Maharashtra State Board Class 12th Marathi Question Paper 2024 with Solutions Answers Pdf Download.
Class 12 Marathi Question Paper 2024 Maharashtra State Board with Solutions
Time : 3 Hrs
Total Marks: 80
कृति पत्रिका
कृतिपत्रिकेसाठी सूचना:
(१) आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात.
(२) स्वच्छता, नीटनेटकेणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
Time: 3 Hours
Max. Marks: 80
विभाग १: मदय (गुण २०)
कृती १.
(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)
(१) चौकटी पूर्ण करा – (२)
(य) विचारांची गती म्हणजे – ……………..
(र) दिशाविहीन गती म्हणजे – ………….
उत्तर:
(य) प्रगती
(र) अधोगती
(२) कारणे लिहा – (२)
माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ़ होतो, कारण …………..
(य) ……………..
(र) ……………..
उत्तर:
(य) वेळ थोड़ा आणि कामे अनेक असतात.
(र) पायी चालत चालत कामे उरकता येत नाहीन.
वेग हे गतीचे एक रूप आहे, आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते, आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते, रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात, माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात.
अहरोत्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी ? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे.
मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा, त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल, तो आत्मघातकी ठरतो.
(३) स्वमत अभिव्यक्ती- (४)
‘यथा प्रमाण गती ही गरज आहे’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
किंवा
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते सविस्तर लिहा.
उत्तर:
योग्य त्या प्रमाणत आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरणे ही माणसाची गरज आहे. माणसाचेजीवन दशदिशांना विभागलेले आहे. प्रत्येक कामाचे ठिकाण वेगवेगळे असते. त्यामुळे पायी चालत चालत ही सर्व कामे उरकता येत नाहीत त्यासाठी योग्य प्रमाणात वाहनाची गती ठेवून आपली कामे उरकता येतात, अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पांडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग ठरतो. तो आत्मघातकी सुद्ध ठरतो.
किंवा
वाहन चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर आपला प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि अल्प वेळेत पूर्ण होतो. वाहन चालवताना घ्यावयाची काळजी-
(१) वाहनावर पूर्ण लक्ष ठेवावे.
(२) वाहनातील सहप्रवाशांच्या गप्पांत सामील होऊ नये.
(३) आपल्या वाहनाचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटरच्या पुढे जाऊ देऊ नये.
(४) लेनची शिस्त पाळावी. लेन बदक्तांना, बळणं घेताना, रस्ता बदलतांना खूप आधीपासून तयारी करावी. योग्य ते सिग्नल द्यावेत.
(५) अति वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता असते. वेग मर्यादा पाळावी.
(६) रस्त्यावरील जागोजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे कोटेकोर पालन करावे.
(७) वाहनात धूम्रपान, मद्यपान करू नये.
(८) चालकाने मदयपान करून वाहन चालवू नये.
वरीलप्रकारे वाहन चालवताना काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखकर होतो.
(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८)
(१) जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार- (२) (४)
(य) ……………
(र) …………..
उत्तर:
(य) दात हेच सत्य आहे व जग मिथ्या आहे.
(र) बायको आणि मुले हा भास वाटतो.
(२) दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते (२)
(य) ……………
(र) …………..
उत्तर:
(य) दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फरक असला पाहिजे.
(र) दात हे सहावे महाभूत.
दात दुखालया लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली, की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे, आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा ?
प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला, तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही! बरे, हे दुखणे तरी साधे, सरळ असावे? तेही नाही. एखादया कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणासांसारखा असावा, नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ का होतो ? दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रांत्री गडबड करतात.
(३) स्वमत अभिव्यक्ती : (४)
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
किंवा
दातदुखीच्या कथा-व्यथा तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तथा आपल्या सगळ्यांनाच परिचयाचा आहे. दातदुखीच्या वेदना असह्य असतात.
लेखकाचे दातदुखीच्या प्रसंगातील निरीक्षण इतके अचूक आहे की; आपल्याला स्वत:ची दातदुखी आठवू लागते. दातदुखीचे ठणके जीवघेणे असतात आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लकूडतोड्या एकामागून एक दाताच्या मुळावर घाव घालत आहे असे वाटते. डॉक्टरानी दिलेलेया औषधाने काही वेळ थोडे बरे वाटते पण पुन्हा जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्यासरशी वेदना कपाळांत शिरते आणि ती आपले डोके फोडून बाहेर पडते की काय, असे वाटत राहते. वेदनचे स्वरूप इतके अवाढव्य असते की तिन्न अक्राळविक्राळ राक्षासाखेरीज अन्य कोणतेही उपमा लागू पडत नाही.
दिवसा सभ्यपणे दुखणारा दात रात्री प्रचंड ठणकायला लागतो दातदुखीचे ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. लोक आपलया वेदना घेऊ शकत नाही. दातदुखीच्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकाने दातदुखीला दिलेली अक्राळविकाळ राक्षसाची उपमा ककू शकेल.
किंवा
परशा पहेलवानाच्या दातदुखीचा प्रसंग लेखक विस्ताराने सांगतात. हा परशा पहेलवान चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा, त्याने कधीच आपल्या दाताची काळजी घेतली नव्हती त्यामुळे त्याचा एक दात खूप दुखत होता. तेव्हा लेखक त्याला विचारतात, “अरे! सिंहाचे कधी दात दुखाता काय ?” त्यावर परशाचे उत्तर खूपच मजेशीर आहे. “कसला शिव्ह घिऊन बसलाय मर्दा!” असे म्हणत त्याने त्याच्या दुखप्या दाताची दर्दभरी कहानी लेखकाला सांगितला. शेवटी म्हणाला, “अरं शिंव्हच न्हवं नरसिंह आला तरी दाताम्हारें त्येचं काई एक चालायचं न्हाई।”
असाच काही दिवसांनी लेखकाचा एक दात कारण नसताना ठणकू लागला. तो इतका की लेखकाची अवस्था हीनदीन झाली. दातदुखीचे अतिशय मार्मिक वर्णन लेखक करतात. दातदुखींच्या काळात लेखकाचे सगळे शेजारी गोळा होतात. लेखक जोरजोरात ओरडत असतात. सगळे जण दातदुखीवर जणू परिसंवाद असल्यासारखे त्यात हिरिरीने भाग घेतात. अशाप्रकारे पुन्हा एका महिरयानंतर तोच प्रकार होतो. लेखक दुखणारा दात काढून टाकण्याचा निर्णय घेतात आणि त्यांचे दातदुखी प्रकरण येथेच संपते.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :- (४)
(१) खालील चौकटी पूर्ण करा – (२)
रिमझिम पावसात अडई व वणकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती-
(य) ………………….
(र) …………………..
उत्तर:
(य) पोखरीत घरटे करणे
(र) झंडी घालणे
प्रचंड बुंधा असलेल्या मोहाच्या झाडाला पोखरी असतात, रिमझिम पावसात अडई व वणकी ही रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात, मोहरानातून तळ्याकडं उडत जाणाऱ्या येणाऱ्या रानबदकांचं दृश्य मोठं गूढ रम्य वाटतं.
