळखले जातात.

१८४८ साली जोतीबांनी पुण्यातील बुधवार पेठेत पहिली मुलींची शाळा काढली. १८५१ साली रास्ता पेठेत मुलींची दुसरी तर १८५२ साली मुलींची तिसरी शाळा सुरू केली. मुलींना शिकविण्यासाठी स्त्री-शिक्षका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला – सावित्रीबाईना तयार केले. स्त्री-शिक्षणाला अनुकूल नसलेल्या समाजाचा प्रचंड रोष या पतिपत्नीला सहन करावा लागला. सावित्रीबाईंचा या शाळेत जाता-येता छळ झाला. तसेच जोतीरावांच्या वडिलांनी जोतीरावांना व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.

१८६० साली महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणेचे आणखी एक पाऊल टाकले. विधवा केशवपनास विरोध आणि त्यांचा पुनर्विवाह ही ती सुधारणा होय. १८६० व १८६४ साली जोतीरावांनी शेणवी विधवेचा विवाह लावला. तसेच १८६३ साली त्यांनी बालहत्याप्रतिबंधकगृह काढले. दलितांना पाणी भरण्यासाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. ब्राह्मण म्हणजे भूदेव ही त्या काळातील सामान्य माणसाची श्रद्धा होती.

मुलाच्या जन्मापासून त्याच्या निधनानंतर त्याच्या दहाच्यापर्यंत ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागत असे. त्याशिवाय माणसाला मोक्ष मिळणार नाही अशी त्या काळात ठाम समजूत होती. या ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध आणि मानसिक गुलामगिरीविरुद्ध ‘ब्र’ काढण्याची कुणाचीही हिंमत नव्हती या काळात जोतीबांनी समाजक्रांतीचे निशाण फडकवले.

१८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. विद्या, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. हजारो अनुयायी घडवले. डॉ. कीर व डॉ. मालशे यांनी ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ या ग्रंथात म्हटले आहे की, “ही चळवळ म्हणजे खेडुतांना शिक्षण नि ज्ञान देऊन त्यांच्या ठायी बसत असलेली अज्ञानादि पूर्वग्रहांची जळमटे झटकून टाकून आधुनिक संस्कृतीचे आणि ज्ञानाचे लोण त्यांच्यापर्यंत पोहोचविणारी एक सामाजिक प्रबोधिनी होती. ” पारंपरिक धार्मिक गुलामगिरीतून समाजाला मानसिक मुक्ती मिळवून देण्याचे कार्य या संस्थेतर्फे केले गेले.

महात्मा फुले यांनी १८५५ ते १८९० या काळात ‘तृतीय रत्न’ ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘सत्सार – २’, ‘सत्सार – १’, ‘अस्पृश्यांची कैफियत’ व ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ही पुस्तकें लिहिली. आपले क्रांतिकारी विचार त्यांनी त्यांच्या वाङ्मयातून पददलितांपर्यंत पोहोचविले. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथात शेतऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काही विधायक उपायही सुचवले आहेत. शंभर वर्षापूर्वीचे हे मौलिक विचार आजही लागू पडतात. यावरून जोतीरावांचे अलौकिक द्रष्टेपण दिसून येते.

लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात त्याप्रमाणे “हे विचार भारतातील लोकशाहीच्या क्रांतीच्या अग्रदूताचे विचार होत. सर्व मानवांचे जे जीवन व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता यांनी भरलेले आहे ते सामाजिक जीवन हेच पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य होय. ‘ अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर जोतीराव झगडत राहिले.

विद्या, सत्य व सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना ‘महात्मा’ म्हणून गौरवले. अशा या थोर समाजसुधारकाची प्राणज्योत २८ नोव्हेंबर १८९० रोजी मावळली. सामाजिक न्याय, बंधुभाव, सामाजिक समता या शाश्वत मूल्यांची देणगी समाजाला देऊन हा महापुरुष काळाच्या पडद्याआड गेला. जोतीराव गेले, पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले.

३. अंधश्रद्धांचे थैमान
उत्तर:
अंधश्रद्धांचे थैमान

‘नजीकच्या काळात शनी वक्री होत असून त्याचा वाईट प्रभाव आपल्या राशीवर पडून आपल्याला वाईट फळे मिळणार आहेत. ‘ ज्योतिषाच्या या भाकितावर विश्वास ठेवून, घाबरून एका गृहस्थाने स्वतःची व स्वत:च्या कुटुंबाची जीवनयात्रा संपवली.

