Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 5 सुरांची जादूगिरी

सुरांची जादूगिरी Question Answer

प्रश्न १.
चौकटी पूर्ण करा.

(अ)
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 40
उत्तर:
१. मंद, लयबद्ध, प्रौढ अन् दमदार
२. घास घातल्यावर भरडा होणारा
३. पीठ होताना सौम्य सुरांत येणारा
४. गळा मोकळा झाल्यावर प्रसन्न व कोमल सुरावट काढणारा

(आ)
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 39
उत्तर:
१. सुरांचे
१. शब्दांचे
३. आवाजांचे

प्रश्न २.
एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

(अ) खेडे जिथे विसावते ते ठिकाण –
उत्तर:
निसर्गाची लडिवाळ मांडी

(आ) खेड्याला दिलेली उपमा –
उत्तर:
ताजी व टवटवीत रानफुले

(इ) लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वादय-
उत्तर:
दळणाचे जाते

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

प्रश्न ३.
का ते लिहा.

(अ) घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते; कारण…
उत्तरः
लेखकाला अर्धवट जाग आलेली असते आणि त्याच वेळी अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असतो.

(आ) कंटाळलेले वासरू टाहो फोडते; कारण…
उत्तर:
ते दुधासाठी आसुसलेले असते.

प्रश्न ४.
खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

(अ) पहाटेला पुरती जाग आली नव्हती.
उत्तर:
हे वाक्य उत्तररात्र आणि पहाट यांना जोडणाऱ्या काळाचे वर्णन करते. या क्षणी रात्र संपून पहाटेचे आगमन होणार असते आणि सारी सृष्टी गाढ झोपेत असते. पहाट उजाडायला काही क्षण अवधी असल्याचा क्षण लेखकाने येथे नेमका टिपला आहे.

(आ) थोड्या वेळाने दिशांना आकार आला.
उत्तरः
अंधारामध्ये गुडूप झालेल्या दिशा पहाट होऊ लागताच प्रकाशाने स्वच्छ दिसू लागल्या. आजूबाजूचा परिसर अंधारातून बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला.

(इ) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला.
उत्तर:
पहाटेच्या वेळी आईने लावलेल्या चिमणीचा प्रकाश त्या गच्च अंधाराला पातळ करतो. त्या चिमणीच्या पिवळसर प्रकाशात घरातील प्रत्येक वस्तू न्हालेली असते.

प्रश्न ५.
योग्य जोड्या लावा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 41
उत्तर:
(i – ड),
(ii – इ),
(iii – अ),
(iv – ब),
(v – क)

प्रश्न ६.
‘आवाजाची सोबत’ ही संकल्पना तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
आपल्या अवतीभोवती सतत आवाजांची रेलचेल असते. कधी गाडीचा आवाज, कधी गाण्यांचे आवाज, तर कधी मंदिरातील घंटेचा आवाज. असे एक ना अनेक आवाज सतत आपली सोबत करत असतात. रात्रीच्या वेळीही रातकिड्यांची किरकिर सुरूच असते. निरव शांततेचाही आपला एक वेगळाच आवाज असतो. आवाज आपल्याला कधीही एकटेपणा जाणवू देत नाही. शांतपणे मन एकाग्र करून या आवाजांचा शोध घेतला, तर हे आवाज निश्चितच आपल्याला साथ करत असतात. काही वेळा कर्कश आवाज नकोसे वाटतात. गर्दीचा गोंगाट नकोसा वाटतो; पण घरात एकटे असताना शेजारच्या लहानग्यांचा आवाजही आधार देणारा वाटतो. त्यामुळे, ‘आवाजाची सोबत’ हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे असे आपण म्हणू शकतो.

प्रश्न ७.
दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 42
उत्तर:

ऐकावेसे वाटणारे आवाज त्रासदायक वाटणारे आवाज
पक्ष्यांचा किलबिलाट, झऱ्याचा खळखळाट, पैंजणांची छुमछुम, वाऱ्याचे गुज, बांगड्यांची किणकिण, शाळेतील प्रार्थना, पानांची सळसळ, शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत, लहान बाळाचे बोबडे बोल, वासराचे हंबरणे, पावसाची रिमझिम इत्यादी. गाड्यांचे भोंगे, बाजारातील गोंधळ, ध्वनिक्षेपकांचा आवाज, विमानांचा आवाज, फटाक्यांचे आवाज, कारखान्यातील यंत्राचे कर्कश आवाज इत्यादी.

