Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 11 Question Answer स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 11 Question Answer स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा Question Answer
प्रश्न १.
चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
१. तर्कशुद्ध
२. तर्कसंगत
प्रश्न २.
वैशिष्ट्ये लिहा.
(अ)
उत्तर:
१. समुद्रकिनाऱ्यापासून एक-दीड फर्लांग अंतरावर शिलाखंडाच्या रूपात असलेले ठिकाण
२. पाण्याच्या भरपूर वर असलेले ठिकाण
(आ)
उत्तर:
१. हत्तीच्या सुळ्यांसारखे दात व जबरदस्त जबडा असलेले
२. मनुष्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊ शकणारे
[जेव्हा स्वामी विवेकानंद ………….
……….. शक्तिशाली मनुष्य आहे.]
प्रश्न ३.
हे केव्हा घडेल ते लिहा.
(अ) परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. _____________
उत्तर:
जेव्हा आपण तासन्तास ध्यानाचा अभ्यास करून आपले मन केंद्रित होईल.
(आ) माणसाची अंत:स्थ चेतना फुलेल.
उत्तर:
जेव्हा माणसाला संघर्ष करता येईल, त्याच्यावर थोडी संकटं येतील आणि त्याला थोडा विरोध होईल.
प्रश्न ४.
परिणाम लिहा.
(अ) स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. –
परिणाम: स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे जाणून घेण्यासाठी ग्रंथपालाने त्यांना त्या तीन खंडांतले उभे आडवे प्रश्न विचारले.
(आ) नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले –
परिणाम: स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली व फर्लांग दीड फर्लांग एवढे अंतर पोहत जाऊन ते शिलाखंडावर पोहोचले.
प्रश्न ५.
तुमचे मत लिहा.
(अ) ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत.
उत्तर:
स्वामी विवेकानंदांना वाचनाची आवड असल्याने त्यांनी तीन खंड एकेका दिवसात वाचून ग्रंथालयात परत केले. यामुळे, ग्रंथपालाच्या मनात शंका आली. स्वामीजी पुस्तके न वाचताच परत करत असावेत; कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेरचे होते.
काही माणसांना जाडीजाडी पुस्तकं नेऊन ती चाळून वाचल्यासारखे दाखवून, न वाचताच परत करण्याची सवय असल्याचा त्यांचा अनुभव होता. स्वामीजीही असेच करत असावेत, अशी शंका ग्रंथपालाच्या मनात येणे साहजिकच होते. त्यामुळे, हा साधूही पुस्तक केवळ दिखाव्यासाठी घेतो आणि न वाचता परत; करतो असे त्याला वाटणे चुकीचे नव्हते, असे तो स्वामीजींच्या शिष्यांना म्हणाला.
(आ) पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत.
उत्तरः
माझ्या मते पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणारे नावाडी वाईट नव्हते. पोटापाण्यासाठी नावाड्याचा व्यवसाय करणारे हे नाविक एका सामान्य ग्राहकाकडून मोबदला मागावा तसा स्वामींकडेही मागू पाहतात.
स्वामीजींच्या महात्म्यापासून अपरिचित असलेले नाविक केवळ त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने त्यांच्याकडून पैशांची अपेक्षा करत होते. सुरुवातीला चुकीचे वाटणारे हे नावाडी स्वामीजींनी समुद्रात उडी टाकल्यावर मात्र घाबरतात. त्यांच्यावर कोणतेही संकट ओढावू नये याकरिता ते नावा काढून त्यांचा पाठलाग करतात. यावरून त्यांची संवेदनशीलता, माणुसकी, त्यांना वाटणारी चिंता दिसून येते. ही संन्यासी व्यक्ती असामान्य असून ती अद्वितीय शक्तिशाली व्यक्ती आहे, हे त्यांच्या लक्षात आले.
पुढील तीन दिवस, तीन रात्री स्वामीजी धानस्थ बसलेले असताना हे नावाडी त्यांच्यासाठी खाण्याचे सामान आणायचे. त्यांना हाका मारायचे; पण स्वामीजी भावसमाधीत असल्याने त्यांना प्रतिसाद देत नव्हते. एका महान माणसाला आपण पैशांकरिता नावेने नेण्यास नकार दिल्याची खंत या नावाड्यांना होती. यावरून हे नावाडी माणुसकी जपणारे, स्वतःच्या उदरनिर्वाहाची सोय पाहणारे, संवदेनशील, मायाळू असल्याचे लक्षात येते.
१. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये परिच्छेदातून शोधा व लिहा.
(अ) निर्भयता
(आ) मनाची एकाग्रता
(इ) दृढनिश्चय
(ई) देशप्रेम
(उ) वाचनप्रेम
उत्तर:
(अ) निर्भयता:
स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली.
(आ) मनाची एकाग्रता:
ते रोज एक खंड वाचायचे.
(इ) दृढनिश्चयः
स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले.
(ई) देशप्रेम:
ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा, म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले.
(उ) वाचनप्रेम:
अ. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत.
ब. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे.
क. त्यांनी तीन खंड एकेका दिवसांत वाचून परत केले.
ड. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर आसायचे, ते अर्धे -पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे.
प्रश्न ७.
तुमचा अनुभव लिहा.
(अ) ‘काम करत असताना एखादे संकट आले, की माणूस जागरूक राहून काम करतो’, याविषयी तुमचा अनुभव.
उत्तर:
रोज सकाळी दूध आणण्याचे काम आईने माझ्यावर सोपवले होते. मी ते नित्यनेमाने करत असे. काही दिवसांपूर्वी बाबांनी मला सायकल आणली होती. मी ती घेऊनच आता दूध आणायला जात असे. सुरुवातीला सायकल शिकताना एक दोन वेळा सायकल पडल्याने तिचा आरसा फुटला होता; पण त्याकडे दुर्लक्ष करून मी सायकल चालवण्याचा आनंद घेत होतो. त्यादिवशीही मी सायकलवरून मोठ्या जोशाने दूध आणायला गेलो होतो; मात्र मागून येणारी मोटारसायकल आरसा नसल्याने नजरेस पडली नाही आणि अचानक सायकल थांबवल्याने ती मला येऊन धडकली.
अपघात झाला आणि त्यात माझा हात फ्रॅक्चर झाला. कोणतेही वाहन चालवताना काळजी घेणे किती गरजेचे असते, हें मला या प्रसंगातून कळले. आता मी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करतो. सयाकलचीही निगा राखतो. सायकल चालवताना सांभाळून चालवतो. अशाप्रकारे, जेव्हा माझ्यावर संकट आले तेव्हा मी अधिक जागरूक होऊन काम करू लागलो.
प्रश्न ८.
खालील दोन प्रसंगांतील फरक स्पष्ट करा.
स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार.
उत्तर:
उडी मारण्यापूर्वी | उडी मारल्यानंतर |
नावाडी स्वामींकडून श्रीपादशिलेवर जाण्यासाठी नावेचे पाच पैसे एवढे भाडे मागत होते. पैशांशिवाय निष्कांचन संन्याशालाही तेथे सोडण्यास तयार नव्हते. | नावाडी घाबरले. दोघा तिघांनी नावा काढून स्वामींचा पाठलाग केला. त्यांच्यावर संकट येऊ नये, याकरिता मदतीसाठी ते पुढे सरसावले. हा संन्यासी सामान्य मनुष्य नसून हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे याची त्यांना खात्री पटली. स्वामीजींना खाण्याचे पदार्थ देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नावाड्याला आपल्या कृतीचा पश्चाताप झालेला दिसून येतो. |
खेळूया शब्दांशी
१. ‘निर्भय’ पासून ‘निर्भयता’ हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’, ‘आळू’, ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा.
उत्तर:
– ता | कोमलता, विशालता, ममता, वत्सलता, भावुकता, कठोरता, कणखरता, मृदूता, संकुचितता इत्यादी. |
– त्व | कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, भ्रातृत्व, बंधुत्व, राष्ट्रीयत्व, एकत्व, महत्त्व, गुरुत्व, मूर्खत्व, जडत्व, विद्वत्व इत्यादी. |
– आळू | कनवाळू, दयाळू, झोपाळू विसराळू, लाजाळू, मायाळू इत्यादी. |
– पणा | शहाणपणा, मूर्खपणा, वेडेपणा, गाढवपणा, कणखरपणा, वाईटपणा, चांगुलपणा, खरेपणा, खोटेपणा, विचित्रपणा इत्यादी. |
(आ) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.
- सर्वांनी बेसावध राहून काम करू नये.
- गाडी वेगाने चालवू नये.
- शिळे अन्न खाऊ नये.
- कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये.
- जॉन अप्रामाणिक मुलगा नाही.
