Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 16 Question Answer चोच आणि चारा for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer चोच आणि चारा
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 16 चोच आणि चारा
चोच आणि चारा Question Answer
प्रश्न १.
खालील आकृती पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
१. कालसुसंगत
२. उपयोगी
३. आवश्यक
(आ)
उत्तर:
१. पक्ष्यांचा रंग
२. उडण्याची किंवा बसण्याची पद्धत
३. चोचीचा आकार
(इ)
उत्तर:
१. चिखलातून किंवा झाडान्या खोडातून अन्न शोधण्यासाठी
२. बिया फोडण्यासाठी
३. शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करण्यासाठी
૪. घरटे बांधण्यासाठी
५. पिल्लांना भरवण्यासाठी
६. झाडावर चढण्यासाठी किंवा वेलीवर लटकण्यासाठी
प्रश्न २.
एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) चोचीचा वरचा भाग –
उत्तर:
मॅक्सिला
(आ) चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग-
उत्तर:
एग टूथ
(इ) चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिल्या क्रमांकाचा पक्षी-
उत्तर:
धनेश म्हणजेच हॉर्नबिल
(ई) ‘एग टूथ’ नसलेला पक्षी-
उत्तर:
किवी
प्रश्न ३.
कोण ते लिहा.
(अ) ‘अग्निपंख’ हे नाव सार्थ करणारा पक्षी-
उत्तर:
गुलाबी फ्लेमिंगो
(आ) चोचीचा सर्वांत वेगळा उपयोग करणारा पक्षी-
उत्तर:
पोपट
(इ) ‘शक्करखोरा’ म्हणून ओळखले जाणारे पक्षी-
उत्तर:
चिमुकले शिंजीर / सनबर्ड्स
(ई) घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी-
उत्तर:
सुगरण
प्रश्न ४.
फरक लिहा.
किवी पक्षी | इतर पक्षी |
उत्तर:
किवी पक्षी | इतर पक्षी |
i.चोचीवर असणारी छिद्रं म्हणजेच बाह्य श्वसनेंद्रिय चोचीच्या टोकावर असतात. | इतर पक्ष्यांमध्ये चोचीवर असणारी छिद्रं म्हणजेच बाह्य श्वसनेंद्रिय चोचीच्या सुरुवातीला असतात. |
ii. किवी पक्ष्याच्या पिल्लांना ‘एक टूथ’हा चोचीवरील चिमुकला दात नसतो. | इतर पक्ष्यांच्या पिल्लांना ‘एक टूथ’ हा चोचीवरील चिमुकला दात असतो. |
iii. किवी पक्ष्याची पिल्ले लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात. | इतर पक्ष्यांची पिल्ले ‘एग टूथ’ च्या मदतीने आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतात. |
प्रश्न ५.
पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) ‘चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात’ या विधानाचा अर्थ.
उत्तर:
जीवन जगता यावे आणि आपली दैनंदिन कामे सहजगत्या पार पडावीत याकरिता प्रत्येक प्राण्यामध्ये, पक्ष्यामध्ये त्यांना अनुकूल असे बदल झालेले दिसतात. पक्ष्यांना असलेली चोच याच अनुकूलतेशी संबंधित आहे. विविध पक्षी हे निसर्गातील विविध घटकांवर अन्नाकरिता अवलंबून असतात. काही पक्षी फळं खातात, काही चिखलातून, झाडाच्या खोडातून अन्न शोधतात, काही पक्षी बिया फोडून त्यातून अन्न मिळवतात, तर काही पक्षी मासे किंवा इतर प्रकारच्या मांसाचे भक्षण करतात. काही पक्षी पाण्यातून अलगद माशांवर झेपावतात. असे विविध प्रकारचे भक्ष्य मिळण्याकरिता विविध पक्ष्यांमध्ये विविध प्रकारच्या चोची निसर्गत: असलेल्या दिसून येतात. उदा. फ्लेमिंगो पक्ष्याची चोच मध्येच वाकडी असते. त्यामुळे पाण्यातील, चिखलातील अन्न सहज बाहेर काढणे त्याला शक्य होते. गरुड, घार, ससाणा इत्यादी शिकारी पक्ष्यांच्या चोची अणकुचीदार आणि बाकदार असतात. यामुळे, भक्ष्य पकडणे, ते फाडणे, त्याचे तुकडे करणे त्यांना सुलभ होते. सुतार, हुप्पा यांची चोच सरळसोट असून त्यांना जमिनीवरचे किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढणे सोपे जाते. शक्करखोरासारख्या पक्ष्यांच्या चोची शरीरापेक्षा लांब, बाकदार असतात. त्यामुळे, फुलांतील मधुरस चोखणे त्यांना सहज शक्य होते. अशाप्रकारे, जसा अन्नाचा स्रोत असेल, जसे भक्ष्य असेल तसे चोचींचे आकार बदलतात, हे आपल्या लक्षात येते.
