Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions

Maharashtra State Board Class 12th Marathi Sample Paper Set 2 with Solutions Answers Pdf Download.

Maharashtra Board Class 12 Marathi Model Paper Set 2 with Solutions

विभाग १ : गद्य

प्रश्न १.
(अ) पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास – लेह, नुब्राव्हॅली, पँगाँग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल ! आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. कारगिल आणि द्रास ! सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानझिन पाच वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या.

सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे १९९९ साली इथे काय उत्पात घडला असेल, ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. निःशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ‘ऑपरेशन विजय ‘ज्या स्मारकापर्यंत पोहोचलो.

समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली, की दिसणारा रौकीनॉब, हंप, इंडिया गेट, थ्री पिंपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट ४८७५ – भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच १६००० फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना या भयाण पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते.

मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीसतेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती! ज्यांना आशीर्वाद दयायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, ह्याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.

(१) (i) लेखिकेच्या सात दिवसाच्या प्रवासातील महत्त्वाची ठिकाणे
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 1
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 6

(ii) तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक.
उत्तर:
ऑपरेशन विजय

(२) ऑपरेशन विजय स्मारकाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:

  1. दातदुखीच्या काळात लेखकाची सहनशक्ती खलास झालेली असते.
  2. लेखकाच्या दातदुखीमुळे होणारे विव्हळण्याने त्याच्याभोवती रोजारपाजार गोळा होतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions

(३)
स्वमत अभिव्यक्ती-
थरथरत्या हातांनी व डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन
विजयच्या ‘ स्मारकाला सलाम केला. कारण स्पष्ट करा.
किंवा
‘ऑपरेशन विजय स्मारक ‘पाहून लेखिकेच्या मनातील सैनिकाविषयीच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
तोलोलिंग, इंडिया गेट, टायगरहिल आणि त्याबाजूलाच पॉईट ४८७५ हे भारतीय जवानांनी काबीज केलेली शिखरांची रांग इथेच शत्रू पहाडावरून तोफाच्या आग ओकत असतानाही भयाण पर्वतावर म्हणजेच १६००० फूट उंचीच्या बर्फाच्छादित शिखरावर चढून भारतीय जवान शत्रूशी लढत होते. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्युलाच आव्हान देणारी ही बावीस वीस वर्षांचे जवान म्हणजेच तेजोमय स्फुल्लिंग होती. लेखीकेच्या दृष्टीने खरे तर त्यांना आशीर्वाद दयायचे परंतु त्यांच्या वीरश्रीच प्रतीक म्हणून जे ‘ऑपरेशन विजय स्मारक’ बांधले आहे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन थरथरत्या हातांनी व डबडबलेल्या डोळ्यांनी सलाम केला.

किंवा

इ. स. २००४ मध्ये पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला १९९९ मधील कारगील युद्ध आपल्यापर्यन्त पोहोचले नसल्याची खंत वाटते त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील पाच वर्षे त्या भूमीवर जाऊन सर्व वीरांना सलामी देण्याची शपथ घेऊन त्यांच्या शपथपूर्तीच्या वाटेवरील प्रवास आणि या प्रवासातील त्यांचे अनुभव लेखिकेने या पाठामध्ये रेखाटले आहेत.

तोलोलिंगच्या पायथ्याशी ऑपरेशन विजय स्मारकाशी लेखिका पोहोचली तेव्हा समोरच तोलोलिंग, रॉकीनॉब, इंडिया गेट, थ्री पिपल, टायगर हिलचा सुळका आणि त्या बाजूलाच असलेला पॉईंट ४८७५ पाहिल्यानंतर भारतीय जवानांनी हिच काबीज केलेली शिखरांची रांग दिसली. याच मातीतून धूळ अंगावर घेत घेत १६००० फूट उंची असलेल्या बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना भयाण अशा पर्वतावर धैर्यधर अथक चढत राहिले होते.

अगदी मृत्यू समोर दिसत असताना मृत्यूच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस तेवीस वर्षाची ती तेजोमय स्फूल्लिंग होती. ज्यांना आशीर्वाद दयायचे त्यांच्याचसमोर नतमस्तक होऊन सलामी देणेही लेखिकेला कष्टप्रद वाटत होते. कारण ऐन तारुण्यातच या तरुणांनी देशासाठी प्राण अर्पण केले होते. अशाप्रकारे ‘ऑपरेशन विजय स्मारक’ पाहून लेखिकेच्या मनात सैनिकांविषयी भावना जागृत झाल्या होत्या.

(आ) पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती फार खलास झालेली असते. दाते किंवा दातार ह्या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते!

माझ्या दातदुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे, की माझ्या विव्हळण्याने शेजारीपाजारी गोळा होतात आणि माझ्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी, ती का होते, टाळावी कशी आणि झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर एकदातारी परिसंवाद होतोच. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. हीच मंडळी मोठ्याने बोलतात, की माझे विव्हळणे त्यात बुडून जाते. माझा अनुभव असा, की दातदुखीवरील चर्चेने दातदुखी मुळीच कमी होत नाही! दातदुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत.

माझा दात दुखू लागला, की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले काही उपचार करते. अशी मिळून २० – २५ प्रकारची औषधे, बोळे माझ्या दातामागे लागतात. चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो दातामागे लागतात. चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो. कशामुळे थांबला याचा शोध करायच्या मी भानगडीत पडत नाही. दात दुखणे थांबल्याचे कळल्याबरोबर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही याची खात्री करून घेण्यासाठी येतात.

मी कुणाचेही मन दुखवत नाही. प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन मोकळा होतो. सगळे खूश होतात. दंतआघाडीवर सर्वत्र सामसूम होते. एखाद दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार यांचा पुन्हा प्रयोग होतो.

या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला. अनेकांचा सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्यांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैदय गाठला. का कुणास ठाऊक; पण माझी अशी समजूत झाली, की ज्याचे दात चांगले असतील असाच दंतवैदय शोधणे बरे. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आला नव्हता.

आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर वाटले. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्याबाबत आमचे मतैक्य झाल्यावर पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे दयावे लागतात याचे वाईट वाटले; पण मग माझी मीच समजूत घातली याचे वाईट वाटले की आपण डोक्याचे केस मुळासकट काढत नाही तरी पैसे देतो, मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले ?

(१)
(i) ‘दाताशी जवळीक दाखवणारी माणस
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 2
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 7

(ii) परिसंवादातील विषय
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 3
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 8

(२) लेखकाच्या दातदुखीची वैशिष्ट्ये लिहा.

(i) …………
(ii) …………
उत्तर:
लेखकाच्या दातदुखीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगला येतील.
(i) दातदुखीच्या काळात लेखकाची सहनशक्ती खलास झालेली असते.
(ii) लेखकाच्या दातदुखीमुळे होणारे विव्हळण्याने त्याच्याभोवती रोजार-पाजार गोळा होतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions

(३) स्वमत अभिव्यक्ती-
‘दातदुखीवरील परिसंवाद’ याविषयी लेखकाचा अनुभव तुमच्या भाषेत लिहा.
किंवा
लेखकाचा दात काढून टाकण्याचा विचार तुमच्या भाषेत लिहा.
उत्तर:
सुप्रसिद्ध लेखक, नाटककार वसंत सबनीस लिखित ‘ दंतकथा’ हा विनोदी ललितलेख असून तो सबनीशी या ललितलेखसंग्रहातून घेतला आहे. दंतकथा म्हणजे कल्पित कथा किंवा दाताशी संबंधित अशी कथा असून दाताचे दुखणे फारच त्रासदायक असते. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन दातदुखी विषयीचे अनुभव वा प्रसंग लेखकानी नर्मविनोदी शैलीत टिपले आहेत.

दातदुखीमुळे लेखक जसजसे विव्हळू होऊ लागतात तसतसे शेजारीपाजारी गोळा होतात. आणि लेखकाच्याच दाताच्या अध्यक्षतेखाली.

दातदुखी का होते ?
ती कशी टाळावी? आणि

झालीच तर त्यावर कोणते उपचार करावेत ? याविषयी परिसंवाद होतो. उपस्थित वक्तेही मोठ्या आनंदाने, उत्साहाने त्यात भाग घेतात. मोठमोठ्याने चर्चा करतात. या गोंधळात लेखकाचे विव्हळणे बुडून जाते. शिवाय या चर्चेमुळे लेखकाची दातदुखी थांबत नाही. हा लेखकाचा अनुभव असून दातदुखीवरील अनेक असे उपचार लेखकचे पाठ असून त्यातले काही उपचार लेखकाच्या पत्नीनेही केलेले आहेत. त्यापैकी २० – २५ प्रकारची औषधे, बोळे लेखकाच्चा दातामागे लागतात आणि चार दिवसांनी दाती दुखायचा थांबतो.

तो कशामुळे थांबला याचा शोध लेखक घेत नसले तरी लेखकाचे दातदुखणे थांबले आहे हे कळताच परिसंवादातील प्रत्येक वक्त्याला आपण सांगितलेल्या उपचारामुळे दातदुखी थांबली असावी याची ते खात्री करून घ्यायला येतात आणि लेखकही कोणाचे मन न दुखावता आपल्याच तीचाराने दातदुखी थांबल्याची कबुली देतात. त्यामुळे परिसंवादातील सर्व वक्ते खूश होतात. अशाप्रकारे दातदुखी वरील परिसंवादाचा अनुभव लेखकास येतो.

किंवा

दंतकथा हा एक विनोदी ललितलेख असून या ललितलेखाचे लेखक वसंत सबनीस आहेत. मानवी जीवनात कधीना कधी दातदुखीसारखा वेदनादायी प्रसंग हा उद्भवल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला हा जीवघेणा त्रास सहन करावा लागतोच. मात्र दातदुखीसारखा गंभीर विषय असला तरी त्या अनुभवाकडे लेखक विनोदी शैलीतून पाहतात व त्या अनुभवाचा प्रत्ययही विनोदी शैलीतूनच लेखक आपणास देतात.

लेखकाच्या दातदुखीमुळे शेजारचे सर्वजन गोळा होतात. लेखकाच्याच दाताच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेतात. परिसंवादात मोठमोठ्याने चर्चा होते. या दातदुखीच्या चर्चेमध्ये दातदुखीची कारणे शोधली जातात व त्यावरील उपचारासंबंधी चर्चा करून काही उपचार लेखकास सांगतात. अनेक उपचारानंतर लेखकाची दातदुखी थांबते. ही दातदुखी थांबल्याचे परिसंवादातील भाग घेतलेल्या मंडळींना समजतय ते आपण सांगितलेल्या उपचारांनी दातदुखी थांबली का याची खात्री करण्यासाठी लेखकाकडे येतात आणि लेखकही प्रत्येकाला त्यांच्याच उपचारांनी दातदुखी थांबल्याचे सांगून त्यांनाही खूश करतात.

शांततेमध्ये एखादा महिना जातो आणि पुन्हा दातदुखीला सुरुवात होते. या सर्व गोष्टीला कंटाळून शेवटी लेखक दात काढून टाकण्याचा निर्धार करतात व अनेकांचा सल्ला घेऊन अनेक दंतवैद्याचे चेहरे पाहून त्यातल्यात्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला मात्र लेखकाने ज्या दंतवैद्याचे दात शाबूत असतील अशाच दंतवैद्याला दात काढण्यासाठी निवडले याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाच संबंध नव्हता.

दंतवैद्याला भेटून लेखकने आपली दंतकथा सांगितली आणि लेखकाने दात काढून टाकण्याचा केलेला विचार दंतवैद्याला आवडला दोघांचेही मतैक्य झाले. मात्र दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे लेखकास वाईट वाटते परंतु डोक्याचे केस मुळासकट काढत नसला तरी त्यास आपण पैसे देतो मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले अशी स्वतःची समजूत करून घेतली. अशाप्रकारे लेखकाने दात काढून टाकण्याचा विचार केला.