माझं वनविभागात जाणं केवळ अपघात नव्हे, ते माझं भाग्य आहे, वनांच्या सावलीत मी वाढलोय, ग्रंथात आढळून येणार नाही असं ज्ञान मी जंगलातून प्राप्त केलंय. गुरुजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी शिकविलयं, वृक्षांइतका धर्मात्मा कुणी नाही. त्यांच्यापासून मी देवाचं अस्तित्व जाणलयं झाडं जशी सूर्यप्रकाश व दव शोषून घेतात तसं चांगलं तेवढं घेतलय, पानं गळतात.
फुलं कोमेजतात. पण ती पुन्हा विकसित होतात. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं. आभाळाच्या पर्वताच्या हिरव्या मैदानाच्या चमकणाऱ्या पाण्याच्या केवळ दर्शनानं कितीतरी स्मृती माझ्यात जागृत होतात. तुम्हाला वाटतं ना आपली मुलं विचारी बनावीत, त्यांनी भावनातील पावित्र्य जाणावं, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या.
(२) कारणे लिहा. (२)
आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे, कारण –
(य) ………
(र) …………………..
उत्तर:
(य) मुलांना विचारी बनविण्यासाठी.
(र) भावनांमधील पावित्र्य जाणण्यासाठी.
विभाग २: पद्म (गुण १६)
कृती २.
(अ) खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८)
(१) कारणे लिहा – (२)
(य) समुद्र अस्वस्थ होतो, कारण …………………
(र) समुद्र शिणून जातो, कारण ……………..
उत्तर:
(य) समुद्र अस्वस्थ होतो, कारण तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्यांचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो.
(र) समुद्र शिणून जातो, कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची खूप काळजी वाटते.
(२) चौकटी पूर्ण करा- (२)
उत्तर:
समुद्राकडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या
हताशपणे पाहत असतो समोरच्या
बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोके.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या
माणसांचे पाय, बसर्ची चाकं,
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकांकी, समोरच्या
रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी.
समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या
पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.
(३) अभिव्यक्ती : (४)
शहरांतील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात
ते स्पष्ट कहा.
उत्तर:
अभिव्यक्ती :
‘समुद्र कोडून पडलाय’ या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयाण वास्तव भावपूर्ण शब्दांत मांडले आहे.
शहरांमध्ये उंचउंच टोलेजंग इमारतीचे तुरुंग उभारले गेले आहेत. त्यात बाल्यावस्था घुसमटते आहे. या उंच इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागत बालकाकडे समुद्र हताशपणे पाहत आहे. या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरील आनंददायी अंगण दिसत नाही, ही त्याच्या बाल्यावस्थेची शोकांतिका आहे. दुसरीकडे दुसरे एक निरागस बालक स्टेशनवरील एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपी गेले आहे.
एक गगनचुंबी इमारत तर दुसरे अनिकेत जमिनीवर हा विरोधाभास वेदनादायक आहे या दोन्ही बालकांचे भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला येणे खूप दुःखदायी आहे. र्या दोन्ही अवस्थांकडे समुद्र हताशपणे पाहत बसतो, अवस्थपणे शहरातील वस्त्या वस्त्यांमधून सैरभैर फिरत राहतो.
अशाप्रकारे शहरातील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन कवीने आपल्या कवितेतून मांडले आहे.
(आ) खालील ओळींचा अर्थ लिहा : (४)
आरशात भेटलोस तरी बोलत नाहीस
ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन
देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मास अहोरात्र पारंपरिकतेचे
वरदान समजून
उत्तर:
या कवितेत स्त्रीचे आरशातील प्रतिबिंब तिच्याशी संवाद साधत आहे.
आज तू मला आरशात भेटलीस तरी मनमोकळे बोलत नाहीस. डहाळीवरून जसे एका झटक्यान देठापासून फूल खसकन तोडून ध्यावे तसे तुझे ओठ निपचित, क्लान आणि पिळवटलेले आहेत. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस. मनातल्या मनात कुढत चालली आहेस. संसाराच्या गडचागत मात्र तू स्वतः जायबंदी झाली आहेस. रात्रंदिवस तू आतल्याआत तुझे मन जाळते आहेस. परंपरेचे बंधन हेच वरदान आहे अशी समजूत करून घेतली आहेस. स्वतःचे मन मारून संसारात जगते आहेस.
(इ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा :
काव्यसौंदर्य :
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
किंवा
रसग्रहण:
सरी- वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
उत्तर:
काव्यसौंदर्य – ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वत:च्या कलंदर आणि मुक्त व्यक्तिमत्तवाचे पैलू उलगडून दाखविले आहेत.
उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतो की, साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कोठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लगणारा मी संवेदनशील माणूस आहे.
तडफदार आणि ओजस्वी शब्दांत कवीने स्वयंभू विचार मांडले आहेत.
किंवा
रसग्रहण :
आशयसौंदर्य – ‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यथोचित शब्दांत केले आहे. उपरोक्त ओळींमध्ये शेतकरी स्त्री शेतजमिनीतच माझा संसार आहे. आणि मी या मातीतच नांदत आहे. याचे चित्रण हृदय शब्दांत केले आहे.
काव्यसौंदर्य- शेतकरी स्त्री सरी- वाफ्यांमध्ये का कांदयाची रोपे लावत आहे. ते कांदे नव्हेतच तर जणू ती स्वतःचा जीव कांदयाच्या रोपांच्या रूपात लावते. आपल्या संसारासाठी शेतात ती अहोरात्र खपत असते. मी माझ्या काळया आईला म्हणजेच शेतजमिनीला हिरव्या रोपांच्या रूपाने गोंदते आहे. गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते आहे. ती तिच्या शेतजमिनीत आपले आनुष्य समर्पित करते. पुढचे हिरवे स्वप्न पाहते. या शेतजमिनीतच माझा संसार आहे. या मातीतच मी नांदते आहे.
भाषासौंदर्य अतिशय साध्या, सोज्ज्वळ भाषेत कवितेतील शेतकी स्त्री आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या बोलीमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात. तिच्या अभिव्यक्तीसाठी लोकगीतासारखा सैल छंद कवयित्रीने वापरला आहे. नादयुक्त शब्दकला हा कवितेचा घाटआहे. ‘रोज मातीत नांदल’ ही प्रतिभा ळीजलो हेलावून टाकणारी आहे. कवितेतीते प्रत्ययकारी शब्दरचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत जाते.
विभाग ३: साहित्यप्रकारः कथा (गुण १०)
कृती ३.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४)
(अ) (१) एका वाक्यात उत्तरे लिहा : (२)
(य) प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा.
(र) कथेची व्याख्या लिहा.
उत्तर:
(य) एखादी शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाही प्रारंभी कथालिहिली गेली.
(र) ‘एकाविशिष्टस्थलकालात च्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनाचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय.
प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले, नंतर नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत ! अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षक ही असते.
‘एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्ला घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा- ‘
अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही, एखादया कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखादया कथेत प्रसंगांना, कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते.