वृत्तपत्रात आलेल्या या बातमीवरून समाजमनावर अंधश्रद्धेचा किती जबरदस्त पगडा आहे हेच दिसून येते. बुवा, साधू, महंत, महाराज यांच्याकडून फसवल्या गेलेल्या तरुण-तरुणींच्या शोकांतिकेच्या दुःखद वार्ता सतत आपल्या कानांवर येतात. माणसांचा दुःखद अंत करणारी अंधश्रद्धेची विषवल्ली समाजात सर्व ठिकाणी किती

खोलवर पसरलेली आहे याचा प्रत्यय आपल्याला ठायी ठायी येतो.

आज एकविसाव्या शतकात एकीकडे नवनवीन शोध लागून विज्ञान क्षेत्रात प्रगतीची घोडदौड सुरू असताना दुसरीकडे आपला समाज मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी न बाणता अंधश्रद्धेच्या घोर अंधारातच चाचपडत आहे. अंधश्रद्धा हा आपल्या समाजाला मिळालेला शाप आहे.

तथाकथित बुवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवणे, देवाला केलेला नवस फेडण्यासाठी पळत येऊन मंदिराच्या दगडी भिंतीवर टक्कर देऊन डोके फोडून घेणे, पाठीच्या कातडीतून धारदार गळ आरपार घालून घेणे, बैलगाडीवर ठेवलेल्या काठीवरच्या बगाडाला टांगून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती बैलगाडीवर ठेवलेल्या काठीवरच्या बगाडाला टांगून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती बैलगाडी पळवत नेणे, नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने देवापुढे बोकड मारून रक्तमांसाचा चिखल करणे, आगीवरून चालणे, धुळीत लोटांगणे घालत देवळाला प्रदक्षिणा घालणे, गणपतीपुढील यज्ञात लक्ष मोदकांची आहुती देणे, केसात जट निर्माण झाली की त्या मुलीचा देवदासीत समावेश करणे, पोटी मुलगा आला नाही, मरणोत्तर क्रियाकर्मे त्याच्याकडून घडली नाहीत तर स्वर्गाचे दार खुले होत नाही ही समजूत, शुभकार्यात विधवेचे पांढरे पाऊल न पडेल याची दक्षता घेणे, देवाच्या मूर्तीवर शेकडो लीटर दही, दूध, तूप, मध यांचा वर्षाव करणे अशासारख्या असंख्य अंधश्रद्धा समाजात मूळ धरून आहेत.

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळच्या जंगलात सात जणांचा निर्घृण संहार करण्यात आला. मुलगा व्हावा म्हणून बालकांचा बळी देण्याच्या घटना तर वारंवार ऐकायला मिळतात. मध्यंतरी केरळमध्ये एक भलामोठा पुत्रकामेष्ठी यज्ञ झाला. १००८ जोडऱ्यांनी हा यज्ञ केला व शेकडो टन शुद्ध तूप, उत्तम तांदूळ व लाकूड यज्ञासाठी वापरले गेले.

समाजात अंधश्रद्धा कशी फोफावली आहे याची अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. ग्रह, तारे, ग्रहण या सगळ्या गोष्टींची शास्त्रीय माहिती आज विज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे तरीदेखील ग्रहणकाल हा अशुभ असतो, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये यासारख्या अंधश्रद्धा असूनही समाजात मूळ धरून असल्याचे दिसते.

अंधश्रद्धा या केवळ अशिक्षित किंवा अल्पशिक्षितांतच असतात असे नाही तर उच्चशिक्षित व स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारी कित्येक उच्चपदस्थ माणसेही अंधश्रद्धा असे आचरण करताना दिसतात. १९९२ साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, पावसाने ओढ दिली होती. तेव्हा प्रत्यक्ष राज्यपालांनी आवाहन केले की, ‘अमुक दिवशी सकाळी ११ वाजता पावसासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, करुणा भाकावी.’

