12th Marathi Question Paper 2023 Maharashtra Board Pdf

Maharashtra State Board Class 12th Marathi Question Paper 2023 with Solutions Answers Pdf Download.

Class 12 Marathi Question Paper 2023 Maharashtra State Board with Solutions

Time: 3 Hours
Max. Marks: 80

विभाग १: गय (गुण २०)

कृती १.

(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)

(१) लेखकाने सांगितलेल्या आनंदच्या गंमती
(य) ……….. (२)
(र) …….. (२)
उत्तर:
(य) तुम्ही शोधू लागलात की, तो दडून बसतो.
(र) पकडू गेलात की, हातातून निसटतो.

(२) (य) आनंदाविषयी उताऱ्यात आलेली काव्यपंक्ती – (२)
उत्तर:
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.

(र) प्रस्तुत काव्यपंक्तीविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत –
उत्तर:
ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे.

आनंद सगळ्यांनाच हवा असतो… पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं, आनंद म्हणजे नमके काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद ? कुठे नसतो हा आनंद ? आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहेए किंबहुना शाश्वत सत्य आहे!

आनंदाची गंमत कशी आहे, की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात, की हातातून निसटतो, आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो, जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच तो अनुभवता मात्र यावा लागतो.

आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो, आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो आनंद आपल्या मनातच असतो, आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो,

हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो, आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी, आनंदाला आकर्षित करतो, तो फक्त आनंदच,

(३) स्वमत अभिव्यक्ती – (४)
‘आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो’,
या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा,
किंवा
‘आनंदाची तुमची संकल्पना’ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
स्वमत अभिव्यक्ती – खऱ्या आनंदांचा, म्हणजेच शाश्वत आनंदांचा उगम हा आत्म्यातच असतो. खोटा आनंद म्हणजे मानसिक किंवा शरीरिक स्तरावरील क्षणभंगुर असतो, तो बाह्य वस्तू, व्यक्ती किंवा घटनांमधून मिळत असतो. खऱ्या आनंदाचा उगम प्रेरणेने निर्माण होणारी भावना, विचार, समज, वाणी आणि आपली कृती यांमध्ये आहे.

आपण नेहमीच आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. इच्छांची आपढी यादी कधीही न संपणारी असते. एक इच्छा पूर्ण होताच दुसरी जागृत होते. आयुष्य असेच पुढे जात असते.

आनंदाचा, सुखाचा अनुभवं मिळण्यासाठी आपले मन निर्मक असले पाहिजे. निर्मळपणा असला की मन स्वच्छ होते. अशा स्वच्छ आणि निरोगी मनात आनंदाचे झरे निर्माण होत असतात. म्हणून आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये मन रमविले पाहिजे. आपने छंद जोपासले पाहिजेत मन निरोगी अणि प्रसन्न ठेवले पाहिजे.

किंवा

‘आनंदाची तुमची संकल्पना’ तुमच्या शब्दांत लिहा. आनंदाची संकल्पना व्यक्तिपरत्वे बदलत असते. सुख, वैभवाची साधनं चार भिंतीत कोंबून असली, खऱ्या जीवनाचा आनंद घेता येत नाही निसर्गाच्या कुशीत समरस होउनही अतृप्त राहिल्याची जाणीव माणसाला कधी-कधी अस्वस्थ करीत असते.

आनंद ही वाटण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे पाहणाऱ्याच्या दृष्टिनुसार सौंदर्य बदलत असते. त्याप्रमाणे आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीनुसार बदलत असतो आनंद हा निर्मक असावा. मनावरचे ताण, ईर्ष्या, असूया, द्वेष, राग विरघळणे ही खरा आनंद ओळखण्याची खूण आहे. आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते. आपले मन मोकळ ठेवले तरच आनंद भरभरून मनात शिरतो.

(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)

(१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या (२)

(य) ……….
(र) …………
उत्तर:
(य) दात उपटून हातात ठेवीन
(र) दात घशात घालीन

(२) दंतवैद्यान केलेल्या दोन क्रिया- (२)

(य) ……….
(र) …………
उत्तर:
(य) हिरड्यांत दिलेले इंजेक्शन
(र) कौशल्याने दात काढला.

दंतवैदय अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रमाणिक मत झाले, त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या, त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैदयाच्या खुर्चीत असतानाच वाटली.

दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैदयालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांनां सांगितले, की “तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’

12th Marathi Question Paper 2023 Maharashtra Board Pdf

(३) स्वमत अभिव्यक्ती : (४)
‘यापुढे दंतसप्ताह नाही, ‘लेखकाच्या या विधानाची
कारणमीमांसा तुमच्या शब्दांत करा.
किंवा
दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.
उत्तर:
लेखकाच्या तो दुखरा दात खूपच ठणकत असे. त्यामुळे
त्यांना रात्र-रात्र जागून काढावी लागत असे. एवढेच नव्हे तर शेजाऱ्यांना सुध्दा यांच्या दातदुखीमुळे जागरणं झालेली होती. जेव्हा दंतवैघाने लेखकाचा तो दुखरा दात उपटून काढला तेव्हा लेखक आनंदाने उड्या मारत आहे. आपल्या चार-पाच शेजाऱ्यांना ते ओरडून सांगतात की तुम्हाला जागवणारा दात काढला आहे. यापुढे दंतसप्ताह नाही असे उपहासाने म्हणतात.

किंवा

परशा पहेलवानाच्या दातदुखीचा प्रसंग लेखक विस्ताराने सांगतात. हा परशा पहेलवान चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा. त्याने कधीही आपल्या दाताची काळजी घेसलेली नव्हती. त्यामुळे त्याचा एक दात खूप दुखत होता. तेव्हा लेखक त्याला विचारतातं “अरे, सिंहाचे कधी दात दुखतात होय ?” त्यावर परशाने दिलोले उतर खूपच मजेशीर आहे. “कसला शिंव्ह घिऊन बसलास मर्दा ? ह्य दातानं शिव्हांचा पार बकरा करून टाकलाय!” असे म्हणन त्याने त्याच्या दुखऱ्या दाताची दर्दभरी कहानी लेखकाला सांगितली. शेवटी म्हाणाला “अरं, शिंव्हच न्हवं, नरशिंव्ह आला तरी दाताम्होरं त्येचं काई एक चालायचं न्हाई ? ”

असाच काही दिवसांनी लेखकाचा एक दात कारण नसताना ठणक लागला. तो इतका की लेखकाची अवस्था हीनदीन झाली. दातदुखीचे अतिशय मार्मिक वर्णन लेखक करतात, दातदुखीच्या काळात लेखकाचे सगळे शेजारी गोळा होतात. लेखक जोर जोरात ओरडत असतात. सगळेजण दातदुखीवर जणू परिसंवाद असल्यासारखे त्यात हिरीरीने भाग घेतात. अशाप्रकारे पुन्हा एका महिन्यानंतर तोच प्रकार होतों लेखक दुखणारा दात काढून टाकण्याचा निर्णय घेतात अणि त्यांचे दातदुखी प्रकरण येथेच संपते.

(इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४)

(१) लेखिकेच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे- (२)
(य) ………..
(र) ………….
उत्तर:
(य) महत्त्वाकांक्षी
(र) यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक

मी वेड्यासारखी समुद्र पाहत राहायची. कधी सकाळी तर कधी चांदण्यारात्री. पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं की वाटायचं सगळा समुद्र ओंजळीत पकडावा. कसं थंड, शांत वाटायचं. मनातले सगळे विकल्प लयाला गेले असायचे, अवघं अस्तित्व निरामय होऊन जायचं. आपण आणि हा अथांग पसरलेला समुद्र ! बाकीची जाग जाण मिटलेली असायची. अशी अभूतपूर्व शांतता मी पूर्वी कधी अनुभवलेली नव्हती. मुरुडच्या समुद्रानं मला बांधून ठेवलं. मी लिहायला लागले त्यामागे या मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे महत्वाकांक्षा, यश आणि आत्मविश्वासाचं प्रतीक वाटायच्या, तर मागे मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव अपशय, मानहानी पचवणारी शक्ती. समुद्राच्या पोटात किती काय काय दडलं असेल! त्यानं किती पचवलं असेल, किती सहन केलं असेल. माणसाच्या मनाचं मला ते दुसरं रूप वाटायचं. समुद्राशी माझा संवाद चालायचा.
– गिरिजा कीर

(२) पाण्यावर सांडलेलं चांदणं पाहिलं’ की लेखिकेची होणारी भावावस्था: (२)

(य) ………..
(र) ………….
उत्तर:
(य) समुद्र ओंजळीत पकडावा असे वाटायचे.
(र) थंड, शांत वाटायचे, मनातले सगळे विकल्प ल्याला जायचे.

विभाग २: पद्म (गुण १६)

कृती २.

(अ) खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)

(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे (२)
(य) ………………..
(र) ………………..
उत्तर:
(य) सरी- वाफ्यात कांदे लावणे, झेडूची फुले तोडणे
(र) घरादाराला तोरण बांधणे, उसाचे बेजे मातीत दाबणे.

(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा (२)
(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रणाणे शेत पिकाने सजवते.
(र) स्वत:चा जीवच जणू कांदयाच्या रोपाच्या रूपात लावते. (१)
उत्तर:
(य) काळया आईला, हिखं गोंदते.
(र) नाही कांदं ग, जीव लावते.

सरी- वाफ्यात, कांद लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत मी ग नांदते
बाई नांदते

फुलं सोन्याची, झेंडू तोडते
बाई तोडते
नाही फूलंग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला तोरण बांधते बाई बांधते
रोज मातीत मी ग नांदते
बाई नांदते

ऊस लावते, बेणं दाबते
बाई दाबते
नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या – कांड्यांनी, संसार सांधते
बाइ सांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

उन्हातान्हात रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उर
खोल विहिरीचं पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत मी ग नांदते
बाई नांदते

(३) अभिव्यक्ती : (४)
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे
योगदान स्पष्ट करा.
उत्तर:
शेतकरी महिला आपल्या कुटुंबाच्यां उदरनिर्वाहासाठी रात्रंदिवस शेतात कष्ट करत असतात. कष्टकरी शेतकरी स्त्री घरातील सर्व कामे आटोपून शेतातही तिचा जीव ओतते. आपल्या लहानग्या मुलांना जोजवत, भाजी-भाकरी करत असतात. लगबगीने घरातील सर्व कामे आवरून लहानग्याला कमरेवर घेऊन झपाझप शेताला निघतात. दिवसभर न थकता आपल्या लेकराप्रमाणेतीकाळ्या आईची सेवाकरते. आपल्याघामाच्या धारांचे शिंपण करून ती हिरवेगार शेत पिकविते.

दिवसभर उन्हातान्हाचा विचार न करता नेटाने शेतात राबतात. दिवस सरल्यावर पुन्हा घराकडे परततात. पुन्हा त्यांच्या वाट्याला चूल, रडणारे मूल अणि भुकेने आ वासलेली तोंडे हेच येते. कसलीही तक्रार न करता निमूटणे तकरी स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची क करून जगत असते.

12th Marathi Question Paper 2023 Maharashtra Board Pdf

(आ) खालील ओळींचा अर्थ लिहा : (४)
या विंचवाला उतारा ।
तमोगुण मार्गे सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरां ॥
सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ॥
उत्तर:
काम-क्रोधरूपी विंचू चावला, तर त्याचा दाह शमविण्यासाठी संत एकनाथ महाराज उपाय सांगतात. विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे आपल्या अंगातील तामसी वृत्ती आणि दुर्गुण टाकून दया. त्यांचा त्याग करा. आपल्या अंगातील दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्त्विक गुणांचा अंगारा लावा म्हणजेच विंचू इंगळीरूपी विकार पटकन दूर होतील. या सत्तवगुणाच्या उताऱ्याने तमोगुण मागे सारता येतो. तसेच वेदनासुद्धा शमते. पण थोडीशी वेदनेची ठसठस उरली असेल तर गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी.

(इ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (४)
काव्यसौंदर्य :
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा !
सांगती ‘तात्पर्य ‘ माझें सारख्या खोट्या दिशा:
‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !”
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

किंवा

रसग्रहण :
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी
पाहत.
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
उत्तर:
काव्यसौंदर्य – ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वत:च्या कलंदर आणि मुक्त व्यक्तिमप्वाचे पैलू उलगडून दाखविले आहेत.

कवी म्हणतो, कोणत्या क्षणी मळा जीवनाचे भान आले, जाणीव झाली हे मला कळले नही. मी आयुष्य जगायला लागलो आणि ह्या आयुष्याने माझ्या प्रामाणिक जगण्याचा विश्वासंघात केला. चारी दिशांनी ही माणसे, दिशा मला जीवनाचे सार सांगतात आणि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा आणि जो नीट पाहतो त्याला आंधळा म्हणते. या ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे.

मी कुठल्याही बंधनात स्वतः ला अडकवून ठेवले नाही. नैराश्याच्या अंधान्या रागी मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्या स्वार्थांसाठी कधीही पेटून उठत नाही. दुःखाचा सोहळा मी साजररा करत नाही. तडपुदार आणि ओजस्वी शब्दांत कवी आपने स्वयंभू विचार मांडतात. वरील ओळींतून स्वातंत्र्य आणि समता याविषयीचे ठोस विचार कवी प्रकट करतो.

किंवा

आशयसौंदर्य – ‘समुद्र कोंडून पडलाय ‘ या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी ‘समुद्र’ हे अथांग जीवनाचे रूपक घेऊन शहरी जीवनाची मूल्यहीनता आणि असंवेदनशीलता दाहक शब्दांत मांडतात. उपरोक्त काव्यपंक्तीतून समुद्राची असाहाय्य हतबलता अधोरेखित केली आहे.

काव्यसौंदर्य – माणुसकीहीन शहरी जीवनाचा विचार करून समुद्र बेचैन होतो. तो मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरांमधील रस्त्यांवरून, वस्त्यांमधून विमनस्कपणे नहिंडतो. रात्री इशिरापर्यंत स्टेशनवरील बाकावर एकाकी बसतो. हतबल होऊन समोरच्या रूळांवरील गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहत असतो.

भाषिक वैशिष्ट्ये:- कवीने या कवितेत मुक्तछंद योजिला आहे. मुक्तशैलीतील विधानात्मक मांडणी करत महानगरीय वैफल्यग्रस्तता कवी आपल्या शब्दांतून दर्शवितो आहे. समुद्रासारखे सर्जनशील अथांग जीवन जेव्हा महानगरांच्या मर्यादित बंदिस्त होते. त्या वेळची बेचैनी, जीवहोणी घुसमट या कवितेतून कवीने सार्थपणे प्रत्ययास आणली आहे. महानगरीय संवेदनेची ही कविता शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थपणे घडवते.

विभाग ३: साहित्यप्रकारः कथा

कृती ३.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४)

(अ) (१) एका वाक्यात उत्तरे लिहा :

(य) कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचण्या मागील कारण लिहा. (१)
उत्तर:
कथेतील चांगल्या-वाईटाचा संघर्ष कथेला
उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचवण्यामागील कारण आहे.

(र) कथेंतील भाषायोजनेचे घटक लिहा. (१)
उत्तर:
कथेतील पात्रं, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, कथेतील वातावरण, कथाकाराचा दृष्टिकोन आणि त्याची अनुभव घेण्याची पध्दत हे सर्व कथेतील भाषायोजना ठरविण्याचे घटक आहेत.

कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो.

कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आतंरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात.

कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यांनुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणत: प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते.

(२) कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. (२)
उत्तर:
कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. कथेतील पात्रांचे व्यक्तिमत्त्व कथेच्या संवादातून व्यक्त वागळ हवे. कथेची भावानात्मकता संवादांमधून व्यक्त व्हायला पाहिजे. संवादात लय आणि आंतरिक संगती असणे महत्त्वाचे असते. संवादतून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात.

(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (६)

(य) अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
उत्तर:
लहान मुलांच्या वॉर्डमध्ये एकदा अनुची ड्युटी होती. आठ-नऊ वर्षांच्या सुनीताला सकाळीय अॅडमिट केले होते. तिच्या हाता-पायाला नळया लावल्या होत्या- ब्लड, ट्रैन्सल्यूजन, सलायन, ऑक्सिजन इत्यादी. ती लहानगी अनुला सारखी नळ्या काढा म्हनून विनयाची. अनुने पुढाकार घेऊन तिच्या सर्व नळ्या काढल्या. ऑक्सिजनची तेवढी ठेवली. त्या मुलीच्या आयुष्यातील शेवटचे काही. तास सुखानं जगता यावेत म्हणून अनुने पुढाकार घेतला होता. त्या लहानगीने आपल्या लहानगण्या आवाजात अनुला ताई थँक्यू असं म्हटले. सुनीताने तिच्या खाऊसाठी ठेवलेली एक रूपयाची नोट अनुल दिली आहे. ती नोट अनुने खूप जपली ।

(र) बापू गुरूजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
ज्या गावात पूर्वी शाळाच नव्हती तिथे आता शाळा आली. इतकेच नव्हे तर, चौथीपर्यंत असलेली शाळा बापू गुरूजींच्या प्रयत्नांमुळे सातवीपर्यत झाली. मैट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातच मिळावे म्हणून बापू गुरूजीनी खूप प्रयत्न केले. पण गावातील उचापती लोकांनी हायस्कूल होऊ दिले नाही. बापू गुरूजीनी आपले संपूर्ण आयुष्य गावाला अर्पण केले. बापूच्या प्रयत्नातूनच गावाला ‘साजरे गाव’ हे परिसोषिक मिळाले होते.

(ल) अनुच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन करा.
उत्तर:
शोध या कथेची नायिका अनु आहे. ती चारचौघींसारखी एक सामान्य तरुणी नाही. बखर पाहता ती तऱ्हेवाईक आणि विक्षिप्त वाटते; पण ती तशी नाही. अनु स्वतंत्र बुद्धीची असून तिला कोणाच्याही प्रभावाखाली राहायचे नाही. स्वत:चे स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. आपल्या बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी स्वतंत्र राहते. आपले निर्णय तिला स्वतंत्रपणे घ्यायला आवडते नर्स व्यवसायातील सेवाधर्माच्या ओढीने ती नर्स होते. रुग्णांच्या भावविश्वात स्वतःला स्थान मिळवते.

12th Marathi Question Paper 2023 Maharashtra Board Pdf

(व) बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुर्जीबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर:
बोर्डिंगमधल्या मुलांवर बापू गुरुजींचा खूप जीव होता. त्यांच्याप्रमाणे मुलींचेही ते खूप लाडके होते. बोर्डिंगमधील मुलं बापू गुरूजींचा शब्द कधी खाली पडू देत नसत. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. रोज रात्री मुलाना कंदिलाच्या प्रकाशात ते घेऊन बसत. त्यांचा अभ्यास घेत असत. तसेच पहाटे उठूनही अभ्यास घेत. सातवी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना साहजिकच शाळा सोल्वी लागे. काहींना बापूंनी अन्य गावाच्या शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवून दिली. आपल्या उदरनिर्वाहाची सोय होऊनसुद्धा विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमच्या दिवशी ते आठवणीनै गुरूजींना श्रीफरु देऊन त्यांच्या पाया पडत. त्यांचा आर्शीवाद घेत. अशाप्रकारे आजी-माजी सर्वच विद्यार्थ्यांचा गुरूजींवर जीव होता.

विभाग ४: उपयोजित मराठी

कृती ४.
(अ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (४ गुण)

(१) मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
उत्तर:
दोन व्यक्तींमधीळ संवादाने मुलाखत फुलत असते. मुलाखतकार मुलाखतीत महत्त्वाची भूमिका निभावत असतो. मुलाखतीत रसिकांना समरूप करून घेण्याचे कौशल्यपूर्ण काम मुलाखतकाराचे असते. मुलाखतदात्यास सहज, सोपे प्रश्न विचारणे, कमीत-कमी प्रश्नांतून अधिकाधिक बोलते करणे गरजेचे असते. मुलाखतीचा हेतू लक्षात घेऊन प्रश्नावली तयार करणे उचित ठरते. प्रश्नांची पुनरावृत्ती टाळून प्रश्नांचा क्रम ठरवताना वेळ आणि रसिकांची अभिरुची यांचा मेळ घालावा लागतो. अपमानकारक, संभ्रम निर्माण करणारे विषय भरकटवणारे, ताण, संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे । प्रश्न उपस्थित करू नयते. मुलाखतीद्रम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे, हालचाली टाळाव्यात. मुलाखतीदरम्यान नियोजित वेळेचे सुद्धा भान ठेवावे लागते:

(२) माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर:
माहितीपत्रक नवनवीन योजना / सेवा / उत्पादने यांची अगदी सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते. भाजीविक्रेत्यापासून करोड़ो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. उत्पादनाच्या सोयीसंदर्भातील शंकांचे निरसन माहितीपत्रक करत असते. उत्पादक, उत्पादन संस्था, सेवासंस्था यांच्या प्रती ग्राहकाची सकारात्मक मनोभूमिका तयार करण्याचे काम माहितीपत्रक करत असते. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. माहितीपत्रकातून उत्पादनाविषयी विश्वासार्ह माहिती मिळत असल्याने उत्पादनाची वैशिष्ट्ये, त्याचे वेगळेपण, ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची गरज हमखास असते.

(३) अहवाललेखनाची उपयुक्तता लिहा..
उत्तर:
अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीकसारीक बाबींची नोंद अहवाल लेखनात घेतली जाते. कोणत्याही संस्थेच्या कामकाजात अहवाल हा महत्त्वाचा घटक मानला जातो. संस्थेच्या भविष्यातील योजना, उपक्रम आणि दिशा ठरविण्यासाठी अहवालाचा उपयोग केला जातो. अहवालाच्या मदतीनेच एखाद्या संस्थेच्या विकासाची आणि परंपरेची माहिवी मिळविणे शक्य होते. संस्थेच्या कामकाजातील, कार्यक्रमांमधील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांवर उपाययोजना करण्यासाठी अहवाल महत्त्वाचा धागा मानला जातो. अहवाललेखनातून विशिष्ट कामाचे दस्तऐवजीकरण होत असते. एखाद्या क्षेत्रात महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करावयाचा असल्यास त्यासंदर्भातील योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते.

(४) वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार मुख्यत्वे केला जातो. वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी असावी. वृत्तलेखाची भाषा सोपी, ओघवती असावी. वाचकांना सहज समजणारी, त्यांना आपलीशी वाटणारी, वाचकांच्या मनाचा ठाव घेरि, कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी आसावी. वाचकांच्या विचारांना धक्का देणारी ताकद वृत्तलेखात असते. वृत्तलेख वाचकाला आनंद देणारा, माहिसी देणारा, ज्ञान देणारा मनोरंजन करणारा असतो. वृत्तलेखाची भाषाशैली वाचकाची उत्सुकता वाढविणारे असावे.

