Maharashtra State Board Class 12th Marathi Question Paper 2022 with Solutions Answers Pdf Download.
Class 12 Marathi Question Paper 2022 Maharashtra State Board with Solutions
Time: 3 Hours
Max. Marks: 80
विभाग १: गद्य (गुण २०)
कृती १.
(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)
(१)
(२)
उत्तर:
(य) दुर्दम्य आशावाद
(र) असामान्य कर्तृत्व
(२)
(२)
उत्तर:
(य) शिस्त, निष्ठा, समर्पण आणि तयाग या शब्दांना यथोचित न्याय देईन.
(र) पुढील पाच वर्षे नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन वीरांना सलामी देईन.
मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीसतेवीस वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती ज्यांना आशीर्वाद दयायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.
तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक्-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असमान्य कर्तुव्य, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तुत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “ जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो !” चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली –
“शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन, केवळ शब्द नाहीत, तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट होऊन त्याची कवनं गाईन आणि निदान पुढील पाच वर्ष नागरिकांना सोबत घेऊन ह्या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन.”
(३) स्वमत अभिव्यक्ति- (४)
शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
स्वमत अभिव्यक्ती – शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिका वेदनांमय झाळ्या. वेदनांनी रक्तबंबाळ झाळ्या. चाबकाने शंभर फटके मारलयावर होणाऱ्या वेदनेपेक्षा कितीतरी अधिक वेदना त्यांच्या मनाला झाळ्या. लेखिकेने त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभावर शपथ घेतली की, शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या त्यांच्या स्वतःच्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथायोग्य न्याय देईन. तसेच मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे भाट होऊन त्यांच्या कर्तृत्वाची कवने गाण्याची शपथ घेतली. पुढील पांच वर्षे या भूमींवर सर्व नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्ववीरांना सलामी देण्याची सुद्धा शपथ लेखिकेने घेतली.
किंवा
सैनिकाला स्वत:च्या कुटुंबापासून हजारोमैल दूर आपले जीवन कर्तव्य बजावत जगावे लागते. आपल्या माणसांत राहून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत सामान्य जीवन जगता येत नाही. दररोज त्यांच्या वाट्याला कष्टमय जीवन येत दऱ्याखोऱ्यांतून, वाळवंटातून, जंगलातून, हिमालयासारख्या बर्फाच्छादित प्रदेशांमधून कर्तव्य बजावत फिरावे लागते. तासनतास एकाच ठिकानी उभे राहून कवक पहारा दयावा लागतो. प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे लागते. त्यांना संचार स्वातंत्र्य नसते. अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवन सैनिक आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी जगत असतात.
याउलट सामान्य नागरिक मुक्तपणे संचार करून आपल्या मनाला बाटेल त्याप्रमाणे जीवन जगत असतो.
(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)
(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)
(य) ………….
(र) ………………
उत्तर:
(य) गुलमोहर
(र) जॅक्रांड
(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)
(य) …………..
(र) ……………
उत्तर:
(य) अनोखा, लोमसवाणा
(र) नाजूक व तरल
सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागतल्या पाखरांना, मी पहिला चाह करून घेऊन तयचे घोट घेत घेत ‘काय लिहावं ? ‘ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांदयांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झालीय काय ?” असं विचारू लागतात.
खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला ? पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात चेत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती अकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये ! पहाट कशी होते, हे देखील पाहण्या जोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल.
हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॉक्राडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो.
(३) स्वमत अभिव्यक्ति : (४)
पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
स्वमत – आपल्या सभोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला असतो असे लेखकाला वाटते. पहाट ही तशी रोज घडणारी घटना आहे. पहाट झाली की पाखरांचा बारीक-बारीक आवाज सुरू होतो. त्यांच्या हालचालींना सुरुवात होते. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे या प्रसंगात लेखकाला मानवी भावभावनांचे दर्शन घडते. पाखरांचा तो बारीक आवाज म्हणजेच त्यांचे कुजबुजने होय. जनू ती एकमेकांना विचारत आहेत. पहाट झाली का ? पहाटेचे हळुवार येणे पाहून लेखकाला वाटते की पहाटचा या पाखरांना हळूच विचारते की “मी येऊका ?” त्या दोघांमधील हे कोमळ नाते. या वाक्यातून लेखकाला व्यक्त करायचे आहे.
किंवा
पहाटे लवकर उठणे तसे आता जुनी कल्पना असल्यासारखे लोक वागत असतात. पहाटे लवकर उठणाऱ्या व्यक्तींना चांगले आरोग्य लाभते. आम्ही एक दिवस मुक्कामासाठी किल्ले हरिश्चंद्र गडावर गेले होतो. गडावर पहाटेची वेळ अतिशय प्रसन्न आणि ऊर्जा देणारी असते. मनाला मोहवणारी आल्हाददायक पहाट आपल्याला दिवसभराच्या कामासाठी एक वेगळीच ऊर्जा देते. नुकताच वापसाळा संपला असल्याने आकाश निरभ्र होते. पहाट होताच सगळीकडे पसरलेला. काळोखाचा पडदा हळूहळू विरळ होत जातो.
वाऱ्याची मंद शीतल झुळूक आपल्या अंगाला मोहरून टाकते. संपूर्ण गडावरील वातावरण आगदी प्रसन्न आणि उल्हासदायक असते. गडाच्या कडा कपाऱ्यातील झाडांवरील पक्षी जणू आपल्याला झोपेतून जागे करण्यासाठीचा किलबिलाट करत आहे असे वाटते. उंचावरील थंड हवा आपल्याला प्रसन्न करून जाते. सगळीकडे असणारी हिखाई पहाटेच्या प्रकाशात पाहण्याची अपूर्वाई काही वेगळीच असते.
(इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(१) चौकटी पूर्ण करा : (४)
(य) अर्थयुक्त असणारे _________ (१)
(र) अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्यकृतीचा उलगडतो तो _____ (१)
उत्तर:
(य) साहित्यकृती शब्द
(र) आशय
साहित्यकृती शब्दांनी बनलेली असते. शब्द अर्थयुक्त असतात. तो अर्थ एकपदरी अथवा अनेकपदरी असतो. प्रतिमा, प्रतीक हे ही शब्दच असतात. त्यात एकाहून अधिक अर्थ असतात. भाषेतील रूपकप्रक्रियेने अर्थाचे विश्व व्यापक केलेले असते. शब्दांच्या साहाय्याने साहित्यकृतीत पात्रे, प्रसंग, वातावरण निर्माण केलेले असते. शब्दार्थजनित कल्पित विश्वाची निर्मिती साहित्यकृतीत होत असते. त्या विश्वाचे बाह्य जगाशी साधर्म्य किंवा वैधर्म्य असते. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्यकृतीचा आशय उलगडतो.
