Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Textbook Questions and Answers
स्वाध्याय :
1. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
प्रश्न 1.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम दयायचा नव्हता, कारण …………….
(अ) तो नुकताच शिकायला आला होता.
(ब) त्याला वाक्य वाजवता येत नव्हते.
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(ड) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
उत्तर :
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
प्रश्न 2.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ……………
(अ) बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.
(ब) ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुदंर वाजवत होता.
(क) शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.
(ड) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
उत्तर :
(ड) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
2. आकृतिबंध पूर्ण करा.
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
3. जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा. पाठातील असे शब्द शोधा.
उत्तरः
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. धीट | भित्रा |
2. हजर गैरहजर | गैरहजर |
3. सुंदर | कुरूप |
4. स्तुती निंदा | निंदा |
4. खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा.
प्रश्न 1.
खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा.
उत्तर :
i. लेखकाने सुमारे वीसएक मिनिटे पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली.
ii. नानांना काहीच ऐकू येत नव्हते.
5. खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्ये पुन्हा लिहा.
प्रश्न 1.
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्ये पुन्हा लिहा.
- वर्गातील विदयार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
- आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
- उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
उत्तर :
- वर्गातील विद्यार्थ्यांनी जिवाचे कान करून शिक्षकांचे शिकवणे ऐकले पाहिजे.
- आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये, म्हणून प्रत्येक विक्ष्यानि काळजी घ्यायला हवी.
- उत्तम वादनाने लेखकाचा शिरीषबाबतचा चांगला ग्रह झाला.
6. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
प्रश्न 1.
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. कोलाहल | (अ) प्रवासी |
2. त-हेवाईक | (आ) विचित्र |
3. मुसाफिर | (इ) प्रेरित |
4. उदयुक्त | (ई) गोंधळ |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. कोलाहल | (ई) गोंधळ |
2. त-हेवाईक | (आ) विचित्र |
3. मुसाफिर | (अ) प्रवासी |
4. उदयुक्त | (इ) प्रेरित |
7. स्वमत :
प्रश्न अ.
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्टचे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा दहा-बारा वर्षांचा मुलगा होता. वयाच्या मानाने परिस्थितीमुळे शिरीषला लवकरच शहाणपण आले होते. शिरीषच्या वडिलांचे संगीत कलेवर जिवापाड प्रेम होते. ते उत्कृष्ट गवई होते; परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले. त्यांची संगीत सेवा अंतरली, याचे त्यांना दुःख झाले.
त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला, शिरीषची आकलनशक्ती इतकी दांडगी होती की त्याने पहिल्या तीन महिन्यातच आपली प्रगती व कौशल्य दाखवून दिले. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात असे. यावरुन त्याचा नियमितपणा व वक्तशीरपणा दिसून येतो. त्याला आपल्या वडिलांविषयी आदर व प्रेम होते.
वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. संगीतकलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. वडील गेल्यावर तो फार दु:खी झाला. पण मन घट्ट करून तो परिस्थितीला सामोरा गेला.
लोकनिंदेकडे लक्ष न देता नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला, अहोरात्र सराव केला. यातून त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते. कार्यक्रमाच्या दिवशी नवखा असूनही उत्तम वादन करून श्रोत्यांना व संगीत शिक्षकांना प्रभावित केले. यातून त्याचा आत्मविश्वास ब धीटपणा दिसून येतो. अशाप्रकारे, या पाठातून शिरीषचा ध्येयवेडेपणा, प्रामाणिकपणा, सातत्य, कष्ट, ध्यास व वडिलांच्या सौख्यासाठी केलेली धडपड ही गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात.
प्रश्न आ.
शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
शिरीष हा दहा – बारा वर्षांचा मुलगा, त्याचे वडील एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. पण एका जबर अपघातामुळे ते शिरीषने संगीत शिकून त्यात प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता, त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले. शिरीषच्या या खंबीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की, आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे, कष्टाने सातत्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे, ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे.
8. अभिव्यक्ती:
प्रश्न अ.
प्रस्तुत कथेचे संवादरूपाने लेखन करा.
उत्तर :
(शिरीष व त्याचे वडिल संगीत शिक्षकाच्या भेटीला जातात.)
- शिरीष : नमस्कार ! मी शिरीष भागवत. मला गाण्याची फार आवड आहे. मला संगीत शिकायचे आहे.
- संगीत शिक्षक : बरं, तुला गाण्याची फार आवड आहे तर!
- शिरीष : माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी संगीत शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईन; पण माझ्याबरोबर रोज माझे वडील पण शिकवणी चालू असताना वर्गात बसतील. अशी माझी अट आहे.
- संगीत शिक्षक : मान्य! तुझ्या अटी एकदम मान्य; पण तुला त्यासाठी महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल!
- शिरीष : कबूल! मी उद्यापासून शिकवणीला येतो. तीन महिने शिरीष नियमितपणे वडिलांसोबत शिकवणीला जातो. काही दिवसांनी शिरीषच्या वडिलांचे निधन होते. कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष शिक्षकांना भेटायला जातो.)
- शिरीष : माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे मी शिकवणीला येऊ शकलो नाही, परंतु मला कार्यक्रमात सहभाग घेण्याची परवानगी दयावी, ही विनंती.
- संगीत शिक्षक : शिरीष तुझी मन:स्थिती ठीक नाही. शिवाय गैरहजेरीमुळे तुझा सरावही नाही. त्यामुळे तुला परवानगी देता येणार नाही.
- शिरीष : मला परवानगी दिली, तर माझी मन:स्थिती आपोआप सुधारेल, सर.
- संगीत शिक्षक : ठीक आहे. दिली तुला परवानगी; पण नीट वाजव.
- शिरीष : होय सर, धन्यवाद. (शिरीष उत्कृष्टपणे वादन करतो. श्रोते व शिक्षक सगळेच त्याचे वादन ऐकून प्रभावित होतात. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक शिरीषला भेटतात व त्याचे कौतुक करतात.)
- संगीत शिक्षक : अरे वा ! शिरीष. तू तर आज कमालच केली. अशा मन:स्थितीत तुला कसे शक्य झाले?
- शिरीष : सर, माझे नाना मोठे गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते ठार बहिरे झाले. त्यांच्या सुखासाठी मी ही धडपड करत होतो; पण ज्या दिवाशी नाना गेले त्या दिवशी मी संगीत बंद केले; पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा वादन ऐकूशकत नव्हते; पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारा सरशी मी त्याच दिवासापासून व्हायोलिन वाजावाला सुरुवात केली. आज सकाळपासून कुठे बाहेर पडलो नाही. चोवीस तास एकच उदयोग, एकच ध्यास! त्याचा हा परिणाम.