उत्तर:
- सर्वांनी सावधं राहून काम करावे.
- गाडी हळू चालवावी.
- ताजे अन्न खावे.
- सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.
- जॉन प्रामाणिक मुलगा आहे.
(इ) खालील चौकटींत ‘बे’ हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा. बेसावध.
उत्तरः
(टीप: बेइनाम, बेअब्रू, बेदम, बेफिकीर, बेपर्वा, बेगुमान, बेअदबी, बेकार इत्यादी शब्दही येथे लिहिता येतील.)
शोध घेऊया
*१. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील पाच व्यक्तींची माहिती आंतरजालाचा वापर करून मिळवा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा. मुद्दे – संक्षिप्त परिचय, उल्लेखनीय कार्य, मिळालेले पुरस्कार.
लिहिते हेऊया
*१. तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांविषयीची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा.
मुद्दे – पुस्तकाचे नाव, लेखक / लेखिका, पुस्तकाचा विषय, साहित्याचा प्रकार, तुम्हांला आवडलेली पात्रे, त्यातील तुम्हांला विशेष आवडलेल्या घटना इत्यादी.
(टीप: वरील उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करावा.)
आपण समजून घेऊया
• खालील तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा व विसर्गसंधीचे काही नियम समजून घ्या.
(वरील तक्त्यात विसर्गसंधी संदर्भांतील काही नियम व उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणांचा सराव करावा.)
• खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
संघी | संधिविग्रह |
i. अधोमुख | अधः + मुख |
ii. दुर्दैव | दु: + दैव |
iii. मनोबल | मन: + बल |
iv. दुष्कर्ती | दु: + कीर्ती |
v. बहिष्कृत | बहि: + कृत |
• खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
संधिविग्रह | संधी |
i. मन: + वृत्ती | मनोवृत्ती |
ii. निः + विवाद | निर्विवाद |
iii. मन: + धैर्य | मनोधैर्य |
iv. तेज: + पुंज | तेज:पुंज |
v. आयुः + वेद | आयुर्वेद |
(वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे पूर्वरूप संधी व पररूप संधी यांच्या नियमाप्रमाणे इतरही काही विशेष संधी पाहायला मिळतात.)
वाचा.
उतारा वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
पुस्तकाकडे केवळ कागदांवर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. पुस्तकांनाही जीव असतो. त्यांना स्वत:चं व्यक्तिमत्त्व असतं. पुस्तकं आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात. गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची; संवाद साधण्याची! एकदा का पुस्तकांशी मैत्री जुळली, नातं निर्माण झालं, की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं. परमेश्वरानं आपल्याला एकच आयुष्य दिलं आहे; पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकंच देऊ शकतात. शिवकथा वाचायला लागलो, की त्यांच्या शब्दाशब्दांतून इतिहास जिवंत होतो.
जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूपं पाहत पशुपक्षी, प्राण्यांशी संवाद साधतो, विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो, तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभांडार आहे. त्यातून मनोरंजन तर होतंच आणि जाणिवाही प्रगल्भ होतात. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून, तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्त्वे केवळ पुस्तकेच देतात म्हणूनच पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो. त्याच्याशी नातं जोडायलाच हवं.
(१) पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर:
(२) पुस्तकांना लेखकाने कोणती उपमा दिली आहे ?
(३) ‘थोरामोठ्यांची चरित्रे’ आणि ‘विनोदी कथा’ वाचनाचा तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो, असे लेखकाला वाटते.
(४) पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
(२) पुस्तकांना लेखकांनी कोणती उपमा दिली आहे?
उत्तर:
पुस्तकांनी लेखकांनी निसती कागदावरची छापलेली अक्षरं नसून ती फार आपल्याला आपल्या आयुष्यात मदत म्हणून किंवा मित्र मैत्रीण म्हणून नेहमी सोबत असते.
(३) ‘थोरामोठ्यांची चरित्रे आणि विनोदी कथा वाचनाचा तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो, असे लेखकाला वाटते.
उत्तर:
चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य मला अंतर्मुख बनवते. विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांचा विश्वात मन हरवून जाते. मनोरंजन होते व जाणिवाही प्रगल्भ होतात.
