Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 10 Question Answer लिओनार्दो दा व्हिंची for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer लिओनार्दो दा व्हिंची
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 10 लिओनार्दो दा व्हिंची
लिओनार्दो दा व्हिंची Question Answer
प्रश्न १.
फरक स्पष्ट करा.
लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक.
उत्तर:
चित्रकला | शिल्पकला |
i. चित्रकला ही शिल्पकलेपेक्षा जास्त श्रेष्ठ दर्जाची कला आहे. | शिल्पकला ही चित्रकलेएवढी श्रेष्ठ दर्जाची कला नाही. |
ii. चित्रकला यांत्रिक नसते. | शिल्पकला ही यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते. |
iii चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो. | शिल्पकार केवळ दगडातला नको असलेला भाग काढत राहतो. |
प्रश्न २.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(अ) ‘आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवहयांचा अभ्यास करतात’ या विधानामागील कारण.
उत्तर:
लिओनार्दो दा व्हिंची हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. तो चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ अशा अनेक भूमिका निभावणारा कलावंत होता. लिओनार्दो याने प्रकाशविज्ञान, आवाज़विज्ञान, मेकॅनिक्स, हेड्रोलिक्स उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीरविज्ञान इत्यादींसंदर्भात संशोधन करून आपले विचार आणि इतर माहितीही नोंदवून ठेवली. त्याने आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत विविध विषयांवर टिपणं करून ठेवली.
याशिवाय, लिओनार्दोने अनेक यंत्रेही तयार केली, अनेकांचे आराखडे तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आज दिसणारी मात्र त्या काळात मागमूसही नसलेली हेलिकॉप्टर्सची रेखाटनं आणि गणितं त्याच्या वहीत बघायला मिळतात. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी तीनशे वर्षे आधीच लिओनार्दोने सायकलचा आराखडा बनवला होता.
अशा विलक्षण, बुद्धिमत्ता असलेल्या लिओनार्दोने आपल्या नोंदवहयांमध्ये नोंदवलेल्या टिपणांमधील तंत्र समजून घेण्यासाठी आजही अनेक अभ्यासक या नोंदवह्यांचा अभ्यास करत आहेत. साडेतीन हजार पानं असलेल्या एकोणवीस वह्यांमध्ये अनेकविध क्षेत्रांतील सामावलेले ज्ञान उलगडण्यासाठी अनेक लोक अभ्यास करत आहेत.
(आ) तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण.
उत्तर:
लिओनार्दो हे एक विलक्षण प्रतिभाशक्ती असलेले महान चित्रकार म्हणून सर्वपरिचित होते. ‘मोनालिसा’, ‘मॅडोना ऑन दी रॉक्स’, ‘लास्ट सपर’ यांसारखी चित्रे आजही जगभरातील रसिकांना सुखावत आहेत. आजही जगभरातील अनेक अभ्यासक लिओनार्दोच्या चित्रांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यातील मेहनती, प्रतिभाशाली, अहिंसक, शांतताप्रिय कलावंत आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
केवळ चित्रच नव्हे, तर अनेकविध शिल्प, स्वतः बांधलेल्या इमारती, पूल आणि जीवनात अनुभवलेल्या गोष्टींवरील टिपणे, प्रकाशविज्ञान, आवाज़विज्ञान, मेकॅनिक्स, हॅड्रोलिक्स उड्डाण, खगोलशास्त्र, शस्त्रविज्ञान आणि शरीरविज्ञान यांविषयीची विविध संशोधने, हेलिकॉप्टर, सायकलसारख्या त्या काळात अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींबाबतच्या नोंदी, त्यांनी तयार केलेली विविध प्रकारची यंत्रे, आराखडे हे सारे जगावर असलेले त्यांचे ऋणच आहे. आजही यांच्या आधारावर अनेक लोक अभ्यास करून, संशोधन करून यश मिळवताना दिसतात.
(इ) ‘चित्रकार’ म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे.
