Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 19 Question Answer गे मायभू (कविता) for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 19 Question Answer गे मायभू (कविता)
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 19 गे मायभू (कविता)
गे मायभू (कविता) Question Answer
प्रश्न १.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो ?
उत्तर:
कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो.
(आ) मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती?
उत्तर:
सूर्य, चंद्र आणि तारे ही मातृभूमीची आरती करण्याची साधने आहेत.
(इ) कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला?
उत्तर:
कवीच्या जन्माला मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला.
प्रश्न २.
खालील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
(अ) आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे-
उत्तर:
‘गे मायभू’ या कवितेत कवी सुरेश भट यांनी आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा परमोच्च आदर अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे.
कवीच्या जीवनात मातृभूमीला आईइतकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातृभूमी आपल्याला वाढवते, सर्वांगाने घडवते. तिचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. या कृतज्ञतेच्या भावनेतून कवीला मातृभूमीचे ऋण फेडायचे आहेत. त्यासाठी काय करावे नि किती करावे असे त्याला सतत वाटत राहते. म्हणून, तो मातृभूमीला सांगतो, ‘हे मातृभूमी, मी तुझे सारे पांग फेडणार आहे. त्यासाठी मी तुझी आरतीदेखील करणार आहे. तुझी आरती करण्यासाठी मी साक्षात् सूर्य, चंद्र आणि तारे आणणार आहे. त्यांच्या अलौकिक तेजाने मी तुला ओवाळेन म्हणजेच, मातृभूमीचा सन्मान करण्यासाठी मी अशक्य ते शक्य करेन असे कवीला यातून स्पष्ट करायचे आहे.
(आ) आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा-
उत्तर:
‘गे मायभू’ या कवितेत कवी सुरेश भट यांनी आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा परमोच्च आदर अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे.
कवी म्हणतो, ‘आई मी वयाने कितीही मोठा झालो तरी तुझ्यापुढे मी तुझं तान्हं बाळच आहे. तू माझी माऊली आहेस. मला पुष्ट होण्यासाठी तुझी गरज आहे. मला शब्दसामर्थ्य, प्रतिभासामर्थ्य मिळवण्यासाठी तुझ्या प्रेमपान्याची आवश्यकता आहे. तुझ्या अमृतमयी पान्याची धार तू माझ्या शब्दांमध्ये सोड. जेणेकरून माझी भाषा मधुर, रसाळ आणि समृद्ध बनेल.’ असे कवीला येथे सांगायचे आहे.
प्रश्न ३.
हे केव्हा घडते ते लिहा.
(अ) कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते………….
उत्तर:
जेव्हा कवी मातृभूमीची पायधूळ ललाटास (कपाळास) लावतो.
(आ) कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो………….
उत्तर:
जेव्हा कवीची वाणी मातृभूमीच्या दुधाने भिजून जाते.
प्रश्न ४.
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
(अ) माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव.
उत्तर:
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा
(आ) शब्दसामर्थ्य, प्रतिभासामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन.
उत्तर:
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी.
प्रश्न ५.
कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा.
i. पांग फेडणे.
ii. पायधूळ घेणे.
उत्तर:
i. पांग फेडणे – जीवनभर समाजासाठी लोकोत्तर कार्य करून त्या सुपुत्राने मायभूमीचे पांग फेडले.
ii. पायधूळ – घेणे महापुरुषांना वंदन करून त्यांची पायधूळ घ्यावी.
प्रश्न ६.
कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा.
उत्तर:
- सारे तारे
- तान्हा – पान्हा
- कशाला आला
- जराशी काशी
- गाणी-वाणी
प्रश्न ७.
स्वमत.
(अ) कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे, ते स्पष्ट करा.
उत्तर:
‘गे मायभू’ या कवितेत कवी सुरेश भट यांनी आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा परमोच्च आदर अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे.
या कवितेत कवी ‘पायधूळ’ हा शब्द भारतमातेच्या पवित्र मातीसाठी वापरतो. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भूमीत संत, महंत, महान शूरवीर, नररत्ने जन्माला आली आहेत. त्यांनी आपल्या महान कार्याद्वारे या भूमीला पावन केले आहे. ही भारतमातेची पवित्र माती मस्तकी लावताच माझी भाग्यरेषा उजळून निघते. भारतमातेच्या पायधुळीने म्हणजेच तिच्या मातीच्या स्पर्शाने माझ्या भाग्याला पावित्र्य, सामर्थ्य प्राप्त होते, असे कवीला यातून सांगायचे आहे.