(इ) दिलेल्या उताऱ्याच्या आधारे प्रश्नाची उत्तरे लिहा. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदा., कुस्ती खेळण्यासाठी अखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळित झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय ? मी तर नेहमी असे म्हणत असतो, की मी जे करीन ते होईल.

अर्थात, मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील; परंतु ही प्रौढी अगर घमंड नसून आत्मविश्वासमुळेच मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबांतील गरीब विदयार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही.

मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हांस आजच्या साधन-: न-सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल ? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी उपजू शकत नाही.

मी विदयार्थिदशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्षे लागतात तो अभ्यास मी २ वर्षे ३ महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी २४ तासांपैकी सारखा १८ तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.

(१)
(i) व्यक्तीच्या दीर्घोद्योगाचा परिणाम
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 4
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 9

(ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तित्व गुण
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 5
उत्तर:
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 10

(२) व्यक्तीच्या जीवनातील ‘आत्मविश्वासाचे’ स्थान स्पष्ट करा.
उत्तर:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित नमुना गद्य आकलन- ‘आत्मविश्वासो रखी शक्ती नाही’ या पाठात आत्मविश्वासाचे महत्त्व सांगितले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो मात्र काहींना ते समजतच नाही आणि म्हणूनचते आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीला यश नाही आले तर ते आपल्या नशिबाला दोष देतात. त्यासाठी त्यांनी आपला आत्मविश्वास न गमावता सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. जीवनामध्ये कोणतीच व्यक्ती जन्मतः बुद्धिमान वा पराक्रमी नसते कारण या दोनही गोष्टी प्रयत्नानेच साध्य कराव्या लागतात.

मात्र त्यासाठी आळस झटकून प्रत्येकाने दीर्घोद्योगी बनले पाहिजे कारण दीर्घोद्योग हा माणसाला बुद्धिवान व पराक्रमी बनवत असतो आणि म्हणूनच ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो त्या व्यक्तीला सर्व गोष्टी सहज शक्य होतात. जो सतत प्रयत्नशील असतो, स्वतःतील आत्मविश्वासावर विश्वास असतो तो प्रत्येक गोष्ट साध्य करतो किंबहुना प्रत्येक गोष्टीत त्याला यश प्राप्त होते. उदा. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी केलेली आनंदवनाची निर्मिती आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास अनन्य साधारण महत्त्व आहे. हे महत्त्व स्वतःचा आत्मविश्वास गमावून कमी करू नये, तर तो चिरंतन टिकवल्यास त्यावरच माणसाचे यश अवलंबून असते. अशाप्रकारे व्यक्तिजीवनात आत्मविश्वासाला स्थान असते.

विभाग २: पद्य

प्रश्न २.

(अ) पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय मांझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतापरी;
हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
सांगती ‘तात्पर्य ‘ माझें सारख्या खोट्या दिशा;
“चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !”
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

(१) पुढील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा.

(i) सर्वामध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो.
उत्तर:
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ।
गुंतुनी गुंत्यातं साऱ्या पाय माझा मोकळा ।

(ii) हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटते
उत्तर:
राहती माझ्यासवे ही आसवें गीतांपरी,
हे कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा !

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions

(२) योग्य पर्याय निवडून निवडून विधान पूर्ण-

(अ) कवीची सदैव सोबत करणारी, म्हणजे..
(i) सूर्य
(ii) आसवे
(iii) दु:ख
(iv) त्रास
उत्तर:
(ii) आसवे

(ब) कवीचा विश्वासघात करणारे, म्हणजे….
(i) आयुष्य
(ii) तात्पर्य
(iii) लळा
(iv) प्रेम
उत्तर:
(i) आयुष्य

(३) अभिव्यक्ती-
‘समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:
कविवर्य गझलकार सुरेशभट लिखित ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये समाजामध्ये स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करत असताना जे अनुभव आले ते अनुभव व्यक्त केले आहेत. समाजाचा घटक म्हणून समाजातच वावरत असताना आपले आयुष्य जगत असता आपले वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उदा. सुरेश भट हे पत्रकार, संपादक म्हणून कार्यरत असतानाच ते एक उत्तम कवी होते. त्यांनी मराठी साहित्य दालनात ‘गझल’ हा काव्यप्रकार पुनर्जिवित करून तो लोकप्रिय केला. त्यांनी अन्यायाखाली भरडला जाणारा समाज, सुख सुविधांपासून वंचित असलेला समाज आणि सुखसुविधांपासून दूर असलेला समाज याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यांना न्याय देण्यासाठी आपला संघर्ष चालू ठेवला.

तसेच ‘मी’ ची मानहानी करणारे, माणसांची दुटप्पी वृत्ती, स्वार्थी- ढोंगीपणा, समाजातील मूल्यहीनता त्यांनी आपल्या साहित्यातून प्रकट केली. या प्रश्नांशी अंतर्मुख होऊन अशा समाजाविरुद्ध आवाज उठविला. मात्र समाजातील स्वार्थी लोकांनी कवीबद्दल ‘सार’ सांगताना, तात्पर्य सांगताना दिशाभूल केली आहे. असे असताना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या कवीचा स्वत:च्या कर्तृत्वावर अढळ विश्वास असल्यानेच अशा नैराश्य अंध:काराने ज्यांचे आयुष्य व्यापलेले आहे. त्यांच्यासाठी आपण मध्यरात्रीचा सूर्य बनून उभे आहोत हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सामर्थ्य, आत्मविश्वास विविध प्रतिमांतून व्यक्त होताना दिसून येते. पुढे त्यांच्या आयुष्यातील काळरात्र घालवून प्रकाश निर्माण करण्यासाठी अखंडितपणे आपण संघर्ष करणार असल्याचेही कवी स्पष्ट करतात. अशाप्रकारे स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रत्यत्न करावेच लागतात. या विधानाचा अर्थ सांगता येईल.

(आ) ‘रडू नकोस खुळे, उठ !
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रयत्न फुले’
या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.
उत्तर:
सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे यांनी या कवितेत स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्री ने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना असून सहज आरशात पाहताना कवितेतील नायिकेच्या गावकाळाच्या स्मृती जागृत होऊन संवाद सुरू होतो तो अंतर्मनाचा प्रत्यक्ष मनाशी आणि अंतर्बाह्य झालेला बदल दिसतो. चैतन्यमयी, अल्लड, बालपण, तेजस्वी तारुण्यामधली स्वप्ने, ध्येय कुठल्याकुठे गायब होतात. परंतु गतआयुष्याबद्दल आरशात पाहणाऱ्या स्त्रीला काहीच वाटत नाही, ती मागे वळून पाहते ते स्थितप्रज्ञाच्या भूमिकेतून. मात्र तिला इथे प्रश्न पडतो की आपल्यात ही स्थितप्रज्ञा आली कुठून ?

बालपणी छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद कुठेतरी हरवल्याची तिला जाणीव होते. आरशातील स्त्री या व्यथांबद्दल भावना व्यक्त करत नसली तरी आरशाबाहेरील स्त्रीला म्हणजेच तिच्या प्रतिमेला आरशातील स्त्रीची भावना अस्वस्थ करते. तिच्या मनाची चलबिचल स्थिती पाहून तिचे अंतर्मन आरशातील स्त्रीला सावरते, जवळ घेते आणि तितकेच अधिकारवाणीने ती तिला तिच्यातील नवचैतन्याची जिद्दीची, आत्मविश्वासाची जाणीव करून देते. ती डोळ्यातील आसवे तिला शेजारच्या तळ्यात सोडून देण्यास सांगते आणि याच तळ्यात उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले घेऊन येण्यास सांगते.

डोळ्यातील आसवे हे निराशेचे प्रतीक असून ही मनातील निराशा दूर फेकून देवून भवतालच्या अवकाशातून नवचैतन्य घेऊन पुन्हा एकदा आत्मविश्वासाने, जिद्दीने, सामर्थ्याने या सर्वांवर मात करावी हे नवउमेदीचे भान आरशाबाहेरील स्त्रीमध्ये म्हणजेच कवितेतील नायिकेमध्ये ‘आरशातील स्त्री’ (नायिकेचे अंतर्मन जागृत करते. तिला उमेदीने जगण्यासाठी प्रेरित करते.

संवादात्मक शैलीतून कवयित्रीने केलेला हा भावनाविष्कार समाजव्यवस्थेतील स्त्रीच्या स्थानाविषयीची अनुभूती घडवतो. संसारामुळे गांजून गेलेली स्त्री ही स्वतःच्या मनाचा, इच्छेचा, स्वप्नांचा, ध्येयाचा कसा कोंडमारा करून घेते म्हणजेच तिला जर मानसिक व शारीरिक आधार मिळताच ती आपल्या मरगळलेल्या मनाची कात टाकून पुन्हा नवचैतन्याचे प्रेरित होऊन पुन्हा जिद्दीने कशी उभी राहते याची अनुभूती येते. डोळ्यातले आसू. शेजारचे तळे, कमळाची फुले अशा शब्दप्रयोगामुळे आशयालाही गतिमानता प्राप्त होते. संवादातील तरलता अधिक प्रभावी व गहिरी होत जाते आणि स्त्री. जाणीवेच्या मनातील विविध पैलू उलगडून स्त्री मनाशी एकरूप होतात. हेच कवितेचे आणि कवयित्रीचे यश म्हणावे लागेल.

(इ) ‘सरी वाफ्यात कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला हिरवं गोंदते
बाई नांदते
रोज मातीत मी ग नांदते
बाई नांदते’
या कवितेतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.

किंवा

‘समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील
मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय,
बसच चाकं
– या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
उत्तर:
‘सरी वाक्यात कांदं लावते
…….बाई नांदते.
‘रोज मातीत’ या कवितेच्या कवयित्री कल्पना दुधाळ असून ‘सीझर करं म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे. भारतीय कृषी समृद्धीतील कष्टकरी स्त्रीचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हा विचार येथे व्यक्त केला आहे.

प्रस्तुत ओळींचा वाच्यार्थाच्या दृष्टीने विचार करता ‘शेतीची मशागत करून सरी- वाफ्यात कांदे लावते आहे मात्र कष्टकरी स्त्री ही कांदे लावण्याचे काम करत नसून कांद्याच्या रोपाच्या रूपात जणू काही स्वत:चा जीवच लावते आहे. जमिनीला जीवापाड जपते तेव्हा कुठे ती जमीन हिरव्या रोपांनी सजते आहे. जमिनीत लावलेल्या रोपांची हिरवी पान पाहून आपण सरी वाफ्यात लावलेली रोपे म्हणजेच काळ्या आईला गोंदतो आहे असे वाटते. या गोंदणाच्या रूपात तिला तिच्या भाळावरील गोंदणाची आठवण येते आहे आणि शेतातही गोंदणासारखी सर्वत्र नक्षी दिसते आहे.

येथे कवयित्रीच्या मनातील भावनांचा संवेदनशील आविष्कार होताना दिसतो. तिला त्या कष्टकरी महिलेचे आत्मसमर्पण दिसत असून ती जीव लावते म्हणजेच तहान भूक विसरून, उन्हातान्हात ती स्वत:ला विसरते. कष्ट करत आहे ते केवळ संपूर्ण शेतकरी कुटुंबाला अर्थप्राप्ती व्हावी, सुख-समृद्धी लाभावी यासाठी. त्यामुळेच ‘गोंदण’ ही प्रतिमा संवेदनशील कल्पनेच्या मुळाशी आपणास घेऊन जाते. जमीन, गोंदण, सरी, वाफा, जीव, माती अशी प्रतिमाने प्रतीके योजून आशयही आपणास वैचारिक पातळीवर घेऊन जातो. अशाप्रकारे ही कष्टकरी शेतकरी महिला शेतीशी इमानप्रमाण राखत नांदते आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सुख-समाधान देते आहे. संसारालाही हातभार लावते आहे.