उत्तर:
लिओनार्दो दा व्हिंची हा एकावेळी अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडणारा कलावंत होता; मात्र तो जगभरात अजरामर झाला एक विलक्षण चित्रकार म्हणूनच. त्याची प्रतिभा, त्याची चित्रं रेखाटण्याची आवड, ही चित्र खरीखुरी वाटावीत यासाठी नाना प्रयोग करण्याची धडपड, दीर्घ निरीक्षण यांमुळे त्याची चित्रं दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत गेली. त्याने व्हेरोशिओ या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. चित्र काढताना प्रत्येक अवयवाचे प्रमाण आणि रचना यांच्या गणिती पद्धतीने नोंदी करून मगच रेखाटन करण्याची सवय त्याने लावून घेतली.
यासाठी प्रत्यक्ष मानवी शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती करून घेतली. यांमुळे लिओनार्दोच्या चित्रांमध्ये जिवंतपणा झळकतो. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे. ही बाबही त्याच्या चित्रांना अजरामर होण्यास कारणीभूत ठरते.
लिओनार्दोची जगप्रसिद्ध कलाकृती ‘मोनालिसा’ हे चित्र काढण्यासाठी तीन वर्षे काम केले. त्याच्या या संयमाने केलेल्या कामामुळे मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे स्मित आजही अनेकांना कोड्यात टाकते. हे चित्र काढताना त्याने मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये, म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायक-वादक ठेवले.
इतकी लहानसहान गोष्टींची काळजी तो आपल्या चित्रांच्या बाबतीत घेत असे. आज इतक्या वर्षांनंतरही मोनालिसाच्या डोळ्यांतली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारे आहे. त्याच्या आपल्या कलेबाबत असलेल्या समर्पित वृत्तीमुळे त्याने काढलेली ‘मॅडोना ऑन दी रॉक्स’, ‘लास्ट सपर’ आणि ‘मोनालिसा’ या चित्रांनी त्याचे नाव जंगभरात अजरामर झाले आहे.
खेळूया शब्दांशी
(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(अ) तहानभूक विसरणे
(आ) मंत्रमुग्ध होणे
(इ) कोड्यात टाकणे
उत्तर:
(अ) तहानभूक विसरणे – भान हरपून कामात गुंग होणे / मग्न होणे.
वाक्य : रीना तहानभूक विसरून परीकथा वाचत होती.
(आ) मंत्रमुग्ध होणे – भारावून जाणे.
वाक्य:सई मोबाइलवर स्वामी विवेकानंदांचे भाषण ऐकून मंत्रमुग्ध झाली होती.
(इ) कोड्यात टाकणे – पेचात टाकणे.
वाक्य: छोट्या गणूने कठीण गणित सहज सोडवून सर्वांनाच कोड्यात टाकले.
(आ) खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.
उत्तर:
- पूर्णविराम – मी शाळेत जाते.
- अर्धविराम – ती काल आली नाही; कारण तिला बरे नव्हते.
- प्रश्नचिन्ह – तू काल वृक्षारोपण केलेस का?
- उद्गारचिन्ह – वा! काय सुंदर फुले फुलली आहेत तळ्यात!
- एकेरी अवतरण चिन्ह –
अ. ‘आंबा’ फळांचा राजा आहे.
ब. ‘पाठांतर महत्त्वाचं’ असं ते म्हणाले. - दुहेरी अवतरण चिन्ह – आई म्हणाली, “चला, सर्वांनी जेवून घ्या लवकर.”
शोध घेऊया.
• पाच भारतीय चित्रकारांची आंतरजालावरून माहिती मिळवा आणि लिहा.
लिहिते होऊया.
• ‘माझी आवडती कला’ या विषयावर दहा ओळींत माहिती लिहा.
(टीप : या कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील निबंधलेखन पाहावे.)
ओळख स्वतःची
१. लिओनार्दो यांच्यामध्ये अनेक गुण होते. पाठ वाचून त्या गुणांची यादी तयार करा. या गुणांपैकी कोणते गुण तुमच्यात आहेत त्याची पडताळणी करा. नसल्यास ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा. गुणः उदा. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे, म्हणजे नीट समजून घेऊन काम करत असे.
आपण समजून घेऊया
१. खालील शब्दांचे संधिविग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
संधी | संधिविग्रह |
शरत्काल | शरद् + काल |
जगन्नाथ | ‘जगत् + नाथ |
तल्लीन | तत् + लीन |
संताप | सत् + ताप |
२. खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तरः
संधिविग्रह | संधी |
सत् + आचार | सदाचार |
सत् + मती | सन्मती |
शब्द + छल | शब्दच्छल |
शरद् + चंद्र | शरच्चंद्र |
[टीप : जिथे उच्चाराची तीव्रता दिसते ती कठोर व्यंजने समजावीत आणि तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य असतो त्यांना मृदू व्यंजने समजावीत.]