प्रार्थनेचे आवाहन करताना राज्यपाल आणि ते पाळणारे सर्व जण नेमकी एक मुद्द्याची गोष्ट विसरले की दुष्काळाचे प्रमुख कारण पावसाने दिलेला हिसका हे नाही तर महाराष्ट्राने पाण्याचा वापर नियोजनशून्यतेने, अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केला हे आहे आणि त्यावर प्रार्थना हा उपाय नाही. अंधश्रद्धांचे प्रमाण वाढतच असल्याचे आढळून येते. सध्याचा समाज अनेक ताणतणाव, दहशतवादाचे सावट इत्यादी समस्यांमुळे अस्थिर, भयग्रस्त झालेला आहे. वाढती लोकसंख्या, वाढते अपघात यामुळे आणखी समस्या निर्माण होते आहे.

एकट्या मानवाची शक्ती विश्वातील भयानकतेला अपुरी पडणारी आहे याची जाणीव माणसाला अंधश्रद्धेकडे नेते. स्वत:च्या अगतिकतेतून, शोषणातून, अस्थिरतेतून मनाला प्रासंगिक दिलासा देण्यासाठी अंधश्रद्धेचा भ्रामक पण हवाहवासा वाटणारा आधार माणसे घेतात. पण अंतिमतः तो माणसाला अधोगतीला नेणारा असतो.

अंधश्रद्धेची ही व्याधी नष्ट करायची असेल तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या हजारो संस्था या कार्यासाठी पुढे यायला हव्यात. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार समाजात करायला हवा. घटनेचा तर्कशुद्ध विचार करावयाचा, त्याला प्रयोगाची जोड देऊन मगच जरूर ते निष्कर्ष काढायचे. अशा पद्धतीने अनुभवाचा अर्थ लावण्याची कुवत निर्माण करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे व अंधश्रद्धा निर्मूलन करणे. १९७५ साली इंदिरा गांधींनी घटनादुरुस्ती करून नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हा भाग समाविष्ट केला.

या कर्तव्यांच्या यादीत शास्त्रीय दृष्टिकोनाचा मानवतावादी विचारांचा विकास करणे, चौकस बुद्धी वाढविणे यासाठी मनोवृत्ती सजग ठेवणे हे भारतीय नागरिकांचे प्रमुख कर्तव्य मानले आहे. प्रत्येक नागरिकाने जागरूकतेने कर्तव्य पालन केले पाहिजे. मानवी मूल्ये सर्वश्रेष्ठ मानून जगले पाहिजे. म्हणजे मग अंधश्रद्धांचे थैमान आपोआपच लयास जाईल व निकोप अशा विज्ञाननिष्ठ प्रगत समाजाच्या निर्मितीस सुरुवात होईल.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 1 with Solutions

४. मी रेडिओ बोलतोय
उत्तर:
मी रेडिओ बोलतोय…

“नमस्कार मंडळी, ओळखलत का मला? हे काय? तुमच्या चेहऱ्यावर चक्क प्रश्नचिन्ह दिसतय. म्हणजे ओळखलं नाहीत – तर! काय म्हणताय, आवाज ओळखीचा वाटतोय. अहो नुसतं ओळखीचा वाटतोय असं काय म्हणताय आठवा बरं जरा कोणाचा आवाज आहे ते. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी सकाळच्या मंगलसमयी माझे गोड सूर घराघरातून ऐकू यायचे. तसेच व्हायोलीनची सुंदर धून ऐकूनच नवीन आशांनी भरलेला तुमचा नवा दिवस सुरू व्हायचा आणि ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना घेऊन, रात्री आपल्या आवडीची मधुर गीते ऐकत ऐकतच तुम्ही निद्रादेवीच्या अधीन होत होता.

‘आपली आवड’ म्हटल्यावर आता तर नक्कीच तुम्ही ओळखलं असेल मी कोण ते! माझ्यावरून प्रसारित होणाऱ्या सुमधुर हिंदी-मराठी गाण्यांनी ज्यांचे तारुण्याचे दिवस मंत्रमुग्ध झाले त्या बुजुर्ग मंडळींना तर माझी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आँ? काय म्हणालात? हो हो तोच मी. अगदी बरोबर ओळखलत मला. आहे मीच तो तुमचा एकेकाळचा सखा रेडिओ ! आजकाल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माझा विसर पडला आहे. दूरचित्रवाणीचे आगमन झाले अन् तुम्ही सर्व जण तच्या झगमगाटात इतके गुंतून गेलात की एकेकाळच्या तुमच्या सख्याचा आवाजही तुम्हाला ओळखू येईना! जाऊ द्या, कालाय तस्मै नमः पण मी तुम्हाला सांगतो की, माझे कार्यक्रम अधिक जोमाने सुरू आहेत. त्यांची व्याप्ती आणि विषयांचे वैविध्यही वाढले आहे.