(२) कथा लेखनासाठीचे आवश्यक असणारे चार मुद्दे लिहा (२)
उत्तर:
- एखादी कथा पात्रप्रधान असेल तर एखादी कथा प्रसंग प्रधान.
- कथालेखकाचा दृष्टिकोनही अधिक महत्त्वाचा असतो.
- एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते.
- कथा वैचारिक आणि भावनिकसुद्धा असू शकते.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (६)
(य) ‘शोध’ कथेतील ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या पात्राविषयीचे तुमचे मत लिहा.
उत्तर:
शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्ह हा अत्यंत साधा, सालस आणि प्रामाणिक माणूस होता. दिवसभर टॅक्सी चालवत असे. कधी-कधी रात्रीसुद्धा चालवत असे. तो नुकतांच या व्यवसायात आला होता. त्याला दिवसा जेवायला मिळाले नव्हते. मध्यरात्री त्याने उसळपाव खाल्ला होता. आपल्या पेशाला सामाजिक प्रतिष्ठा नाही हे तो जाणून होता. अपघातात त्याच्या बाजूने साक्ष द्यायला आलेल्या भिडविषयी त्याला प्रचंड कृतज्ञता वाटत होती. अनुची हकीकन ऐकल्यावर तो ज्या तन्हेने व्यक्त झाला त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसून येते. सर्वसाधारण नर्स रुग्णांमध्ये मानसिकदृष्टया गुंतत नाहीत. अनु तशी नाही. अनुचे हे मोठेपण तो ओळखतो. या टॅक्सी ड्रायव्हसारखी व्यक्ती विरळाच असते. म्हणून व्याची व्यक्तिरेखा मला खूप आवडली.
(र) घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
अनुच्या मते, माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलेने चालण्याची सवय लावून घेत असतात. जन्मापासून आई – वडिलांच्या प्रभावाखाली वागतात. प्रत्येकाला स्वतंत्र मंदू असला तरी माणसे दुसन्याच्या मताने वागतात. यामुळेच स्वत:चे स्वतंत्र असे अस्तित्व आणि जगाकडे पाहण्याची स्वतंत्र दष्टी गमावून बसतात. अनुला हे अजिबात मान्य नव्हते. प्रत्येकाला जगाकडे स्वतच्या स्वतंत्र नलान जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे त्यासाठी तिला स्वत:ची अशी स्वतंत्र नजर घडवायची होती. हे सगळे कमावण्यासाठी तिला पाच वर्षे स्वतंत्रपणे राहण्याचा प्रयोग करायचा होता. त्या तिच्या अनुभवातून ती नवे काहीतरी घडवू पाहत होती. आणि हा सगळा विचार तिच्या मनात घर सोडण्यामागे होता.
(ल) गावाच्या विकास कार्यात अडचणी निर्माण करणा-या लोकांबद्दल तुमचे मत लिहा.
उत्तर:
गावाच्या विकासकार्यात अडचणी निर्माण करणान्या लोकांच्या प्रकृत्तीवर माझे मत अत्यंत प्रखर आणि ठाम आहे. गावाचा विकास हा समुदायाच्या सर्वांगीण प्रगतीशी संबंधित असतो. विकासकार्यात अडचणी निर्माण करणान्या व्यक्तीच्या विरोधाचे मूळ अनेक कारणांत असू शकते काही व्यक्ती स्वार्थ, भय, आणि अज्ञानामुळे विरोध करतात तर काहींचा विरोध त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीनील बदलांच्या भितीतून किंवा सांस्कृतिक संरचनेला किंवा पारंपरिक व्यवसायाला धोका समजून विरोध करतात.
या अडचणींचा सामना करण्यासाठी सामाजिक सहभाग अणि संवाद महत्वाचा ठरतो विरोधकांना प्रक्रियेत सहभागी करून घेणे, त्यांच्या भीतीचे उपाय शोधणे, हे महत्त्वाचे ठरते. संवादाने विरोध करणान्यांना विकासाच्या लाभाची जाणीव करून देऊन सामाजिक हिताचा विचार रुजविणे आवश्यक आहे.
गावाच्या विकासकार्यात अडचणी निर्माण करणान्या लोकांबददल मत आव्हानात्मक असून संवाद, संमजूतदारपणा आणि समावेशकता हे याचे सामाधान आहे.
(व) बापू गुरुर्जीसारख्या समाजसेवकांसारखे तुम्ही अनुभवलेल्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण लिहा.
उत्तर:
समाजसेवकाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या कृतीतून व्यक्त होत असते. बापू गुरुर्जीसारख्या समाजसेवी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना आपण त्याच्या जीवनातील वेगळेपण ठळकपणे ओळखू शकतो. अशा समाजसेवी व्यक्तींची खरी व मुख्य वैशिष्टये म्हणजे त्यांची निःस्वार्थ सेवा भावना, अथक परिश्रम आणि समाजाच्या प्रत्येक घटकांच्या कल्याणची इच्छा समाजसेवक त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे ओळखले जातात. त्यांची कार्यपद्धती, त्यांचा उत्साह, त्यांची समर्पणाची भावना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. समाजसेवकाचे वेगळेपण त्यांच्या दृष्टिकोनातूनही स्पष्ट होते.
सामाजिक समस्यांकडे ते समस्या म्हणून न पाहता एक संधी म्हणून पाहतात, आणि त्या दृष्टीने काम सुरू करतात. त्यांचा लढा मानसिक आणि भावनिक पातळीवर असतो, त्यांच्या कामात जिददु, सहनशीलता, सातत्य आणि धैर्य यांचा समावेश असतो.
समाजसेवेतील यशस्विता हे केवळ व्यक्तिगत प्रतिभा आणि कौशल्यावर अवलंबून नसते तर सामाजिक सम्बन्ध, संवाद आणि समजूतदारपणा यांवर अवलंबून असते.
विभाग ४: उपयोजित मराठी (गुण १४)
कृती ४.
(अ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (४)
(१) मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर:
दोन व्यक्तींमधील संवादाने मुलाखत फुलत असते. मुलाखतकार मुलाखतीत महत्त्वाची भूमिका निभावत असतो. मुलाखतीत रसिकांना समरूप करून घेण्याचे कौशल्यपूर्ण काम मुलाखतकाराचे असते. मुलाखतदात्यास सहज, सोपे प्रश्न विचारणे, कमीत-कमी प्रश्नांतून अधिकाधिक बोलके करणे गरजेचे असते. मुलाखतीचा हेतू लक्षात घेऊन प्रश्नावली तयार करणे उचित ठरते. प्रश्नांची पुनरावृत्ती टाळून प्रश्नांचा क्रम ठरवताना वेळ आणि रसिकांची अभिरुची यांचा मेळ घालावा लागतो. अपमानकारक, संभ्रम निर्माण करणारे विषय भरकटवणारे, ताण, संघर्ष निर्माण होईल असे मुद्दे / प्रश्न उपस्थित करू नयेत. मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने अनावश्यक हातवारे, हालचाली टाळाव्यात. मुलाखतीदरम्यान नियोजित वेळेचेसुद्धा भान ठेवावे लागतेः
(२) माहितीपत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा.