किंवा

समुद्र कोंडून पडलाय ……
……. बसची चाकं

सुप्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके लिखित ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेतील पद्यपंक्ती असून ‘शुभवर्तमान’ या त्यांच्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे ही कविता चित्रकविता म्हणून प्रसिद्ध असून ती ‘मुक्तछंद’ या काव्यप्रकारात लिहिली आहे. महानगर अथवा शहरीवस्तीतील धावते जीवन आणि त्याची एकूणच धावती दैनंदिन जीवनशैली, तेथील समाजव्यवस्था, व त्या समाजव्यवस्थेत आपले मूळ बळकट करणारे अविश्वास, दहशत, दुरावा, असुरक्षितता, भीती, या समाजविघातक गोष्टींचा मानवी मनावर होणारा परिणाम याचे वास्तव चित्रण येथे पाहावयास मिळते.

महानगरातील राहणीमान दिवसेंदिवस कठीण होत असून तेथील बेसुमार वाढती लोकसंख्या, राहण्यासाठी जागेचा अभाव त्यामुळे उंचच उंच गगनचुंबी इमारतींचे वाढते प्रमाण हे महानगराच्या, शहराच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरतेय. अशा या महानगरीत समुद्रासारखे अथांग जीवन लहान मुलांच्या रूपात दिसून येते. अशा या गतिमान समाजव्यवस्थेचे दुष्परिणाम लहान मुलांवर होताना दिसतात.

अथांग जीवनाचे प्रतीक असा हा समुद्र गगनचुंबी इमारतींच्या गजाआड कोंडून पडला कारण वाढती दहशत असुरक्षितता, भीती त्यामुळे तेथील लहान मुलांना स्वातंत्र्य असे मिळत नाही. खेळण्याचेही त्यांना स्वातंत्र्य नाही. बाग नाही, जागा नाही, अंगनही नाही, त्यामुळे केविलवाण्या आक्रसल्या स्थितीत आपले बालपण व्यतीत करणाऱ्या या लहानमुलांकडे पाहून त्यांच्या मनोविश्वाचा आणि गतिमान समाजव्यवस्थेचा विचार करून बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे पाहिले असता या अथांग जीवनाला अतिशय त्रासल्यासारखे वाटते. महानगरीतल्या या बालविश्वाचा विचार करून त्याचा चेहरा त्रासला आहे. दाढी अन् केस प्रमाणापेक्षा जास्त वाढून त्याच्या झिंज्या झाल्या आहेत. तरीही तो हताशपणे बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे पाहतो तेव्हा त्याच्या मनात येते की या मुलाचे बालपनही इमारतीसारखे उंचच उंच वाढत आहे.

तसेच त्याचा विकास होण्याच्या कक्षाही अरुंद होत आहेत. त्याच्या या विकासात्मक कक्षा समाजव्यवस्था हिरावून घेत आहे. हे त्याला तरी कसे समजणार शिवाय याची कल्पनाही त्याला नसणार या विचाराने तो थकून, शिणून जातो आणि नजर वळवतो तेव्हा त्याला इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर दिसतात थकलेल्या माणसाचे पाय आणि बसची चाकं. माणसाचे पाय आणि बसची चाकं ही महानगरातील मानवी जीवनाच्या गतीमानतेचे प्रतीक असून ते या रस्त्यावरून माणसांची ने-आण करत आहेत. शिवाय दिवसभर काम करून संध्याकाळी थकले भागलेले पाय परत घराकडे जाताना या रस्त्यावर दिसत आहेत.

रस्ता न थांबणारा, न संपणारा, बसची चाके सतत धावणारी, माणसांचे पायही न थकता चालणारी असे रस्त्यावरच्या दृश्याचे समर्पक चित्रण केले आहे. ‘चाक’ ही निर्जीव, असंवेदनशील तरीही जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. थोडक्यात ही कविता अबोध व्याकुळतेचा सूर आळवणारी, साधी-सोपी, चिंतनात्मक ही तीची वैशिष्ट्ये असून ती समुद्राच्या वेदनेशी नाते जोडते, बेसुमार लोकसंख्येने अस्ताव्यस्त वाढत जाणाऱ्या शहरातील दहशत, जीवनातील अस्थिरता, मानवी दु:ख, पराधीनता, असुरक्षितता, भीती, अविश्वास, दुरावा आणि असंवेदनशीलतेबद्दल भाष्य केले आहे.

तसेच बालमनाबद्दलही अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारी ही कविता वास्तवतेचे मनोज्ञ दर्शन घडविते गगणचुंबी इमारत, बत्तिसावा मजला, अथांग समुद्र, आभाळ, बसची चाकं ही या महानगरीचे वास्तव रूप प्रकट करणाऱ्या प्रतिभा असून ‘चेतनगुणोक्ती’ या काव्यालंकाराचा, समर्पक विशेषणांचा आणि सूचक शब्दयोजनांचा पत्ययकारी वापर केला आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions

विभाग ३ : साहित्यप्रकार-कथा

प्रश्न ३.

(अ) दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या.

कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वाचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत ! अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. थोडक्यात सांगायचे तर…. कथा म्हणजे…..

‘एका विशिष्ट स्थळकाळी पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा’.

अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखादया कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखादया कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. थोडक्यात, कथा म्हणजे केवळ प्रसंगांचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वाचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय.

(१)
(i) कथा लिहिली जाते कारण
(ii) कथा म्हणजे
उत्तर:
चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यन्त
(i) एखादा विचार, भावना, पोहोचविण्यासाठी वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन कथा लिहिली जाते.
(ii) कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण.

(२) कथेचे स्वरूप तुमच्या भाषेत लिहा.
उत्तर:
म्हणजे सांगणे, निवेदन करणे. ‘क‘ या मूळ धातूपासून ‘कथा’ हा शब्द रूढ झाला आहे. भारतात ‘कथा’ या साहित्यप्रकाराला मोठी परंपरा असून सुरुवातीला कथेतून एखादी शिकवण, बोध दिला जात असे मात्र नंतर मनोरंजनासाठी वा एखादा विचार, भावना, घटना वाचकांपर्यन्त पोहोचविण्यासाठी कथा लिहिली जाऊ लागली. अशाप्रकारच्या कथेत कथानक, घटना, पात्रे असतात. तसेच स्थळ-काळ-वेळ यांचा उल्लेख असतो. कथाविषयानुसार वातावरणनिर्मिती केली जाते. समर्पक निवेदनशैली ही असते. याशिवाय कथेत पात्रापात्रातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही असते. तसेच उत्कर्षबिंदूही असतो. कथेला समर्पक शेवट व उत्तम शीर्षकही असते. अशाप्रकारे आपणास कथेचे स्वरूप सांगता येईल.

(आ) खालील पैकी कोणत्याही दोन कृति सोडवाः

(१) ‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या भाषेत लिहा.
उत्तर:
व. पु. काळे लिखित ‘शोध’ या कथेतील ‘अनु इनामदार’ हे महत्त्वाचे पात्र असून स्वभावाने थोडे विक्षिप्त असले तरी संपूर्ण कथानक या पात्राभोवती फिरताना दिसते. ‘प्राप्तेषु षोडशे वर्षे’ या नियमानुसार लग्नापूर्वी किमान पाच वर्षे एकटे राहण्याचा ती विचार करते व त्याबद्दल आबासाहेबांची परवानगी घेऊन बाहेर राहते. स्वतंत्र विचाराची, बंधणे झुगारून देणारी, फटकळ स्वभावाची व संवेदनशील मनाची जिद्दी स्वभावाची, स्वत:चेच खरे करणारी, एककल्ली स्वाभावामुळे ती विक्षिप्त वाटत असली तरी समाज म्हणजे काय ?

स्वतःच्या दृष्टीने समाज पाहण्याची तिची धडपड, जगाकडे पाहण्यासाठी स्वतःचा चष्मा वापरणारी, समाजातील प्रत्येक वस्तू, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करण्यासाठी स्वत:ची नजर तयार करण्याचा आत्मविश्वास असलेली तसेच जीवनाचे सार समजून वागणारी अशी होती. त्यामुळेच तिने जिथे सुख-दुःख भेटतात असाच व्यवसाय निवडला होता व या व्यवसायामध्येच नर्स बनून जनसेवा करण्याचे व्रत घेतले होते. कारण तिला डॉक्टरी पेशापेक्षा नर्स पेशाच अधिक योग्य वाटतो. कारण डॉक्टर्स . फक्त पेशंटला पाहून मोकळे होतात. मात्र नर्स त्या पेशंटचा ताप व मनस्ताप दोन्हीही दूर करतात. के. ई. एम हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळविल्यानंतर त्याच विश्वात राहून ती डॉक्टर्स, सर्जन्स, फिजिशियन, डीन, मेट्रीन, समव्यवसायी भगिनी, पेशंट यांनाही जिंकून घेते.

‘अनु’ ही व्यक्तिरेखा परखड व स्वतंत्र विचाराची असली तरी तितकीच ती भावनाशीलही होते. ‘सुनिता’ नावाची लहान मुलगी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते तेव्हा तिला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु शेवटी डॉक्टरांच्याही हातात काही उरले नसल्याने ‘सुनिता’ काही तासांपुरतीच असणार आहे हे तिला डॉक्टरांकडून समजताच काहीतास तरी तिला सुखाने जगू द्यावे असाही विचार ही व्यक्तिरेखा करताना दिसते.

अनूला सुनिताने भेट म्हणून दिलेली एक रुपयाची नोट जिवापाड जपते मात्र ती नोट हरवल्याचे लक्षात येताच तितकीच अस्वस्थ होते. ही तिची अवस्था म्हणजे पेशंटमध्ये असलेली भावनिक गुंतागुंत होय. तिला मिळणारी भेट धर्मादाय पेटीत टाकून निःस्वार्थपणे आपले कार्य करणारी ‘अनु इनामदार’ ही नायिका म्हणूनच हृदयस्पर्शी वाटते.

(२) ‘गढी’ पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.
उत्तर:
डॉ. प्रतिभा इंगोले यांनी ‘गढी’ ही कथा लिहिली असून ती कथा ‘अकसिदीचे दाने’ या कथासंग्रहातून घेतली आहे. या कथेमध्ये ‘बापू गुरुजी’ या व्यक्तिचित्राचे मनोज्ञ दर्शन घडविले असून त्यांच्या तत्त्वप्रणालीवर लेखिकेने प्रकाश टाकला आहे.

बापू गुरुजींनी तालुक्याच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर आपले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी गावच्या विकासाला सुरुवात करतात. गावात सुधारणा करायची ही त्यांची तत्त्वप्रणाली होती. त्यानुसार त्यांनी गावातच शाळा सुरू केली ती गावातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मुलांसाठी शाळेतच तालीमखाना सुरू केला. त्यांचे हे विकासात्मक धोरण पाहून गावातील लोक त्यांना मान देऊ लागले.