- संगीत शिक्षक : शाब्बास ! शिरीष तू फार मोठी कामगिरी केली. आज तुझे बाबा नाहीत. आज जर ते असते तर म्हणाले असते, ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ (शिक्षकांनी शिरीषच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, त्यावेळी शिरीषच्या डोळ्यांतून अश्रूओघळले.)
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Additional Important Questions and Answers
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार
कृती करा: कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
उत्तर :
प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
विशेषण | बिशेष्य |
1. तिसरी | (अ) मुसाफिर |
2. जाहीर | (ब) घंटा |
3. नवखा | (क) कोलाहल |
4. संमिश्र | (ड) कार्यक्रम |
उत्तर :
विशेषण | बिशेष्य |
1. तिसरी | (ब) घंटा |
2. जाहीर | (ड) कार्यक्रम |
3. नवखा | (अ) मुसाफिर |
4. संमिश्र | (क) कोलाहल |
प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
- कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
- म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होता.
- मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली.
- मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.
उत्तर :
- मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली.
- कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
- मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.
- म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो.
प्रश्न 5.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाचा कोणता पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे?
उत्तर :
लेखकाच्या वादनविदयालयाचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे.
ii. बाहेरचा संमिश्र कोलाहल केव्हा बंद पडला?
उत्तर :
तिसरी घंटा घणघणली तेव्हा बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला.
प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. कलेच्या प्रांतातील हा नवखा ……….. आहे. (प्रवासी, मुसाफिर, यात्री, सहप्रवासी)
ii. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या ………………. होईल. (तंतुवादनाने, तबलावादनाने, वीणावादवाने, फिड्लवादनाने)
उत्तर :
i. मुसाफिर
ii. फिड्लवादनाने
प्रश्न 7.
सहसंबंध लिहा.
स्त्री : पुरुष :: विद्यार्थिनी : …………
उत्तर :
विदयार्थी
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
कोण ते लिहा.
उत्तर :
प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा
उत्तर :
प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
लेखकाला शिरीषला कार्यक्रम दयायचा नव्हता; कारण
(अ) तो नुकताच शिकायला आला होता.
(ब) त्याला वाक्य वाजवता येत नव्हते.
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(ड) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
उत्तर :
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
i. लेखकाला शिरीषला कार्यक्रम दयायचा होता,
ii. शिरीष हा अनुभवी वादक होता.
उत्तर :
i. चूक
ii. चूक
प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. कलेच्या प्रांतातिल हा नवखा मुसाफीर आहे.
ii. मला या मूलाची अतिशय भिती वाटत होती.
उत्तर:
i. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
ii. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :
- मी
- मला
- माझ्या
प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :
- अतिशय
- संमिश्र
- नवखा
प्रश्न 4.
लिंग बदला
i. स्त्री-
ii. विद्यार्थिनी –
उत्तर:
i. पुरुष
ii. विद्यार्थी
प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- शेवट × [ ]
- निंदा × [ ]
- दुःख × [ ]
उत्तर :
- सुरुवात
- कौतुक
- आनंद
प्रश्न 6.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा, स्थिर होणे
उत्तर :
स्थिर होणे – शांत होणे
वाक्य: मुख्याध्यापकाचा आवाज ऐकताच वर्गातील सर्व विद्यार्थी आपापल्या जागेवर स्थिर झाले.
प्रश्न 7.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो.
ii. कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.
उत्तर:
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ
प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम जरूर सादर केलेला असाल त्यावेळी आलेल्या तुमच्या अनुभवांचे वर्णन करा.
उत्तर :
स्टेजवर एखादा कार्यक्रम सादर करणे म्हणजे आनंदाची एक पर्वणीच असते. मी अनेकदा स्टेजवर कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे. एकदा मी शालेय नाटकस्पर्धेत भाग घेतला होता. त्या नाटकात मी नायकाची भूमिका वठवली होती. तो माझा स्टेजवरील पहिलाच अनुभव होता. त्यामुळे संवाद बोलताना व अभिनय करताना सुरुवातीला मला धास्तीच वाटत होती. मनावर एक प्रकारचे दडपण आलेले होते.
मनात अनेक वेळा शंका येत होती की जर एखादा संवाद चुकला तर संपूर्ण नाटकाचा बट्याबोळ होईल. पण प्रत्यक्षात जेव्हा मी स्टेजवर अभिनय व संवाद यांचा सुंदर समन्वय साधू लागलो, तेव्हा मात्र प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून मला दाद दिली. मग मला हुरूप आला आणि मी माझी भूमिका चांगल्या प्रकारे वठवून सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरलो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. फूटलाईट | (अ) प्रतिबिंबित |
2. मन | (ब) ध्यान |
3. डोळे मिटून | (क) झगझगीत प्रकाश |
4. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास | (ड) चलबिचल |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. फूटलाईट | (क) झगझगीत प्रकाश |
2. मन | (ड) चलबिचल |
3. डोळे मिटून | (ब) ध्यान |
4. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास | (अ) प्रतिबिंबित |
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.
- फुटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळयांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले.
- तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.
- चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला.
- हलकेच त्याने ‘षड्ज’ लावला.
उत्तर :
- चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला.
- फूटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले.
- तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.
- हलकेच त्याने ‘षड्ज’ लावला
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखक शिरीषबाबत काय ओळखून होता?
उत्तर :
शिरीषचे अवसान फार वेळ राहणार नाही, हे लेखक ओळखूनोता.
ii. शिक्षक या नात्याने लेखकाचे कोणते कर्तव्य होते?
उत्तर :
कार्यक्रमात शिरीषला सावरून धरणे हे शिक्षक या नात्याने लेखकाचे कर्तव्य होते.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
- पडदा ……….. वर गेला. (पटकन, झटकन, झरझर, भरभर)
- तो …………. गेला आहे, हे मी ओळखले. (गडबडून, घाबरून, गोंधळून, विधरून)
- त्याचा चेहरा पूर्वीच्या ……….. न्हाऊन निघाला. (धीटपणाने, अभिमानाने, गनि, आत्मविश्वासाने)
उत्तर:
- झरझर
- गडबडून
- आत्मविश्वासाने
प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
तंबोऱ्याचा आवाज : धीरगंभीर :: मनाची अवस्था : ……
उत्तर :
चलबिचल
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
फूटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच …………
(अ) शिरीषने डोळे पटकन उघडले.
(ब) शिरीषने डोळे झपकन मिटून घेतले.
(क) शिरीषने डोळे मिटून घेतले.
(ड) शिरीषने डोळ्यांवर हात ठेवला.
उत्तर :
(क) शिरीषने डोळे मिटून घेतले.
प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 4.
कोष्टक पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 5.
चूक की बरोबर लिहा.
i. लेखकाने तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली नाही.
ii. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
उत्तर :
i. चूक
ii. बरोबर
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करून लिहा.
i. शिरीषने डोळे मीटून कुणाचे तरि ध्यान केल्यासारखे दिसले.
ii. तंबोऱ्याचा धिरगंभीर आवाज घूमु लागला.