उत्तर:
माहितीपत्रक वाचून झाल्यानंतरही लोकांती ते जपून ठेवावे वाटणे ही उत्तम माहितीपत्रकाची ओळख असते. माहितीपत्र नवनवीन योजना, सेवा, उत्पादने यांची अगदी सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते. भाजीविक्रेत्यापासून करोडो रुपयांचा व्यवसाय करणान्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. उत्पादनाच्या सोईसंदर्भातील शंकांचे निरसन माहितीपत्रक करत असते.
उत्पादक, उत्पादनसंस्था, सेवासंस्था यांच्याप्रति ग्राहकाची सकारात्मक मनोभूमिका तयार करण्याचे काम माहितीपत्रक करत असते. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते. माहितीपत्रकातून उत्पादनाविषयी विश्वासर्ह माहिती मिकत असत्तयामुळे उत्पादनाची वैशिष्ट्ये, त्याचे वेगळेपण, ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिचे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची उपयुक्तता हमखास असते.
(३) अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या चार बाबी विशद करा.
उत्तर:
- अहवाल लेखन करणान्या व्यक्तीला अहवालाच्या विषयासंबंधी चांगली जाण असावी.
- अहवाललेखन वास्तवदर्शी असावे.
- अहवाल लेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते.
- कार्यक्रमाचे सारांशरूपाने संक्षिप्त लेखन करता आले पाहिजे.
- अहवालाची भाषा सहज, सोपी, स्वाभाविक लेखनशैली असावी, अत्यंत आलंकारिक, नाट्यपूर्ण आणि अतिशयोक्तिपूर्ण वर्णन नसावे.
- अहवाहलेखनात आवश्यक त्या तांत्रिक गोष्टी, मथळा, तारीख, वेळ, स्थळ अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पारितोषिक, पुरस्कार प्राप्त व्यक्ती इत्यादी नोंदवणे आवश्यक आहे.
(४) बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक थोडक्यात लिहा.
उत्तर:
बातमीमध्ये घडलेली घटना वा प्रसंग जसाच्या तसा सांगण्यावर लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत अंगभूत असते. घटनेचे वास्तववादी रूप बातमी दाखवत असते. बतमी एखादी घटना किंवा प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते. वृत्तलेख बातमीच्या आत सामावलेली बातमी सांगण्याचा प्रयत्न करतो. बातमीत न आलेली नावीन्यपूर्ण आणि रंजक माहिती वृत्तलेखात पाहावयास मिळते. बातमीनील घटनेमागे असणारे बारकावे, सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेख लालित्यपूर्ण असतो. बातमीचे तपशील वृत्तलेखात पाहावयास मिळतात. वृत्तलेखात संशोधनास महत्त्व आहे. बातमीत नसलेल्या नोंदी विसहतपणे चित्रित केल्या जातात.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (१०)
(१) माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा :
सुसंगत व अचूक माहिती ……….. उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ………. माहितीपत्रकाची विशेष काळजी व
वेगळेपण ………. आकर्षक मांडणी व भाषाशैली ………. मनाला भिडणारी शब्दयोजना.
उत्तर:
माहितीपत्रकातून कोणतीही संस्था / उत्पादन / सेवा यांचा वैशिष्ट्यपूर्णरित्या परिचय होत असतो. माहितीपत्रकामुळे एखाद्या उत्पादकाला नवीन बाजारपेठेत सहज प्रवेश करता येतो. जनमत आकर्षित करण्यासाठी कमी खर्चात आणि कमी वेळात विश्वासार्ह माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे माहितीपत्रक होय.
सुसंगत व अचूक माहिती माहितीला सर्वांत जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते, त्या हेतूशी सुसंगत, अचूक माहिती देणे आवश्यक असते. माहिती आटोपशीर आणि संक्षिप्त असावी. माहिसीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य आणि वास्तव असावी. माहितीपत्रकातील माहिती वाचनीय असावी. त्यात माहितीचा अतिरेक नसावा.
उपयुक्तता व परिणामकारक दक्षता माहितीपत्रक वाचून झाल्यानंतरही लोकांला ते जपून ठेवावे असे वाटणे ही उत्तम माहितीपत्रक जसल्याची पावती असते. आपले माहितीपत्रक उपयुक्त आणि परिणामकारक कुसे होईल याची दक्षता घेतली पाहिजे.
माहितीपत्रकाची विशेष काळजी व वेगळेपण इतर माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असावे. हे वेगळिपण माहिसीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत असावे. माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर, आकार, पानांची मांडणी, सुलेखन, अक्षरांची ठेवण, आकर्षक मांडणी इत्यार्दीद्वारे माहितीपत्रकात वेगळिपण आणणे आवश्यक आहे.
आकर्षक मांडणी आणि भाषाशैली माहित्तीपत्रक दिसताक्षणी वाचावेसे वाटले पाहिजे. दर्शनी रूपासोबतच माहितीपत्रकाच्या मजवुरालाही खूप महत्त्व आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे. भाषा सोपी परन्तु परिणामकारक असावी. मनाला भिडणारी शब्दयोजना, मनाची पकड घेणारी भाषाशैली असावी. थोडक्या, भाषाशैली पाल्हाळीक नसावी आणि ती मनाची पकड घेणारी असावी.
(२) अहवालाचे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा:
हेतु, तारीख वेळ, समारोप विविध मुद्दे ……….आरंभ ते शेवट ……….. “क्रमाक्रमाने तपशील ” माहिती संकलन ………….. अहवाललेखनाची आवश्यकता
उत्तर:
चे स्वरूप व आवश्यकता स्पष्ट करा एखाद्या संस्थेत वा कार्यालयात झालेल्या विविध कार्यक्रमांची आणि समारंभांची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे ‘अहवाललेखन’ होय.
हेतू, तारीख, वेळ, समारोप विविधमुद्दे : अहवाललेखन करताना एखाद्या कार्याक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, प्रतिसाद आणि समारोप अशा विविध मुख्यांचा समावेश केलेला असतो.
आरंभ ते शेवट कार्यक्रम व समारंभ प्रात्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो संपेपर्यंत कार्यक्रमाची सविस्तर नोंद केली जाते.
क्रमाक्रमाने तपशील : अहवाललेखनात एखाद्या कार्यक्रमाच्या आरंभापासून ते सांगतेपर्यंत क्रमवार सविस्तर नोंद केली जाते.
माहिती संकलन: एखाद्या विषयाच्या समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे, सर्वेक्षणाचे, आणि विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात.
अहवाल लेखनाची आवश्यकता : कार्यक्रम आणि समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी अहवाललेखनाचा उपयोग होतो. संस्थेचा विकास, गती, उणिवा अहवानाद्वारे संस्थाचालकांपर्यंत पोहोचण्याल साहास्य होते, एखाद्या संस्थेच्या कामकाजातील किंवा कार्यक्रमातील विविध अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल महत्त्वाचा धागा मानाल जातो. अहवाला मदतीनेच संस्थेस भावी वाटचालीसाठी आवश्यक योजनांचा आराखडा तयार करणे शक्य होते.
