Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता)

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता)

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 12 गोधडी (कविता)

गोधडी (कविता) Question Answer

प्रश्न १.
(अ)
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 18
उत्तर:
१. मायेलाही ऊब देणारी
२. बापाच्या फाटक्या धोतराचे आणि आईच्या फाटक्या लुगड्याचे, मायेचे अस्तर असणारी कपड्यांच्या चिंध्या असणारी
३. दाटीवाटीने बसवलेल्या मायेच्या माणसांच्या
४. आठवणींच्या सुईने शिवलेली

(आ)
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 17
उत्तर:
१. बापाच्या फाटक्या धोतराचा तुकडा
२. बापाने आईला घेतलेल्या लुगड्याचा तुकडा
३. भाच्याचा जीर्ण कुडता
४. आईला माहेराहून आलेल्या लुगड्याचा तुकडा
५. असंख्य ठिगळे असणारे आईचे लाडके लुगडे
६. बापाच्या कोपरीच्या बाहया

प्रश्न २.
कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा.

(अ) ……….
(आ) …………
(इ) ………
(ई) …………..
उत्तर:
(अ) कष्टाळूपणा
(आ) प्रेमळपणा
(इ) शिस्तबद्धता
(ई) सोशिकता

प्रश्न ३.
तुमच्या घरातल्या एखादया जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तर:
काही वेळा आपण आपल्या पहिल्यावहिल्या खास वस्तूसोबत भावनिक नात्याने जोडले जातो. माझ्या सायकलसोबतही माझे असेच भावनिक नाते आहे. ती माझ्या आयुष्यात आली, तेव्हा

केवढं भव्य स्वागत केलं होतं आम्ही तिचं ! तिला प्रेमाने ओवाळलं होतं, तिच्या गळ्यात फुलांची माळ घातली होती. माझे तिच्यावर जिवापाड प्रेम होते. शाळेत जाताना, शिकवणीला जाताना ती मला सोबत करायची. आईने बाजारातून वस्तू आणायला सांगितली, की मी तिच्यावर स्वार होऊन लगेच धूम ठोकायचे. मित्रमैत्रिणींसोबत खेळताना, त्यांच्यासोबत फिरायला जाताना माझी ही लाडकी सखी माझ्या सोबतच असे. मी दररोज तिच्यावर मायेने हात फिरवायचे, तिला वेळेवर तेलपाणी करायचे.

परंतु, आता मात्र माझी सायकल खूप थकली आहे, मोडकळीस आली आहे. बाबांनी ती भंगारवाल्याला दयायचे ठरवताच माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता. मला त्या कल्पनेने रडूच कोसळले होते. अखेरीस बाबांनी ‘आठवण’ म्हणून सायकल घरीच ठेवायचे वचन देताच मला हायसे वाटले. खरंच, काही वस्तू कितीही जुन्या झाल्या तरी त्यांच्याशी असलेले आपले खास नाते कायम टिकून राहते.

प्रश्न ४.
आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द / शब्दसमूह लिहा.
उत्तर:
‘गोधडी’ या कवितेत कवी डॉ. कैलास दौंड यांनी गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, आठवणी यांचे दर्शन घडवले आहे. ‘मायेलाही मिळणारी ऊब’, ‘आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे अस्तर’, ‘अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या’, ‘माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुर’ आणि ‘पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं-आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं’, ‘आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात’ या सर्व ओळींतून आईविषयीच्या भावना कवी व्यक्त करतो.

प्रश्न ५.
खालील ओळींतील भाव स्पष्ट करा.

(अ) ‘गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.’
उत्तर:
‘गोधडी’ या कवितेत कवी डॉ. कैलास दौंड यांनी गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, आठवणी यांचे दर्शन घडवले आहे.
गोधडी हे केवळ पांघरुण नसते. ती दुःख व दारिद्र्य यांनी होरपळलेल्या जीवांना दिलेली मायेची ऊब, प्रेमाचा स्पर्श असते. गोधडी आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक असते. थंडीवाऱ्यापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी आई गोधडी शिवते. या गोधडीसाठी तिने वडिलांच्या फाटक्या धोतराचे किंवा स्वतःच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर वापरलेले असते. हे अस्तर गोधडीला आधार देते, मजबूत करते. त्या अस्तराला आईवडिलांच्या कष्टाचा सुगंध असतो. त्यातून मायेची ऊब जाणवत राहते, असा भाव येथे व्यक्त होतो. आईवडिलांचे मुलांसाठीचे अपार कष्ट व प्रेम या दोन्ही गोष्टी येथे समर्पकरित्या मांडल्या आहेत.