उत्तर :
i. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
ii. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :
- चेहरा
- प्रकाश
- डोळे
- पडदा
प्रश्न 3.
वचन बदला.
i. डोळा – [ ]
i. सवयी – [ ]
उत्तर :
i. डोळे
ii. सवय
प्रश्न 4.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती प्रश्न 4. स्वमत
प्रश्न 1.
कोणत्याही कलेसाठी धीटपणा व आत्मविश्वास आवश्यक असतो. यावर तुमचे मत लिहा.
उत्तर :
कोणतीही कला असो, ती शिकताना वा तिचे सादरीकरण करताना कलावंताजवळ धीटपणा व आत्मविश्वास असणे आवश्यक असते. खरे पाहता हे दोन्ही गुण कलेसाठी पूरक असतात. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असते, तर धीटपणा कला सादर करताना अप्रत्यक्षपणे अभिव्यक्त होत असतो. त्यामुळे कला शिकताना व ती सादर करताना व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. उलट व्यक्ती खंबीरपणे कला आत्मसात करू लागते, तसेच तिचे सादरीकरण ही तितक्याच तन्मयतेने करते. धीटपणा व आत्मविश्वास अंगी बाळगल्यामुळे व्यक्तीचे चित्त इतर घटकांकडे वळत नाही. कला सादर करते वेळी हजारो प्रेक्षकांपुढे ती सादर करताना व्यक्तीच्या मनाची चलबिचल होत नाही.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. लेखकाच्या शिकवणीची फी – [ ]
ii. सहा महिन्यापूर्वी विदयालयात आलेला विद्यार्थी – [ ]
उत्तर :
i. पन्नास रूपये
ii. शिरीष भागवत
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
- टपणे त्याने विचारले, ‘आपणच का पी. जनार्दन ?’
- सुमारे सहा महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला.
- ‘त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल!’
- धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजायला सुरुवात केली.
उत्तर :
- धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजायला सुरुवात केली.
- सुमारे सहा महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला.
- धीटपणे त्याने विचारले, ‘आपणच का पी. जनार्दन?’
- ‘त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल.’
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीषने धीमेपणाने कोणत्या रागातील गत वाजवायला सुरुवात केली?
उत्तर :
शिरीषने धीमेपणाने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली.
ii. शिरीषला घरी कोणत्या नावाने बोलावले जायचे?
उत्तर :
शिरीषला घरी ‘श्री’ या नावाने बोलावले जायचे.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
i. सुमारे ………………….. महिन्यांपूर्वी शिरीष विदयालयात आला. (सहा, सात, दहा, चार)
ii. ……………… शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. (पटापट, हळूवारपणे, धीमेपणाने, धीम्यागतीने)
उत्तर :
i. सह्य
ii. धीमेपणाने
प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
कानांवर : विश्वास :: पंचेंद्रिये : ……………..
उत्तर :
दगा
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा.
तुझ्या अटी एकदम मान्य; …………….
(अ) पण त्यासाठी तुला महिना साठ रुपये फी दयावी लागेल!
(ब) पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल!
(क) पण त्यासाठी तुला शंभर रुपये फी दयावी लागेल!
पण त्यासाठी तुला सत्तर रुपये फी क्यावी लागेल!
उत्तर :
तुझ्या अटी एकदम मान्य; पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल!
प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा,
उत्तर :
प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
- शिरीषला शिकविण्याची लेखकाची अजिबात इच्छा नव्हती.
- लेखकाला शिरीषचा राग आला.
- शिरीषने मल्हार रागातील गत वाजवायला सुरुवात केली.
उत्तर :
- चूक
- बरोबर
- चूक
प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. माझ्यापेक्षा माझ्या वडीलांना, मि शिकलेले फार आवडेल.
ii. पण त्यासाठी तुला महीना पन्नास रुपये फि द्यावी लागेल.
उत्तर :
i. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी शिकलेले फार आवडेल.
ii. पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा,
उत्तर :
- सुहास्य
- चमत्कारिक
- थोडासा
प्रश्न 3.
लिंग बदला
i. आई – [ ]
ii. मुलगी – [ ]
उत्तर :
i. वडील
ii. मुलगा
प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- उठतील × – [ ]
- घेणे × – [ ]
- अमान्य × – [ ]
- बंद × – [ ]
उत्तर :
- बसतील
- देणे
- मान्य
- चालू
प्रश्न 5.
समानार्थी शब्द लिहा.
i. पिता – [ ]
ii. चेहरा – [ ]
उत्तर :
i. वडील
ii. मुद्रा
प्रश्न 6.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
i. धक्का बसणे
ii. नवल वाटणे
iii. शंका वाटणे
उत्तर :
i. अर्थ : आघात होणे
वाक्य : मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईवडिलांना जोरदार धक्का बसला.
ii. अर्थ : आश्चर्य वाटणे
वाक्य : पावसात पिसारा फुलवून नाचणारा मोर बघताना सर्वांना नवल वाटते.
iii. अर्थ : संशय वाटणे
वाक्य : रमेशच्या वागण्याची पोलिसांना शंका वाटू लागली.
प्रश्न 7.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
गाणे गाताना सूर महत्त्वाचे असतात. असे जे म्हटले जाते ते तुम्हास पटते का?
उत्तर :
गाणे गाताना सूर महत्त्वाचे असतात. गाणे गात असलेल्या व्यक्तीला सूरांचे भान ठेवावेच लागते. जर सूर तंतोतंत जुळले तरच व्यक्तीने गाणे चांगल्या प्रकारे सादर केले असे म्हटले जाते. समजा एखाद्या व्यक्तीने गाणे सादर करताना सुरांचा ताळमेळ राखला नाही म्हणजे सूर भटकले तर गाणे गात असलेल्या व्यक्तीचे गाणे चांगल्या प्रकारे सादर होऊच शकत नाही. असे गाणे मनाला भिडत नाही व हृदयात घर करू शकत नाही. चांगले गाणे म्हणजे सुरांचे ताळतंत्र लक्षात घेऊन गायलेल्या गाण्याची सर्व प्रेक्षक वर्ग दाद देतात. अशीच व्यक्ती एक उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपाला येते. समाजात कलावंत म्हणून ओळखली जाते.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. नानांच्या चेहऱ्यावरील भाव – [ ]
ii. लेखकाने वाजवून दाखविलेली गत – [ ]
उत्तर :
i. तृप्तीच्या समाधानाचे
ii. पिलू रागातली
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
- एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले.
- हे माझे गुरुजी, नाना आणि हे माझे वडील!
- आमचे नमस्कार झाले.
- ‘वा उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही शिरीषनेच मध्ये उत्तर दिले.
उत्तर :
- हे माझे गुरुजी, नाना आणि हे माझे वडील!