कठोर व्यंजने – क्, ख्, च्, छ्, ट्, ठ्, त्, थ्, प्, फ्
मृदू व्यंजने – ग्, घ्, ज्, झ, ड्, ढ्, द्, ध्, ब्, भ्
बातमी लेखन
दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रे, टी. व्ही., रेडिओ यांसारख्या माध्यमांतून वाचत व ऐकत असतो. त्यामुळे घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपणाला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते.
• बातमी लेखनासाठी आवश्यक गुण-
(१) लेखनकौशल्य.
(२) भाषेचे उत्तम ज्ञान.
(३) व्याकरणाची जाण.
(४) सोपी, सुटसुटीत वाक्यरचना.
(५) चौफेर वाचन.
• खालील बातमी वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
उत्तरः
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे – प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे.
(आ) समारंभाचे अध्यक्ष – प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे – रसिक
(२) चौकट पूर्ण करा.
(अ) शिबिरार्थींची संख्या ______
(आ) शिबिरार्थीनी शिबिरात शिकलेली कला ______
(इ) शिबिराचे ठिकाण ______
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख ______
उत्तरः
(अ) शिबिरार्थींची संख्या – पंचवीस
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला – चित्रकला
(इ) शिबिराचे ठिकाण – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्रौली, ता. भोर.
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख – १० डिसेंबर
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.
उत्तरः
१. चित्रकला शिबिर
२. शिबिराचे ठिकाण
३. शिबिराची वेळ आणि दिनांक
४. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत
५. चित्रांचे प्रदर्शन.
Class 8 Marathi Balbharati Chapter 10 लिओनार्दो दा व्हिंची Question Answer
संकलित मूल्यमापन
१. टिपा लिहा.
i. लिओनार्दोने अनुभवलेला निसर्गाचा सहवासः
उत्तर:
लिओनार्दो दा व्हिंची यांचा जन्म १५ एप्रिल, १४५२ रोजी व्हिंची नावाच्या एका लहानशा गावात झाला. इटली देशातील उंचच उंच पर्वताच्या उतारावर वसलेले, एका बाजूने आर्नो नावाची नदी खळाळून वाहत असलेले, तर दुसरीकडे डोंगराएवढे खडकच खडक असलेल्या या निसर्गरम्य वातावरणात लिओनार्दो यांनी पिओरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी जन्म घेतला. लहानपणापासून डोंगरदऱ्यांतून मनसोक्त भटकणाऱ्या लिओनार्दोला निसर्गाबद्दल कुतूहल वाटत असे. चित्रकलेची आवड असलेला लिओनार्दो जंगलात फिरून तेथील विविध प्राणी गोळा करून आणायचा व त्यांचे निरीक्षण करायचा. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्याला हा निसर्गाचा सहवास भरभरून लाभला.
ii. फ्लोरेन्स:
उत्तर:
फ्लोरेन्स हे लिओनार्दोच्या वेळचे बुद्धिमंत, चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्त्वज्ञ यांचे शहर होते. दहा ते बारा वर्षांचा असताना लिओनार्दो आपल्या वडिलांबरोबर येथे रहायला आला. येथील व्हेरोशिओ या त्या काळातील विख्यात चित्रकाराकडे लिओनार्दोने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले.
iii. लिओनार्दोचे चित्रकलेचे शिक्षण:
उत्तर:
निसर्गाच्या सहवासात रमलेल्या लिओनार्दोला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. वडिलांनीही त्याला चित्र काढण्यापासून कधी रोखले नाही. त्यामुळे, लिओनार्दो तहानभूक विसरून चित्रं काढू लागला. ती खरीखुरी वाटावीत म्हणून स्वतःच निरनिराळे प्रयोग करून, निसर्गातील घटकांचे निरीक्षण करून तो शिकू लागला. पुढे फ्लोरेन्स शहरात आल्यावर वयाच्या चौदाव्या वर्षांपासून सत्ताविसाव्या वर्षांपर्यंत त्याने व्हेरोशिओ या त्या वेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले. आपल्या चित्रामधील मानवी अवयवांचे प्रमाण आणि रचना जाणण्यासाठी शरीराची आणि स्नायूंच्या रचनेची माहिती ‘करून घेण्यासाठी त्यांनी त्या काळात मानवी शरीररचनेचा अभ्यास करणाऱ्या आणि मृतदेहांचे विच्छेदन करणाऱ्या अॅन्टोनिओ डेल पॉलिओलो या पहिल्यावहिल्या चित्रकाराचे सहकार्य घेतले. अशारीतीने, लिओनार्दो यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले.