(आ) पक्ष्यांच्या चोचपुराणातून तुम्हांला मिळालेली नवीन माहिती.
उत्तरः
पक्ष्यांच्या चोचपुराणातून निसर्गाची किमया माझ्या ध्यानात आली. एग टूथ, बाह्य श्वसनेंद्रिये, त्यांची कार्ये चोचींचे विविध उपयोग यांची शास्त्रीय माहिती मिळाली. त्यातूनच लक्षात आले की निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यात अनेक जीव जन्म घेतात आणि प्रत्येक जीवाला स्वतःचे असे एक स्वतंत्र स्थान आहे. हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी निसर्गाने प्रत्येकालाच काही आयुधं हत्यारं दिली आहेत. ज्यांच्या बळावर प्रत्येक सजीव आपल्या मूलभूत गरजा भागवून आपले रक्षण करण्यास समर्थ असतो. पक्ष्यांना लाभलेली चोच हेदेखील त्यांचे एक आयुचच आहे. ही चोच या पक्ष्यांना अन्न मिळवून देण्यासाठी, घरटी बांधण्यासाठी मदत करते, स्वसंरक्षणासाठी मदतगार ठरते. हे आयुध तो पक्षी राहत असलेल्या प्रदेशात म्हणजेच अधिवासात टिकून राहण्याकरिता मदतगार ठरते. यावरून लक्षात येते, की अधिवास, अन्नाची उपलब्धता यांनुसार ही आयुधं, त्यांची रचना बदलते. त्यामुळे निसर्गामध्ये समतोल राखण्यास मदत होते.
(इ) ‘ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो’ या म्हणीचा अर्थ.
उत्तर:
निसर्गाचा पसारा अफाट आहे. यातील प्रत्येक जीव हा या निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. या निसर्गातील प्रत्येक घटकाचे विशिष्ट असे स्थान आहे. हे स्थान ज्याने निर्माण केले आहे तो केवळ या जीवांची निर्मिती करून थांबला नाही. या जीवांचे स्थान कायम रहावे याकरिता त्यांनी निसर्गात टिकून राहावे याकरिता निसर्गाने त्यांना काही आयुधं, हत्यारं बहाल केली. ज्या निसर्गाने या जीवांना जन्म दिला त्याच निसर्गाने या जीवांच्या मूलभूत गरजा भागवण्याची सोयही केली. उदाहरणार्थ, उंटासारख्या प्राण्याला वाळवंटात जन्मास घातले. तेथे पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने प्राण्यांना जगता येणे अवघड असतानाही उंट मात्र तेथे टिकून आहे; कारण त्याच्या कुबडामध्ये चरबीच्या स्वरूपात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या निसर्गानेच निर्माण केली आहे. दुसरे उदाहरण दयायचे झाले, तर माणसाला पोहायला शिकावे लागते; मात्र पाण्यातच जगू शकणाऱ्या माशाला जन्मजातच पोहोण्याची कला अवगत असते. यावरून निसर्गाने ज्या सजीवांची निर्मिती केली आहे. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी, संकटांवर मात करून आपले अस्तित्व टिकवण्याची ताकद ही त्याच्या अंगी दिली आहे असा अर्थ या म्हणीतून प्रतीत होतो.