प्रश्न .
‘भाषेतील सौंदर्य’, या दृष्टीने परिच्छेदातील वाक्ये शोधून लिहा.
उदा. निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
उत्तर:

  1. अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात.
  2. खेड्यातला दिवस हा जणू पायांत आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो.
  3. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते, तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते.

खेळूया शब्दांशी

(अ) पाठाधारे विशेष्य- विशेषणांच्या जोड्या लावा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 22
उत्तर:

विशेषण विशेष्य
i. आसुसलेला टाहो
ii. मुलायम स्पर्श
iii. लडिवाळ मांडी
iv. भरभरीत झांज
v. कुर्रेबाज तान
vi. किरटा आवाज

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

(आ) तक्ता पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 23
उत्तरः

शब्द सामान्यरूप विभक्ती प्रत्यय
i. सुराने सुरा ने
ii. सुरात सुरा
iii. सुराचे सुरा चे
iv. सुराला सुरा ला
v. सुराशी सुरा शी

चर्चा करूया

*१. विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा.

उपक्रम :

(१) पाठात वर्णन केलेली ग्रामजीवनातील कोणकोणती दृश्ये सध्याच्या काळात तुमच्या परिसरात तुम्हांला दिसत नाहीत त्याची यादी करा. वर्गात वाचन करा.

(२) पाठात आलेले आवाज क्रमाने लिहा व वाचून दाखवा.

आपण समजून घेऊया.

• खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा.

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 24
उत्तर:
(अ) मी
(आ) पत्र
(इ) लिहिणे

वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता ↔ क्रियापद, कर्म ↔ क्रियापद या संबंधाला ‘प्रयोग’ असे म्हणतात.

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 26

आता आपण प्रयोगांचे प्रकार सविस्तर अभ्यासूया.

(१) कर्तरी प्रयोग

• वाक्याच्या शेवटी ‘येणे’ या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

१. मी शाळेतून आत्ताच ………….. (येणे)
२. ती शाळेतून आत्ताच ……… (येणे)
३. रवी शाळेतून आत्ताच ……. (येणे)
४. विदयार्थी शाळेतून आत्ताच ……. (येणे)
उत्तर:
१. मी शाळेतून आत्ताच आलो./ आले.
२. ती शाळेतून आत्ताच आली.
३. रवी शाळेतून आत्ताच आला.
४. विद्यार्थी शाळेतून आत्ताच आला. / आले.

जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते, तेव्हा त्यास ‘कर्तरी प्रयोग’ असे म्हणतात.

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 29

उदा., खालील वाक्यांमध्ये ‘जाणे’ हे क्रियापद कर्त्याप्रमाणे बदललेले दिसते.

(अ) तो शाळेत जातो.
(आ) ती शाळेत जाते.
(इ) ते शाळेत जातात.
(ई) तू शाळेत जातोस.

• कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्ये पूर्ण करा.

१. मुली क्रिकेट …….. (खेळणे)
उत्तर:
मुली क्रिकेट खेळतात.

२. तुम्ही क्रिकेट …….. (खेळणे)
उत्तर:
तुम्ही क्रिकेट खेळता.

३. आम्ही क्रिकेट ……… (खेळणे)
उत्तर:
आम्ही क्रिकेट खेळतो.

४. जॉन क्रिकेट …….. (खेळणे)
उत्तर:
जॉन क्रिकेट खेळतो.

५. समीरा क्रिकेट …… (खेळणे)
उत्तर:
समीरा क्रिकेट खेळते.

पत्रलेखन

पत्र हे आपल्या मनातले भाव/विचार दुसऱ्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवायचे उत्तम साधन आहे.
मागील इयत्तांमध्ये तुम्ही ‘पत्रलेखन’ या घटकाचा अभ्यास केला आहे. पत्रलेखनाच्या विषयानुसार पत्राचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

(१) औपचारिक पत्र
(२) अनौपचारिक पत्र

आत्तापर्यंत तुम्हांला या पत्रप्रकारांची ओळख झालेली आहे.

लक्षात घ्या- आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणे कमी झाले आहे. तरीही आपल्याला अर्ज करणे, मागणी करणे, विनंती करणे अशा काही कारणांसाठी पत्र लिहिणे आवश्यक असते व पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी या इयत्तेत तुम्हांला औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप समजून घेऊया.