त्यांच्या शब्दांना किंमत देऊ लागले. त्याचवेळी त्यांच्याबरोबर तालुक्याला शिकत असलेला त्यांचा वर्गमित्र पुढारी होण्यासाठी गावाकडे आला व त्याने गुरुजींचे यश पाहून त्यांना निवडणुकीसाठी उभे राहण्याचा आग्रह धरला परंतु त्याचा हा आग्रह गुरुजींनी स्वीकारला नाही. उलट त्यांनी त्यास ‘पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं’ हेच तत्त्व ऐकवले कारण ज्या गोष्टीची आवडच नाही ती गोष्ट का करायची? शेवटी माणसाने कोणतेही कार्य करण्यापूर्वी स्वत:ची क्षमता, सामर्थ्य, कुवत ओळखली पाहिजे व नंतरच काम हाती घेतले पाहिजे.

याचे कारण म्हणजे आवड असलेले काम माणूस मनापासून करतो. त्यासाठी माणसाने आपली धाव ओळखूनच पावले टाकली पाहिजेत. बापू गुरुजींना शाळेविषयी शाळेत शिकणा-या मुलांविषयी नितांत प्रेम होते. ते याच कार्यासाठी अहोरात्र कष्ट करत होते. राजकारणात त्यांना कोणत्याच प्रकारे सहभाग नको होता कारण ते क्षेत्र त्यांच्या आवडीचे नव्हते. म्हणूनच ते आपल्या मित्राला जणू काही आपल्या जीवनाचे वैचारिक तत्त्वज्ञान सांगतात, ते म्हणतात ‘पाखरानं पयले पहण पारखावं आन् मंग उळावं.

(३) ‘शोध’ ही कथा सुप्रसिद्ध कथालेखक व. पु. काळे लिखित असून ‘मी माणूस शोधतोय’ या त्यांच्या कथा संग्रहातून ती घेतली आहे. के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये काम करणारी अनु इनामदार ही या कथेतील केंद्रवर्ती भूमिका असून संपूर्ण कथानक या व्यक्तिरेखाभोवती फिरते.
उत्तर:
‘शोध’ ही कथा सुप्रसिद्ध कथालेखक व. पु. काळे लिखित असून ‘मी माणूस शोधतोय या त्यांच्या कथा संग्रहातून ती घेतली आहे. के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये काम करणारी अनु इनामदार ही या कथेतील केंद्रवर्ती भूमिका असून संपूर्ण कथानक या व्यक्तिरेखा भोवती कथेच्या सुरुवातीलाच कथा नायक व मुक्ता हे अनु इनामदारच्या घरी उतरले असता तिला न विचारता तिच्या टेबलवरील काचेखालील एक रुपयाची नोट घेतात आणि संतप्त चिडखोर अनु इनामदार या नोटेचा शोध घ्यायला सुरुवात करते व कथेला सुरुवात होते.

या कथेतील ही व्यक्तिरेखा अतिशय महत्त्वाची असून ती नव्या व स्वतंत्रविचाराची असून बी. ए. झाल्यानंतर तिने आबासाहेबांकडून पाच वर्षे घरापासून, घरातील माणसांपासून अलिप्त राहाण्यासाठी परवानगी मागते व तशी परवानगी मिळताच ती लग्नापूर्वी पाच वर्षे एकटी घराबाहेर राहते. कारण कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्तीला परंपरेने लागते माणूस स्वतःच व्यक्तिमत्त्व घडवतच नाही कुणाचा न कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो.

त्याच्या विचारांवर छाया पडलेली असते आईवडील या मुलावर प्रेम करतात म्हणून मुलेही त्यांच्यावर प्रेम करतात. जे आईवडिलांचे शत्रू तेच त्यांचेही शत्रू बनतात याचाच अर्थ असा की माणूस हा स्वतंत्रपणे स्वतःचा असा मेंदू घेऊन जन्माला आला तरी तो जीव मात्र दुसऱ्याचे ऐकतो कारण त्याला स्वातंत्र्य कसे ते नसतेच. तो सतत दुसऱ्याच्या अंकुशाखाली आपले आयुष्य जगत असतो. त्यामुळे तो स्वत:चे अस्तित्व हरवून बसतो. निसर्गाने जगाकडे पाहण्याची प्रत्येकालाच एक नजर दिलेली असते तीही तो हरवून बसतो. व्यक्ती जेव्हा कोणाच्या तरी आधाराने आश्रयाने जगते त्यावेळी त्याला आश्रय देणाऱ्याचे आश्रित म्हणून जगावे लागते. त्याची मने त्याचे विचार स्वीकारावेच लागतात.

आश्रित म्हणून बंधनात राहावे लागते आणि म्हणूनच आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करणारी अनु इनामदार पाच वर्षे स्वतंत्रपणे एकटी राहू इच्छिते. कारण आश्रित आणि स्वतंत्र यातील फरक तिला जाणून घ्यायचा असतो. जगाकडे पाहताना तिला तिच्या स्वत:च्या नजरेतून जग पाहायचे आहे. त्यातील प्रत्येक वस्तूचे, घटनेचे व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तिला तिची स्वतंत्र अशी बंधनविरहित नजर तयार करायची आहे. तिला कोणाच्या तरी सानिध्यात राहून स्वतःच अस्तित्व वा जगाकडे पाहाण्यासाठीची स्वतंत्र नजर हरवून बसायचे नाही.

(४) सुप्रसिद्ध कथालेखिका डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ ही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रणात्मक कथा त्यांच्याच ‘अकसिदीचे दाने’ या कथासंग्रहातून घेतली आहे.
उत्तर:
सुप्रसिद्ध कथालेखिका डॉ प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ ही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रणात्मक कथा त्यांच्याच ‘अकसिदीचे दाने’ या कथासंग्रहातून घेतली आहे ‘गढी’ म्हणजे किल्लासदृश्य घर वा राजवाडा अथवा ‘गावचा मातीचा किल्ला’ हा गावच्या पाटलाने राहण्यासाठी बांधलेला असतो. ही वास्तू पांढऱ्याशुभ्र मातीपासून बनवलेली असे जी त्या गावचे आकर्षक वैभव आहे. ही गढी सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गावात वैभवाने गतकाळापासून उभी असलेली. मात्र वाडा पडला तसा ‘गढी’ ही उघडी पडली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बापू गुरुजी गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे, समाजसेवक म्हणून या गावाला वाननदीच्या साक्षीने व गावाच्या पाटलाच्या स्नेहामुळे लाभले होते. परंतु विकासाच्या वाटेवर गावगाड्यासमोरचे प्रश्न सोडविण्यासाठी बापू गुरुजींनी समाजसेवेचे व्रत स्वीकारले.

आणि या व्रतामध्ये अडचणी निर्माण करणारे विरोधकही बापू गुरुर्जीना अडचणी निर्माण करू लागले. या सर्वांना साक्षी असलेली वाननदी गावाशेजारूनच झुळूझुळू वाहत होती. असे हे चैतन्यदायी चित्रलेखिकेने आपल्या प्रतिभावंत लेखणीतून उभे केले आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे गावचे वैभव म्हणजे गावातील काळी सुपीक जमीन, भरघोस पीक, शेजारून वाहणारी वाननदी आणि त्या काठावर उभा असलेला वड व गावात तम धरून उभी असलेली गढी. याच वैभवात बापू गुरुजी विकासात्मक भर घालत होते. गावातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी शाळा उभी केली. तसे तालुक्याला जाऊन शिकणारी मुले बापू गुरुजींच्या शाळेत दाखल झाली. बघता बघता चौथीची शाळा सातवीपर्यन्त पोहोचली. गावाचा विकास झपाट्याने होऊ लागला.

शाळेतच तालीमखाना, गावात वाचनालय सुरू झाले. आजूबाजूच्या परिसरातील मुलांची राहण्यासाठी सोय म्हणून बोर्डिंग बांधले. बोर्डिंगमध्ये शिकणाऱ्या ‘संपत’ चा (बापू गुरुर्जीचा मानस पूत्र ) मृत्यू झाल्याने हतबल झालेल्या बापू गुरुजींनी गावात दवाखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र गावातील विरोधकांमुळे त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही. गावातील सडक, पोस्ट ऑफिस यासही गावातील विरोधकांनी विरोध केला. त्यातून गुरुजींना आलेले अपयश सहन होत नाही एकूणच त्यांच्या या कार्यशैलीचा निसर्गावरही परिणाम होताना दिसतो.

पुढे गुरुजींचा मुलगा आजारी असता त्याकडे लक्ष देता न आल्याने तोही मृत्यू पावतो त्यामुळे गुरुजी दुःखी, कष्टी, हतबल, हताश होतात. गावाशेजारून दुधडी भरून वाहणारी वाननदी शेवटी कोरडी पडू लागते. गावाचे वैभव म्हणून ख्याती असलेली गढी दिवसेंदिवस खचू लागते. वादळवाऱ्याने, अनपावसाने तर कधी गावातील माणसांमुळे ती जमीनदोस्त होऊन शेवटी तिचे मैदानात रूपांतर होते.

पांढऱ्या मातीचे मैदान. जे वैभव धुळीस मिळते तीच गत वाननदीच्या काठावर असलेल्या वडाची होते. हळूहळू फुटू पाहणारा त्याच्या पारंब्या मातीत घुसल्या असल्या, त्याने पोरांच्या डोक्यावर सावली धरली असली तरी शेवटी तो वाळूनच जाऊ लागतो.

बापू गुरुजी देशस्वातंत्र्यानंतर गावांचा विकास करू पाहत होते. परंतु गाववाल्यांनी त्यांना साथ न दिल्यामुळे, अडचणी निर्माण केल्यामुळे स्वातंत्र्यानंतरही कसलाच विकास न होता फक्त शाळाच चांगल्याप्रकारे चालू राहिली. गावातील स्वार्थी लोकांना गावाचा विकास नकोच होता. जसे गढी हे गावाचे वैभव असलेतरी तिला पुन्हा कोणाकडूनही पुनर्जीवन मिळाले नाही ती जमीनदोस्त झाली.

बापू गुरुजींचाही विकास त्यांच्याच निवृत्ती. काळात मंदमंद होत गेला. येथे लेखिकेने बापू गुरुजी व गढी यांची तुलना केली असून एकीकडे गावातील लोकांना बापू गुरुजी स्वार्थीपणाणे काम करत आहेत असे वाटते तर दुसरीकडे सरकार त्यांच्या कार्याचा सन्मान करते. शेवटी बापू गुरुर्जीचे कार्य त्यांच्या वयाल्या गतिमानतेबरोबर थांबताना दिसते. त्यामुळे कथेचे ‘गढी’ हे शीर्षक समर्पक वाटते.

विभाग ४: उपयोजित मराठी

प्रश्न ४.

(अ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.

(i) मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात ?
उत्तर:
मुलाखत घेताना पुढील गोष्टी करणे गरजेचे ठरते.
(a) मुलाखत घेणाऱ्याने सुरुवातीला आपल्या मर्यादा ओळखण्यात व आपल्या मर्यादांची जाणीव ठेवूणनच
प्रश्न विचारावेत.
(b) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे वा न देण्याचे मुलाखत देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे.
(c) मुलाखतीचे सादरीकरण ओघवते श्रवणीय व उत्स्फूर्त असले पाहिजे.
(d) मुलाखत घेत असताना मुलाखतीदरम्यान अनौपचारिक व सकारात्मक वातावरण निर्माण करावे.
(e) ‘हो’, ‘नाही’ अशी उत्तरे मिळणारी प्रश्न शक्यतो टाळवीत.
(f) संयम, विवेक व नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीस रंग भरावा…इत्यादी.

(ii) ‘माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्ष जाहिरात असते’ विधान स्पष्ट करा.
उत्तर:
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यन्त पोहोचविण्यासाठीचे ते महत्त्वाचे असे साधन आहे. तसेच नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठी ती खिडकी आहे आणि जनमन आकर्षित करण्यासाठी ते लिखित स्वरूपाने जाहीर आवाहन असते.