(३) एखादया व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील
मुट्ट्यांच्या आधारे स्पष्ट करा :
मुलाखतीचा प्रारंभ …………. मुलाखतदात्याचे कार्य………..
मुलाखतीचा मध्य ………. प्रश्नांची लवचिकता ………..
मुलाखत समारोप
उत्तर:
मुलखतीचा प्रारंभ मुलाखतीची सुरुवात आकर्षक, सहज आणि श्रोत्यांच्या / वाचकांच्या मनाला भिडणारी
असावी. सर्वांत अगोदर मुलाखतदात्याचा अल्पपरिचय देऊन अनौपचारिक प्रांनी मुलखतीचा आरंभ करावा. मुलखतदात्याचे कार्य : ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात अमूल्य कर्तबगारी आपला ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. ज्यांच्याजवळ काहीतरी सांगण्यासारखे आहे. आणि ज्यांच्याकडून काहीतरी ऐकण्यासारखे आहे अशा व्यक्तींची मुलाखत ऐकणे किंवा वाचणे लोकांना आवडते. मुलखतदात्याचे कार्य हे मुलाखतीत केंद्रस्थानी असते. त्याचे कार्यकर्तृत्व मुलखतीतून जाणून घेता येने. मुलाखतदात्याचे कार्यक्षेत्र, कामाचे स्वरूप, त्याचा संघर्ष, त्याची जिद्द आणि कामतील सातत्य अशा कितीतरी बाबींचा उलगडा मुलाखतदात्याच्या कथनातून होत असतो.
मुलाखतीचा मध्य मुलाखतीच्या या टप्प्यावर श्रोत्यांना गुंतवून ठेवण्याच्या जबाबदारीचे कायम् भान हवे. मुलाखतीच्या मध्यावर मुलाखतदात्याचे पूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्यकर्तृत्व उलगडून दाखवणे आवश्यक असते. या भागात एकसुरीपणा येणार नाही याची दक्षता मुलाखतकारास घ्यावी लागते. मुलाखतीच्या मध्यात सर्व महत्त्वाचे प्रश्न विचारून मुलाखतदात्याल अधिकाधिक बोलते करून अधिक वेळ देणे गरजेचे असते.
प्रश्नांची लवचिकता एकामागून एक असे प्रश्न विचारून मुलाखत रूक्ष आणि पठडीछाप होण्याची भीती असते. एखाद्या प्रश्नाला मिखलेलया उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्न तयार करता आला पाहिजे. प्रश्नांच्या ओथावर संवादाचे प्रवाहीपण अवलंबून असते. म्हणून प्रश्नच लवचीक असे तयार करावेत.
मुलाखतीचा समारोप : मुलाखतीची सुस्वान जेवढी आकर्षक अपेक्षित असते तेवढाच समारोप सुद्धा परिणामकारक असणे आवश्यक सतते. मुलाखत काराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावून मुलाखतीचा समारोप करणे उचित ठरते. त्याचबरोबर सारांशरूपाने मुलखतीचा अर्क रसिकांसमोर मांडता यायला हवा. प्रभावी निवेदन साक्षणी अधिक महत्त्वाचें ठरते. श्रोत्यांना मुलखत अजून हवीहवीशी वाटत असताना ती संपवावी परन्तु अपूर्ण स्थितीतिही संपवू नये.
(४) वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा :
बातमीवर आधारित वृत्तलेख ………….
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख ……….. मुलाखतीवर आधारित वृत्तलेख ……….. ऐतिहासिक स्थळ ………… गूढ़, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.
उत्तर:
एखाद्या घटनेच्या आणि बातमीच्या संदर्भाने हा लेख लिहलेला असतो. ज्या घटनेवर लेख लिहायचा आहे. त्या घटनेचा विस्ताराने विचार करावा लागतो. वर्तमानपत्रातीळ बातमीत ज्या नोंदी आल्या नसतील, अशा सर्व नोंदीवर प्रकाश टाकण्याचे काम या वृत्तलेखन प्रकारात होपे आवश्यक असते. याप्रकारच्या वृत्तलेखनासाठी विषयाच्या मर्यादा नसतात. तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, औद्योगिक आणि राजकीय अशा विविध विषयांवर लिहीला जाऊ शकतो.
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख : एखाद्या क्षेत्रात देदीत्यमान कार्य केलेलया व्यक्तीच्या जीवनाचा आढावा व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखान घेतला जातो. सामान्य आणि असामान्य कोणत्याही व्यक्तीच्या संघरूर्षाची दखल या वृत्तलेखात घेतली जाते. असे लेख बहुतेक वेळा औचित्य (आ) साधून लिहिलेले असतात. पुरस्कार, सन्मान, वाढदिवस, जयंती, पुण्यतिथि, अमृत महोत्सव इत्यादीप्रसंगी या प्रकारने वृत्तलेख लिहिणे जातात. वृत्तलेखात व्यक्तीची परिचायात्मक माहिती लिहिते अपेक्षित नसते तर त्या व्यक्तीचे विचार, दृष्टिकोग, भूमिका, सवयी, खास शैली इत्यादी बाबींचा सखोल परामर्श घेणे महत्त्वपूर्ण ठरते. व्यक्तिगत जीवतील भावनिक स्पर्श हे या वृत्तलेख प्रकाराचे वैशिष्ठ्य होय.
मुलाखतीवर आधारित वृत्तलेख : विविध क्षेत्रात वेगवेगळे लोक आपले कर्तृत्व सिद्ध करत असतात. प्रसारमाध्मांसाठी त्यांच्या होणान्या मुलाखती लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केल्या जातात. त्याला मुलाखतीवर आधारित वृत्तलेख असे म्हणतात. विशिष्ट ल्यतीची विशिष्ट क्षेत्रातील कर्तृत्वाची उंची आणि संबंधित क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या वृत्तलेखात करणे गरजेचे ठरते. मुलाखत देणाया व्यक्तीची भूमिका या प्रकारच्या वृत्तलेखातून मांडली जाते.
ऐतिहासिक स्थळ: प्राचीन मंदिर लेण्या, स्थळे, गावे यांचे ऐतिहासिक संदर्भ केंद्रस्थानी ठेवून उपलब्ध माहितीच्या आधारे नव्याने संशोधनात्मक माहिती देणारा ऐतिहासिक स्वरूपाचा वृत्तलेख लिहिणे अपेक्षित असते. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख लिहिताना इतिहासतज्ज्ञाशी झालेली चर्चा, त्यांचे व्याख्यान आणि त्यातून मिळालेल्या नव्या माहितीचा उपयोग केला जातो.
नव्या माहितीच्या संदर्भात प्राचीन माहितीचा उपयोग करून लेख लिहिल जातो. अशा स्वरूपाच्या वृत्तलेखाची गरज म्हणून नकाशा, चित्रे आणि छायाचित्र यांचादेखील वापर कला जातो.
