Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 4 नव्या युगाचे गाणे

नव्या युगाचे गाणे Question Answer

प्रश्न १.
हे केव्हा घडेल ते लिहा.

(अ) दिव्य क्रांती –
उत्तर:
जेव्हा विज्ञानाचा प्रकाश आला.

(आ) शून्यामधून विश्व उभारेल-
उत्तर:
जेव्हा मनात खूप जिद्द असेल.

(इ) दुबळेपणाचा शेवट –
उत्तर:
जेव्हा मनात नवचैतन्य संचारेल.

प्रश्न २.
खालील चौकटीतील घटनांचा पदय पाठाधारे योग्य क्रम लावा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 12
उत्तर:

  1. विज्ञानाचा प्रकाश आला.
  2. क्रांती घडली.
  3. हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
  4. उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.
  5. नैराश्य नष्ट झाले.

प्रश्न ३.
खालील अर्थांच्या ओळी शोधा.

(अ) माणसाच्या अंगी चिकाटी असली, तर तो काहीही साध्य करू शकतो.
उत्तर:
शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य

(आ) माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात.
उत्तरः
नसानसातुन जोश उसळतो नव आशा चित्ती

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे

प्रश्न ४.
तक्ता पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 13
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 10

प्रश्न ५.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

(अ) ‘नवसूर्य पहा उगवतो’, ‘संघर्ष पहा बहरतो’ या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
नवसूर्य पहा उगवतो – आजच्या युगात विज्ञानक्षेत्रातील प्रगतीमुळे सर्वत्र ज्ञानाचा, नव्या विचारांचा प्रकाश व्यापून राहिला आहे. त्यामुळे, प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. मानवी जीवनातील अज्ञान, उदासी, दैन्य, दारिद्र्य अशा नकारात्मकतेचा अंधार दूर करण्यासाठी जणू विज्ञानरूपी नवसूर्य उगवला आहे, असे कवीला वाटते. उदा. विज्ञानक्षेत्रात संगणकाच्या शोधानंतर क्रांती घडली, जग जवळ आले. वैदयकीय सेवा, दळणवळण, अवकाश संशोधन इत्यादी क्षेत्रांत मानवाने प्रचंड प्रगती केली.

(आ) कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.
उत्तर:
कवी वि. भा. नेमाडे यांच्या ‘नव्या युगाचे गाणे’ या कवितेत वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात घडलेली क्रांती मांडली आहे. आजच्या युगात विज्ञानाच्या प्रकाशात सारे जग उजळून निघत आहे. मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. मानवात शून्यातून विश्व उभारण्याची जिद्द, आत्मविश्वास निर्माण होत आहे. त्याच्या हृदयातील अशांतता शमली आहे; कारण विज्ञानामुळे मानवाला प्रगतीचा नवा मार्ग सापडला आहे. त्याच्या तनामनात नवचैतन्य, उत्साह संचारला आहे. निराशाजनक विचार, मनाचा दुबळेपणा, उदासी, लाचारी, असहायता अशा नकारात्मक गोष्टी दूर होत आहेत.

विज्ञानरूपी नवसूर्याचा उदय झाल्यामुळे मानवी समाजाचा उत्कर्ष घडत आहे. त्याच्या संघर्षाला यश आले आहे. माणुसकीच्या मार्गावर चालताना कितीही संकटे आली, तरी मानव एकत्वाचे सूत्र जपणार आहे. एकता टिकवून ठेवणार आहे, असे आशावादी विचार कवी या कवितेत मांडतो.

खेळूया शब्दांशी

(अ) कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
उत्तर:

  1. प्रगति – पुढती – क्रांती – चित्ती
  2. दिव्य – भव्य
  3. विझला – दिसला
  4. गेले – आले
  5. ज्वाला – माला
  6. खिन्नता – दीनता
  7. उगवतो – झळकतो – बहरतो – उसळतो

(आ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.

(१) उजेड
(२) तेज
(३) रस्ता
(४) उत्साह
उत्तर:
(१) प्रकाश
(२) प्रभा
(३) मार्ग
(४) जोश

उपक्रम

(अ) विज्ञानविषयक आणखी काही कविता मिळवून वाचा व त्यांचा संग्रह करा.
(आ) वैज्ञानिक प्रगतीमुळे घरात आलेल्या व जीवन सुलभ करणाऱ्या वस्तूंची यादी करा.

प्रकल्प : विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रांत नवनवीन साधनांची भर पडली आहे. त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रांतील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा. तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 14

सारे हसूया.

