Class 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता)

Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता) for exam preparation.

Std 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता)

Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 14 आतां उजाडेल (कविता)

आतां उजाडेल (कविता) Question Answer

प्रश्न १.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते?
उत्तर:
उदास वातावरण निर्माण करणारा अंधार ओसरेल व त्यानंतर उगवत्या सूर्यकिरणांची कलाबूत मोहरेल, असे कवीला वाटते.

(आ) आनंदाने मृदु गळ्यात कोण गाणार आहे ?
उत्तर:
उजाडल्यावर जणू काही आनंदाच्या लाटा गात फुटतील. तसेच पक्षीदेखील आनंदाने मृदु गळ्याने गाणार आहेत.

Class 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता)

(इ) पानांवर दहिंवर केव्हा हसेल?
उत्तरः
पानांच्या हिरवेपणात वारा हसेल व गहिवर दाटून आलेल्या प्रकाशात पानांवरील दहिंवर म्हणजेच दव हसेल.

(ई) गारवा कशामुळे थरारेल?
उत्तर:
उजाडत असताना पारिजात आपल्या फुलांचा वर्षाव करेल व त्या फुलांच्या सुगंधाने कोवळा गारवा थरारेल.

(उ) प्रकाशाचे महादान कोणते ?
उत्तर:
सूर्योदयाने दाही दिशा उजळून निघतील व सूर्यप्रकाशाने निळे आकाश भरून जाईल, हेच प्रकाशाचे महादान असेल.

(ऊ) उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे?
उत्तर:
उजाडल्यामुळे मनामनांत प्रकाशाचे झरे निर्माण होतील व अंधाराचे भय संपणार आहे.

प्रश्न २.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगांवकर यांच्या ‘जिप्सी’ कवितासंग्रहातील ‘आता उजाडेल !’ या कवितेत त्यांनी, सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात होणाऱ्या आनंददायक बदलांचे मनोहारी चित्रण केले आहे.)

(अ) उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते?
उत्तर:
उजाडल्यामुळे अंधार ओसरून सूर्यकिरणांची जरीप्रमाणे नक्षी तयार होणार आहे. आनंदाच्या लाटा निसर्गात गात फुटतील व पक्षीही आपल्या मंजूळ गळ्याने गाऊ लागतील. वारा पानांतून हसेल व गहिवरलेल्या प्रकाशामध्ये दवबिंदू मिसळून जातील. पारिजात आनंदाने आपल्या फुलांचा वर्षाव करणार आहे व त्यांच्या सुगंधाने पहाटेचा गारवा थरारून जाईल. कळ्या उमलू लागतील. सर्वत्र निळा – सोनेरी प्रकाश पसरेल. प्रकाशाने दाही दिशा व आकाश व्यापून जाईल.

(आ) ‘पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल’ या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा.
उत्तर:
आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे ही रात्रीच्या अंधाराप्रमाणे आहेत. अंधाराचे जसे आपल्याला भय वाटते, तसेच या संकटांचीही भीती असते; परंतु रात्रीचा अंधार जसा सूर्य उगवल्यावर नष्ट होतो, तो कायमस्वरूपी नसतो; तसेच संकटेही कायमची नसतात. नवी पहाट, नवीन दिवस मनात नव्या आशा निर्माण करतो, म्हणून कवी प्रकाशाला वरदान व आशीर्वाद म्हणतात जो आपल्या मनात, प्राणात उगवतो.

प्रश्न ३.
खालील ओळी वाचा. त्यांचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

(अ) खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार.
उत्तर:
उदासवाणा अंधार नष्ट होईल व सर्वत्र प्रकाश पसरेल म्हणजेच, निराशा जाऊन मनांमध्ये आशा पल्लवित होतील.

(आ) आनंदात पारिजात उधळील बरसात.
उत्तर:
पहाटेच्या वेळेस उमलणारी पारिजातकाची फुले ही नवीन दिवसाचा, नवीन आशेचा आनंदच व्यक्त करत असतात. पारिजातकाचे झाड हे जणू काही आनंदाने फुलांचा वर्षाव करत असते.