(आ) ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ या ओळीचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
कवी म्हणतो, की ‘हे मातृभूमी, तू मला सर्वार्थाने घडवले आहेस. तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. हे तुझे कधीच न फिटणारे सारे उपकार मी फेडेन.’
(इ) कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘गे मायभू’ या कवितेत कवी सुरेश भट यांनी आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा परमोच्च आदर अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे.
आपल्याला जन्म देणारी जरी आई असली तरी आपण मातृभूमीचीही बाळे आहोत. मातृभूमी आपल्याला तिच्या अंगाखांद्यांवर खेळवते. तीच आपल्याला जगवते, वाढवते, घडवते. त्यामुळे कवीच्या मनात मातृभूमीविषयी आत्यंतिक प्रेम, निष्ठा, आदर, कृतज्ञता जाणवते. त्याला आपल्या मातृभूमीचे ऋण फेडायचे आहे. त्यासाठी काय करू नि किती करू अशी त्याची अवस्था झाली आहे.. चंद्र, सूर्य, तारे तो तिच्या आरतीला आणण्याची तयारी दर्शवतो. म्हणजेच मातृभूमीसाठी अशक्य ते शक्य करण्याची त्याची तयारी आहे. जिच्या पोटी जन्म घेऊन जन्म सार्थक झाला, जिने भाग्य उजळवले, तिच्याकरिता गौरवगाणी गाण्याचा त्याचा विचार आहे. आपणही सदैव मातृभूमीच्या रक्षणासाठी, प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, हेच आपल्याला या कवितेतून शिकायला मिळते.
चर्चा करूया.
आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी काय कराल, याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा.
उत्तर:
चर्चेसाठीचे मुद्दे:
- भारतभूमीचे पुत्र म्हणून तुमची वैयक्तिक जबाबदारी
- गट पातळीवर तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत किंवा एखादया समूहासोबत तुम्ही काय कराल?
- शालेय स्तरावर कोणते उपक्रम करू शकता?
- स्वतः च्या देशाविषयीचा अभिमान वाढावा व देशासाठी काही सकारात्मक काम करण्याची प्रेरणा लोकांना मिळावी म्हणून तुम्ही काय कराल?
- समाजमाध्यमांच्या वापरातून जनजागृती.
- देशाला विकसित देश बनवण्याच्या दृष्टीने तुमचे विचार व कल्पना सांगा.
- सामाजिक विषमता दूर करण्यासाठी काय कराल? viii. भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही कोणते करिअर / क्षेत्र निवडू इच्छिता?
- तुम्ही करिअर म्हणून निवडलेल्या कोणत्याही क्षेत्राद्वारे देशाचे नाव उंचावण्यासाठी काय प्रयत्न कराल?
(टीप: प्रस्तुत मुद्द्यांच्या आधारे विदयार्थी वर्गात चर्चा करू शकतात.)
उपक्रम
(१) आपल्या मायभूचे पांग फेडण्यासाठी काम केलेल्या पाच लोकांची माहिती मिळवा. वर्गात सांगा.
(२) स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘सागरास’ ही कविता मिळवून वाचा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 19 गे मायभू (कविता) Question Answer
संकलित मूल्यमापन
कृती १ आकलन
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
१. प्रयाग
२. काशी
२. खालील चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
i. तान्हा
ii. स्वतःची व्यथा
मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती
१. खालील मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
i. प्रस्तुत कवितेच्या कवी/ कवयित्रीचे नाव लिहा..
उत्तर:
कवी – सुरेश भट
ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तर:
मातृभूमीविषयीचा आदर व कृतज्ञता हा या कवितेचा विषय आहे.
iii. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) तान्हा
(ब) मायभू
(क) व्यथा
(ड) वाणी
उत्तर:
(अ) लहान मूल
(ब) मातृभूमी
(क) दुःख
(ङ) वाचा
iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तर:
आपल्या जीवनात मातृभूमीचे आई एवढेच महत्त्व असते त्यामुळे या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे हा संदेश ही कविता देते.
v. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
कवितेच्या यमकप्रधान रचनेमध्ये असलेल्या सहजतेमुळे कविता लयबद्ध झाली आहे. कवीने वापरलेले शब्द कवितेला गेयता प्राप्त करून देतात. दोन दोन ओळींच्या बंधातील ही काव्यरचना असून मातृभूमी विषयीचा आदरभाव काळजाला भिडतो.
vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.
उत्तरः
मातृभूमी आपल्याला सर्वांगाने व सर्वार्थाने घडवते. या मातृभूमी विषयीचा कृतज्ञता भाव या कवितेतून व्यक्त झाला आहे.
vii. प्रस्तुत कवितेतील पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे हा जन्मास अर्थ आला.
