Bhagya

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात(स्थूलवाचन)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 15.1 ‘बिग 5’ च्या सहवासात Textbook Questions and Answers

1. केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:

प्रश्न 1.
केनिया पार्क्समध्ये फिरण्याचे थ्रिल पुढील मुद्दा विचारात घेऊन लिहा:
गेम ड्राइव्ह
उत्तर:
जंगलाचा फेरफटका मारणे म्हणजे ‘गेम ड्राइव्ह’ करणे व जंगलातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे हे ‘थ्रिल’ असते. केनियाच्या पार्कमध्ये रोज सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी चार-पाच तास ‘गेम ड्राइव्ह’ करण्याचा कार्यक्रम लेखकांनी आखला होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटाडोर गाड्या व फोरव्हीलर्स उपलब्ध होत्या. जंगलात फिरताना मोटारीचे छप्पर उघडण्यात येते.

त्यातून जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे फोटो मनसोक्त काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. हेतू हा की वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा उपयोग होतो. शिवाय कुठे एखादे दुर्मीळ जनावर दिसले, की तिथे पोहोचा, अशा प्रकारच्या सूचनाही देता येतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

2. टिपा लिहा:

प्रश्न 1.
केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका.
उत्तर : पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. एखादा दुर्मीळ प्राणी दिसला, तरच तात्पुरते झुडपात शिरावे, पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.

जनावरांशी बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खादय देऊ नये. सिंह, गेंडा, लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये. जनावरांचा पाठलाग करू नये. त्यांना त्रास देऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्कबाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत.

प्रश्न 2.
‘बिग 5’चे थोडक्यात वर्णन.
उत्तर:
सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे. तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना ‘बिग 5’ असे म्हणतात. सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. तो क्वचित शिकार करतो. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस होय. लेपर्डची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.

लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो. तो सावजाला ओढत झाडावर नेतो. त्याचे आयुष्य वीस वर्षे असते. त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे. चित्ता हा सर्वांत अतिचपळ प्राणी ताशी 100 किमी वेगाने पळतो. त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तो सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो. शिकार खायची नसेल, तर ती पालापाचोळचाने झाबून ठवतो.

3. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखक नकुरू ते मसाईमारा असा मोटारीने प्रवास करीत होते. दुपारचे जेवण आटोपून ते मारा सरिना लॉजकडे जात होते. इतक्यात फरीदने गाडी कमरेएवढ्या उंच गवतात घुसवली. पाहतात तो काय, गवतात वनराज सिंह मस्त विश्रांती घेत होते. सारे कुटुंब समोर आले. दोन-तीन सिंहिणी नि त्यांची दहा बाळे. शेजारी एक म्हैस मरून पडली होती. चारपाच बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होत्या.

खाऊन झाल्यामुळे सिंहराज तृप्तीने विसावले होते. एक सिंहीण सिंहाजवळ आली आणि ‘मी पाणी पिऊन येते, तू जरा बछड्यांना सांभाळ’ सिंहाला सांगून निघून गेली, असा जणू त्यांचा संवाद झाला असावा, असे लेखकांना वाटले. सर्व सिंह कुटुंबीय मोटारीला खेटून मोटारीच्या सावलीत मस्त पहुडले होते. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळत होता. त्यावर सिंहाने पंजा उगारून जणू ‘त्रास देऊ नकोस’ असे त्याला बजावले असावे. हा सगळा चित्तथरारक सोहळा ‘डिस्कव्हरी चॅनेल’वर पाहावा, तसा लेखकांच्या कुटुंबीयांनी अनुभवला.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

प्रवासवर्णन लिहूया:

प्रवासवर्णन म्हणजे एखादया स्थळाला भेट देऊन आल्यानंतर त्या ठिकाणचे घेतलेले अनुभव व त्या ठिकाणी पाहिलेल्या स्थळांचे बारकाव्यांसह निरीक्षण शब्दबद्ध करणे होय.

प्रश्न 1.
प्रवासवर्णन कसे लिहावे?
प्रवास वर्णन लिहिताना त्यात खालील मुद्द्यांचा विचार व्हावा.
1. प्रवासाचे ठिकाण: ठरवलेल्या ठिकाणची भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये, तेथील हवामान स्थिती, नियोजित ठिकाणी पोहोचण्याचे मार्ग या सगळ्याच्या पूर्वतयारीविषयी थोडक्यात माहिती घेणे आवश्यक आहे.

2. नेमके काय पाहिले: जिथे भेट देणार तिथले लोकजीवन, संस्कृती, वेशभूषा, बोलीभाषा खाद्यपदार्थ आणि अर्थातच निसर्ग, ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व इत्यादी.

3. सूक्ष्म निरीक्षण: प्रवास करताना निरीक्षणातून लक्षात आलेले छोटे बारकावे, तपशिलांची नोंद करून ठेवावी. लेख लिहिताना अशी काही निरीक्षणे नोंदवल्यास आपल्या लिखाणाला वेगळे परिमाण मिळते.

4. सहज संवादात्मक लेखन: प्रवासवर्णनाची शैली ही उत्कंठावर्धक तरीही सहज असावी. लिखाणातला ओघ कायम राहील याचे भान ठेवावे.

5. संस्मरणीय प्रसंग: प्रवासाचा आनंद घेता-घेता घडणाऱ्या अनपेक्षित घटना, प्रसंग, क्वचितप्रसंगी आलेल्या अडचणी, त्यांवर केलेली मात याचा उल्लेख प्रवासवर्णन लिहिताना जरूर करावा. प्रवासवर्णन म्हणजे प्रवासाच्या तयारीपासून सुरू होणारा हा सिलसिला प्रवास संपून, मूळ जागी येऊन स्वस्थता मिळेपर्यंत अव्याहतपणे आपसूक सुरूच असतो.

प्रवासातील वेगळेपण, निरनिराळ्या व्यक्ती, आलेले हटके अनुभव, काही अद्भुत गोष्टी या सर्वांची एक सुंदर अनुभूती तयार होते. सखोल निरीक्षणातून ती उठावदार बनते. त्यातून प्रवासवर्णन हा एक बोलका, अक्षरबद्ध नजारा तयार होतो. त्यामुळेच निरीक्षणे, माहिती, वैशिष्ट्ये, आलेल्या अडचणी आणि विलक्षण अनुभव तसेच केलेली धमाल, या सर्व गोष्टी सहजपणे लिहिल्या की प्रवासवर्णन तयार होते.

‘बिग 5’ च्या सहवासात Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात लेखकांनी आफ्रिकेतील ‘बिग 5’ प्राण्यांची माहिती त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह मांडली आहे. तसेच केनियाच्या अर्थव्यवस्थेविषयी अनोखा तपशील दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. जंगलांचा फेरफटका मारणे व त्यातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणे, हे ‘थ्रिल’ असते.

2. आफ्रिकेतील जंगलांचे स्वरूप दोन प्रकारचे आहे: (1) काही ठिकाणी उंच, घनदाट झाडांचे जंगल. (2) काही ठिकाणी झुडपांचे व सुकलेल्या गवताचे जंगल. घनदाट झाडीपेक्षा झुडपांत किंवा गवतात जनावरांचा शोध घेणे सोपे असते. जंगलात फिरताना ‘चिकाटी’ व ‘नशीब’ या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

3. केनिया सफारीत रोज सकाळ-संध्याकाळ चार-पाच तासांचा ‘गेम ड्राइव्ह’ (जंगलातील भटकंती) करण्याचा कार्यक्रम होता. पूर्ण प्रवासासाठी मॅटडोर गाड्या व फोरव्हीलर्सची व्यवस्था असते. जंगलात फिरताना या मोटारीचे छप्पर उघडण्यात येते. त्यामुळे जनावरांना जवळून पाहता येते व फोटो काढता येतात. प्रत्येक मोटारीत वायरलेस सेट असतो. त्यामुळे वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो; आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग होतो व जनावरांच्या ठिकाणांच्या सूचना देता येतात.

4. वासोनैरो नदीच्या काठी वसलेले ‘सरोवा साभा लॉज’ची रचना आकर्षक आहे. जणू झाडांवर उभारलेली पंचतारांकित झोपडी. वासोनैरो नदीची वैशिष्ट्ये:

 1. तिच्यात जवळजवळ सहा फूट लांबीच्या अजस्र शेकडो मगरी आहेत.
 2. दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे.
 3. आदिवासी मगरींच्या नजरा चुकवून धाडसाने नदी ओलांडतात.
 4. कधी कधी सुस्त पडलेली मगर चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते.

5. अंबरडट्स नॅशनल पार्क हे घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्क लॉजची वैशिष्ट्ये:

 1. संपूर्ण लाकडांच्या खोल्या व सभोवती पाण्याचे मोठे डबके.
 2. डबक्याजवळ प्रचंड दलदलीत खनिजयुक्त मीठ मिसळल्यामुळे जनावरे आकर्षित होतात व पाणी पिण्यासाठी येतात.
 3. लॉजच्या बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरी असल्यामुळे तिथून जनावरांचे दर्शन होते व फोटो काढता येतात.
 4. रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट.
 5. गॅलरीतला बार चोवीस तास उघडा असतो.
 6. दुर्मीळ जनावरे आली की प्रवाशांना उठवण्यासाठी बेलची व्यवस्था.

6. नकुरू तलाव व पार्क हा आफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मीळ पक्ष्यांचा परिसर आहे. नकुरू तलाव व पार्कची वैशिष्ट्ये:

 1. गुलाबी रंगाच्या दीड ते दोन लाख फ्लेमिंगोंचे वास्तव्य.
 2. दुर्बिणीतून फ्लेमिंगोंच्या हालचाली, तुरुतुरु पळणे, त्यांची परेड प्रेक्षणीय असते.
 3. चव्वेचाळीस चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा नकुरू तलाव खाऱ्या पाण्याचा आहे.
 4. फ्लेमिंगो मूळचे इथले. याच्या निळ्याशार पाण्यात फ्लेमिंगो अन्न शोधतात.
 5. पक्षिप्रेमींच्या दृष्टीने हा पार्क मोठा खजिनाच आहे.
 6. काळे व पांढरे मिळून जवळजवळ 80 गेंडे या पार्कमध्ये आहेत.

7. ‘बिग 5’ म्हणजे आकाराने मोठे असलेले पाच प्राणी :

 1. सिंह
 2. लेपर्ड-चित्ता
 3. गेंडा
 4. हत्ती
 5. जंगली म्हैस.

या पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणे अत्यंत कठीण असते.

8.  नकुरू तलाव ते मसाईमारा हा प्रवास लेखकांनी मोटारीने केला; कारण गवतात दुर्मीळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक होती. सरिना लॉजमध्ये जायच्या आधी लेखक व त्यांच्या साथीदारांना वनराज सिंह व त्याचे कुटुंब यांचे दर्शन घडले.

9. सिंहाची वैशिष्ट्ये:

 1. दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहिणीच करतात.
 2. सिंहीण अडचणीत असली, तरच सिंह धावून जातो. तो शिकार क्वचितच करतो.
 3. सिंह ताशी 60 किमी वेगाने पळतो. पण त्याचा स्टॅमिना खूप कमी. म्हणून 200 मीच्या टप्प्यात असलेलेच सावज पकडतो.
 4. सुमारे 30 जणांचे कुटुंब असते.
 5. सिंहाचे आयुष्य 15 ते 20 वर्षे असते.
 6. सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही. तरस त्याची पिल्ले पळवतात.
 7. नैसर्गिकरीत्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा मिळत नाही; कारण तरस त्यांना खातात.
 8. सिंहाचा एकमेव शत्रू माणूस आहे.

10. लेपर्डची वैशिष्ट्ये:

 1. लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते. मारलेले जनावर तो ओढत झाडावर चढवू शकतो.
 2. लेपर्डची शेपटी लांब असते. टोकापासून मध्यापर्यंत तिच्यावर ठिपके असतात.
 3. लेपर्ड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो.
 4. त्याची दृष्टी व श्रवणयंत्रे खूप तीक्ष्ण असतात.
 5. त्याचे आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते.
 6. लेपर्डच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त मागणी आहे.

11. चित्ता व त्याची वैशिष्ट्ये:

 1. जगातील सर्वांत चपळ प्राणी. ताशी 100 किमी वेगाने पळतो.
 2. त्याचे शरीर गोंडस, लवचीक, छाती भरदार व पाय लांब असतात.
 3. शिकार करायची पद्धत वेगळी आहे. सावजाजवळ दबकत जातो, एकदम हल्ला चढवतो नि गुदमरून टाकून त्याला मारतो.
 4. शिकार खायची नसेल तर पालापाचोळ्याने झाकून ठेवतो; कारण तरस आयती मिळालेली शिकार खाऊन टाकतात.

12. केनियाची अर्थव्यवस्था प्रमुख चार प्रकारच्या उत्पन्नांवर आधारित आहे:

 1. पर्यटन
 2. कॉफी
 3. चहा
 4. फुले (गुलाब). यात पर्यटन महत्त्वाचे आहे.

केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत सरकारची भूमिका: पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी केनिया सरकार अतिशय दक्ष आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना पाळावयाचे नियम:

 1. मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये. अगदीच दुर्मीळ प्राणी दिसला, तर झुडपात शिरावे; पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे.
 2. जनावरांच्या जवळ बोलू नये; टाळ्या वाजवू नयेत, खायला घालू नये.
 3. ‘बिग 5’च्या सभोवताली पाचपेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये.
 4. जनावरांचा पाठलाग करू नये व त्यांना त्रास देऊ नये.
 5. नियम मोडणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्कबाहेर काढण्याचे अधिकार सरकारने रेंजर्सना दिले आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15.1 'बिग 5' च्या सहवासात

9th Class Marathi Kumarbharati Lessons Answers भाग-३

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 15 निरोप Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप(कविता)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 15 निरोप Textbook Questions and Answers

1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:

प्रश्न (अ)
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण
1. मुलाचा वाढदिवस आहे.
2. तो रणांगणावर जाणार आहे.
3. त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
4. त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
उत्तर:
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण तो रणांगणावर जाणार आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

2. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:

प्रश्न (अ)
खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:
अशुभाची साउली.
उत्तर:
अशुभाची साउली: शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात, तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील, याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे.

प्रश्न (आ)
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण.
उत्तर:
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण: रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे, म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा, अशी मनापासून इच्छा आहे. म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून ‘पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण’ असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे.

3. कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 1
उत्तर:

कवितेचा विषय कवितेची भाषा कवितेतील पात्रे कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती आईने व्यक्त केलेली इच्छा
रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे. ओजस्वी आई व मुलगा जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज विजयी होऊन आलास
की माझ्या हाताने दूधभात भरवीन.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

4. काव्यसौंदर्य:

प्रश्न (अ)
‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी,’ या काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते – तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्रीछत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानीमातेने आशीर्वाद दिला होता, तशीच तुझ्या शस्त्रांना-अस्त्रांना भवानीमाता शक्ती देईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळींतून व्यक्त होते.

प्रश्न (आ)
‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन,’ या काव्यपंक्तींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वत:च्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्रकन्या आहे. वीरमाता आहे. काही अशुभ घडणार नाही, याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानीमातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे, हे मनात ठसव, अशी ती निर्धाराने सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवील. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळींतून दिसून येते.

5. अभिव्यक्ति:

प्रश्न (अ)
कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई, ही सामान्य आई नाही. ती वीरमाता आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते – तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांदयावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत की गळ्यात हुंदकाही दाटणार नाही.

मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्रकन्या आहे. मला जिजाई व राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावलीदेखील पडणार नाही. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. माय भवानी तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये, मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूधभात भरवीन. हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

प्रश्न (आ)
‘भारतभू ही वीरांची भूमी आहे,’ याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली; पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी । दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे.

उपक्रम:

प्रश्न 1.
सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.

भाषा सौंदर्य:

मुलींची कन्याशाळा, केसांची हेअरस्टाइल, ठंडा कोल्ड्रिंक, वटवृक्षाच्या झाडाखाली, शब्दाखाली अधोरेखित, हाय वे रोड, रायटिंगमध्ये लिहून दया, शेवटी एन्ड मस्त केलाय, पिवळा पितांबर.

शब्दांच्या या रचनेची ही गंमत पाहा. खरं म्हणजे भाषिकदृष्ट्या व अर्थाच्या दृष्टीने ही रचना चुकीची आहे; परंतु आपण बोलताना सहजगत्या अशा चुका वारंवार करतो. इतर भाषांच्या प्रभावामुळे हे असे घडत असले, तरी बोलण्यातील भाषिक चुका आपण लक्षात घ्यायलाच हव्यात. आमच्या घरी वर्तमानपत्र दररोज येते अशा वक्तव्याला एखादी मुलगी सहजपणे आमच्याही घरी मासिक/साप्ताहिक रोज येते, असे म्हणते तेव्हा नक्कीच हशा पिकणार.

अशा विविध रचनांतील चुका लक्षात घेऊन टाळण्याची सवय आपण आपल्याला लावून घेतली तर सुयोग्य भाषिक रचनेचा वापर आपण बोलताना करू शकतो.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 15 निरोप Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 3

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 6
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप 7

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.
अशुभाची साउलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
जिजा-लक्षुमींशी नाते.
याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांदयावरी या विसावे
शांति उदयाच्या जगाची.
तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी.
म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा;
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!
नाही एकहि हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनि ठेविली
तुझ्या तलवारीला धार.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी
1. पाय
2. डोळे
3. हात
4. कान.
उत्तर:
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी हात.

प्रश्न 2.
बाळाच्या खांदयावर विसावणारी ………………………..
1. उदयाच्या जगाची क्रांती.
2. भविष्यातील जगाची शांती.
3. आजच्या जगाची शांती.
4. आजची क्रांती.
उत्तर:
बाळाच्या खांदयावर विसावणारी भविष्यातील जगाची शांती.

2. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.

 1. शस्त्रांना शक्ती देणारी – [ ]
 2. आई स्वत:ला याची कन्या समजते – [ ]
 3. आईने धार लावून ठेवलेली – [ ]
 4. बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे – [ ]

उत्तर:

 1. भवानीमाता
 2. महाराष्ट्रकन्या
 3. तलवार
 4. शिवरायांचे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
बाळ चाललास रणा घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण
उत्तर:
सीमेवर लढावयास जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आई म्हणते-बाळा, तू रणांगणात लढायला चालला आहेस. या शुभकार्याच्या वेळी मी आनंदाने घराला तोरण बांधते आहे. माझ्या पंचप्राणांच्या उजळलेल्या ज्योतींनी मी तुला ओवाळते आहे.

कृती 4 : (विचारसौंदर्य | भावसौंदर्य / अर्थसौंदर्य / रस)

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – निरोप.
उत्तर:
निरोप
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → मराठीतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे.
2. कवितेचा विषय → रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाउलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे, हा या कवितेचा विषय आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

 1. घर = सदन
 2. औक्षण = ओवाळणी
 3. बाहू = हात
 4. डोळा = नेत्र
 5. मुख = तोंड
 6. सावली = छाया
 7. शक्ती = बळ
 8. हात = हस्त.

4. कवितेतून मिळणारा संदेश → वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रींना मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, याची ग्वाही देणारी ही कविता आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → देशरक्षणासाठी मुलाला रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चयी व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रकर्षाने दृष्टीस पडते.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!
→ रणात चाललेल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते-तू माझ्यापोटी जन्मलास ती माझी कूस तू कृतार्थ कर. तू विजयी होऊन आलास की माझ्या हातांनी अगदी मायेने मी तुला दूधभात भरवीन.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवयित्रिंनी केले आहे. तसेच श्रीशिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्रकन्येचा वारसा चालवत आहोत, असे ठामपणे सांगणाऱ्या आईच्या मनःस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केले असल्यामुळे, मनात आर्तता व वीरता जागवणारी ही कविता मला अत्यंत आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!’
उत्तर:
आशयसौंदर्य: रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी ‘निरोप’ या कवितेत केले आहे. वीरमाउलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, या आशयाचीही अभिव्यक्ती केली आहे.

काव्यसौंदर्य: युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानीमाय शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माउली म्हणते – तू विजयी होऊन ये. माझ्यापोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल; त्या वेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत है ओळींमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येतो.

भाषिक वैशिष्ट्ये: प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून, त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द अभ्यासा.

1. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा आणि समासाचे नाव लिहा:

 1. पंचप्राण
 2. महाराष्ट्र
 3. रणांगण
 4. दूधभात.

उत्तर:

 1. पंचप्राण : पाच प्राणांचा समूह -द्विगू.
 2. महाराष्ट्र : महान असे राष्ट्र-कर्मधारय.
 3. रणांगण : रण हेच अंगण-कर्मधारय.
 4. दूधभात : दूध आणि भात -इतरेतर द्वंद्व.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

 1. सावली
 2. दुःख
 3. स्वतंत्रता
 4. विजय.

उत्तर:

 1. सावली × ऊन
 2. दुःख × सुख
 3. स्वतंत्रता × परतंत्रता
 4. विजय × पराजय.

प्रश्न 2.
तक्ता पूर्ण करा: (उत्तरे ठळक अक्षरांत दिलेली आहेत.)
उत्तर:

एकवचन हुंदका ज्योत शस्त्र डोळा
अनेकवचन हुंदके ज्योती शस्त्रे डोळे

प्रश्न 3.
पुढील शब्दांपासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. चाललास
2. तलवारीला.
उत्तर:
1. चाललास – चाल, लस, सल, लाल.
2. तलवारीला – तरी, वारी, वाल, रीत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील अशुद्ध शब्द लेखननियमानुसार शुद्ध लिहा:

 1. ओक्षन
 2. वीक्रमि
 3. स्वरुप
 4. वीजयि.

उत्तर:

 1. औक्षण
 2. विक्रमी
 3. स्वरूप
 4. विजयी.

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:

 1. Lyric
 2. Action
 3. Exchange
 4. Exhibition.

उत्तर:

 1. भावगीत
 2. कार्यवाही
 3. देवाण-घेवाण
 4. प्रदर्शन.

निरोप Summary in Marathi

कवितेचा आशय:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आईच्या मनात आलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेत कवयित्रींनी ओजस्वी शब्दांत घडवले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

शब्दार्थ:

 1. रणा – रणांगणात.
 2. तोरण – शुभपताकांची माळ.
 3. विक्रमी – पराक्रमी.
 4. बाहू – हात.
 5. राखायची – रक्षण करायची.
 6. विसावे – विश्रांती घेते, थांबते.
 7. जाणते – उमगते, समजते.
 8. हुंदका – गहिवर.
 9. मुखावाटे – तोंडातून.
 10. अशुभ – वाईट गोष्ट.
 11. साउली – सावली.
 12. माझिया – माझ्या.