(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (१०)

(१) खालील मुद्दयांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप स्पष्ट करा :

भाषिक कौशल्ये ………. “परिणामकारक निवेदन ………….
‘अनपेक्षित समारोप” ……… ‘श्रोत्यांचा प्रतिसाद’ ……..
मुलाखतीची यशस्विता.
उत्तर:
मुलाखतीची सुरुवात जेवढी आकर्षक अपेक्षित असते तेवढाच समारोप सुद्धा परिणामकारक असणे गरजेचे असते. इतका वेळ कसे अगदी छान जुळून आले. पण आता कुठेतरी थांबायाला हवे हे थांबणे म्हणजेच कळसाध्याय आहे अशा शब्दांचा वापर करत मुलाखतकाराने आपले सम्पूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते. याबरोबरच सारांशरूपाने मुलाखतीचा अर्क रसिकांसमोर मांडता यायला हवा. प्रश्नांएवेजी प्रभावी निवेदन याक्षणी अधिक महत्त्वाचे असते. मुलाखतीचा समारोप सकारात्मक सूत्रावर करणे योग्य ठरते. याबरोबरच श्रोत्यांना ‘अरेरे, फारच लवकर संपली मुलाखत’ असे वाटायला लावणारा समारोप असावा. मुलाखतीच्या या टप्पयांवर श्रोत्यांना मुलाखतीत सहभागी करून घेता येऊ शकते. मुलाखत योग्यवेळी आणि योग्यठिकाणी संपवावी. मुलाखत आता संपेले याचा जराही अंदाज श्रोत्यांना आलेला नसतो अशा वेळी अनपेक्षितपणे ती संपवावी.

अजून हवीहवीशी वाटत असताना ती संपवावी परन्तु ती अपूर्ण राहिली अक्षा स्थितीतही संपवू नये. बाहेर जाताना मुलाखतीतील काही. अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहरे पडले की समजावे मुलाखत यशस्वी झाली; श्रोत्यापर्यंत पोहोचली.

(२) खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा:
माहितीला प्राधान्य ……….. उपयुक्तता …….. ‘वेगळेपण ……… आकर्षक मांडणी ……… भाषाशैली.
उत्तर:
माहितीपत्रकातून कोणतीही संस्था / उत्पादन / सेवा यांचा वैशिष्ट्य पूर्णरित्या परिचय होत असतो. माहितीपत्रकामुळे एखाद्या उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. जनमत आकर्षित करण्यासाठी कमी खर्चात आणि कमी वेळात विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे माहितीपत्रक होय.

माहितीला प्राधान्य- माहितीपत्रकाचा मुख्य हेतू माहिती देजे हा आहे. संस्थबेद्दल विश्वासार्ह माहिती असावी. माहिती आटोपशीर आणि संक्षिप्त असावी. माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य आणि वास्तव असावी. माहितीपत्रकाची माहिती वाचनीय असावी. त्यात माहितीचा अतिरेक नसावा

उपयुक्तता – माहितीपत्रक वाचून झाल्यानंतरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम महितीपत्रक असल्याची ओळख असते माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परन्तु विश्वासार्ह असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात.

वेगळेपण – इतरांच्या माहितीपत्रकांपक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्यपूर्ण असावे, हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत असले पाहिजे. मजकुराची आकर्षक मांडणी, माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर, आकार, पानांची मांडणी सुलेखन, अक्षरांची ठेवण इत्यादीद्वारे वेगळेपण आणणे आवश्यक आहे.

आकर्षक – माहितीपत्रक दिसताक्षणी वाचावेसे वाटले पाहिजे. यासाठी माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक असावी. माहितीपत्रकाचा आकार, छपाई, नीटनेटकी मांडणी करून तसे आकर्षक करता येते.

मांडणी व भाषाशैली- दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही खूप महत्त्व आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे. माहितीपत्रकाची भाषा सोपी परन्तु परिणामकारक असावी. भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी. माहिसीपत्रकातील आशय सहज ध्वनित करणारी असावी.

(३) खालील मुद्दयांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा :
प्रास्ताविक ………. ‘अहवालाचा मध्य ……….. अहवालाचा
शेवट……..अहवालाची भाषा ………. अहवालाची आवश्यकता.
उत्तर:
अहवालेखनाचा आराखडा समजून घेताना अहवाल लेखनाची प्रमुख अंगे विचारात घ्यावी लागतात. प्रास्ताविक – अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालाचा, हेतू, समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव, पदनाम उपस्थितांची नावे, त्यांचे हुद्दे, इत्यादी बाबींचा समावेश असणे गरजेचे आह. आहे. कार्यक्रमाची सुरुवात, त्याचे स्वरूप, लक्षणीय कृती इत्यादींचा उल्लेख आवर्जून करावा. अहवालाचा मध्य-संबंधित कार्यक्रमास उपस्थित व्यक्ती, त्यांचे विवेचन, उपक्रमाचे तपशील, उपक्रमाच्या भविष्यातील योजना, र्त्याचे नियोजन थांबाबत क्रमवार आणि मुद्देसूद विवेचन असणे गरजेचे आहे. संबंधित कार्यक्रमात अन्य सहभागी व्यक्तींचे विचार, त्यांचा नामोल्लेख निवडक स्वरूपात या टप्प्यावर लिहिणे आवश्यक आहे.

अहवालचा शेवट – कोणताही कार्यक्रम / समारंभ / सभा यांमधील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्विता यासंबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे अपेक्षित असते.

अहवालची भाषा अहवालाची भाषा सोपी सहज समजणारी असावी. संस्थेचे कार्यक्षेत्र, कार्यक्रमाचे स्वरूप. इत्यादींनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्द योजना करावी लागते. प्रत्येक क्षेत्रात अहवालाची ठरावीक भाषा विकसित झालेली असते. अशा ठरावीक भाषेचा वापर अहवाललेखन करताना करावा. अहवालची आवश्यकता

(४) खालील मुद्दयांच्या आधारे वृत्तलेख लिहितांना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा :
वाचकांची अभिरुची ………. तात्कालिक महत्त्व ……… वेगळेपणा वाचकांचे लक्ष वेधणे ……. वृत्तलेखाची शैली.
उत्तर:
कृपया कृती ४ (अ) मधील प्रश्न ३ चे उत्तर पाहावे. [Please refer action 4 (अ) Answer & Questons (3)]

वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज. विषयांची निवड यांचा विचार करून वृत्तलेखन करत असतात.
वाचकाची अभिरुची (आवड ) – वाचकांची आवड, त्यांची गरज वृत्तलेखन करावे लागते. वर्तमानपत्राचा वाचक कोणत्या वर्गातील आहे, त्याची गरज काय आहे, हे ळक्षात घेऊन विषय, भाषा, आशय, यांची निवड करावी लागते. वाचकांना आवडतील, उत्सुकता निर्माण करतील, अशा वृत्तलेखांची मांडणी कोली तर ते लोकांच्या पंसतीस येऊ शकतान. म्हणून वाचकांच्या अभिरुचीचा विचार वृत्तलेखनात करावा लागतो.

तात्कालिक महत्त्व – वृत्तलेख, नैमित्तिक असतात. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. तात्कालिक कारण असेल तरच वाचक तो लेख वाचतात त्यासाठी त्या लेखाचे ताजेपण आणि समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.

वेगळेपणा – वाचकांची उत्सुकता आणि जिज्ञासा समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते: वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात् घेण्याची गरज असते.

वाचकांचे लक्ष वेधणे – वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते त्याच्या शेवटापर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिणे त्यासाठी वृत्तलेख लिहिताना त्याचा आराखडा ठरविणे आवश्यक असते, साधारणपणे वृत्तलेखाचा विषय, संदर्भ, शीर्षक, उपशीर्षक, विवेचन, त्यातील चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा, छायाचित्रे इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो. मजकुरासाठी लागणारी चित्रे / छायाचित्रे समर्पक आणि चांगही असावीत.