- आमचे नमस्कार झाले.
- एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले.
- ‘वा उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही’ शिरीषनेच मध्ये उत्तर दिले.
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाला कशाचा राग आला?
उत्तर :
लेखकाला शिरीषच्या आगाऊ स्वभावाचा राग आला होता.
ii. शिरीष बरोबर कोण होते?
उत्तर :
शिरीष बरोबर नाना (वडील) होते.
iii. लेखकाने कोणत्या रागातील गत वाजवून दाखवली?
उत्तर :
लेखकाने पिलू रागातील गत वाजवून दाखवली.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
i. दुसरे दिवशी तो अगदी ………….. आला. (वेळेव्याआधी, वेळेनंतर, वेळेवर, बऱ्याच वेळाने)
ii. एक अक्षर न बोलता नाना ………….. बसले.
(खुर्चीवर, टेबलावर, आरामखुर्चीवर, बिछान्यावर)
उत्तर :
i. वेळेवर
ii. खुर्चीवर
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
लेखकाचा शिरीषबद्दलचा ग्रह चांगला झाला; कारण …………
(अ) शिरीषने स्वत:बरोबर वही वगैरे आणलेली लेखकाने पाहिली.
(ब) शिरीषने व्हायोलिन आणले होते.
(क) शिरीषने ढोलकी आणली होती.
(ङ) शिरीषने स्वत:बरोबर पेन आणला होता.
उत्तर :
(अ) शिरीषने स्वत:बरोबर वही वगैरे आणलेली लेखकाने पाहिली.
प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 4.
कोष्टक पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 5.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 6.
चूक की बरोबर लिहा.
एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवरून उठले.
उत्तर :
चूक
प्रश्न 7.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्य शुद्ध करून लिहा.
शिरीष बरोबर एक वयसकर आणि भारदसत गृहस्थ होते.
उत्तर :
शिरीष बरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :
- वडील
- शिरीष
- गुरुजी
- नाना
- खुर्ची
- व्हायोलिन
- विदयालय
- विदयार्थी
- पिता
- पुत्र
प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
- शिकवणी – [ ]
- नियम – [ ]
- शिक्षक – [ ]
- संवेदना – [ ]
- म्हातारा – [ ]
- पद्धत – [ ]
- उद्देश – [ ]
- उत्तम – [ ]
उत्तर :
- अध्यापन
- अट
- गुरुजी
- जाणीव
- वयस्कर
- प्रथा
- हेतू
- उत्कृष्ट
प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- तरुण × [ ]
- नाकबूल × [ ]
- आज × [ ]
- रात्र × [ ]
उत्तर :
- वयस्कर
- कबूल
- उदया
- दिवस
प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
विद्यालयात | विद्यालया |
चेहऱ्याकडे | चेह-या |
स्वभावाचा | स्वभावा |
प्रश्न 6.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
i. एक अक्षर न बोलणे
ii. प्रथा असणे
उत्तर :
i. एक अक्षर न बोलणे – गप्प बसून राहणे
ii. प्रथा असणे – पद्धत असणे
प्रश्न 7.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले होते.
ii. शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळी-पाळीने बघत आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ
प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
एखाक्याचा स्वभाव आगाऊ असतो म्हणजे कसा? हे तुमच्या शब्दात सांगा.
उत्तर :
आगाऊ स्वभाव म्हणजे थोडासा उद्धट असा स्वभाव असलेली व्यक्ती स्वभावाने बिनधास्त असते. कधीही कोणाला न घाबरता प्रश्न विचारणे हा तिचा स्वभाव असतो. अशी व्यक्ती इतरांशी बोलताना स्पष्टपणे आपले विचार व्यक्त करते. आपल्या समोरील व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने छोटी आहे की मोठी हे सुद्धा ती पाहत नाही व आपले मत त्यांच्यासमोर स्पष्टपणे व्यक्त करते. अशा व्यक्तींशी जर कोणी थोडा फार आवाज चढवून बोलले तर अशा स्वभावाच्या व्यक्तींना फारच राग येतो व मग आपल्याशी आवाज चढवून बोलत असलेल्या व्यक्तीचा पाणउतारा केल्याशिवाय ती गप्प राहूच शकत नाही.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
कोण ते लिहा.
i. भोचकपणे उत्तर देणारा .
ii. शिरीष बरोबर रोज यायचे
उत्तर :
i. शिरीष
ii. नाना (वडील)
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
- त्याचा चेहरा काहीसा उतरला!
- ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते.
- शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती.
- ‘माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल.’
उत्तर :
- ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते.
- शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती.
- त्याचा चेहरा काहीसा उतरला!
- ‘माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल.’
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. नाना कोणाला दम भरतील असे लेखकाला वाटत होते?
उत्तर :
नाना शिरीषला दम भरतील असे लेखकाला वाटत होते.
ii. नाना शिरीषकडे कोणत्या नजरेने पाहत होते?
उत्तर :
नाना शिरीषकडे कौतुकाच्या नजरेने पाहत होते.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. नियमितपणे रोज ………….” जोडी येऊ लागली. (मातापित्याची, पितापुत्राची, काकापुतण्याची, दादामामाची)
ii. हां हां म्हणता “” “महिने निघून गेले! (चार, पाच, तीन, सहा)
उत्तर :
i. पितापुत्राची
ii. तीन
प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
आकलनशक्ती : दांडगी :: ठाशीव स्वरूपाचे : ………………..
उत्तर :
उत्तर
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा,
i. लेखकाच्या सर्व विदयार्थ्यांत त्याची ……………….
(अ) स्मरणशक्ती फारच दांडगी होती.
(ब) आकलनशक्ती फारच दांडगी होती,
(क) विचारशक्ती फारच दांडगी होती.
(ड) चिंतनशक्ती फारच दांडगी होती.
उत्तर :
(ब) आकलनशक्ती फारच दांडगी होती,
ii. लेखकाने आपल्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण ……..
(अ) अमेयला कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
(ब) नानांना कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
(क) शिरीषला कार्यक्रम व्यायचा असा निश्चय केला.
(ड) गुरुजींना कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
उत्तर :
(क) शिरीषला कार्यक्रम व्यायचा असा निश्चय केला.
प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 3.
चूक की बरोबर लिहा.
- गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले.
- माझ्यापेक्षा नानांना त्याचे दु:ख जास्त होईल.
- लेखक नानांशी बोलत नसत.
उत्तर :
- बरोबर
- चूक
- बरोबर
प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा,
i. भोचकपणे शीरीषच पून: म्हणाला
ii. एक अक्षरहि न बोलता शांत बसुन राहात.
उत्तरः
i. भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला.
ii. एक अक्षरही न बोलता शांत बसून राहात.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :
- अतिशय
- सर्व
- गंभीर
- प्रथम
प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
i. निश्चय, निशचय, नीश्चय, निशय
ii. विदयालय, बीद्यालय, वीदय्यालय, विद्यालय
उत्तर :
i. निश्चय
ii. विद्यालय
प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.