आई, तुझ्यापुढे माझी दुःखे मी कशाला मांडू? मी खरोखरच खूप भाग्यवान आहे; कारण तुझ्यापोटी जन्म घेतल्याने माझा जन्म सार्थकी लागला आहे.
viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर:
कवीने मातृभूमीला आई समजून केलेला गौरव अतिशय प्रत्ययकारी शब्दांत मांडला आहे. कवितेला स्वतःची एक लयबद्धता व गेयता आहे त्यामुळे ही कविता सतत गुणगुणावीशी वाटते. कवितेतील सहजसोप्या शब्दरचनेमुळे कविता समजण्यासाठी सोपी आहे. म्हणून, मला ही कविता खूप आवडली.
काव्यपंक्तींचे रसग्रहण
१. पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी
उत्तर:
कवी सुरेश भट यांनी गे मायभू या कवितेत मातृभूमीला आई समजून आपण तिचे लेकरू असल्याप्रमाणे तिचा गौरव केला आहे. राष्ट्ररूपी आईला ते तुझ्यामुळेच जीवनाचे सार्थक झाल्याचे सांगतात. मातृभूमी विषयीचा परमोच्च आदर अतिशय गौरवपूर्ण रीतीने कवी व्यक्त करतात.
मातृभूमीरूपी आईला कवी म्हणतात, की मी तुझी गाणी रोज गाईनं, कारण तुझ्या दुधामध्ये न्हाऊन माझ्या वाणीला म्हणजेच शब्दांना एक शक्ती प्राप्त झाली आहे. माझी कविता मी तुझेच लेकरू असल्यामुळे समृद्ध झाली आहे.
दोन-दोन ओळींच्या बंधात कवीने भावपूर्ण काव्यरचना करताना साधलेल्या यमकांमुळे कवितेला एक लयबद्धता व गेयता प्राप्त झाली आहे. संवादात्मक भाषाशैलीचा वापर करून कवी जणू आपल्या मातृभूमीशी बोलत आहे असे वर्णन कवितेत केले आहे. कवितेची शब्दरचना थेट काळजाला भिडणारी आहे.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे नाम, सर्वनाम, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय यांपैकी योग्य गटांत वर्गीकरण करा.
तुझ्यापुढे, मायभू, फेडीन, हळूच मी, चंद्र, गाईन, तुझे, आणीन, आरती, रोज, माझी, आता, तुझ्यामुळे
उत्तर:
२. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.
- मंगलने वहीवर रेघोट्या मारल्या.
- अशितीने कविता लिहिली.
- कुणाल वडापाव खाऊ लागला.
- विजूने प्रमोदला प्रसाद दिला.
उत्तर:
- भावे प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- भावे प्रयोग
३. खालील वाक्यांतील उपमेय, उपमान, साम्यवाचक शब्द, समानधर्म व अलंकार ओळखा.
i. लहान मूल मातीच्या गोळयासमान असते.
ii. नयन तुझे जणू गहिरा डोह !
iii. अनिताचं घर म्हणजे जणूकाय कोंबड्यांचा खुराडाच !
iv. बापाची माया आभाळागत असते.
उत्तर:
४. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
i. भाग्यरेषा
ii. पायधूळ
iii. एकवीस
iv. चक्रपाणि
v. घडोघडी
उत्तर:
५. खालील ओळींचे गण पाडा आणि वृत्त कोणते ते ओळखून लिहा.
नाही मुळीच मिळणे वरदक्षिणा ती
देवास साक्ष करुनी कर घेड़ हाती.
उत्तर:
वसंततिलका वृत्त
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.
- ऋण
- शशी
- भाग्यरेषा
- गीते
उत्तर:
- पांग
- चंद्र
- ललाटरेषा
- गाणी
२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- व्यक्त ×
- आदर ×
- कीर्ती ×
- पाप ×
- व्यापक ×
- खोल ×
उत्तर:
- अव्यक्त
- अनादर
- अपकीर्ती
- पुण्य
- संकुचित
- उथळ
३. शब्दांनंतर ‘आई’ प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
खोदाई, चराई, शिलाई, उजळाई, घडाई इत्यादी.
४. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
- स्वार्थाचा विचार न करणारा
- खूप चांगली संधी
- कविता लिहिणारी
- मनन करण्यास योग्य असे
उत्तर:
- निःस्वार्थी
- सुवर्णसंधी
- कवयित्री
- मननीय
५. लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.