वृत्तलेखाच्या उत्तम मांडणीसाठी या सर्व बाबींचा सविस्तर विचार वृत्तलेखकाला करावा लागतो. वृत्तलेखाची शैली – वृत्तलेखाचा प्रारंभीच भाग बातमीसारखा असतो. वृत्तलेखच्या पाहिल्या भागात बातमीचा उलगडा केला जातो. वृत्तलेख ‘कशावर’ आणि ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात होणे आवश्यक आहे. वृत्तलेखाच्या मध्य भागात बातमीचे विवेचन अपेक्षित असते. अखेरच्या . भागात समारोप करताना वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते. याचा विचार मांडणे गरजेचे असते. वृत्तलेख सर्वसामान्य वाचकांच्या पसंतीस उतरयासाठी त्याची भाषा साधी, सोपी आणि सहज आकलन व्हावी अशी असावी. वाचकांच्या जिज्ञासेची पूर्तता करण्याची शैली वापरणे, हे यशस्वी वृत्तलेखनाचे मर्म आहे.

विभाग ५: व्याकरण व लेखन (गुण 20)

व्याकरण घटक व वाक्प्रचार.

कृती ५.

(अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण)

(१)
(य) किती आतून हसतात ती ! (१)
वरील विधानाचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा
(१) ती आतून हसतात.
(२) ती फार हसतात आतून.
(३) ती आतून हसत राहतात.
(४) ती खूप आतून हसतात.
उत्तर:
(४) ती खूप आतून हसतात.

(र) सूचनेप्रमाणे सोडवा : (१)
अशी माणसं क्वचितच सापडतात.
(नकारार्थी वाक्य करा.)
उत्तर:
अशी माणसं बहुतेक सापडत नाहीत.

12th Marathi Question Paper 2023 Maharashtra Board Pdf

(२) (य) योग्य पर्याय निवडा (१)
‘पतिपत्नी’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.
(१) कर्मधारय समास
(२) विभक्ती तत्पुरुष समास
(३) इतरेतर द्वंद्व समास
(४) दविगू समास
उत्तर:
(३) इतरेतर द्वंद्व समास

(र) ‘नीलकंठ’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. (१)
उत्तर:
बहुव्रीही समास

(३) (य) योग्य पर्याय निवडा: (१)
कमलने बक्षीस मिळवले.
या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा.
(१) कर्तरी प्रयोग
(२) कर्मणी प्रयोग
(३) भावे प्रयोग
(४) यापैकी नाही
उत्तर:
(२) कर्मणी प्रयोग

(र) योग्य पर्याय निवडा : (१)
‘भावे प्रयोग’ असलेले वाक्य शोधून लिहा.
(१) आज लवकर सांजावले.
(२) त्याने कपाटात पुस्तक ठेवले.
(३) युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले.
(४) त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले.
उत्तर:
(१) आज लवकर सांजावले.

(४) (य) योग्य पर्याय निवडा: (१)
जो अबरी उफळता खुर लागलाहे ।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे ॥
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
(१) अर्थान्तरन्यास
(२) अतिशयोक्ती
(३) अनन्वय
(४) अपन्हुती
उत्तर:
(२) अतिशयोक्ती अलंकार

(र) न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील
या वाक्यातील उपमेय ओळखा. (१)
उत्तर:
उपमेय – नयन
उपमान- पाकळ्या

(५) (य) मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा. (१)
(१) मुळात नसलेले रूप धारण करणे.
(२) मुखावर पांघरूण घालणे.
(३) मुखावर लेप लावणे.
(४) खूप मोठा पराक्रमं करणे.
उत्तर:
(१) मुळात नसलेले रूप धारण करणे.

(र) ‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. (१)
उत्तर:
राजेशने नरसिंहाचा मुखवटा धारण करून आपल्या भूमिकेचे सादरीकरण केले.

(आ) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा (१०)

(१) मी अनुभवलेला पाऊस
उत्तर:
मी अनुभवलेला पाऊस
काल नागपूरला पहिला पाऊस पडला. पाऊस पडण्यापूर्वी आभाळात अचानक अंधारून आले होते. आकाश ढगांनी भरून गेले होते. आणि मग पावसाला सुरुवात झाली. पावसाचे टपोरे थेंब खाली येत होते. नंतर सरीवर सरी बरसू लागल्या. आम्ही त्या सरी कितीतरी वेळ नुसते पाहत होतो. पावसाने पृथ्वीला केलेला तो अभिषेक मोठा विलोभनीय होता.

तेवढ्यात आजोबा म्हणाले, चल बाळ, आपण स्लॅबवर जाऊ. मस्तपैकी पावसात भिजू. खूप मजा येते. पावसाल भिजण्याची मजा काही औरच. ‘मला तर तेच हव होतं. लगेच मी आणि आजोबा दोघही वर मोकल्या स्लॅबवर गेलो. पावसात उभे राहिलो.

पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडत होते. एक मिनिटात मी पूर्ण भिजून गेलो. किती थंडगार होते ते थेंब. उन्हाळयात
तीन महिने सहन केलेला उकाडा मिनिटा दोन मिनिटातच पूर्ण नाहीसा झाला होता. अंगात विलक्षण उत्साह व नवा हुरूप चढला होता. आजोबा तर सिनेमातल्या हिरोसारखे बेभान होऊन नाचत होते. त्यांचं पाहून मीही मस्त नाचलो. जवळजवळ अर्धा तास तरी आम्ही पावसाची अशी मजा लुटली.

नंतर माझे ढगांकडे लक्ष गेलं. ढगांकडे पाहून मला एक वेगळाच साक्षात्कार झाला. माझ्या मनात असा एक न्यूनगंड होता की मी सावळा आहे म्हणून गोऱ्या मुलांपेक्षा कमी सुंदर आहे. पण त्यादिवशी मला जाणवलं की सर्वांचा दाह शांत करणारा हा काळा ढगच पांढऱ्या ढगांपेक्षा श्रेष्ठ आहे. कृष्णाला मेघश्याम का म्हणतात त्याचा खरा अर्थ मला त्यादिवशी कळला. मी यावर विचार करू लागलो की आपणही पावसाप्रमाणे सर्वांची मनं शांत करावी. हेच आपलं जीवनध्येय असाव.

मी अनुभवलेल्या पावसानं मला नवं जीवन दिलं होतं.

(२) माझा आवडता खेळाडू
उत्तर:
माझा आवडता खेळाडू
क्रिकेट जगतातील एक अभूपूर्व आणि अविस्मरणीय नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी म्हणजेच आपला माही. खरंतर भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही कारण त्याने निवृत्ती घेतली. आहे. पण आजही तो करोडो चाहत्यांच्या मनात घर करून आहे. आजही माही आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमसोबत खेळताना आम्हाला दिसतो. तुम्हाला माहित असेलच की महेंद्रसिंग धोनी ज्याची फिनिशिंग स्टाईल सर्वांना आवडते. आज भारतातील सर्व खेळाडू धोनीला आदर्श मानतात. आणि त्यांच्याकडून सल्ला घेऊन काम करतात. विशेष म्हणजे धोनी हा भारताचा एकमेव असा कर्णधार होता ज्याने भारतीय संघाला सर्व ट्रॉफी मिळवून दिल्या.