प्रश्न ६.
खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे अधोरेखित करा.
(अ) सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात.
उत्तर:
आरामात
(आ) बहिणाबाईंनी सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं.
उत्तर:
अचूक
(इ) तुम्ही पक्ष्यांचे बारकाइने निरीक्षण करा.
उत्तर:
बारकाईने
(ई) घार आपली शिकार घट्ट पकडते.
उत्तर:
घट्ट
प्रश्न ७.
पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.
उत्तर:
या पाठात आलेली म्हण : ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो.
वाक्य: मानवाकडे तीक्ष्ण दात नाहीत, की अणकुचीदार नखं नाहीत. रात्री स्पष्ट दिसेल असे डोळे नाहीत आणि वेगाने पळता येईल असे पायही नाहीत; पण तरीही निसर्गाने त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याला सर्वांत अधिक बुद्धी मात्र दिली आहे. खरंच! ‘ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो.’ हेच खरे.
खेकूया शब्दांशी.
प्रश्न (अ). खाली दिलेल्या चित्रांसाठी योग्य विशेषणे सुचवा व त्याखालील चौकटीत लिहा.
i.
उत्तर:
लाल, टवटवीत, सुंदर, नाजूक.
ii.
उत्तर:
सुंदर, मनमोहक, रंगीबेरंगी, आकर्षक, ऐटबाज.
(आ) खाली दिलेल्या चौकोनातील शब्द असेच लिहा.
उत्तर:
औषधांपासून – सुधा औषधांपासून चार हात लांबच राहते.
औषधांचा – मला औषधांचा वास अजिबात आवडत नाही.
औषधांतून – औषधांतून शरीरास उपयुक्त अशी अनेक रसायने पुरवली जातात.
औषधांनी – औषधांनी बरेचसे आजार बरे होतात.
औषधांच्या – लहान मुलांपासून औषधांच्या बाटल्या लांब ठेवाव्यात.
औषधांवर – औषधांवर असलेली तारीख पाहूनच औषधे घ्यावीत.
औषध – आई मला लहानपणी औषध मधासोबत देत असे.
औषधांना – औषधांना नेहमी कोरड्या जागी ठेवावे.
आपण समजून घेऊया.
(१) अव्ययीभाव समास
* खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा.
(अ) गरजूंना यथाशक्ती मदत करावी.
(आ) त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत.
(इ) क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.
तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये पाहूया.
उत्तर:
(अ) यथाशक्ती
(आ) जागोजागी वाचनालये
(इ) आमरण
* खालील विग्रहांपासून सामासिक शब्द तयार करा.
(१) प्रत्येक गावी
(२) जन्मापासून
(३) प्रत्येक पावलावर
उत्तर:
(१) गावोगावी
(२) आजन्म
(३) पावलोपावली पदोपदी
(२) तत्पुरुष समास
* खालील उदाहरणे अभ्यासा व त्यांतील सामासिक शब्द शोधा.
(अ) अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत.
(आ) मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
(इ) कया सप्ताहात क्रीडामहोत्सव आहे.
शब्द | विग्रह |
तोंडपाठ | तोंडाने पाठ |
महाराष्ट्र | महान असे राष्ट्र |
सप्ताह | सात दिवसांचा समूह |
उत्तर:
तोंडपाठ, महाराष्ट्र, सप्ताह, क्रीडामहोत्सव, महोत्सव.
* खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(१) राजपुत्र
(२) क्रीडांगण
(३) अष्टकोन
(४) अयोग्य
उत्तर:
(१) राजाचा पुत्र
(२) क्रीडेसाठी अंगण
(३) आठ कोनांचा समूह
(४) नाही योग्य ते नाही योग्य जे असे
भाषासौंद्य
* खालील म्हणी पूर्ण करा.
(१) मूर्ती लहान पण ……………… .
(२) शितावरून …………… .