• औपचारिक पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी :

(१) ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा.
(२) भाषा सरळ, सुगम, सुस्पष्ट व विषयानुरूप असावी.
(३) पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे.
(४) ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा.
(५) पत्राची भाषा लेखननियमांनुसार असावी.

• औपचारिक पत्र लिहिण्यासाठी खाली दिलेल्या प्रारूपाचा अभ्यास करा.

औपचारिक पत्र प्रारूप

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 34

कृती – वरील प्रारूपाचा अभ्यास करून खालील विषयावर पत्रलेखन करा.

तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा.

टीप : औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारची पत्रे आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजे ईमेलद्वारा पाठवली जातात. ईमेल पाठवण्याचे पत्राचे प्रारूप व तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

वाचा.

• खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.

रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते आज उमललेले फूल उदया कोमेजून जाणार असते पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही दुसऱ्याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की मुलांनो आजचा दिवस आपला आहे या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा दुसऱ्यांना आनंद सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

• खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या ऊर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.

नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो.
असे सुखदुःखाचे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या संघर्षाला जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 सुरांची जादूगिरी Question Answer

संकलित मूल्यमापन

परिच्छेद १

कृती १ – आकलन

१. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 5
उत्तर:
१. कुर्रेबाज
२. नखरेल
३. आसमंत भारून टाकणाऱ्या

२. वैशिष्ट्ये लिहा.
i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 6
उत्तर:
१. सौंदर्याने माखलेला
२. नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 7
उत्तरः
पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येणारा

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 8
उत्तर:
१. विशिष्ट लय असलेली
२. विशिष्ट ठेक्यात असलेली

३. कोण ते लिहा.

  1. पहाटेच्या आधी हमखास जाग येणारा –
  2. मनात मुरवायला छान वाटावी अशी साद घालणारा –
  3. कोंबड्याला नि:शब्द मनाने साद घालणारे –

उत्तर:

  1. खेड्यामध्ये टोपलीखाली झाकून ठेवलेला कोंबडा
  2. कोंबडा
  3. आपण

४. ओघतक्ता पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 9
उत्तर:
१. हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते.
२. सादाला प्रतिसाद दिला जातो.

[निसर्गाचा लडिवाळ ………
……… साद घालत असतो.]

कृती २ – आकलन

१. परिणाम लिहा.
वस्तीवरच्या एका कोंबड्याने बांग दिली.
परिणामः त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो.

२. का ते लिहा.
अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात; कारण…
उत्तर:
निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला, नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. ‘खेड्यातला दिवस हा जणू पायांत आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो.’ या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:
खेडे आणि शांतता यांचे अतूट नाते असते. या शांततेमध्ये खेड्यातील प्रत्येक आवाज सौंदर्य भरत असतो. या शांततेत नानाविध आवाजांची प्रकर्षाने जाणीव होते. त्यामुळे, आवाज कोणत्याही गोंधळात हरवत नाहीत. खेड्यातील सकाळ ही अशीच आवाजांची मेजवाणी घेऊन येते. पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरातील घंटानाद, प्रार्थनेचे सूर, गुरांच्या गळ्यातील घंटानाद, कामाची लगबग करणाऱ्या बायकांच्या हातातील बांगड्यांचा नाद अशा कित्येक आवाजांनी दिवसाची सुरुवात होते. पायांतील पैंजणांची छुमछुम जशी मनात आनंदाचे उधाण आणते त्याचप्रमाणे खेड्यातील दिवसही आपल्या पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येतो आणि प्रत्येकाच्या मनात आनंद पसरवतो.

परिच्छेद २

कृती १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 10
उत्तर:
१. घरातल्या बायका जाग्या होतात
२. चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला त्या पातळ करतात
३. झोपलेल्या जात्याला त्या गायला लावतात

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 11
उत्तर:
१. जात्याच्या आवाजाच्या छोट्या-मोठ्या ताना
२. त्याच्या हरकती

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 13
उत्तर:
१. आईच्या अपार कष्टाचा
२. आईच्या अपार मायेचा

२. एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

  1. जात्यातून पीठ भुरुभुरु पडावे, तसे सांडत असलेले –
  2. जात्याच्या संगीताला साथ देणाऱ्या
  3. शब्दातीत असलेली खुमारी असणारे –

उत्तर:

  1. जात्याचे संगीत
  2. आईच्या गळ्यातील गोड ओव्या
  3. जात्याचे संगीत

[त्यानंतर संगीताचे ……..
……खुमारी केवळ शब्दातीत.]