धोनीची फलंदाजीची आक्रमक वृत्ती सर्वांनाच आवडते. धोनीचे हेलिकॉप्टर शॉट प्रत्येक खेळाडूने मारण्याचा प्रयत्न केला. धोनी शेवटच्या चेंडूपर्यंत संघासाठी झगडायचा आणि जो सामना हातातून निसटला तोही सामना धोनी जिंकून दाखवायचा, त्याच्या याच कौशल्यामुळे महेंद्रसिंग धोनी आज जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून परिचित आहे. खरं सांगायचं झालं तर धोनी कधीही हार मानत नाही. उदाहरणार्थ, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना किंवा आफ्रिकेविरुद्धचा सामना ज्यामध्ये भारताने विजय मिळवला. त्यावेळी धोनीच्या वेगवान स्टंपिंगने कोण प्रभावित झाले नाही. धोनीने 1 सेकंदापेक्षा कमी वेळात स्टंप उडवले. हा विक्रम आजपर्यंत जगात कोणीही मोडू शकलेले नाही.

महेंद्रसिंह धोनी लहानपणी सर्व खेळ खेळायचा. सुरुवातीला त्यांचा आवडता खेळ फुटबॉल होता. ज्यामध्ये तो गोलरक्षक असायचा. पण त्याची प्रतिभा पाहून त्याच्या प्रशिक्षकाने त्याला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. माहीने ते अंगीकारले आणि क्रिकेटकडे जीव झोकून दिला. सुरुवातीला क्रिकेटमध्ये फारशी कामगिरी करता आली नाही. पण जगाला मात्र एक वेगल्या शैलीचा कर्णधार आणि खेळाडू मिळाला होता.

खरंतर वयाच्या 18 व्या वर्षी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. रणजीमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात संधी मिळत नव्हती, कारण त्यावेळी सचिन, सेहवाग, गंभीर, द्रविड, युसूफ असे अनेक खेळाडू असल्यामुळे संघात स्थान मिळवणे सोपे नव्हते. पण त्यावेळी 2007 मध्ये दिग्गजांनी विश्वचषक खेळण्यास नकार दिल्याने ने तरुणांना संधी मिळाली आणि माहीला या युवा संघाचा कर्णधार बनवण्यात आले. आणि इतकंच नव्हे तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकात युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 2011 च्या वनडे कपमध्ये धोनीने 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताला विजेतेपद मिळवून दिले.

माहीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक, विश्वचषक आणि इतर अनेक यश मिळवले. भारतीय संघाला अजूनही धोनीसारख्या खेळाडूची गरज आहे. धोनी अजूनही भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करतो. भारताने महेंद्रसिंग धोचीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये झालेल्या विश्व ज्20 स्पर्धा जिंकल्या, त्यानंतर धोनी आपल्या भूमीवर 2011 विश्वचषक जिंकून भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला. न्यूझीलंडसह अनेक देशांच्या परदेश दौ-यांवर त्यांनी आपल्याच भूमीवर मालिका जिंकून आपली प्रतिभा आणि कार्यक्षम नेतृत्व दाखवून दिले.

माहीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले. विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात धोनीच्या नाबाद 91 धावांच्या खेळी आणि सहा षटकारांसह विजयाचे क्षण दीर्घकाल स्मरणात राहील. या सामन्यासाठी तो सामनावीर म्हणूनही निवडला गेला. या विजयासह भारत दोन विश्वचषक जोरावर अनेक यश मिळवले, ज्यासाठी त्याचा गौरवही करण्यात आला. 2008 मध्ये त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. तोपर्यंत हा बहुमान मिळवणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू होता.

खरंतर धोनी हा मैदानात खूप शांत असतो आणि म्हणूनच त्याला आपण कॅण्टन कुल म्हणून सुद्धा ओळखतो. रेल्वेत टीसीची नौकरी ते जगातील सर्वोत्तम कर्णधार हा प्रवास जर साध्य करायचे असेल तर जगात धोनी शिवाय दुसरा पर्यायच नाही ही वस्तुस्थिती आहे. आजही धोनीची लोकप्रियता इतकी आहे की त्याला मैदानात बघण्यासाठी लोक त्याची आतुरतेने वाट असतात. खरंच या खेलाडूने कर्तृव्य तर खूप गाजवलं पण करोडो लोकांच्या मनात स्वतःच एक वेगळं घर निर्माण करून गेलं हे मात्र नक्की.

(३) मी फळा बोलतोय
उत्तर:
मी फळा बोलतोय
नेहमीप्रमाणे मी आज शाळेमध्ये गेले होतो. परंतु रोज पेक्षा आज मी जरा लवकरच गेलो होतो कारण माझा अभ्यास पूर्णा झाला नव्हता, म्हणून शाळेमध्ये लवकर जाऊन अभ्यास करण्याचा मी निर्णय घेतला त्यामुळे शाळा भरण्याच्या एक तास अगोदर मी शाळेमध्ये पोहोचलो अभ्यासाला सुरुवात करणार तेव्हाच मला आवाज आला. ‘मित्रा माझ्याकडे पहा मी फळा बोलतोय’. असे मनात फळाने माझ्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

मित्रा, मी फळा बोलतोय होय मी तोच फळा…. ज्या फळाच्या साहाय्या तुम्ही प्राथमिक शिक्षणापासून पदवीत्तर शिक्षण प्राप्त केले आहे. दिसायला मी अतिशय काळा तरी देखील या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम माझ्यामार्फत केले जाते यामुळे मला स्वत:वर गर्व वाटतो.

विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना माझ्यावर विविध गणिते ते विज्ञानाच्या आकृत्या, इंग्रजीची एबीसीडी लिहून शिकवत असतात. सुंदर सुविचार लिहून माझ्यामार्फत सुंदर विचार सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मी केवळ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वापरला जात नाही तर विविध सरकारी कार्यालयांमध्ये देखील माझा वापर केला जातो.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील ज्ञान शिकवण्यासाठी माझा वापर केला जातो. तर सरकारी कार्यालयांमध्ये रोजची दिनचर्या लिहिण्यासाठी मला वापरतात. माझ्यावर सुंदर विचार लिहून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातो.

माझा जन्म हा आजपासून सुमारे सात वर्ष अगोदर झाला. तेव्हापासून मी याच शाळेमधील याच वर्गामध्ये उपस्थित आहे. सुरुवातीला माझा जन्म हा एका दगडी कारखान्यांमध्ये झाला. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी अगदी ओबडधोबड आणि खडबडीत होतो परन्तु त्या कारखान्यांमध्ये मला गुळगुळीत करण्यात आले व माझा आकार चौरसामध्ये रूपांतरित झाला.

त्यानंतर काही दिवस मी त्या कारखान्यात होतो. तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला विकत घेतले व या वर्गामध्ये मला लावण्यात आले. तेव्हापासून आज पर्यंत मी याच वर्गामध्ये आहे. सुरुवातीच्या काळमध्ये मी एकटाच होतो परंतु हळूहळू माझी खडू सोबत मैत्री झाली. खडू आणि माझी मैत्री इतकी आहे की, माझ्याशिवाय खडू वापरता येत नाही आणि खडूशिवाय माझा वापर करता येत नाही.

तसेच या वर्गाच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, बेंचदेखील माझे मित्र झाले आहेत. त्यामुळे आता मला हा वर्गच माझे विश्व वाटतो. लहान मुलांना माझ्या साहाय्याने मिळणारे ज्ञान पाहून मला खूप आनंद वाटतो.

माझ्यासारख्या काळा दगडाचा देखील वापर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी करता येईल असे मला वाटले नव्हते. परंतु या वर्गामध्ये आल्याने मला स्वतःचे महत्त्व कळाले.

विद्यार्थ्यासोबत शिकता शिकता मला देखील इयत्ता आठवीचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे. मानवाप्रमाणे सजीव नाही परन्तु मलादेखील भावना आहेत. तुमचे सर तुम्हाला शिकवत असताना मी देखील अतिशय बारकाईने त्यांच्याकडे पाहतो.