- प्रशंसा – [ ]
- नवल – [ ]
- सुधारणा – [ ]
- निर्धार – [ ]
उत्तर :
- कौतुक
- आश्चर्य
- प्रगती
- निश्चय
प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- निंदा × [ ]
- अधोगती × [ ]
- जड × [ ]
- अनियमित × [ ]
उत्तर :
- कौतुक
- प्रगती
- हलका
- नियमित
प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
i. महिने
ii. विदयार्थी
प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
स्वरूपाचे | स्वरूपा |
कौतुकाच्या | कौतुका |
विद्यार्थ्यात | विदयाथ्यो |
आनंदाच्या | आनंदा |
प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
- दम भरणे
- अक्षरही न बोलणे
- निश्चय करणे
- अत्यानंद होणे
उत्तर :
- दम भरणे – ओरडणे
- अक्षरही न बोलणे – गप्प बसणे
- निश्चय करणे – ठरवणे
- अत्यानंद होणे – खूप आनंद होणे
प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. मी पण त्यांच्याशी बोलत नसे.
ii. तुझा कार्यक्रम आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ
प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते तुम्हास पटते का?
उत्तर :
मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते मला शंभर टक्के पटते. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात त्यांना शिक्षण देतात. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या लाडक्याने मोठे होऊन आपल्या घराचे, समाजाचे व देशाचे नाव मोठे करावे. जेव्हा मुले परीक्षेत प्रथम येतात.
डॉक्टर किंवा अभियंता होतात, तेव्हा त्यांच्या आई-बाबांना ब्रह्मानंद झाल्याशिवाय राहत नाही. मुलांपेक्षा त्यांनाच अधिक कौतुक वाटते. त्यांच्या मुलांनी आयुष्यात मिळविलेले यश हे त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या तपाचे फळ असते. म्हणून मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते, असे जे म्हटले जाते ते अगदी योग्यच आहे.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीष न येण्याचे कारण – [ ]
ii. लेखक बेचैन झाला होता – [ ]
उत्तर :
i. नाना आजारी होते.
ii. शिरीषच्या आठवणीने
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
- ‘नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
- समारंभाचा दिवस उगवला.
- मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा!
- दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही.
उत्तर :
- दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही.
- ‘नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
- समारंभाचा दिवस उगवला.
- मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा!
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाच्या मनात वरचेवर कोणती शंका येत असे?
उत्तर :
नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा अशी शंका लेखकाच्या मनात वरचेवर येत असे.
ii. शिरीषच्या आठवणीने कोण बेचैन झाले होते?
उत्तर :
शिरीषच्या आठवणीने लेखक बेचैन झाला होता.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात ………………… उभा! (शिरीष, नाना, शिक्षक, गिरीष)
ii. ……….. गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या त-हेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो.
(मातापिता, काकापुतण्या, पितापुत्र, काकाकाकी)
उत्तर :
i. शिरीष
ii. पितापुत्र
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
या शिवाय आणखीन एक शंका लेखकाच्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे …………..
(अ) लेखक असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.
(ब) नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.
(क) नाना जवळ असताना शिरीष मोकळया मनाने गिटार वाजवत नाही.
(ड) नाना असताना शिरीष मोकळ्या मनाने पेटी वाजवत नाही.
उत्तर :
(ब) नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.
प्रश्न 2.
कोण ते लिहा, – [ ]
i. आजारी होते – [ ]
ii. आठवणीने बेचैन होता
उत्तर :
i. नाना
ii. लेखक
प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
i. त्याचा हा पहिला खाडा, नसेल एखादवेळेस जमले.’
ii. ‘नाना ठणठणीत असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
उत्तर :
i. बरोबर
ii. चूक
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमानुसार शुद्ध करून लिहा.
त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवुन मि बाकीचे विद्यार्थी तयार केले.
उत्तर :
त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :
- पिता
- पुत्र
- शिरीष
- नाना
- मनुष्य
- फी
- पैसे
- कार्यक्रम
- सकाळ
- दार
प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन विशेषण शोधून लिहा.
उत्तर :
- 0त-हेवाईक
- मोकळ्या
- पहिला
प्रश्न 4.
अचूक शब्द लिहा.
i. बेचैन, बैचन, बैचेन, बेचन
ii. व्हायोलिन, व्हायलिन, व्ायलीन, व्होयालीन
उत्तर :
i. बेचैन
ii. व्हायोलिन
प्रश्न 5.
समानार्थी शब्द लिहा.
- पिता – [ ]
- पुत्र – [ ]
- खाडा – [ ]
- रहस्य – [ ]
- शंका – [ ]
- दिवस – [ ]
उत्तर :
- वडील
- मुलगा
- गैरहजेरी
- गुपित
- संशय
- दिन
प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- रात्र × [ ]
- चूक × [ ]
- अवेळी × [ ]
- प्रश्न × [ ]
- जवळ × [ ]
- मावळला × [ ]
- अस्वस्थ × [ ]
उत्तर :
- दिवस
- बरोबर
- वेळी
- उत्तर
- दूर
- उगवला
- स्वस्थ
प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
प्रश्नाचे | प्रश्ना |
थोड्याशा | थोड्या |
प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
i. आश्चर्यचकित होणे
ii. बेचैन होणे
उत्तर :
i. अर्थ : नवल वाटणे
वाक्य : सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ पाहून मुले आश्चर्यचकित झाली.
ii. अर्थ : अस्वस्थ होणे
वाक्य : आई घरात न दिसल्याने भूषण बेचैन झाला होता.
प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. त्याचा ा पहिला खाडा होता.
ii. मी उगाचच बेचैन झालो आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ
प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
ऐन कार्यक्रमाच्या दिवशी तुमच्याबरोबर कार्यक्रमात भाग घेतलेला तुमचा मित्र गैरहजर राहिल्यास तुमची मन:स्थिती कशी होईल?
उत्तर :
समजा मी एखादया संगीत नाटकात भाग घेतलेला आहे व माझ्याबरोबर माझ्या मित्रानेही त्यात भाग घेतलेला आहे. गेल्या महिनाभर आम्ही त्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे. ऐन नाटकाच्या दिवशी कही कारणास्तव तो नाटकाला हजर राहू शकणार नाही हे समजताच माझी तारांबळ उडेल. नाटक सादर कसे करायचे तसेच गैरहजर राहिलेल्या मित्राचे संवाद अगदी ऐन वेळी कोण पाठ करणार? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतील. कार्यक्रम सूचीतून नाटक रद्द करण्याशिवाय दुसरा मार्गच राहणार नाही. गेल्या महिनाभर वेळ काढून केलेल्या तयारीला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे मन खिन्न व उदास होईल.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीष जन्मात हात लावणार नव्हता.
ii. लेखकांनी कार्यक्रमाची परवानगी दिली.