iv. लिओनार्दोचे व्यक्तिमत्त्वः
उत्तर:
लिओनार्दो हा अत्यंत प्रतिभावंत, हरहुन्नरी असा कलावंत होता. तो उत्तम चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ अशा अनेकविध भूमिका यशस्वीपणे पार पाडणारा उत्तम कलावंत होता. चित्रकलेबाबत नितांत आस्था असलेल्या लिओनार्दोला स्पर्धा करणं, वादविवाद करणं आवडत नसे. तो शांतताप्रिय होता. पिंजऱ्यात बंद पक्ष्यांना जादाचे पैसे देऊन मुक्त करणाऱ्या या लिओनार्दोमध्ये भूतदया ठासून भरलेली दिसते. युद्ध, युद्धामुळे होणारा रक्तपात, मनुष्यहानी यांबद्दल त्याला तिटकारा होता. तो दिसायला अत्यंत देखणा असून उठावदार कपडे घालणे, टापटीप राहणे त्याला आवडत असे. लोकांना मंत्रमुग्ध करणारा सुरेल आवाज त्याच्याकडे होता. ल्यूट नावाचे तंतुवादय वाजवण्यात तो वाकबगार होता. असे हे लिओनार्दोचे व्यक्तिमत्त्व नेहमीच प्रसन्न, आनंदी आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारे होते.
v. मोनालिसाचे चित्र:
उत्तर:
लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी, प्रचंड गाजलेली, जगभरात लिओनार्दोला अजरामर करणारी, जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे ‘मोनालिसाचे’ चित्र.
१५०३ ते १५०५ या तीन वर्षांच्या कालखंडात लिओनार्दोने चितारलेले हे चित्र म्हणजे त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी समजली जाते. मोनालिसाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकते.
मुळात हे चित्र फ्रान्सेस्को दी बार्टोलामिओ डेल गिओकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या मोनालिसा उर्फ मॅडोना लिसा नावाच्या चोवीस वर्षांच्या बायकोचे होते. हे चित्र ‘ला गिओकोंडा’ या नावानेही ओळखले जाते. हे चित्र काढताना लिओनार्दोने मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये, याकरिता तिचे मन रमवण्यासाठी गायक-वादकही ठेवले होते, असे म्हटले जाते.
आज इतक्या वर्षांनंतरही मोनालिसाच्या डोळ्यांतली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारे आहे. आता हे चित्र पॅरिसच्या ‘लुव्र’ संग्रहालयात आहे. लिओनार्दोचे हे चित्र ही त्याची चित्रकलेच्या क्षेत्रातली सर्वोत्कृष्ट कामगिरी मानली जाते.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
१. गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण लिहा.
- इटली, विज्ञान, सरडे, प्रचंड
- दगड, की, परंतु, कारण
- श्रेष्ठ, आनंदी, एकोणवीस, टिपली
- छी!, बापरे!, अगाई!, भरभर
उत्तर:
- प्रचंड – हे विशेषण असून इतर सर्व नामे आहेत.
- दगड – हे नाम असून इतर सर्व उभयान्वयी अव्यये आहेत.
- टिपली – हे क्रियापद असून इतर सर्व विशेषणे आहेत.
- भरभर – हे क्रियाविशेषण अव्यय असून इतर सर्व केवलप्रयोगी अव्यये आहेत.
२. खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
३. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / विधानार्थी / आज्ञार्थी / उद्गारार्थी)
- लहानपणी लिओनार्दो डोंगरदऱ्यांतून मनसोक्त भटकला.
- कशाला चित्र काढतोस?