(४) पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
पुस्तके नि:स्वार्थी मित्र असतात. त्यांच्याशी मैत्री केल्यास अनेक फायदे होतात. हे मित्र आपली साथ कधीच सोडत नाहीत. आपल्या अस्तित्वाने ते सर्वांचाच एकटेपणा दूर करतात. त्यांना आपल्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा नसते. ती फक्त स्वत:जवळील ज्ञान देत राहतात. जगभरातल्या प्रचंड माहितीचा खजिना आपल्यासमोर खुला करून देतात. आपले मनोरंजन करून जीवनातील तोचतोचपणा, रटाळपणा दूर करतात. चांगले विचार, मूल्ये, संस्कार वाचकांना पुरवतात. आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम करतात. ही पुस्तके आपले अनुभवविश्व संपन्न करतात. आपल्याला ‘माणूस’ म्हणून समृद्ध करतात. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन मिळतात. विचारांना, लेखनाला चालना मिळते, आनंद मिळतो, म्हणूनच वाचकाला आयुष्यभर भरभरून देणारी पुस्तके ही उत्तम मित्र असतात.
सुविचार
- संकटांना घाबरून न जाता जो जीवन यशस्वी करतो तोच खरा पराक्रमी होय.
- मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.
- नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया होय.
- आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
- शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय. अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही.
Class 8 Marathi Balbharati Chapter 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा Question Answer
संकलित मूल्यमापन
परिच्छेद १
कृती १ – आकलन
१. आकृती पूर्ण करा.
उत्तर:
१. ग्रंथालयातून जाडीजाडी पुस्तके नेणे
२. न वाचता ती परत करणे
३. थोडे चाळणे आणि वाचल्यासारखे दाखवणे
२. चौकटी पूर्ण करा.
- येथील वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत → □
- ग्रंथपालाला स्वामी विवेकानंदांचा हा गुण पडताळायचा होता → □
उत्तर:
- पोरबंदरच्या
- प्रामाणिकपणा
३. कोण ते लिहा.
- रोज एक खंड पूर्ण वाचणारे-
- पुस्तके वाचण्याबाबत स्वामीजींबद्दल शंका घेणारे-
- मानवी कक्षेच्या बाहेरचे काम करणारे.
उत्तर:
- स्वामी विवेकानंद
- ग्रंथपाल
- स्वामी विवेकानंद
[ज्या देशाची आपल्याला ……
….. बाहेरचे काम आहे.’]
कृती २ – आकलन
१. कारणे लिहा.
i. स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून
कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले; कारण…
उत्तर:
ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, त्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश, तो समाज स्वामींना एकदा डोळ्यांखालून घालायचा होता.
ii. स्वामी करत असलेले काम मानवी कक्षेच्या बाहेरचे आहे असे ग्रंथपालास वाटले; कारण…
उत्तर:
ग्रंथपालाने स्वामीजींना एकेका दिवसात वाचलेल्या तीन खंडांतील उभे आडवे प्रश्न विचारले असता स्वामीजी ते उत्तर असलेले अर्धे – पाऊण पान कंठस्थ सांगायचे.
कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती
१. वाचनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
वाचन हा मानवाला प्रगल्भ बनवणारा छंद आहे. वाचनामुळे मानवाच्या ज्ञानामध्ये वाढ होते. त्याचे अनुभवविश्व संपन्न होते. वाचनामुळे मानवाला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांतील ज्ञान मिळते. वाचन हे मनोरंजनाचे महत्त्वाचे माध्यम आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. एखादया ठिकाणी प्रत्यक्ष न जाता माणूस त्या प्रदेशाचा आनंद घेऊ शकतो. वाचनामुळे माणसाला चांगल्यावाईटातला फरक समजू लागतो. त्याच्यात चांगली मूल्येही रुजतात. वाचन ही लेखनामागची प्रेरणा ठरू शकते. एका ठिकाणी बसून वाचनाच्या आधारावर संपूर्ण जग पाहता येते. एकंदरीत वाचन माणसाला घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते.
परिच्छेद २
कृती १ – आकलन
१. चौकटी पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. त्यांचे मन ते कुठेही एकाग्र करू शकत
२. त्यांचा तासन्तास ध्यानाचा अभ्यास असल्याने ते जे वाचत त्यावर त्यांचे मन केंद्रित होई
ii.
उत्तर:
१. वाक्य बोलता येणे
२. वाक्य वाचता येणे
३. वाक्य लिहिता येणे
iii.
उत्तर:
१. मनाची शक्ती
२. बुद्धीची शक्ती
३. नेत्रेंद्रियांची शक्ती
२. मुलांच्या शिक्षणाचा ओघतक्ता पूर्ण करा.