माहितीपत्रक हे माहिती देणारा व घेणारा या दोघींमध्ये एक नाते तयार करते. नवीन बाजारपेठ व नवनवीन ग्राहक मिळवण्याची ती पहिली पायरी असते. ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहते. माहितीपत्रक हे कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यन्त घरबसल्या पोहचवता येते. या सर्व गोष्टी लक्षात घेता माहिती पत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीतचे कार्य करते.

(iii) अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी लिहा.
उत्तर:
अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी पुढीलप्रमाणे-
(a) अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची चांगली जाण हवी.
(b) जे घडले आहे वा जसे घडले आहे त्यावर आधारित अहवाल लेखन करता आले पाहिजे.
(c) सारांशरूपाने संक्षिप्तलेखन करता आले पाहिजे.
(d) अहवाललेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असून सांस्कृतिक कार्यक्रमाचे अहवाललेखन करताना बोलके व सजीव चित्र उभे करता आले पाहिजे.
(e) संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली व वस्तुनिष्ठता ही महत्त्वाची असते.
(f) सहज, सोपी व स्वाभाविक भाषाशैली असावी……. इत्यादी.

(iv) वृत्तलेखकाची शैली कशी असावी असे तुम्हाला वाटते ते स्पष्ट करा.
उत्तर:
वृत्तलेखनामध्ये वृत्तलेखाचा प्रारंभीचा भाग हा बातमीसारखा असून पहिल्या भागात बातमीचा उलगडा केला जातो. म्हणजेच ‘कशावरती’, ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती प्रारंभीच्या भागात होणे आवश्यक असते. त्यानंतर मधल्या भागात विवेचनाला संधी असते तर वृत्तलेखाच्या अखेरच्या भागात समारोप करताना या वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे.

काय बदल घडवावा असे वाटते याचा विचार करावा लागतो. साधारणपणे वृत्तलेख लिहिताना वृत्तलेखाची भाषाही सरल, साधी, सोपी तसेच मनाला भिडणारी असावी, वृत्तलेखामध्ये विवेचन करताना शब्दबंबाळपणा टाळावा लागतो. भाषा क्लिष्ट असू नयेदीर्घ वाक्यरचना नसावी छोट्या वाक्यरचनेतून विषय सहज समजतो शेवटी ज्या विषयासंबंधी वृत्तलेख लिहितो त्या विषयासंबंधी वाचकांची जिज्ञासा शमली जात आहे ना याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे वृत्तलेखाची शैली असावी.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions

(आ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.

(i) ‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.
उत्तर:
बातमीमध्ये घडलेली घटना मर्यादित असले तर त्या घटनेसंबंधीचा तपशील, इतरगोष्टी वृत्तलेखनातून पूर्ण केल्या जातात. म्हणेजेव वृत्तलेख घडलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो. वृत्तलेख हा स्वतंत्र तसेच आकर्षक आणि वाचकांना खिळवून ठेवणारा असतो. तसेच वृत्तलेखन ज्ञान, माहिती, आनंद देणारा व मनोरंजन करणाराही असतो.

‘शिवशाही व स्विफ्ट यांच्या भीषण अपघातात नऊ जनांचा जागीच मृत्यू. दिनांक २३ – ४ – २०१९ रोजी सोलापूर ते रोहा’ असा प्रवास करणारी शिवशाही बस व स्विफ्ट MH- 14, K-04 या गाडीचा खोपाली घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात जागीच नऊ जनांचा मृत्यू झाला व सुदैवाने दोन वर्षाचे एक बालक मात्र जिवत राहिले. त्यास कसलीही इजा झाली नाही.

सोलापूरहून सकाळी ९-३० वाजता शिवशाही बस ४० प्रवाशांना घेऊन रोहाला निघाली. तीच बस पुण्यातून तीन वाजता रोहाकडे जात असता. खोपोली घाटात समोरून येणाऱ्या स्विफ्टने बसला जोराची धडक देऊन, ती गाडी १० ते १५ फूट उंच उडून दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की त्या गाडीतील एकूण सहा प्रवाशांपैकी ५ जनांचा जागीच मृत्यू झाला.

मात्र त्यातील एका दोन वर्षान्या बालकाचे प्राण वाचले. तर शिवशाही बस मधील चार प्रवाशी जागीच ठार झाले. हे प्रवासी साठ वर्षापेक्षा वयाने जास्त असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्विफ्ट गाडीचा चालक पुण्यातील रहिवासी असून गाडीतील सर्व प्रवाशी पुणे येथील कोथरूड भागात डी. एस. केकॉलनीत राहणारे कुटुंबीय असून या एकाच कुटुंबातील पाचही व्यक्तींचा जागीच दुर्देवी मृत्यु झाला यामध्ये तीन पुरुष ड्रायव्हरसह व दोन स्त्रियांचा समावेश होता.

एवढ्या मोठ्या भीषण अपघातातून दोन वर्षाचे बालक मात्र चमत्कारितरित्या बचावले. अपघात घटनास्थळी स्थानिकांनी एकच गर्दी. केली मात्र वेळीच पोलीस पथक पोहोचल्याने त्यांनी गर्दीला आवर घालून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत कशी करता येईल याचाही त्यांनी हालचाली सुरू केल्या.

(ii) अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
(a) अहवाल लेखन करत असताना जे घडले जसे घडले त्यावर आधारित अहवाल लेखन करावे. अहवाललेखनाच्या विषयाशी संबंधित अहवाललेखकास कार्यक्रमाला उपस्थित राहणे अनिवार्य असते. कारण कार्यक्रम हा जसजसा पुढे सरकत जातो तसतसे कार्यक्रमात काहीना काही घडत असते. या घडण्याची नोंद अहवाललेखकास घ्यावी लागते. उदा. कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिक्षणाधिकाऱ्यास न नेमता त्या शहराच्या नगरपालिकेच्या महापौरांना नेमले जाते.

मात्र असे न केल्यास खूप मोठा गोंधळ होतो अहवालावरील विश्वासास तडा जातो. आणि म्हणून अहवाल लेखकाने कार्यक्रमाविषयीची सत्य माहिती लिहावी.

(b) अहवाल लिहून झाल्यावर त्याखाली मान्यतेसाठी संबंधित अध्यक्ष व सचिव यांची स्वाक्षरी घ्यावी लागते. संस्थेमध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले असून अशा कार्यक्रमाचे संस्थेने वर्षभरासाठी अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. तसेच संस्थेच्या विकासासाठी शहरातील मान्यवरांनी मोठमोठ्या देणग्या दिल्या आहेत. हे सर्व अहवाललेखनात वस्तुनिष्ठतेने येणे गरजेचे असते मात्र अनावधानाने वा हेतुपुरस्सर अहवाललेखकाने पूर्वग्रहदुषित दृष्टिकोनातून काही उपक्रम गाळले तर ते संबंधित संस्था अध्यक्ष वा सचिवांच्या निदर्शनास येणे अगत्याचे ठरते.

त्यामुळे वेळीच चूक सुधारता येते अथवा अहवाललेखकाने त्याच्या मर्जीनुसार अहवाल लेखन केले तर संस्था अध्यक्ष वा सचिव त्यास विरोधही करू शकतात व होणारे परिणाम टाळता येतात. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे अहवाललेखन करून होताच अहवाललेखकाने अहवाललेखनावर संस्थेच्या अध्यक्षाची वा सचिवाची स्वाक्षरी घेणे महत्त्वाचे ठरते.

(iii) वस्त्रदालनासाठी माहितीपत्रक तयार करा.
उत्तर:
वस्त्रदालनासाठीचे माहितीपत्रक पुढीलप्रमाणे: वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक म्हणजे माहितीपत्रक होय. माहितीपत्रकाद्वारे सेवा संस्था, उत्पादन लोकांपर्यन्त पोहोचविता येते. नवनव्या योजना, उत्पादने, संस्थांकडे लोकांनी पाहावे यासाठी ती महत्त्वपूर्ण खिडकी असून जनमत आकर्षित करण्यासाठी ते लिखित स्वरूपाचे एक जाहीर आवाहन असते. वस्त्रदालनासाठीचे माहितीपत्रक पुढीलप्रमाणे.
उदाहरण.
तुमच्या आवडीचे! तुमच्या पसंतीचे! खास तुमच्या विश्वासाचे
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 11
सदाशिव पेठ, पुणे
Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions 12 ९४२०००५९६०, ०२०२८२२२२
वेबसाइट: h#p://www.wastra.com.
ई-मेल: maharani [email protected]
दसरा, दिवाळी; मूंज, बारसे, लग्न यासाठी
खास तुमच्या मनातलं एकच दालन
महाराणी वस्त्रदालन
वस्त्रदालन आमचे, पसंती मात्र तुमची
काय मग येताय ना ? महाराणी वस्त्रदालन वाट पाहतेय
तुमच्यासारख्या प्रेमळ ग्राहकाची
सदाशिव पेठसारख्या उच्चतम, सुंदर अशा परिसरात
भव्यदिव्य 17 मजली इमारत
प्रशस्त दालन, पार्कींगची सोय, चुकवू नये असेच काही से……
★ वस्त्रदालनाची खास वैशिष्ट्ये

  • एकाच ठिकाणी मनपसंत खरेदी !
  • भरपूर व्हरायटी, उत्कृष्ट क्वालिटी
  • पुरुष व महिलांच्या कपड्यांसाठी स्वतंत्र दालन
  • छोट्या मुला-मुलींसाठी लेटेस्ट, फॅन्सी ड्रेस, ड्रेसमटेरियल
  • ऑनलाईन साड्या ड्रेस पाहण्याची व बुकींगची सोय घरपोच डिलिव्हरीची मोफत सोय…..

तुम्हाला परवडतील अशा किफायतशीर किंमती १८५ वर्षे आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले दालन म्हणजे तुमच्या विश्वासार्हतेस उतरलेले खास तुमचे दालन पुरुषांच्या ब्रँडेड कपड्यांसह साड्यांचे असंख्य प्रकार लहान मुलांच्या ड्रेससह समृद्ध व परिपूर्ण वस्त्रदालन
वेळ: सळाली १० ते सायंकाळी ९-३०
प्रत्येक सोमवारी साप्ताहिक सुट्टी राहील
लग्नबस्त्याच्या खरेदीवर ३५% सवलत
एकदा याल तर महाराणीच्या प्रेमात कायमचे पडाल !

(iv) मुलाखत घेताना मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उदाहरणासह लिहा.
उत्तर:
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद असला तरी तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो. ही मुलाखत मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी घेतली जाते. व्यक्तीकार्य, व्यक्तीची संघर्षगाथा, व्यक्तीचे कार्यकर्तृत्व, त्याच्यातील माणूसपण जाणून घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात.

सर्वसाधारणपणे मुलाखत घेण्यासाठीचे टप्पे पाहता मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य, मुलाखतीचा समारोप इत्यादीचा समावेश होतो. त्यामध्ये मुलाखतीचा मध्य विशेष महत्त्वाचा असून मुलाखत घेत असताना या टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी लागते. मुलाखतीचा मध्य-मुलाखतीची सुरुवात केल्यानंतर हलके-फुलके प्रश्न विचारून.

मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास दुनावला म्हणजे मुलाखतीच्या मध्याकडे विशेष लक्ष वेधता येते. मुलाखत घेत असता प्रश्नांची यादी समोर असल्याने मुलाखतीचे स्वरूप प्रश्नामागे प्रश्न असे नसावे वा फक्त प्रश्नोत्तराचेही स्वरूप नसावे. तर मुलाखत घेणारा व देणारा या दोघांमध्ये उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे. प्रश्न विचारल्यानंतर मिळणाऱ्या उत्तराचा धागा पकडून पुढील प्रश्न तयार करता यायला हवेत. हे करत असता विषयांतर होणार नाही याचीही दखल घेतली पाहिजे. प्रश्नांमध्ये विविधता असली पाहिजे ज्यामुळे मुलाखत रंगतदार होईल.