मिथक, आदिबंध यांनी त्या आशयाला एक परिमाण दिलेले असते; तर शब्दांच्या अर्थातून व्यक्त होणाऱ्या विचारप्रणालीने, जीवनविषयक भूमिकेने दुसरे परिमाण दिलेले असते. साहित्यकृतीत विविध व्यक्ती, समाजगट, व्यक्तींची मने, व्यक्ती आणि समाजगट यांच्यातील संबंध शब्दार्थातून व्यक्त झालेले असतात. व्यक्तींना, व्यक्तिसमूहांना सामाजिक संदर्भ असतो. त्या समाजगटाची, समाजाची विशिष्ट संस्कृती असते. माणसांच्या सर्वसाधारण व्यवहारात ‘बोलणे’ हा एक महत्त्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे निर्देशात्मक, भावनात्मक, विचारप्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक, आंतर असे असू शकते.
– वसंत आबाजी डहाके
(२) खालील कृती करा : (२)
माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा :
(य) ……..
(र) ………..
उत्तर:
(य) भावनात्मक
(र) निर्देशात्मक
विभाग २: पद्म (गुण १६)
कृती २.
(अ) खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृति करा (८ गुण)
(१) कामक्रोधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय
(य) ………………..
(र) …………………..
उत्तर:
(य) तमोगुण मागे सरणे
(र) सत्वगुणांचा अंगारा लावणे
(२) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा (२)
(य) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे
(अ) जीवनसत्त्व देऊन,
(आ) सत्त्वगुणांना आश्रय घेऊन,
(इ) सात्त्विक आहार देऊन,
(ई) सत्त्वाचे महत्त्व सांगून,
उत्तर:
(ई) सत्व उतारा देऊन, म्हणजे – सत्त्वाचे महत्त्व सांगून
(र) ‘विंचू चावला वृश्चिक चावला’ या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे –
(अ) भारूड उत्तम गाता येते.
(आ) वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.
(इ) भारुडाला अर्थ प्राप्त होतो.
(ई) भारुड अधिक रंजक बनते.
विंचू चावला ……………..
उत्तर:
(आ) ‘विंचू चावला वृश्चिक चालवा’ या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥ धृ. ॥
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥ १ ॥
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ॥ २ ॥
ह्या विंचवाला उतारा।
तमोगुण मागे सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरा ॥ ३ ॥
सत्तव उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ॥ ४ ॥
(३) अभिव्यक्ति : (४)
सद्गुण अंगी बाणविण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर:
(आ) खालील ओळींचा अर्थ लिहा : (४)
tableee 1
सरी- वाफ्यात, कांद लावते काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई लावते – बाई गोंद
नाही कांदं ग, जीव लावते – रोज मातीत, मी ग नांदते
बाई लावते – बाई नांद
उत्तर:
कष्टकरी शेतकरी महिला तिच्या शेतातील वाफ्यांमध्ये कांदयाची रोपं लावत आहे. ती म्हणजे ही कांदयांची रोपं नसून मी माझा जीवच कांदयाच्या रोपांच्या रूपात लावत आहे. ती शेतकरी महिला अतिशय जीव ओतून शेतात काम करत आहे. तिच्या शेतातील पिकावर तिचे जीवापाड प्रेम असते. तिच्या काळ्या-भोर जमिनीत कांद्यांची लागवड करून ती ते काळभोर शेत हिरवं करत आहे. कांदयांचं पीक चांगल यावं म्हणून ती दररोज शेतात अतिशय कष्ट घेत आहे.
(इ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (४)
काव्य सौंदर्य :
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून
पाहून पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारे भावसौंदर्य उलगडून दाखवा.
किंवा
रसग्रहण :
सांगती ‘तात्पर्य ‘ माझें सारख्या खोट्या दिशा:
“चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा ।”
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ।
वरील ओळींचे रसग्रहण करा.
उत्तर:
काव्य सौंदर्य – ‘ आरशातली स्त्री’ या कवितेत कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागवून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे. आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागवताना आरशातील स्त्री म्हणते. “तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात गढून मूक- अबोल होऊन सर्व मुकाट्याने सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी ताटकळत (बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही. पूर्वी तू बागेत. अलझडपणे बागडायचीच. त्या वेळी तुझ्यासोबत असलेळी जाईं आता तुझी वाट बघून पेंगाळून गोलीय. तुझ्यातला स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हखरलेली कठोर पुतळी झाली आहेत.
‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’ आणि ‘पेंगुळलेली अल्लड जुई ‘ या प्रतिमांमधून कवयित्रीने गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरित्या मांडले आहेत. याउलट आताच्या स्त्रीची मूकवेदना ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी या प्रतीकातून प्रकर्षाने मांडली आहे.
किंवा
रसग्रहण-
आशय सौंदर्य-समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी. कलंदर माणूस आहे. असे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलामधून सुरेश भट हे मांडतात दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभे सहण्याचा निर्धार कवीने व्यक्त केला आहे. काव्य-सौंदर्य-उपरोक्त ओळींमध्ये कवी असा मांडतो की चारीबाजूंनी या दिशा, ही माणसे मनला जीवनाचे सार लागतात आणि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणतो आणि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणतो. ढोंगी माणसांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केलेळी आहे. जिथे अंधार, दारिद्र्याचा काळोख आहे. अशा नैराश्येच्या.
काळ्या मध्यरात्री, सर्वत्र तळपणारा मी सूर्य आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी माझ्या स्वार्थासाठी कधीही पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही. भाषासौंदर्य रमेश भटांच्या या कवितेत गझल हे मात्रावृत्त आहे. या रचनेत अंत्य यमकाचा रदीफ ठळकपणे वापरला आहे. ‘सांवल्यांच्या झळा’ ‘दुःखाचा लळा’ आणि ‘मध्यरात्रीचा सूर्य’ यांसारख्या प्रतिमा वेगळ्या आणि नवीन आहेत. तडफदार आणि ओजस्वी शब्द तसेच शब्दांची ठोस पकड़ यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते.
विभाग ३: साहित्यप्रकारः कथा (गुण १०)
कृती ३.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४)
(अ) (१) एका वाक्यात उत्तरे लिहा :
(य) कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा. (१)
(र) कथानकाचे प्रयोजन लिहा. (१)
उत्तर:
(य) एखाद्या घटनेत वास्तवाचे आणि कल्पनेचे रंग
भरणे हे कथाकाराच्या प्रतिभाशलीचे कार्य होय.
(र) कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावशय वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते.
कथाकार त्याच्या प्रतिभाशाक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे साहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटनामालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते; म्हणून कथेत ‘घटना’ हा महत्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच ‘कथाबीज’ असे म्हणतात.
कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, (अ स्वभाववैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते.
पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखादया पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीचे शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला ‘पात्र’ असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक
साधली जाते. ही पात्रे कथाकाराची ‘स्व’ निर्मिती होते.
(२) कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा.