उत्तर:
१. शब्द शिकवतो
२. वाक्य शिकवतो
३. वैशिष्ट्ये लिहा.
स्वामी विवेकानंदांचे वाचन
उत्तर:
- तासन्तास ध्यानाचा अभ्यास असल्याने ते जे वाचत ते लक्षात राहत असे, पाठ होत असे.
- ते ग्रंथांचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचत.
- काही ग्रंथांची पानेच्या पाने ते एका दृष्टिक्षेपात वाचू शकत.
[खेत्रीच्या महाराजांनी ………..
………. मी वाचू शकतो. “]
कृती २ – आकलन
१. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये परिच्छेदातून शोधा व लिहा.
i. मनाची एकाग्रता
ii. वाचनप्रेम
उत्तर:
i. मनाची एकाग्रता :
स्वामीजींनी सांगितले, “मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो, तसेच माझा तासन्तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो, त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. ”
ii. वाचनप्रेम :
अ. मी जे वाचतो, त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते.
ब. मी ग्रंथांचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो.
२. हे केव्हा घडेल ते लिहा.
i. आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल.
उत्तर:
जेव्हा आपण वाक्य बोलता, वाचता, लिहिता येणे या आपल्या शिक्षणाच्या शेवटच्या पायरीपुढे जाऊन प्रयत्न करू, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू.
कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती
१. ‘मनाची एकाग्रता’ याविषयी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मानवी मन हे अत्यंत चंचल असते. क्षणात ते जगभराची सफर करू शकते. अशा चंचल मनाला एकाग्र केले असता, त्याचे लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित केले असता वरवर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मानव सहजपणे साध्य करू शकतो. ‘मनाची एकाग्रता’ ही मानवाची फार मोठी ताकद आहे. मन एकाग्र केले असता मानवातील सुप्त शंक्ती जागृत होतात. एखादे कार्य करायचे ठरवून मनापासून त्या कार्यावरच लक्ष केंद्रित केले असता मनाची ताकदही ते कार्य हमखास पूर्ण करते. ते कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक शक्ती, आवश्यक कौशल्ये या एकाग्रतेच्या बळावर सहज प्राप्त करता येतात. महान लोकांच्या यशामागचे गमक ही ‘मनाची एकाग्रताच’ असते.
परिच्छेद ३
कृती १ – आकलन
१. आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. समुद्रात फर्लांग -दीड फर्लांग एवढे अंतर पोहत जायचे होते
२. समुद्रामध्ये शार्क मासे होते
ii.
उत्तर:
१. हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही
२. हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे
२. चौकटी पूर्ण करा.
- कन्याकुमारीपासून एक-दीड फर्लांग अंतरावरील शिलाखंड → □
- शिलाखंडावर सोडण्याकरिता स्वामींकडून नावाड्याने मागितलेली रक्कम → □
उत्तर:
- श्रीपादशिला
- पाच पैसे
कृती २ आकलन
१. हे केव्हा घडले ते लिहा.
स्वामीजींच्या मनाला अतिशय आनंद झाला.
उत्तर:
जेव्हा, स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले आणि त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले.
२. परिणाम लिहा.
i. स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली.
परिणाम: नावाडी घाबरले आणि त्यांच्यातील दोघा-तिघांनी नावा काढून स्वामीजींचा पाठलाग सुरू केला.
३. कारणे लिहा.
i. स्वामीजींना आपण श्रीपादशिलेवर जावे असे वाटले; कारण…
उत्तर:
स्वामीजींची भारतयात्रा संपत आलेली होती आणि ते कन्याकुमारी या देशाच्या टोकापर्यंत आले होते; मात्र ते देशाचे टोक नसून समुद्रातील शिलाखंड, श्रीपादशिला हे देशाचे टोक असून आपण या कन्याकुमारीच्या चरणी भारतयात्रा समर्पित करावी अशी त्यांची इच्छा होती.
ii. स्वामीजींकडे नावाड्याला देण्याकरिता पैसे नव्हते; कारण…
उत्तरः
निष्कांचन संन्यासी होते.
iii. स्वामीजींना समुद्रात उडी मारताच नावाड्यांनी स्वामीजींचा पाठलाग सुरू केला; कारण…
उत्तर:
स्वामीजींना वाटेत संकट येईल किंवा त्यांचा दम संपेल अशी त्यांना भीती होती.
कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती
१. स्वामी विवेकानंदांप्रमाणे तुम्ही कधी निडरपणे वागला आहात का? तुमचा अनुभव लिहा.
उत्तर:
हो काही दिवसांपूर्वी एक कुत्र्याचे पिल्लू नाल्यामध्ये पडले होते. जीवाच्या आकांताने ते ओरडत होते. माझ्या कानी तो आवाज पडताच मी क्षणाचाही विलंब न करता नाल्याजवळ गेलो. नाला किती खोल होता याची मला जराही कल्पना नव्हती; पण त्या क्षणी मनात कसलीही भीती संचारली नाही. त्या पिल्लाला वाचवणं एवढाच विचार मनात घोळत होता.
मी नाल्याच्या किनाऱ्यावरून सांभाळून चालत गेलो. किनाऱ्यावर अगदी अरुंद भागावरून चालताना तोल जाऊ नये, याची काळजी मी घेतली. अन्यथा नाल्यात पडून मोठा अपघात झाला असता. त्या भेदरलेल्या कुत्र्याजवळ पोहोचताच मी त्याला अलगद उचलून माझ्या बॅगेत टाकले आणि मी काळजीपूर्वक बाहेर आलो. त्या पिल्लाला मी झाडाच्या कडेला सोडून दिले आणि सुखरूप घरी परतलो. घरी हे कळताच काळजीपोटी आईबाबांचा थोडा ओरडा पडला; पण त्यांना माझा हेतू कळताच माझ्या निडरपणाचे कौतुकही वाटले.
परिच्छेद ४
कृती १ – आकलन
१. आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. विरोध
२. प्रतिकूलता
ii.
उत्तर:
१. सूर्यासारखा सर्वप्रकाशक
२. वसुंधरेसारखा सर्वसंग्राहक
२. चौकटी पूर्ण करा.
- देशातील अनेक लोकांना याची भ्रांत असते → □
- भाकरीची भ्रांत असताना लोकांना याचा उपदेश करू नये → □
- स्वामीजींनी समजावून सांगितलेले सूत्र → □
उत्तर:
- भाकरीची
- वेदांताचा
- सर्वधर्म समन्वयाचे सूत्र
[स्वामीजी त्यांना ………………..
………… समजावून सांगितले.]
कृती २ – आकलन
१. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये परिच्छेदातून शोधा व लिहा.
i. दृढनिश्चय –
ii. निर्भयता
iii. देशप्रेम –
उत्तर:
i. दृढनिश्चय –
मी आता दोन-तीन दिवस इथेच राहणार आहे.
ii. निर्भयता –
अ. स्वामीजी तीन दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही.
ब. जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो.
iii. देशप्रेम –
अ. तीन दिवस, तीन रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते.
ब. डोळ्यांसमोर सतत दिसत होता तो आपला भारत.
कन्याकुमारीच्या चरणी भारतयात्रा समर्पित करावी.
२. हे केव्हा घडले / घडेल ते लिहा.
i. नावाडी थक्क झाले.
उत्तर:
जेव्हा स्वामीजींनी त्यांना दोन-तीन दिवस ते श्रीपादशिलेवर राहणार असल्याचे सांगितले.
ii. स्वामीजी भावसमाधीमध्ये आहेत हे नावाड्यांना कळले.
उत्तर:
जेव्हा नावाडी जेवण आणत व स्वामीजींना खायला देण्यासाठी हाक मारत; मात्र स्वामीजींना काही ऐकू जात नसे.
३. कारणे लिहा.
i. नावाडी श्रीपादशिलेवर यायचे.
उत्तर:
स्वामीजी तीन दिवस, तीन रात्री ध्यानस्य बसलेले असताना त्यांना काहीतरी खायला दयावे या हेतूने नावाडी श्रीपादशिलेवर यायचे.
ii. नावाड्यांनी मारलेल्या हाका स्वामीजींना ऐकू येत नसत.
उत्तरः
स्वामीजी भावसमाधीत असल्यामुळे नावाड्यांनी मारलेल्या हाका स्वामीजींना ऐकू येत नसत.
४. खालील संकल्पना स्पष्ट करा.
i. भारतमातेचे चिंतन
उत्तर:
स्वामी विवेकानंदांनी भारतयात्रेच्या अंती श्रीपादशिलेवर तीन दिवस, तीन रात्री ध्यानस्थ बसून भारतमातेचे चिंतन केले. त्यावेळी त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, भारतातील गोरगरीब जनता. त्यावेळी स्वामीजींच्या लक्षात आले, की भारतातील अनेक लोक उपाशी आहेत. त्यांना जेवायला अन्नही नाही. त्यांना आपण वेदांताचा उपदेश करण्यात काही तथ्य नसते.