(आ) ‘गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ‘ऊब’.
उत्तर:
‘गोधडी’ या कवितेत कवी डॉ. कैलास दौंड यांनी गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, आठवणी यांचे दर्शन घडवले आहे.

गोधडी बनवण्यासाठी अनेक लहान-मोठ्या चिंध्या लागतात. या चिंध्या घरातील मायेच्या व्यक्तींच्या जुन्या कपड्यांच्या असतात. गोधडी म्हणजे फक्त हा चिंध्यांचा बोचका / गाठोडे नसते. त्या चिंध्यांमागे विविध आठवणी जोडलेल्या असतात. त्यात आईच्या पहिल्या संक्रांतीची गोड आठवण म्हणजेच वडिलांनी घेतलेले लुगडे तसेच तिच्या माहेरातून खास तिच्यासाठी आलेले लुगडे असते. मामाने त्याच्या भाच्यासाठी घेतलेला सदरा, वडिलांच्या कोपरीच्या बाह्या व त्यांचे फाटके धोतर अशा गोष्टी त्यात असतात. म्हणजेच, या गोधडीत घरातल्या व्यक्तींच्या आठवणी, प्रेमाची ऊब असते. आईही मोठ्या प्रेमाने त्या आठवणी, माया गुंफत ती गोधडी शिवते, हे वात्सल्य कवी येथे मांडतो.

लिहिते होऊया

• ‘गोधडीचे आत्मकथन’ या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा.
(टीप: या कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील निबंधलेखन पाहावे.)

उपक्रम : आईने घरातील टाकाऊ वस्तूंपासून जशी स्वकष्टाने गोधडी बनवली, तशी ‘मकरसंक्रांत’ या सणाला प्रेमाची भेट देण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून भेटकार्डे बनवा. मित्रांना, नातेवाईकांना, शिक्षकांना प्रेमाने भेट दया.
(टीप: विदयार्थ्यांनी हा उपक्रम स्वतः करावा.)

आपण समजून घेऊया.

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यांतील एक घटक म्हणजे ‘अलंकार’.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 20

(अ) आता आपण शब्दालंकारातील ‘यमक’ आणि ‘अनुप्रास’ या अलंकाराचा अभ्यास करूया.

(१) यमक अलंकार

• खालील ओळी वाचा व निरीक्षण करा.
मना चंदनाचे परी त्वा झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ।।
अधोरेखित शब्दांच्या उच्चारांमध्ये साम्य आढळते का? ____
उत्तर:
हो. □

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये, किंवा ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास, तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.

• खालील ओळी वाचा व ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर / शब्दांच्या जोड्या शोधा.

(अ) नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी
रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी
(आ) आई, तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा
(इ) कडीस जोडोनि दुज्या कडीला
मनुष्य बनवीतसे साखळीला
उत्तर:
(अ) नदीशी – झाडांशी
(आ) तान्हा – पान्हा
(इ) कडीला – साखळीला

(२) अनुप्रास अलंकार

• खालील ओळी वाचा आणि त्यांतील कोणत्या अक्षरांची पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा.
गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले.
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.
पुनरावृत्ती झालेले वर्ण लिहा. _____ ______
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 15
उत्तर:
ल, ग, द, त, च

एखादया वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा ‘अनुप्रास’ हा अलंकार होतो.

• खालील ओळींत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा.

(अ) रजतनील, ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील _____
उत्तर:
(अ) ल

(आ) संत म्हणती, “सप्त पदें सहवासें सख्य साधूशी घडतें । ______
उत्तर:

भाषासौंदर्य

• आलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते. आपले विचार अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. खाली काही आलंकारिक शब्द दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दांप्रमाणे इतर काही आलंकारिक शब्दांची यादी तयार करा.