उत्तर :
i. व्हायोलिनला
ii. शिरीषला
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
- ‘माझे नाना…नाना…माझे नाना कायमचे गेले हो सर!’
- मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो.
- सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा.
- ‘तर माझी मनःस्थिती आपोआपच सुधारेल!’
उत्तर :
- मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो.
- ‘माझे नाना…नाना…माझे नाना कायमचे गेले हो सर!’
- सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा.
- ‘तर माझी मन:स्थिती आपोआपच सुधारेल!’
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाने कोणाचे सांत्वन केले?
उत्तर :
लेखकाने शिरीषचे सांत्वन केले.
ii. अगितक होऊन शिरीष कोणाला विनंती करत होता?
उत्तर :
अगतिक होऊन शिरीष लेखकाला विनंती करत होता,
iii. शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक नकार का देत होता?
उत्तर :
शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक नकार देत होता कारण; तो दोन महिने गैरहजर होता.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. अरे, तुझा ………. तरी काय? (नाव, गाव, पत्ता, धंदा)
ii. नंतर जन्मात हात लावणार नाही ……….! (व्हायोलिनला, गिटारला, विण्याला, तबल्याला)
उत्तर :
i. पत्ता
ii. व्हायोलिनला
प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
विनंती : लेखकाला :: आगतिक ……………….
उत्तर :
शिरीष
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ………………..
i. ‘इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर.
(अ) यापुढे मी दिसणार नाही!
(ब) यापुढे मी एकटाच दिसेन !
(क) यापुढे मी आणि नाना येईन!
(ड) यापुढे मी कधीच बोलणार नाही!
उत्तर :
(ब) यापुढे मी एकटाच दिसेन !
ii. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या ……………..
(अ) विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे.
(ब) विद्यालयाची शान अवलंबून आहे.
(क) विद्यालयाची पत अवलंबून आहे.
(ड) विदयालयाचे नाव अवलंबून आहे.
उत्तर :
(अ) विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे.
प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.
- ‘मला परवानगी दिलीत, तर माझी मनःस्थिती आपोआपच सुधारेल!’
- गिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो’
- ‘आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना?’
उत्तर :
- सत्य
- असत्य
- सत्य
प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. ‘इकडची दुनीया तीकडे होईल ना?’
ii. ‘तू पूढे जन्मभर वाजव पण आज वाजवु नको.’
उत्तर :
i. ‘इकडची दुनिया तिकडे होईल ना?’
ii. ‘तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नको.’
प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
i. इभरत, इभत, इभ्रत, इर्भत
ii. दुःखित, दुखित, दूःखित दुःखीत
उत्तर :
i. इभ्रत
i. दुःखित
प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
i. निर्धार – [ ]
ii. सौम्य – [ ]
उत्तर :
i. निश्चय
ii. शांत
प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- दूर × [ ]
- इकडे × [ ]
- हजर × [ ]
- चूक × [ ]
- सुरुवात × [ ]
- आनंदी × [ ]
उत्तर :
- जवळ
- तिकडे
- गैरहजर
- बरोबर
- शेवट
- दु:खी
प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | प्रत्यय | विभक्ती |
विदयालयाचा | चा | षष्ठी |
आवाजात | त | सप्तमी |
व्हायोलिनला | ला | द्वितीया |
प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
सांत्वनानंतर | सांत्वना |
विद्यालयाचा | विदयालया |
आवाजात | आवाजा |
कार्यक्रमावर | कार्यक्रमा |
प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
i. इभ्रत राखणे
ii. आगतिक होणे
उत्तर :
i. इभ्रत राखणे – इज्जत राखणे / प्रतिष्ठा राखणे
ii. अगतिक होणे – अधीर होणे
प्रश्न 8.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा,
i. तुझी मन:स्थिती पण आज बरोबर नाही.
आज आपला नाईलाज आहे.
उत्तर :
i. वर्तमानकाळ
ii. वर्तमानकाळ
प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
तुम्ही शिरीषच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते ते थोडक्यात सांगा.
उत्तर :
मी जर शिरीषच्या जागी असतो तर कार्यक्रमाला गेलो असतो. शिक्षकांना विनंती करून कार्यक्रमात वाजविण्याची परवानगी मिळवली असती. स्वत:चे दुःख विसरून संगीतक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले असतेवदिवस-रात्र मेहनतकरूनआपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले असते. एकाग्रता व जिद्द यांची सांगड घालून यशाची उंचच उंच भरारी मारली असती. संगीत शिकत असताना येत असलेल्या सर्व संघर्षांचा सामना केला असता; पण काहीही झाले असते तरी संगीत शिकण्याचे थांबविले नसते.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. संगीतसेवा अंतरली याचाच धक्का बसला – [ ]
ii. एकेकाळी उत्कृष्ट गवई होते – [ ]
उत्तर :
i. नानांना
ii. शिरीषचे नाना
प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. माझे नाना एकेकाळी ………………. गवई होते. (उत्कृष्ट, चांगले, मध्यम, दर्जाचे)
ii. ………. कडकडाटाने मी भानावर आलो. (वाक्यांच्या, टाळ्यांच्या, आवाजाच्या, किंचाळीच्या)
उत्तर :
i. उत्कृष्ट
ii. टाळ्यांच्या
प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
- डोळे पुशीत शिरीष म्हणाला, ‘सर, काय ही भलतीच शंका!’
- शेवटी त्यांनी मला काही तरी वादय शिकण्यासाठी उद्युक्त केले.
- त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
- नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो.
उत्तर :
- त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
- नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो.
- डोळे पुशीत शिरीष म्हणाला, ‘सर, काय ही भलतीच शंका!’
- शेवटी त्यांनी मला काही तरी वादव शिकण्यासाठी उद्युक्त केले.
प्रश्न 5.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीषने लेखकाला काय पाठवली?
उत्तर :
शिरीषने लेखकाला फी व चिठ्ठी पाठवली.
ii. शिरीष कार्यक्रमात कोणते वाक्य वाजवत होता.
उत्तर :
शिरीष कार्यक्रमात व्हायोलिन हे वाक्य वाजवत होता.
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व
(अ) चिठ्ठी पाठवली.
(ब) संदेश पाठवला.
(क) वही पाठवली.
(ड) पेन पाठवला.
उत्तर :
(अ) चिठ्ठी पाठवली.
ii. डोळे पुशीत शिरीष म्हणाला.
(अ) सर, काय हे भलतच सांगताय!
(ब) सर, काय हे भलतच म्हणताय!
(क) सर, काय ही भलतीच शंका!
(ड) सर, काय ही भलतीच निंदा!
उत्तर :
(क) सर, काय ही भलतीच शंका!
प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा,
उत्तर :
प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.