टिपा:

 1. औक्षण – पंचारतीने ओवाळणे.
 2. महाराष्ट्रकन्या – महाराष्ट्रात होऊन गेलेल्या वीरमाता, पराक्रमी स्त्रिया.
 3. जिजा – शिवछत्रपतींची आई, जिजामाता.
 4. लक्षुमी – झाशीची राणी लक्ष्मीबाई.
 5. भवानी – श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत, भवानीमाता.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

 1. निरोप देणे – जाण्यासाठी परवानगी देणे.
 2. अशुभाची सावली पडणे – विपरीत घडणे, अमंगल घडणे.
 3. कूस धन्य करणे – जन्म सार्थकी लागणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 15 निरोप

कवितेचा भावार्थ:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते – बाळा, तू रणांगणावर चालला आहेस हा शुभशकुन आहे. मी आनंदाने घराला तोरण लावते आहे. माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करते आहे. तुझे शुभ चिंतते आहे. तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. तुझ्या बळकट खांदयांवर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उदयाच्या जगाचा शांतिदूत ठरणार आहेस. म्हणून तू रणांगणात जातोस याचे मी दुःख करणार नाही. माझे डोळे आसवांनी ओथंबले नाहीत. मी सुद्धा महाराष्ट्रकन्या आहे. मला लढणे हा वीराचा धर्म माहीत आहे. वीरमातेचा वारसा माझ्याकडे आहे.

तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून हुंदका फुटणार नाही. उलट तुझ्या तलवारीला (शस्त्राला) धार मीच लावून ठेवली आहे. (संगीन मी स्वतः तुझ्या हाती सोपवली आहे.)

अशुभ गोष्टींची छायाही तुझ्यावर मी पडू देणार नाही. वीरमाता जिजाई आणि झाशीची लढवय्यी राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझे नाते आहे. तुझ्या शस्त्रांना (बंदुकांना) अस्त्रांना माय भवानी उदंड शक्ती देईल. भवानीमातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. रणांगणावर लढताना तू श्रीछत्रपती शिवाजी महारांजाच्या पराक्रमाचे स्मरण कर. विजयी होऊन ये नि माझ्यापोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल. तू आलास की माझ्या हातांनी प्रेमाने मी तुला दूधभात भरवीन.

9th Class Marathi Kumarbharati Lessons Answers भाग-३

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Textbook Questions and Answers

1. कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा:

प्रश्न 1.
कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा:
उत्तर:

 1. वानरेया – [ ]
 2. सर्वज्ञ – [ ]
 3. गोसावी – [ ]

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 1

3. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.

प्रश्न 1.
प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.
उतारा:
डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते. ते सी बाजत होते: तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करू लागलेः नाथोबाए म्हणीतलें: “नागदेयाः तू कैसा काही हीवसी ना?” तवं भटी म्हणीतलें: “आम्ही वैरागी: काइसीया हीवुः” यावरी सर्वज्ञ म्हणीतलें: “वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि की गाः” यावरि भटी म्हणीतलें: “जी जी: निर्वीकार तो कवणः”

सर्वज्ञ म्हणीतलें: “वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हेळाही जालाचि नाही: मा तु काइ वेगळा अससिः” “हो कां जी:’ यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपीला: “कव्हणी ऐकू कठीया असे: तो भोगस्थानाची सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः ‘कठीये हो नीके करीत असा: बरवे करीत असाः’ ते आइकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः तयासि कीर्तीचेचि फळ झालेः”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

4. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.

प्रश्न 1.
पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 2

5. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

प्रश्न 1.
आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारांवर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारांनुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करीत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टांची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र, आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो, असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच, नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला; अवगुण ठरला.

6. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणादवारे स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणादवारे स्पष्ट करा.
उत्तर:
आमच्या परिसरात अगदी अलीकडेच घडलेली घटना आहे. आमच्या परिसरातील शाळेचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला. यशस्वी विदयार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विदयार्थ्यांना व पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातही श्री. वसंतराव नाटेकर या शिक्षकांबद्दल तर खूप आदर वाटत होता. ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

आपण विदयार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले, रात्ररात्र जागरणे केली, जेवणाखाण्याची पर्वा केली नाही. स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, वगैरे त्यागाचे वसंतरावांनी भरभरून वर्णन केले. हे सर्व खरेच होते. पण बोलता बोलता ते स्वत:ची स्तुती करू लागले. तेव्हा लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर “मी नसतो तर विदयार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते,” असेही ते म्हणाले. यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. म्हणजे केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला. पाठातील तत्त्व आम्हांला या प्रसंगात पाहायला मिळाले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

भाषाभ्यास:

1. व्यतिरेक अलंकार:
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’
वरील उदाहरणातील उपमेय – [ ] उपमान- [ ]

व्यतिरेक अलंकाराचे वैशिष्ट्य- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. वरील उदाहरणात परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे मानले आहे. जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे मानले जाते तेव्हा तिथे व्यतिरेक’ अलंकार होतो.

प्रश्न 1.
पुढील उदाहरण वाचा व तक्ता पूर्ण करा:
तू माउलीहून मयाळ । चंद्राहूनि शीतल ।
पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 3
उत्तर:

उपमेय उपमान समानगुण
तू (परमेश्वर/गुरू) माउली मायाळूपणा
चंद्र शीतलता
पाणी पातळपणा

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Additional Important Questions and Answers

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 4

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 5

प्रश्न 3.
योग्य पर्याय ओळखून विधान पूर्ण करा :
………………………, म्हणून स्वामींनी दृष्टान्त सांगितला.
उत्तर:
(य) व्यापार चांगला व्हावा
(र) लोकांचे मनोरंजन व्हावे
(ल) नागदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा
(व) कामातले कष्ट कमी व्हावेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

प्रश्न 4.
दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा:
1. डोमग्रामी सकाळी सकाळी पुढील काम चालू होते: (भोगस्थानाची शुश्रूषा / जीवाचे वैराग्य /मातीचा व्यापार/मातीकाम)
2. श्रीचक्रधरस्वामी यांनी ज्यांना दृष्टान्त सांगितला, तेः (गोसावी / कठीया / नागदेवाचार्य / पुजारी)

उत्तर:

1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 6

2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 7

3. नागदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा, म्हणून स्वामींनी दृष्टान्त सांगितला.

4. मातीकाम

 1. नागदेवाचार्य.

5. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश: आपले मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली, तर त्याचासुद्धा अहंकार बाळगता कामा नये. हा अहंकार म्हणजे विकारच होय. सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले, तर तो खरा वैरागी होय.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पर्यायांतून योग्य पर्याय निवडा:

 1. महानुभाव पंथाचे संस्थापक – (श्रीचक्रधरस्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू)
 2. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ – (गोविंदप्रभुचरित्र, श्रीकृष्णचरित्र, लीळाचरित्र, दत्तात्रयप्रभुचरित्र)
 3. लीळाचरित्राचे लेखक – (श्रीचक्रधरस्वामी, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू )
 4. श्रीचक्रधरस्वामींचे गुरू – (भटोबास, म्हाइंभट, नागदेवाचार्य, श्रीगोविंदप्रभू )
 5. ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ हा दृष्टान्त कथन करणारे – (नाथोबास, नागदेव, म्हाइंभट, श्रीचक्रधरस्वामी)

उत्तर:

1. [नागदेवाचार्य]

 1. [श्रीचक्रधरस्वामी]
 2. [श्रीचक्रधरस्वामी]

2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 8

3. श्रीचक्रधरस्वामी

 1. लीळाचरित्र
 2. म्हाइंभट
 3. श्रीगोविंदप्रभू
 4. श्रीचक्रधरस्वामी

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

समास:

 • कमीत कमी दोन शब्द एकत्र येण्याच्या प्रक्रियेला समास म्हणतात.
 • दोन शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या जोडशब्दाला सामासिक शब्द म्हणतात.
 • सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात.

उदा.,

दोन शब्द सामासिक शब्द विग्रह
1. भाऊ/बहीण भाऊबहीण भाऊ आणि बहीण
2. नील/कमल नीलकमल नील असे कमल
3. तीन/कोन त्रिकोण तीन कोनांचा समूह

समासाचे प्रकार:

 1. समासात कमीत कमी दोन शब्द असतात.
 2. समासातील शब्दांना ‘पद’ म्हणतात.
  पहिला शब्द → पहिले पद दुसरा शब्द → दुसरे पद
 3. समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजेच प्रधान आहे, यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.

महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद (+)
कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद ( – )

समासांचे मुख्य चार प्रकार होतात:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 9

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

लक्षात ठेवा:

 1. अव्ययीभाव समास → पहिले पद प्रधान (उदा., दररोज).
 2. तत्पुरुष समास → दुसरे पद प्रधान (उदा., विदयालय, क्रीडांगण).
 3. वंद्व समास → दोन्ही पदे प्रधान (उदा., भाऊबहीण).
 4. बहुव्रीही समास → दोन्ही पदे गौण (उदा., नीळकंठ).

या इयत्तेत आपल्याला:

1. कर्मधारय
2. द्विगू
3. वंद्व (इतरेतर/वैकल्पिक/समाहार)
हे समास शिकायचे आहेत.

1. कर्मधारय समास:

 • कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे.
 • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते, त्यास कर्मधारय समास म्हणतात.

उदा.,
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 10
म्हणून ‘नीलकमल, मातृभूमी’ हे कर्मधारय समास आहेत.

2. द्विगू समास

 • द्विगू समास हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे.
 • ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असून दुसरे पद नाम असते, त्या तत्पुरुष समासाला द्विगू समास म्हणतात.

उदा.,
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 11
म्हणून ‘त्रिकोण, नवरात्र’ हे द्विगू समास आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

3. द्ववंद्ववं समास:

ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात, त्याला वंद्व समास म्हणतात.

द्ववंद्ववं समासाचे उपप्रकार:

द्वंद्व समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे

 1. इतरेतर द्वंद्व
 2. वैकल्पिक द्वंद्व व
 3. समाहार वंद्व असे तीन उपप्रकार पडतात.

1. इतरेतर द्वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:

1. स्त्रीपुरुष → स्त्री आणि पुरुष
2. आईवडील → आई व वडील

वरील दोन्ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण ‘आणि’, ‘व’ या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला.
जेव्हा वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘आणि, व’ अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात, तेव्हा त्यास इतरेतर वंद्व समास म्हणतात.
म्हणून ‘स्त्रीपुरुष, आईवडील’ हे इतरेतर द्वंद्व समास आहेत.

2. वैकल्पिक द्वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:
1. सुखदुःख → सुख किंवा दुःख
2. भेदाभेद → भेद किंवा अभेद

वरील दोन्ही सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण ‘किंवा’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला. जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘किंवा, अथवा, वा’ अशा उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात व दोन्ही पदे परस्परविरोधी असतात, तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ‘सुखदुःख, भेदाभेद’ हे वैकल्पिक द्वंद्व समास आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

3. समाहार वंद्व समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो, ते नीट पाहा:

1. गप्पागोष्टी → गप्पा, गोष्टी वगैरे
2. मीठभाकर → मीठ, भाकर वगैरे

वरील दोन्ही सामासिक शब्दांत अनेक गोष्टींचा समावेश आहे. म्हणून त्यांचा विग्रह करताना आपण ‘वगैरे’ या शब्दाचा वापर केला.
जेव्हा वंद्व समासातील सामासिक शब्दांत इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो व ज्यांचा विग्रह करताना ‘वगैरे, इतर, इत्यादी’ अशा शब्दांचा वापर होतो, तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. म्हणून ‘गप्पागोष्टी, मीठभाकर’ हे समाहार वंद्व समास आहेत.

4. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा:

 1. त्रिगुण
 2. भाऊबहीण
 3. नीलकमल
 4. स्त्रीपुरुष.

उत्तर:

 1. त्रिगुण → तीन गुणांचा समूह
 2. भाऊबहीण → भाऊ आणि बहीण
 3. नीलकमल → निळे असे कमल
 4. स्त्रीपुरुष → स्त्री आणि पुरुष.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

5. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
पुढील शब्द वाचून उपसर्गघटित व प्रत्ययघटित यांत वर्गीकरण करा: (नम्रता, उपवास, विरोधक, ममत्व)
उत्तर:

उपसर्गघटित प्रत्ययघटित
उपवास नम्रता
विरोधक ममत्व

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा:
1. बरवे = ……………….
2. दृष्टान्त = ……………..
उत्तर:
1. बरवे = चांगले
2. दृष्टान्त = दाखला.

प्रश्न 2.
प्रचलित मराठीतील समानार्थी शब्द लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 12
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त 13

प्रश्न 3.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
1. सुरुवात × ……………
2. प्राचीन × ……………
उत्तर:
1. सुरुवात – शेवट
2. प्राचीन × अर्वाचीन.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

प्रश्न 4.
पुढील शब्दापासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा : वीकारावेगळा : ……………………
उत्तर:

 1.  काळा
 2. राग
 3. वेग
 4. वेळा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. निर्वीकार, निविर्कार, निर्विकार, नीर्विकार.
2. दृश्टांत, दुष्ट्रान्त, दृष्टान्त, दृष्टांत.
उत्तर:
1. निर्विकार
2. दृष्टान्त.

कीर्ती कठीयाचा दृष्टान्त Summary in Marathi

प्रस्तावना:

‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो. इ. स. 1283 च्या सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला आहे. महानुभाव पंथाचे ज्येष्ठ शिष्य म्हाइंभट यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. ते बुद्धिमान, विद्वान व व्यासंगी होते.

‘लीळाचरित्र’ म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांचे चरित्र होय. स्वामींच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर म्हाइंभटांनी खूप परिश्रम घेऊन स्वामींच्या आठवणी एकत्रित केल्या. त्या आठवणी म्हणजे ‘लीळाचरित्र’ होय. यांतील एकेक आठवण म्हणजे एकेक लीळा होय. येथे कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ ही लीळा अभ्यासासाठी नेमलेली आहे.

प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारांपासून कोणीही दूर नाही. आपण अनेकदा केवळ वाईट विकार-वासनांनाच या बाबतीत गृहीत धरतो. पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हासुद्धा विकारच होय, अशी स्वामींची शिकवण होती. तीच या पाठात सांगितली आहे.

हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यांत फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

पाठाचा सरळ अर्थ:

एके दिवशी डोमग्राम या गावात सकाळी सकाळी श्रीचक्रधरस्वामींकडे मातीकाम चालू होते. त्या वेळी खूप थंडी वाजत होती. त्यामुळे भक्तांना काम करणे कठीण जात होते. मात्र भटोबास (नागदेवाचार्य) यांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा नाथोबांनी त्यांना , विचारले, “नागदेवा, तुला कशी थंडी वाजत नाही?” तेव्हा नागदेव म्हणाले, “आम्ही वैरागी. आम्हां वैराग्यांना कसली आली थंडी!’

त्यावर स्वामी म्हणाले, “राजे हो, (हे नरश्रेष्ठा,) प्रत्येक जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. हासुद्धा एक विकारच आहे.” मग नागदेवांनी विचारले, “हो; तर मग निर्विकार कोण?”

स्वामी उत्तरले, “जीव विकारापासून वेगळा कधी झालाच नाही. मग तू या जीवांपेक्षा वेगळा कसा काय?” नागदेव म्हणाले, “बरं, बरं.’ त्यावर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितला. तो दृष्टान्त असा: कोणी एक पुजारी होता. तो भोगस्थानाची (नैवेदयाच्या जागेची) देखभाल करीत असे. साफसफाई करीत असे. सडासंमार्जन करीत असे. (जमीन सारवून रांगोळी काढीत असे.) ते पाहून गावकरी म्हणू लागले, “गुरवांनो, तुम्ही खूप नेटके करीत आहात. छानच करीत आहात.” ते ऐकून तो पुजारी (स्तुतीने खूश झाला आणि) रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. परंतु देवता त्याला कोणतेही फळ देत नाही. त्याला फक्त कीर्ती मिळाली, म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले. अन्य काही नाही.

शब्दार्थ:

 1. सी बाजत होते – थंडी वाजत होती.
 2. व्यापार – काम.
 3. होववे ना – होईना, करता येईना.
 4. हीवसी ना – गारठला नाहीस, थंडी वाजली नाही.
 5. काइसीया – कशी काय, का, कशाला, कोणत्या कारणाने.
 6. हीवु – थंडी, गारठा.
 7. कवण – कोण.
 8. केव्हेळाही – कधीही.
 9. जालाचि – झालाच.
 10. कठीया – गुरव, पुजारी.
 11. भोगस्थान – देवाला नैवेदय दाखवण्याची जागा.
 12. सडासंमार्जन – सकाळी झाडलोट करून, जमीन गाईच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढणे.
 13. गावीचे – गावातले लोक, गावकरी.
 14. नीके – स्वच्छ, शुद्ध, नीटनेटके.
 15. बरवे – छान, चांगले.
 16. आइकौनी – ऐकून.
 17. दीसवडी – दररोज, प्रतिदिनी.
 18. नेदी – देत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त

टिपा:

1. डोमग्राम – डोंबेग्राम (गावाचे नाव), सध्याचे नाव ‘कमालपूर’, ता. नेवासे, जिल्हा अहमदनगर.

2. पाठात उल्लेखलेल्या व्यक्ती:

 1. गोसावी – श्रीचक्रधरस्वामी.
 2. भक्तीजन – श्रीचक्रधरस्वामींचे भक्त.
 3. भट – नागदेवाचार्य, ज्येष्ठ भक्त. यांनाच भट, भटोबास, नागदेव या नावांनीही संबोधले जाई. ते सतत चपळतेने वावरत. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी आपले भक्त नागदेव यांना प्रेमाने ‘वानरा’, ‘वानरेश’ असे संबोधित असत. ‘वानर’ किंवा ‘वानरेश’ यांमधील ‘वा’ हा प्रशंसावाचक शब्द असून, ‘नर’ किंवा ‘नरेश’ म्हणजे नरश्रेष्ठ राजा हा अर्थ पंथीय परंपरेनुसार रूढ झालेला आहे. ‘वानरा/वानरेश’ म्हणजे ‘वा राजे’ किंवा ‘वा नरश्रेष्ठा’ असा पंथीय परंपरेतील रूढ अर्थ आहे.
 4. सर्वज्ञ – श्रीचक्रधरस्वामी.
 5. कठीया – गुरव, पुजारी, मंदिरातील पूजाअर्चा, मूर्त्यांची देखभाल, गाभाऱ्याची देखभाल वगैरे कार्ये ज्याच्यावर सोपवलेली असतात ती व्यक्ती.
 6. गावीचे – गावचे, गावातील लोक, गावकरी, ग्रामस्थ.

3. दृष्टान्त – एखादे तत्त्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, एखादी कथा सांगितली जाते, त्या वेळी त्या दाखल्याला किंवा त्या कथेला ‘दृष्टान्त’ किंवा ‘दृष्टान्तकथा’ म्हणतात. इसापनीतीमधील सर्व कथा या दृष्टान्तकथाच होत.

4. महानुभाव पंथ: हिंदू धर्माच्या अंतर्गत निर्माण झालेला हा एक पंथ आहे. इसवी सनाच्या १३व्या शतकात हा पंथ निर्माण झाला. , रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्रीगोविंदप्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन पुढे दोन-तीन शतके या पंथाचा खूप प्रसार झाला. विशेषतः महाराष्ट्र, त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते मध्य भारत, पंजाब व काश्मीर एवढ्या भूभागांत या पंथाची वाढ है अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या झाली.

हा पंथ अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. त्या काळात कर्मकांडांचे स्तोम माजले होते. त्यामुळे खरा धर्म बाजूला पडला होता. कर्मकांडांतून जनतेची सोडवणूक करण्यासाठी श्रीचक्रधरस्वामींनी या पंथाची स्थापना केली. या पंथाचा जातीयतेला प्रखर विरोध आहे. जातिनिरपेक्षता, समानता व अहिंसा ही या पंथाची महत्त्वाची तत्त्वे आहेत.

5. श्रीचक्रधरस्वामी: हे महानुभाव पंथाचे संस्थापक होत. रिद्धिपूरचे ईश्वरावतार श्रीगोविंदप्रभू यांचे ते शिष्य. खेडोपाडी जाऊन त्यांनी आपल्या आचारधर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते अहिंसेचे पूजक होते. जातीयतेचे कट्टर विरोधक होते. आपल्या अनुयायांना ते आचारधर्माचे कठोरपणे पालन करायला लावत. मात्र, ते कोमल अंत:करणाचे होते. केवळ माणसांविषयीच नव्हे, तर प्राणिमात्रांविषयीही त्यांना ममत्व वाटे. आपल्या पायाखालची मुंगीही मरता कामा नये असे त्यांना वाटे.

9th Class Marathi Question And Answer भाग-१

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 7 दुपार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 7 दुपार Textbook Questions and Answers

1. तुलना करा:

प्रश्न 1.
तुलना करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 1
उत्तर:

कष्टकऱ्यांची दुपार लेखनिकांची दुपार
1. कष्टकरी उन्हातान्हात काम करतात. कार्यालयात खुर्चीत बसून काम  करतात.
2. सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात. सहकाऱ्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात.
3. शारीरिक कष्ट अमाप. शारीरिक कष्ट कमी.
4. साधने कष्टाची असतात. संगणकासारखे आधुनिक उपकरण.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

2. कोण ते लिहा:

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
(अ) दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [ ]
(आ) दुपारला आनंद देणारा घटक – [ ]
(इ) दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी – [ ]
(ई) सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक – [ ]
(उ) मानवी जीवनक्रमातील दुपार – [ ]
(ऊ) वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ – [ ]
उत्तर:
(अ) शेतकरी
(आ) मधल्या सुट्टीत खेळणारी मुले.
(इ) कार्यालयांतील लेखनिक व हिशोबतपासनीस.
(ई) दुपार
(उ) तारुण्य.
(ऊ) दुपार

3. आकृतिबंध पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 3

4. डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात.

प्रश्न 1.
डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात.
उत्तर:
हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.
स्पष्टीकरण: खूप जलद चालल्यावर माणसाला धापा लागतात. इथे डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत. म्हणजे गिरिशिखरांवर (निर्जीव वस्तूंवर) मानवी भावनांचे आरोपण केले अहे. म्हणून हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

5. खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा:

प्रश्न 1.
खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटांतून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा:
उदा., मित्र – दोस्त, मैत्री, सखा, सोबती

 1. रस्ता – बाट, मार्ग, पादचारी, पथ
 2. पर्वत – नग, गिरी, शैल, डोगर
 3. ज्ञानी – मुश, सुकर, डोळस, जाणकार
 4. डौल – जोम, ऐट, दिमाख, स्वाब
 5. काळजी – चिंता, स्याबदारी, विवंचना, फिकीर.