उत्तर:
पात्र म्हणजे कथानकातील शब्दरूप व्यक्तीच असतात. या व्यक्तीची वृत्ती प्रवृत्ती, तिच्या भावभावना, कल्पना, कृती, तिचे विचार आणि कथानकातील अन्य व्यक्तींशी असलेले परस्परसंबंध, तिची संवेदना, जीवनपद्धती
इत्यादी घटक कथानकातील व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करताना विचारात घेतलेली असते.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (६)
(य) ‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे. ‘
या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
उत्तर:
डॉक्टरीपेशात ज्ञानाचा भाग मोठा असून नर्स या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टरचा स्टेथास्कोप रुग्णाच्या फक्त छातीपर्यंत पाहोचतो तर नर्सचा हात काळजाच्या आत जातो. एखाद्या रुग्णाच्या रोगाचे निदान करता आले की डॉक्टरचे कार्य संपते पण नर्स पेशंटला समजून घेतात. नर्स रोगाच्या माहितीपेक्षा माणसाच्या माहितीला अधिक महत्त्व देतात. नर्स रोग्यांचा ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करण्याची धडपड़ करतात म्हणून उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे असं मला वाटतं ।
(र) ‘गढी’ कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
उत्तर:
गावातील सत्तास्थानाचे प्रतीक म्हणजे ‘गढी’. गढीचा गावावर प्रभाव असायचा तसाच गावाला ग्रढींचा आधारही असायचा. स्वातंत्र्यानंतर गढी आपले सत्तास्थान गमावून बसली. असे असले तरी तिचा आधार होता उन्हापावसाला तोंड देत, त्यांच्याशी झगडत गढी ताठ उभी होती. हळूहळू गढी खंगत गेली चारही बाजूंनी कणाकणाने ती कोसळत होती. गावांतील उचापती लोक गढी पडण्याची वाटच पाहत होते. गाववाल्यांना गढी कोसळली तर तिच्या खालीची पांढरी माती हवी होती.
गाव खरंतर चांगल्या दिशेने चालले होते. पण उचापती लोकांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची गती ढकली. जे गढीचे झाले तेज गावाचे झाले. गढी ही कथा त्या चहानशा गावांच्या स्थित्यंतराचे, पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली अगदी तशीच गढीची झाली. तीच गत बापू गुरुजींची झाली. बापू गुरुजी आणि गाव यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ही गढी होय, म्हणून ‘गढी’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.
(ल) ‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
उत्तर:
शोध या कथेची नायिका अनू आहे. ती चारचौघींसारखी एक सामान्य तरुणी नाही. बखर पाहता ती ते हेवाईक आणि विक्षिप्त वाटते पण ती तशी नाही. ती स्वतंत्र बुद्धीची असून तिला कोणाच्याही प्रभावाखाली राहायचे नाही. स्वत:चे स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते आपल्या बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी ती. स्वतंत्र राहते. अनू स्वतंत्रपणे राहते कारण आपले निर्णय तिळा स्वतंत्रपणे घ्यायल आवडते कुटुंबातील कोणाच्याही आधाराशिवायती समाज समजून घेण्यासाठी स्वतंत्र राहते नर्स व्यवसायातील सेवाधर्माच्या ओढीने ती नर्स होते. रुग्णांच्या भावजीवनात स्वतः ला स्थान मिळवते.
(व) बोर्डिगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विदयार्थ्यांचे बापू गुरुर्जीबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
बोडिंगमधल्या मुलीवर बापू गुरुर्जीचीखूप माया होती. त्याचप्रमाणे मुलांचेही ते खूप लाडके होते. गुरुजींचा शब्द विद्यार्थी कधीही खाली पडू देत नसत. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळीजण धडपडत असत. गुरुजी रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत. त्यांचा अभ्यास होत असत आणि पहाटे उठूनही अभ्यास घेत.
सातवी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना साहजिकच शाळा सोडावी लागे. काहींना बापूंनी अन्य गावाच्या शाळांत शिक्षक पदावरची नोकरी मिळवून दिली. आपल्या उदरनिर्वाहाची सोय होऊनसुद्धा विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौि मिच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत. त्यांचा आशीर्वाद घेत. गुरुजीना आपल्या गावी येण्याचा आग्रह करीत असत. अशा प्रकारे आजी-माजी सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता.
विभाग ४: उपयोजित मराठी (गुण १४)
कृती ४.
(अ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (४ गुण)
(१) मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
मुलाखतीची सुरुवात आकर्षक, सहज आणि वाचकांच्या / रसिकांच्या मनाला भिडणारी असावी. मुलाखतदात्याच्या अल्पपरिचय देऊन अनौपचारिक गद्यांनी आरंभ करावा. मुलखतदात्याशी सहज संवाद साधत आवश्यक ते संदर्भ देऊन विषयाची प्रस्तावना करावी. मुलाखतीची सुरूवात जेवढी आकर्षक आणि श्रवणीय होईल तेवढी पुढील कार्यक्रमात रंगत येते. मुलाखतदात्याच्या आयुष्यातील एखादा अनुभव, किस्सा सांगून वातावरण हल्के-फुल्के ठेवावे. त्यानंतर मग मुख्य विषयाकडे चर्चा वळवावी.
(२) ‘माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी’ थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर:
आपल्या उत्पादनाची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे माहितीपत्रक हे एक उत्तम साधन आहे. माहितीपत्रकाच्या दर्शनी रूपासोबत मजकुरालाही फार महत्त्व आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे. ती सोपी परंतु परिणामकारक असावी. मनाची पकड़ घेणारी आणि सहज आशय ध्वनित करणारी असावी. माहितीपत्रकाची भाषा उत्पादनाची स्तुती करणारी असावी. ती पाल्हाळीक आणि अवास्तव नसावी. वाचकाच्या मनावर ठसा उमटवणारी भाषाशैळी माहिती पत्रकात असणे आवश्यक असते.
(३) अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीक सारीक बाबींची नोंद अहवाल लेखनात घेतली जाते. कोणत्याही संस्थेच्या कामकाजात अहवाल हा विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या भविष्यातील योजना, उपक्रम आणि दिशा ठरविण्यासाठी अहवालाचा उपयोग केला जातो. अहवालाच्या मदतीनेच. एखाद्या संस्थेच्या विकासाची आनि परंपरेची माहिती मिळविणे शक्य होते. संस्थेच्या कामकाजातील, कार्यक्रमांमधील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांवर उपाययोजना करण्यासाठी अहवाल महत्त्वाचा धागा मानला जातो. अहवाललेखनातून विशिष्ट कामाचे दस्तऐवजीकरण होत असते. एखाद्या क्षेत्रात महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करावयाचा असल्यास त्यासंदर्भातील योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते.
(४) माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आनि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याचीही काळजी घेतली जाते. आजरोजी बाजारात नवनवी उत्पादने येत असतात. या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचे वेगळेपण टिकविणे आवश्यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळेपणाने केली जाते. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे. त्यासाठी इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणे आणि वेगळा आकार, वेगळी मांडणी, रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे यांद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (१०)
(१) खालील मुद्दयांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा :
मुलाखत म्हणजे …………………… कार्यक्षेत्रांमधला ठसा …………. आसाधारण व्यक्ती ……….. आव्हाने …….. विशेष आदर.