माझा आवाज लहरींच्या रूपाने हवेतून तुमच्यापर्यंत येतो. म्हणून तुम्ही मला आकाशवाणी, नभोवाणी असे संबोधता आणि माझे ब्रीदवाक्य आहे, ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’, समाजशिक्षण, समाजप्रबोधन, समाजाची वैचारिक, सांस्कृतिक उन्नती हेच माझ्या कार्यक्रमांमागचे मुख्य प्रयोजन आहे.

तुम्हाला ठाऊक आहे का ? भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मी केवढी मोठी कामगिरी केली आहे. सन् १९४२ च्या ‘चले जाव’ लढ्याच्या वेळी अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले होते व त्यांनी स्वतः चे नभोवाणी केंद्र चालवले होते. नेताजी सुभाषचंद्रांनी ‘चलो दिल्ली’ चा संदेश जनतेला माझ्याच माध्यमातून दिला.

तुम्ही शहरातले लोक मला विसरत चाललाय याचा खेद वाटतोय खरा. पण आशेचा किरण अजूनही आहे तो ग्रामीण भागात. शेतावरून दमून भागून आलेले शेतकरी दादा जेव्हा भजन, कीर्तन असे माझे कार्यक्रम ऐकण्यात रंगून जातात व त्यामुळे त्यांचे श्रम हलके होतात तेव्हा मला मनापासून आनंद होतो. रानावनात एकटाच हिंडणारा गुराखी सुमधुर गीते, बातम्या, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकतो तेव्हा त्याचे या विश्वासी चटकन नाते जोडले जाते. तेव्हा मला समाधान होते.

कृषिप्रधान भारतीय समाजातील ग्रामीण जनतेशी अनेकविध उपयुक्त कार्यक्रमांद्वारे आकाशवाणी संपर्क राखते. चालू जमाना, माझं घर माझं शेत, कृषिसल्ला, शेतीतील नवीन प्रयोगांची माहिती अशा अनेकविध कार्यक्रमांमुळे आकाशवाणीची ग्रामीण भागाशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. बालसंगोपन, आरोग्य शिक्षण याविषयीची जी थोडीफार जागृती ग्रामीण व आदिवासी भागात होत आहे ती आकाशवाणीवरील कार्यक्रमांमुळेच होय. आकाशवाणी आणि संगीत यांचं नातं तर अतूट असं आहे. रेडिओवरील संगीताचे कार्यक्रम सामान्यांना चटकन आपलेसे करतात तर गानरसिक श्रोत्यांना आणि कलावंतांना आनंदाच्या खजिन्याची गुहाच उघडून देतात.

आकाशवाणीच्या संग्रहातील अवीट गोडीची जुनी गाणी, शास्त्रीय संगीत तसेच वाद्यसंगीत म्हणजे आपल्या गानसंस्कृतीचा अमोल अक्षय असा ठेवाच ! महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या साजाने अजरामर झालेले गीतरामायण सर्वप्रथम प्रसारित झाले ते रेडिओवरूनच ! त्यावेळेला गीतरामायणाचा कार्यक्रम सुरू होण्याआधी लोक मला हार घालून माझीच भक्तिभावाने पूजा करत असत.

उत्तमोत्तम साहित्यकृतींची नाट्यरूपांतरे सादर करून मी सर्वसामान्यांना वाङ्मयाभिमुख बनवतो तर साहित्य रसिकांना भरभरून आनंद देतो.