उत्तर:

 1. पादचारी
 2. नग
 3. सुकर
 4. जोम
 5. जबाबदारी

6. स्वमत

प्रश्न (अ)
‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
उत्तर:
आठवीनंतरच्या मे महिन्यापासून सक्तीने क्लास सुरू होतो. त्या बदल्यात आम्ही मित्र घरून भांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो. खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यांत आमची दुपार चिंब भिजून जाते. तळमजल्यावरचे काका खिडकीत पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात. तो आमचा मोठाच आधार असतो. क्वचित केव्हातरी टीव्हीवर सिनेमा बघण्यात दुपार जाते किंवा बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो. पण हे किरकोळ झाले.

क्रिकेट खालोखाल मे महिन्यातला दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी! पिझ्झा पार्टी, आइस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला तरी काहीतरी मिळालेले असते, खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टी होतेच. मग काय, वर्गणी काढतो आणि पार्टी करतो. ही दुपारची वेळ आम्हांला खूप आवडते. त्या वेळी आम्ही आमचे राजे असतो. त्या वेळी “पुरे झाले, आता चला घरी,’ असे कोणी सांगत नाही. मला नेहमी वाटते वर्षातून दोन-तीन वेळा तरी मे महिना यायला हवा!

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न (आ)
‘दुपार’ या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
उत्तर:
‘दुपार’ या ललित लेखातील मला आवडलेला प्रसंग आहे तो मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा. मला खरोखर खूप आवडला तो. तो वाचताक्षणी मला शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे दिवस झर्रकन आठवले. मधल्या सुट्टीची घंटा झाल्यावर अर्धे मिनिटसुद्धा थांबायला कोणी तयार नसतो. आम्ही डबा किती भरभर खायचो. अनेकदा तोंडात घास घेऊनच मैदानावर पळायचो. सातवीपर्यंत मी शाळेत डबा नेत असे. आठवी-नववीत मात्र डबा बंद केला. शाळेच्या कँटीनमधला वडापाव आम्हां सर्व मित्रांमध्ये लोकप्रिय.

तो वडापाव हातात घेऊन कबड्डीच्या मैदानात उतरलो होतो. विशेष म्हणजे सरांनीसुद्धा हसतहसत परवानगी दिली होती. मधली सुट्टी म्हणजे हैदोस होता नुसता! या मधल्या सुट्टीत आम्ही असंख्य गोष्टी केल्या आहेत. पाठातला हा प्रसंग लेखकांनी मोजक्या शब्दांत लिहिला आहे. पण सगळी मधली सुट्टी त्या तेवढ्या शब्दांत उभी राहते. म्हणून या पाठातला हाच प्रसंग मला सर्वाधिक आवडला आहे.

7. अभिव्यक्ती

प्रश्न (अ)
तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवालेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.

प्रश्न (आ)
पाठात आलेल्या ‘दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

भाषाभ्यास:

रसविचार

मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कलाकृती पाहताना, त्याचा आस्वाद घेताना मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उठतात. कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वानुभव समतेवर अवलंबून असते. ही अनुभवक्षमता शालेय वयापासून वृदपिंगत व्हावी, या दृष्टीने ‘रसास्वाद’ ही संकल्पना आपण समजून घेऊया. मानवाच्या अंत:करणात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात, त्यांना ‘स्थाविभाव’ असे म्हणतात. उदा., राग, दुःख, आनंद इ. कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना जागृत होतात व त्यांतून रसनिपती होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 4
साहित्यामध्ये गय-पदय घटकांचा आस्वाद घेताना आपण अनेक रस अनुभवतो. गदा-पदय घटकांतून चपखलपणे व्यक्त होणारा आशय, दोन ओळींमधील गर्भितार्थ, रूपकात्मक भाषा, पदय घटकांतील अलंकार, सूचकता, प्रसाद, मापुर्व हे काव्यगुण पदोपदी प्रत्ययास येतात. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात शाली, की त्यामुळे मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. भाषासमूदधीसाठी ‘रसास्वाद’ या घटकाकडे आवर्जून लश देऊया.

मनातील वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यातून अनुभवाला आली तर तिथे करुण रसाची निर्मिती होते. मनातल्या दुःखाचा निचरा, विरेचन होऊन (कथार्सिसच्या सिद्धांतानुसार) कारण्याच्या सहसंवेदनेचा अनुभव घेता येतो. आणि या प्रक्रियेतून काव्याचा आस्वाद घेता येतो. तसेच वैयक्तिक दाखाची भावना सार्वत्रिक होऊन तिचे उदात्तीकरण होते. अशा भावनांच्या उदात्तीकरणामुळे मी व माझा या पलिकडे जाऊन व्यक्तींच्या व समाजाच्या भावनांचा आदर कण्याची वृत्ती जोपासली गेली तर नात्यांमधील, व्यक्तीव्यक्तींमधील भावसंबंधाचे दृढीकरण होते.

कोणतीही कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. एखादी कलाफूती दिलगे, ती पाहणे व ती अनुभवणे हे कलाकृतीच्या आस्वादाचे टणे आहेत. केवळ डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. कोणत्याही कवितेचे, पाठाचे आकलन होऊन संवेदनशीलतेने कलाकृतीतील अर्थ, भाष, विचार, सौंदर्य टिपता आले पाहिजे. कवीला काय सांगायचे आहे याविषयी दोन ओळींमधील दडलेला मथितार्थ समजला तरच कवितेचे पूर्णाशाने आकलन होते व त्याच्या रसनिष्पत्तीचा आनंद घेता येतो. आपल्या पाठयपुस्तकातील प्रत्येक पात्र, प्रत्येक कविता, प्रत्येक घटकाकडे पाहण्याचा अर्थ समजून घेण्याची ही आस्वादक दृष्टी विकसित झाली, तर भाषेचा खरा आनंद प्राप्त होईल.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 7 दुपार Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 6

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा:
1. सूर्याची धमकी – [ ]
2. सूर्याचे प्रखर तेज – [ ]
उत्तर:
1. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलेस, तर डोळे जाकून टाकीन.
2. सर्व पृथ्वीला टिपवून टाकते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी – [ ]
उत्तर:
1. शेतकऱ्याची पत्नी

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला या उताऱ्यावरून जाणवलेली दुपारची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
सकाळचा सूर्य, दुपारचा सूर्य ही सूर्याची वेगवेगळी रूपे आहेत. या वेगवेगळ्या रूपांमुळेच सकाळ व दुपार या कालावधींना वेगवेगळी नावे मिळाली आहेत. सकाळ प्रसन्न असते. तिच्यात उल्हास ठासून भरलेला असतो; तर दुपार ही प्रखर सूर्यामुळे रौद्र रूप धारण करते. डोळे उघडून बाहेर पाहण्याची हिंमतही होणार नाही. अशी ही तप्त, रखरखीत दुपार शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे मायेने व आदराने पाहते. सकाळपासून केलेल्या कष्टाचा शीण घालवण्यासाठी तो वडा-पिंपळाच्या झाडाखाली विसावतो. पत्नीने आणलेला भाकरतुकडा तो समाधानाने खातो. त्याची पत्नी त्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहते. या दृश्याने दुपारला धन्य धन्य झाल्यासारखे वाटते.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
रिकामी जागा भरा:
कष्टकऱ्यांच्या दुपारचे वर्णन: ………………………………………
उत्तर:
खेडोपाडी गावे सुस्तावतात. घरकाम सांभाळणाऱ्या स्त्रिया घरकामे आटपून घटकाभरासाठी डोळे मिटून विसावतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
पक्ष्यांची विश्रांती:

 1. वडाच्या झाडावरील पक्षी: …………………………………….
 2. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी: ……………………..
 3. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचे काम केलेले पक्षी: ……………………………………..
 4. घरांच्या आश्रयाने राहणारी कबुतरे: ………………………………………..

उत्तर:

 1. वडाच्या झाडावरील पक्षी: किलबिलाट थांबवून सावलीत छानशी डुलकी घेत विश्रांती घेतात.
 2. शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी: मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेतात.
 3. सकाळपासून दाणापाणी मिळवण्याचे काम केलेले पक्षी: कुठे कुठे विश्रांती घेण्याच्या प्रयत्नात असतात.
 4. घरांच्या आश्रयाने राहणारी कबुतरे: गुटगू थांबवून कुठे तरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 8

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 10

प्रश्न 3.
विधान पूर्ण करा:
…………………….. हा दुपारचा कार्यरत राहण्यामागील हेतू असतो.
उत्तर:
पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी सर्वांना काही क्षण विश्रांती मिळावी, हा दुपारचा कार्यरत राहण्यामागील हेतू असतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्ही पाहिलेल्या दुपारचे वर्णन लिहा.
उत्तर:
आमच्याकडे दुपार तशी शांत शांतच असते. मी शाळेतून येतो. बाबा शेतावरून येतात. हातपाय धुवून जेवायला बसतात. आम्ही सगळेच जण एकत्र जेवायला बसतो. जेवल्यानंतर बऱ्याच वेळा बाबा शेतीतल्या कामांसंबंधी बोलतात. बोलता बोलता आईबाबा काही निर्णय घेतात. आई स्वयंपाकघराची आवराआवर करते. आम्हीपण कधी कधी तिला मदत करतो. बाबा अंगणातल्या बाकड्यावर पहडतात. क्षणातच झोपी जातात. आई चटई पसरून पहुडते. आमचा कुत्रा बाबांच्या बाकड्याखाली मुटकुळे करून पहुडतो. तो झोपण्यासाठी डोळे मिटतो खरा, पण प्रत्यक्षात जागाच असतो.

मधून केव्हातरी चटकन कान टवकारून पाहतो आणि पुन्हा शांत होतो. आवारातल्या आम्हा मुलांची मात्र त्या वेळी मजा होते. सगळे विश्रांती घेत असतात, म्हणून टीव्ही बंद ठेवावा लागतो. आम्ही मित्रमंडळी घराच्या मागच्या बाजूला पडवीत जमतो. कधी पत्त्यांचा खेळ, कधी गोट्यांचा खेळ रंगतो. हे सर्व अर्थातच शांतपणे. पण केव्हातरी आवाज वाढतो. मग मोठी माणसे कुठून तरी ओरडून दम देतात. मग सगळे शांत. केव्हातरी मी नववीत असल्याची आठवण कोणीतरी करून देतोच. मग थोडा वेळ पुस्तक घेऊन बसावे लागते. अशी ही मजेची दुपार असते.

उतारा क्र. 3

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
माहिती लिहा:
1. हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन.
2. सायकलरिक्षावाल्याची दुपार.
3. कारखान्यातील कामगारांची दुपार.
उत्तर:
1. हातगाडीवाल्याचे दुपारचे जीवन: हातगाडीवाला म्हणजे हातगाडीवरून लोकांचे सामान वाहून नेणारा हमाल. यात अमाप कष्ट असतात. दुपारपर्यंत बऱ्यापैकी कमाई झाली. उरलेल्या अवधीत चांगली कमाई होईल का, अशी चिंता करीत तो विश्रांती घेण्याच्या बेतात असतो. तेवढ्यात त्याला वर्दी मिळते. विश्रांतीची गरज असतानाही तो आळस झटकून गाडी ओढायला सिद्ध होतो.

2. सायकलरिक्षावाल्याची दुपार: सायकलरिक्षा तळपत्या उन्हात चालवून चालवून रिक्षावाला एखादी डुलकी घेण्याच्या विचारात असतो. पण तेवढ्यात त्याला लांबची वर्दी मिळते. म्हणजे जास्त पैसे मिळणार. म्हणून दमलेल्या शरीराची पर्वा न करता तो सायकलरिक्षा दामटतो. या रिक्षावाल्याची दुपार ही अशी असते.

3. कारखान्यातील कामगारांची दुपार: कारखान्यात पहिल्या पाळीचे कामगार कामावर हजर होण्यासाठी पहाटेच उठतात. दिवसभर यंत्राशी झगडत काम करतात. त्यामुळे दुपारी विश्रांतीची गरज असते. कामावरून सुटल्यावर डोळ्यांवरील झापड दूर सारत सारत धडपडत घरी पोहोचतात. त्याच वेळी त्यांचे दुसरे सहकारी विश्रांती हवी असताना कामावर हजर होण्यासाठी येतात. हे सुद्धा पोटासाठीच धावतपळत असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [ ]
उत्तर:
दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक – [कष्टकरी]

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
1. दुपार हातगाडीवाल्याला सलाम करते.
2. दुपार सायकलरिक्षावाल्याला सलाम करते.
3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते.
उत्तर:
1. दुपार हातगाडीवाल्याला सलाम करते : हातगाडीवाला हा काबाडकष्ट करणारा असतो. त्याच्या कामाला काळवेळेची मर्यादा नसते. किती वजन ओढायचे यालाही मर्यादा नसते. पैसे बहुधा त्या मानाने कमीच मिळतात. त्यामुळे दुपारची विश्रांती पुरेशी झालेली नसतानाही तो कष्ट करायला सिद्ध होतो. जीवन चालू ठेवायला सिद्ध होतो. म्हणून दुपार त्याला सलाम करते.

2. दुपार सायकलरिक्षावाल्याला सलाम करते: सायकलरिक्षा जिथे आजही चालू आहे, तो परिसर प्रचंड उकाड्याचा आहे. तळपत्या उन्हात सायकलरिक्षा चालवणे हे कोणालाही थकवणारे असते. त्याला दुपारी विश्रांतीची नितांत गरज असते. तरीही वर्दी मिळताच पोटाची खळगी भरण्याकरिता तो भर दुपारी सायकल मारत निघतो. त्याची ही जीवनावरची निष्ठाच असते. म्हणून दुपार त्याला सलाम करते.

3. दुपारला कारखान्यातील कामगारांविषयी कौतुक वाटते: कारखान्यातील काम तीन पाळ्यांमध्ये चालते. सकाळीच कामावर हजर झालेला कामगार दुपारी घराकडे निघतो. त्याच्या डोळ्यांवर झोपेची झापड असते. विश्रांतीसाठी तो अधीर झालेला असतो. त्याच्यानंतर दुसरे कामगार येतात. त्यांनाही खरे तर दुपारची विश्रांती हवी असते. पण सतत कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती असते. म्हणून दुपारला त्यांचे कौतुक वाटते.

कृती 3: (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला जाणवलेले कष्टकऱ्यांचे मोठेपण सांगा.
उत्तर:
हातगाडीवाले व सायकलरिक्षावाले हे कष्टकरी आहेत. किती ओझे वाहून न्यावे लागेल, किती अंतर जावे लागेल व त्यासाठी किती कष्ट पडतील, हे त्यांना ठाऊक नसते. पैसे बहुतेक वेळा कमीच मिळतात. तरी ते विश्रांतीची पर्वा करीत नाहीत. पोटाची खळगी भरण्याकरिता धावत असतात. एक प्रकारे ते जीवनचक्र चालू ठेवण्यासाठीच धडपडत असतात.

हेच कारखान्यातील कामगारांबाबतही घडते. त्यांचेही काम कष्टाचेच असते. मात्र या कामगारांच्या वेळा ठरलेल्या असतात. तरीही वेळा पाळण्यासाठी स्वत:च्या आरामाचा, स्वास्थ्याचा त्याग करतात. ही त्यांची स्वत:च्या कामावरची निष्ठा असते. कष्टकऱ्यांच्या त कामगारांच्या निष्ठेमुळेच हे जीवनाचे चक्र चालू असते. माझ्या मते, समाजाने त्यांचे ऋणी राहिले पाहिजे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

मुलांची कृती दिसून येणारी भावना
1. मधल्या सुट्टीत आरडाओरड
2. पटापट डबा खातात व हात धुतात.

उत्तर:

मुलांची कृती दिसून येणारी भावना
1. मधल्या सुट्टीत आरडाओरड उल्हास
2. पटापट डबा खातात व हात धुतात. खेळाची ओढ

प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा:

मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
1. ……………………………………………………………………..
2. ……………………………………………………………………..
3. ……………………………………………………………………..

उत्तर:

मुलांच्या मधल्या सुट्टीतील करामती
1. आरडाओरड करीत वर्गातून धूम ठोकतात.
2. पटापट डबा खाऊन हात धुतात.
3. राहिलेल्या थोड्या वेळात खेळ व मस्ती करतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. समोर काम येऊ नये, असे वाटते ती वेळ:
उत्तर:
1. दुपार.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
का ते लिहा:

 1. शहरातल्या कार्यालयातील लेखनिकांचे व हिशोबतपासनिसांचे लक्ष भिंतीवरील घड्याळाकडे असते.
 2. समोर नवीन काम येऊ नये, अशी त्यांची इच्छा असते.
 3. जिवाभावाच्या गप्पा मारतात.
 4. एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची चव चाखत जेवतात.

उत्तर:

 1. भूक लागलेली असते व डबा खायचा असतो म्हणून.
 2. निवांतपणे जेवता यावे म्हणून.
 3. ताजेतवाने होण्यासाठी.
 4. एकमेकांविषयी जिव्हाळा वाटतो म्हणून आणि विविध चवींचा आस्वाद मिळावा म्हणून.

उतारा क्र. 4

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 12

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 14

प्रश्न 2.
गाळलेल्या जागा भरा:
वृद्ध माणसांचे चिंतन:
1. ………………………..
2. ……………………….
उत्तर:
1. आतापर्यंतच्या आयुष्यात काय कमावले, काय गमावले, याचा विचार करतात.
2. स्वत:च्या भविष्याची चिंता करीत बसतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हाला जाणवलेले संसाराचे चक्र स्पष्ट करा.
उत्तर:
निसर्गात ऋतूंचे चक्र असते, पाण्याचे चक्र असते. प्राणवायू, कार्बन डायऑक्साइड वायू यांची चक्रे असतात. तसेच मानवी जीवनाचेही चक्र दिसून येते. बालपण व विदयार्थिदशा ही पहिली अवस्था आहे. तारुण्याची दुसरी अवस्था आणि वृद्धत्वाची तिसरी अवस्था असते. या अवस्था एकेका पिढीनुसार बदलत राहतात. आता बाल्यावस्थेत असलेली मुले पुढच्या पिढीत तरुण बनतात. त्याच व्यक्ती नंतरच्या पिढीत वृद्ध होतात. यांतील मधली पिढी ही तारुण्याची होय. या पिढीतील माणसे कर्ती-धर्ती असतात.

त्यांच्या कर्तबगारीवरच कुटुंबाचा व समाजाचाही गाडा चालू असतो. या टप्प्यात माणसे कामात गुंतलेली असतात, अपार कष्ट करतात. म्हणून संसाराचे रूप बदलते. दुपार हीसुद्धा दिवसाची मधली म्हणजे तारुण्यावस्था असते. म्हणूनच समाजाच्या विकासाची, पालनपोषणाची सर्व कार्ये या अवधीतच चालू असतात. दुपार ही तारुण्याचे प्रतीकच आहे.

उतारा क्र. 6

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोण ते लिहा:
1. तेजाने न्हाऊन निघणारी – [ ]
2. दुपारच्या रौद्र रूपाने अचंबित होणारी – [ ]
उत्तर:
1. बर्फाच्छादित गिरिशिखरे
2. बर्फाच्छादित गिरिशिखरे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 2.
उत्तर लिहा:
अचंबित करणारे दुपारचे कार्य – ………………………..
उत्तर:
समुद्राच्या पाण्याची वाफ करणे आणि डोंगरावरच्या बर्फाचे पाणी करणे, हे दुपारचे अचंबित करणारे कार्य आहे.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पाण्याचे चक्र काढा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार 15

प्रश्न 2.
दुपारचे मोठेपण सांगणारे उताऱ्यातील शब्द लिहा.
उत्तर:
दुपारचे मोठेपण सांगणारे लेखकांचे शब्द : कर्तृत्ववान, कामाची प्रेरणा देणारी, सृष्टीला कार्यरत करणारी, कर्तृत्वाच्या तेजाने तळपवून टाकणारी, हितकर्ती, रक्षणकर्ती, हवेतले कीटक व जंतू यांचा नाश करणारी, उदास नसून उल्हास आहे. अचेतन नसून सचेतन आहे. दीर्घकर्तृत्ववाहिनी, कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
लेखकांनी दुपारला उद्देशून केलेल्या दुपारच्या स्तुतीबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर:
लेखकांनी दुपारला उद्देशून लिहिलेला मजकूर म्हणजे दुपारचे स्तोत्रच आहे. ते अत्यंत योग्य आहे. एरवी लोकांच्या मनात दुपार म्हणजे कंटाळवाणा, त्रासदायक, नकोसा काळ असतो. पण लेखकांनी दुपारचे खरे रूपच आपल्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे दुपारबद्दलचे आपले मत बदलण्यास मदत होते. दुपारचा लखलखीत सूर्य म्हणजे दुपारचे तेज होय. या काळात माणसाच्या हिताची सर्व कार्ये चालू असतात. कंटाळा आला, थकवा आला, तरी लोक ही कार्ये चालू ठेवतात.

त्यामुळे मानवी समाजाची भरभराट होते. म्हणूनच लेखकांनी दुपारला मानवाची हितकर्ती, दीर्घ कर्तृत्ववाहिनी, कार्यप्रवण करणारी, वैभवाची वाट दाखवणारी असे म्हटले आहे. या काळातच कर्तबगारीला बहर येतो. म्हणून दुपार ही अचेतन नसून चेतना आहे, हे लेखकांचे विधान यथोचित आहे. एकंदरीत लेखकांनी दुपारला उद्देशून म्हटलेले सर्व काही मला पूर्णपणे पटते.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण लिहा:

2. समास:

प्रश्न 1.
सामासिक शब्दांवरून समास ओळखा:

 1. चौकोन →
 2. भारतमाता →
 3. बापलेक →
 4. धावपळ →
 5. खरेखोटे

उत्तर:

 1. विगू समास
 2. कर्मधारय समास
 3. इसमेतर वंद्व समास
 4. समाहार वंद्व समास
 5. वैकल्पिक वंदन समास.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

3. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘आळू’ प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
उत्तर:

 1. दयाळू
 2. ममतालू
 3. कृपाळू
 4. मायाळू.

4. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. कृतकृत्य होगे
2. ताव मारणे
3. धूम ठोकणे.
उत्तर:
1. कृतकृत्य होगे – अर्थ : धन्य होगे.
वाक्य: वंदा पास छान पडल्यामुळे शेतकरी कृतकृत्य झाले.
2. ताव मारणे – अर्थ : भरपूर जेबगे.
वाक्य: लानातील जेवणात जिलेबीवर बापूने ताव मारला.
3. धूम ठोकणे – अर्थ : पळून जाणे.
वाक्य: बापाची चाहूल लागताच हरणांनी धूम ठोकली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
प्रत्येकी दोन समानार्थी शब्द लिहा:

 1. धरती
 2. पाणी
 3. समुद्र
 4. पक्षी.