उत्तर:
एखादी सामान्य व्यक्ती जेव्हा असामान्य कामगिरी करते तेव्हा त्या व्यक्तीची जडणघडण, जीवनपट जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोळते करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केले जाते. प्रश्नांच्या माध्यमांतून अशा व्यक्तींना बोलते करण्याची जबाबदारी मुलखतकारावर असते. मुलाखतीत कार्यसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास त्यांच्याय तोंडून एकता येतो.
यशाचे शिखर गाठत असताना भोगाव्या लागलेल्या यातना, संघर्ष, जिद्द, परिस्थितीशी झुंज, सोबती यांसारख्या कितीतरी गोष्टींवर मुलखतीच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो. ‘ज्या अंगी मोठेपण’ त्या यातना कठीण ही ओक काही व्यक्तींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. अशा व्यक्तींचा जीवनप्रवास संघर्षमय असतो. जगावेगळी आव्हाने समर्थपणे पेलून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने ‘स्व’ सिद्ध केलेल्या व्यक्ती मुलाखतीतून समोर येतात मुलाखतीतच्या माध्यमातूनच त्यांच्याबद्दल आपल्या मनात असणा-या आदरात आणखी वाढ होत असते.
(२) खालील मुद्दयांच्या आधारे माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये’ लिहा :
माहितीपत्रक म्हणजे ……….. माहितीला प्राधान्य …….. उपयुक्तता …….. लिखित माध्यम ……. भाषाशैली.
उत्तर:
माहितीपत्रकातून कोणतीही संस्था / उत्पादन / सेवा यांचा वैशिष्ट्यपूर्णरित्या परिचय होत असते. माहितीपत्रकामुळे एखाद्या उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. जनमत आकर्षित करण्यासाठी कमी खर्चात आणि कमी वेळात विश्वासाई माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे माहितीपत्रक होय.
माहितीपत्रकाचा मुख्य हेतु माहिती देणे हा आहे. संस्थेबद्दल विश्वासार्ह माहिती गरजेची असते. माहितीपत्रकातील माहिती सत्य आणि वस्तुनिष्ठ असावी. माहितीचे स्वरूप सुटसुटीत असावे. माहितीपत्रकाची भाषा साधी, सोपी आणि सामान्य लोकांना सहज समजले अशी असावी. माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम माहितीपत्रक असल्याची ओळख असते. नवनवीन योजना / सेवा उत्पादने यांची सविस्तर माहिती देण्याचे काम माहितीपत्रक करत असते, विश्वासार्ह माहिती देण्याचे काम माहितीपत्रक करत असल्याने त्यांची उपयुक्तता महत्त्वाची असते.
आपल्या उत्पादनाची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे माहितीपत्रक एक उत्तम साधन आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा बेधक, सोपी, परंतु परिणामकारक असावी. भाषा मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी.
(३) खालील मुद्द्यांच्या आधारे ‘अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये ‘ विशद करा :
अहवाल म्हणजे …….. सुस्पष्टता वस्तुनिष्ठता ………….
विश्वसनीयता …….. विविध क्षेत्रांतील गरज.
उत्तर:
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, वैज्ञानिक यांसारख्या क्षेत्रांमधील एखाद्या संस्थेत राबवलेल्या कार्यक्रमाचा लेखी सविस्तर आढावा म्हणजे अहवाल होय. अहवाललेखनात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वार, वेळ, स्थळ, सहभागी व्यक्ती, पदे, विवेचन, महत्त्वाच्या घटना, संख्यात्मक आकडेवारी निष्कर्ष सांसारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींची नांद असते. यामध्ये वस्तुनिष्ठ असणे गरजेचे असते. एखादी घटना वा प्रसंग वर्णनात संदिग्धता असता कामा नये. अहवाल लेखनातील नोंदी अचूक आणि सुस्पष्ट असाव्यात. अहवालाची मांडणी तार्किक असावी. अहकलाच्या शेवटी आवश्यक ते संदर्भ आणि शिफारशी जोडाव्यात ।
अहवाललेखनात विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते. अहवाल लेखन कर्त्याचे मत किंवा निष्कर्ष टाळून त्यातील घटक सत्य असावेत. कार्यक्रमातील नोंदी, संदर्भ, परिशिष्ठ, शिफारशी, माहितीस्रोत यांचा अहवालात समावेश केल्याने अहवालाची विश्वसनीयता वाढते.
विविध संस्था, छोटे-मोठे उद्योग, तसेच शासकीय आणि अशासकीय संस्था अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी म्हणून अहवालाची गरज असते. अहवाळाच्या मदतीने एखाद्या संस्थेला भविष्यातील योजनांचा कृतिआराखडा ठरवणे शक्य होते.
(४) खालील मुद्दयांच्या आधारे ‘मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व’ सांगा :
योग्य समारोप ……….. वेळेचे भान …….. थांबणे म्हणजे कळसाध्याय ……… अनपेक्षित व समर्पक समारोप ……… यशस्विता ……. श्रोत्यांचा प्रतिसाद.
उत्तर:
मुलखतीची सुरुवात जेवढी आकर्षक अपेक्षित असते तेवढाच समारोपसुद्धा परिणामकारक असणे गरजेचे असते. इतका वेळ कसे अगदी छान जुळून आले, पण आता कुठेतरी थांबायला हवे; हे थांबणे म्हणजे कळसाध्याय आहे असा शब्दांचा वापर करत मुलाखतवकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते. याबरोबरच श्रोत्यांना ‘अरेशे, फारच लवकर संपली मुळाखत ! असे वाटायला लावणारा समारोप करायचा असतो. मुलाखतीच्या समारोपाच्या टप्प्यावर मुलाखतीचा अर्क रसिकांसमोर मांडता यायला हवा. मुलाखतीचा शेवट सकारात्मक सूत्रावर करणे योग्य ठरते. मुलाखतीच्या या टप्पयावर रसिकांना/ श्रोत्यांना मुलाखतीत सहभागी करून घेता येऊ शकते.
मुलाखत योग्य वेळी आणि योग्यठिकाणी संपवावी. मुलाखत आता संपले याचा जराही अंदाज श्रोत्यांना आलेळा नसतो अशावळी अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीहवीशी वाटत असताना ती संपवावी परंतु ती अपूर्णच, अर्धवट राहिली अशा स्थितीतही संपवू नये. श्रोत्यांना भरभरून मिळाल्यांचे समाधान मिळावेच पण अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असते तरी चालले असते. असेही वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप असतो.
समारोपात मुलाखतकाराचा रसिकांसोबत / श्रोत्यांसोबत झालेला संवाद अविस्मरणीय ठरला पाहिजे.
विभाग ५: व्याकरण व लेखन (गुण 20)
व्याकरण घटक व वाक्पचार.
कृती ५.
(अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण)
(१) (य) योग्य पर्याय निवडा: (१)
माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात ?
वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून
लिहा :
(१) माणसं स्वत:चा नेहमी विसरतात.
(२) माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.
(३) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.
(४) माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.