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

कृती २ – आकलन

१. हे केव्हा घडते ते लिहा.

i. आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो, जेव्हा……..
उत्तरः
जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आपण आईच्या उबदार आणि मंदपणे हालणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकत असतो.

ii. आपण आपले उरत नाही, जेव्हा…
उत्तरः
जात्याच्या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते आणि त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्नं प्रकट होत असतात.

३. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने परिच्छेदातील वाक्ये शोधून लिहा.
उदा. निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
उत्तर:

  1. घराघरांतल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत, झोपलेल्या जात्याला गायला लावतात.
  2. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ अन् दमदार आवाज छोट्या-मोठ्या ताना व हरकती घेत आसमंतात भरून जातो.
  3. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त झालेले असते.
  4. जात्याचे संगीत साऱ्या अंगावर, जात्यातून पीठ भुरुभुरु पडावे तसे, सांडत असते.

परिच्छेद ३

कृती १ आकलन

१. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 14
उत्तर:
१. घराच्या भिंती
२. अंगण
३. झाडाच्या फांदया

२. चौकट पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 15
उत्तरः
वादयवृंद

[थोड्या वेळाने दिशांना ………..
………. झांज मध्येच वाजते.]

कृती २ – आकलन

१. योग्य जोड्या लावा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 16
उत्तर:
i. – क,
ii. – ड,
iii. – अ,
iv. – इ,
v. – ब,

१. हे केव्हा घडते ते लिहा.

i. चिमण्यांना कंठ फुटतो, जेव्हा…
उत्तरः
थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतात.

ii. आवाजांची एक वेगळीच मैफल निर्माण होते, जेव्हा…
उत्तरः
परस्परांना पूरक असणारे अन् तरीही भिन्नत्व असणारे नानाविध आवाज परस्परांत कालवले जातात.

२. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने परिच्छेदातील वाक्ये शोधून लिहा.
उदा. निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या
खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
उत्तर:

  1. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो.
  2. अवतीभवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते.
  3. सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते.

कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती

१. तुम्ही निसर्गातील आवाजांच्या मैफिलीचा अनुभव घेतला आहे का?
उत्तर:
होय. निसर्गाची अनोखी मैफल मी अनुभवली आहे. पावसाळ्याचा प्रारंभीचा काळ होता. मी वाचत बसलो होतो. अचानक खिडकीतून सूसूऽऽ करत वारा आला. त्याचा आवाज पावसाच्या आगमनाची सूचना घेऊन आला होता. मी क्षणात गच्चीवर जाऊन पोहोचले. ढग दाटून आले होते. एकमेकांवर आदळत गडगडाट करत होते. विजांचा कडकडाट सुरू होता. अशात कावळे, बुलबुल या साऱ्या पक्ष्यांची लगबग सुरू झाली होती. कावळ्यांची कावकाव, बुलबुलचा मधुर आवाज जणू या पावसाचे स्वागत करत होते. या आवाजांची जुगलबंदी काही काळ रंगली आणि मग वरुण राजाचे आगमन झाले. सारा परिसर त्याच्या रिमझिम आवाजात न्हाऊन गेला. स्वयंपाकघरात, कढईत भजी सोडल्याचा चर्रर्रऽऽ आवाज आला आणि या मैफिलीची पूर्तता झाल्यासारखी वाटली.

परिच्छेद ४

कृती १ – आकलन

१. एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

  1. या संगीतात जादू असते –
  2. वातावरणाला भारभूत करणारे –
  3. वातावरणाला छेदून अवकाशात जाणारा

उत्तर:

  1. धारेच्या
  2. जनावरांचे हंबरणे
  3. लहान मुलांचा आवाज

[गोठ्यात बांधलेल्या ………..
………. अवकाशात जात असतो.]

कृती २ – आकलन

१. तक्ता पूर्ण करा.

i. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज ——————
ii. भांड्याच्या गळ्याशी दूध आल्यावर होणारा आवाज ——————-

उत्तरः

i. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा
ii. भांड्याच्या गळ्याशी दूध आल्यावर होणारा आवाज गंभीर अन् वजनदार

२. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने परिच्छेदातील वाक्ये शोधून लिहा.
उदा. निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
उत्तर:

  1. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात.
  2. त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एकतारीचा सूर छेडत असते.
  3. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो.
  4. गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर अन् वजनदार बनतो.

कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती

१. शहरापेक्षा गावी आवाजांचा आनंद अधिक चांगला घेता येतो, असे तुम्हांला वाटते का?
उत्तर:
हो. शहरापेक्षा गावी अधिक शांतता, अधिक स्थैर्य असल्याने येथील आवाजांचा आनंद आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो. येथील पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरातील घंटानाद, भजनाचे सूर, पानांची सळसळ सारे काही कानांपर्यंत सहज पोहोचते. त्यामुळे, या आवाजांमधील माधुर्य मनापर्यंतही सहज पोहोचते; पण शहरातील हे मधुर आवाज वाहनांच्या, टिव्ही, मोबाइलच्या, ध्वनिक्षेपकांच्या, माणसांच्या गर्दीच्या आवाजात हरवून जातात. हे आवाज कानी पोहोचत नसल्याने शहरातील माणूस या आनंदापासून वंचित राहतो. शहरातील माणसे सतत घड्याळाच्या काट्यावर धावत असतात. त्यांना संथ, नाजूक, हळुवार आवाजाचा आनंद घ्यायला वेळही मिळत नाही. गावी मात्र संथ आयुष्य असल्याने हे आवाज हळुवार टिपून त्यांचा आस्वाद निवांतपणे घेता येतो.

परिच्छेद ५

कृती १ – आकलन

२. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 19
उत्तर:
१. घरातल्या भांड्यांचा आवाज
२. भाकरी थापण्याचा आवाज
३. काटक्या मोडण्याचा आवाज
४. कोरड्याशाला फोडणी दिल्याचा तड्तड् आवाज
५. ताक घुसळताना होणारा माठाचा आवाज

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

२. खालील चौकटी पूर्ण करा.

  1. स्स् स्स् आवाज करणारी → □
  2. किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या → □
  3. मधल्या पट्टीचा आवाज असणारे → □
  4. वातावरणाला जिवंतपणा आणणारे → □

उत्तर:

  1. गौळण
  2. कोंबड्या
  3. नवजात लेकरू
  4. एकमेकांत कालवलेले आवाज

[घरातल्या भांड्यांचे ………….
………… संमेलनात तरंगत जाते.]

कृती २ – आकलन

१. आवाज ओळखा.

  1. तड्तड्
  2. खळखळ
  3. सळसळ
  4. फाटकन

उत्तर:

  1. कोरड्याशाला दिलेली फोडणी
  2. ओढा
  3. पाने
  4. चाबुक

२. हे केव्हा घडेल ते लिहा.
आवाजांची दुनिया आपल्याभोवती फेर धरू लागेल,
जेव्हा…
उत्तरः
आपण कानांत प्राण आणून ते आवाज ऐकू.

*३. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने परिच्छेदातील वाक्ये शोधून लिहा.
उदा. निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
उत्तर:

  1. ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज.
  2. आपण कानांत प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्याभोवती फेर धरू लागते.

कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती

१. ‘एकमेकांत कालवलेले आवाज वातावरणाला जिवंतपणा आणतात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तरः
वातावरणातील आवाज हे माणसांना नकळतपणे सोबत करत असतात. या आवाजांमुळे आपल्याला एकटेपणा फारसा बोचत नाही. कुणीतरी आपल्यासोबत, आपल्या आजूबाजूला आहे, याची जाणीव मनाला फार सुखावणारी असते. निर्जन बेटावर एकटे असताना पाण्याचा झुळझुळ आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळदेखील वातावरण जिवंत करते. आपली सोबत करते. शांत-भकास वातावरण मानवाला एका मर्यादेनंतर खायला उठते. अशा वेळी वातावरणातील हे आवाज जगण्याला प्रेरणा देतात. दिवसभराचा थकवा क्षणार्धात दूर करतात. मानवाचे वातावरणातील या आवाजांशी एक अनोखे नाते जुळते आणि हे आवाज त्याच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होतात.

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

६. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी वाक्य / विधानार्थी वाक्य / आज्ञार्थी वाक्य / उद्गारार्थी वाक्य)

  1. साऱ्या कोंबड्यांना पहाटे कंठ फुटतो.
  2. किती आवाज म्हणून सांगावेत ?
  3. मंदपणे हलणाऱ्या पापण्या मिटतात.
  4. दप्तर घेऊन ये.
  5. किती मायेचा स्पर्श असतो आईचा !