उत्तर:

 1. धरती = (1) धरणी (2) भूमी
 2. पाणी = (1) जल (2) नीर
 3. समुद्र = (1) सागर (2) रत्नाकर
 4. पक्षी = (1) खग (2) विहग.

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

 1. आनंद
 2. दिवस
 3. काळोख
 4. पुष्कळ.

उत्तर:

 1. आनंद × दुःख
 2. दिवस × रात्र
 3. काळोख × उजेड
 4. पुष्कळ × कमी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

प्रश्न 3.
वचन बदला:

 1. चिमणी
 2. सागर
 3. पक्षी
 4. खेडी.

उत्तर:

 1. चिमणी – चिमण्या
 2. सागर – सागर
 3. पक्षी – पक्षी
 4. खेडी – खेडे.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

 1. आशिर्वाद, आर्शीवाद, आर्शिवाद, आशीर्वाद.
 2. अवाढव्य, अवढव्य, अवाडव्य, अव्हाढव्य.
 3. विवचंना, वीवंचना, विवंचना, विहिवंचना.
 4. गिरीशिखरे, गिरिशिखरे, गीरिशीखरे, गीरीशीखरे.
 5. भूमीका, भूमिका, भुमिका, भुमीका.
 6. प्रतीनीधी, प्रतिनीधी, प्रतिनिधि, प्रतिनिधी.

उत्तर:

 1. आशीर्वाद
 2. अवाढव्य
 3. विवंचना
 4. गिरिशिखरे
 5. भूमिका
 6. प्रतिनिधी.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा:
1. सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे प्राणी पशू पक्षी झाडे वेली
2. दुपार म्हणते उठा आराम बास
उत्तर:
1. सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशू, पक्षी, झाडे, वेली.
2. दुपार म्हणते, ‘उठा-आराम बास.’

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

 1. Calligraphy
 2. Secretary
 3. Action
 4. Comedy

उत्तर:

 1. सुलेखन
 2. सचिव
 3. कार्यवाही
 4. सुखात्मिका.

दुपार Summary in Marathi

पाठाचा परिचय:

राजीव बर्वे हे प्रसिद्ध लेखक आहेत. तसेच, त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रांचाही त्यांना चांगलाच परिचय आहे. लोकांना साधारणपणे सकाळचा व संध्याकाळचा अवधी खूप आवडतो. त्यांची वर्णनेही खूप केली जातात. सकाळ-संध्याकाळवर कविताही लिहिल्या जातात. कथा-कादंबऱ्यांमध्ये, सिनेमांमध्ये सकाळ-संध्याकाळची वर्णने, प्रसंग खूप येतात. मात्र दुपारबद्दल अशी वर्णने जवळजवळ नसतात.

दुपार म्हणजे रखरखीत, तप्त जाळ असलेली, कंटाळवाणी, नकोशी वाटणारी अशी सर्वांची भावना असते. प्रस्तुत पाठात मात्र लेखकांनी दुपारबद्दल अत्यंत आत्मीयतेने लिहिले आहे. जगण्याची धडपड, नवीन जीवन घडवण्याची प्रेरणा व नवनिर्मितीची ऊर्मी दुपारमध्येच दिसते. जीवनाचे चक्र चालू ठेवण्याचे कार्य दुपार पार पाडते. दुपारच्या रूपांकडे लेखक प्रेमाने पाहतात. म्हणून या पाठात दुपारचे लोभस वर्णन आले आहे. शहरात, गावात, जंगलात दुपार कशी वेगवेगळ्या | रूपांत अवतरते, त्यांचे सुंदर वर्णन या पाठात आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

शब्दार्थ:

 1. उल्हास – आनंदाने भरलेला उत्साह.
 2. मध्यान्ह – दुपारची वेळ, दिवसाचा मध्य.
 3. रौद्र – प्रचंड क्रोध, संताप यांनी भरलेले अत्यंत भयंकर व भीतिदायक असे रूप.
 4. शिणवटा – थकवा.
 5. घरची लक्ष्मी – पत्नी.
 6. कृतकृत्य – धन्य.
 7. रपेट – फेरफटका.
 8. सांदीत – खाचेत, दोन बाजूंमधील अत्यंत चिंचोळ्या जागेत.
 9. सैलावलेली – सुस्तावलेली.
 10. घासाघीस – जास्तीत जास्त नफा मिळवू पाहणारा विक्रेता व कमीत कमी किमतीत वस्तू मिळवू पाहणारा ग्राहक यांच्यात
 11. किमतीवरून होणारी खेचाखेच.
 12. कार्यरत – कामात मग्न, कामात गुंतलेला.
 13. अव्याहत – सतत, न थांबता.
 14. अथांग – ज्याचा थांग (पत्ता) लागत नाही असा.
 15. मैलोगणती – कित्येक मैल.
 16. काहिलीने – प्रचंड उष्ण्याने.
 17. अचंबित – आश्चर्यचकित.

टीप:

मध्यान्ह:

मध्य+अन्ह, अहन् म्हणजे दिवस, ‘अन्ह:’ हे अहन्चे षष्ठीचे रूप, म्हणून अन्हः=दिवसाचा. ‘अन्हः’ हा शब्द मराठीत येताना त्यातील विसर्ग लोप पावला आहे. यावरून मध्यान्ह दिवसाचा मध्य.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 7 दुपार

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

 1. घाम गाळणे – खूप कष्ट करणे.
 2. कृतकृत्य होणे – धन्य होणे, धन्य धन्य वाटणे.
 3. चार पैसे गाठीला बांधणे – पैशांची बचत करणे.
 4. बेगमी करणे – भविष्यासाठी तरतूद करणे.
 5. भ्रांत असणे – विवंचना असणे.
 6. ताव मारणे – भरपूर खाणे, पोटभर खाणे.
 7. धूम ठोकणे – पळून जाणे.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers भाग-२

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 5 एक होती समई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 5 एक होती समई Textbook Questions and Answers

1. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख – [ ]
(आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था – [ ]
(इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे – [ ]
(ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे – [ ]
उत्तर:
(अ)अनुताई वाघ
(आ) बाल ग्रामशिक्षण केंद्र
(इ) प्राथमिक शिक्षण
(ई) आदिवासी बालक

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

2. खालील घटनांचे परिणाम लिहा:

प्रश्न 1.
खालील घटनांचे परिणाम लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 1
उत्तर:

घटना परिणाम
(अ) अनुताईंचे निधन. कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले.
(आ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. डोंगराएवढे दुःख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या.
(इ) ताराबाईंचे निधन. अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या.

3. कार्यक्षेत्र लिहा:

प्रश्न 1.
कार्यक्षेत्र लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 2.1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 3

4. का ते लिहा:

प्रश्न (अ)
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
उत्तर:
शिक्षण सर्वांगीण असले पाहिजे. ते एकांगी असता कामा नये. तसेच, केवळ चाकोरीबद्ध रितीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजेत, असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले. त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते. म्हणून शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न (आ)
अनुताईंच्या कार्याचा तुम्हांला जाणवलेला विशेष सांगा.
उत्तर:
आपल्याकडे शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण असा समज घट्ट बसला आहे. खरे तर शिक्षण जीवन जगण्यासाठी व लाभलेले जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी दिले जाणारे शिक्षण हे जीवनाभिमुख असले पाहिजे. ते जीवनाशी जोडले गेले पाहिजे. समाजात पूरक वातावरण तयार असले पाहिजे.

अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. कुटुंबकल्याणाकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता व आरोग्य यांबाबत समाजात जागृती हवी. तसेच, लहान मुले, मूकबधिर व महिला या घटकांना सक्षम केले पाहिजे. इतके व्यापक भान अनुताईंना होते. म्हणून त्यांनी शालेय , शिक्षणाबरोबर अन्य सामाजिक क्षेत्रांकडे लक्ष दिले आणि तेथेही भरीव । काम केले. अनुताईंच्या कार्याचा हा फार मोठा विशेष आहे.

5. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा:
1. भातुकलीचा खेळ
2. ज्ञानयज्ञ
3. ज्ञानगंगा.
4. पाऊलखुणा.
उत्तर:
1. भातुकलीचा खेळ: लहान मुलांचा, विशेषतः मुलींचा खेळ. यात खोटा खोटा संसार उभारला जातो. संसारोपयोगी चिमुकली भांडी आणली जातात. प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वावरतात, त्याचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो. बाहुला-बाहुलीचे लग्नही लावले जाते. थोडक्यात, भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा, आभासमय असा संसार.

2. ज्ञानयज्ञ: विधिपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो, अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. यज्ञात आहुती देतात, तशी अनुताईंनी स्वत:च्या जीवनाची आहुती दिली. म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय.

3. ज्ञानगंगा: गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी प्याल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघर पोहोचवणे म्हणजे सर्वांचे दु:ख, दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले, म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटले आहे.

4. पाऊलखुणा: या शब्दाचा शब्दश: अर्थ, चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा. त्या खुणांवरून, कोण चालत गेले, हे सांगता येते. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी काय, काय केले ते त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजे, त्यांच्या ‘पाऊलखुणा’ आहेत. या पाऊलखुणा जपल्या पाहिजेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

6. खालील ‌शब्दसमूहांसाठी‌ ‌एक‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌:‌

प्रश्न 1.‌ ‌
खालील ‌शब्दसमूहांसाठी‌ ‌एक‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌:‌
‌(अ) व्रताने‌ ‌स्वत:ला‌ ‌बांधणाऱ्या‌ ‌- [ ]
‌(आ) नेमाने‌ ‌स्वत:ला‌ ‌बांधणारा‌ ‌- [ ]
‌(इ) गावातील‌ ‌रहिवासी‌ ‌- [ ]
(ई) तिहाइताच्या‌ ‌भूमिकेतून‌ ‌बघणारा‌ ‌-‌ ‌[ ]
उत्तर:
(अ) व्रतस्थ‌ ‌
(आ) नेमस्त‌ ‌
(इ) ग्रामस्थ‌ ‌
(ई) भतटस्थ‌ ‌

7. खाली ‌दिलेल्या‌ ‌शब्दांचा‌ ‌उपसर्ग‌ ‌बदलून‌ ‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌ ‌:‌ ‌

प्रश्न 1.‌ ‌
खाली ‌दिलेल्या‌ ‌शब्दांचा‌ ‌उपसर्ग‌ ‌बदलून‌ ‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌ ‌:‌ ‌
उदा.,‌ 1.‌ ‌सापेक्ष‌ ‌×‌ ‌निरपेक्ष‌, ‌2.‌ ‌अनावृष्टी‌ ‌× ‌अतिवृष्टी.‌

 1. अनाथ‌ ‌
 2. दुश्चिन्ह‌ ‌
 3. सुपीक‌ ‌
 4. एकमत‌ ‌
 5. पुरोगामी‌ ‌
 6. स्वदेशी‌ ‌
 7. विजातीय‌ ‌

उत्तर:

 1. अनाथ × सनाथ
 2. दुश्चिन्ह × सुचिन्ह
 3. सुपीक × नापीक
 4. एकमत × दुमत
 5. पुरोगामी × प्रतिगामी
 6. स्वदेशी × परदेशी
 7. विजातीय × सजातीय

8. स्वमत:

प्रश्न (अ)
अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
समईचा प्रकाश मंद, शांत, स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत, निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. तिचा प्रकाश भगभगीत नसतो. भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळतच नाही. अनुताई वाघांचे व्यक्तिमत्त्व समईसारखे होते. त्यांच्याजवळ डामडौल नव्हता. भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून, त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटे. अनुताईंना दिलेली समईची उपमा यथार्थ आहे.

प्रश्न (आ)
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
समई देवाजवळच लावली जाते. घरात प्रकाश मिळावा, म्हणून अन्य दिवे वापरतात; समई नव्हे. देवाजवळची, गाभाऱ्यातली समई सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणून सतत तेवणारी ती समई. समईमध्येच सातत्य सामावलेले आहे. समई संपूर्ण घर, संपूर्ण महाल किंवा संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्षा बाळगत नाही. ती फक्त देवघर किंवा मंदिरातला गाभारा उजळते. पण उजळते म्हणजे झगझगीत प्रकाश पसरवीत नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत, निवांत करणारा असतो. मर्यादित प्रमाणात राहावे, ही तिची वृत्तीच जणू असते. म्हणून ती संयमी वाटते. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च, उदात्त भावनेने भारलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समईचे सामर्थ्य आहे

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

उपक्रम:

प्रश्न 1.‌ ‌
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.

भाषाभ्यास:

उपमेय व उपमान यांच्यातील साधर्म्यावर आधारित काही अलंकारांचा आपण अभ्यास केला. आता इतर काही अलंकार पाहूया.

1. दृष्टान्त अलंकार:
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)

1. संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?
[ ] आणि [ ]

2. (अ) चंदनाचा विशेष गुण – [ ]
(आ) संतांचा विशेष गुण – [ ]
चंदन सर्वांगाने सुगंधित-त्रिकालाबाधित सत्य
सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असते हे पटवून देण्यासाठी वरील उदाहरण दिले आहे.

3. दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये –
1. एखादी गोष्ट पटवून देणे.
2. ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे.

4. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते, तेव्हा ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न 1.
खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा.
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

 1. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात – [ ]
 2. रत्नासारख्या थोर ऐरावताला सहन करावा लागतो – [ ]
 3. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते – [ ]
 4. संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात – [ ]
 5. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात – [ ]

उत्तर:

 1. [लहानपण दे]
 2. [अंकुशाचा मार]
 3. [साखरेचा रवा]
 4. [नम्रपणा असावा]
 5. [थोर ऐरावताला अंकुशाचा मार]

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 5 एक होती समई Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:

 1. बालपणीच वैधव्य आलेल्या – [ ]
 2. अनुताईंचे अश्रू पुसणाऱ्या – [ ]
 3. प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या – [ ]
 4. ताराबाईंनी स्थापन केलेली संस्था – [ ]

उत्तर:

 1. अनुताई वाघ
 2. ताराबाई मोडक
 3. अनुताई वाघ
 4. बाल ग्रामशिक्षण केंद्र

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:

 1. वादळ झेलतात – ………………………………..
 2. वादळ पचवतात – ………………………………….
 3. ज्ञानयज्ञ तेवत ठेवला – …………………………………..
 4. कोसबाडची टेकडी हळहळली – …………………………..

उत्तर:

 1. मोठ्या संकटांना सामोरे जातात.
 2. संकटांचे निवारण करतात.
 3. ज्ञानप्रसाराचे कार्य दीर्घकाळ चालू ठेवले.
 4. कोसबाडच्या टेकडीवरील आदिवासी हळहळले, ते व्यथित झाले.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 5

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
हा उतारा वाचल्यावर अनुताई वाघांची तुमच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
अनुताई वाघांचा काळ म्हणजे सुमारे 100 वर्षांपूर्वीचा काळ. त्या काळाला धरून अनुताईंचे लग्न वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे इयत्ता आठवीत असण्याच्या वयात झाले. शाळेत मित्रमैत्रिणींबरोबर शिकण्याचे व खेळण्याबागडण्याचे हे वय. पण त्यांना हा नैसर्गिक उत्सव सोडून लग्न करावे लागले. पण लग्न, संसार म्हणजे काय, हे कळण्याच्या आतच, म्हणजे सहा महिन्यांतच, त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या विधवा झाल्या. त्या काळात विधवांचे जीवन खूप कष्टाचे, हलाखीचे व अपमानाचे होते. पण त्या वयातही त्या मनाने खंबीर राहिल्या. स्वत:ला खचू दिले नाही.

संकटांना तोंड देण्यासाठी स्वतः शक्तिमान असणे आवश्यक असते, हे त्यांनी ओळखले. स्वत:चे व्यक्तिमत्त्व अधिक बलशाली करण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेतले. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी संपादन केली. त्या स्वत:चे दुःख कुरवाळत बसल्या नाहीत किंवा संकटांना शरणही गेल्या नाहीत. दुःखाला सामोरे जाण्याचा त्यांनी वेगळाच मार्ग निवडला. त्या ताराबाई मोडकांच्या कार्यात सामील झाल्या. त्यांनी आदिवासी बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे ठरवले. त्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले. यावरून त्यांच्या मनातील उच्च, उदात्त मूल्यांचे दर्शन घडते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

उतारा क्र. 2

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 6
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 7

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
1. कपाळावर दारिद्र्याचा शाप असलेली – [ ]
2. प्रसिद्धीचा हव्यास नसलेल्या – [ ]
उत्तर:
1. आदिवासी बालके
2. अनुताई वाघ

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 8
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 9

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा:

आदिवासींची स्थिती अनुताईंचे कर्तृत्व

उत्तर:

आदिवासींची स्थिती अनुताईंचे कर्तृत्व
पराकोटीचे दारिद्र्य मायेची ऊब दिली व ज्ञानाची ज्योत पेटवली

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 10
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई 11

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्हांला या उताऱ्यावरून जाणवलेले उपाय लिहा.
उत्तर:
दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना प्रथम गरज असते ती मायेची. मायेच्या आधाराने त्यांच्यात ज्ञानाची ओढ निर्माण केली __ पाहिजे. अशा स्थितीत नेहमीचे चाकोरीबद्ध शिक्षक उपयोगाचे नाहीत. त्यांना शिकवण्याबरोबर मार्गदर्शन केले पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्याची भूमिका घेतली पाहिजे. तसेच, सतत नवनवीन प्रयोग करीत राहिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांकडे दूरदृष्टी असली पाहिजे. प्रथम प्राथमिक शिक्षण भक्कम केले पाहिजे. या शिक्षकांनी प्रसिद्धीपासून दूर राहिले पाहिजे. या सर्व बाबी पाळल्या तर दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना चांगले शिक्षण देता येईल.

उतारा क्र. 3:

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
अन्य क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठे काम केले आहे.
उत्तर:
आपल्या शाळांमधून दिले जाणारे औपचारिक शिक्षण एकांगी आहे. या शिक्षणाने एक चांगला नागरिक घडवता येणे अशक्य आहे. म्हणून शिक्षणाशी संबंधित क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठे कार्य केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
कल्पना स्पष्ट करा:
1. अंधश्रद्धा निर्मूलन
2. महिला विकास.
उत्तर:
1. अंधश्रद्धा निर्मूलन : अंधश्रद्धेमुळे माणसे चुकीच्या मार्गांनी जातात. स्वत:ची विचारशक्ती, विवेकबुद्धी गमावून बसतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत. यांमुळे माणसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सतत नुकसान, अपयश मिळत राहिल्याने ती हतबल होतात आणि पुन्हा अंधश्रद्धांच्या मागे लागतात. या परिस्थितीचा लबाड लोक गैरफायदा घेतात. ते दुबळ्या माणसांना लुबाडतात, म्हणून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी चळवळ, म्हणजे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ होय.

2. महिला विकास : शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी महिलांच्या सहकार्याची नितांत गरज असते. त्यासाठी प्रथम महिला सुधारल्या पाहिजेत. महिला कमावत्या असतील, तर त्यांना आत्मविश्वास येतो. त्या शिक्षित असतील, तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते. दृष्टी व्यापक बनते. मग घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार होते. महिलांना उपजीविकेची साधने मिळवून देणे, शिकू इच्छिणाऱ्यांना शिक्षण देणे, विविध कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवणे, स्त्रीपुरुष समानतेचा दृष्टिकोन रुजवणे या गोष्टी प्राधान्याने महिला विकासात येतात.

प्रश्न 2.
आशय स्पष्ट करा:
अनेक मानसन्मान अनुताईंच्या शोधात भटकत राहिले.
उत्तर:
वेगवेगळ्या कर्तबगारी गाजवलेल्यांना शासन व समाज सन्मान देऊन त्यांचा गौरव करतात. कित्येकजण हे सन्मान मिळावेत म्हणून गैरमार्गाने प्रयत्न करतात. अनुताईंना मात्र कार्य करण्यातच रस होता, त्यांचे कार्यच एवढे उत्तुंग होते की, त्यांचा सन्मान करावा, असे सर्वांनाच वाटत होते. म्हणून अनुताईंनी न मागता अनेक सन्मान त्यांना मिळत गेले.

उतारा क्र. 4:

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
का ते लिहा:
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
उत्तर:
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. त्यामागे रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. प्रचंड अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात. त्यांना नवीन सुधारणा नको असतात. सुधारणांमुळे आपले नुकसान होईल, अशी त्यांना भीती वाटते. म्हणून ते शिक्षणाला विरोध करतात.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील बाबींची घातकता सांगा:
1. रूढी
2. परंपरा
3. अंधश्रद्धा
4. स्थितिशीलता.
उत्तर:
1. रूढी: रूढींमुळे माणसे विचार करीत नाहीत, चिकित्सा करीत नाहीत. घातक प्रथा तशाच राहतात.
2. परंपरा: पूर्वापार चालत आलेली जगण्याची रीत म्हणजे परंपरा. परंपराप्रिय माणसे नवीन गोष्टींना, सुधारणांना विरोध करतात.
3. अंधश्रद्धा: भूताखेतांच्या, देवधर्माच्या खूप जुन्या कल्पनांवर श्रद्धा ठेवणे म्हणजे ‘अंधश्रद्धा’. अंधश्रद्धाळू माणसे विज्ञाननिष्ठेकडे पाठ फिरवतात. अंधश्रद्धेतून चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे खूप नुकसान होते. कधी कधी माणसांचे प्राणही जातात. अंधश्रद्धेमुळे प्रगतीच्या मार्गात अडचणी निर्माण होतात.
4. स्थितिशीलता: आहे त्याच स्थितीला चिकटून राहणे आणि त्याच स्थितीत राहण्यात आनंद मानणे, म्हणजे ‘स्थितिशीलता’. या वृत्तीमुळे प्रगती, विकास होत नाही. किंबहुना प्रगतीला विरोध केला जातो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:
1. ज्ञानाचा दिवा जपणे.
2. मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करणे.
उत्तर:
1. ज्ञानाचा दिवा जपणे: दिव्यामुळे प्रकाश पडतो. अंधार दूर होतो. आपल्याला स्पष्टपणे सर्व दिसते. ज्ञानामुळेही सर्व गोष्टींचा उलगडा होतो. सर्व घटना, प्रसंग, माणसे, माणसांचे वागणे आपल्याला कळते. म्हणून ज्ञानाला दिवा म्हणतात. ज्ञानाचा दिवा जपणे म्हणजे ज्ञान वाढवत राहणे.
2. मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करणे: मनात अज्ञानामुळे अंधार निर्माण होतो. कधी कधी अंधश्रद्धेने सत्य काय व असत्य काय हे कळत नाही. रूढींमुळेही हा गोंधळ उडतोच. भूताखेतांवर विश्वास ठेवल्यामुळेही मनात भीती निर्माण होते. हे सर्व अंधाराचेच प्रकार होत. या अंधारामुळे माणूस योग्य दिशेने प्रगती करू शकत नाही. ज्ञानामुळे हे सर्व अंधार नष्ट होतात. माणूस प्रगती करू शकतो.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
अनुताईंच्या मार्गातील खडतरपणा तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आदिवासींमध्ये कमालीचे दारिद्र्य असल्यामुळे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. वर्ग घेण्यासाठी साधी जागा मिळत नसे. बसण्याच्या सोयी, खडू-फळा या गोष्टीही मिळत नसत. अनुताईंनी या स्थितीलाही खंबीरपणे तोंड दिले. जेथे मिळेल तेथे वर्ग घेतले. प्रसंगी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी झोपडीत, तर कधी उघड्याबोडक्या माळावर वर्ग घेतले.

