Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण शब्दसिद्धी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest व्याकरण शब्दसिद्धी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण शब्दसिद्धी

11th Marathi Guide व्याकरण शब्दसिद्धी Textbook Questions and Answers

शब्दसिद्धी

भाषा व्यवहारामध्ये म्हणजेच लिहिताना वा बोलताना आपण नानाविध शब्दांचा वापर करतो. आपल्या भाषिक व्यवहारातील सर्वच शब्द आपल्या मूळ मराठी भाषेतील असतीलच असे नाही. बऱ्याचदा मूळ भाषेतील शब्दांपासून आपण नवनवीन शब्द बनतो. केव्हा केव्हा इतर भाषेतील शब्दांचाही स्वाभाविकपणे आपण वापर करतो. बऱ्याचदा तो शब्द दुसऱ्या भाषेतील आहे हेही आपल्या लक्षात येत नाही.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण शब्दसिद्धी

इतर भाषेतीलही काही शब्द मराठीत असे रुळले आहेत की त्यांचे वेगळेपणही बऱ्याचदा लक्षात न घेता तो आपल्याच भाषेतील शब्द आहे या पद्धतीने आपण त्याचा वापर करत असतो. यासाठीच आपल्या भाषेतील मूळ शब्द कोणते? आपल्या भाषेत रुळलेले कोणते शब्द आपण इतर भाषांमधून जसेच्या तसे घेतले आहेत वा कोणत्या शब्द रूपात कसा बदल केला आहे हे समजून घेणे भाषेच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे आहे.

भाषेतील शब्द कसा बनतो वा सिद्ध होतो या प्रक्रियेलाच शब्दसिद्धी असे म्हणतात.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण शब्दसिद्धी 1

काही उपसर्गघटित शब्द :

उपसर्ग व त्याचा अर्थ  उपसर्गघटित साधित शब्दांची उदाहरणे
अति (= फार / पलीकडे)  अतिशय, अतिरेक, अतिक्रम, अतिलोभी, अतिसार इ.
आ (= पासून / पर्यंत / पलीकडे)  आजन्म, आमरण, आक्रमण, आक्रोश इ. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण शब्दसिद्धी
सु (= चांगले / सोपे)  सुग्रास, सुभाषित, सुकर, सुगम, सुशिक्षित इ.
अव (= हीन / कमी)  अवघड, अवजड, अवकळा, अवदसा, अवलक्षण इ.
दर (= प्रत्येक)  दररोज, दरसाल, दरमहा, दरमजल, दरशेकडा इ.
आड (= लहान / गौण)  आडनाव, आडवाट, आडकाठी, आडवळण, आडदांड इ.
दुर्, दुस् (= वाईट / दुष्ट)  दुर्गुण, दुर्दशा, दुर्जन, दुर्लभ, दुराचरण, दुर्लक्ष इ.
प्रति (= उलट / फिरून)  प्रतिकार, प्रतिबिंब, प्रतिदिन, प्रतिकूल, प्रत्येक इ.
वि (= विशेष / शिवाय)  विख्यात, विज्ञान, विधवा, विसंगती, विपत्ती इ.
भर (= मुख्य / पूर्ण)  भरधाव, भरजरी, भरदिवसा, भरचौकात, भरलोकात, भरपेट इ.
अनु (= मागून / सारखे)  अनुकरण, अनुक्रम, अनुभव, अनुवाद, अनुमती इ.
उत् (= श्रेष्ठ / उंच)  उत्कर्ष, उन्नती, उत्तीर्ण, उत्तम, उत्प्रेक्षा इ.
अभि (= पूर्वी/ जवळ)  अभिनय, अभिनंदन, अभिरुची, अभिप्राय, अभिमुख इ.
गैर (= वाचून / विना)  गैरहजर, गैरशिस्त, गैरसमज, गैरसोय, गैरहिशोबी इ.
सर (= मुख्य)  सरकार, सरपंच, सरहद्द, सरदार, सरनौबत इ.
बे (= वाचून / शिवाय / रहित)  बेडर, बेअब्रू, बेदम, बेईमान, बेइज्जत, बेशरम, इ.
ना (= अभाव)  नाउमेद, नाराज, नापसंत, नालायक, नाकबूल इ.
प्र (= अधिक / पुढे)  प्रताप, प्रबल, प्रगती, प्रवाह, प्रदोष, प्रस्थान, प्रसिद्ध इ.
बद (= वाईट)  बदनाम, बदसूर, बदफैली, बदलौकिक इ.
हर (= प्रत्येक)  हररोज, हरघडी, हरदम, हरकाम, Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण शब्दसिद्धी

काही प्रत्ययघटित शब्द

1. कृदन्ते / धातुसाधिते : धातूस कृतप्रलय लागून तयार होणारे नवीन शब्द.

प्रत्यय  धातुसाधित शब्द (उदाहरणे)
अक  लेखक, पाचक, रक्षक, भक्षक, गायक, वाहक इ.
अनीय  श्रवणीय, मननीय, रमणीय, वंदनीय, पूजनीय इ.
आई  खोदाई, चराई, उजळाई, शिलाई, अंगाई इ.
रा  लाजरा, बुजरा, हसरा, कापरा, दुखरा इ.
ऊन  करून, देऊन, बसून, हसून इ.
अना  प्रार्थना, वेदना, कल्पना, तुलना, वंदना इ.
 धरण, जळण, तळण, चढण, भांडण, लोळण इ.
तव्य  कर्तव्य, तालव्य, भवितव्य इ. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण शब्दसिद्धी
आळू  झोपाळू, लाजाळू, कनवाळू, विसराळू इ.
णावळ  खाणावळ, जेवणावळ, धुणावळ, लिहिणावळ इ.

2. तद्धिते / शब्दसाधितेः धातूखेरीज अन्यशब्दांना प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द

प्रत्यय  शब्द साधिते (उदाहरणे)
इक  कायिक, वाचिक, मानसिक, धार्मिक, लौकिक इ.
कर  सुखकर, खेळकर, खोडकर, दिनकर, प्रभाकर इ.
की  माणुसकी, भावकी, गावकी, शेतकी, उनाडकी इ.
खोर  भांडखोर, चिडखोर, चहाडखोर, चेष्टेखोर, मस्तीखोर इ.
दार  दुकानदार, फौजदार, जमिनदार, इमानदार, धारदार, डौलदार इ.
कट  तेलकट, मातकट, धुरकट, मळकट, पोरकट इ.
गर, गार  सौदागर, जादूगार, गुन्हेगार, माहितगार, कामगार इ.
खाना  कारखाना, तोफखाना, दवाखाना, हत्तीखाना, दारूखाना इ.
नामा  करारनामा, हुकूमनामा, पंचनामा, जाहीरनामा इ.
आई  लढाई, नवलाई, दांडगाई, शिष्टाई, खोदाई. इ. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण शब्दसिद्धी

Leave a Comment