  • गजान्तलक्ष्मी – श्रीमंत मनुष्य
  • गळ्यातला ताईत – अत्यंत प्रिय व्यक्ती
  • बाळकडू – लहानपणीचे संस्कार
  • काथ्याकूट – निष्फळ चर्चा
  • अष्टपैलू – अनेक बाबींमध्ये प्रवीण
  • अळवावरचे पाणी – अल्प काळ टिकणारे
  • अजातशत्रू – ज्याला कोणी शत्रू नाही असा
  • झाकले माणिक – गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य
  • इतिश्री – शेवट
  • अक्षरशत्रू – निरक्षर, अशिक्षित

(टीप: या कृतीच्या उत्तराकरिता व्याकरण विभागातील आलंकारिक शब्द पाहावेत.)

• वाचा आणि समजून घ्या.

आई : अरे जॉन, किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग ?
जॉन : आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं ?
आई : मुळात आवश्यक तेवढेच नवीन कपडे घ्यावेत. त्यांचा पुरेपूर वापर करावा.
जॉन : अगं हो, पण आता काय करू ते सांग ना !
आई : यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत, ते बाजूला कर. जे तुझ्या अंगाला येत नाहीत, जे फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर.
जॉन : आई, आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का?
आई : हो, नक्कीच. त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे.
जॉन : आई, काय काय बनवता येईल गं या कपड्यांचं ?
आई : तुला सुट्टी आहे ना आज, चल आपण दोघं मिळून बनवूया..
(आई जॉनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते.)
जॉन : आई, किती छान झाल्यात गं या वस्तू. खूपच छान दिसत आहेत. खरंच, आपण जुन्या कपड्यापासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. यामुळे नक्कीच कपड्याचा अपव्यय न होता पुनर्वापर होईल.

Class 8 Marathi Balbharati Chapter 12 गोधडी (कविता) Question Answer

संकलित मूल्यमापन

कृति १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 3
उत्तर:
१. बापाचे फाटके धोतर
२. आईचे फाटके लुगडे

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 4
उत्तर:
१. दाटीवाटीनं
२. दटावून

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 5
उत्तर:
१. बाप (वडील)
२. आई
३. मामा
४. भाचा

२. चौकटी पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 8
उत्तर:
१. बापाचे फाटके धोतर
२. आईचे फाटके लुगडे

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 9
उत्तर:
१. दाटीवाटीनं
२. दटावून

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 10
उत्तर:
१. बाप (वडील)
२. आई
३. मामा
४. भाचा

iv.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 11
उत्तर:
१. बापाच्या फाटक्या धोतराचा तुकडा
२. बापाने आईला घेतलेल्या लुगड्याचा तुकडा
३. भाच्याचा जीर्ण कुडता
४. आईला माहेराहून आलेल्या लुगड्याचा तुकडा
५. असंख्य ठिगळे असणारे आईचे लाडके लुगडे
६. बापाच्या कोपरीच्या बाया

v.
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 12
उत्तर:
१. मायेलाही ऊब देणारी
२. बापाच्या फाटक्या धोतराचे आणि आईच्या फाटक्या लुगड्याचे, मायेचे अस्तर असणारी
३. दाटीवाटीने बसवलेल्या मायेच्या माणसांच्या कपड्यांच्या चिंध्या असणारी
४. आठवणींच्या सुईने शिवलेली

३. कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
१. कष्टाळूपणा
२. प्रेमळपणा
३. शिस्तबद्धता
४. सोशिकता

४. चौकटी पूर्ण करा.

  1. गोधडी म्हणजे केवळ हे नव्हे. → □
  2. गोधडी म्हणजे ही ऊब असते → □
  3. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील आठवणींचा गोफ विणणारी → □

उत्तर:

  1. चिंध्यांचा बोचका
  2. मायेलाही मिळणारी ऊब
  3. आई

[गोधडी म्हणजेच ……….
……….. ऊब असते ऊब !]

कृती २ – आकलन

१. योग्य विधान ओळखा.
अ. आईचे लाडके लुगडे नवेकोरे आहे.
ब. आईच्या लाडक्या लुगड्याला एकही ठिगळ लावलेले नाही.
क. आईचे लाडके लुगडे असंख्य ठिगळे लावलेले आहे.
ड. आईच्या लाडक्या लुगड्याला फक्त एकच ठिगळ लावलेले आहे.
उत्तर:
आईचे लाडके लुगडे असंख्य ठिगळे लावलेले आहे.

२. ‘जीर्ण कुडता’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
मामाने दिलेले भाच्याचे (आपल्या मुलाचे) कोणते वस्त्र आईने गोधडी शिवण्यासाठी वापरले आहे ?