सर्व भौतिक सोयींची वानवा होतीच. पण आदिवासींची मानसिकताही शिक्षणाला पूरक नव्हती. पोट भरण्यासाठी भटकावे लागत असल्याने मुलांना शिक्षणासाठी मोकळे ठेवणे त्यांना परवडत नसे. शिवाय, अज्ञान, अंधश्रद्धा व रूढी-परंपरा यांच्या प्रभावामुळेही आदिवासी लोक शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत. त्यांना पुन:पुन्हा समजावून सांगून शिक्षणाकडे आणावे लागे. यात अनुताईंची बरीचशी शक्ती खर्च होई.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा:
1. चंदनाचे हात। पायही चंदन।
तुका म्हणे तैसा। सज्जनापासून।
पाहता अवगुण। मिळेचिना।। (संत तुकाराम)
2. संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?
[ ] आणि [ ]

2. (अ) चंदनाचा विशेष गुण – [ ]
(आ) संतांचा विशेष गुण – [ ]
उत्तर:
1. [सज्जन] आणि [चंदन]
2. (अ) [सुगंधित]
(आ) [त्यांच्यात अवगुण नसतो]

2. समास:

प्रश्न 1.
तक्ता भरा: (उत्तरे अधोरेखित केली आहेत.)
उत्तर:

सामासिक शब्द विग्रह
1. भेदाभेद भेद किंवा अभेद
2. गप्पागोष्टी गप्पा, गोष्टी वगैरे
3. मीठभाकर मीठ, भाकर वगैरे
4. केरकचरा केर, कचरा वगैरे

‌3. ‌शब्दसिद्धी‌:‌ ‌

प्रश्न 1.
‌उपसर्गघटित‌ ‌व‌ ‌प्रत्ययघटित‌ ‌यांत‌ ‌वर्गीकरण‌ ‌करा‌‌:‌
‌(नि:स्वार्थी,‌ ‌दिशाहीन,‌ ‌व्यावहारिक,‌ ‌प्रयत्न)‌ ‌
उत्तर‌:‌ ‌
उपसर्गघटित‌ ‌प्रत्ययघटित‌ ‌नि:स्वार्थी‌ ‌
दिशाहीन‌ ‌व्यावहारिक‌ ‌ प्रयत्न‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

4.‌ ‌वाक्प्रचार‌‌:

प्रश्न 1.
‌पुढील‌ ‌वाक्प्रचारांचा‌ ‌अर्थ‌ ‌सांगून‌ ‌वाक्यांत‌ ‌उपयोग‌ ‌करा‌‌:
‌1. ‌आयुष्य‌ ‌गमावणे‌ ‌
2. कोलमडून‌ ‌पडणे.‌
‌उत्तर‌:‌
‌1.‌ ‌आयुष्य‌ ‌गमावणे -‌ ‌अर्थ‌ ‌:‌ ‌जीवन‌ ‌संपवणे.‌ ‌
वाक्य‌:‌ ‌स्वातंत्र्यलढ्यामध्ये‌ ‌अनेक‌ ‌क्रांतिवीरांनी‌ ‌देशासाठी‌ ‌आपले‌ ‌आयुष्य‌ ‌गमावले.‌ ‌

2.‌ ‌कोलमडून‌ ‌पडणे‌ ‌-‌ ‌अर्थ‌ ‌:‌ ‌मनाने‌ ‌ढासळणे.‌ ‌
वाक्य‌:‌ ‌अतिवृष्टीने‌ ‌पिकांचा‌ ‌नाश‌ ‌झाल्यामुळे‌ ‌अनेक‌ ‌शेतकरी‌ ‌कोलमडून‌ ‌पडले.‌ ‌

(आ‌) भाषिक‌ ‌घटकांवर‌ ‌आधारित‌ ‌कृती‌ :

1.‌ ‌शब्दसंपत्ती‌:‌

प्रश्न 1.‌ ‌
पुढे‌ ‌दिलेल्या‌ ‌शब्दांचा‌ ‌उपसर्ग‌ ‌बदलून‌ ‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा‌ ‌:‌ ‌
उदा.,‌ 1.‌ ‌सापेक्ष‌ ‌×‌ ‌निरपेक्ष‌, ‌2.‌ ‌अनावृष्टी‌ ‌× ‌अतिवृष्टी.‌
1. आरोह‌ ‌
2.‌ ‌दीर्घायुषी.‌ ‌
उत्तर:
1. आरोह × अवरोह
2. दीर्घायुषी × अल्पायुषी.

प्रश्न 2.‌ ‌
तक्ता पूर्ण करा:

एकवचन टेकडी वर्ग
अनेकवचन क्षेत्रे ज्योती

उत्तर:

एकवचन टेकडी क्षेत्र वर्ग ज्योत
अनेकवचन टेकड्या क्षेत्रे वर्ग ज्योती

प्रश्न 3.‌ ‌
पुढील शब्दांतील अक्षरांपासून प्रत्येकी चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. जाणीवपूर्वक
2. शिफारस.
उत्तर:
1. (1) जाणीव (2) पूर्व (3) जावक (4) कणी.
2. (1) फार (2) फास (3) रस (4) सर.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

2. लेखननियम:

प्रश्न 1.‌ ‌
पुढील अशुद्ध शब्द लेखननियमांनुसार शुद्ध लिहा:

 1. दुरदृष्टि
 2. ओपचारिक
 3. स्थीतीशिल
 4. नीमुर्लन
 5. भातूकलि
 6. आदराजलि.

उत्तर:

 1. दूरदृष्टी
 2. औपचारिक
 3. स्थितिशील
 4. निर्मूलन
 5. भातुकली
 6. आदरांजली.

३. विरामचिन्हे:

प्रश्न 1.‌ ‌
नावे लिहा: (उत्तरे ठळक अक्षरांत दिली आहेत.)
1. [,] स्वल्पविराम
2. [;] अर्धविराम

एक होती समई Summary in Marathi

प्रस्तावना:

उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक व पत्रकार. त्यांना साहित्यनिर्मितीसाठी व पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यात गरीब, कष्टकरी सामान्य जनतेच्या जीवनाला प्राधान्याने स्थान मिळाले आहे. दीनवाणे, अगतिक जीवन लाभलेल्या तळागाळातील लोकांविषयी लेखकांना खूप आस्था आहे.

अनुताई वाघ (17 मार्च 1910-17 सप्टेंबर 1992) यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अनेक हालअपेष्टा सोसल्या. त्यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठात करून देण्यात आला आहे.

शब्दार्थ:

1. व्रतस्थ – कठोरपणे एखादया व्रताचे आचरण करणारे.
2. निरपेक्ष – कार्य केल्याच्या बदल्यात काहीतरी मिळण्याची अपेक्षा न ठेवता.
3. स्थितिशील – कोणताही बदल होऊ न देता, आहे त्याच स्थितीत राहण्याची वृत्ती असलेले.
4. औपचारिक शिक्षण – पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे शाळांमध्ये क्रमाने दिले जाणारे रूढ शिक्षण.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5 एक होती समई

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

1. कपाळावरील कुंकू पुसले जाणे – पतीला मृत्यू येणे, विधवा होणे.
2. डोळ्यांतले अश्रू पुसणे – दुःख दूर करणे, दुःख दूर करण्यास मदत करणे.
3. भविष्याचा वेध घेणे – भावी काळात काय काय होऊ शकेल याचा अंदाज बांधणे.

9th Std Marathi Kumarbharati Digest Pdf भाग-१

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 20.1 विश्वकोश Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश (स्थूलवाचन)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 20.1 विश्वकोश Textbook Questions and Answers

1. टिपा लिहा:

प्रश्न 1.
विश्वकोशाचा उपयोग.
उत्तर:
शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला. औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या. विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या. त्यामुळे आजच्या यंत्रयुगातील व विज्ञानयुगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अदययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली. मानव्यविदया, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्वसंग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निकडीचा उपयोग आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

प्रश्न 2.
विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया.
उत्तर:
मानव्यविदया, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयांचे अययावत ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. प्रथम विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित करण्यात आली. नोंदीचे तीन प्रकार करण्यात आले – मुख्य, मध्यम व लहान नोंदी. त्यांतील मुद्द्यांची टाचणे करण्यात आली.

नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या. प्रत्येक विषयातील नोंदींच्या त्यांच्या प्रकारांनुसार यादया तयार करण्यात आल्या. अकारविल्यानुसार या यादया क्रमवार लावण्यात आल्या. अशा प्रकारे 1976 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आतापर्यंत विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झाले आहेत.

2. ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते,’ याविषयी तुमचे मत लिहा.

प्रश्न 1.
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते,’ याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
विविध मासिकांमधून व वर्तमानपत्रांमधून पुरवण्यांच्या द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात. शब्दकोडे सोडवल्यामुळे अनेक जुने-नवे शब्द कळतात. आपली शब्दसंपत्ती वाढते. त्यामुळे बुद्धीत भर पडतेच पण आपल्याला शब्दांच्या अर्थछटा माहीत होऊन आपले ज्ञान वाढते. शब्दसमूहासाठी एक शब्द, एका शब्दांचे भिन्न अर्थ, प्रतिशब्द व विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमोल खजिना लुटता येतो.

उदाहरणार्थ, जंगल या शब्दाला – अरण्य, रान, वन, कानन, विपीन असे पर्यायी शब्द कळल्यामुळे आपण शब्दसंपन्न होतो. शब्दकोडे सोडवताना गंमत येतेच, शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंद मिळतो. कालानुरूप शब्दांच्या अर्थकक्षा कशा रुंदावल्या व फैलावल्या यांची जाण शब्दकोड्यामुळे येते. अशा प्रकारे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते.

3. विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा.

प्रश्न 1.
विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा.
उत्तर:
आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपला मदतनीस होतो. त्या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषयसाखळीमुळे त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शमवण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे. विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारते. आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते. मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागतात.

4. केशभूषेचे उद्देश सांगून, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.

प्रश्न 1.
केशभूषेचे उद्देश सांगून, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
उत्तर:
मोकळे केस इतरांना दिसू नयेत, म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी. या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा. लेण्यांमधल्या शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांनी केलेल्या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात. केशभूषेचा मुख्य उद्देश हा आकर्षकता व सौंदर्य वाढवणे हा आहे. सामाजिक संकेतानुसार प्रतीकात्मक केशभूषा करणे, हा केशभूषेचा सामाजिक उद्देश ठरतो. केशभूषेत केस कापणे, केस धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे किंवा सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

5. विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.

प्रश्न 1.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
उत्तर:
मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञानक्षेत्रांबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे. मराठी भाषेची व्युत्पत्ती, तिचा इतिहास, वेदांपासून ते अदययावत साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे. मराठी भाषेतील प्राचीन काव्य, अनेकविध रचनाबंध समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल. मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाने माझे व्यक्तिमत्त्व संपन्न होण्यास मदत होईल.

भाषा सौंदर्य:

विश्वकोश अकारविल्ल्यानुसार (अनुज्ञेय) पाहाबा हे आपल्याला कळले. त्यासाठी संपूर्ण वर्णमाला (आता अँव ऑ हे स्वर धरून) आपल्याला क्रमाने मुखोद्गत असायला हवी. त्या योग्य वर्णाची आणि त्यांची उच्चारस्थाने, परिपूर्ण आकलनही असावयास हवे. (उदा., स्वर, स्वरादी, व्यंजन, महाप्राण, मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके).

प्रश्न 1.
पुढील कोडे सोडवा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 1

 1. पैसे न देता, विनामूल्य.
 2. पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
 3. जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
 4. रहस्यमय.
 5. खास महाराष्ट्रीय पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.

उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 2
वरील कोडे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे उत्तर तुम्हाला सोडवायचे आहे. हे कोडे सोडवल्यावर तुम्हांला निश्चितच भाषेचे सौंदर्य व गंमत लक्षात येईल. अशा कोड्यांचा अभ्यास करा. त्यातील भाषिक वैशिष्ट्ये समजून घ्या व अशी विविध वैशिष्ट्यांची कोडी तयार करण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

मैत्री तंत्रज्ञानाशी:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 3
वडील: (सोनालीच्या आईशी बोलताना.) “अग, लाईटबिल भरण्याची अंतिम तारीख आजच आहे; पण आज माझी ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे. काय करावं बरं?”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 4
सोनाली: “बाबा, एवढी काळजी कशाला करता, लाईट बिलच भरायचय ना? आणा इकडे, मी भरते एका मिनिटांत, तेही उन्हातान्हात बाहेर न जाता, धावपळ न करता.”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 5
सोनाली: “अग आई, एवढं आश्चर्यानं काय पाहतेस? आपल्याकडे संगणक आहे, आंतरजाल आहे. आता आपण ऑनलाईन बिल घरच्या घरी भरू शकतो. चल आई, मी तुला ऑनलाईन बिल कसे भरायचे ते दाखवते.”

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 6
आई: (मुलगी ऑनलाईन बिल भरते. आई-वडील तिच्या कृतींचे निरीक्षण करतात.) “शाबास बाळा! किती आत्मविश्वासाने संगणक हाताळतेस. बाजार करणं, बिलं भरणं, खरेदी करणं, वस्तू विकणं, असे ऑनलाईन व्यवहार मलाही शिकव.”

प्रश्न 1.
कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.
उत्तर:

 1. लाईट बिल भरणे
 2. टेलिफोन बिल भरणे
 3. गॅसचे बिल भरणे
 4. आवश्यक वस्तू खरेदी करणे
 5. वस्तू विकणे
 6. गृहोपयोगी वस्तूंची मागणी करणे
 7. प्रवासासाठी बस, रेल्वे, विमान किंवा खाजगी वाहन यांची बुकिंग करणे
 8. भेटवस्तू पाठवणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

उपक्रम:

प्रश्न 1.
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेले विविध अॅप्स कोणते?
त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवा.

विश्वकोश Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात विश्वकोशाची ओळख करून दिली आहे. विश्वकोश का व कसा तयार झाला, वेगवेगळे संदर्भ मिळवण्याची आनंददायी प्रक्रिया, भाषासमृद्धी, तसेच एका विषयाच्या निमित्ताने अनेक संलग्न विषयांची माहिती मिळणे, ही विश्वकोशाची वैशिष्ट्ये आहेत.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. आपल्या शाळेत, गावात, शहरात ग्रंथालय (वाचनालय) असते. मराठीतील विविध साहित्यसंपदा व अनेक विषयांची पुस्तके उपलब्ध होतात. मराठी विश्वकोश, मराठी चरित्रकोश, मराठी व्युत्पत्तिकोश इत्यादी ग्रंथसंपदा हा प्रत्येक ग्रंथालयाचा ‘मानबिंदू’ आहे.
2. मानव्यविदया (Social sciences), विज्ञान (Pure science) व तंत्रज्ञान (Technology) यांतील सर्व विषयांचे आजतागायतचे ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोशाचा उपयोग होतो.
3. विश्वकोशाची गरज: भारतात शिक्षणाचा प्रसार वेगाने होऊ लागला. वाढत्या औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. अनेक शब्द अस्तित्वात येऊन भाषा समृद्ध होऊ लागली. त्यामुळे सर्वविषयसंग्राहक अशा विश्वकोशाची गरज निर्माण झाली.

उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा स्वीकार झाला. त्यामुळे मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भग्रंथांची तीव्र आवश्यकता, तसेच शासनव्यवहाराची भाषा म्हणून राज्यपातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्वविषयसंग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. स्वातंत्र्यपूर्वकाळात ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी विश्वकोशाची मुहूर्तमेढ रोवली.

1. विश्वकोश असा तयार झाला…

 1. विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली.
 2. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली.
 3. मुख्य, मध्यम, लहान नोंदींतील मुद्द्यांची टाचणे तयार केली गेली.
 4. नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या.
 5. प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या यादया तयार केल्या गेल्या.
 6. अकारविल्यानुसार या यादया लावण्यात आल्या.

1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे अठरा खंड प्रसिद्ध आहेत.

2. विश्वकोश यासाठी पाहावा…

 1. आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी.
 2. जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयांतील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी.
 3. अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी.
 4. सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी.

3. विश्वकोश असा पाहावा…
1. शब्द अकारविल्हे (अनुज्ञेय) नुसार पाहावेत.
2. बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पाहावा.

4. मूलध्वनी (मराठी वर्णमाला):
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 7.1

5. व्यंजने (34)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 8
स्वर + व्यंजने = अक्षरे/अर्थपूर्ण क्रमाने येणारी अक्षरे = शब्द/ अर्थपूर्ण शब्दांचा समूह = वाक्य.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

चौदाखडी:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 9
तुम्हांला आवडणारे कोणतेही शब्द… त्यांचे अर्थ… संदर्भ विश्वकोशातून शोधा व भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता एका क्लिकवर – https://en.wikipedia.org/wiki/Marathi_Vishwakosh

1. मुलांना आवडणारी शब्दकोडी व फँशनपैकी केशरचना या ” शब्दांचे संदर्भ विश्वकोशाच्या आधारे दिले आहेत.

1. शब्दकोडी:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 10
अशा कल्पनांवर आधारलेले अनेक प्रकार रूढ आहेत. संगणकीय खेळांमध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो.

1. प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन त्याचे लेखक ओळखण्यास सांगणे.
2. एका शब्दातील अक्षरे फिरवून नवीन शब्द तयार करणे.
3.  काही शब्दांतील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणे.

2. पुढील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा:

 1. ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
 2. एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण …’
 3. तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक (देशभक्त).
 4. ‘सुधारक’चे संपादक.
 5. कवी यशवंत यांचे आडनाव.
 6. एका विनोदी साहित्यिकाचे आडनाव.
 7. मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
 8. कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.

उत्तरांसह कोड्याची आकृती : (पाठ्यपुस्तकानुसार)

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 11

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश

2. केशभूषा:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश 12

आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्ये दाखवण्याकरिता त्यात विजयचिन्हे आणि पदके लावत.
( केशभूषेचा उगम यातून झाला असावा. )
(केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी.)
अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतींत आढळणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात.

Marathi Kumarbharti Std 9 Guide Pdf भाग-४

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 9 मी वाचवतोय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय (कविता)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 9 मी वाचवतोय Textbook Questions and Answers

1. कोष्टक पूर्ण करा:

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय 1
उत्तर:

पूर्वीचे व्यवसाय पूर्वीचे खेळ
1. लोहारकाम 1. विटीदांडू
2. कुंभार (मडकी बनवणे) 2. लगोरी
3. भांड्यांना कल्हई करणे 3. आट्यापाट्या

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय 2
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय 3

3. सकारण लिहा:

प्रश्न 1.
सकारण लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय 4
उत्तर:

जुन्या गोष्टींपैकी वाचाव्यात अशा वाटणाऱ्या गोष्टी त्या गोष्टी वाचवण्याची तुमच्या मते कारणे
1. कविता 1. मन समृद्ध होते
2. आई 2. प्रेम, माया, जिव्हाळा लाभतो
3. बोली 3. विचार व्यक्त करता येतात
4. भूमी 4. मूल्यांवर निष्ठा असते

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

4. कव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातली खंत स्पष्ट करा.
उत्तर:
जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत, यांची खंत कवीला वाटते. बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते. आपण आईला ‘आई’ अशी साद घालत नाही. वासरासाठी गोठ्यात गायही हंबरत नाही. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चाललेयत. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावतायत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करीत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होण्याची खंत कवीला बोचते आहे.

प्रश्न (आ)
‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.
उत्तर:
पूर्वीच्या कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्य जपणारे होते. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु आता लिहिणाऱ्या हातातून सकस साहित्यनिर्मिती होत नाही, हे कवीला सांगायचे आहे. जो शब्दपसारा दिसतो तो भावनाशून्य व पोकळ आहे, असे कवीला म्हणायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही, याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की, आताचे शब्द केविलवाणे झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे.

प्रश्न (इ)
सामाजिक बदलाबद्दल कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तर:
पूर्वी गावगाडा होता. नैतिक मूल्ये जपणारी गावची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलत गेला. शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा, भुसार मालाची दुकाने हरवून गेली. लोहाराचा भाता बंद पडला. कुंभाराचे चाक फिरायचे थांबले. तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कल्हईची झिलई निघून गेली. चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली. आधुनिक समाजव्यवहारांमुळे मायेची माणसे दुरावली. अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलाविषयी कवीने सांगितले आहे.

5. स्वमत:

प्रश्न (अ)
‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.
उत्तर:
‘माझी बोली’ म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकते आहे; त्यांच्यावर शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहे. पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळत जाते आहे. आईची जागा ‘मम्मी’ने घेतली आहे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे. मातृभाषा हेच विचार व भावना मांडण्याचे नैसर्गिक माध्यम असते. ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने खंत व्यक्त केली आहे. अशा प्रकारे ‘माझी बोली’ या संकल्पनेतून कवींची खेदजनक भावना व्यक्त झाली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

प्रश्न (आ)
‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
शहरे वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरवणारे ‘मॉल’ वाढले. पूर्वी शहरामध्येसुद्धा छोटे छोटे दुकानदार होते. विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानांत मिळायच्या. मॉलमध्ये सर्व वस्तूंची दुकाने एकत्र असतात. शिवाय खादयपान सेवेची हॉटेल्स व सिनेमागृहेही असतात. मॉलच्या एकंदर झगमगाटाचे आकर्षण माणसांच्या ठायी निर्माण झाले. महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज फोफावला. त्यातच आकर्षक जाहिरातींची भर पडल्यामुळे लोकांना मॉलचे आकर्षण निर्माण झाले. साहजिकच माणसांचा मॉलमध्ये राबता सुरू झाला आणि त्यांनी छोट्या दुकानांकडे पाठ फिरवली. अर्थात मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो, हे खरे आहे.