- तू वर्गमुळांचा गुणाकार ल्यूकाकडे जाऊन शिकून घे.
- काय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं लिओनार्दोचं!
उत्तर:
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
४. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.
- तो फ्लोरेन्स शहरात राहायला आला.
- त्याने नोंद लिहून ठेवली.
- मोनालिसा गाऊ लागली.
- कलावंताने कला जपावी.
उत्तर:
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
५. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
- कुतूहल वाटणे
- आत्मसात करणे
- तिटकारा असणे
- वाक्बगार असणे
- मिळूनमिसळून वागणे
- अचंबित करणे
- नाव अजरामर करणे
- कायमचा निरोप घेणे
उत्तर:
- कुतूहल वाटणे – उत्कंठा/उत्सुकता वाटणे.
वाक्य:अंतराळवीर अंतराळात कसे राहतात याचे नवीनला खूप कुतूहल वाटायचे. - आत्मसात करणे – शिकून घेणे.
वाक्य: प्रियाने गायन कलेशिवाय इतरही अनेक कला आत्मसात केल्या होत्या. - तिटकारा असणे – खूप राग असणे.
वाक्य:मानवला भांडणाचा प्रचंड तिटकारा आहे. - वाकबगार असणे – प्रवीण / पारंगत / तरबेज असणे.
वाक्य:रमेश तबलावादनात वाकबगार आहे. - मिळून मिसळून वागणे – सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागणे.
वाक्य :रमा सर्वांशीच मिळून मिसळून वागते. - अचंबित करणे – आश्चर्यचकित करणे.
वाक्य: छोट्या रघूने भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय न चुकता म्हणून सर्वांना अचंबित केले. - नाव अजरामर करणे – कर्तृत्वाने मोठे होणे.
वाक्य: पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक मिळवून भारताचे नाव अजरामर केले. - कायमचा निरोप घेणे – मृत्यू पावणे, वारणे.
वाक्य: आपले जीवन देशासाठी समर्पित करून त्या वीर जवानाने जगाचा कायमचा निरोप घेतला.
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- विख्यात
- युद्ध
- वाकबगार
- तहान
- विश्व
उत्तर:
- लोकप्रिय, प्रसिद्ध
- रण, समर
- निष्णात तरबेज
- तृष्णा
- जग, जगत
२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- जन्म ×
- विक्री ×
- शांतता ×
- प्रसन्न ×
- ओलसर ×
उत्तर:
- मृत्यू
- खरेदी
- अशांतता
- अप्रसन्न
- कोरडे
३. शब्दांच्या आधी ‘अति’ हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
अतिरिक्त, अतिशय, अतिउत्साही, अतिरेक, अतिप्रसंग, अतिक्रम, अत्यंत इत्यादी.
४. खालील आलंकारिक शब्दांचा अर्थ लिहा.
- कर्णाचा अवतार
- देवमाणूस
- बृहस्पती
- काडी पहिलवान
- भाकडकथा
उत्तर:
- उदार मनुष्य
- चांगला माणूस, सज्जन व्यक्ती
- बुद्धिमान मनुष्य
- अत्यंत हडकुळा व्यक्ती
- वायफळ गोष्टी
आकारिक मूल्यमापन
बातमी लेखन
१. या पाठाखालील बातमी वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(टीप : या कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील बातमीलेखन पाहावे.)
लिओनार्दो दा व्हिंची पाठाची पार्श्वभूमी
लिओनार्दो दा व्हिंची या अद्भुत प्रतिभा लाभलेल्या जागतिक कीर्तीच्या चित्रकाराचे बालपण, त्यांची अनेकविध विषयांमधील विलक्षण गती आणि चित्रकलेच्या परिपूर्ण अविष्काराकरिता त्यांनी केलेला अभ्यास याची माहिती म्हणजे हा पाठ होय. लिओनार्दो यांनी केलेला अभ्यास, केलेले संशोधन यांमधून त्यांनी टिपलेल्या नोंदी अगदी आजही अभ्यासकांकरिता कशारीतीने उपयुक्त ठरत आहेत, याचे वर्णन या पाठात लेखकाने “केले आहे.
लिओनार्दो दा व्हिंची शब्दार्थ
लिओनार्दो दा व्हिंची वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
लिओनार्दो दा व्हिंची टिपा