उत्तर:

  1. विधानार्थी वाक्य
  2. प्रश्नार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य
  4. आज्ञार्थी वाक्य
  5. उद्गारार्थी वाक्य

७. खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. मोहरून जाणे
  2. डालून ठेवणे
  3. कंठ फुटणे
  4. पापण्या जड होणे
  5. पापण्या मिटणे
  6. भारभूत करणे
  7. कानांत प्राण आणून ऐकणे

उत्तर:

  1. मोहरून जाणे – फुलून जाणे.
    वाक्य:वसंताचे आगमन होताच सारी सृष्टी मोहरून गेली.
  2. डालून ठेवणे – झाकून ठेवणे.
    वाक्य:संध्याकाळ होताच कोंबड्यांना टोपलीखाली डालून ठेवले जाते.
  3. कंठ फुटणे – आवाज उमटणे.
    वाक्य:पावसाळा जवळ येताच कोकीळ पक्ष्याला जणू कंठच फुटतो.
  4. पापण्या जड होणे – झोप येणे.
    वाक्यः आईची अंगाई ऐकताना हळूहळू प्रापण्या जड होऊ लागतात.
  5. पापण्या मिटणे – झोप लागणे.
    वाक्य: आजीची गोष्ट ऐकताऐकता आपोआप पापण्या मिटतात.
  6. भारभूत करणे – भारून टाकणे, व्यापून टाकणे.
    वाक्य:त्या साधूचे धीरगंभीर सूर पहाटेचे वातावरण भारभूत करत होते.
  7. कानांत प्राण आणून ऐकणे – लक्षपूर्वक ऐकणे.
    वाक्य: कोरोनापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती मुले कानांत प्राण आणून ऐकत होती.

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

*१. या पाठातील ‘वाचा’ अंतर्गत दिलेला उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
उत्तर:
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले, की मन कसे प्रसन्न होऊन जाते! आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक, टवटवीत, गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. आज उमललेले फूल उदया कोमेजून जाणार असते; पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसऱ्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते हसत – बागडत राहते. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना, की ‘मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख, समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे. ‘

२. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. खेडे
  2. अलंकार
  3. मस्तक
  4. आवाज
  5. माठ
  6. पोपट
  7. रात्र
  8. देऊळ

उत्तर:

  1. गाव, ग्राम
  2. दागिने
  3. डोके, शीर, ललाट
  4. ध्वनी, रव
  5. मडके
  6. रावा, राघू
  7. निशा, रजनी
  8. मंदिर, राऊळ

३. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. टवटवीत ×
  2. दिवस ×
  3. प्रसन्न ×
  4. कोमल ×
  5. अनोळखी ×

उत्तर:

  1. कोमेजलेला
  2. रात्र
  3. अप्रसन्न
  4. राकट, कडक
  5. ओळखीचा, परिचित

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

४. खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. कोंबडा
  2. आई
  3. चिमणी
  4. कावळा
  5. गाय
  6. कुत्रा
  7. बकरा

उत्तर:

  1. कोंबडी
  2. बाबा
  3. चिमणा
  4. कावळी
  5. बैल
  6. कुत्री
  7. बकरी

५. शब्दांनंतर ‘दार’ हा प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
उबदार, दमदार, वजनदार, बाकदार, टोकदार, पिळदार.

वाचा

*१. या पाठातील ‘वाचा’ अंतर्गत येणारा दुसरा उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.
(टीप : या कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील गदय आकलन पाहावे.)

सुरांची जादूगिरी पाठाची पार्श्वभूमी

प्रस्तुत पाठ म्हणजे ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या, तेथील संस्कृतीशी एकात्म झालेल्या आवाजांचे सुंदर वर्णन होय. लेखकाने निसर्गातील पशुपक्षी, झाड़े, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे आवाज हळुवारपणे टिपून त्यातून मिळणाऱ्या आनंदाचे सुरेख वर्णन या पाठात केले आहे.

सुरांची जादूगिरी शब्दार्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 1
Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 2

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी

सुरांची जादूगिरी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 3

सुरांची जादूगिरी टिपा

Class 8 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer सुरांची जादूगिरी 4

Leave a Comment