उत्तर:
(१) माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात
(र) सूचनेप्रमाणे सोडवा : (१)
जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा)
उत्तर:
जगात सर्वांत सुखी असा कोण आहे ?
(२) (य) योग्य पर्याय निवडा : (१)
‘प्रतिक्षण’ या सामासिक शब्दतील समासाचे नाव लिहा.
(१) अव्ययीभाव समास
(२) तत्पुरुष समास
(३) द्वंद्व समास
(४) बहुव्रीही समास
उत्तर:
(१) अव्ययीभाव समास
(र) ‘दशदिशा’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. (१)
उत्तर:
द्विगु समास
(३) (य) योग्य पर्याय निवडा: (१)
‘तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.’
या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा.
(१) कर्तरी प्रयोग
(२) कर्मणी प्रयोग
(३) भावे प्रयोग
(४) यापैकी नाही
उत्तर:
(१) कर्तरी प्रयोग
(र) योग्य पर्याय निवडा : (१)
‘कर्मणी प्रयोग’ असलेले वाक्य शोधून लिहा.
(१) त्यांनी आम्हाला दृक्-श्राव्य दालनात नेले.
(२) भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच.
(३) आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता.
(४) सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले.
उत्तर:
(३) आम्ही धैर्यांचा मुखवटाच चढवला होता
(य) योग्य पर्याय निवडा : (१)
दमडिचं तेल आणलं, सासूबाई चं न्हाणं झालं
मामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
(१) अनन्वय
(२) अपन्हुती
(३) अर्थान्तिरन्यास
(४) अतिशयोक्ती
उत्तर:
(४) अतिशयोक्ती अलंकार
(र) उपमान ओळखा:
‘सागरासारखा गंभीर सागरच । ‘
या वाक्यातील उपमान ओळखा. (१)
उत्तर:
सागरच
(५) (य) ‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा. (१)
(१) अनुस्वार देणे.
(२) सोडून देणे.
(३) सावध असणे.
(४) जागृत असणे.
उत्तर:
(२) सोडून देणे
(र) ‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. (१)
उत्तर:
कोरोनाने आईची मृत्यू होऊनही रमेश त्याच्या दुःखाला विसर्ग देऊन कामाला लागला
(आ) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा: (१०)
(१) मी पाहिलेला अविस्मरणीयसामना
उत्तर:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
१९८३मध्ये भारतानेकपिलदेवच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. त्यानंतर १९८५ साली सुनील गावस्करच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये झालेली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा तेव्हा “बेन्सन अॅन्ड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ” म्हणून ओळखली गेली होती. हीच ती स्पर्धा ज्यात रवी शास्त्री “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” ठरला आणि ऑडी ही म्हागडी गाडी त्याला मिळाली.
या स्पर्धेये वैशिष्ट्य म्हणजे भारताने खेळलेला प्रत्येक सामना जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारताने फक्त २ झेल सोडले. या सामन्यात भारतीय संघाने क्षेत्ररक्षण अगदी दृष्ट लागण्याजोगे होते. स्पर्धेची सुरुवात भारत-पाकिस्तान सामन्याने झाली. याच स्पर्धेतला माझ्या दृष्टीने झालेला अविस्मरणीय सामना म्हणजे उपांत्य फेरीतला भारत-न्यूझीलंड सामना. भारताने आधीचे सगळे सामने जिंकून उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला होता.
भारताची उपांत्य फेरीत गाठ पडणार होती न्यूझीलंडशी, ५ मार्च १९८५ रोजी सिडनी येथे. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही आघाड्यांवर न्यूझीलंड आपल्यापेक्षा सरसच होते.
भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामन्याची सुरुवातही सनसनाटी झाली, कपिलदेवच्या पहिल्या षटकातल्या तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर जॉन राईट शून्यावर यष्टीमागे झेल देऊन परतला. न्यूझीलंड १ बाद ०. संपूर्ण स्पर्धेत भारताने प्रतिस्पर्ध्याची सलामीची जोडी लवकर फोडण्यात नेहमीच यश मिळवलं. या स्पर्धेत भारतीय यष्टीरक्षक होता सदानंद विश्वनाथ. या पट्ट्याने एकही झेल सोडला तर नाहीच शिवाय एकही बाय दिली नाही. हाही एक विक्रमच. सदानद विश्वनाथ परत भारतीय संघात कधीच खेळला नाही आणि कुठे गायब झाला देव जाणे. जॉन रीड आणि फिल मॅकइवान यांनी हळूहळू धावसंख्या वाढवायला सुरुवात केली.
न्यूझीलंडची दुसरी विकेट १४ धावांवर पडली. त्यानंतर ओलेल्या मार्टिन क्रोलादेखील फारसा टिकाव धरता आला नाही. तोही ९ धावा करून मदनलालच्या गोलंदाजीवर अझरच्या हाती झेल देउन बाद झाला. मागोमाग कर्णधार सेफ हॉवर्थदेखील दुर्दैवीरित्या धावचीत झाला. हॉवर्थने शास्त्रीचा चेंडू हलकेच फाईन लेगच्या दिशेने मारला आणि १ धाव घेऊन दुसऱ्या धावेसाठी परत फिरला. धावता धावता त्याच्या उजव्या पॅडचा बंद सुटला, त्यामुळे त्याचा वेग मंदावला.
न्यूझीलंड ९ बाद २०६. समोर केर्न्ससारखा आडदांड कर्दनकाळ फलंदाजीला ५ वा चेंडू परत निर्धाव गेला आणि ६ वा चेंडू केर्न्सने परत तोच फटका अगदी त्याच पद्धतीने परत श्रीकांतकडेच मारला, ह्यावेळेस मात्र श्रीकांतने चूक केली नाही. शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड सर्वबाद २०६.
२०७ धावांच लक्ष्य घेऊन शास्त्री आणि श्रीकांत ही भारताची सलामीची जोडी मैदानात उतरली. रिचर्ड हॅडली आणि इयान चॅटफिल्ड या किवींच्या तेज दुकलीचा पहिला स्पेल इतका अचूक होता की श्रीकांतसारख्याची तलवार एकदम म्यान झाली. एकाही चैकाराची नोंद न करता २८ चेंडूत श्रीकांतने फक्त ९ धावा केल्या आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याजागी ओलेला अझरुद्दीन तर इतक्या अचूक गोलंदाजीसमोर सुरुवातीपासूनच चाचपडत होता. मग धावा काढणं तर दूरची गोष्ट झाली.
भारताच्या २० व्या षटकांत कशाबशा ५० धावा फलकावर लागल्या. हॅडली. चॅटफील्ड, स्नेडन आणि केर्न्स यांनी एकदिवसीय सामान्यत गोलंदाजी कशी करावी याचा उत्कृष्ट पुरावा सादर केला. या चौघांनी शास्त्री आणि अझर यांना पुरतं जखडून ठेवलं होतं. चॅटफिल्ड हा तर एकदिवसीय सामन्यातला आदर्श गोलंदाज. धावा देण्यात महाकंजूष भारत ३० षटकांत ३ बाद १०२ धावा. यावेळेस गावस्करने मोहिंदर अमरनाथ किंवा स्वतः न येता कपिलदेवला बढती देऊन पाठविले. त्याचा हा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. कपिलने आल्या हॅडलीला स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार मारून आपला इरादा स्पष्ट केला.