३. ‘आईने आठवणींच्या सुईने गोधडी शिवलेली असते’, या अर्थाची कवितेतील ओळ शोधून लिहा.
उत्तर:
आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात.

४. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. आईला तिच्या माहेरातून कोणते वस्त्र भेट म्हणून पाठवलेले आहे?
उत्तर:
आईला तिच्या माहेरातून लुगडे भेट म्हणून पाठवलेले आहे.

ii. आईचे लाडके लुगडे तिच्यासाठी कोणी व केव्हा घेतलेले आहे ?
उत्तर:
आईचे लाडके लुगडे तिच्यासाठी तिच्या नवऱ्याने (बापाने) तिच्या पहिल्या संक्रांतीला घेतलेले आहे.

कृती ३ – सरळ अर्थ

१. ‘गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या,’ या ओळींतील सरळ अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
‘आईने गोधडीत विविध प्रकारच्या चिंध्या दामटवून, दाटीवाटीने एकत्र बसवलेल्या असतात.’ असा अर्थ कवी येथे स्पष्ट करतो.

कृती ४ – काव्यसौंदर्य

१. ‘त्यात असतो मामाने घेतलेला, भाच्याचा जीर्ण कुडता माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं – आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाहया’, या ओळींतील अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
‘गोधडी’ या कवितेत कवी डॉ. कैलास दौंड यांनी गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, आठवणी यांचे दर्शन घडवले आहे.

आई शिवत असलेल्या गोधडीत मायेच्या माणसांनी वापरलेल्या कपड्यांच्या चिंध्या असतात. त्यात मामाने भाच्यासाठी घेतलेला, आता फाटलेला सदरा, माहेरातून आईसाठी आलेल्या लुगड्याचा तुकडा असतो. तसेच, वडिलांनी पहिल्या संक्रांतीसाठी आईला घेतलेले तिचे आवडते लुगडे असते. जे आता असंख्य ठिगळं लावलेल्या अवस्थेत आहे, फाटून जीर्ण झालेले आहे, तरीही आईने ते जपले आहे. वडिलांच्या जुन्या झालेल्या कोपरीच्या बाया देखील आई गोधडीत टाकून शिवते. या केवळ चिंध्या नसतात, तर ती आपल्या माणसांच्या प्रेमाची ऊब असते. जणू त्यांच्या आठवणी गोधडीच्या रूपात जपल्या जातात, असा आशय कवी येथे मांडतो.

मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी कृती

१. खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

i. प्रस्तुत कवितेच्या कवी / कवयित्रीचे नाव लिहा.
उत्तर:
डॉ. कैलास दौंड

ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तर:
गोधडीच्या माध्यमातून कौटुंबिक नात्यामधील आठवणींचे भावस्पर्शी चित्रण हा कवितेचा विषय आहे.

iii. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) कुडता
(ब) वडील
(क) गाठोडे
(ड) आठवण
उत्तर:
(अ) सदरा
(ब) वडील
(क) गाठोडे
(ड) आठवण

iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तरः
आई-वडिलांच्या प्रेमाचे नाते जपत गरिबीतही आनंदाने जगण्याचा संदेश ही कविता देते.

v. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
मुक्तछंदातील ही कविता आहे. अल्पाक्षरांच्या साहाय्याने अत्यंत साधे, सोपे शब्द आपल्या मनाचा ठाव घेतात. निवेदनात्मक शैलीचा वापर करताना कवी आपल्यासमोर रंगीबेरंगी गोधडीच्या बरोबरीने नात्यांचे भावचित्र उभे करण्यात यशस्वी ठरतो. कवितेची भाषा भावनाप्रधान असून गोधडीचे प्रतीक वाचकांच्या मनात भावनांचा कल्लोळ निर्माण करते.

vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.
उत्तर:
आपल्या कुटुंबातील मागील पिढीचा आदर करून त्यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल कायम कृतज्ञ राहावे तसेच कौटुंबिक नात्यातील आपुलकी माणसाला माणूस म्हणून कायम ठेवते हा विचार या कवितेतून मांडला आहे.

vii. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका
गोधडी म्हणजेच गोधडी असते
मायेलाही मिळणारी ऊब असते
उत्तर:
गोधडी म्हणजे केवळ चिंध्या जोडून तयार केलेले पांघरुण . किंवा गाठोडे नसते, तर गोधडीमध्ये माया – ममतेलाही ऊब देण्याची ताकद असते. गोधडीची माया ही मायेलाही ऊबदार बनवते.

viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर:
‘गोधडी’ या प्रतीकाद्वारे कवी आई-वडिलांच्या मायेची कष्टाची आठवण वाचकांना करून देतो. त्याच्या भावनाप्रधान शब्दांमुळे कविता हृदयाचा ठाव घेते. आठवणींच्या सुईनं शिवलेल्या या गोधडीतील नातेसंबंध जोडणारे कपड्याचे तुकडे साऱ्या कौटुंबिक आठवणी जागृत करतात व मन हेलावून सोडतात म्हणून ही कविता मला खूप आवडली.

काव्यपंक्तींचे रसग्रहण

१. पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
गोधडीला असते अस्तर
बापाच्या फाटक्या धोतराचे
किंवा
आईला बापाने घेतलेल्या
फाटक्या लुगड्याचे
उत्तर:
डॉ. कैलास दौंड यांनी गोधडी या कवितेतून आई-वडिलांच्या कष्टमय जीवनाचे आणि नातेसंबंधाचे भावस्पर्शी वर्णन केले आहे. ‘गोधडी’ आपल्याला गरिबीतही आनंदाने नातेसंबंध जपण्याचा संदेश देते. गोधडी शिवताना आई आतमध्ये अस्तर म्हणून वडिलांचे फाटके धोतर किंवा स्वतःची फाटकी साडी वापरते. आई-वडील आपल्या कष्टांतून आपल्या मुलांना गरिबीची दुःखाची झळ पोहोचू देत नाहीत. त्याच्यावर मायेचे पांघरुण घालतात. गोधडीच्या या अस्तरात एकूणच आईवडिलांचे कष्ट, एकमेकांवरील प्रेम आणि मुलांसाठीची माया हे सारे सामावलेले असते.

या कवितेच्या ओळी मुक्तछंदात लिहिलेल्या आहेत. कवीने मनातील भावना मुक्तपणे शब्दांद्वारे कागदावर उतरवल्यानंतर त्याचे शब्द थेट काळजाचा वेध घेणारे आहेत. आईवडिलांच्या कष्टांचे, मायेचे भावनाप्रधान शब्दांतून कवीने केलेले वर्णन अत्यंत परिणाम साधणारे आहे.

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

१. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.

  1. आई भाजी कापत होती.
  2. मधूने श्रीखंड खाल्ले.
  3. मांजराने कुत्र्याला बोचकारले.
  4. तिने कपडे धुतले.

उत्तर:

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. भावे प्रयोग
  4. कर्मणी प्रयोग

२. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.

  1. आईबाबा
  2. भांडीकुंडी
  3. क्रीडांगण
  4. पंचप्राण
  5. दररोज

उत्तर:

  1. आई आणि बाबा
  2. भांडी, कुंडी इत्यादी विविध प्रकारचे सामान
  3. क्रीडेसाठी अंगण
  4. पाच प्राणांचा समूह
  5. प्रत्येक दिवशी

३. खालील ओळींतील वृत्त ओळखा.

i. मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना सर्वथा नीति सोडूं नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ।
ii. तरुवर सुफलांच्या आगमी नम्र होती
उत्तर:
i. भुजंगप्रयात वृत्त
ii. मालिनी वृत्त

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहा.

  1. सूर्य
  2. पृथ्वी
  3. आई
  4. बाप

उत्तर:

  1. मित्र, रवी, आदित्य, भानू, भास्कर
  2. वसुंधरा, रसा, मही, अवनी, क्षमा
  3. माता, माऊली, जननी, माय, जन्मदात्री
  4. तात, पिता, जनक, जन्मदाता, बाबा, वडील

२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. जीर्ण ×
  2. कठोर ×
  3. आशा ×
  4. माहेर ×

उत्तर:

  1. नवाकोरा
  2. मृदू
  3. निराशा
  4. सासर

३. खालील शब्दांचे वचन बदला.

  1. गोधडी
  2. चिंध्या
  3. कुडता
  4. लुगडे
  5. बाहया
  6. सुई

उत्तर:

  1. गोधड्या
  2. चिंधी
  3. कुडते
  4. लुगडी
  5. बाही
  6. सुया

४. शब्दांच्या आधी ‘गैर’ हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तरः
गैरहजर, गैरशिस्त, गैरसमज, गैरसोय, गैरहिशेबी, गैरसावध इत्यादी.