महिलांच्या भावविश्वाचा, साहित्यउर्मीचा, कर्तृत्वाचा तसेच प्रगतीच्या नव्या वाटांचा शोध महिलांच्या कार्यक्रमात घेऊन महिलांच्या मनात आकाशवाणीने हक्काचे घर प्रस्थापित केले. खऱ्या अर्थाने समृद्ध सहजीवन कसे जगावे हे सांगताना पती-पत्नीमधील समृद्ध सहजीवन, पालक आणि मुलं यांच्यातला सुसंवाद, भावी जोडीदाराबद्दलच्या नवीन पिढीच्या उचित अशा अपेक्षा यासारख्या विषयांवर तज्ज्ञांच्या चर्चा माझ्या कार्यक्रमातून होतात.

त्या खरोखरच मार्गदर्शक असल्याचा अभिप्राय श्रोत्यांकडून मिळाल्यावर मला संतोष होतो, घटस्फोट, बालगुन्हेगारी, कैद्यांचे मानसशास्त्र अशांसारख्या मानसशास्त्रीय आणि सामाजिक प्रश्नांवरचेही तज्ज्ञांचे विचारमंथ श्रोत्यांना उपयुक्त ठरते. मुला-मुलींना वाढविताना भेद करू नये, स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्याच्या दिशेने प्रयत्नशील राहिले पाहिजे हा महत्त्वाचा विचार तर माझ्या अनेक कार्यक्रमांतून जनमानसात सातत्याने रुजवण्याचा प्रयत्न होतो.

लोकाभिमुखता हे माझ्या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्यच आहे. गण, गवळण, भारूड, धनगरी ओव्या गाणारे गायक, पारंपरिक वाद्य वाजवणारे वादक यांच्या लोकसंगीताचा मनोरम आविष्कार माझ्या कार्यक्रमातून होतो. सामान्यांच्या असामान्य कलेची, त्यांच्या मतांची तसेच त्यांच्या प्रश्नांची दखल माझ्या कार्यक्रमातून घेतली जाते. तेव्हा माझं ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य सार्थ झाल्याचं समाधान मला वाटतं.

तुमच्या कार्यक्रमात बाधा न आणता तुमचं मनोरंजन, उद्बोधन करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता माझ्यात आहे. तुमचा एकटेपणा दूर करण्याची जादू माझ्यात आहे. तुम्ही तुमच्या मित्राशी जसे हितगुज करता अगदी त्याप्रमाणेच मी तुमच्याशी हितगुज करतो आणि मी तुमच्याबरोबर कुठेही येऊ शकतो.

हा आणखी एक फायदा. कार्यक्रमात कोणताही भडकपणा, अतिरंजितपणा न आणता प्रेम, दया, करुणा, सहकार्य अशा मानवी मूल्यांचे संस्कार करणे, (ज्याची आज समाजाला नितांत गरज आहे.) हेच तर माझे उद्दिष्ट आहे आणि यासाठी मला तुमची निरंतर साथ हवी आहे. द्याल ना मला साथ ?

५. गप्पा मारण्याचे व्यसन
उत्तर:
गप्पा मारण्याचे व्यसन

एकदा मी कर्णबधिर मुलांच्या मंडळात गेले होते. त्यांच्यापैकीच एक मुलगा सापांबद्दल काही माहिती सांगणार होता. पण सगळे महिन्याभरांनी भेटलेले मित्र एकमेकांशी गप्पा मारण्यात इतके गुंतले होते की, त्याच्याकडे कोणाचं लक्षच जाईना! बरं ओरडून, काहीतरी आवाज करून लक्ष वेधावं तर त्याचा काही उपयोग नव्हता, कोणालाही बोलायला आणि ऐकायला येत नव्हतं, तरी हावभावांनी, खाणाखुणांनी त्यांच्या जिवाभावाच्या मित्रांशी गप्पा मात्र रंगल्या होत्या. शेवटी त्याने लाईटच्या बटणाची उघडझाप केली आणि आपल्याकडे लक्ष वेधलं.

अबोल माणसांची ही कथा तर मग बोलणाऱ्या गप्पांबद्दल काय बोलावं ? माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्याशी अनेक मार्गांनी संवाद साधायला आवडतो. माणसाला भाषा अवगत असल्यामुळे दोन माणसं एकत्र आली की त्यांच्या गप्पा सहज रंगतात.