जेव्हा तुमची सुट्टी होते आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बाहेर ‘खेळण्यासाठी जातात तेव्हा तुमच्या सामानाची जबाबदारी माझ्यावर असते. त्यामुळे मी समोरून तुमच्या सर्व सामानाची देखरेख करतो.

या सात वर्षांमध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी माझ्यामार्फत ज्ञानग्रहण केले. काही विद्यार्थी हे आज माझ्यामार्फत घेतलेल्या ज्ञानाच्या साहाय्याने नोकरी देखील करत आहे. शिक्षकांनीदेखील माझा वापर अतिशय उत्तम रित्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला त्यामुळे माझा जन्म सार्थक झाला असे मला वाटते.

शिक्षक माझ्यावरती तुम्हाला विविध धडे शिकवत असतात. गणित, मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, इतिहास यासारख्या प्रत्येक विषयाचे ज्ञान देण्यासाठी माझ्या अंगावर खडूच्या साहाय्याने विविध आकृत्या, महत्त्वाचे मुद्दे मांडून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एखादा विषय समजून घेण्यास मदत होते.
परंतु मित्रांनो आज मी खूप थकलो आहे. माझ्या काळा रंगाचे रूपांतर हळूहळू पांढऱ्या रंगामध्ये होत आहे त्यामुळे सर माझ्या अंगावर काय लिहिता तो हे विद्यार्थ्यांना वाचायला थोडे अवघड जात आहे. सोबतच माझ्या शरीराचे तुकडे सुद्धा पडत आहेत.

परंतु मला स्वत:चा अभिमान वाटतो की, मी आपल्या देशाचे भविष्य घडवण्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी फायद्याचा ठरतो…..

शेवटी जाता जाता एवढेच सांगायचे आहे की, थेट विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये फळयाला कधीही विसरू नये व आम्हाला नियमित पुसून दरवर्षी आमच्या अंगाला काळा रंग देऊन आमची कालजी ध्यावी जेणेकरून आम्ही अधि क काळ टिकून तुम्हाला ज्ञान देण्यासाठी फायद्याचे ठरू…. एवढे बोलून फळा अगदी शांत झाला. तेव्हा माझ्या लक्षात आले की, आमच्या वर्गातील फळाची दुर्दशा ही खराब झालेली आहे. व मी आमच्या वर्गशिक्षकांना सांगून फळयाला काळा रंग दिला फळाची स्थिती सुधारून घेतली. आता मला फळयाला बघून वाटते की, माझ्या वर्गातला फळा खूप आनंदी असेल……..

12th Marathi Question Paper 2023 Maharashtra Board Pdf

(४) पेट्रोल संपले तर…….
उत्तर:
पेट्रोल संपले तर
मित्रांनो पेट्रोल हे एक इंधन आहे ज्याचा वापर करून आपण वेगवेळी वाहने चालवत असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची निर्मिती झाली परंतु ही वाहने चालवण्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे पेट्रोल-डिझेल सारख्या इंधनाचे आणि हे इंधन आपल्याला निसर्गातून मिळते.

नेहमीप्रमाणेच मी माझं ऑफिसमधून घरी येत होतो. आज जरा घरी जाण्याची जास्तच घाई होती कारण आईने पंचपक्वान्नांचे जेवण तयार केले होते. घरी येत असताना अचानकच माझी गाडी बंद पडली. पाहतो तर काय गाडी मधील पेट्रोल पूर्णता संपले होते. थोड्या अंतरावर पेट्रोल पंप होते हे मला माहिती होते म्हणून मी गाडी ढकलत पेट्रोल पंप पर्यंत कसंतरी पोहोचलो….गाडी ढकलून अतिशय थकलो होतो.

त्यामुळे पेट्रोल पंपावर पोहोचतात सर्वप्रथम मी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरवले. थोडावेळ विश्रांतीसाठी थांबले असताना माझ्या मनात विचार आला की, केवल माझ्या गाडीतील पेट्रोल संपल्याने मला एवढा त्रास झाला तर या जगातील पेट्रोल संपले तर काय होईल ???

खरोखरच मित्रांनो पेट्रोल संपले तर काय होईल ? ? ? मनुष्याने स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचे आयुष्य सुखी करण्यासाठी गाड्यांचा आणि इतर वाहनाचा शोध लावला बरोबर !!! परंतु ही वाहने चालवण्यासाठी आपल्याला पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांची आवश्यकता भासते.

परंतु जर हे पेट्रोल संपले तर.. कारण पेट्रोल हा एक नैसर्गिक स्त्रोत आहे. निसर्गातून आपल्याला पेट्रोल हे इंधन मिळत आहे परंतु निसर्गातून पेट्रोल हे इंधन मिळणेच बंद झाले म्हणजे पेट्रोल संपले तर….

या निसर्गातून आपल्याला भरपूरं गोष्टी मिळतात. त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो. हवा पाणी, झाडे, इंधन, सूर्यप्रकाश यांसारख्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मिळतात.

परंतुयातील हवापाणी सूर्यप्रकाशहे अमर्यादितस्वरूपात आहे परंतु पेट्रोल-डिझेलसारखे इंधने ही मर्यादित आहेत म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल यांचा साठा हा निसर्गातून एक दिवस संपणार आहे.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पेट्रोलसारख्या इंधनाचा वापर अमर्यादित केला जातो. आज एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जायचे म्हटले की, मोटरसायकल, कार यांसारख्या वाहनांचा वापर केला जातो, परंतु ह्या वाहनांना चालवण्यासाठी पेट्रोलची अवश्यकता असते. ज्याप्रमाणे मनुष्याला ऊर्जा मिवण्यासाठी अन्न लागते त्याप्रमाणेच वाहनांना चालवण्यासाठी पेट्रोल लागते. परंतु अलीकडच्या कामध्ये वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामु पेट्रोलचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. तसेच पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मिती कणकणाची सोय अतिशय सुलभ आणि सोपी झाली आहे. परंतु बरीच वाहने ही पेट्रोलवर अवलंबून असल्याने पेट्रोलचा वापर जास्त होत आहे त्यामु पेट्रोलचे स्त्रोत तू संपत येत आहेत.

दैनंदिन जीवनामध्ये तर पेट्रोलचे भाव गगनाला पोहोचले आहेत. आपले दैनंदिन जीवन हे पेट्रोलदर अवलंबून आहे, परंतु पेट्रोल संपले तर..

पेट्रोल संपले तर आपले धावफीचे जीवन हे एका जागीच ठप्प होईल. आज वाहनांची संख्या वाढलेली आहेत ती वाहने जागीच स्तब्ध होतील. पेट्रोल संपले तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी साधने राहणार नाहीत. मनुष्याला एखाद्या ठिकाणाला जाण्यासाठी पायी चालत जावे लागेल किंवा पूर्वीच्या कफामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांचा सहारा घ्यावा लागतो.

पेट्रोल संपले तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत होईल. अनेक व्यवसाय त्या जागीच ठप्प होती. त्यामुळे आर्थिक नुकसान होईल, परिणामी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ढासळेल.

जर पेट्रोल संपले तर, याचा परिणाम आपल्या जीवनावर खूप घातक होईल. कारण वर्तमान काळामध्ये आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची मदत घेण्याची गरज लागली आहे परंतु पेट्रोल संपले तर एखाद्या लांब ठिकाणी जाणे शक्य नाही.

यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह वाहने चालवून होत असतो. त्यामुळे अशा सर्वसामान्य लोकांचे जनजीवन धोक्यात येईल. तसेच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या लोकांचे कुटुंबाचे पालन पोषण करणे देखील अवघड. होईल.
जर पेट्रोल संपले तर, वाहने आपल्या जागेला पुळयाप्रमाणे स्तब्ध होतील त्या आजारी पेशंटला दूर दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी के लागेल, आणि याचा परिणाम त्याच्या जीवनावर देखील होऊ शकतो. एखादे काम करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागेल.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला बैलगाडी, घोडा, हत्ती, गाढव यांसारख्या प्राण्यांचा वापर करावे लागते.