(इ) मृदु गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल.
उत्तरः
सूर्योदयाचा पक्ष्यांनाही आनंद होत आहे. पक्षी त्यांच्या मृदु गळ्याने मंजूळ गाणी गात आहेत. आपल्या किलबिलाटाने ते पहाटेचं स्वागत करत आहेत.

(ई) प्रकाशाचे महादान कणाकणांत स्फुरेल.
उत्तर:
उजाडल्यावर सूर्याचा प्रकाश सृष्टीच्या चराचरांत पसरतो. दाही दिशा व आकाश या प्रकाशाच्या दानाने व्यापून जातात, म्हणून, सूर्याच्या या प्रकाशाच्या दानाला महान दान म्हटले आहे.

Class 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता)

प्रश्न ४.
‘आतां उजाडेल!’ या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. ‘आता पाऊस पडेल!’ व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या चार ओळी लिहा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता) 3
उत्तर:
आता पाऊस पडेल!
सर्वत्र गंध मातीचा दरवळेल
हिरव्या कोमल तृणांचा
शालू लेवून वसुंधराही सजेल.

प्रश्न ५.
या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा.

(अ) …….. आनंदाच्या लाटा
उत्तर:
शुभ्र

(आ) …….. गळ्यांत
उत्तर:
मृदु

(इ) ……. आकाश
उत्तर:
निळे

(ई) ……. गारवा
उत्तर:
गोड, कोंवळा

प्रश्न ६.
दान-महादान यांसारखे तुम्हांला माहीत असलेले शब्द लिहा.
उत्तर:

  1. लक्ष्मी – महालक्ष्मी
  2. प्रलय – महाप्रलय
  3. राजा – महाराजा
  4. वृक्ष – महावृक्ष
  5. सागर – महासागर
  6. नगर – महानगर
  7. पूर – महापूर
  8. पुरुष – महापुरुष
  9. मार्ग – महामार्ग
  10. नायक – महानायक

विचार करून सांगूया.

डेव्हिड संध्याकाळी अभ्यासाला बसला. अचानक वीज गेली. ओह ! आता कसला अभ्यास होतोय. समूहगीतही पाठ करायचे होते. किती अंधार पसरलाय सगळीकडे. सगळंच अडलंय; पण वीज गेली कशी ? सांगा बरे आता डेव्हिड अभ्यास कसा करणार ?

माहिती मिळवूया.

सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्य लाल का दिसतो ?

पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूलीकण असतात. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळीही एरवीप्रमाणे सूर्यकिरणे वातावरणांमधून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. सूर्यकिरणांमधील सात रंगांपैकी लाल आणि नारिंगी रंग सोडून बाकीचे रंग विखुरले जातात; त्यामुळे लाल आणि नारिंगी रंग फक्त पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे सूर्य लाल दिसतो. (सूर्यकिरणांमध्ये ता, ना, पि, हि, नि, पां, जां असे सात रंग समाविष्ट असतात.)

• खालील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत ते शोधा व लिहा.
उदा., कान टवकारणे.
Class 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता) 4
उत्तर:

Class 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता) 2

  1. पोटात कावळे ओरडणे.
  2. धुडकावून लावणे.
  3. डोळ्यांत सलणे.
  4. कावराबावरा होणे.
  5. कानगोष्टी करणे.
  6. टवाळकी करणे.
  7. कापरे भरणे.
  8. मात करणे.
  9. ‘वनवासी होणे.
  10. वसंत फुलणे.
  11. असर होणे.
  12. नकार देणे.
  13. वर देणे.
  14. मन आकळणे.
  15. आसुसणे.
  16. मरगळ येणे.
  17. धूम पळणे
  18. कावणे
  19. नमणे
  20. वळवळणे
  21. वरमणे
  22. राबणे

सुविचार.