एखादी विस्मयकारक घटना कृती, निसर्गातील नवलाई यासंबंधीच्या अनुभवांवर आधारित हा लेख असतो. या प्रकारच्या वृत्तलेखात उपलब्ध माहितीची शहानिशा पारख करणे, तिची चिकित्सा करणे या बाबी प्राधान्याने विचारात होणे गरजेचे असते.
विभाग ५: व्याकरण व लेखन (गुण २०)
कृती ५.
(अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण)
(१) (य) योग्य पर्याय निवडा :
निशिगंधासारखा निशिगंधच होय (१)
वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहाः
(१) निशिगंध हा निशिगंधच असेल !
(२) निशिगंध म्हणजे निशिगंधच !
(३) निशिगंधासारखा निशिगंधच कसा !
(४) निशिगंध म्हणजे गंध !
उत्तर:
(२) निशिगंध म्हणजे निशिगंधय!
(र) सूचनेप्रमाणे सोडवा : (१)
पुढील सगळे मार्ग बंदच होते.
(नकारार्थी वाक्य करा.)
उत्तर:
पुढील कोणतेही मार्ग खुले नव्हते.
(२) (य) योग्य पर्याय निवडा: (१)
‘पतिपत्नी’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.
(१) कर्मधारय समास
(२) द्वंद्व समास
(३) अव्ययीभाव समास
(४) तत्पुरुष समास
उत्तर:
(२) दवंद्व समास
(र) ‘पावलोपावली’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. (१)
उत्तर:
अव्ययीभाव समास
(३) (य) योग्य पर्याय निवडा: (१)
‘मी हलकेच उठतो’ या वाक्यातील प्रयोग
ओळखून लिहा.
(१) कर्तरी प्रयोग
(२) कर्मणी प्रयोग
(३) भावे प्रयोग
(४) यांपैकी नाही
उत्तर:
(१) कर्तरी प्रयोग
(र) ‘भावे प्रयोग’ असलेले वाक्य शोधून लिहा. (१)
(१) त्यांना आपण जपलं पाहिजे.
(२) मी डायनिंग टेबल जवळ येतो.
(३) हा संदेश मला पोहोचवता आला.
(४) तुम्ही गाडीतच बसा.
उत्तर:
(१) त्यांना आपण जपलं पाहिजे.
(४) (य) मुंगी उडाली आकाशी (१)
तिने गिळिले सूर्यासी !
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
(१) अर्थान्तरन्यास
(२) अनन्वय
(३) अतिशयोक्ती
(४) अपन्हुती
उत्तर:
(३) अतिशयोक्ती अलंकार
(र) चौकट पूर्ण करा :
‘आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी:
या वाक्यातील उपमेय ओळखा. …………
उत्तर:
जगती
(५) (य) फितूर होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा. (१)
(१) दगाबाजी करणे.
(२) बोलणी करणे.
(३) शरण जाणे.
(४) अपमान स्वीकारणे
उत्तर:
(१) दगाबाजी करणे
(र) ‘फितूर होणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. (१)
उत्तर:
दिवसा न दुखणारा दात रात्री फितुरी करून प्रचंड दुखायल लागतो.
(आ) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा (१०)
(१) निसर्ग माझा सखा
उत्तर:
निसर्ग माझा सखा
आजच्या आधुनिक युगात आपण निसर्गाला साधारण आणि तुच्छ समझतो आहे. कारण निसर्ग चारही बाजूंना सहज उपलब्ध झाला आहे. जी गोष्ट, आपल्याला सहज मिलते त्या गोष्टींची किंमत आपल्याला राहत नाही; परंतु खरे पहला निसर्ग आपला अतिशय घनिष्ठ मित्र आहे व तो आपल्यासाठी नेहमी उपयोगी ठरत असतो. ज्या पद्धतीने एक खरा मित्र. नेहमी प्रत्येक संकटात आपल्या सोबत असतो त्याच पद्धतीने निसर्गही आपला सोबती आहे, सखा आहे.
आजच्या युगात निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकार व कलाकार यांनी निसर्गाबद्दल अनेक सुंदर रचना केल्या आहेत. आपल्या सभोवताली असलेले पाणी. हवा, जंगल, पर्वत, नदी, झाडे, भूमी, सूर्य, चंद्र, आकाश, समुद्र इत्यादी गोष्टीपासून निसर्ग बनतो, निसर्ग अनंत रंगांनी भरलेला आहे ज्याने आपल्या कुशीत सजीव निर्जीव सर्व जीवांना सामावून घेतले आहे.
खरे पाहता निसर्ग हा आपला मित्र आहे. कारण निसर्ग हीच ती शक्ती आहे की आपल्याला विश्वात सर्व काही देते, मग ते आपले अन्न असो वा जीवन, निसर्गामध्ये ती शक्ती आहे जी शरीरातील सर्व रोगांना दूर करते, वृक्षांची हिरवळ पाहून मानसिक ताणतणाव कमी होतो, म्हणून जर कधीही तुम्हाला मानसिक तणाव निर्माण झाला असेल तर. बागेत जाऊन फिरून या. बागेतील निसर्ग सौंदर्य पाहून मनाला मानसिक शांती लाभेल, निसर्ग आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांना सहज पूर्ण करतो. निसर्गाने आपल्याला सुंदर हिरवळ दिली आहे. निसर्गाने आपल्याला प्राणवायू दिला आहे.
हा प्राणवायू आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजन या प्राणवायू शिवाय आपण फक्त काही क्षण जिवंत राहू शकतो, मनुष्याला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्कता असते आणि ही ऊर्जा त्याला अन्नातून प्राप्त होते आणि हे अन्नदेखील निसर्गच उपलब्ध करून देतो, आपल्याला राहण्यासाठी जमीन निसर्गाने दिली आहे. या धरतीवर बनवलेले घरसुद्धा निसर्गात उपलब्ध झालेल्या वस्तूपासून बनवण्यात आले आहे.
निसर्ग हा फक्त आपला मित्र नसून तो पशू व पक्ष्यांचाही घनिष्ठ मित्र आहे. कारण तो आपल्यासोबत पशू-पक्ष्यांचीदेखील अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था करीत असतो. आपल्याला निसर्गाचे संतुलन न बिघडवता याचा योग्य उपयोग करू घ्यायला हवा. निरोधी जीवनासाठी निसर्गाचा पूर्णपणे उपभोग घेणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला आपल्या निसर्गाकडे लक्ष्य द्यायला हवे. याला स्वच्छ ठेवायला हवे. इकडे-तिकडे कचरा न टाकता त्याला कचराकुंडीत टाकून योग्य विल्हेवाट लावायला हवी.
मनुष्याने कधीही निसर्ग या मित्रांसोबत छेडछाड करायला नको. आजच्या मनुष्याला वाटते की निसर्ग त्यांच्या अनुसार चालायला हवा, परंतु असा विचार करणे मुळात फारच चुकीचे आहे. आपण मनुष्य निसर्गाच्या अनुसार जिवंत राहण्यासाठी बनलो आहोत, या निसर्गात बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. आजकल सभोवताली वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग मित्राचा ह्रास होत आहे. जल, वायू, पानी आणि मृदा प्रदूषणामुळे निसर्ग नष्ट होत आहे. याचे दुष्परिणामाही मनुष्याला भोगावे लागत आहेत.