(३) सुंठीवाचून …………….. .
(४) ……………… सोंगे फार.
(५) …………… खळखळाट फार.
(६) दोघांचे भांडण ……………… .
(७) …………… सव्वालाखाची.
(८) ……………… चुली.
(९) ……………… आंबट.
(१०) अंथरूण पाहून ……………… .
(११) इकडे आड …………….. .
(१२) ……………. गावाला वळसा.
(१३) ……………… तळे साचे.
(१४) …………………… उपाशी.
(१५) ………………. आरसा कशाला?
उत्तर:
(१) मूर्ती लहान पण कीर्ती महान.
(२) शितावरून भाताची परीक्षा.
(३) सुंठीवाचून खोकला गेला.
(४) रात्र थोडी सोंगे फार
(५) उथळ पाण्याला खळखळाट फार.
(६) दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
(७) झाकली मूठ सव्वालाखाची.
(८) घरोघरी मातीच्याच चुली.
(९) कोल्हयाला द्राक्षं आंबट.
(१०) अंथरूण पाहून पाय पसरावे.
(११) इकडे आड तिकडे विहीर.
(१२) काखेत कळसा गावाला वळसा.
(१३) थेंबे थेंबे तळे साचे.
(१४) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी/दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
(१५) हातच्या कंकणाला आरसा कशाला?
Class 8 Marathi Balbharati Chapter 16 चोच आणि चारा Question Answer
परिच्छेद १
कृती १ – आकलन
प्रश्न १.
खालील आकृती पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. बहिणाबाई
२. सुगरण
ii.
उत्तर:
१. हाथ
२. पाया
३. दागिना
४. चमचा
५. फावडं
६. करवत
iii.
उत्तर:
१. पक्ष्याचे भक्ष्य
२. घरटयाचा प्रकार
प्रश्न २.
एका शब्दांत उत्तर लिहा.
i. चोचीचा खालचा भाग –
उत्तर:
मॅन्डिबल
ii. चोचीच्या टोकावर छिद्रं असलेला पक्षी –
उत्तर:
किवी
iii. पक्ष्यांच्या चोचीवर असलेली छिद्रे म्हणजेच –
उत्तर:
बाह्य श्वसनेंद्रिय
कृती २ – आकलन
प्रश्न १.
चुकीचे विधान शोधून लिहा.
अ. चोच फक्त पक्ष्यांना असते.
ब. पक्ष्यांच्या प्रकारांनुसार चोचींचे प्रकार बदलतात.
क. सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ संरचना समान असते.
ड. पक्ष्यांची चोच तीन भागांमष्ये विभागलेली असते.
उत्तर:
पक्ष्यांची चोच तीन भागांमध्ये विभागलेली असते.
२. परिच्छेदाच्या आधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.
पक्ष्यांच्या चोचीवरील छिद्रे
उत्तर:
याद्वारे पक्षी श्वासोच्छ्वास करतात.
प्रश्न ३.
हे केव्हा घडते ते लिहा.
i. फक्त पक्ष्यांना चोच असते हे कळते.
उत्तर:
जेव्हा आपण प्राणिसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटांतल्या प्राण्यांच्या शरीररचनेकडे पाहतो.
ii. प्राण्यांच्या शरीरात बदल होत जातात.
उत्तर:
जेव्हा प्राणी उत्क्रांतीच्या ओघात बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहतात.
प्रश्न ४.
कारण लिहा.
पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही; कारण…
उत्तर:
चोचीने अन्न खाण्याबरोबरच इतरही अनेक कामे सहज केली जातात.
प्रश्न ५.
परिच्छेदात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.
पक्ष्याचे नाव | वैशिष्ट्य |
किवी | बाह्य श्वसनेंद्रिय म्हणजेच चोचीवरील दोन लहान छिद्रं चोचीच्या टोकावर असणारा. |
कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती
प्रश्न १.
चोच हे जसे पक्ष्यांना मिळालेले वरदान आहे त्याप्रमाणे मानवाला जीवन जगण्यासाठी कोणते वरदान मिळाले आहे? तुमचे मत लिहा.