शास्त्री आणि अझर या दोघांना मिळून ३० षटकांपर्यंत केवळ चारच चौकार मारता आले होते यावरून किवी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण किती अचूक होतं याची पुरेशी कल्पना येऊ शकेल. वेंगसरकर आणि कपिलदेव यांनी मग खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. शक्य होईल तेव्हा १-२ धावा पळून काढण्यात कुचराई केली नाही. खराब चेंडूंना सीमारेषा दिसू लागली. धावफलक हलता ठेवण्यात दोघांनाही यश आले. वेंगसरकरच्या फलंदाजीच्या दर्जाबाबत प्रश्नच नव्हता पण कपिलनेसुद्धा परिस्थिति ओळखून जबाबदारीने फलंदाजी केली. त्या वेळेस आततायीपण केला असता तर मॅच परत न्यूझीलंडच्या हातात जाण्यास वेळ लागला नसता.
दोघांच्या धावा काढण्याच्या सातत्यामुळे आधी धोकादायक वाटणारी किवी गोलंदाजी आता एकदम सामान्य वाटू लागली. अझर, शास्त्री आणि श्रीकांत जिथे धावा काढण्यासाठी चाचपडत होते तिथेच या दोघांनी आपला दर्जा सिद्ध करत धावा कशा काढाव्यात याचं सुरेख प्रात्यक्षिक दिलं. वेंगसरकर आणि कलिपदेव यांनी वैयक्तिक अर्धशतकं पण पूर्ण केली. ३० व्या षटकांत फक्त १०२ धावा होत्या तिथे ४३व्याच षटकांत २०७ धावा करून दोघांनी सामनाही जिंकून दिला. वेंगसरकरने ५९ चेंडूत ६३ धावा तर कपिलने ३७ चेंडूत ५४ धावा फटकावल्या.
कपिलने रिचर्ड हॅडलीच्या नवव्या षटकांत विजयी धाव घेतलयानंतर गावस्करने पॅव्हेलियनमधून धावत येऊन मैदानावरच कपिल आणि वेंगसरकरला मिठी मारली. या दोघांनी शांत चिताने परिस्थितिनुसार जो खेळ केला त्याला तोड नव्हती. या विजयामुळे भारत अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ८ विकेट्सनी पराभूत करुन “बेन्सन अॅन्ड हेजेस” कप जिंकला. याच स्पर्धेत रवी शास्त्री “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” ठरला आणि ऑडी गाडीचा मानकरी ठरला.
(२) माझे आवडते शिक्षक
उत्तर:
माझे आवडते शिक्षक
आज १५ सेप्टेंबर, २०१३, शिक्षक दिन, मला माझे आवडते शिक्षक आठवयाला लागले तर सरळ शालेय जीवनातील शिक्षकच असणार, माझ्या शालेय जीवनात प्रत्येक शिक्षकाचे आचार, विचार, रंग, ढंग आणि स्वभाव वेगळे होते. काहींबरोबर सूर जुळतात, काहींना खास टोपणनावं ठेवली जातात काहींबरोबर खास आकर्षणांमुळे आठवणी रुजलेल्या असतात, काही फक्त खास सवयीमुळे ओळखले जातात.
जसे काळाच पेन वापरायचं, प्रत्येक उत्तराला चौकट, ‘ऐ मुर्खा काययेतं तुला ….. !’, ‘सगळं बरोबर ! अशा सगळया वळणावळणांनी शालेय जीवनाचा प्रवास सुरू राहतो. तरी एखादे अशे शिक्षक असतात जे व्यक्तिमत्त्वाने प्रभाव सोडतात आणि ते प्रत्येकापेक्षा अतिशय वेगळे असतात ! अशे हे माझे आवडते शिक्षकांचे नाव ‘ श्री विष्णु दत्तात्रय चितळे आहे. आम्ही प्रेमाने ‘चित्ते सर’ म्हणायचो, गणित विषयात तज्ज्ञ, त्यांची गव्हाळ रंगांची, ऊँच, भव्य, रुबाबदार आणि सुदृढ़ मूर्ती दृष्टीला पडताच नकळतच माझे हात जोडले जातात. माझ्या आयुष्यात त्यांच खास स्थान आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवले तर घरी यायचे आणि माझ्या आई-वडिलांना माझे कौतुक सांगायचे. मी कृतज्ञतेनी त्यांचे पाय शिवायचे.
चितळे सर ! स्वभावाने अत्यंत प्रेमळ, सतत मदतीला तयार, दयाळू स्वभाव, कर्त्तव्यनिष्ठता आणि साधी राहणी हे यांचे अद्वितीय मिश्रण होते. एकच असे सर होते ज्यांना टोपणनावें जरी पडली असली तरी एकदाही त्यांची थपण झाली नाही. विद्यार्थ्यांना नेहमी मदत करण्याची
वृत्ती, विषयावर शिकवण्याची हातोटी. शिकवणीबद्दल सरांचा जबाब नाही. गणित शिकवताना इतक्या तन्मयतेने शिकवायवे की आम्ही विद्यार्थी अक्षरश: असा विचार करायचो की त्यांच्या पाया पडायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात सन्मानाचा भाव, आदर्शवाद असे त्यांचे वर्तन होते. कामाशी काम आणि बाकी केवळ साधेपणा. विषयाच्या शिकवणीबरोबर शिस्तपणा पण शिकवायचे. जीवनात शिस्तीने वागायचं असे ते नेहमी म्हणायचे. मला अस वाटतं की एखादी थप्पड जर लगावली असती तर ती मला जीवनात योग्य असती.
चितळे सरांच्या चेहऱ्यावर केवळ करुणा व कृतज्ञताच होती, अभिमान दिसलाच नाही. सरांच्याबद्दल प्रेम व आदराची भावना जपोसून ठेवली आहे. त्याची नुस्ती आठवणी माझ्या मनाला बाल्य देणाऱ्या आणि व्यथित करणाऱ्या सारखं होत.
सरांच्या जीवनाचा साधेपणा आणि करुणामय गरिबी त्यांनी जे संस्कार त्यांच्या वागण्यातून आम्हाला दिले. याचा माझ्या जीवनात फार मोठा स्थान आहे. ते आठवले की खरच कसेसे वाटते. मनावर कोरले गेले ते चितळे सरच ! सरांच्या गेल्याची बातमी जेव्हा मला एका वर्गमित्रामार्फत कळवली तेव्हा ‘हो का !’ असे म्हणून मी विचारांच्या नादात निघून गेलो. मला फार फार वाईट वाटले. त्यांच्या मुलाबरोबरच त्यांना अग्नी देण्याचे पुण्य मलाही मिळाले असते तर ?