संजू : मोहन, हे बोटावर आकडे का लिहिलेस?
मोहन : अरे माझी आजी म्हणते, “नुसत्या बोटावर आकडेमोड करता आली पाहिजे.”

अजय : थंडी वाजते तेव्हा तू काय करतोस ?
विजय : मी मेणबत्तीजवळ बसतो.
अजय : आणि खूप थंडी वाजली तर?
विजय : मेणबत्ती पेटवतो.

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 नव्या युगाचे गाणे Question Answer

कृती १ – आकलन

२. आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 4
उत्तर:
१. अणू
२. रेणू

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 5
उत्तर:
१. उत्कर्षाचा
२. प्रगतीचा

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 6
उत्तर:
१. खिन्नता
२. दीनता

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे

२. चौकटी पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 7
उत्तर:
i. दिव्य
ii. अशांततेचा
iii. मानवतेच्या
iv. अमरत्वाची

[अणूरेणूतुनि ……….
………… चला पुढती]

(टीप: कवितेवर आधारित कृतींकरिता संपूर्ण कविता न देता केवळ कवितेची सुरुवात व शेवट यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार विदयार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कविता वाचून कृतींचा अभ्यास करावा.)

कृती २ – आकलन

१. एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. कवीच्या मते, अणूरेणूतून कोणते शब्द प्रगटतात?
उत्तर:
कवीच्या मते, अणूरेणूतून ‘चला चला पुढती’ हे शब्द प्रगटतात.

ii. नवे तेज कशाप्रकारे आले, असे कवी म्हणतो?
उत्तरः
नैराश्याच्या होळीमधून नवे तेज आले, असे कवी म्हणतो.

कृती ३ – सरळ अर्थ

१. ‘विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती’ या ओळींतील सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
(विज्ञानाच्या प्रकाशाने अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे) मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे, असे कवी येथे म्हणतो.

२. ‘नको खिन्नता, नको दीनता’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
विज्ञानरूपी नवसूर्य उगवल्यामुळे सर्वत्र ज्ञानाचा, नव्या विचारांचा प्रकाश पसरला आहे. त्यामुळे, मानवी जीवनातील उदासी, दुःख, दैन्य दूर ‘होत आहे, असा अर्थ येथे व्यक्त होतो.

कृती ४ – काव्यसौंदर्य

१. ‘नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य’ या ओळींतील भाव स्पष्ट करा.
उत्तर:
कवी वि. भा. नेमाडे यांच्या ‘नव्या युगाचे गाणे’ या कवितेत वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात घडलेली क्रांती मांडली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवीन युग पृथ्वीवर अवतरले आहे. त्याचे दिव्य तेज सर्वत्र पसरले आहे. म्हणजेच, वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवन प्रकाशमय व सुखकारक झाले आहे. विज्ञानाच्या साथीने शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रेरणा, जिद्द, आत्मविश्वास मानवात निर्माण झाला आहे, असा भाव वरील ओळींतून व्यक्त झाला आहे.

२. ‘नवी चेतना अंतरि स्फुरली दुबळेपण गेले
नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले’ या ओळींतील अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
कवी वि. भा. नेमाडे यांच्या ‘नव्या युगाचे गाणे’ या कवितेत वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात घडलेली क्रांती मांडली आहे.

विज्ञानाच्या साथीने मानवाने प्रगती साधली. विज्ञानामुळेच त्याच्या मनात नवे चैतन्य संचारले. त्याच्या जीवनातील दुःख, दैन्य, असहायता निघून गेली. मनातील निराशाजनक, नकारात्मक विचारांची होळी झाली. म्हणजेच, ते नष्ट झाले आणि त्यातूनच नव्या विचारांचे तेज सर्वत्र पसरले असा अर्थ वरील ओळींतून व्यक्त होतो.

३. ‘मानवतेच्या मार्गावरती उठती जरि ज्वाला
अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला’ या ओळींतील भाव स्पष्ट करा.
उत्तर:
कवी वि. भा. नेमाडे यांच्या ‘नव्या युगाचे गाणे’ या कवितेत वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात घडलेली क्रांती मांडली आहे.

आता माणुसकीच्या मार्गावर दाहक असे आगीचे लोळ उठत असले, म्हणजेच, या मार्गात कितीही संकटे आली तरीही आपण कायम टिकणाऱ्या विचारपुष्पांची माळ गुंफूया, एकता जपूया, असा अर्थ येथे व्यक्त होतो. नकारात्मक गोष्टी दूर सारून सकारात्मकता जपण्याचा आशावादी भाव येथे व्यक्त होतो.

४. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

i. संघर्ष पहा बहरतों विज्ञानातील प्रगतीमुळे मानवी जीवनात क्रांती घडून आली आहे. जणू आजवर मानवाने केलेला संघर्ष आता बहरास आला आहे: त्याच्या कष्टांचं चीज झालं आहे. असा अर्थ कवीला येथे सूचित करायचा आहे.
उदा. वैज्ञानिक प्रगतीमुळे विश्वातील काही रहस्यांचा (विविध ग्रह – गोलावरील जीवसृष्टी इत्यादी) शोध लागला. मानवाच्या अपार कष्टांना यश आले.

मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी कृती

१. खालील मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

i. प्रस्तुत कवितेच्या कवी / कवयित्रीचे नाव लिहा.
उत्तर:
कवी – वि. भा. नेमाडे.

ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तर:
वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात क्रांती घडून नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

iii. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) खिन्नता
(ब) जोश
(क) दिव्य
(ड) प्रभा
उत्तर:
(अ) उदासी
(ब) उत्साह
(क) भव्य
(ड) तेज

iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तर:
विज्ञानक्षेत्रामुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून आली आहे. विज्ञानाच्या साथीने शून्यातून नवीन जग उभारण्याचा आत्मविश्वास, जिद्द मानवात निर्माण होत आहे. मानवी जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी आणि प्रगतीच्या नवीन आशा निर्माण करण्यासाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे हा संदेश कवितेतून देण्यात आला आहे.

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे

v. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
यमकप्रधान रचना असलेली मुक्तछंदातील ही कविता आहे. क्रांती, जिद्द, उत्कर्ष, स्फुरली, तेज, संघर्ष, जोश यांसारख्या शब्दांतून मानवी जीवनात घडणाऱ्या सकारात्मक बदलांची जाणीव आपल्याला कविता वाचताना होते. कमीत कमी शब्दांत अधिकाधिक आशय आपल्यापर्यंत सहजसोप्या पद्धतीने पोहोचवण्यात ही कविता यशस्वी होते.

vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.
उत्तरः
दिवसेंदिवस अतिशय वेगाने विज्ञानक्षेत्रात प्रगती घडत आहे. विज्ञानाचे नवीन युग पृथ्वीवर अवतरल्यामुळे मानवाला प्रगतीचा, उत्कर्षाचा नवा मार्ग सापडला आहे. मानवी जीवनातील संकटांना दूर करणाऱ्या विज्ञानरूपी नवसूर्याचे तेज सर्वत्र पसरले आहे. विज्ञानयुगात सर्वत्र उत्साह व प्रगतीच्या आशा निर्माण झाल्यामुळे प्रेरणादायी व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे.

vii. प्रस्तुत कवितेतील पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा.
नवसूर्य पहा उगवतो
उत्कर्ष पहा झळकतो
संघर्ष हा बहरतो
उत्तर:
वैज्ञानिक प्रगतीमुळे नवीन पहाट उजाडली आहे, मानवी समाज प्रगतिपथावर आहे, सकारात्मक संघर्ष बहरत आहे.

viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर:
या कवितेमध्ये कवी विज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश आपल्याला देतात. विज्ञानयुगात माणसाने केलेली प्रगती अतिशय सोप्या शब्दांत प्रभावीपणे या कवितेत मांडली आहे.

त्याचप्रमाणे माणसाने संकटांवर मात करण्यासाठी विज्ञानाची कास धरावी हा सकारात्मक दृष्टिकोन या कवितेद्वारा मिळतो. म्हणून, मला ही कविता आवडली.

वरील आठ कृतींपैकी कृतिपत्रिकेत १-१ गुणाच्या २ कृती आणि २ गुणांची कोणतीही १ कृती विचारली जाते.

काव्यपंक्तींचे रसग्रहण

दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करताना कवितेचा विषय, आशय, संदेश त्यातील काव्यसौंदर्य, छंद व भाषिक वैशिष्ट्ये यांचे योग्य विश्लेषण करणे आवश्यक असते.
रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांमध्ये करावे.