- मात्रृभुमी / मातृभूमी / मात्रभूमी / मातृभुमि
- सर्वांगं / सर्वागं / सर्वांग / सेवाग
- अननसाध्यारण / अनन्यसादारण / अनन्यसाधारण / अन्यनसाधारण
- अंतकरण / अतंक्करण / अंतक्करण / अंत:करण
उत्तर:
- मातृभूमी
- सर्वांग
- अनन्यसाधारण
- अंतःकरण
गे मायभू (कविता) कवितेचा आशय
‘गे मायभू’ ही कविता सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार सुरेश भट यांनी लिहिली आहे. या कवितेत त्यांनी आपल्या अंत:करणातील मातृभूमीविषयीचा आदर गौरवपूर्ण शब्दांत व्यक्त केला आहे. आपल्या जीवनात मातृभूमीला आईएवढेच अनन्यसाधारण महत्त्व असते; कारण मातृभूमी आपल्याला सर्वांगाने व सर्वार्थानि घडवते. या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी कवीला काय करू आणि काय नको असे वाटत आहे. मातृभूमीविषयीची कृतज्ञता कवी येथे व्यक्त करत आहे.
गे मायभू (कविता) कवितेचा भावार्थ
मातृभूमीविषयी गौरवोद्गार काढताना कवी म्हणतो,
‘गे मायभू …………… सूर्य, चंद्र, तारे.’
हे मातृभूमी, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझ्या जडणघडणीत तुझा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे, तुझे सारे उपकार फेडण्यासाठी मी तुझी आरती करेन. तुझ्या आरतीला मी सूर्य, चंद्र आणि तारे घेऊन येईन आणि त्यांच्या तेजाने मी तुला ओवाळेन.
‘आई, तुझ्यापुढे ………………. हळूच पान्हा.’
आई मी वयाने कितीही मोठा झालो तरीही तुझ्यापुढे मात्र अजूनही मी तान्हं बाळ आहे. तुझ्या अमृतमयी प्रेमपान्हयाची धार तू माझ्या शब्दांमध्ये सोड. म्हणजेच माझ्या शब्दांना सामर्थ्य दे, माझी भाषा मधुर व समृद्ध कर.
‘आई, तुझ्यापुढे …………….. अर्थ आला.’
आई, मी तुझ्यापुढे माझी दुःखे कशाला मांडू? मी खरंच खूप भाग्यवान आहे; कारण तुझ्यापोटी जन्म घेतल्याने माझा जन्मच सार्थकी लागला आहे. तुझं हे ऋण फेडणं मला या जन्मातही शक्य नाही.
‘मी पायधूळ …………… प्रयाग काशी.
तुझ्या आशीर्वादात खूप सामर्थ्य आहे. तुझी पायधूळ मस्तकी लावताच माझी भाग्यरेषा उजळून निघते. ती प्रयाग, काशी समान पवित्र बनते. म्हणजेच, माझ्या भाग्याला तुझ्यामुळे पावित्र्य, सामर्थ्य प्राप्त होतं.
‘आई, तुझी …………….. भिजून वाणी!’
हे मातृभूमी, माझ्या मनात तुझ्याबद्दल परमोच्च आदर आहे; या कृतज्ञतेतून मी दररोज तुझी गौरवगाणी गात राहणार आहे. कारण तुझ्या दुधाने मी पुष्ट झालो आहे, मला शब्दसामर्थ्य प्राप्त झाले आहे. तुझ्या दुधाने माझी वाणी भिजून गेली आहे.
गे मायभू (कविता) शब्दार्थ:
तान्हा | अगदी लहान मूल, बाळ |
पान्हा | आईचे दूध |
मायभू | मातृभूमी, जन्मभूमी |
ललाटरेषा | भाग्यरेषा, कपाळावरील दैव रेषा |
व्यथा | क्लेश किंवा दुःख |
वाणी | वाचा, बोलण्याची शक्ती |
गे मायभू (कविता) वाक्र्रचार व त्यांचे अर्थ:
जन्मास अर्थ येणे. | जन्म सफल झाला असे वाटणे. |
पायधूळ घेणे. | चरणस्पर्श करणे, आशीर्वाद घेणे. |
पांग फेडणे. | उतराई होणे, उपकार फेडणे. |
गे मायभू (कविता) टिपा:
काशी | काशी हे पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे काशी विश्वनाथ हे शंकराचे मंदिर आहे. काशी विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. |
प्रयाग | प्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहर आहे. गंगा, यमुना या नदयांचा संगम येथे होतो. पवित्र नदयांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानाला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आहे. |