(२) माझा आवडता लेखक / कवी
उत्तर:
माझा आवडता लेखक /कवी
मराठी भाषेतील महान साहित्यिक, शिक्षक आणि समाजसेवी पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी माझे आवडते लेखक आहेत. साने गुरुजींनी लेखनासोबतच देशसेवेचे कार्यही केले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी स्वातंत्र्यसेनानी म्हणून महत्त्वाची कामगिरी केली. स्वदेशी आंदोलनादरम्यान त्यांना तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला, साने गुरुजींनी आपल्या जीवनकाळात जवळपास ७३ पुस्तके लिहिली. त्यांना निसर्गाबद्दल प्रेम होते ते निसर्गाची पूजा करीत असत.
साने गुरुर्जीचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील पालगड या गावी झाला. साने गुरुजींच्या वडिलांचे नाव सदाशिवराव साने तर आईचे नाव यशोदाबाई असे होते. साने गुरुजी हे त्यांच्या आई – वडिलांचे तिसरे अपत्य होते. गुरुजींचे वडील खोताचे काम करीत असत. तर त्यांची आई अतिशय दयाळू व सदाचारी स्त्री होती. त्यांनी साने गुरुजींना जीवनातील वास्तविक मूल्य शिकवण्यावर भर दिला. जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई हीच त्यांची देवता होती. “आई माझा आणि आई माझी कल्पतरू” असे आपल्या आईचे वर्णन त्यांनी आपल्या प्रसिद्ध कादंबरी ‘श्यामची आई’ मध्ये केले आहे.
साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते व शेवटपर्यत तसेच राहिले. देशातील राजकीय उलथापालथीमुळे त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत झाली. त्यांनी नियतकालिकातून राष्ट्रवादी लेख लिहिण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी हे त्यांचे आदर्श होते. नंतरच्या काळात त्यांनी आपली शिक्षकाची नोकरी सोडून खेड्यांमध्ये सभा आयोजित करणे सुरू केले.
आपल्या सभांच्या माध्यमातून ते लोकांना जागृत करीत असत. गुरुर्जीच्या राजनैतिकं कार्यामुळे त्यांना पंधरा महिने नाशिकच्या कारागृहामध्ये काढावी लागली. नाशिकच्या कारागृहात त्यांनी आपली प्रसिद्ध कादंबरी ‘श्यामची आई चे लेखन केले. श्यामची आई हे मी आजवर वाचलेल्या पुस्तकांमध्ये ‘माझे आवडते पुस्तक’ आहे. साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकाचे लेखन अवघ्या चार दिवसात संपवले. धुळ्याच्या कारागृहात असताना गुरुर्जीनी, विनोबा भावे यांनी सांगितलेला ‘गीताई’ ग्रंथ लिहिला.
याशिवाय साने गुरुजींनी विपुल मराठी लेखन केले. अमोल गोष्टी, आपण सारे भाऊ, आस्तिक, इस्लामी संस्कृती, कर्तव्याची हाक, कला आणि इतर निबंध, कला म्हणजे काय? कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य, गुरुजींच्या गोष्टी, गोड गोष्टी (भाग १ ते १०) इत्यादी प्रसिद्ध आणि विशेषत: लहान मुलांसाठी उपयुक्त पुस्तके त्यांनी लिहिली. वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी गांधीजींच्या हत्येने अस्वस्थ आणि निराश साने गुरुजी या महान आत्म्याने अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आपले जीवन संपवले. परंतु मृत्यूच्या ७० वर्षांनंतरही ते आपल्या अजरामर लेखनाने आपल्यांत जिवंत आहे.
(३) मी समुद्र बोलतोय
उत्तर:
मी समुद्र बोलतोय
बाळांनो, कसे आहात सुखी आहात ना ? तुमच्याकडे थोडा वेळ आहे का या अभाग्याकडे पाहायला ? मी समुद्र तुम्हाला भरभरून देणारा तुमच्यावर पित्याप्रमाणे प्रेम करणारा, आजवर मी माझ्या गर्भातून तुम्हाला खनिज तेल, वाळू, मीठ, मासे, मौल्यवान मोती देत आलो, पण तुम्ही मला काय दिले ?
नाही ना आठवत……. मी सांगतो तुम्ही मला आजवर दिलेत ते फक्त प्लास्टिक कचरा, रसायनयुक्त सांडपाणी, मलमूत्र, मोठाल्या बोर्टीमधून निघणारे हानिकारक तेल आणि अजून बरेच काही, तरीही मी गप्प राहिलो फक्त तुमच्यासाठी, पण आता राहवत नाही म्हणून तुम्हाला विनवणी करतोय, ऐकाल ना माझं….. ?
माझ्या अथांगतेचा तुम्ही उल्लेख करता, माझे मन केवढे अथांग, विशाल आणि विस्तीर्ण आहे. याची तुम्हाला कल्पना आहेच, तुम्हाला मी तुमच्या सर्व गुण-दोषासह व चांगले-वाईट विचारसह पूर्णपणे स्वीकारतो, कारण तुम्ही माझेच आहातच, डोंगरावरून वाहणाऱ्या नद्या माझणत समर्पित होतातच, सरिताचे गोड पाणी मी खारट करतो असा माझ्यावर आरोप केला जातोय. पण हे माझे पाणी खारट का होतेय. याचा कुणी कधी विचार करतो का आणि मित्रांनो माझे हे पाणी चवीला खारट नसते तर तुमचे संपूर्ण जीवन अळणीच राहिले असतेच, मीठ मोठ्या प्रमाणात तयार करण्याची क्षमता या माझ्या खारट पाण्यातच आहेत. महात्मा बापूजी साबरमतीहून माझ्या तीरावर मीठ उचलाय आले ना तेव्हा मला धन्य वाटले होते.
हे आधुनिक युगातील प्रगतशील मानवा, आज तुझे संपूर्ण जीवनच गतीमान अन आयुष्यामध्ये विलक्षण गती आली आहे. या गतीला इंधन हवे असते. ते इंधनही मी मिळवून देतो. इतकेच काय ! सर्व सजीवांचे जीवनच माझ्यावर अवलंबून आहे. माझ्या पाण्यापासून बाष्प तयार होते तेव्हाच तुम्हाला पाऊस मिळतो. ते पाणी म्हणजेच तुमचे जीवन !
दोस्तांनो, जो दुसन्यासाठी जगला तोच खरोखर जगला. आज माझ्या मदतीने तुम्ही दूरवरच्या खंडातून फिरू शकता तेव्हा मनाला खूप बरे वाटते. नव्या खंडाचा शोधही मी तुम्हाला लावून दिला. भारतमातेच्या तर तिन्ही बाजूंना मीच पसरलेलो आहे. तेव्हा मला तुमचा सहवास द्या, एवढेच माझे सांगणे आहे. त्यात माझी कृतार्थता आहे.