भाकरीची भ्रांत असताना, पोटापुरते अन्न मिळत नसताना वेदांत सांगणे हे धादांत खोटे आहे. लोकांना आधी दोन वेळेचे पुरेसे अन्न मिळाले पाहिजे; या चिंतनातून त्यांना भारतातील मूळ समस्येचे ज्ञान झाले, ती सोडवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
ii. सर्वधर्म समन्वयाचे सूत्र
उत्तर:
स्वामी विवेकानंद यांनी समस्त समाजाला समजावून सांगितलेले हे सूत्र धर्माची खरी व्याप्ती सांगते. सूर्य ज्याप्रमाणे सर्वांना समान प्रकाश देतो, तो कोणामध्येही भेदभाव करत नाही त्याप्रमाणेच धर्मही सर्वांसाठी समान असतो. ज्याप्रमाणे वसुंधरा, ही धरणी साऱ्यांना आपल्या उदरात सामावून घेते, सर्वांना समान न्यायाने वागवते त्याप्रमाणे खरा धर्मदेखील सर्वांना सामावून घेणारा असतो. या सूत्रातून स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म समान असून त्यांच्यात कोणताही भेद नाही हे स्पष्ट केले आहे.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
४. खालील वाक्यांतील काळ ओळखून लिहा.
- स्वामीजींनी तीन खंड एकेका दिवसात वाचून परत केले होते.
- आपली भारतयात्रा आता संपत आहे.
- स्वामी विवेकानंदांनी त्या सागरात एकदम उडी मारली.
- खरा धर्म हा सूर्यासारखा सर्वप्रकाशक आहे.
- ते भारतमातेचे चिंतन करत होते.
उत्तर:
- पूर्ण भूतकाळ
- अपूर्ण वर्तमानकाळ
- साधा भूतकाळ
- साधा वर्तमानकाळ
- अपूर्ण भूतकाळ
५. खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
i. मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।
जनी निंदय ते सर्व सोडूनि दयावे ।
जनी वंय ते सर्वभावे करावे ।
ii. शकुंतला देवी जणू मानवी संगणकच होत्या.
iii. पेटविलें पाषाण पठारावरती शिवबांनी
गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी
iv. वणवा पेटल्यागत त्याचे डोळे आग ओकू लागले.
उत्तर:
i. यमक
ii. उत्प्रेक्षा
iii. अनुप्रास, यमक
iv. उपमा
६. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
- महादेव
- नवरात्र
- सभासंमेलने
- बरेवाईट
- नीलकंठ
- गायरान
उत्तर:
- महान असा देव
- नऊ रात्रींचा समूह
- सभा, संमेलने इत्यादी.
- बरे किंवा वाईट
- निळा आहे कंठ ज्याचा असा तो (शंकर)
- गायीसाठी रान
७. योग्य जोड्या जुळवा.
क्र. | ‘अ’ गट (वृत्त) | ‘ब’ गट (यती) | |
i. | भुजंगप्रयात | अ. | ८ व्या व १४ व्या अक्षरावर |
ii. | वसंततिलका | ब. | ८ व्या अक्षरावर |
iii. | मालिनी | क. | ६ व्या व १२ व्या अक्षरावर |
ड. | ७ व्या अक्षरावर |
उत्तर:
(i – क),
(ii – अ),
(iii – ब)
८. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
- डोळ्यांखालून घालणे
- भ्रमण करणे
- उभे आडवे प्रश्न विचारणे
- कंठस्थ करणे
- मन केंद्रित होणे
- समर्पित करणे
- थक्क होणे
- पाठलाग करणे
- अंतःस्थ अग्नी प्रदीप्त होणे
- चिंतन करणे
- भ्रांत असणे
- ध्यानस्थ बसणे
उत्तर:
- डोळ्यांखालून घालणे – झरझर नजर टाकणे.
वाक्य:मराठीच्या पेपरच्या आधी नितेशने महत्त्वाचे प्रश्न पुन्हा डोळ्यांखालून घातले. - भ्रमण करणे – फिरणे, भटकणे.