गुरू हा सुखाचा सागरू गुरू हा प्रेमाचा आगरू ।
गुरू हा धैर्याचा डोंगरू। कदाकाळीं डळमळीना ।
(३) मी शाळेची घंटा बोलतेय
उत्तर:
मी शाळेचा घंटा बोलतोय
शाळेच्या मध्यभागी, मुख्याध्यापकांच्या खोलीबाहेर मला स्थान मिळाले आहे. मला आठवतेय, ही शाळा सुरू झाली, तेव्हा, मुलांनी प्रवेश घेण्यापूर्वीच माझी स्थापना करण्यात आली. त्यामुळे शाळेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मी साझीदार आहे. माझी निवड शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र कार्यासाठी, एका शाळेसाठी झाली, हाही मी माझा गौरव समजते.
आता मी तुम्हाला माझी जीवनकहाणी सांगते. मला घडवण्यासाठी खाणीतून धातू काढण्यात आला. मग तो शुद्ध करून एका कारखान्यात आटवला गेला. तेथे इतर काही धातूंचे त्यांत मिश्रण करण्यात आले. हेतू हा ही माझे काठिण्य वाढावे आणि मी काटक व्हावे. मग एका विशिष्ट साच्यातून मी घडले. माझ्याबरोबर माझ्या इतर काही लहान-मोठ्या बहिणी होत्या. नंतर हा लंबकाचा दांडा माझ्या कंठात अडकवला गेला; मला चकचकीत पॉलिश करण्यात आले. त्यानंतर आमचा वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास सुरू झाला.
माझ्या काही बहिणी देवळात गेल्या. काही आग विझवणाऱ्या बंबांवर स्थानापन्न झाल्या; तर काही रुग्णवाहिकांत जाऊन बसल्या. काही छोट्या छोट्या बहिणी ‘आईसफ्रूट’च्या गाडीवर चढल्या; तर कुणाची कचरा गोळा करण्याच्या गाडीवर नेमणूक झाली. तेथून कारखान्यातून मी सरळ या सरस्वतीमंदिरात आले, हे माझे फार मोठे भाग्यच.
माझ्या आवाजावरच शाळेंतील प्रत्येक तास सुरू होतो. शाळेतील प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी यांचे माझ्याकडे लक्ष असते. मात्र एखादा भाविक भक्त मंदिरामधील घंटा वाजवतो. त्याप्रमाणे शाळेचा शिपाई मामा हे काम शाळेत करत असतो. माझ्यामुळे शाळेचे नियोजन व्यवस्थित चालत असते. शाळेला शिस्त येते.
शाळेतील शिक्षकांच्या आवाजाबरोबर माझा आवाज विद्यार्थीदशेत सर्व मुले ऐकत असतात. परंतु त्यांना माझ्या निर्मितीची कथा ठावूक नसेल. धातूच्या तप्त उकळत्या रसामधून भट्टीमध्ये माझा जन्म होतो. मग मला खूप ओतून आकार दिला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊन गरजेनुसार त्यांची निर्मिती केली जाते आणि परंपरेनुसार शाळा, मंदिर चर्च अशा ठिकाणी माझे जाणे होते.
कधी कधी एखादा निरस आणि कंटाळवाणा तास चालू असतो. अशावेळी वर्गातील विद्यार्थ्यांना माझा आवाज कधी कानी पडतोय आणि हा तास केव्हाचा संपतोय असे झालेले असते. दुपारच्या वेळी पोटात कावळे ओरडत असतात. तेव्हाही मुले माझी वाट पाहत असतात. शिक्षक घंटा वाजल्यावर केव्हा वर्गातून बाहेर पडतात आणि आम्ही डबा केव्हा खातो याचा विचार ते करत असतात. हे मनोमन मलाही समजते.
परीक्षेच्या काळात मात्र माझे महत्त्व वेगळेच असते. दिलेल्या तीन तासात पेपर लिहिण्यात विद्यार्थी गर्क असतात. एक क्षणही वाया न घालवता आपले लक्ष पेपर पूर्ण करण्यात ते गुंतलेले असतात. त्यांचेसारखे लक्ष घड्याळातील काट्याकडे आणि घंटेच्या टोलाकडे असते. शेवटची दहा मिनिटे म्हणजे आवराआवरीजा काळ असतो. मुलांची खूप धांदल उडते. मलाही वाटते की नको वाजायला घंटा. परंतु माझा नाईलाज असतो. या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी होते. शाळेत गणपती बसतो. तेव्हा आरतीच्या वेळी दामू मलाही वाजवतो. शाळेतील एखादया संघाने यश मिळवले की तो आनंदही मी जाहीर करते. पण एखादया दुःखद प्रसंगी मी मौन धारण करतो.
परीक्षा संपताच मे महिन्याची सुट्टी सुरू होते. आता शिपाईमामा मला कुठेतरी एखाद्या पेटीत ठेवून देतो. महिना-दीड महिना खूप शांततेज जातो. ही शांती मला खायला उठते. मला अजिबात करमत नाही. ती निर्जीव शांतता जीवघेणी असते. मला वाटते की संपू दे लवकर एकदाची सुट्टी, खरंतर मुलांना वाटत नसेल सुट्टी संपावी पण मला मात्र इकडे करमत नाही.
(४) सूर्य नाही उगवला तर
उत्तर:
सूर्य उगवला नाही तर ………….
सूर्य उगवला नाही, तर ……….. तर काय मजाज मजा. दिवस उजेडणार नाही म्हणजे आई रात्र समजून झोपली राहणार, मग आम्ही पण ताणून झोपलं रादू शाळेची सुट्टी. आनंद ! शाळेत जावे लागणार नाहीं, पण असे म्हणून चालणार नाहीं. खरोखरंच जर का सूर्य नाही उगवला तर हा अंधाराचा काळोखा झेलणे फार जड जाईल. पृथ्वीचं अस्तित्वच सूर्यावर अवलंबून आहे. यासाठी सूर्याचे उगवणे फार आवश्यक आणि महत्वचो ओह.
पृथ्वीवर कोटी जीव वास करतात. पृथ्वीचा हवामान त्यांना जगण्याची परवानगी देतो. जर सूर्य नाही उगवला तर हवामान बदलेल आणि जीवांस जगण्यास योग्य असलेली परिस्थितीत बदल होईल, परिणामत: जीव नाहीसे होतील, जगाची हलचल थांबेल, अंधार पसरल्यामुळे रोजची कामे करणे जड जाईल. वीजेची भयंकर खप वाढेल. जीवनाचा चाक येऊन टिकेल. स्वास्थ्यच्या दृष्टीने सूर्याचे किरणे शरीराला आवश्यक आहे. पृथ्वीच्या हवामानाचा समतोल सूर्यावर अवलंबून आहे. हा समतोल बिगडला तर मानवी अस्तित्वावर धोका होईल.