(४) क्रीडांगण बोलू लागले तर……..
उत्तर:
क्रीडांगण बोलू लागले तर…..
मुलांनी, धरात बसून टीव्ही, मोबाईल, व्हीडियो गेम खेळणे सोडून पुन्हा मैदानी खेळांकडे वळा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचे बालपण हे असे वाया जाऊ देऊ नका. मी नवनवीन टेक्लॉनाजी शिकण्याच्या विरुद्ध अजिबात नाही आहे कारण मला संपूर्ण कल्पना आहे की जो आजच्या काळाची गरज आहे, परंतु तुमच्या शारीरिक जडणघडणीसाठी मैदानी खेळ, व्यायाम आणि कसरतीही खूप महत्त्वाच्या आहेत. व्यायामाचे महत्त्व वेळीच समजून घ्या.
आज भी तुम्हा सर्वाना आवाहन करू इच्छितो की, पुन्हा या क्रीडांगणाकडे या. माझ्या साफसफाई कडे लक्ष्य या येथील कचऱ्याचे साम्राज्य नाहीसे करून मला पुन्हा नवसंजीवनी मिळवून द्या आणि पुन्हा या तुमच्या क्रीडांगणाला पूर्वीसारख जिवंतपणा प्राप्त करून दया. पुन्हा या क्रीडांगणावर क्रिकेटचे, कबड्डीचे, खो-खो, फुटबॉल आणि इतर मैदानी खेळाचे सामने रंगू द्या, बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमातील टाळ्याच्या कडकडाटामध्ये हे क्रीडांगणन पुन्हाने जागे होऊ द्या.
(५) वृत्तपत्रांचे महत्त्व
उत्तर:
वृत्तपत्रांचे महत्त्व
मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात रोज नवनवीन घटना घडतात त्या मानवी जीवनाला प्रभावित करतात. छोट्याछोट्या घटना जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. जसजसा आपला बौद्धिक स्तर उंचावत
तो तसतसे आपण जगभरातील घटनांची माहिती मिळवू इच्छितो. या आपल्या जिज्ञासेची तृप्ती वृत्तपत्र करते. भारतात वृत्तपत्राच्या विकासाचा श्रीगणेश १७८० मधील ‘बंगाल गॅजेट’ पासून मानला जातो. त्यानंतर हिंदीतील पहिले वृत्तपत्र. ‘उदंड मार्तंड’ संपादक श्री जुगलकिशोर यांनी काढले. भारतात वृत्तपत्राचा विकास स्वतंत्रता चळवळीपासून सुरू झाला. अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांनी वृत्तपत्र काढले.
त्यामुळे त्यांचा जनतेशी संपर्क प्रस्थापित झाला. राजा राममोहन रॉय यांनी पहिले उर्दू वृत्तपत्र ‘मिराईतुलम’ काढले. टिळकांचे ‘केसरी’ व ‘मराठा’ महात्मा गांधींचे ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ही हिंदी. इंग्रजी, उर्दू, मराठी वृत्तपत्रे प्रकाशित झाली. हळूहळू त्यांचा प्रसार-प्रचार वाढला. आज आपल्या देशात असंख्य वृत्तपत्रे दररोज प्रकाशित होतात.
वृत्तपत्रे फक्त दैनिकच असतात अस नव्हे, तर पाक्षिक, मासिक, साप्ताहिक, वार्षिक, अर्धवार्षिक पण असतात. प्रमुख वृत्तपत्रे प्रातःकालीन असतात तर काही सायंकालीनसुद्धा असतात. सर्वात जास्त प्रातः कालीन दैनिकच लोकप्रिय आहेत. कारण त्यातून देश-विदेशांतील मुख्य माहिती मिळते.
व्यावसायिकतेच्या उद्देशाने पत्रकारिता सुरू झालेली नव्हती तर पाश्चिमात्य शिक्षणातून आधुनिकतेची झालेली ओळख समाजाला करून देण्याचे ध्येय त्यामागे होते. म्हणूनच वृत्तपत्राचे हे माध्यम समाजासाठी दिशादर्शक ठरते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गतीने इतरही प्रसारमाध्यमे आली. मात्र, वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवून आजही दीपस्तंभासारखे दिमाखाने उभे आहे. आज शहरच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत वृत्तपत्राचे जाळे पसरले आहे. शाळा-महाविद्यालयांतून युवक- युवतींचा वाचक वर्ग तयार झाला आहे.
हे जाहिरातयुग आहे. मोठमोठ्या कंपन्या वृत्तपत्रांतून आपल्या उत्पादनांची जाहिरात करतात. त्या जाहिराती लोक वाचतात त्यामुळे लोकांना अनेक वस्तूंची माहिती होते. व्यापार वाढतो तसेच वृत्तपत्रांना
आर्थिक लाभही होतो. वृत्तपत्रांमुळे आपल्याला जगाची माहिती घरबसल्या मिळते. नोकरीविषयक बातम्या विवाह मंडळांची माहिती. घरांची माहिती, बाजारभाव, स्थानिक घडामोडी, शैक्षणिक संस्था, वेगवेगळे अभ्यासक्रम या सर्वांबद्दल माहिती मिळते. लोक वेगवेगळ्य कारणांनी वृत्तपत्रे वाचतात. कोणाला सिने कोणाला जगातील माहिती हवी असते तर खेळांविषयी. लोकशाही असणाऱ्या देशात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. समाजातील वाईट चालीरीती वृत्तपत्रे मागे नाहीत. प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट, दिवाळी, होळी, इत्यादी वर वृत्तपत्रे विशेषांक प्रकाशित करतात. यातील लेख महत्त्वपूर्ण असतात.
वृत्तपत्रे केवळ नवीन माहितीच आपणासपुरवतात असे नसून विचारांची देवाण घेवाणही करतात. निवडणूक काळात निरनिराळ्या नेत्यांच्या घोषणा ते आपणापर्यंत पोहोचवतात.
वृत्तपत्रांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. लोकमत जाणून घेण्यासाठी तसेच जगजागरणासाठी वृत्तपत्रांचा उपयोग करता येतो. सामाजिक ऐक्य व परस्पर सहकार्य वाढविण्यात वृत्तपत्रे मदत करू शकतात. हुंडा, अस्पृश्यता, जातीभेद दूर करण्याची कामगिरी पार पडू शकतात. टीव्ही, कॉम्प्युटरच्या युगातही वृत्तपत्रांचे महत्त्व अबाधित आहे. वृत्तपत्रांनी ही आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन बातम्या दिल्या पाहिजेत, फक्त प्रसिद्धीच्या मागे लागू नये.
वैश्विक माहिती समजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्याचे काम वर्तमानपत्रांतून होते. त्यामुळे समाज प्रगतीत, देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. समस्त जनांचा, गोरगरिबांचा, महिलावर्गांचा, दिनदुबळ्यांचा कैवारी म्हणून वर्तमानपत्राची जबाबदारी आहे. आणि ती आज निःस्वार्थपणे पार पाडली जात आहे.