उपक्रम:

तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा:

 1. बदल
 2. परिणाम
 3. तुमचे मत

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 9 मी वाचवतोय Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
शब्दजाल पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय 5
उत्तर:
1. हाकेतून हद्दपार होत आहे.
(1) हंबरायच्या थांबल्या आहेत.
2. लोहाराचा भाता
(1) कुंभाराचा आवा

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

प्रश्न 3.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय 6
उत्तर:

 1. (i) किराणा (ii) भुसार
 2. रटरटणारी आमटी
 3. कल्हईची झिलई
 4. आईची बोली
 5. बापुडे शब्द
 6. परकरी मुली

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
उत्तर:
बदलत चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेताना कवी सतीश काळसेकर म्हणतात की, शहरात मोठमोठे मॉल व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे पूर्वीची किराणामालाची व भुसारीची दुकाने भूतकाळात जमा झाली आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 (आ) साठी……

प्रश्न 1.
पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता – मी वाचवतोय.
उत्तर:
मी वाचवतोय.
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → सतीश काळसेकर.

2. कवितेचा विषय → वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे.

3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

 1. हाक = साद
 2. आई = माता
 3. विस्तव = आग
 4. राख = रक्षा
 5. वारा = वात.

4. कवितेतून मिळणारा संदेश → चांगली जुनी संस्कारक्षम मूल्ये हरवू नयेत; आईची बोली पारखी होऊ नये; भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये; हा संदेश प्रस्तुत कविता देते.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवींनी चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → यंत्रयुगातील नवीन बदलांमुळे जुनी मूल्ये ढासळत चाललीयत. ती वाचवणे व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
→ बदलत जाणाऱ्या वास्तवामध्ये ममी-डॅडी या परकीय शब्दांमुळे
आईची मायेची हाक आता ऐकू येत नाही. गोठ्यातल्या गाईसुद्धा 3 आता नैसर्गिक हंबरणे विसरत चालल्या आहेत.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहे. नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाद अधोरेखित केला आहे. आई, आईची बोली, भूमी आणि कविता वाचवण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 (इ) साठी…

प्रश्न 1.
पुढील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:
‘हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई.’
उत्तर:
आशयसौंदर्य: यंत्रवत असलेल्या महानगरीय जीवनात जुनी जीवनमूल्ये नष्ट होत आहेत. क्रय वस्तूंच्या बेगडी झगमगाटात जुनी चूल, जुने खेळ, बोली व संस्कृती यांचा नवीन पिढीला विसर पडत चालला आहे, या वास्तववादी आशयाचे विदारक चित्रण कवी सतीश काळसेकर यांनी ‘मी वाचवतोय’ या कवितेत केले आहे.

काव्यसौंदर्य: बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना प्रस्तुत ओळींमध्ये कवी म्हणतात की ‘मम्मी-डॅडी’ या उसन्या परिभाषेमुळे ‘आई’. अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती हाक सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या मायेचा वारसा असलेल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत. म्हणजेच आई-लेकरांचे संबंध मायाममतेचे राहिले नाहीत, ही खंत कवींनी व्यक्त केली आहे. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होते, याची बोचणी प्रस्तुत ओळींमध्ये स्पष्टपणे दर्शवली आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवीने चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. योग्य परिणामकारकता शब्दाशब्दांत अभिव्यक्त झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा :

 1. सत्यासत्य
 2. सप्तसागर
 3. पूर्वपश्चिम
 4. रक्तचंदन

उत्तर:

 1. वैकल्पिक द्वंद्व
 2. द्विगू
 3. इतरेतर द्वंद्व
 4. कर्मधारय.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

2. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
1. दंग असणे
2. दुरावणे.
उत्तर:
1. दंग असणे – अर्थ : मग्न असणे.
वाक्य: जेव्हा बघावे तेव्हा मंदार खेळामध्ये दंग असतो.

2. दुरावणे – अर्थ : लांब जाणे.
वाक्य : परदेशी गेल्यामुळे ममताला आईवडिलांची संगत दुरावली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा:
1. लिहिता-वाचता येणारा → …………………..
2. लिहिता-वाचता न येणारा → ………………..
उत्तर:
1. साक्षर
2. निरक्षर.

प्रश्न 2.
अनेकवचन लिहा:

 1. गाय
 2. खेळ
 3. कविता
 4. सुट्टी.

उत्तर:

 1. गाई
 2. खेळ
 3. कविता
 4. सुट्ट्या

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

प्रश्न 3.
पुढील शब्दांतील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. वाचवतोय
2. समाजाचे
उत्तर:
1. चव, वय
2. मास सजा

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. बोलचाली, बोलाचाली, बोलाचालि, बोलचालि.
2. दूरर्दशन, दुरदर्शन, दूर्रदर्शन, दूरदर्शन.
उत्तर:
1. बोलाचाली
2. दूरदर्शन.

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:

 1. Lyric
 2. Magazine
 3. Category
 4. Index

उत्तर:

 1. भावगीत
 2. मासिक-पत्रिका
 3. प्रवर्ग
 4. अनुक्रमणिका.

मी वाचवतोय Summary in Marathi

कवितेचा आशय:

समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे. जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटात आईची बोली कोणी बोलत नाही. नवीन पिढी यांत्रिक वस्तूंच्या आहारी गेली आहे. या सर्व बदलांची खंत या कवितेत कवींनी व्यक्त केली आहे. जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे झाले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

शब्दार्थ:

 1. वाचवतोय – बचाव करतोय.
 2. मुकाट – शांतपणे, निमूट.
 3. विस्तव – निखारे.
 4. धग – ऊब.
 5. रटरटणारी – शिजणारी.
 6. सहित – सोबत, बरोबर, संगती.
 7. बोलाचाली – संभाषण.
 8. बोली – भाषा.
 9. दंगा – (इथे अर्थ) गोंधळ, आरडाओरडा.
 10. परकऱ्या – परकर घालणाऱ्या (मुली).
 11. लिहिते हात – लेखनाचा सराव.
 12. बापुडे – गरीब, केविलवाणे.
 13. भूमी – धरती.

टिपा:

 1. हंबरणे – गाईचा आवाज (ओरडणे).
 2. किराणा-भुसार – अन्नधान्याच्या वस्तू.
 3. सुपर मार्केट – अन्नधान्य, भाजीपाला, खाण्याचे तयार पदार्थ, तसेच अन्य अगणित वस्तू एका छपराखाली मिळतील असे, भव्य दुकान ; मोठमोठाले मॉल.
 4. लोहाराचा भाता – लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचे साधन.
 5. कुंभाराचा आवा – ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले लाकडी गोल चाक.
 6. गावगाडा – गावची जुनी संस्कृती व्यवहार.
 7. कल्हईची झिलई – तांब्या-पितळेची भांडी कळकू नयेत म्हणून कथिलाची तार तापवून त्याच्या रसापासून तयार केलेलामुलामा.
 8. आईची बोली – मातृभाषा.
 9. विटीदांडू – लाकडाची छोटी विटी व मोठा दांडू यांचा जुना मैदानी खेळ.
 10. लगोऱ्या – दगडांच्या चकत्या एकावर एक रचून चेंडूने फोडण्याचा जुना मैदानी खेळ.
 11. आट्यापाट्या – जमिनीवर आडव्या-उभ्या रेघा आखून खेळता येणारा सांघिक खेळ.
 12. पिंगा – मान गोल गोल फिरवून घुमण्याचा खेळ.
 13. क्राइम-थ्रिलर – गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या दूरदर्शनवरील मालिका.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

 1. हद्दपार होणे – सीमेबाहेर सोडणे (जीवनातून निघून जाणे).
 2. दुरावत जाणे – लांब जाणे.
 3. दंग असणे – गुंगणे, मग्न असणे.
 4. विरून जाणे – विरघळून जाणे, नाहीसे होणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय

कवितेचा भावार्थ:

बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना कवी म्हणतात – ‘आई’ अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या गाईसुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता वासरासाठी हंबरत नाहीत. (आई-लेकरांचे संबंध मायेचे राहिले नाहीत.)

मोठमोठे मॉल्स व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकाने हरवून जात आहेत. पूर्वीच्या गावच्या संस्कृतीत (गावगाड्यात) असलेले (जुने व्यावसायिक) लोहार, कुंभार नि त्यांचे भाते व चाके गावगाड्याबरोबरच निमूटपणे नाहीशी झाली आहेत. पूर्वीच्या भांड्यांची कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे. चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसकट दूर गेली. आता धुराशिवाय ती गॅस शेगडीवर शिजत असलेली दिसते.संभाषणातून-संवादातून हल्ली (माझी) मातृभाषा (आईची बोली) निघून चालली आहे.

आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटीदांडू आणि लगोरीचे खेळ खेळत नाहीत. त्यांचा गिल्ला आता थांबलाय. आता आट्यापाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले आहेत. परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत. आता मुले दूरदर्शनच्या स्पोर्ट चॅनेलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात किंवा गुन्हेगारी विश्वातील मालिका बघत राहतात. आता कुणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत. लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय. शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात.

अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतोय आणि कवितेसोबतच माझी आई, माझी भाषा नि माझी भूमी यांचा { मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers भाग-२

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर Textbook Questions and Answers

1. योग्य उदाहरण लिहा:

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 2

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न 2.
योग्य उदाहरण लिहा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 4

2. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 5
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 6

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 8

3. खाली काही उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा:

प्रश्न (अ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 10

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न (आ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 12

4. वैशिष्ट्ये लिहा:

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा:
(अ) लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी –
(आ) टेल्कोचा पुण्यातील कारखाना –
(इ) टेल्कोची परंपरा –
(ई) टेल्कोची मालमोटार –
उत्तर:
(अ) लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच; शिवाय, प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे. मगच पदवी मिळत असे.
(आ) टेल्कोचा पुण्यातील कारखाना : उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी कारखाना पहिल्या दर्जाचा आहे, हा लौकिक मिळाला.
(इ) टेल्कोची परंपरा : सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत, ही टेल्कोची परंपरा होती.
(ई) टेल्कोची मालमोटार : टेल्कोची मालमोटार पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली.

5. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

(अ) मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
(आ) मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
(इ) मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

6. अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

(अ) प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.
(आ) शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
(इ) आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
(ई) स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
(अ) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (आ) टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते?

7. स्वमत.

प्रश्न (अ)
पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
माणसे आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवतात. ही तरतूद वेगवेगळ्या स्वरूपांत असते. पैशाच्या स्वरूपातील मदत फार मुळगावकरांनी सामाजिक कार्ये केलेली क्षेत्रे – उपयोगाला येत नाही. झाडे लावली, तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते. लाकूडही निर्माण होते. झाडांचा हा असा दरवर्षी नियमितपणे शेती शिक्षण आरोग्य फायदा होतो. मात्र, कोणत्या झाडांचा कधी, कसा व किती फायदा घ्यायचा, हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला घडलेला असेल, मुळगावकरांचे छंद – तर त्याला स्वत:ला या गोष्टीचा फायदा होतोच; शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो.

अशी व्यक्ती खूप कर्तबगार निघाली, तर त्या छायाचित्रण कला झाडे लावणे व्यक्तीचा अखंड समाजालाही फायदा होतो. म्हणून पैसे साठवून मुळगावकरांच्या छंदांची फलश्रुती ठेवण्यापेक्षा झाडेझुडपे लावली, तर त्यांचा माणसांना उपयोग होणारच. पण त्याहीपेक्षा माणसे घडवली, तर त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे त्यांनी काढलेली त्यांनी लावलेल्या माणसे तयार करणे, हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चिनी छायाचित्रे इतकी सुंदर आहेत झाडांनी पुण्याचा परिसर ई म्हणीमध्ये नेमके हेच सांगितले आहे. की त्यांची प्रदर्शने भरू अत्यंत नयनमनोहर शकतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न (आ)
टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते ?
उत्तर:
मालमोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशांत हिंडत असतो. तो कधी जंगलातून प्रवास करतो, तर कधी वाळवंटी प्रदेशातून. उंचसखल प्रदेश, सपाट प्रदेश, दलदलीचा प्रदेश, अतिथंडीचा प्रदेश, प्रचंड पाऊस कोसळणारा प्रदेश अशा विविध प्रकारच्या परिसरांतून आपली मालमोटार प्रवास करीत असते.

अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरांतील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल? काही अडचणी निर्माण होत असतील का? मोटारीच्या स्वरूपात उणिवा राहिल्या असतील का? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळतात. गाडीत काही उणिवा असतील तर त्या दूर करता येतात. आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते.

उपक्रम:

प्रश्न 1.
तुमच्या परिसरातील लघुउद्योजकांची मुलाखत घ्या.

भाषाभ्यास:

हस्व दीर्घ लेखनाबाबतचे नियम:

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा.
कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे -हस्व आहेत.

मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यतः हस्य असतात.

लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार न्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य

वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न 2.
खालील शब्द वाचा.

चिंच, लिंबू, बिंदू, तुरुंग, उंच, लिंग, अरविंद, अरुंधती, दिंडी, पिंड, किंकाळी, चिंता, पिंड, पुरचुंडी, पुंगी, धुंद, चिंधी
वरील शब्द अनुस्वारयुक्त आहेत. यांतील अनुस्वारयुक्त अक्षराकडे नीट पाहिल्यास काय जाणवते ?
शब्द मराठी असो वा तत्सम. अनुस्वारयुक्त अक्षरे -हस्व आहेत.

मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास सामान्यत: ती हस्य असतात, म्हणजेच ह्या अनुस्वारयुक्त अक्षरातील इकार, उकार -हस्व असतात. वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 14

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
1. होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडीवर परखड भाष्य करणारा.
2. समाजमनावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारा.
उत्तर:
1. संपादक
2. समाजमनस्क व्यक्तिमत्त्व.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
उत्तर लिहा:
संपादकाचे आवश्यक गुण:

 1. बहुश्रुतता
 2. ………………..
 3. ………………..

उत्तर:

 1. संपादकाचे आवश्यक गुण:
 2. बहुश्रुतता
 3. चिकित्सक विचार

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 15
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 16

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘फॅक्ट्स आर् सेक्रेड बट कॉमेंट्स आर् फ्री’ या उक्तीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर:
वृत्तपत्रांनी बातमी देणे हे त्यांचे मूळ कर्तव्य आहे. वाचकांना आपल्या अवतीभवती, देशविदेशात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यात रस असतो. वृत्तपत्रांनी बातमीच्या रूपात या घडामोडींची माहिती दयायची असते. ही बातम देताना घटना जशी घडली तशी बातमीत ती आली पाहिजे. बातमीदाराने स्वत:चे विचार, कल्पना बातमीत मिसळू नयेत, अशी अपेक्षा असते. बातमीदाराने आपल्या आवडत्या राजकीय पक्षाची बातमी भरभरून दिली, तर तो त्या पक्षाचा प्रचार होईल. वाचकांना मात्र संबंधित घटना खऱ्या स्वरूपात कळणार नाहीत. हे गैर आहे.

थोडक्यात बातमीदाराने, पत्रकारांनी बातमीत भेसळ करता कामा नये. यालाच ‘फॅक्ट्स आर् सेक्रेड’ असे म्हटले आहे. पत्रकारांना स्वत:चे विचार, मते मांडायची असतील, तर ती त्यांनी अग्रलेखात मांडावीत. स्वतंत्र लेख लिहून मांडावीत. मात्र ही मतेसुद्धा तटस्थपणे व परखडपणे मांडली पाहिजेत. पत्रकारांना ते स्वातंत्र्य पूर्णपणे बहाल केलेले असते. यालाच ‘कॉमेंट्स आर फ्री’ असे म्हटले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
कोष्टक पूर्ण करा:

कृती तुम्हांला जाणवलेले गुण
पहिले 6 महिने विनावेतन काम केले आणि नंतर काही काळ अत्यल्प वेतनावर काम केले.

उत्तर:

कृती तुम्हांला जाणवलेले गुण
पहिले 6 महिने विनावेतन काम केले आणि नंतर काही काळ अत्यल्प वेतनावर काम केले. चिकाटी व कामावरील निष्ठा

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा:
1. मंदीच्या काळातील नोकऱ्या.
उत्तर:
1. मंदीच्या काळातील नोकरीत सुरुवातीला काही महिने विनावेतन काम करावे लागे व नंतर काही काळ अत्यल्प वेतन मिळत असे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न 2.
कोण ते लिहा:
1. टाटा कंपनीत येण्याचे मुळगावकरांना आमंत्रण देणारे.
2. ध्येयाच्या बाबतीत अजिबात तडजोड न करणारे.
उत्तर:
1. जे. आर. डी. टाटा
2. सुमंत मुळगावकर.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
तुम्हांला जाणवलेले मुळगावकरांचे मोठेपण समजावून सांगा.
उत्तर:
मुळगावकरांनी शास्त्र शाखेची पदवी घेतली होती. पुढे ते लंडनला गेले आणि त्यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी घेतली. त्या काळाचा विचार करता, हे खूप उच्च दर्जाचे शिक्षण त्यांनी मिळवले होते. लेखकांनी सांगितलेला आदर्शवाद जोपासण्याचा मुळगावकरांचा गुण यातून दिसून येतो. जे करायचे ते उत्तमच, हा त्यांचा ध्यास या कृतीतून दिसतो. उच्च शिक्षण घेतलेले असूनही त्यांना सुरुवातीला 6 महिने विनावेतन काम करावे लागले. या परिस्थितीने ते खचले नाहीत. निराश झाले नाहीत. अत्यल्प वेतनावरही त्यांनी काम केले. यातून त्यांची चिकाटी दिसते. आपल्या ध्येयाकडे जाताना येईल त्या संकटाला तोंड दयायची त्यांची तयारी होती.

या सर्व काळात मुळगावकरांनी आपली योग्यता सिद्ध केली होती. म्हणूनच सिमेंटचे अधिक कारखाने उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोप-अमेरिकेत तंत्रज्ञांचे एक मंडळ तत्कालीन सरकारने पाठवले. त्यात मुळगावकरांचा समावेश होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या मंडळात जे. आर. डी. टाटांसारखा दूरदृष्टीचा उदयोजकही होता. टाटांनी त्या प्रवासातच मुळगावकरांना टाटा कंपनीत येण्याचे आमंत्रण दिले. या घटनांवरून मुळगावकरांच्या मोठेपणाची सहज कल्पना येऊ शकेल.

उतारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
उत्तर लिहा:
सलग बारा वर्षे मालमोटारींचे उत्पादन न करण्यामागील रहस्य:
उत्तर:
सलग बारा वर्षे मालमोटारींचे उत्पादन न करण्यामागील रहस्य: मुळगावकरांना केवळ कारखाना उभारायचा नव्हता; तर त्यांना एक उदयोग उभारायचा होता.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

कृती 3 : (स्वमत अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
मुळगावकरांची दिसून येणारी व्यवस्थापनातील दूरदृष्टी व कौशल्य समजावून सांगा.
उत्तर:
साधारणपणे बहुसंख्य उदयोजक भराभर उत्पादन तयार करतात आणि बाजारात आणतात. या घाईमुळे उत्पादनात दोष राहतात. कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांनाही एक वाईट सवय लागते. उत्पादनात उणिवा दिसल्या तरी तिकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागते. अचूक काम करण्याची, काटेकोरपणे काम करण्याची इच्छा राहत नाही. उत्तम दर्जा हवा, हा आग्रहही हळूहळू राहत नाही. अशी कंपनी कधीही पहिल्या दर्जाची होऊ शकत नाही. म्हणून मुळगावकरांनी प्रथम उत्पादनावर भर दिला नाही. मूलभूत बाबी निर्माण करण्यावर भर दिला. याचा टेल्को कंपनीला फार मोठा फायदा झाला. यातच मुळगावकरांची दूरदृष्टी होती व कौशल्य होते.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
मुळगावकरांचे स्वभावविशेष लिहा.

 1. ………………………..
 2. ………………………..
 3. ………………………..
 4. ………………………..

उत्तर:
मुळगावकरांचे स्वभावविशेष:

 1. सौम्य प्रवृत्ती
 2. मोजके बोलणे
 3. आस्थेवाईकपणा
 4. टापटीपपणा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न 3.
विधाने पूर्ण करा:
1. आपल्या कारखान्याला आदर्श करायचे असेल, तर …………………………….
2. आपल्या कारखान्याचे हित कशात आहे, हे लक्षात घेतले, तर ………………………….
उत्तर:
1. आपल्या कारखान्याला आदर्श करायचे असेल, तर कठोरपणे निर्णय घेणे आवश्यक असते.
2. आपल्या कारखान्याचे हित कशात आहे, हे लक्षात घेतले, तर कठोर निर्णय घेणे सोपे जाते.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
पुढील घटनांचा परिणाम लिहा:

घटना परिणाम
1. मुळगावकर दौऱ्यावर असताना टेल्कोची मालमोटार दिसल्यास ते ती थांबवत आणि ड्रायव्हरशी बोलत.
2. कारखान्याचे अध्यक्ष व अन्य अधिकारी कामगारांत मिसळत.

उत्तर:

घटना परिणाम
1. मुळगावकर दौऱ्यावर असताना टेल्कोची मालमोटार दिसल्यास ते ती थांबवत आणि ड्रायव्हरशी बोलत. मोटार चांगली चालते का, काही अडचणी येतात का, इत्यादी माहिती मिळे.
2. कारखान्याचे अध्यक्ष व अन्य अधिकारी कामगारांत मिसळत. विचारांची देवाण-घेवाण होत असे.

प्रश्न 2.
विधाने पूर्ण करा:
1. ………………….. ही मोटार उदयोगाला मुळगावकरांनी दिलेली देणगी होय.
2. आपले उत्पादन अधिकाधिक सरस व्हावे, म्हणून ……………………….
उत्तर:
1. अनेक तंत्रज्ञ शिकून तयार झाले, ही मोटार उद्योगाला मुळगावकरांनी दिलेली देणगी होय.
2. आपले उत्पादन अधिकाधिक सरस व्हावे, म्हणून मुळगावकरांनी संशोधन विभागावर लक्ष केंद्रित केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

उतारा क्र. 5

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 17
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर 18

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

1. समास:

प्रश्न 1.
पुढील विग्रहावरून समास ओळखा:
उत्तर:

 1. हळद, कुंकू वगैरे → समाहार वंद्व समास
 2. पाच मुखांचा समूह → द्विगू समास
 3. राव किंवा रंक → वैकल्पिक द्वंद्व समास
 4. ऋषीसारखा राजा → कर्मधारय समास
 5. देव आणि दानव → इतरेतर द्वंद्व समास

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
‘उपसर्गघटित, प्रत्ययघटित व अभ्यस्त’- प्रत्येकी दोन है शब्द लिहा.
उत्तर:

उपसर्गघटित प्रत्ययघटित अभ्यस्त
नि:पक्षपाती पत्रकार हळूहळू
प्रक्रिया दयावान लालेलाल

प्रश्न 2.
‘ज्ञ’ प्रत्यय लागलेले चार शब्द लिहा : जसे-तंत्रज्ञ.
उत्तर:

 1. शास्त्रज्ञ
 2. तत्त्वज्ञ
 3. शिल्पज्ञ
 4. मनोज्ञ

प्रश्न 3.
‘सद् (सत्)’ उपसर्ग लागलेले चार शब्द लिहा: जसे-सद्वर्तन.
उत्तर:

 1. सद्विचार
 2. सद्विवेक
 3. सदाचार
 4. सद्गुणी

3. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा:

 1. यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
 2. शेतीत खूप कष्ट केल्यामुळे या वर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
 3. आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
 4. स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.