उत्तर:
चोच जशी पक्ष्यांना जगण्यासाठी सृष्टीत टिकून राहण्यासाठी मदत करते त्याप्रमाणे मानवाला या सृष्टीत टिकून राहण्यासाठी मदतगार ठरणारी गोष्ट म्हणजे त्याला मिळालेली बुद्धी होय. मानवाला स्वतःच्या संरक्षणासाठी तीक्ष्ण नखे, मोठे दात, अंगावर केस नाहीत. त्याला कोणत्याही हत्याराशिवाय शिकार करणेही शक्य नाही; मात्र आपल्या बुद्धीच्या बळावर अनेक शोध लावत त्याने जीवन जगण्याची कला साधली आहे.
त्याला दोन पायांवर तोल सावरून चालता येणे, हाताच्या पंजांची इतर प्राणी पक्ष्यांहून वेगळी असलेली रचना, हालचालींवरील नियंत्रण या बाबीही त्याला या निसर्गात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याला प्राप्त झालेली बुद्धिमत्ता वापरून त्याने आज संपूर्ण जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कोणतेही काम त्याच्यासाठी असाध्य राहिले नाही. त्यामुळे बुद्धी हे त्याला मिळालेले वरदान आहे, असे आपल्याला म्हणता येईल.
परिच्छेद २
कृती १ आकलन
१. आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. गुलाबी
२. शेंदरी
ii.
उत्तर:
१. गरुड
२. घार
३. ससाणा
iii.
उत्तर:
१. सुतार
२. हुप्पो
प्रश्न २.
एका शब्दांत उत्तरे लिहा.
i. पक्ष्यांची चोच म्हटल्यावर सर्वात आधी आठवणारा शब्द-
उत्तर:
अणकुचीदार
प्रश्न ३.
कोण ते लिहा.
i. लांबच लांब चोची आपटून आवाज करणारे पक्षी
उत्तर:
स्टॉर्क
ii. सापापासून ते सशापर्यंत सर्वांची शिकार करणारे.
उत्तर:
शिकारी पक्षी
कृती २ आकलन
प्रश्न १.
योग्य जोड्या लावा.
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
i. लाथा मारून अंड्याचे कवच | ब. किवी |
ii. मध्येच वाकडी झालेली चोच | ड. गुलाबी फ्लेमिंगो |
iii. अणकुचीदार, बाकदार चोच | क. स्टॉर्क |
प्रश्न २.
कारणे लिहा.
i. सगळ्याच पक्ष्यांना एग दूध असतो; कारण….
उत्तर:
या चोचीच्या टोकावरील दातासारख्या भागाच्या मदतीने पक्ष्यांना आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर पडता येते.
ii.
गुलाबी फ्लेमिंगोचे ‘अग्निपंख’ हे नाव सार्थ ठरते, कारण…
उत्तर:
या पक्ष्याचे पंख गुलाबी आणि शेंदरी रंगाचे म्हणजेच अग्निच्या रंगाशी साधर्म्य दाखवणारे असतात.
iii. शिकारी पक्ष्यांच्या चोची बाकदार, अणकुचीदार, असून त्यांचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो; कारण….
उत्तर:
यामुळेच सापापासून सशापर्यंत विविध प्राण्यांची शिकार करणाऱ्या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता येते, फाडता येते, तिचे तुकडे करता येतात.
iv. सुतार, हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते; कारण…
उत्तर:
त्यांना जमिनीवरील किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात.
प्रश्न ३.
परिच्छेदात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.
कृती ३ स्वमत / अभिव्यक्ती
प्रश्न १.
पक्ष्यांप्रमाणे प्राण्यांमध्येही शिकारीकरिता काही विशेष शारीरिक वैशिष्ट्ये निर्माण होतात का? सोदाहरण लिहा.