(१) प्रगती हे जीवनाचे ध्येय असले तरी गती हा त्याचा आत्मा आहे.
(२) सत्य, सदाचार, अहिंसा, शांती, भूतदया ही जीवनाची मूल्ये आहेत.
(३) भविष्य पाहाणाऱ्यापेक्षा, जो भविष्य घडवतो त्याचं जीवन कृतार्थ होतं.

Class 6 Marathi Balbharati Chapter 14 आतां उजाडेल (कविता) Question Answer

संकलित मूल्यमापन

कवितेवर आधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

i. कळ्या केव्हा फुलणार आहेत ?
उत्तर:
निळा-सोनेरी प्रकाश सर्वत्र पसरणार आहे व कळ्यांतील देवदूत म्हणजे परागकणांमुळे कळ्या फुलणार आहेत.

ii. पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून कधी उगवेल ?
उत्तर:
प्रकाशाचे झरे मनामनांत पाझरू लागतील, अंधाराचे भय संपेल; तेव्हा पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल.

Class 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता)

प्रश्न २.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगांवकर यांच्या ‘जिप्सी’ कवितासंग्रहातील ‘आता उजाडेल !’ या कवितेत त्यांनी, सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात होणाऱ्या आनंददायक बदलांचे मनोहारी चित्रण केले आहे.)

i. सूर्य उगवण्याचा आनंद वारा, फुले व पक्षी कसा व्यक्त करणार आहेत?
उत्तर:
पानापानांत फिरणारा वारा पानांचा हिरवेपणा पाहून हसणार आहे. पारिजात आपल्या फुलांची मुक्तपणे उधळण करणार आहे व त्यांच्या सुगंधाने पहाटेचा गारवाही थरारणार आहे. कळ्यांमधील देवदूतांमुळे म्हणजे परागकणांमुळे कळ्या उमलून आपला आनंद व्यक्त करणार आहेत. पक्षीदेखील आपल्या मंजूळ गळ्याने गाऊन पहाटेचे स्वागत करणार आहेत.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
‘किलबिल’ सारखे आणखी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. ऐसपैस
  2. ताळमेळ
  3. चूकभूल
  4. देवघेव
  5. रोगराई
  6. जाडजूड

प्रश्न २.
समानार्थी शब्द लिहा.

  1. खिन्न =
  2. खग =
  3. आकाश =
  4. पहाट =
  5. सुगंध =
  6. गोड =

उत्तर:

  1. उदास
  2. पक्षी, विहंग
  3. नभ
  4. प्रभात =
  5. सुवास
  6. मधुर

प्रश्न ३.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अंधार ×
  2. आनंद ×
  3. उजळणे ×
  4. आशीर्वाद. ×
  5. मृदु ×
  6. भय ×

उत्तर:

  1. प्रकाश
  2. दुःख
  3. मावळणे
  4. शाप
  5. कठोर
  6. निर्भयता/धाडस

प्रश्न ४.
शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.
उत्तर:

  1. उजाडेल, मोहरेल, पालवेल, मिसळेल, थरारेल, उमलेल, स्फुरेल, उगवेल.
  2. पारिजात, बरसात, देवदूत.
  3. अंधार, पार.
  4. भरून, उजळून.
  5. सरे, झरे.

प्रश्न ५.
या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा.

i. ……. हिरवेपणात
उत्तर:
मुग्ध

ii. …… दिशा उजळून
उत्तर:
दाही

प्रश्न ७.
कवितेतील विशेषनामे शोधून लिहा.
उत्तर:
विशेषनामे:

  1. हिरवा
  2. पारिजात
  3. निळा

प्रश्न ८.
कंसातील विरामचिन्हे वाक्यांत योग्य ठिकाणी वापरा.
(? ! . ; )

  1. अरे वा किती छान चित्र आहे
  2. त्या लेखकाचे नाव काय

उत्तर:

  1. अरे वा! किती छान चित्र आहे.
  2. त्या लेखकाचे नाव काय?