काहींना तर सारखं बोलायला आवडतं, गप्पांचं त्यांना व्यसनच असतं. असं वाटतं की या लोकांचं तोंड चामड्याचं असतं तर फाटून गेलं असतं. आपलं बोलणं दुसऱ्याला ऐकायचं आहे की नाही, त्यात त्याला रस वाटतो आहे की नाही याचा विचार ते करत नाहीत. त्यांचे विषय तरी काय असतात ? उठल्यापासून मी काय काय केलं? तोच तो कंटाळवाणा विषय. काहींच्या बोलण्यात नुसती दुसऱ्याची टिंगल-टवाळी, स्वत:बद्दलची प्रौढी आणि स्वत:ला सर्व काही समजतं असा भाव. अशा लोकांशी गप्पा करणं म्हणजे शिक्षा वाटते. लोक त्यांना टाळतात. त्यांच्यापासून लांब राहतात किंवा त्यांचं बोलणं मध्येच तोडून टाकतात. पण ते या व्यसनाच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांना अपमानही कळत नाही.

काही व्यक्तीचं बोलणं मात्र श्रवणीय असतं. त्यांच्या सहज गप्पाही तर्कशुद्ध, स्पष्ट विचार व्यक्त करतात. अनुभवांची गाठोडी त्यातून उलगडतात. कधी एखाद्या राजकीय, सामाजिक घटनेवर किंवा कधी वाचलेल्या पुस्तकावर ते मतप्रदर्शन करतात तेव्हा आपणही विचारसमृद्ध होतो. अशा व्यक्तींना थोडं बोलतं करून ऐकत राहणं हा एक आनंद असतो.

गप्पांतून माणूस सहज व्यक्त होतो. तो जसा आहे तसा कळतो. विरंगुळ्यासाठी, ताण कमी करण्यासाठी मार्गदर्शन मिळविण्यासाठी माणसं गप्पा मारतात. गप्पांमुळे चित्त हलकं, होतं. खेड्यातले वड, पिंपळांचे पार, देवळं, नदीकाठ, समुद्रकाठ, कॉलेजकट्टे, बागा हे वेगवेगळ्या वयोगटातल्या माणसांचे गप्पांचे अड्डे ओसंडून चाललेले असतात.

आज तर फोन आणि मोबाईलमुळे एकमेकांना न भेटताही गप्पा मारता येतात. त्यात एसएमएसच्या लिखित गप्पांचीही भर पडली आहे. गप्पांचं व्यसन असणारी माणसं या सगळ्या गोष्टींचा अवलंब करतातच. पण एखादा माणूस त्यांच्या तावडीत सापडला की, ते त्यांना हवं आणि नको असलेलं सारं ऐकवितात. त्यांनी कितीही वेळा घड्याळाकडे पाहिलं तरी ते त्यांना सोडत नाहीत. समोरच्या माणसाची मोठी कठीण परिस्थिती होते. त्यातच झोप आली असेल तर त्याचं रागात रूपांतर होतं.

म्हणून गप्पा मारताना वेळेचं भान, मनावर संयम, आपल्या बोलण्यामुळे कोणात गैरसमज होणार नाहीत ना याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण शब्द हे एक शस्त्रही आहे, म्हणूनच ते जपून वापरलं पाहिजे. या शस्त्राचा विधायक उपयोगही होतो. रविकिरणमंडळाची निर्मिती अनेक कवीलेखकांच्या साहित्यिक गप्पांतूनच झाली. एखाद्या मोठ्या माणसाला मुलाखतीद्वारे बोलतं करून त्याच्याशी गप्पा मारत त्याच्या जीवनकार्याविषयी माहिती करून देणारी गप्पाष्टकं खूपच रंगताना आपण पाहतो – ऐकतो. त्यातून ऐकणाऱ्या गप्पा असोत की विवाहासाठी मुली पाहताना किंवा नोकरीसाठी मुलाखत घेताना मारलेल्या हवा-पाण्याच्या गप्पा असोत, त्या आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत.

आजकाल या कम्युनिकेशन स्किलला खूपच महत्त्व आहे. लोकांना बोलतं करणं, त्यांना हव्या त्या विषयावर बोलायला लावणं, सूचक प्रश्न विचारणं, यात करिअर करणंसुद्धा आज शक्य आहे. तेव्हा गप्पांची आवड असणाऱ्या लोकांना आता आपल्या गप्पा कॅशही करता येणार आहेत.

Maharashtra Board Class 12 Marathi Previous Year Question Papers

Leave a Comment