१. आशय सौंदर्य
१. काव्यसौंदर्य
३. भाषिक वैशिष्ट्ये

१. पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

i. नसानसातुन जोश उसळतो नव आशा चित्ती’
अणूरेणूतुनि शब्द प्रगटति… ‘चला चला पुढती’
उत्तर:
कवी वि. भा. नेमाडे यांच्या ‘नव्या युगाचे गाणे’ या कवितेतील या काव्यपंक्ती आहेत. वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात घडलेली क्रांती हा या कवितेचा विषय असून विज्ञानाच्या नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीतून नवे जग निर्माण होईल, प्रगतीचा नवा मार्ग दिसल्यामुळे अणुरेणूतील शब्द प्रकट होऊन आपल्याला ‘चला, पुढे चला प्रगतिपथावर जा’ असे सांगतील. या ओळींतून कवीचा आशावाद व्यक्त झाला आहे.

विज्ञानाचा नवसूर्य उगक्ल्यामुळे मानवाच्या मनातील उदासी, दीनता, असहायता दूर होत आहे. त्यामुळे, नसानसांतून उत्साह सळसळत आहे. मनामनांत प्रगतीच्या नव्या आशा पल्लवित होत आहेत. या विज्ञानाच्या युगात सृष्टीच्या कणाकणांतून ‘चला चला पुढे चला’ असे सकारात्मक व प्रेरणादायी स्वर उमटत आहेत, हे या काव्यपंक्तीतून सांगितले आहे.

यमकप्रधान रचना असलेली ही कविता मुक्तछंदात लिहिलेली आहे. निवेदनात्मक शैलीद्वारे कवी आपल्याला विज्ञानयुगाचे महत्त्व सांगतानाच पुढे जाण्याची सकारात्मक ऊर्जा देतो.

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

२. ‘खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.

  1. अणूरेणू
  2. चला
  3. दिव्य
  4. झपाट्याने
  5. स्फुरली
  6. ज्वाला

उत्तर:

  1. नाम
  2. क्रियापद
  3. विशेषण
  4. क्रियाविशेषण अव्यय
  5. क्रियापद
  6. नाम

२. खालील शब्दांना लागलेले विभक्ती प्रत्यय ओळखून लिहा.

  1. अणूरेणूहून
  2. विज्ञानाची
  3. नसानसांत
  4. मानवतेच्या

उत्तर:

  1. हून
  2. ची
  3. च्या

३. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / विधानार्थी / आज्ञार्थी / उद्गारार्थी)

  1. विज्ञानाने मानवी जीवनात काय बदल घडवला ?
  2. किती क्रांती घडवली आहे विज्ञानाने!
  3. शून्यामधून विश्व घडव.
  4. मनात नवीन आशा निर्माण झाली आहे.

उत्तर:

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. आज्ञार्थी वाक्य
  4. विधानार्थी वाक्य

५. खालील वाक्यांचा काळ ओळखून लिहा.

  1. विज्ञानाच्या प्रकाशाने जगात क्रांती घडत आहे.
  2. अशांततेचा वणवा विझला असेल.
  3. तो सराव करत असे.
  4. अणूरेणूतून शब्द प्रगटत होते.

उत्तर:

  1. अपूर्ण वर्तमानकाळ
  2. पूर्ण भविष्यकाळ
  3. भूतकाळ
  4. अपूर्ण भूतकाळ

६. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.

  1. तो गाणे गातो.
  2. आज लवकर सांजावले.
  3. त्याने मिठाई खाल्ली.
  4. ती अभ्यास करते.

उत्तर:

  1. कर्तरी प्रयोग
  2. भावे प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग
  4. कर्तरी प्रयोग

७. खालील शब्दांचा संधिविग्रह करा.

  1. मन: + रंजन
  2. सम् + गती
  3. बहि: + अंग
  4. निः + रस

उत्तर:

  1. मनोरंजन
  2. संगती
  3. बहिरंग
  4. नीरस

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.

  1. जग
  2. मन
  3. लवकर
  4. उदासी

उत्तर:

  1. विश्व
  2. अंतर, चित्त
  3. झणि/ झणी
  4. खिन्नता

२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अशांतता ×
  2. खिन्नता ×
  3. उत्कर्ष ×
  4. प्रगती ×
  5. दुबळा ×
  6. आशा ×

उत्तर:

  1. शांतता
  2. प्रसन्नता
  3. अपकर्ष
  4. अधोगती
  5. सबळ, बलवान
  6. निराशा

३. खालील शब्दांचे वचन बदलून लिहा.

  1. वणवा
  2. होळी
  3. नस
  4. आशा

उत्तर:

  1. वणवे
  2. होळ्या
  3. नसा
  4. आशा

४. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

  1. नवयुग
  2. नवसूर्य

उत्तर:

  1. नव, युग, नग, वन, वग.
  2. नव, सूर्य, वन, वसू, सून.