५. खालील आलंकारिक शब्दांचे अर्थ लिहा.

  1. छत्तीसचा आकडा
  2. अकरावा रुद्र
  3. ओनामा
  4. पांढरा कावळा
  5. पिकले पान

उत्तर:

  1. शत्रुत्व
  2. अतिशय तापट व्यक्ती
  3. सुरुवात
  4. निसर्गात नसलेली गोष्ट
  5. म्हातारी व्यक्ती

६. खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

i. त्यांना हव्या तशा; त्यांच्या मनपसंत गोष्टी त्यांना मिळाल्या.
ii. अबब! केवढी मोठी वसाहत !
iii. रघू, दिवा लाव.
iv. ‘गोधडी’ ही कविता मला फार आवडते.
उत्तरः
Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 16

गोधडी (कविता) कवितेचा आशय

‘गोधडी’ ही कविता कवी डॉ. कैलास दौंड यांच्या ‘उसाच्या कविता’ या काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे. ‘गोधडी’ हे गरिबीने गांजलेल्या जीवनातील प्रेमाच्या, मायेच्या उबदार स्पर्शाचे, तसेच आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, आठवणी उलगडण्याचा प्रयत्न येथे कवीने केलेला आहे.

गोधडी (कविता) कवितेचा भावार्थ

‘गोधडी म्हणजेच……… मिळणारी ऊब असते.’
गोधडी ही फक्त लहान-मोठ्या चिंध्यांचे बोचके नसते. ही गोधडी म्हणजेच गरीब आईवडिलांच्या प्रेमाचा उबदार स्पर्श असते. मायेलाही माया देणारी ऊब असते. चिंध्यांना कलात्मकरित्या एकत्र जोडत प्रेमानं शिवलेली गोधडी मायेची ऊब मिळवून देते.

‘गोधडीला असते………फाटक्या लुगड्याचे’
गोधडी शिवताना आई आतमध्ये अस्तर म्हणून वडिलांचे फाटके धोतर किंवा स्वतःची फाटकी साडी वापरते. आईवडील गरिबीची, दु:खाची झळ आपल्या मुलांपर्यंत पोहोचू न देता त्यांच्यावर मायेचं जे पांघरुण घालतात, ते म्हणजे गोधडी. त्यातल्या अस्तरातही त्यांचे प्रेम लपेटलेले असते.

‘आत- गोधडीत………. दटावून बसवलेल्या. ‘
आईने गोधडीत विविध प्रकारच्या चिंध्या दामटवून, दाटीवाटीने एकत्र बसवलेल्या असतात.

‘तेव्हा त्या फक्त……….. लुगड्याचं पटकुर’
गोधडीतील चिंध्या ह्या फक्त चिंध्याच नसतात. त्या प्रत्येक चिंधीत आठवण दडलेली असते. त्यातून जणू नात्यातील प्रेम, माया जाणवते. त्यात मामाने भाच्यासाठी घेतलेला; परंतु आता फाटत आलेला कुडता असतो. आईला माहेराकडून आलेल्या तिच्या जुन्या लुगड्याचा तुकडा असतो.

‘आणि पहिल्या संक्रांतीला………. कोपरीच्या बाह्या’
त्या गोधडीत आईला लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला बापाने घेतलेल्या लुगड्याच्या चिंध्या असतात. असंख्य ठिगळं लावून फाटेपर्यंत वापरलेलं हे आईचं लाडकं लुगडं असतं. त्याच्याशी तिच्या भावना जोडलेल्या असतात. तसेच, गोधडीत वडिलांच्या कष्ट करून विरलेल्या – कोपरीच्या बाह्यादेखील असतात.

‘आईनं ते……….. असते ऊब !’
आईने गोधडी शिवताना वापरलेल्या चिंध्यांमध्ये अनेक आठवणी दडलेल्या असतात. त्यामुळे, आई जणू आठवणींच्या सुईने, ती आपल्या माणसांची माया, ते प्रेम गोधडीत शिवत असते. म्हणूनच, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे बोचके नसते, तर ती मायेची, प्रेमाची ऊब असते.

गोधडी (कविता) शब्दार्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 1

गोधडी (कविता) टिपा

Class 8 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer गोधडी (कविता) 2

Leave a Comment