उत्तर:
हो. भक्ष्य पकडण्यासाठी पक्ष्यांप्रमाणे प्राण्यांमध्येही काही वैशिष्ट्यपूर्ण रचना आढळून येते. वाघासारख्या प्राण्याच्या जबड्यांमध्ये प्रचंड ताकद असते. त्याचे दात तीक्ष्ण, आकाराने मोठे आणि मजबूत असतात. त्यामुळे भक्ष्य पकडणे, त्याचा कणा मोडून त्याला हतबल करणे, त्याचा श्वास कोंडून त्याला मारणे वाघासाठी सहज शक्य होते. वाघाची नजर ही शिकारीकरिता रात्रीही तीक्ष्ण असते. त्यामुळे अंधारातही शिकार करणे त्याला शक्य होते. वाघाचा रंग गवतामध्ये सहज लपणारा असल्याने त्याला भक्ष्य पकडण्याकरिता लपून हल्ला करता येतो. वाघाची शेपटी लांब असते.
त्यामुळे शिकारीमागे धावताना शरीराचा तोल सावरणे त्याला शक्य होते. वाघाची नखे त्याला इच्छेनुसार आत-बाहेर करता येतात. त्यामुळे, शिकारीच्या वेळी ही नखे बाहेर काढून त्याच्या मदतीने तो शिकार करतो. इतर वेळी या नखांमुळे त्याला कोणतीही अडचण होत नाही. सुंदरवनातील वाघांमध्ये तर एक अनोखा बदल झालेला दिसतो. दलदलीच्या प्रदेशात राहिल्याने, सतत पाण्यात पोहावे लागल्याने त्यांच्या बोटांमध्ये पडदे तयार झाले आहेत. त्यामुळे पोहण्यास पर्यायाने शिकार करण्यास सुलभता निर्माण झाली आहे. अशाप्रकारे शिकार करण्याच्या दृष्टीने प्राण्यांमध्येही अनेक बदल घडून येतात.
परिच्छेद ३
कृती १ – आकलन
प्रश्न १.
कोण ते लिहा.
i. सुगरण पक्ष्याच्या चोचीशी साधर्म्य राखणारा पक्षी –
उत्तर:
iii. बाया
कृती २ आकलन
प्रश्न १.
परिच्छेदाच्या आधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.
पोपटाची चोच
उत्तर:
पोपटाची चोच जाडसर आणि बाकदार असून त्याने तो शेंगा किंवा अगदी तिळाएवढ्या लहान बियादेखील आरामात फोडून खाऊ शकतो. शिवाय, झाडाच्या डहाळ्यांवरून चालताना याच चोचीने डहाळी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायांसारखाही करू शकतो.
प्रश्न २.
कारणे लिहा.
i. वेड्या राघूची चोच सरळ आणि लांब असते; कारण…
उत्तर:
यामुळेच कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूला उडता उडता माश्या टोळ पकडायला सोपे जाते.
ii. शिंपी पक्ष्याची चोच एखादया सुईसारखी पातळ आणि टोकदार असते, कारण….
उत्तर:
यामुळे, शिंपी पक्ष्याला चोचीने पाने शिवून घरटे विणणे सोपे जाते.
प्रश्न ३.
परिच्छेदात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांच्या नावासमोर त्याचे वैशिष्ट्य लिहा.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
प्रश्न 1.
खालील ओळींतील वृत्त ओळखा.
i. चंद्रासि लागति कळा उप – राग येतो
गंगेसि भंग बहु पाण – उतार होतो
जें होय चूर्ण तरि मौक्तिक तें कशाला
नाही समान नळ – राज – महा – यशाला
उत्तर:
वसंततिलका वृत्त
ii. सदय हृदय याचे, भूप हा ताप-हारी,
म्हणुनि परिसतां मी हीय एथे विहारी;
मजहि वध कराया पातकी पातला जो,
वरुनि पति असा ही भूमि कैशी न लाजो ?