प्रश्नांतून उत्तरे उत्तरांतून प्रश्न- प्रश्नांची उत्तरे उत्तरांचे प्रश्न अशा मालिकेतून मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगत जातात. मात्र असे करत असताना मुलाखतीच्या विषयाचा संदर्भ व मुलाखतीचा हेतू निसटता कामा नये. मुलाखत रंजक कशी होईल याकडेही लक्ष दयावे परंतु ती रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्दिष्ट भरकटू नये हे लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे असते.

प्रश्नकर्त्याच्या एकेका प्रश्नाने मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्त्व, त्याचे कार्य, व इतरही संबंधित पैलू उलगडले पाहिजेत. विषयाचे, व्यक्तिमत्त्वाचे तसेच त्या व्यक्तीच्या विचारधारेचे सर्व कंगोरे समोर येत असताना मुलाखत हळूहळू सर्वोच्च बिंदूकडे गेली पाहिजे. मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला बोलण्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे. त्यास अधिकाधिक व्यक्त होऊ दिले पाहिजे.

त्यासाठी प्रश्नांची गुंफणही कुशलतेने केली गेली पाहिजे. जेणेकरून मुलाखतदात्याचा उत्तरे देतानाचा उत्साह वाढत जाईल. या टप्प्यावर मुलाखतीतील सर्वात जास्त महत्त्वाचे, विषयासी संबंधित थेट प्रश्न विचारले जावेत कारण मुलाखतीच्या माध्यमातून जो विषय जी माहिती लोकांपर्यन्त पोहोचवायची असते ती याच टप्प्यावर. अशाप्रकारे मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी काळजी घ्यावी लागते.

विभाग ५: व्याकरण व लेखन

प्रश्न ५.
व्याकरण घटक व वाक्प्रचार

(अ) कंसातील सूचनेनुसार कृती करा.

१) (i) वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात! (विधानार्थी करा)
(ii) तुम्ही लष्कराचं मनोबल खूप वाढवत आहात (उद्गारार्थी करा)
उत्तर:
(i) वृक्षवेली आपल्याला तजेला व विरंगुळा देऊन जातात.
(ii) किती मनोबल वाढवत आहात तुम्ही लष्करांच!

(२) पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.
(i) सद्गुरू
(ii) सुईदोरा
(iii) चौघडी
(iv) जलदुर्ग
उत्तर:
(i) कर्मधारय समास
(ii) इतरेतर द्वंद्व समास
(iii) द्विगु समास
(iv) मध्यमपदलोपी समास

(३) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.

(i) राजाला नवीन कंठहार शोभतो.
(ii) मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले.
उत्तर:
(i) कर्मणी प्रयोग
(ii) भावे प्रयोग

(४) पुढील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
(i) सागरासारखा गंभीर सागरच !
(ii) मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी
उत्तर:
(i) अनन्वय अलंकार
(ii) अतिशयोक्ती अलंकार

(५) जोड्या लावाः

(क) ‘इरावती कर्वे (i) गर्भरेशीम
(ख) दुर्गा भागवत (ii) मर्ढेकरांची कविता
(ग) इंदिरा संत (iii) पैस
(घ) विजया राजाध्यक्ष (iv) युगान्त
(v) सौन्दर्यानुभव

उत्तर:
(क) (iv),
(ख) (iii),
(ग) (i),
(घ) (ii).

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions

(आ) पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

१. समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
उत्तर:
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
समुद्रकाठच्या गावांचा मला नेहमीच हेवा वाटतो. तिथल्या लोकांना संध्याकाळी काय करायचं? हा प्रश्न केव्हाच पडत नाही. कारण उत्तर तयार असतं समुद्रावर जायचं. चित्रपटगृह, नाट्यगृह आणि संग्रहालय या साऱ्यांची उणीव एकटा समुद्र भरून काढतो. बरे! काल समुद्रावर गेलो म्हणून आज नको, असं कुणीही म्हणत नाही. उलट सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ गेलो तरी कंटाळा येत नाही. तेही सौंदर्य पार्वतीच्या रूपाप्रमाणे नित्यनूतन असते. म्हणूनच सुटीसाठी मी नेहमी समुद्रकिनाऱ्याला पसंती देते.

अशाच एका सुटीत मी रत्नागिरीला गेले होते. दिवसाची उन्हं ओसरली आणि पाय आपोआप समुद्राकडे वळले. समुद्रकिनाऱ्यावर नेहमीची दृश्यं दिसत होती. कुठे लहान मुलं बाळूचे किल्ले करते होती. ते पुन: पुन्हा मोडत होती, उभे करत होती. लांबवर पाण्यात डचमळणाऱ्या होड्या दिसत होत्या. कुठे प्रेमी युगुलं सागराच्या साक्षीने प्रेमाच्या आणाभाका घेत होती. आपल्या भावी जीवनाची सुखस्वप्नं रंगवित होती. प्रत्येक लाटेबरोबर वाळूत रुतून बसलेले शंख-शिंपले काढण्याची मुलांची धडपड सुरू होती. लाटेवर स्वार होऊन येणारा खारा वारा नाकात घुसून साऱ्या संवेदनांचा कब्जा करीत होता.

भेळवाले, फुगेवाले आणि शहाळी विकणारे यांची एकच गर्दी उसळली होती. आता संध्याकाळ होऊ लागली होती. आकाशात रंगांची मुक्त उधळण झाली होती. सूर्याची सोनेरी किरणं पाण्यावर चमकत होती. हवेत वाऱ्याचा गारवा आणि उन्हाचा उबदारपणाही होता. समुद्राच्या लाटा एका लयीत संथपणे येऊन किनाऱ्यावर आदळत होत्या. समुद्रबगळ्यांचे थवे पाण्यावरून उडत होते. माणसांची गर्दी खूप होती. पण सारं स्तब्ध होतं. सर्वांचे लक्ष होते लालभडक सूर्यबिंबाकडे. काही मिनिटांतच ते दृष्टिआड होणार होतं. त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं होतं. आजूबाजूच्या ढगांना आणि पाण्याला त्याने झळझळीत केलं होतं.

घड्याळाच्या काट्याबरोबर त्या तेजात बदल होत होता. रंग मंदावत होते. आता त्याच्याकडे नजर रोखून पाहिले तरी त्रास होत नव्हता. किनाऱ्यावरची माणसंही थोडी अस्पष्ट दिसायला लागली होती. सूर्यांचा लहानसा ठिपकाहीं ढगाआड झाला आणि क्षितिजरेखा काळवंडू लागल्या. हवेत गारवा निर्माण झाला.

किनाऱ्यावरचे सगळे लोक सूर्यास्ताचे दृश्य पाहून भारावून गेले. सूर्यास्त झाला तरी लाटांचं नर्तन सुरूच होतं. ते तसंच अव्याहतपणे सुरू राहणार होतं आता त्यांचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होतं. कारण रंगांची आणि प्रकाशाची नजरबंदी संपली होती. वातावरण गूढ, थोडं उदास झालं होतं. दिवसभर दिमाखाने तळपणारा आणि आता अस्ताला जाणारा सूर्य जीवनाचा नवीनच अर्थ उलगडून सांगत होता.

समुद्राची अथांगता, विस्तार, त्याचं सर्व काही भलंबुरं पोटात साठवून ठेवणारं रूप मला चकित करीत होतं. त्याची भव्यता आणि माणसाचा खुजेपणा यातला विरोध जाणवत होता. दिमाखाने येणारी लाट किनाऱ्या येऊन फुटत होती.

“हळूहळू खळबळ करीत लाटा
येऊनी पुळणीवर ओसरती
जणू जगाची जीवनस्वप्ने
स्फुरती, फुलती, फुटती, विरती”

प्रत्येक लाटेचं उत्साहात येणं आणि संपून जाणं मानवी स्वप्नांचंच वास्तव सांगत होती किंवा एखाद्या ध्येयवेड्या माणसाची आपल्या ध्येयामागची तळमळ दाखवित होती. सभोवताली काळोख पसरू लागला तरी समुद्राची गाज ऐकू येत होती. ती तशीच अखंड सुरू राहणार होती.

सगळ्या नद्या, नाले, ओहोळ पोटात साठविणारा आणि थकल्या भागल्या जीवांना आश्रय देणारा हा पयोधि त्या संध्याकाळी मला आईसारखा स्नेहशील वाटला. सारं दुःख पचवून आनंदानं जगण्याची कला त्याच्याकडूनच शिकली पाहिजे.

“कळे मला का म्हणती तुजला
रत्नाकर, तीर्थाचे आगर.
शिकव जगाचे दु:ख गिळूनिया
फळाफुलांनी भरण्या डोंगर ”

स्वामी विवेकानंदांनाही कन्याकुमारीच्या तीन समुद्राच्या सान्निध्यात ध्यानाला बसावं, असं का वाटलं याचं रहस्य मला त्या समुद्राच्या रूपाने उलगडलं. विचारांच्या कल्लोळात किती वेळ गेला कोणास ठाऊक? किनाऱ्यावरची वर्दळ आता खूपच कमी झाली होती. माणसांचे ठिपके विरळ झाले होते. उठावंसं वाटत नव्हतं, पण उठणं आवश्यक होतं. वियोगाची हुरहुर मनात ठेवूनच मी सागराचा निरोप घेतला.

२. पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
उत्तर:
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
डॉ. सलीम अली थोर पक्षीतज्ज्ञ होते. आपल्या नव्वद वर्षाच्या आयुष्यातली ८० वर्षे त्यांनी पक्षी निरीक्षणात आणि संशोधनात घालवली. त्यांच्या सवयींचा अभ्यास करून, पक्षीजीवनावर अनेक ग्रंथ लिहून अभ्यासकांची मोठी सोय करून ठेवली. पक्षी निरीक्षणासाठी त्यांनी आपलं जीवन जणू समर्पित केलं होतं. जो उत्साह अकराव्या वर्षी होता, तोच नव्वदीतही टिकून होता.

त्यांच्या लेखी पक्षी निरीक्षणाइतकं महत्त्वाचं काहीही नव्हतं, त्यामुळेच त्यांच्या जीवनावर दूरदर्शनसाठी चित्रीकरण करायला माणसं येणार होती, त्या वेळी बऱ्याच वर्षांनी दर्शन देणाऱ्या ‘जेडनचा कोर्सर’ या पक्ष्याला पाहायला ते सर्व कार्यक्रम रद्द करून गेले. डॉ. सलीम अलींचं बालपण मुंबईत खेतवाडीत गेलं.

त्यांच्या आईचं निधन ते तीन वर्षांचे असताना झाल्यामुळे मामांनी त्यांचा सांभाळ केला. मामा पट्टीचे शिकारी असल्यामुळे शिकारीची नाना हत्यारे आणि बंदुका घरात होत्या. आपणही चांगले शिकारी व्हावं असं छोट्या सलीमला वाटे. हातात बंदूक आल्यावर त्यांचं पहिलं लक्ष्य चिमण्या झाल्या. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव ‘दि कॉल ऑफ स्पॅरो’ असं आहे. त्यांच्यामागे ही हकीकत आहे.