- लेखकाने परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
- माझे नाना उत्कृष्ट खेळाडू होते.
- नानांनी शिरीषला वाक्य शिकण्यासाठी उद्युक्त केले.
उत्तर :
- सत्य
- असत्य
- सत्य
प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. ओठांच्या हालचालिंवरून त्यांना काहि काही शब्द समजत.
ii. ज्या दिवशी मि तुमच्याकडे फी व चीट्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले.
उत्तर :
i. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत,
ii. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :
- मी
- मला
- त्याने
- तू
- त्यांना
- ते
- माझे
प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :
- शिरीष
- पाय
- फी
- चिट्ठी
- व्हायोलिन
- गवई
- हात
प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.
- लोक – [ ]
- पाय – [ ]
- शंका – [ ]
- डोळे – [ ]
- हात – [ ]
- अंतरली – [ ]
- वारंवार – [ ]
- कौशल्य – [ ]
उत्तर :
- जनता
- पद
- संशय
- नयन
- कर
- दुरावली
- पुन्हापुन्हा
- कसब
प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- शंका × [ ]
- दिवस × [ ]
- सोई × [ ]
- अंतरली × [ ]
उत्तर :
- कुशंका
- रात्र
- गैरसोई
- मिळाली
प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
पायांवर | पायां |
माझ्याकडे | माझ्या |
वादकाप्रमाणे | वादका |
टाळ्यांच्या | टाळयां |
प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
- विदयार्थी
- लोक
- टाळया
- डोळे
प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
- परवानगी देणे
- भानावर येणे
- उदयुक्त करणे
उत्तर :
- होकार देणे / अनुमती देणे
- शुद्धीवर येणे
- प्रोत्साहन देणे, प्रेरित करणे,
प्रश्न 9.
काळ बदला, (भविष्यकाळ करा)
शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले.
उत्तर :
शिरीष आत येईल व तो माझ्या पायांवर डोके ठेवेल.
प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही, असे तुम्हांस वाटते का ? स्पष्ट करा.
उत्तर :
तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते. त्यात प्रगती होत असते. नवीन तंत्रज्ञान मानवासाठी एक चमत्कार असते. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत वा पद्धत, तंत्र समजून घेण्यासाठी मानवाला थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला व तिचा वापर करण्यास फार वेळ लागला होता. त्याप्रमाणे आता एवढा वेळ लागत नाही. वा त्याचे आश्चर्य वाटत नाही; पण तरीही नवीन तंत्रज्ञान म्हटले की ते शिकण्यास वा जाणून घेण्यास घोडा फार वेळ लागतोच.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कती करा:
कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीषला खेद वाटायचा – [ ]
ii. लोकांच्या निदेकडे लक्ष न देता शिरीष – [ ]
उत्तर :
i. नानांना ऐकायला येत नव्हतं.
ii. व्हायोलिन वाजवू लागला.
प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
- शिरीषला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता.
- ‘बेटा वाजव, मी ऐकतो आहे.’
- शिरीष गप्प बसला आणि मी बोलू शकत नव्हतो.
- नाना रोज शिरीषबरोबर येत होते.
उत्तर :
- नाना रोज शिरीषबरोबर येत होते.
- शिरीषला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता.
- बेटा वाजव, मी ऐकतो आहे.’
- शिरीष गप्प बसला आणि मी बोलू शकत नव्हतो.
प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीष किती तास सराव करत होता?
उत्तर :
शिरीष 24 तास सराव करत होता.
ii. ताना व सूर कोण सांगत आहेत, असा भास शिरीषला व्हायचा.
उत्तर :
ताना व सूर नाना सांगत आहेत, असा भास शिरीषला व्हायचा.
iii. शिरीषने डोळे मिटून घेताच नाना काय म्हणाले?
उत्तर :
‘बेटा वाजव, मी ऐकतो आहे!’ असे नाना म्हणाले.
प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. डोळ्यांसमोर …………. नव्हते, ………….. नव्हते, कोणी नव्हते. (प्रेक्षक/थिएटर, लोक/प्रेक्षक, जनता/ प्रेक्षक, थिएटर/प्रेक्षक)
ii. …………… गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. (शिरीष, नाना, लेखक, रमेश)
उत्तर :
i. प्रेक्षक/थिएटर
ii. शिरीष
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा,
i. चोवीस तास एकच उदयोग, ……………..
(अ) एकच चिंता!
(ब) एकच ध्यास!
(क) एकच विचार!
(ड) एकच शिक्षा!
उत्तर :
(ब) एकच ध्यास!
ii. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले, की ………
(अ) संगीत बंद !
(ब) वाक्ष्य बंद !
(क) व्हायोलिन बंद !
(ड) पेटी बंद !
उत्तर :
(अ) संगीत बंद !
प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.
i. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला, एवढे लोक पाहून, शिरीष गडबडून गेला होता.
ii. बारा तास एकच उदयोग, एकच ध्यास!
उत्तर :
i. सत्य
ii. असत्य
प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
कृती 3 : व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
या वीचारासरशी, लोकांच्या नींदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.
उत्तर :
या विचारासरशी, लोकांच्या निदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.
प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :
- संगीत
- नाना
- व्हायोलिन
- प्रेक्षक
- थिएटर
- बेटा
- आवाज
प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :
- त्यांना
- ते
- मला
- मी
प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.
- पुष्कळ – [ ]
- सुधारणा – [ ]
- सराव – [ ]
- दुःख – [ ]
उत्तर :
- अमाप
- प्रगती
- रियाज
- खेद
प्रश्न 5.
विरूद्धार्थी शब्द लिहा.
- शेवट – [ ]
- आनंद – [ ]
- अधोगती – [ ]
उत्तर :
- सुरुवात
- खेद
- प्रगती
प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
- विदयार्थी
- लोक
- टाळया
- डोळे
प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :
शब्द | सामान्यरूप |
विचारासरशी | विचारा |
शास्त्रासाठी | शास्त्रा |
निंदेकडे | निंदे |
तारांवरून | तारां |
प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
- धडपड करणे
- खेद करणे
- निंदा करणे
उत्तर :
- खूप मेहनत करणे
- दु:ख करणे
- वाईट बोलणे
प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
कृती 4 : स्वमत
प्रश्न 1.