खर तर सूर्य स्थिर आहे, पृथ्वी स्वत:भोवती फिरते आणि सूर्यासमोर येते म्हणून सकाळ होते. बोलण्यात ‘कुठून सूर्य उगवला’ हे वाक्प्रचाराच्या रूपाने खूप प्रयोगात येतं म्हणून सूर्याचे उगणे फार महत्त्वाचे आहे, नाहीतर तो जगाचा अखेरचा दिवस किंवा दुसऱ्या अर्थाने आपलं जगप नष्ट होणार आहे, असे समज करण्यात येतं. सूर्य केवल प्रकाश देत नाही तर ऊबही देतो म्हणून जीवन जगण्यासाठी शक्ती व प्रेरणा मिळते.
सूर्याच्या उत्तेजनेमुळेच व्यायामाची ऊब मिळते. आहार हा सूर्यामुळे मिळतो. सूर्य हा सर्व बेचा प्रणेता आहे. सर्व आरोग्याचा, दीर्घायुष्याचा व शतायुष्याचा कारक सूर्यच आहे. अग्नी सूर्याचा प्रतिनिधि आहे, असे समजूनच जगात ठिकठिकाणी अग्निपूजा होत असते. थंडीचे दिवसात आकाशातील सूर्य फारसा प्रखर नसला तरी तो सगळ्यांना तापवत ठेवतो म्हणजेच ऊब देतो. उगवत्या सूर्याची ऊब शरीराला मिळवून दिली की आरोग्य उत्तम राहते. सूर्य उगवला आहे वा मावळला आहे, आता दिवस आहे वा रात्र आहे हे दृष्टिहीन माणसालाही वातावरणातील तापमानता होणारा बदलामुळे कळू शकते.
ह्या सगळ्या कारणी थांबतील पर सूर्य उगवला नाही. माणसाचा जीवनचक्र सूर्याच्या ओवती-भोवती टिकलेला आहे. ऋतुबदलांचा चक्र पण गडबडेल. जीवनसृष्टी संपण्यात येईल.
(५) आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
उत्तर:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
आज 21 व्या शतकात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. इ सन पूर्वच्या काळात स्त्रियांची परिस्थिति ही अत्यंत हलाखीची होती. राजाराममोहन रॉय व ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या अडचणी समजून त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवला. महत्मा फुले यांनी स्वताच्या बायकोला सावित्रीबाई फुले यांना शिकवून पुण्यात मुलींसाठी पहिली मुलींची शाळा काढली यामुळे शिक्षणाचे महत्त्व मुलींना कळले व त्यामुळे आज २१ व्या शतकातसुद्धा स्त्रिया या पुरूषांच्या बरोबरीने शिकून मोठमोठ्या अधिकारी पदांवर काम करताना दिसत आहेत.
राजाराममोहन रॉय यांनी विधवा पुर्नविवाह याला पाठिंबा दिल्यामुळे आजच्या काळात सुद्धा स्त्रियांचे पुर्नविवाह होत आहेत. इस पूर्व मध्ये हुंडाबळी ही समस्यासुद्धा होतीच पण आजसुद्धा २१व्या शतकात स्त्रियांना हुंडाबळी या समस्येला सामोरे जावे लागते. या हुंड्यामुळे कित्येक मुलींचे आणि त्यांच्या आई-बाबांचे आयुष्य उध्वस्त होते. हुंड्यामुळे कित्येक मुलींना शारीरिक, मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम त्या मुलींच्या मानसिक स्वास्थ्यावर तसेच शारीरिक स्वास्थ्यावर होतोच शिवाय त्या मुलींच्या घरच्यांनासुद्धा सहन करावा लागतो. या सर्वामुळे तिच्या घरच्यांनासुद्धाखूपमोठ्याप्रमाणातमानसिकत्रासहोतो.
काही ठिकाणी मुली कितीही शिकल्या तरी त्यांना या सर्व त्रासांमुळे स्वताचा जीव गमावून आयुष्य संपवावे लागते. स्त्रियांच्या बाबतीत आज २१ व्या शतकात फक्त चूल आणि मूल अभी परिस्थिती राहिलेली नाहीये. स्त्रियांच्या अनेक छोटे-छोटे उद्योग घरच्या घरी करून त्यातूनसुद्धा मानाचे स्थान मिळवले आहे. आजच्या २१व्या शतकात मुली किंवा स्त्रिया या स्वतंत्र विचारांच्या जरी असल्या तरी त्यांनी त्यांची मर्यादा ओळखून वागायला हवे, त्यामुळे विनयभंग, बलात्कार अशा समस्या उद्भवणार नाहीत असे वाटते. स्त्रिया या सर्व कुटूंबाची जबाबदारी स्विकारून नोकरी करतात. त्यावेळी घरच्यांनीसुद्ध पाठिंबा दिल्यामुळे त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वताला खंबीरपणे सिद्ध करू शकतात.
शिक्षणामुळे त्यांची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पहायला मिळते. या सर्व गोष्ठी जरी खा-या असल्या तरी स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रोज सकाळी लवकर उठून घरच्यांसाठी जेवण करून मुलांचे सर्व नीट करून एखादी स्त्रीही जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा ती सुरक्षितत घरी येऊ शकते का? याचा सर्वानी विचार करावा. आजकाल स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतात. स्त्री ही मुळातच सहनशील असते म्हणून तिने होणाया अत्याचारांना सहन करणे हे योग्य नाहीये ना ?
आज स्त्रियांवर खूप अत्याचार होताना दिसतात. काही वेळेला तर स्त्रियांना खुप घाणेरडे असे अश्लील विनादांना सामोरे जावे लागते, तसेच अतिशय वाईट कर्मेन्ट्सना सामोरे जावे लागते. स्त्रियांच्या सुरक्षेचा विचार करताना आणखी एका महत्तवाच्या समस्येला सामोरे जावे लागते ते म्हणजे मोठ्या मुली किंवा स्त्रियांना जसे बलात्काराचा सामना करावा लागतो तसेच कितीतरी निःश्पाप जीवांना सुद्धा म्हणजेच २/३ वर्षाच्या मुलींना सुद्धा ह्या बलात्काराचा सामना करावा लागतो. या सर्वामध्ये त्यांची काही चूक नसते तरी त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागते. ज्यावेळी अशा सर्व गोष्ठी घडतात तेव्हा असे कृत्य करताना त्या व्यक्तींना कसलीही लाज का वाटत नाही असा प्रश्न निर्माण होतो ? या सर्व गोष्ठी करताना काही वेळेला नातेवाईक या सर्वाला कारणीभूत असतात. या सर्व गोष्टीमध्ये लोकांची बघ्याची भूमिका असते.
कोणीही कसलीही पर्वा करत नाही. या सर्वामुळे स्त्रियांची सुरक्षितता करणे हे सर्वस्वी त्या स्त्रीचे जसे कर्तव्य आहे तसेच इतरांचेही कर्तव्य आहे असे मला वाटते. सर्वानीच स्त्रियांना मानाने, आदराने वागवावे अशी विनंती स्त्रीही अनेक बाबतीत जशी स्वतंत्र विचारांची असते तसेच इतरांनीही तिला समजून घ्यावे आजच्या काळात स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्षेत्रात काम करून नाव कमावले आहे याचा सर्वानी आदर करावा.