मुक्तोत्तरी प्रश्न

प्रश्न १.
तुमच्या गावातील / शहरातील पहाटेचे वर्णन करा.
उत्तर:
माझ्या गावी आजही कोंबड्यांच्या आरवण्याने व पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाट होते. शेतांच्याही पलीकडे असलेल्या डोंगरामागून सूर्य उगवतो. उगवताना लाल – केशरी दिसणारा सूर्य हळूहळू पिवळा दिसू लागतो. सूर्योदयासोबतच सर्वांची कामांची लगबगही सुरू होते. गाई-गुरांना चरण्यासाठी माळरानावर नेले जाते. झाडांवरील पक्षीसुद्धा अन्नाच्या शोधात आकाशात झेपावतात. अशी प्रसन्न पहाट दिवसभराची ऊर्जा देते.

उपक्रम / प्रकल्प

प्रश्न १.
आंतरजालाचा वापर करून बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची ‘आनंदी आनंद गडे’ कविता शोधा, त्यातील निसर्गाची रूपे समजून घ्या व त्याचे वर्गात सादरीकरण करा.
(टीप: हा उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वत: करावा.)

Class 6 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer आतां उजाडेल (कविता)

आतां उजाडेल (कविता) कवितेचा भावार्थ:

‘आतां उजाडेल!’ ही कविता मंगेश पाडगांवकरांच्या ‘जिप्सी’ कवितासंग्रहातून घेतली आहे. या कवितेत सूर्योदयाच्या वेळी दिसणाऱ्या नयनरम्य निसर्गाचे वर्णन केले आहे.

सूर्योदयाची वेळ झाली आहे. अंधाराचे उदास वातावरण आता ओसरेल आणि सोनेरी जरीप्रमाणे दिसणारी सूर्यकिरणे येतील व सर्वत्र उजाडेल.

उजाडल्यामुळे निसर्ग आनंदाने गीत गाईल. पक्ष्यांच्या कोमल कंठातून मंजूळ किलबिलाट ऐकू येईल. पानापानांत फिरणारा वारा जणू हसू लागेल व सर्व पाने आपल्या हिरव्या रंगामुळे हरखून जातील. गहिवर दाटून आलेल्या या प्रकाशामध्ये दवबिंदू मिसळून जातील व सूर्योदय होईल. आनंद झाल्याने पारिजात आपल्या फुलांची मुक्तपणे उधळण करेल व त्या फुलांच्या सुगंधाने पहाटेचा कोवळा गारवा थरारून जाईल. कळ्यांतील देवदूतांमुळे (परागकणांमुळे) त्या फुलतील. निळसर, सोनेरी प्रकाशकिरणांमुळे सर्व दिशा उजळून निघतील व पहाट होईल.

निळे आकाश व दाही दिशा या प्रकाशाने व्यापून जातील व सृष्टीच्या चराचरांत प्रकाश पसरेल. सूर्याच्या आगमनामुळे मनातील सारी भिती दूर होईल व मनामध्ये प्रकाशाचे झरे, म्हणजेच नव्या आशा निर्माण होतील. पहाटेचा हा आशादायी आशीर्वाद सर्व प्राणिमात्रांना आशा व आनंद देईल.

आतां उजाडेल (कविता) शब्दार्थ

उजळणे प्रकाशित होणे
उजाडणे सूर्य उगवणे (सूर्योदय)
उमलणे बहरणे
ओसरणे हळूहळू कमी होणे
कलाबूत चांदीची किंवा सोन्याची जर, रेशमी दोरा
खग पक्षी, विहंग
खिन्न उदास, दुःखी
गहिवरणे मन भरून येणे
गौरव सन्मान (येथे अर्थ – चैतन्य पसरवणारा प्रकाश)
ज्योतिर्मय प्रकाशमान होणे
दहिंवर दवबिंदू
देवदूत देवाचा निरोप पोहोचवणारा (येथे अर्थ – परागकण)
नकळत अजाणतेपणी
पर्ण पान
पारिजात प्राजक्ताचे झाड
पालवणे पसरणे
बरसात पाऊस, वर्षाव
भय भीती, गंड
महादान सर्वांत मोठे दान
मृदु कोमल
सरे निघून जाणे
स्फुरणे उत्पन्न होणे

Leave a Comment