संगीतशास्त्राची प्रेरणा ज्यास मिळते त्याचे भाग्य मुखासमाधानात न्हाऊन निघते, या कश्चनावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
संगीतशास्त्र ही जीवनोपयोगी कला आहे. सूर ताल व लय यांचा मिलाप त्यात आहे. संगीतशास्त्र शिकणे हे कोणाचेही काम नाही. ही शिकण्याची संधी व भाग्य त्यालाच मिळते, ज्यास दैवी ईश्वरीय शक्तीचे वरदान लाभलेले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शान, भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गजांनी संगीतशास्त्रात नाव कमावलेले आहे. त्यांनादेखील संगीतशास्त्राची प्रेरणा त्यांच्या गुरूपासून लाभलेली आहे. त्यांच्या गुरूंची त्यांच्यावर असलेली कृपा हीच त्यांना मिळालेली प्रेरणा होय. त्यामुळेच त्यांचे आयुष्य सुखासमाधानात न्हाऊन निघालेले आहे.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Summary in Marathi
लेखकाचा परिचय :
नाव : वसंत पुरुषोत्तम काळे
कालावधी : 1932-2001
कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, ‘लोंबकळणारी माणसं’, ‘पण माझ्या हातांनी’, ‘पेन सलामत तो’, ‘ब्रम्हदेवाचा काळ’, ‘गुलमोहर’, ‘कर्मचारी’, ‘का रे भुललासी’, ‘ऐक सखे’, ‘वन फॉर द रोड’, ‘मायाबाजार’, ‘स्वर, ‘संवादिनी’, ‘वलय’ इत्यादी कथासंग्रहः ‘ही वाट एकटीची’, ‘पार्टनर’ इत्यादी कादंबरीलेखन प्रसिद्ध, आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यांमुळे त्यांच्या कथा वाचकप्रिय आहेत.
प्रस्तावना :
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ ही कथा लेखक व.पु.काळे यांनी लिहिली आहे. या कथेत संगीत कलेवर जिवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीतसेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन लेखकांनी केले आहे.
‘Beta, mi aikto ahe!’ This story is written by writer V. P. Kale. In this story, we can witness a father who loves music more than his life and a son who struggles for happiness of father who has lost music because of an accident.
शब्दार्थ :
- अपघात – दुर्घटना, (an accident)
- सौख्य – संतोष, सुखासमाधानाची स्थिती (happiness)
- कोलाहल. – गोंगाट, गोंधळ (an uproar, noise)
- स्थिर – स्तब्ध, शांत (stable, steady)
- खात्री – भरवसा (trust, certainty)
- वादन – वाक्य वाजवण्याची कृती सादर – एखाक्यासमोर ठेवणे (to render)
- आस्वाद – (येथे अर्थ) आनंद (relish)
- धीटपणा – साहस (boldness, daring, courage)
- नवखा – नवीन (new)
- प्रतिबिंब – पडछाया (reflection)
- मुसाफिर – प्रवासी (traveller)
- अवसान – हिंमत, धमक (guts, courage)
- श्रोतृवृंद – ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांचा समूह (audience)
- झरझर – घाईघाईने (quickly)
- झगझगीत – चकाकणारे (glittering, sparkling)
- सबंध – संपूर्ण (entire, whole)
- चलबिचल – अस्वस्थता (hesitation)
- तंबोरा – एक तंतुवादय (astring instrument)
- धीरगंभीर – शांतपणे (serious)
- ध्यान – चिंतन, मनन (meditation, attention)
- षड्ज – संगीतातील सप्तस्वरांपैकी पहिला स्वर (सा) (the Ist note of the gamut)
- धीमेपणाने – हळुवारपणे (slowly)
- पंचेद्रिये – ज्ञानप्राप्तीची पाच इंद्रिये (the five sense organs)
- दगा . विश्वासघात (betrayal)
- सुहास्य – चांगले हास्य (a beautiful smile)
- मुख – चेहरा (face)
- वयस्कर – प्रौढ (elderly)
- ग्रह – समजूत, कल्पना (a prejudice)
- प्राथमिक – सुरुवातीचा, प्रारंभिक (elementary, primary)
- प्रथा – रूडी, (general practice, custom)
- नेटाने – जोर लावून, कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक (with tremendous efforts)
- आळीपाळीने – आलटून-पालटून, क्रमबदलून (alternately, by turns)
- आगाऊ – उद्धट (rude)
- आकलन शक्ती – बोधशक्ती (grasping power)
- अत्यानंद – परमानंद, अतिशय आनंद (rapture, great joy and delight)
- सांत्वन – दिलासा (consolation)
- सौम्य – हळूवार, शांत (gentle, soft)
- इभ्रत – पत, लौकिक (prestige)
- आगतिक – असहाय्य, निराधार (helpless)
- भानावर – शुद्धीवर (conscious)
- गवई – गायक, गाणारा (asinger)
- जबर – मोठे (huge)
- बहिरे – ज्याला ऐकू येत नाही असा (deaf)
- गैरसोय – अडचण (inconvenience)
- अंतरणे – गमावणे, मुकणे (to lose)
- उयुक्त – प्रेरित, तयार, सज्ज, प्रोत्साहित (ready)
- धडपड – खटपट,खटाटोप, (struggle)
- अमाप – खूप, पुष्कळ (a lot of, immeasurable)
- वारंवार – पुन्हा पुन्हा, सतत (again, repeatedly)
- खेद – दुःख, शोक (regret, remorse)
- कौशल्य – कुशलता, कसब (skill)
- मोकळेपणा – विनासंकोच वागणूक (freely, without any hesitation)
- ध्यास उत्कट इच्छा, (yearning. longing)
- भास – समज, कल्पना, ग्रह, भ्रम (illusion, impression)
- तान – सूर (tune)
- ठेका – एक मंद गतीचा ताल (rhythm)
टिपा :
1. फिड्लवादय – एक प्रकारचे तंतुवादच जे व्हायोलिन या नावानेही ओळखले जाते.
2. फूटलाईट – रंगमंच आणि कलाकारांना प्रकाशित करणारा, रंगभूमीच्या पुढे असलेला प्रकाश.
वाक्प्रचार :
- कोलाहल बंद पडणे – शांतता पसरणे
- आस्वाद घेणे _ – आनंद घेणे
- कौतुक करणे – प्रशंसा करणे
- नाव खराब करणे – वाईट कृत्य करणे
- प्रतिबिंबित होणे – स्पष्ट दिसणे, पडछाया उमटणे
- अवसान न राहणे – हिम्मत हारणे
- धीर सुटणे – हार मानणे
- खूण करणे – इशारा करणे
- चलबिचल होणे – अस्वस्थ होणे
- कानावर विश्वास न बसणे – एखादी गोष्ट सत्य न वाटणे
- शंका चाटून जाणे – संशय निर्माण करणे
- प्रथा असणे – रीत असणे
- जिवाचे कान करणे – एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे
- दम भरणे – रागावणे
- आश्चर्यचकित होणे – नवल वाटणे
- भानावर येणे – शुद्धीवर येणे
- उदयुक्त करणे – प्रेरित करणे, प्रोत्साहन देणे, एखादी गोष्ट करण्यासाठी तयार करणे.
- सराव करणे – अभ्यास करणे
- ध्यास लागणे – इच्छा होणे, व्यसन लागणे
- भास होणे – प्रतीत होणे, जाणवणे
Navneet Marathi Digest Std 9th Pdf Download भाग-१