चिमण्या टिपण्यासाठी ते एकदा तबेल्यात गेले तेव्हा चिमणीने बांधलेल्या घरट्यांकडे त्यांचं लक्ष गेलं. त्यांच्या तोंडावर एक चिमणा पहारा देत होता. त्यांनी त्याचा वेध घेतला. चिमणा खाली पडला. सलीम अली पुढे काय होते पाहू लागले, तो दुसरा चिमणा आला आणि पहारा देऊ लागला. पुढच्या सात दिवसांत ८ चिमणे असे पहारा देण्यासाठी आले. ही नोंद सलीम यांनी आपल्या वहीत केली. तेव्हापासून पक्षीजीवनाविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं.

त्यांचे मामा अमरिद्दीन हे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे सदस्य होते. त्यामुळे तिथल्या लोकांचं मार्गदर्शन त्यांना सहज मिळालं. शालेय जीवनात गणित या विषयाच्या भीतीमुळे ते फारसे चमकले नाहीत. १९१३ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर प्राणिशास्त्राची पदवी घ्यावी असं त्यांना वाटत होतं. पण गणितामुळे ते जमलं नाही. त्या वेळी त्यांचे जाबीरभाई नावाचे भाऊ ब्रह्मदेशात खाणधंद्यात होते. त्यांनी त्यांना तिकडे बोलावून घेतलं. तिथेही त्यांनी पक्ष्यांच्या मागावर जाता-जाता रबराचे मळे, फळबाग आणि वनराया पालथ्या घातल्या.

१९१८ साली ते तेहमिनाशी विवाहबद्ध झाले. तेहमिना जरी समृद्धीत वाढली होती. तरी तिला साधं जीवन, जंगलातली भटकंती आवडत होती. तिलाही पक्षी आणि प्राणी यांच्याबद्दल प्रेम होतं. चाकोरीबाहेरचं जीवन जगणाऱ्या सलीमशी ती अल्पावधीतच समरस झाली. शेवटपर्यंत तिने त्यांना साथ दिली. त्यांना आवडीचं काम करायला मिळावं म्हणून स्वतः नोकरी करून संसाराचा आर्थिक भार उचलला.

सुरुवातीच्या काळात पक्षी निरीक्षणासाठी जाताना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असे. कडाक्याची थंडी, धुळीची वादळं, हिमवर्षाव अशी निसर्गाशी टक्कर देत कधी बैलगाडी तर कधी तट्टू यांच्यावरून प्रवास करावा लागे. साधनं अपुरी, खाण्या-पिण्याचे हाल अशा परिस्थितीत सलीम अली पती-पत्नी तिथे जाऊन तंबू उभारत. मुक्कामाच्या ठिकाणी कधी पोलीस चौकी, कधी डाक बंगला तर कधी पडका गोठाही असे. पक्षी निरीक्षणात दोघंही दंग
राहत.

प्रतिदिनी बारा मैल भ्रमंती असे. रविवारची सुटी वगैरे प्रकार नसत. कच्च्या, खाचखळग्यांच्या डोंगरदरीतून वळणं घेत जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागे. जळवा, माशा आणि डास यांचा त्रास अटळच होता.

डबाबंद अन्न महाग म्हणून ते आणीबाणीसाठी राखून ठेवलं जाई. रोजचा आहार म्हणजे डाळभात, केळं, दही, पपई, प्यायच्या स्वच्छ पाण्याची मारामार, तिथे स्नानासाठी पाणी मिळणं कठीण. या गैरसोईपुढे ते कधीही अडून बसले नाहीत. प्राप्त परिस्थितीत हसतमुखाने, उमदेपणाने सहन करत, त्याला विनोदाची झालर लावत सर्वेक्षणाचं काम ते करीत.

सलीम अलींचे पूर्वसुरी म्हणजे ब्रिटिश आमदानीतले अधिकारी. भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत त्यातल्या काही लोकांची मतं विरोधी असली तरी सलीम म्हणत की, यावर वाद घालण्यापेक्षा आपण कामावर लक्ष केंद्रित करू या! त्यांचे प्राध्यापक इरविन स्ट्रेसमन यांना आपला अभ्यास, आपला वारसा सलीमच पुढे चालवतील, असा विश्वास वाटत होता. पक्षी निरीक्षण करता-करता निसर्ग, पर्यावरण परिसंस्था यांच्या अभ्यासाच्या दिशेनेही त्यांची वाटचाल सुरू होती.

सलीम अलींच्या ज्ञानाला कृतीची जोड होती. भारत हा शेतीप्रधान देश आहे, याचा त्यांना कधीही विसर पडलेला नव्हता. पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करताना, मानवी जीवनात पक्ष्यांचं अर्थशास्त्रीय स्थान ठरविताना सजीव साखळीतला एक घटक म्हणूनच त्यांनी पक्ष्यांचा विचार केला. पशू-पक्ष्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन भाबड्या भूतदयेचा नव्हता.

पक्षीविषयक अभ्यास हा चाकोरीबाहेरचा आणि तसा सामाजिक प्रतिष्ठा नसलेला. परंतु त्याचा त्यांनी जीवनभर ध्यास घेतला. सलग ६० वर्ष ते अभ्यासासाठी राहिले. पक्षीशास्त्रात त्यांचं नाव मोठं झालं. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. मानमरातब मिळाले. पद्मविभूषण, कितीतरी विद्यापीठांच्या डॉक्टरेट, सी. व्ही. रामन मेडल, दादाभाई नौरोजी प्राईज, रवींद्रनाथ टागोर ही काही नमुन्यादाखल नावे.

एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणारे ज्ञानपिपासू सलीम अली मानवजातीला एक आदर्श मानावा लागेल. कारण सहकार्यांसाठी ते खोळंबले नाहीत की श्रेय मिळविण्यासाठी ते अडखळले नाहीत. त्यांची जिद्द, कार्यावरची निष्ठा, तळमळ, समर्पित वृत्ती पाहून मन थक्क होतं. त्यांनी आपल्या कुटुंबीयांमध्येही पक्षीप्रेम चांगल्यापैकी रुजवलं. त्यांनी लिहिलेले ग्रंथ पुढील पिढीच्या अभ्यासकांना निरंतर मार्गदर्शक ठरणारे आहेत.

आपल्यासारखे अनेक सलीम अली झाले पाहिजेत, याच एका इच्छेने त्यांनी पुस्तकलेखनाबरोबर निसर्गसहली, चर्चासत्रं, फिल्मशोज यांचं आयोजन केलं. त्यांच्या हाताखाली त्यांनी मोठा विद्यार्थिवर्ग तयार केला. रॉबर्ट ग्रब, विजयकुमार आंबेडकर, पी. कन्नन आणि जे. सी. डॅनियल हे त्यांचे काही विद्यार्थी आपापल्या शास्त्रात लौकिक राखून आहेत. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करणाऱ्यांची संख्या वाढली तरच त्यांचे विचार या भूमीत रुजले, असं म्हणता येईल. विद्यार्थिदशेतच त्यांचं चरित्र मुलांपुढे यायला हवं.

३. फाटक्या पुस्तकाचे मनोगत
उत्तर:
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
“ग्रंथपाल हसतो तेव्हा ग्रंथालय होते एक बाग
न कोमेजणाऱ्या असंख्य फुलांनी बहरलेली”
“ग्रंथ सुखाने फिरू लागतात हिरव्या कुरणावरून
हाक घालतात लहान मुलांसारखे उचलून घेण्यासाठी”

कवी मंगेश पाडगावकरांची ग्रंथांसंबंधीची ही एक कविता खूप आवडली होती, म्हणून एका ग्रंथालयाच्या शोकेसमधून मुद्दाम लिहून आणली होती. आता ती त्यांच्याच ‘जिप्सी’ नावाच्या काव्यसंग्रहात मला सापडली. तो संग्रह इतका जीर्णशीर्ण झाला होता की, त्याच्या कागदाचे हातात घेतले की तुकडे होत होते. आता यावेळी आपली रद्दीच्या गट्ट्यात नक्की रवानगी होणार अशी भीती त्याला वाटली की काय कोण जाणे? त्यानं खरंच मला उचलून घेण्यासाठी हाक मारली. ते माझ्याशी बोलू लागलं. गप्पा मारता मारता आम्ही दोघंही भूतकाळात गेलो.

“किती वर्षे झाली माझा अभ्यास करून ? सत्तर साल असेल. म्हणजे ३६ वर्षे उलटून गेली. एवढासा माझा जीव इतकी वर्षे तग धरून आहे. अधूनमधून तू कपाटातून काढतेस, मला वाचतेस आणि आठवणीत रमून जातेस. मला माहिती आहे यातली प्रत्येक कविता तुला आवडते. त्यातला अर्थ, शब्दसौंदर्य, कल्पनावैभव, कवीची जीवनाकडे पाहण्याची आनंदी वृत्ती, त्यांच्यातली जिप्सी वृत्ती, वातावरणनिर्मिती आणि एखाद्या कवितेतलं तत्त्वज्ञान हे सारं सारं तुला प्रिय आहे तुझ्या शिक्षकांनी ती तुला जशी शिकवली त्याचीही आठवण तुझ्या मनात ताजी आहे. मला वाचताना तू नेहमीच तुझ्या कॉलेजच्या दिवसात रमून जातेस.

माझ्यातल्या अवघड ओळींचा अर्थ, काही संदर्भ, दुसऱ्या कवितांच्या ओळी असंही काहीबाही तू माझ्या पानांवर लिहिलं आहेस. मला पुनःपुन्हा वाचताना तुल्य नवीन काही समजल्याचा आनंद होतो आणि म्हणूनच तू मला टाकून देत नाहीस. यानंतर माझ्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या, पण तू दुसरी प्रत विकत घेतली नाहीस. अनेकदा मला चिकटवलंस, चिकटपट्टी लावलीस, पण पुनःपुन्हा र्मी तीन भागात फाटत फाटत गेलो. चालायचंच ? वयाचा परिणाम. ”

तुला वाटतं कॉलेजच्या दिवसातला सारा उत्साह, ताजेपणा माझ्यात दडून बसलेला आहे. प्रिय मैत्रिणींचा स्पर्श अजूनही माझ्यात तुला जाणवतो आहे.

“मी इतकी भित्री, इतकी भित्री असे कसे मग घडले
मज नव्हते ठाऊक, अजून नाही कळले ”

ही कविता कॉलेजमध्ये प्रत्यक्ष कवीच्या तोंडून ऐकायचा योग आला होता. तेव्हा त्यातल्या विशिष्ट शब्दांवरच्या आघातांमुळे नवीन समजलेला अर्थ ती कविता वाचताना आजही तुला आठवतो आणि ते क्षण उडून गेल्याचं दुःख होतं. हे सारं मला माहीत आहे. तरीही आता मला निरोप देण्याची वेळ आली आहे.

मला माहीत आहे माझी पानं उलटून तू मला वाचू शकत नाहीस. मला उघडलं की, थोडा सहन न होणारा दर्प येतो. सगळीकडून मी खिळखिळा झालो आहे. माझी नवीन आवृत्ती आण! त्या कोऱ्या करकरीत गंधात मी माझं चैतन्यमय आयुष्य पुन्हा अनुभवीन. मी म्हणजे काही ऐतिहासिक, दुर्मीळ हस्तलिखित अथवा हस्तऐवज नाही. मी कुठेही नव्याने उपलब्ध आहे. त्यामुळे मला इतकं जिवापाड जपण्याचं कारण नाही.