वाक्यः त्या साधूंनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भारत भ्रमण केले होते. - उभे आडवे प्रश्न विचारणे – उलटसुलट प्रश्न विचारणे.
वाक्य: पोलिसांनी गुन्हेगाराला चौकशीत उभे आडवे प्रश्न विचारले. - कंठस्थ करणे – तोंडपाठ करणे.
वाक्य: अशितीने अठरा दिवसांत रामरक्षा कंठस्थ केली. - मन केंद्रित होणे – मन एकाग्र होणे.
वाक्य: मातीचे मडके घडवण्यावर विद्यांचे मन केंद्रित झाले होते. - समर्पित करणे – अर्पण करणे.
वाक्य: वीर जवान आपले जीवन देशासाठी समर्पित करतात. - थक्क होणे – आश्चर्यचकित होणे.
वाक्य: चित्रकलेची विशेष आवड नसणाऱ्या लहानग्या आर्याने अप्रतिम निसर्गचित्र काढलेले पाहून सारे थक्क झाले. - पाठलाग सुरू करणे – मागोवा घेणे.
वाक्य: पोलिसांनी चोराचा पाठलाग सुरू केला. - अंतःस्थ अग्नी प्रदीप्त होणे – आतील चैतन्य जागृत होणे.
वाक्य: वाईट परिस्थितीचा सामना करताना माणसातला अंतःस्थ अग्नी प्रदीप्त होतो. - चिंतन करणे – खूप सखोल विचार करणे.
वाक्य: थोर विचारवंत मानवी जीवनाविषयी चिंतन करतात. - भ्रांत असणे – चिंता असणे.
वाक्य: डोंबाऱ्याला रोजच्या जेवणाची भ्रांत असते. - ध्यानस्थ बसणे – मन एकाग्र करून ध्यानाच्या स्थितीत बसणे.
वाक्य:छोटा मधू प्रार्थनेनंतर ध्यानस्थ बसला.
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- डोळे
- आनंद
- काठ
- चरण
- हत्ती
- संकट
- जनता
उत्तर:
- नयन, नेत्र, चक्षु
- हर्ष, मोद
- तीर
- पाय, पद
- गज
- विपत्ती, आपत्ती
- लोक, प्रजा
२. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
- भारतयात्रा
- भावसमाधी
उत्तर:
- भारत, यात्रा, भार, भात, रत, रया, तर, तयार, यार.
- भाव, समाधी, भास, सभा, समा, मावस, मास.
३. खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.
- पोरबंदरच्या वात्सव्यात स्वामिजी वाचन करत.
- त्यांनी दिलेले उत्तर तकर्शुध्ध आहे.
- आपण आपल्या मनाची, बुद्दीची, नैत्रैद्रियाची शक्ती विकसित करू शकतो.
- कन्याकूमारीच्या चरणी भारतयात्रा समपीर्त करावी, असे त्यांना वाटले.
- हा कोणीतरी अद्वीतीय शक्तीशाली मनुष्य आहे.
उत्तर:
- पोरबंदरच्या वास्तव्यात स्वामीजी वाचन करत.
- त्यांनी दिलेले उत्तर तर्कशुद्ध आहे.
- आपण आपल्या मनाची, बुद्धीची, नेत्रेंद्रियांची शक्ती विकसित करू शकतो.
- कन्याकुमारीच्या चरणी भारतयात्रा समर्पित करावी, असे त्यांना वाटले.
- हा कोणीतरी अद्वितीय, शक्तिशाली मनुष्य आहे.
वाचा.
या पाठातील ‘वाचा’ अंतर्गत येणारा उतारा वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(टीप: वरील कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील गदय आकलन पाहावे.)
मराठीचे – विशेष संधी.
स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा पाठाची पार्श्वभूमी
प्रस्तुत पाठात लेखकांनी स्वामी विवेकानंदांची वाचनाची गती, आकलनशक्ती आणि भावसमाधी यांचे वर्णन केले आहे. स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा, त्यामागील हेतू, त्यादरम्यान उद्भवलेले प्रसंग यांचे यथोचित वर्णन या पाठात करण्यात आले आहे. भारताचे अंतिम टोक म्हणजेच कन्याकुमारीतील श्रीपादशिलेवर भावसमाधीत बसून स्वामी विवेकानंदांनी देशाची सदयस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयी चिंतन केले. हा प्रसंग स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची आंतरिक तळमळ अधोरेखित करतो.
स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा शब्दार्थ
स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा टिपा