५. खालील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.

  1. समाजात घडून येणारा मोठा बदल, परिवर्तन –
  2. समाजाकडून उपेक्षिलेले –
  3. आकाशातून गमन करणारा –
  4. विष्णूची उपासना करणारा –

उत्तर:

  1. क्रांती
  2. उपेक्षित
  3. खग
  4. वैष्णव

६. लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.

  1. क्राती / क्रांती / क्रान्ती / क्रातीं
  2. उत्कर्ष / उत्कर्श / उत्कर्ष / उत्र्कप
  3. स्फुरली / स्फुरली / स्फुरली / स्फुरली
  4. सघर्श / सन्घर्ष / संघर्ष / संघश

उत्तरः

  1. क्रांती
  2. उत्कर्ष
  3. स्फुरली
  4. संघर्ष

नव्या युगाचे गाणे कवितेचा आशय

‘नव्या युगाचे गाणे’ ही कविता कवी वि. भा. नेमाडे यांनी लिहिली असून ती ‘किशोर’, जानेवारी १९९८ या मासिकातून घेतली आहे. ‘विज्ञान’ क्षेत्रातील प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून आली आहे. विज्ञानाच्या साथीने शून्यातून नवीन जग उभारण्याचा आत्मविश्वास, जिद्द मानवात निर्माण होत आहे. मानवी जीवनातील नकारात्मक गोष्टी दूर होत आहेत, प्रगतीच्या नवीन आशा निर्माण होत आहेत, असा आशय कवितेत व्यक्त होतो.

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे

नव्या युगाचे गाणे कवितेचा भावार्थ

विज्ञानाची महती सांगताना कवी म्हणतो,
‘अणूरेणूतुनि……..दिव्य क्रांती’
सृष्टीच्या कणाकणांतून ‘चला चला पुढे चला’ असे प्रेरणादायी स्वर उमटत आहेत. दिवसेंदिवस अतिशय वेगाने विज्ञानक्षेत्रात प्रगती घडत आहे. विज्ञानरूपी ज्ञानाच्या प्रकाशाने सारे जग उजळून निघाले आहे. जगात दिव्य क्रांती घडत आहे.

‘नवयुग ……….. असे भव्य’
विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवीन युग पृथ्वीवर अवतरले आहे. त्याचे दिव्य तेज सर्वत्र पसरले आहे. विज्ञानाच्या साथीने शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रेरणा, जिद्द, आत्मविश्वास मानवात निर्माण झाला आहे.

‘हृदयांतरिच्या …….. नवा दिसला’
मानवजातीच्या हृदयातील अशांततेची आग त्वरित विझली आहे. मानवाला प्रगतीचा, उत्कर्षाचा नवा मार्ग सापडला आहे.

‘नवी चेतना ……… नवे आले’
विज्ञानाच्या साथीने मानवाच्या मनात चैतन्य संचारले, मानवी जीवनातील दुर्बलता, असहायता दूर झाली. निराशाजनक, नकारात्मक, वाईट विचार नष्ट झाले, म्हणजेच, त्यांची होळी झाली आणि त्यातून नव्या विचारांचे तेज सर्वत्र पसरले.

‘मानवतेच्या …….. माला’
माणुसकीच्या मार्गावर दाहक असे आगीचे लोळ उठत असले, म्हणजेच, या मार्गात कितीही संकटे आली तरीही आपण कायम टिकणाऱ्या विचारपुष्पांची माळ गुंफूया. एकता जपूया.

‘नको खिन्नता ……… बहरतो’
आता उदासी नको, दैन्य, असहायता नको; कारण आता विज्ञानरूपी नवसूर्य उगवला आहे. पाहा, विज्ञानामुळे मानवी समाजाचा उत्कर्ष कसा झळकतो आहे! आजवर मानवाने केलेला संघर्ष बहरास आला आहे.

‘नसानसातुन ………….पुढती’
नसानसांतून उत्साह सळसळत आहे. मनामनांत नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत. या विज्ञानाच्या युगात सृष्टीच्या कणाकणांतून ‘चला चला पुढे चला’ असे सकारात्मक व प्रेरणादायी स्वर उमटत आहेत.

नव्या युगाचे गाणे शब्दार्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 1

नव्या युगाचे गाणे वाक्प्रचार व त्याचा अर्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 2

नव्या युगाचे गाणे टिपा

Class 8 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer नव्या युगाचे गाणे 3

Leave a Comment