उत्तर:
मालिनी वृत्त
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
प्रश्न १.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- नैसर्गिक ×
- कालसुसंगत ×
- उपयोगी ×
- आवश्यक ×
- विविधता ×
- अणकुचीदार ×
- सरळसोट ×
उत्तर:
- नैसर्गिक × अनैसर्गिक, कृत्रिम
- कालसुसंगत × कालविसंगत
- उपयोगी × निरुपयोगी
- आवश्यक × अनावश्यक
- विविधता × समानता
- अणकुचीदार × बोथट
- सरळसोट × वेडीवाकडी
प्रश्न २.
खालील शब्दांचे वचन बदला.
- चोच
- किडे
- माश्या
- टोळ
- करवत
- बिया
- तुकडे
- पिल्ले
उत्तर:
- चोची
- किडा
- माशी
- टोळ
- करवती
- बी
- तुकडा
- पिल्लू
प्रश्न ३.
‘भर’ हा उपसर्ग व प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
i. ‘भर’ हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्दः
भरदिवसा भरधाव भरजरी, भरचौकात, भररात्री.
ii. ‘भर’ हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्दः
दिवसभर रात्रभर घरभर गावभर घडीभर, क्षणभर.
प्रश्न ४.
लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.
- शिरोधार्य / शीरोधार्य / शीरोधय / शिरोर्घाय
- विपरित / विपरीत / वीपरीत / वीपरित
- मैत्रीणीस / मैत्रिणिस / मैत्रिणीस / मैत्रिणीस
- अभीव्यक्ती / अभिव्यक्ति / अभिव्यत्की / अभिव्यक्ती
उत्तर:
- शिरोधार्य
- विपरीत
- मैत्रिणीस
- अभिव्यक्ती
प्रश्न ५.
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
i. पक्षी घरटे बांधणे पिल्लांना भरवणे झाडावर चढणे वेलीवर
लटकणे यांसारख्या कामांसाठीही चोचीचा वापर करतात
उत्तर:
पक्षी घरटे बांधणे, पिल्लांना भरवणे, झाडावर चढणे, वेलीवर लटकणे यांसारख्या कामांसाठीही चोचीचा वापर करतात.
ii. पक्षी अंड्यात असताना त्यांना चोचीच्या टोकावर एक
दातासारखा भाग येतो त्याला एग दूध असे म्हणतात
उत्तर:
पक्षी अंड्यात असताना त्यांना चोचीच्या टोकावर एक दातासारखा भाग येतो, त्याला ‘एग दूध’ असे म्हणतात.
iii. किती सुंदर दिसतात ते रोहित पक्षी
उत्तर:
किती सुंदर दिसतात ते रोहित पक्षी!
iv. पक्ष्यांच्या एकूण किती प्रजाती भारतात आढळतात
उत्तर:
पक्ष्यांच्या एकूण किती प्रजाती भारतात आढळतात?
v. पक्षीनिरीक्षणासाठी येणाऱ्या मुलांची संख्या ८०
उत्तर:
पक्षीनिरीक्षणासाठी येणाऱ्या मुलांची संख्या : ८०
चोच आणि चारा पाठाची पार्श्वभूमी
पक्ष्यांविषयीच्या कुतूहलापोटी मानवाने केलेल्या अभ्यासातून पक्षी जीवनाची अनेक रहस्ये, अनेक आयाम समोर आले आहेत. पक्ष्यांच्या चोचींचे आकार आणि रूपे ही त्यांच्या अधिवासाप्रमाणे आणि तेथे उपलब्ध अन्नानुसार कशा रीतीने बदलतात, याचा वेध लेखकाने या पाठातून घेतला आहे. पक्ष्यांच्या चोची व त्यांचे विविध उपयोग यांचे माहितीपूर्ण वर्णन प्रस्तुत पाठात आढळ्न येते.
चोच आणि चारा शब्दार्थ
चोच आणि चारा वाक्र्रचार व त्याचा अर्थ :
सूर मारणे – पाण्यात किवा पाण्यावर झेपावणे
चोच आणि चारा टिपा :
चोच आणि चारा म्हण :
ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो – ज्याने ही सृष्टी निर्माण केली, त्याला येथील प्येकाची काळजी आहे. तो प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक ते सर्व पुरवतो.