मला त्याचं म्हणणं मुळीच पटलं नाही. त्याची सगळी पानं मी व्यवस्थित लावली आणि एका प्लॅस्टिक पिशवीत ठेवली. त्याची एकच विनंती मी ऐकणार आहे. उद्याच त्याची एक नवीन प्रत घेऊन येणार आहे. तो मला माझं आयुष्य संपेपर्यंत सोबत करेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Sample Paper Set 2 with Solutions

४. स्त्री-पुरुष समानता : स्वप्न व वास्तव !
उत्तर:
स्त्री-पुरुष समानता : स्वप्न आणि वास्तव !
अलीकडेच एक धक्कादायक बातमी आली. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचं प्रमाण कोठे ८००, कोठे ८४७, कोठे ७६० पर्यंत आहे. निसर्गाची प्रवृत्ती सर्वच गोष्टींचा समतोल राखण्याची आहे. हजार मुलांमध्ये २००-३०० इतक्या मुलींची तफावत येत असेल तर या असमतोलामागे माणसाचा हस्तक्षेप निश्चितच आहे आणि याला अनेक परिस्थितिजन्य पुरावे उपलब्ध आहेत.

आपला समाजच पुरुषप्रधान आहे. मुलगा हा ‘वंशाचा दिवा’, ‘म्हातारपणाची काठी’ अशा समजुती प्रचलित आहेत. पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती ‘पुं’ नरकापासून तारणारा अशी सांगितली जाते. त्यामुळे मुलगा झाला की, भारतीय स्त्री अगदी धन्य-धन्य होते. मुलगी झाली की, धरणी तिच्या काळजीने तीन हात खचते असाही समज आहे. मुलाला इतकं अपरंपार महत्त्व असल्यामुळे आणि आज विज्ञानाने गर्भ मुलीचा आहे की मुलाचा, हे ओळखण्याची सोय झाल्यामुळे गर्भ मुलीचा असेल तर तिला जन्मालाच येऊ दिलं जात नाहीं. त्यामुळे सर्वेक्षणाचे निष्कर्ष वरीलप्रमाणे धक्कादायक येतात.

स्त्री-पुरुषातील असमानता अशी अगदी मुलीच्या जन्मापासून सुरू होते. संगोपनामध्ये उघडउघड पक्षपात केला जातो. जे-जे चांगलं असेल ते मुलाला पुरविलं जातं. त्यामुळे मुली कुपोषित राहतात. खरं तर नवनिर्मितीची जबावदारी निसर्गाने स्त्रियांवर सोपविलेली आहे. ती सुदृढ असेल तर पुढची पिढी निरोगी आणि बलवान होणार, पण इतका दूरदृष्टीचा विचार समाजात असता तर मुलींच्या गर्भातच हत्या झाल्या नसत्या.

उच्च शिक्षण देताना मुला-मुलींमध्ये निश्चितच भेदभाव केला जातो. याला कारण आपल्या समाजातली हुंड्याची प्रथा. शिक्षणाचा खर्च करूनही हुंडा द्यावा लागतो. मग पालक विचार करतात की, मुलाला शिक्षण द्यावं आणि मुलीला हुंडा द्यावा. याचा परिणाम स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहण्यामध्ये होती. डॉ. सरोजिनी नायडू म्हणतात, ‘पुरुषांच्या शिक्षणाचा उपयोग फक्त त्याच्या एकट्याच्या विकासाला होतो. पण एक स्त्री शिकली तर अवघे कुटुंब शिकते. कारण मुलांवर संस्कार करण्याचे काम प्रामुख्याने स्त्री करते. मग ती सुशिक्षित असेल तर हे काम अत्यंत चांगल्या रीतीने करेल’, पण येथेही एवढा लांबचा विचार कोणी करीत नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यात आता थोडा बदल झाला आहे. प्राथमिक शिक्षण सर्वांनाच सक्तीचं झालेलं असून मुलींना बारवीपर्यत मोफत शिक्षण दिलं जातं. उच्च शिक्षणातही मुलींना ३०% आरक्षण आहे. त्याचा फायदा अनेक मुलींना होतही आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागातल्या अनेक मुली शिक्षणापासून दूर आहेत.

शिक्षित मुली नोकरी करू लागल्या की, तिथेही त्यांच्या क्षमतेबद्दल शंका उपस्थित केल्या जातात. त्या उच्च पदावर असतील तर त्यांचे हुकूम आदेश स्वीकारणं पुरुषांना अपमानास्पद वाटतं. त्यांना अडचणीत आणण्याचे अनेक मार्ग मग ते चोखाळतात. त्यांना सहकार्य करीत नाहीत.

या साऱ्या प्रकारांना पुरून उरणाऱ्या किरण बेदी, नीला सत्यनारायण, मनीषा म्हैसकर यांची उदाहरणं आज समाजापुढे आहेत. ती जसजशी वाढतील तसतशी परिस्थिती बदलेल हे खरं आह. आज मान मिळवत्या स्त्रीला घरात आणि घराबाहेर तीव्र संघर्ष करावा लागतो आहे ही वस्तुस्थिती आहे. पैसे मिळविले म्हणून घरात तिची मिळवित्या पुरुषांप्रमाणे खातिरदारी होत नाही. अशास्त्रियांचा मत्सर करतात.

स्त्री-पुरुष समानता असावी, घटनेमध्ये तर्शी तरतूद आहे. परंतु वास्तव मात्र अनेक पातळींवर असं आहे की, स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य तर कुटुंबात अभावानेच मिळतं. तिचा कष्टाचा पैसासुद्धा तिच्या हक्काचा नसतो. ती फक्त कामाची आणि सहीची धनी असते.

राजकारणात स्त्रियांना स्थान असावं म्हणून काही मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव असतात. तिथे स्त्रिया निवडून आणल्या जातात, पण पुरुषांकडून आणि कारभाराची सूत्रंही पुरुषांकडेच असतात. संसदेत स्त्रियांना 33% आरक्षण असावं; हे बिल अजून पास होऊ शकत नाहीं. याचं कारण संसदेत त्यांची संख्या नगण्य आहे.

हे वास्तव बदलण्याची जवाबदारी स्त्रियांचीसुद्धा आहे. कामाच्या ठिकाणी ‘स्त्री’ म्हणून सवलती त्यांनीही घेऊ नयेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चिकाटी आणि परिश्रम यांत स्त्रिया कमी पडत नाहीत. धडाडी आणि महत्वाकांक्षा यात त्या कमी पडतात. ती उणीव भरून काढता आली तर स्त्री-पुरुष समानतेचं स्वप्न आपल्या आवाक्यात येईल.

५. फॅशनचे वेड
उत्तर:
फॅशनचे वेड
‘एवढे लांबसडक केस आहेत. उगीच फॅशनच्या मागे लागून कापू नको. ‘

‘मी कापणार! सध्या केस छोटे ठेवून ते मोकळे सोडण्याची फॅशन आहे. शिवाय स्वच्छता करण्यासाठी फार वेळ जाणार नाहीं. ‘ ‘कर तुला काय करायचं ते ‘ तुझे केस आणि तू!

हा संवाद आहे आई आणि तिची कॉलेजात जाणारी मुलगी यांच्यातला. घराघरात असे संवाद वेगवेगळ्या विषयांवर थोड्याफार फरकाने होतच असतात. त्याचा शेवट ‘आमच्या वेळी असं नव्हतं’, ‘आजच्या पिढीला रोज नवी फॅशन हवी,’ अशासारख्या उद्गारांनी होतो.

फॅशनचं वेड हे प्रत्येकाला विशिष्ट वयात असतंच. कारण ते नावीन्याचं वेड असतं. त्यातून आपला वेगळेपणा दाखविण्याचा प्रयत्न असतो. इतरांच्या नजरेत भरण्याचा खटाटोप असतो. म्हणून कपडे, केस, नखं, चपला, पर्सेस यांच्या नित्यनव्या फॅशन्स निर्माण होत असतात आणि तरुणाईला त्या फॅशनचं वेड असतं. फॅशन जगतावर चित्रपटसृष्टीचा प्रभाव मोठा आहे.

एखाद्या सिनेमात नायकाने किंवा नायिकेने घातलेले वेगळे कपडे, केस आणि दाढी यांची वेगळी रचनां लगेच फॅशन म्हणून उचलली जाते आणि सगळीकडे प्रचलित होते. मग ती आपल्याला चांगली दिसते की नाही, मानवते की नाही याचाही विचार कोण करीत नाही. आजकाल टी. व्ही. सारखं प्रसारमाध्यम नवनव्या फॅशनचे जणू प्रसारकेंद्रच बनलं आहे. टी. व्ही. वरच्या मालिका त्यातली पात्रं जणू फॅशन शोमधले स्पर्धकच वाटतात.

रोजच्या जीवनात वावरणारी ही माणसं सुंदर-सुंदर कपडे आणि चेहऱ्याची रंगरंगोटी करून घरात २४ तास कशी राहतात, भांडतात, एकमेकांचा द्वेष करतात हे काही कळत नाहीं. खरं म्हणजे हा प्रचंड विनोद आहे. सारंच हास्यास्पद आहे. तरीही सामान्य प्रेक्षक त्या वातावरणात गुरफटून जातो. त्यांच्या बिंदीची आणि बांगड्यांची आणि ड्रेसेसची चर्चा करत बसतो.

फॅशनचं वेड हे मात्र अगदी आदिमानवापासून आहे. काहीही साधने नव्हती तेव्हाही पाने फुलांनी माणूस आपलं शरीर सजवीतच होता. वैचित्र्य, नावीन्य यांची माणसाची आवड खूप जुनी आहे आणि मागची पिढी पुढच्या पिढीला फॅशनबद्दल नावं ठेवताना दिसली तरी त्यांनीही त्यांच्या तरुणपणी फॅशनसाठी आपल्या आई – वडिलांचा रोष ओढवून घेतला, हे तेही कबूल करतात. पिढीतल्या विचारांचं अंतर हे फॅशनच्या निमित्तान चांगलंच दिसून येतं. आई-वडिलांना फॅशन आवडली नाही तर ती चांगली, असं नवी पिढी समजते.

केव्हा कशाची फॅशन येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्या-त्याच फॅशन्स ठरावीक कालानंतर पुनः पुन्हा येताना दिसतात. याच्यामागे साधं मानसशास्त्रा आहे. त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येतो आणि पुन्हा पूर्वीची गोष्ट चांगली वाटू लागते. पूर्वी फॅशनजगत फक्त स्त्रियांच्या भोवतीच रेंगाळत होतं. पण आज पुरुषांचे कपडे, त्यांची केशभूषा, अलंकार त्यांच्यासाठी फॅशन शो हे पाहिलं की, ‘सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे’ या समजुतीचा जमाना मागे घडल्याचं लक्षात येतं.

याचा फायदा व्यापारी लोकांना जास्त होतो. आता तर फॅशनमुळे लोकप्रिय झालेल्या गोष्टी झपाट्याने सगळीकडे पसरवायला टी. व्ही. आणि त्याच्यावरच्या जाहिरातींची मदत आहे. प्रचंड असं सिनेजगत आहे.

काही फॅशन मात्र वीभत्स, किळसवाण्या सभ्यतेला सोडून असणाऱ्या असतात. त्यांचं ओंगळ प्रदर्शन मान खाली घालायला लावतं, ‘खपतं’ म्हणून ‘विकलं जातं हेच चित्र दिसतं. काही फॅशन्स स्त्री-पुरुष भूमिकांची अदलाबदल करणाऱ्या असतात. मला वाटतं, पुरुषांनी केसांची पोनी बांधणं किंवा कानात बाळी घालणं आणि स्त्रियांनी जीन्स घालून अलंकारविरहित राहणं असं करताना फॅशन करणाऱ्या लोकांना परंपरागत कल्पनांना धक्का दयायचा असतो. जीवनातला तोचतोपणा घालवायचा असतो. त्या दृष्टीने माफक प्रमाणात फॅशन ठीक आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करणं हेच सुज्ञपणाचं लक्षण आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Previous Year Question Papers

Leave a Comment