परंतु मित्रांनो ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणेच पेट्रोल बंद झाले तर, याचे नुकसान होईल सोबतच त्यातून काही फायदे देखील होतील.

जर पेट्रोल संपले तर, या पृथ्वीवर वाढणारे प्रदूषण कमी होईल. वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले होते, ते आटोक्यात येईल. मनुष्य हा सर्व प्राण्यांपेक्षा बुद्धिमान प्राणी आहे. जर पेट्रोल बंद झाले तर, मनुष्य त्याच्या पर्यायी उपाय नक्कीच काही ना काही काढेल.

पेट्रोलसारखा इंधनाचा काटकसरीने वापर केला तर सर्वांचे जीवन समतोल राहील. या व्यतिरिक्त वाहनांची वाढती संख्याजी आहे ती आटोक्यात येणे गरजेचे आहे. त्यामुळे खाजगी वाहनाचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर होणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रदूषण होणार नाही सोबत इंधनाची बचत देखील होईल.

पेट्रोल तयार करणे हे आपल्या हातात नाही परंतु पेट्रोलचा काटकसरीने वापर करणे हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे.

पेट्रोल हे इंधन मर्यादित आहे त्यामुळे पेट्रोलचा वापर काटकसरीने केल्याने आपल्या येणाऱ्या पिढीसाठी देखील पेट्रोल हे इंधन उपलब्ध राहील. तसेच पेट्रोल संपले तर, काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना आता आपणास आली असेल. जर ही कल्पना सत्यात येऊ नये असे आपणास वाटत असेल तर, आपण आजपासूनच पेट्रोलचा वापर कशाप्रकारे कमी करता येईल यावर पर्याय काढणे गरजेचे आहे. व पेट्रोलचा वापर काटकसरीने करावा…..

(५) वाचते होऊया
उत्तर:
वाचते होऊया……..
माणसाला घडवण्याकरता दोन गोष्ठी महत्त्वपूर्ण ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन. म्हणूनच, पुस्तकांना विशाल काळाच्या भव्य सागरातून मनुष्याला तरून नेणारं जहाज’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांना आपले सगे मित्र मानते पाहिजे. पुस्तक वाचनामुळे माणसाचे ज्ञान तर वृद्धिंगत होतेच पण त्याचबरोबर त्याचे भाषेवरील प्रभुत्व सुद्धा वाढते. पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचारविचार उच्च पातळीवर पोहचतात. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते. संभाषणकौशल्य विकसित होते. वाचन माणसाचे निखल मनोरंजन करते. यामुळेच अनेकजण आपल्याला ‘वाचाल तर वाचाल’ असा सल्ला देतात.

आजकाल विविध स्पर्धा परीक्षा, शाळा स्तरावरील परीक्षांमध्ये पास होण्यासाठी विविध परीक्षेत अव्वल येणयाकरता केलेले वाचन एवढाच या वाचनाचा मर्यादित अर्थ घेतला जातो, पण या वाचनाची व्याप्ती फार मोठी आहे आणि याची जाणीव मात्र आज क्वचित असलेली दिसून येते. ‘वाचन केवल फक्त आणि फक्त विद्यार्थी दशेतच करायचे असते’ असाही विचार करणारे लोक आपल्याला दिसतात. मात्र वाचन करण्यासाठी कोणतीही प्रकारची वयोमर्यादा नसते, उलट प्रत्येक क्षणाला केलेले वाचन जीवनभर चिरतरुण राहण्यास मदत करते. वाचनाने माणूस समृद्ध होतो.

वाचनाने प्रगल्भ विचारांची समृद्धी तर प्रत्येकामध्ये येतेच शिवाय नवनव्या विचारांची निर्मिती करण्याची आणि या विचारांना प्रवाही ठेवण्याची शक्तीही या वाचनातूनच मिळते. वाचनातून नवनवे विचार मनामध्ये सुचतात आणि लेखणीतून ते हळूवारपणे कागदावर उतरवले जाताल. म्हणूनच वाचनाला लेखनाची प्रेरणा म्हटले जाते. वाचन विविध कल्पना करण्याची ताकद वाढवते, सृजनशक्तीला वाव देते, प्रतिभाशक्ती जागृत करते आणि दुसऱ्याचे सुख-दुःख जाणणरे संवेदनशील आणि प्रामाणिक मनही निर्माण करते.

आपल्या देशाची संस्कृती विश्वातील एक महान संस्कृती असून ती समृद्ध जीवनाचा सुगम मार्ग दाखवते. तो मार्ग समजून घेण्यासाठी या संस्कृतीचे प्रतिबिंब असेलेली विविध पुराणे, पोथ्या, ग्रंथ, पुस्तकेच आपली मदत करू शकतात. वाचनाने मनुष्याला स्वत:चे आत्मभान येते, त्याचा स्वत:चा त्याला स्वतःला नव्याने परिचय होतो. वाचनामधून समर्थपणे व्यक्त होण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते.

विद्यार्थीदशेत वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. आपली शब्दसंपत्ती वाढते. शिवाय, अनुभवांची मोठी शिदोरी कायमची गाठीशी राहते. हे वाचन विविध निबंधमाला, भाषण, स्पर्धा यांसाठी उपयुक्त ठरतेच तसेच यामुळे स्वत:चे मत, तसेच अभिव्यक्तिीसाठी हातभार लागतो. या वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे विषयांवरील चर्चामध्ये सहभागी होऊन महत्त्वाचे विषय चोखाळता येतात. वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होते. एकंदरीत वाचन मानवाला प्रतिष्ठाही मिळवून देते.

वाचन केल्याने इतरांना मनोरंजन देण्याचा हेतु तर साध्य होतोच, पण सोबतच आपल्याला एक जिवलग दोस्त गवसतो. हा मित्र सर्व परिस्थितीत आपल्या सोबत असतो. तो विशाल विश्वाच्या या भवसागरात आपणांस तरायला मदत करतो. तो जगण्याचा आशावाद निर्माण करतो, तो सदैव खुश राहायला शिकवतो. हा आपला सखासोबती एका ठिकाणी बसून साऱ्या विश्वाची सैर आपल्याला घडवतो. तो बिकट स्थितीत खंबीर राहायला शिकवतो. केवल वाचन केल्यानेच सर्व काळजी, सर्व चिंता मिटून जातात. हा सखासोबती आपले मन आनंदी तर करतोच त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सकारात्मकताही वाढीस लावतो. या वाचनाच्या छंदाने न जाणारा वेळ आणि त्या वेळेचा आलेला कंटाळा ही बाबच विसरायला होते.

आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या मनोरंजनात्मक सेवेला उभा असणारा हा सखा आपल्याला फक्त देत अन देतच राहतो. खरतर शेवटपर्यंत आपण त्याचे देणेकरी राहतो. शंकर सारडा हे जे प्रसिद्ध समीक्षक आहेत ते म्हणतात, ‘पुस्तकांशी कधीतरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथ, संगत करत राहतात’, पुस्तकांचे जग किती विशाल, किती अथांग असते, संपूर्ण विश्वातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीशी आपलं अतूट नातं जोडणारी, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळचा वेध घेणारी पुस्तक ‘हे विश्वाची माझे घर’ याचा साक्षात्कार पुन:पुन्हा घडवतात. म्हणूनच, यापुढे आपण सर्वच वाचते होण्याचा दृण संकल्प करूया, विविध विचारांनी समृद्ध होऊया !

Maharashtra Board Class 12 Marathi Previous Year Question Papers

Leave a Comment