उत्तर:

 1. यशने आहाराची हेळसांड केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
 2. शेतीत खूप राबल्यामुळे या वर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
 3. आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
 4. स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड करणे योग्य नव्हे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न 2.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:

 1. वाखाणणे
 2. गाजावाजा करणे
 3. प्रेरणा देणे.

उत्तर:

 1. वाखाणणे – अर्थ : प्रशंसा करणे.
  वाक्य: सुधीरच्या चित्राची सरांनी खूप वाखाणणी केली.
 2. गाजावाजा करणे – अर्थ : स्वत:ची टिमकी वाजवणे.
  वाक्य: आपल्या कर्तृत्वाचा गाजावाजा करणे अयोग्य आहे.
 3. प्रेरणा देणे — अर्थ : स्फूर्ती देणे.
  वाक् : राजूच्या समाजसेवेच्या कार्याला आईने खूप प्रेरणा दिली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा:

 1. सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी कठोर निर्णय घेणे शक्य होत असे.
 2. मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
 3. मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
 4. मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.

उत्तर:

 1. सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी सौम्य निर्णय घेणे शक्य होत नसे. सौम्य प्रकृतीच्या मुळगावकरांना प्रसंगी सौम्य निर्णय घेणे अशक्य होत असे.
 2. मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते.
 3. मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती.
 4. मुळगावकरांचे जीवन समाधानी होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न 2.
तक्ता भरा:

एकवचन पदवी देणगी
अनेकवचन कारखाने मोटारी

उत्तर:

एकवचन पदवी कारखाना देणगी मोटार
अनेकवचन पदव्या कारखाने देणग्या मोटारी

प्रश्न 3.
कंसांतील योग्य विरुद्धार्थी शब्द निवडून लिहा:

 1. सरस × …………………. (विरस, निरस, सुरस)
 2. सचोटी × ………………. (लबाडी, गुणवान, दुर्गुणी)
 3. अवाढव्य × …………….. (प्रचंड, विशाल, चिमुकले)
 4. सुदैव × ………………… (सदैव, एकमेव, दुर्दैव)

उत्तर:

 1. सरस × निरस
 2. सचोटी × लबाडी
 3. अवाढव्य × चिमुकले
 4. सुदैव × दुर्दैव.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
नियम 1 मध्ये दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
उत्तर:

 1. उल्लेख
 2. मुद्दाम
 3. किल्ला
 4. जिल्हा
 5. झिम्मा
 6. कुत्रा
 7. पुत्र
 8. चित्र
 9. दुर्जन
 10. दिल्ली.

प्रश्न 2.
नियम 2 मध्ये दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.
उत्तर:

 1. इंच
 2. भिंत
 3. कुंडी
 4. शिंग
 5. बिंब
 6. बुंदी
 7. रुंदी
 8. उंदीर
 9. टिंब
 10. पिंप.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

प्रश्न 3.
अचूक शब्द ओळखा:

 1. प्रर्दशन, प्रदर्शन, परदर्शन, प्रदशर्न.
 2. केंद्रित, केद्रीत, केद्रित, केंद्रीत.
 3. सलागार, सल्लागर, सल्लागार, सलागर.
 4. चिकीत्सक, चीकीत्सक, चिकिस्तक, चिकित्सक.
 5. बहुश्रुतता, बहुश्रुतता, बहूश्रूतता, बहुश्रूतता.
 6. व्यक्तीमत्त्व, व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्त्व, व्यक्तीमत्व.

उत्तर:

 1. प्रदर्शन
 2. केंद्रित
 3. सल्लागार
 4. चिकित्सक
 5. बहुश्रुतता
 6. व्यक्तिमत्त्व.

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
पुढील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे दुरुस्त करून योग्य ती विरामचिन्हे घालून वाक्ये लिहा:
1. तो म्हणाला. मी! तिथे मुळीच येणार नाही,
2. छे, छे, मला नकोच हा वेगळा छंद.
उत्तर:
1. तो म्हणाला, “मी तिथे मुळीच येणार नाही.”
2. “छे! छे! मला नकोच हा वेगळा छंद!”

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द दया:

 1. Plumber
 2. Comedy
 3. Magazine
 4. Orientation.

उत्तर:

 1. नळ-कारागीर
 2. सुखात्मिका
 3. मासिक-पत्रिका
 4. उद्बोधन, निदेशन.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

उपक्रम:

प्रश्न 1.
तुमच्या परिसरातील लघुउदयोजकाची मुलाखत घ्या.

आदर्शवादी मुळगावकर Summary in Marathi

प्रस्तावना:

गोविंद तळवलकर हे मराठीतील व इंग्रजीतील एक श्रेष्ठ संपादक. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे चिकित्सक अभ्यासक, सामाजिक व राजकीय घडामोडींवर अधिकारवाणीने भाष्य करणारे व्यासंगी पत्रकार. इंग्रजी वाङ्मय, जागतिक राजकारण, विशेषतः रशियन राज्यक्रांती व रशियाची जडणघडण यांचा सखोल अभ्यास हे गोविंद तळवलकरांचे खास वैशिष्ट्य. पुरोगामी दृष्टिकोन, खोलवर चिकित्सा, नि:पक्षपाती भूमिका व धारदार लेखणी यांमुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यांचा जबरदस्त दरारा निर्माण झाला होता. राजकारणी लोकांना त्यांचा खूप धाक वाटत असे. त्यांनी राजकारण्यांवर नैतिक अंकुश ठेवण्याचे काम केले.

गोविंद तळवलकरांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून देणारे लेखही त्यांनी लिहिले आहेत. प्रस्तुत ‘आदर्शवादी मुळगावकर’ हा पाठ अशाच प्रकारातला आहे. श्री. सुमंत मुळगावकर हे टाटा समूहातील टेल्को या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. एखादी कंपनी स्थापन करायची आणि तिला नफा मिळवून दयायचा, एवढाच मर्यादित हेतू त्यांनी मनात बाळगला नाही. जे काही करायचे ते सर्वोत्तम, आदर्शच असले पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता.

कंपनीच्या इमारतीची रचना कशी करायची, कर्मचाऱ्यांना कसे घडवायचे, उत्पादन प्रक्रिया कशी आखायची, अंतिम उत्पादन ग्राहकस्नेही कसे करायचे या सर्व बाबतीत ते आदर्शवादीच होते. यामुळे टेल्को कंपनीने संपूर्ण भारतात एक उत्कृष्ट कंपनी म्हणून लौकिक मिळवलाच; शिवाय, जागतिक पातळीवरही ‘उत्कृष्ट कंपनी’ असा शिक्का प्राप्त केला. अशा या सुमंत मुळगावकर या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा व स्वभावगुणांचा परिचय या पाठात गोविंद तळवलकरांनी करून दिला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

शब्दार्थ:

 1. परखड – स्पष्ट, कोणाच्या दडपणाखाली न येता व कोणालाही खूश करण्याचा हेतू न बाळगता व्यक्त केलेले (मत, विचार इत्यादी).
 2. बहुश्रुतता – खूप ऐकलेले, पाहिलेले, वाचलेले असणे.
 3. समाजमनस्क – समाजाविषयी जागरूक मन असलेला.
 4. आदर्श – आरसा; एखादी गोष्ट, तत्त्व, विचार यांची सर्वोत्कृष्ट अवस्था.
 5. सचोटी – प्रामाणिकपणा, प्रांजळपणा.
 6. निकडीचे – (निकडतातडी, ताबडतोबीची गरज) तातडीचे.
 7. अवाढव्य – प्रचंड.
 8. सौम्य – मृदू, कोमल.
 9. हेळसांड – हयगय, दुर्लक्ष.

टिपा:

1. फॅक्ट्स आर् सेक्रेड, बट कॉमेंट्स आर् फ्री: ‘गार्डियन’ या जगप्रसिद्ध वर्तमानपत्राचे हे घोषवाक्य. फॅक्ट्स म्हणजे घटना, घडलेली गोष्ट. वर्तमानपत्राने घटना घडली, तशीच तिची बातमी दिली पाहिजे. बातमीत स्वत:ची मते, पूर्वग्रह, हेतू मिसळता कामा नयेत. जसे घडले तसे शोधून काढून प्रसिद्ध केले पाहिजे. वर्तमानपत्राची ही नीती असली पाहिजे. भगवद्गीता, बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथांतील वचने, त्यांतील शब्द हे पवित्र मानले जातात. त्यांत बदल करता कामा नये. त्यांची मोडतोड करून वेगळी रचना करता कामा नये. त्या ग्रंथांत मुळात जसे आहे, तसेच उद्धृत केले पाहिजे, असा दंडक असतो. या अर्थाने बातमीसुद्धा पवित्र असते. तिच्या पावित्र्याला धक्का लावता कामा नये. मात्र त्या बातमीवर, बातमीतील घटनांवर भाष्य करण्याचा संपादकांना अधिकार असतो. असा एकूण त्या घोषवाक्याचा अर्थ आहे.

2. मंदीची लाट: कोणत्या तरी कारणाने एखादे उत्पादन खपत नाही किंवा त्याचे पुरेसे उत्पादन होत नाही. त्यामुळे नफा कमी होतो. साहजिकच पगारकपात केली जाते किंवा नोकरभरती होत नाही किंवा नोकरकपात केली जाते. याचा परिणाम म्हणून लोकांच्या हातात कमी पैसा येतो. पैसा कमी असल्याने बाजारात मालाचा उठाव होत नाही. त्यामुळे संबंधित उदयोगाचा नफा कमी होतो. नोकरकपात होते. पुन्हा मागणी कमी होते… अशा रितीने हेच चक्र वेगाने चालू होते. बेकारी येते. उत्पादन थंडावते. समाजाची आर्थिक स्थिती डबघाईला येते. या स्थितीला ‘मंदी’ म्हणतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

 1. कस लागणे – सामर्थ्य सिद्ध होणे, गुणवत्ता सिद्ध होणे.
 2. मानवंदना देणे – आदरपूर्वक सन्मान करणे.
 3. कटाक्ष असणे – आग्रह असणे.
 4. जीव तोडून काम करणे – शरीराला कितीही त्रास झाला तरी त्याची पर्वा न करता कष्ट करणे, पराकोटीचे कष्ट करणे.
 5. गाजावाजा होणे – अवाजवी प्रसिद्धी होणे.

9th Class Marathi Kumarbharati Lessons Answers भाग-३

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 4 नात्यांची घट्ट वीणNotes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 4 नात्यांची घट्ट वीण Textbook Questions and Answers

1. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 1
उत्तर:
(अ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 2
(आ)
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 3

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

2. ‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.

प्रश्न 1.
‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.
उत्तर:
नाते म्हटले की अमूक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यांसमोर येत नाही. आई-बाबांपासून ते इमारती, डोंगरदऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी डोळ्यांसमोर तरळतात. रात्रभर आपला तान्हुला उपाशी रडत राहील, म्हणून जिवाची पर्वा न करता रायगड किल्ल्याच्या बुरुजावरून उड्या घेत घेत बाळाजवळ धाव घेणारी हिरकणी आठवते.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 4
एखादया परीक्षेत/स्पर्धेत मुलाला अपयश आले, तर घायाळ होणारे एखादे बाबा आठवतात. मी काही चांगले केले की, ताई-दादा ती गोष्ट सर्वांना कौतुकाने सांगतात. नातेवाइकांनाही कौतुक वाटते. कधी कंटाळा आला, तर शेजारी जाऊन बसावेसे वाटते. एखादया दिवशी गाठभेट घडली नाही, तर मित्रमैत्रिणी व्याकूळ होतात. .

आपल्या आवडत्या खेळाडू-कलावंतांना मिळालेल्या यशाने त्यांच्यापेक्षा आपल्यालाच आनंद होतो. आवडते प्राणी, झाडे यांना जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळावे असे वाटते. आवडती ठिकाणे, इमारती तर मनात घरच करून टाकतात, अशी ही नाती म्हणजे दुधावरची सायच!

3. खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा:

प्रश्न 1.
खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा:
(अ) ‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते.
(आ) जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.
उत्तर:
(अ) असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.
(आ) मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून ‘बाप’ नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो.

4. वर्गीकरण करा:

प्रश्न 1.
जन्माने प्राप्त नाती व सान्निध्याने प्राप्त नाती.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 5
उत्तर:

जन्माने प्राप्त नाती सान्निध्याने प्राप्त नाती
1. आई 1. गुरू
2. वडील 2. मित्र
3. बहीण 3. मैत्रीण
4. भाऊ 4. शेजारी
5. आजी 5. हितचिंतक

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

5. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा:

प्रश्न 1.
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 6
उत्तर:

तारुण्यातील नात्याचा प्रवास वार्धक्यातील नात्याचा प्रवास
तारुण्यात अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावनाविकारांनी मन व्यापलेले असते. विविध भावनाविकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ, निकोप बनून जाते.

6. स्वमत:

प्रश्न (अ)
माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
लहानपणी बाळाला स्वत:चे पालनपोषण करता येणे, संरक्षण करता येणे शक्यच नसते. तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते. त्या काळात आई-बाबा व आजी-आजोबा त्याला मदत करतात. म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात. तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात, अनेक कार्ये पार पाडावी लागतात.

त्या काळात मित्र, शेजारी व तत्सम नाती उपयोगी पडतात. मार्गदर्शन करण्यासाठी गुरूची गरज असते. वृद्धपणी माणूस कमकुवत बनत जातो. त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात. अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. नाती नसतील, तर मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही.

प्रश्न (आ)
तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे / मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचे नाते तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा.
उत्तर:
मिथिला ही माझी सर्वांत जास्त आवडती मैत्रीण. ती दिवसातून एकदा जरी भेटली नाही, तरी माझा दिवस सुना सुना जातो. मिथिला आणि मी शिशुवर्गापासून एकत्र आहोत. एकाच वर्गात आहोत. एकाच बाकावर बसतो. मधल्या सुट्टीत एकत्र डबा खातो. दररोज शाळेत भेटतो. तरीही शाळेबाहेर कधी भेट झाली की आम्ही गप्पांत रंगून जातो. माझी आई नेहमी मला विचारते, “काय ग, इतका वेळ कशाकशाबद्दल बोलता? विषय संपत नाहीत का?” मग मला खूप हसू येते.

मिथिलेला एखादे गणित सुटले नाही की मीच ते सोडवून देते. मला एखादा निबंध जमला नाही की, मी तिच्याकडे धावते. मिथिलेला चिंच खूप आवडते. मी अधूनमधून आठवणीने तिच्यासाठी चिंच घेऊन जाते. गेल्या वर्षी संपूर्ण फेब्रुवारी महिना ती टायफॉइडने आजारी होती. मी रोज तिच्याकडे जात असे आणि शाळेत शिकवलेले सर्व पाठ तिला वाचून दाखवीत असे. तिचा सगळा अभ्यास मी करून घेतला. त्या काळात वर्गातली खडान्खडा माहिती मी तिला सांगत असे. अशी आमची मैत्री कधी कधीही संपू शकत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

भाषा सौंदर्य:

पाठातील वाक्यांत परस्पर विरोधी शब्द वापरून केलेली रचना हे लेखिकेच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ही रचना म्हणजे समृद्ध भाषेचे उत्तम उदाहरण आहे.
उदा.,
1. कधी आई आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते.
2. शेजारधर्माचा एक धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि धागा तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो.
3. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहूर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते आपल्याला पुढे नेणारी.

अशा उदाहरणांतून तुम्ही तुमचे लेखन कौशल्य वाढवू शकता, भाषा समृद्ध करू शकता. त्यांतून तुमचे भाषिक कौशल्य विकसित होणार आहे. याप्रमाणे इतर वाक्यांचा शोध घ्या. या प्रकारची वाक्ये स्वत: तयार करा.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 4 नात्यांची घट्ट वीण Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 2 : (आकलन)

1. वर्गीकरण करा:

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 7
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 8

कृती 3: (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
नात्यांची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
आपला जन्म होतो, त्याच क्षणी आपल्याला काही नाती मिळतात. आई-वडील, मुलगा-मुलगी, बहीण-भाऊ, नात-नातू, आजी-आजोबा ही नाती आपल्याला जन्माने मिळतात. ही नाती मिळवण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. ही नाती आपोआप मिळतात. सुरुवातीच्या काळात तर हीच नाती, म्हणजे या नात्यांनी बांधलेली माणसे ही आपली, स्वकीय व अगदी जवळची असतात. शेजारी किंवा मित्र-मैत्रिणी ही नाती सहवासातून निर्माण होतात. हळूहळू विविध प्रसंगांतून किंवा एकमेकांशी होणाऱ्या वागण्यातून ही माणसे जवळची होतात किंवा दूरची होतात. वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावामुळे, त्यांच्या वागण्यामुळे त्यांचा सहवास सुखद बनतो, हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते मृदुमुलायम बनते. नात्यांना असे विविध रंग असतात, विविध आकार असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

उतारा क्र. 2

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
रिकाम्या चौकटी भरा:
1. [ ]
2. [ ]
3. [ ]
उत्तर:
1. [उबदार शाल]
2. [कणखर ढाल]
3. [सुंदर चाल]

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 9
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 10

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

पाठ्यपुस्तकातील शब्द अर्थ
1. बघता बघता पंख पसरून उडायला सुरुवात करतं.
2. त्याची झेप सातासमुद्रापलीकडे जायला लागते.

उत्तर:

पाठ्यपुस्तकातील शब्द अर्थ
1. बघता बघता पंख पसरून उडायला सुरुवात करतं. मूल मोठं होता होता स्वतंत्र बनतं.
2. त्याची झेप सातासमुद्रापलीकडे जायला लागते. मोठ्या कालावधीसाठी ताटातूट होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

कृती 3: (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘आईवडील व मुले यांच्यातील नाते परस्परविरोधी भावनांनी भरलेले असते.’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तर:
आईचे मुलावर अपार प्रेम असते. ती त्याला हळुवारपणे आंजारते, गोंजारते. पण प्रसंगी अत्यंत कठोरपणेही वागते. मुलाचा मार्ग सुकर व्हावा, म्हणून आईवडील जणू काही वल्हे बनतात. मुलाला मार्ग तयार करून देतात. येथे मुलगा अजून कमकुवत आहे व वडील अत्यंत सक्षम आहेत, असे चित्र दिसते. पण त्याच वेळी त्या दोघांमध्ये संवाद नामक सेतू बांधला जातो, म्हणजे त्यांच्यात मैत्रीचे, बरोबरीचे नाते निर्माण होते. आई-वडील मुलाला अत्यंत मायेने, आत्मीयतेने वाढवतात. पण थोड्याच अवधीत मुलगा पंख पसरून स्वतंत्रपणे उड्डाण करू लागतो. म्हणजे तो हळूहळू दूर जाऊ लागतो आणि तो सातासमुद्रापलीकडे जातो, तेव्हा तर फार मोठ्या काळासाठी ताटातूट होते. मुलाला वाढवताना आईवडील आनंदी असतात. पण काही काळातच तो दूर गेल्यामुळे दुःखी होतात. अशा प्रकारे आईवडील व मुले यांच्यातील नाते परस्परविरोधी भावनांनी भरलेले असते.

प्रश्न 2.
‘असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते.’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करून सांगा.
उत्तर:
प्रत्येक आईला आपले बाळ सद्गुणी, कर्तबगार व्हावे, असे वाटत असते. म्हणून ती त्याच्यावर सतत चांगल्या गुणांचा संस्कार करीत राहते. मूर्तिकार, शिल्पकार जशी सुंदर मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतात, तशी आई बाळाला सुंदर माणूस घडवण्याचा प्रयत्न करते. शिल्पकार ओबडधोबड दगडावर छिन्नीचे घाव घालतो. अशा वेळी त्या दगडाला किती वेदना होत असतील! आपल्याच देहाचे अनेक तुकडे आपल्यापासून विलग होऊन पडतात, हे पाहताना त्याला दुःख होतच असणार; पण तो हे सगळे सहन करतो. आईचे आपल्या बाळावर अतोनात प्रेम असते, पण प्रसंगी ती कठोरपणे शिक्षा देते. शिक्षा देताना तिला दुःख होतेच, तसे त्या बाळालाही दुःख होते. दोघेही ते दु:ख गिळतात, सहन करतात. त्यामुळे त्या बाळाच्या व्यक्तिमत्त्वाला चांगला आकार मिळतो. तो सद्गुणी माणूस बनतो. हे सर्व लेखिकांना त्या विधानातून व्यक्त करायचे आहे.

उतारा क्र. 3

पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
जन्माबरोबर निर्माण होणाऱ्या नात्यांखेरीज दोन नवीन नात्यांची नावे लिहा.
1. ………………
2. ………………
उत्तर:
1. मैत्री
2. शेजारधर्म.

प्रश्न 2.
पुढील वाक्याचा एका वाक्यात सुबोध अर्थ लिहा:
ते नातं ‘अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं’ होतं.
उत्तर:
हजारो वर्षांपासून माणसामाणसांत चालत आलेल्या मैत्रीच्या नात्याची नवनवीन रूपे निर्माण होतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा :
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 11
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 12

प्रश्न 2.
सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर लिहा :
शिष्य : गुरुदक्षिणा : : गुरू : [ ]
उत्तर:
शिष्य : गुरुदक्षिणा : : गुरू : कानमंत्र

प्रश्न 3.
विधान पूर्ण करा :
कानमंत्र म्हणजे ………………
उत्तर:
कानमंत्र म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गुरूने शिष्याच्या कानात सांगितलेला मंत्र.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 2.
‘मित्र दिसला तरी मैत्रीचं नातं दिसत नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
आई-वडील, बहीण-भाऊ ही नाती जन्मत:च मिळतात. ती स्वीकारावी लागतात. त्यांत निवड करता येत नाही. काही नाती सान्निध्याने निर्माण होतात. ती लादलेली नसतात. मैत्री हे एक असे सान्निध्याने, सहवासाने निर्माण होणारे नाते आहे. मैत्रीचे नाते अत्यंत तरल व सूक्ष्म असते. दोन व्यक्तींमध्ये मैत्रीचे नाते का निर्माण होते, याची कारणे, स्पष्टीकरणे देता येत नाहीत. काही कारणे देता येतात, हे खरे. पण सर्व कारणे किंवा पूर्ण स्पष्टीकरण कधीच देता येत नाही. मित्राशिवाय किंवा मैत्रिणीशिवाय जीवन निरस बनते. मित्राचे असणे जाणवते, पण दाखवता येत नाही. मित्र दिसतो. दाखवता येतो. त्याच्याकडे बोट करता येते. पण मैत्री या भावनेचे स्वरूप सांगता येणे अशक्य असते. ते दिसत नसले, तरी आहे हे मान्य करावे लागते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 13
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 14

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा:

निर्माण होणारी मन:स्थिती आजीचे रूप
(य) आनंदी
(र) वृद्धाश्रमात राहणारी

उत्तर:

निर्माण होणारी मनःस्थिती आजीचे रूप
(य) आनंदी झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी
(र) दुःखी वृद्धाश्रमात राहणारी

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
विधाने पूर्ण करा:

 1. पिकले पान गळणे म्हणजे …………………….
 2. (या पाठात ) उंबरठा ओलांडणे याचा अर्थ …………………
 3. नवी पालवी फुटणे म्हणजे …………………..

उत्तर:

 1. पिकले पान गळणे म्हणजे मृत्यू येणे.
 2. उंबरठा ओलांडणे याचा अर्थ मृत्यू पावणे हा आहे.
 3. नवी पालवी फुटणे म्हणजे नवीन जीव जन्माला येणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

प्रश्न 2.
उताऱ्यात सांगितलेला निसर्गाचा नियम लिहा.
उत्तर:
पिकलेले पान गळून पडल्यावर नवीन पालवी फुटतेच; म्हणजे काही माणसे मरण पावत असली, तरी नवीन जीव जन्माला येतात, हा निसर्गाचा नियम आहे.

प्रश्न 3.
लेखिकांनी अभिप्रेत अभिन्न नाते स्पष्ट करा.
उत्तर:
जन्मापासून सुरू झालेल्या प्रवासात आपले वेगवेगळ्या व्यक्तींशी नाते निर्माण होते. पण वृद्धत्वात गेल्यावर, आपण या संपूर्ण निसर्गचक्राचे भाग आहोत, ही जाणीव होते. आपण वेगळे, सुटे नाही. संपूर्ण निसर्गाला घट्ट चिकटलेलाच भाग आहोत. यालाच लेखिकांनी अभिन्न नाते म्हटले आहे.

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
‘मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो.’ या विधानाचा भावार्थ समजावून सांगा.
उत्तर:
बालपण, तारुण्य, प्रौढपण असे टप्पे पार करीत करीत माणूस वार्धक्याच्या टप्प्यात प्रवेश करतो. या अखेरच्या टप्प्यात आल्यावर आपल्या पूर्वीच्या आयुष्याकडे तो वळून पाहतो, त्या वेळी त्याची दृष्टीच पार बदललेली असते. आधीच्या टप्प्यांमध्ये माणूस अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा या भावभावनांमध्ये पूर्ण बुडालेला असतो. त्याचे मान-अपमान तीव्र असतात. अनेकदा स्वत:चे मानअपमान जपता जपता तो इतरांचा अपमान करतो, त्याला वेदना देतो. ते सर्व वार्धक्याच्या टप्प्यात आठवते. आपल्या चुका कळतात, साहजिकच, तो या भावविकारांना बाजूला सारतो. त्याचे मन निर्मळ बनते, सगळ्या माणसांकडे, सगळ्या जगाकडे तो निर्मळपणाने पाहू लागतो. जग आता त्याला नव्या रूपात दिसू लागते. नवा आनंददायी प्रवास सुरू होतो.

भाषाभ्यास:

1. समास:

प्रश्न 1.
पुढील विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा :
उत्तर:

 1. भूमी हीच माता → मातृभूमी
 2. तीन कोनांचा समूह → त्रिकोण
 3. आई आणि वडील → आईवडील
 4. सुख किंवा दुःख → सुखदुःख

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
पुढील शब्द उपसर्गघटित की प्रत्ययघटित ते ओळखा:

 1. कौटुंबिक-प्रत्ययघटित
 2. जबाबदारी-प्रत्ययघटित
 3. अपमान-उपसर्गघटित
 4. अपूर्ण-उपसर्गघटित.

3. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. मात करणे
2. पाठीशी उभे राहणे.
उत्तर:
1. मात करणे – अर्थ: विजयी होणे.
वाक्य: भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर मात केली.

2. पाठीशी उभे राहणे – अर्थ : आधार होणे.
वाक्य : कोणत्याही कामामध्ये गावचे सरपंच गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात.

आ (भाषिक घटकांवर आधारित कृती):

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील शब्दांत लपलेले चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. भवसागरात
2. कणखर.
उत्तर:
1. (1) साव (2) साग (3) सात (4) रात.
2. (1) कण (2) कर (3) खण (4) रण.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

प्रश्न 2.
वचन बदला:

 1. मंत्र
 2. बहिणी
 3. मुलगी
 4. स्त्रिया.

उत्तर:

 1. मंत्र – मंत्र
 2. बहिणी – बहीण
 3. मुलगी – मुली
 4. स्त्रिया – स्त्री.

प्रश्न 3.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण 15
उत्तर:

 1. स्वकीय × परकीय
 2. नाजूक × भक्कम
 3. ठळक × पुसट
 4. तारुण्य × वार्धक्य

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

 1. निर्वीवाद, निर्विवाद, नीवीर्वाद, नीर्विवाद.
 2. हितचीतक, हीतचीतक, हीतचिंतक, हितचिंतक.
 3. मार्गदर्शक, मागदर्शक, मार्गदशक, मार्गद्रशक.
 4. गुरुदक्षिणा, गुरूदक्षिणा, गुरुदक्षिणा, गुरुदक्षीणा.

उत्तर:

 1. निर्विवाद
 2. हितचिंतक
 3. मार्गदर्शक
 4. गुरुदक्षिणा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
चिन्हे लिहा:
उत्तर:
1. उद्गारचिन्ह → [!]
2. प्रश्नचिन्ह → [?]

नात्यांची घट्ट वीण Summary in Marathi

प्रस्तावना:

मीरा शिंदे या नव्या पिढीच्या लेखिका असून, अनेक नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे लेखन प्रसन्न व प्रभावी असते. प्रस्तुत लेखामध्ये लेखिकांनी माणसामाणसांमधील नात्यांचे वर्णन केले आहे. जीवन जगत असताना या सर्व नात्यांचा माणसाला आधार मिळत असतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो इतर माणसांच्या सोबत व त्यांच्या आधारानेच जगत असतो. साहजिकच, या माणसांशी त्याचे काही संबंध निर्माण होतात. हे संबंध म्हणजेच नाते होय. या नात्यांमधील काही नाती ही जन्मामुळे प्राप्त होतात, तर काही नाती सहवास वा वातावरण यांमुळे निर्माण होतात. प्रस्तुत लेखात लेखिकांनी या नात्यांचे स्वरूप अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे.

शब्दार्थ:

 1. वीण – कापड तयार करण्यासाठी केलेली उभ्या व आडव्या धाग्यांची रचना.
 2. जवळीक – आपुलकी.
 3. भवसागर – (भव आपल्याला दिसणारे, जाणवणारे आपल्या अवतीभवतीचे विश्व) भवरूपी सागर.
 4. उलघाल – उलथापालथ, धांदल, गोंधळ, कालवाकालव, तगमग, तळमळ.
 5. सृजन – निर्मिती.
 6. कानमंत्र – गुप्त सल्ला, गुप्त मंत्र.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 4 नात्यांची घट्ट वीण

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

 1. जवळीक साधणे – सलगी प्राप्त करणे, मैत्री मिळवणे.
 2. तारेवरची कसरत करणे –
  1. कोणताही निर्णय घेताना प्रचंड गोंधळ होणे.
  2. घेतलेल्या निर्णयाला धरून राहताना प्रचंड तारांबळ उडणे.
 3. जिवाची उलघाल होणे – मनाची तगमग, तळमळ होणे ; मनात कालवाकालव होणे; जीव घाबराघुबरा होणे.
 4. कानमंत्र देणे –
  1. अत्यंत मोक्याच्या क्षणी कसे वागायचे याबाबत सल्ला देणे.
  2. गुप्त सल्ला देणे.
 5. कात टाकणे – जुन्या गोष्टींचा त्याग करून पूर्णपणे नवीन स्वरूप धारण करणे.
 6. उंबरठा ओलांडणे –
  1. मर्यादा ओलांडणे
  2. मर्यादित कक्षेतून अधिक व्यापक कक्षेत प्रवेश करणे.
  3. (या पाठानुसार अर्थ) मृत्यू पावणे.
 7. पिकलं पान गळणं –
  1. मृत्यू पावणे.
  2. शेवट होणे.
 8. नवी पालवी फुटणे –
  1. नवे स्वरूप मिळणे.
  2. नवा जन्म मिळणे.

टिपा:

1. नाळ: बाळ आईच्या पोटात वाढते. त्या वेळी बाळाच्या बेंबीतून एक नलिका येते. ती नलिका आई व बाळ यांना जोडते. या नलिकेला नाळ म्हणतात. या नाळेतून आईकडून बाळाला सर्व जीवनरस मिळतो आणि त्याचे पोषण होते.

2. कानमंत्र : मुलगा साधारणपणे आठ वर्षांचा झाला की, त्याला गुरूकडे शिक्षणासाठी पाठवले जाई. शिक्षणासाठी त्याला गुरूकडेच राहावे लागे. त्याची एक अवस्था संपून दुसरी अवस्था सुरू होई. गुरुगृही जाण्यापूर्वी त्या मुलाची मुंज केली जाई. या मुंजीत एक महत्त्वाचा विधी असे. पुढील आयुष्यात उपयोगी पडेल अशी महत्त्वाची गोष्ट वा महत्त्वाचा सल्ला मुलाच्या कानात वडील सांगत असत.

यालाच कानमंत्र असे म्हणतात. हा कानमंत्र मुलाच्या कानातच आणि इतर कोणालाही ऐकू जाणार नाही, अशा रितीने सांगितला जाई. यावरून गुपचूप दिलेल्या सल्ल्याला कानमंत्र म्हटले जाऊ लागले. ‘मननात त्रायते इति मन्त्रः।’ ही मंत्राची व्याख्या आहे. ज्याचे सतत मनन केल्याने आपले रक्षण होते, त्याला ‘मंत्र’ म्हणतात.

9th Std Marathi Textbook Answers Pdf भाग-१

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Textbook Questions and Answers

1. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा:
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 1

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

2. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 2

3. पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:

प्रश्न 1.
पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा:
उत्तर:
(अ) संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
(आ) संतांना सन्मानाची अपेक्षा असते.
(इ) संत निंदा आणि स्तुती समान मानत नाहीत.
(ई) संत सुख आणि दु:ख समान मानतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. वृक्ष
2. सुख
3. सम

5. काव्यसौंदर्य.

प्रश्न (अ)
‘अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती । तया न म्हणती छेदूं नका ।।’ या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
वृक्षाला मान-अपमान यांची फिकीर नसते. कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले, तरी त्या माणसांना ते ‘मला तोडू नका’ असेही म्हणत नाहीत. अशा प्रकारे वृक्षांना मान-अपमान समान असतात.

प्रश्न (आ)
‘निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।’ या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे. संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली, तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात. निंदास्तुतीने ते अजिबात विचलित होत नाहीत. त्यांचे मन निश्चल राहते. या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात. हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

6. अभिव्यक्ती.

प्रश्न (अ)
प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे. वृक्ष एका ठायी निश्चल असतात. वृक्ष उदारवृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व सावली देतात. त्या बदल्यात ते माणसांकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत. संतसज्जनही निरिच्छ वृत्तीने माणसांना ज्ञानदान करतात. वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही. संतसज्जनही मानापमानाच्या पलीकडे असतात. त्यांना निंदास्तुती समान असते. वृक्षांप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सार्थ आहे.

प्रश्न (आ)
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा.
उत्तर:
‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।। तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे पीडित लोक आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे. त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे. अशा प्रकारे रंजल्या-गांजल्या माणसांची जो मदत करतो, त्यालाच देवत्व प्राप्त होते. समाजाची आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते. ‘पुण्य परउपकार । पाप ते परपीडा’ असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो.

उपक्रम:
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे….’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

भाषा सौंदर्य:

खाली दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद.
(रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे) यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

भाषाभ्यास:

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा बाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजे अलंकार.

अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत. अर्थालंकारांमध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात, आता उपमेय आणि उपमानातील साधावर आधारित काही अलंकारांचा आपण परिचय करून घेऊया.

1. रूपक अलंकार:

प्रश्न 1.
पुढील ओळींतील उपमेय व उपमान ओळखा :
1. नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 3
2. ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ।।
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5

2. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये-

1. उपमेय व उपमान यांच्यात साम्य.
2. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे.
3. अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इ. साधर्म्य दर्शक शब्दांचा वापर.

उपमेय व उपमान (कमल व नयन) यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात म्हणून इथे ‘रूपक’ अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहेत (उपमा) किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे (उत्प्रेक्षा) असे न म्हणता नयन हेच कमल असे दर्शवले आहे, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

3. जेव्हा वाक्यांत उपमेय, उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक’ अलंकार होतो.

खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाही रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥
उपमेय – [ ]
उपमान – [ ]

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.

वृक्ष संत
मान-अपमान जाणत नाहीत. निंदा-स्तुती समान मानतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 5.1

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. सज्जनांची भेट होणे म्हणजे ……..”ची गाठ पडणे होय. (भक्ती-मुक्ती/जिवा-शिवा/सुख-दु:ख/निंदा-स्तुती)
2. कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला ——— नका असे म्हणत नाहीत. (मोडू/सोडू/तोडू/छेडू)
उत्तर:
1. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते.
2. सज्जनांची भेट होणे म्हणजे जिवा-शिवाची गाठ पडणे होय.
कुणी वृक्ष तोडला, तर वृक्ष त्याला तोडू नका असे म्हणत नाहीत.

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 6
उत्तर:
[पूर्ण धैर्यवंत] [संत]

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

कृती 4 : (काव्यसौंदर्य)

प्रश्न 1.
प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणरक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गाचे रक्षण आपण करायला हवे. निसर्ग आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण देतो. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी पूर्ण धैर्यवंत संतांची तुलना वृक्षांशी केली आहे. संतांचे वर्तन वृक्षांसारखे असते. वृक्षांना मान-अपमान ठाऊक नसतो. कुणी पूजा केली काय किंवा घाव घातला काय, वृक्ष अविचल असतात. माणसाचे वागणेही वृक्षाप्रमाणे असावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा -हास करू नये, उलट वृक्षलागवड व संवर्धन करावे, असा संदेश संत नामदेवांनी या अभंगात दिला आहे.

लक्षात ठेवा:

1. इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (आ) हा कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हा असेल. यामध्ये प्रश्न 2 (अ) आणि (इ) यांत दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील. त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे:

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव 7

2. वरील 8 कृतींपैकी कृतिपत्रिकेत 1-1 गुणाच्या पहिल्या 2 कृती आणि 2 गुणांची कोणतीही 1 कृती विचारली जाईल.
उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या कवितेचे नाव लिहिणे आवश्यक आहे.

3. ही कृती सोडवण्यासाठी अभ्यास असा करा:

1. कवींचे/कवयित्रींचे नाव, कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, आवड किंवा नावडीची कारणे इत्यादींसाठी पुढील उत्तर नीट अभ्यासावे.
2. कवितेतील दिलेल्या ओळींच्या सरळ अर्थासाठी कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.
3. कवितेतील शब्दांच्या अर्थासाठी कवितेच्या सुरुवातीला दिलेले शब्दार्थ अभ्यासावेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

कविता: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे.

महत्त्वाची नोंद: परीक्षेत आठपैकी कोणत्याही 3 कृती विचारल्या जाणार आहेत. तथापि विदयार्थ्यांना सर्व कृतींचा सराव मिळावा म्हणून इथे सर्व 8 कृती उत्तरांसह सोडवून दाखवल्या आहेत. आशयावर आधारलेल्या प्रत्येकी 2 गुणांच्या कृतींची उत्तरे येथे नमुन्यादाखल दिलेली आहेत. ही उत्तरे विदयार्थी स्वत:च्या मतानुसार व स्वत:च्या शब्दांत लिह शकतात.

उत्तर: संतवाणी – (अ) जैसा वृक्ष नेणे

 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → संत नामदेव.
 2. कवितेचा विषय → या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.
 3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ → (इथे सरावासाठी अनेक शब्दार्थ दिले आहेत.)
 4. वृक्ष = झाड
 5. चित्त = मन
 6. निंदा = नालस्ती
 7. सम = समान
 8. धैर्य = धीर
 9. जीव = प्राण.

4. कवितेतून मिळणारा संदेश → संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिरबुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत यमक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान-अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।
→ निंदा आणि स्तुती जे समान लेखतात, ते संत असतात. असे साधुसंत संपूर्ण धैर्यवान असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

रसग्रहण:

इयत्ता 9 वी-10 वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदययावत आराखड्यानुसार प्रश्न 2 (इ) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत 4 गुणांचा हा नवीन प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:

1. पठित पदयांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल.
2. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे:

1. आशयसौंदर्य: यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
2. काव्यसौंदर्य: यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
3. भाषिक वैशिष्ट्ये: यामध्ये कवींची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती); तसेच आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्दयांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.

वरील मुद्द्यांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा, हे पुढे मार्गदर्शनार्थ दिले आहे. तो अभ्यासून कवितेतील अन्य कोणत्याही दोन पंक्तींसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव विदयार्थ्यांनी करावा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
“निंदास्तुति सम मानिती जे संत।
पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे ।।
उत्तर:
आशयसौंदर्य: ‘जैसा वृक्ष नेणे’ या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत-सज्जनांची महती सांगितली आहे. संतांचे वागणे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते. तशी आपली वागणूक ठेवावी स्थिर चित्ताने वर्तन करावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे.

काव्यसौंदर्य : झाडाची पूजा केली किंवा झाड तोडले तरी झाडाला दुःख होत नाही. त्याला मान-अपमान वाटत नाही. संतसज्जन झाडासारखे असतात. निंदा व स्तुती त्यांना समान वाटते. स्तुतीने ते हुरळून जात नाहीत अथवा निंदेने नाराज होत नाही. ते पूर्ण धीरवंत व स्थिरबुद्धीने वागतात. अशा धैर्यवंत साधूंची गाठ पडणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होणे असते.

भाषिक वैशिष्ट्ये: ‘अभंग’ या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे. पहिल्या तीन चरणात सहा व चौथ्या चरणात चार अक्षरे असा हा ‘मोठा अभंग’ छंद आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधले आहे. झाडाचे सर्वमान्य प्रतीक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. नेमके तत्त्व सांगून लोकमानसाला योग्य शिकवण सहजपणे देण्याची विलक्षण हातोटी शब्दांनी साधली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. अलंकार:
नोंद : सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.

2. वाक्प्रचार:

प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. निंदा करणे
2. स्तुती करणे.
उत्तर:
1. निंदा करणे – अर्थ : नालस्ती करणे.
वाक्य: कुणीही कुणाची कधीही निंदा करू नये.
2. स्तुती करणे – अर्थ : प्रशंसा करणे.
वाक्य: गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या मोहितची सरांनी वर्गात स्तुती केली.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :

 1. वृक्ष
 2. सुख
 3. सम.

उत्तर:

 1. वृक्ष = झाड, तरू
 2. सुख = आनंद, समाधान
 3. सम = समान, सारखेपणा.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

 1. मान
 2. निंदा
 3. सुख
 4. पूर्ण.

उत्तर:

 1. मान × अपमान
 2. निंदा × स्तुती
 3. सुख × दुःख
 4. पूर्ण × अपूर्ण.

प्रश्न 3.
पुढे दिलेल्या कंसातील शब्दांना (क्रियापदांना) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा:
नोंद: सदर प्रश्नप्रकार कृतिपत्रिकेच्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. परंतु हा प्रश्न पाठ्यपुस्तकातील असल्यामुळे विदयार्थ्यांच्या अधिक अभ्यासासाठी तो इथे उत्तरांसह समाविष्ट करण्यात आला आहे.
उदा., आखणे – आखीव – आखीव कागद (रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे)
उत्तर:

 1. रेखणे – रेखीव – रेखीव आकृती
 2. कोरणे – कोरीव – कोरीव काम
 3. ऐकणे – ऐकीव – ऐकीव गोष्ट
 4. घोटणे – घोटीव – घोटीव शिल्प
 5. राखणे – राखीव – राखीव जागा.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. सतजन, सज्जन, सजन्न, साज्जन.
2. स्तुती, स्तूती, स्तुति, स्तूति.
उत्तर:
1. सज्जन
2. स्तुती.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

उपक्रम:

प्रश्न 1.
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा.

संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव Summary in Marathi

कवितेचा आशय:

या अभंगात संत नामदेवांनी संतांना झाडांची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केली आहे.

शब्दार्थ:

 1. जैसा – जसा.
 2. वृक्ष – झाड.
 3. नेणे – जाणत नाही.
 4. मान – सन्मान, गौरव.
 5. अपमान – अवमान.
 6. तैसे – तसे.
 7. सज्जन – संत.
 8. वर्तताती – वागतात, वर्तन करतात.
 9. चित्ती – मनात.
 10. तया – त्यांना.
 11. अथवा – किंवा. छेदू
 12. नका – तोडू नका.
 13. निंदा – नालस्ती, अपमानकारक बोलणे.
 14. स्तुती – प्रशंसा.
 15. सम – समान, सारखे.
 16. धैर्यवंत – हिंमतवान, गंभीर, निश्चल.
 17. भेटी – गाठभेट.
 18. जीव – प्राण.
 19. शिव – परब्रह्म, परतत्त्व.
 20. गांठी – एकत्र येणे.
 21. जाय – होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव

कवितेचा (अभंगाचा) भावार्थ:

संतांची महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात – ज्याप्रमाणे वृक्षाला (झाडाला) मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही, मानापमान ते जाणत नाहीत; त्याप्रमाणे, त्या वृक्षाप्रमाणे संतांचे (सज्जनांचे) वर्तन असते. ।।1।।

कोणी माणसांनी येऊन वृक्षाची पूजा केली, तरी वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही. ।।2।।
किंवा कोणी येऊन वृक्षाला तोडले, तरी तो त्या माणसांना ‘तोडू नका’ असे म्हणत नाही. तो अविचल राहतो. ।।3।।

तसे संतसज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. असे हे साधुसंत पूर्णतः धैर्यवंत असतात. निश्चल असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही. ।।4।।

संत नामदेव म्हणतात, अशा संतांची जेव्हा गाठभेट होते, तेव्हा साक्षात जीवाशिवाची गाठ पडते. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख लागते. ।।5।।

9th Std Marathi Kumarbharati Digest Pdf भाग-१

Scroll to Top