Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत

Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत for exam preparation.

Std 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत

Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 5 भांड्यांच्या दुनियेत

भांड्यांच्या दुनियेत Question Answer

प्रश्न ६.
खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

(अ) शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
उत्तर:
शेतीचा शोध लागल्यामुळे माणसाची भटकंती थांबली. तो स्थिर जीवन जगू लागला. नदीकिनारी वस्ती करून राहिल्यामुळे शेतीचा विकास झाला. शेतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन होऊ लागले. अन्न साठवण, अन्न शिजवणे व अन्न सेवन करण्यासाठी माणसाला भांड्यांची गरज वाटू लागली.

(आ) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
उत्तरः
पूर्वी जेवणाच्या पंगतीत एका वेळेस अनेक लोक जेवायला बसत, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेवणासाठी ताटे उपलब्ध होणं कठीण असे. ताट-वाट्या उपलब्ध झाल्या तरी ती भांडी घासणे कष्टदायी काम असे. पूर्वी घरोघरी अंगणात केळीची झाडे लावलेली असत. केळीची पाने आकाराने ऐसपैस असल्याने त्यात जेवण वाढणे शक्य होत असे व ती मुबलक प्रमाणात उपलब्धही होत असतं. वापरून झालेली ती पाने फेकल्यानंतर पर्यावरणाला हानीही पोचत नसे. वेळ व श्रम वाचत, म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.

(इ) आज घरोघरी मिक्सर वापरतात.
उत्तर:
हल्लीचे जीवन खूप वेगवान झाले आहे. वेळ व श्रम वाचवणे ही काळाची गरज बनली आहे. मिक्सरचा वापर केल्यामुळे वाटण वाटण्यासाठी, दगडी वाटा-वरवंट्याच्या तुलनेत खूपच कमी वेळ लागतो. शिवाय श्रमही वाचतात, म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात.

(ई) मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
उत्तर:
आजच्या काळात मातीची भांडी वापरण्याची परंपरा म्हणजे साहित्य संस्कृतीचा पाया समजला जातो. मातीची भांडी ही
‘माती’ सारख्या नैसर्गिक घटकापासून तयार झालेली असतात. त्यात अन्न शिजवताना मातीतील शरीरासाठी आवश्यक घटक उदा. खनिजे पुरेपूर प्रमाणात त्या अन्नात उतरतात. या अन्नाचे सेवन केल्याने आवश्यक घटक शरीराला मिळतात.- शरीराच्या पोषणासाठी ही खनिजे आवश्यक असतात, त्यामुळे मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

प्रश्न २.
खालील आकृत्या पूर्ण करा.

Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत 4
उत्तर:
१. माती
२. दगड
३. लाकूड
४. चामडे
५. पलंग

प्रश्न ३.
‘भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
माणूस हा पोटासाठी जगतो असे म्हणतात. पोटाची भूक भागवण्यास अन्नाची गरज असते व हे अन्न शिजवणे, सेवन करणे,
साठवणे यासाठी त्याला साधनाची गरज असते. हे साधन म्हणजेच भांडी. भांडी हा मानवी जीवनातील दैनंदिन गरजेचा महत्त्वाचा घटक आहे. त्या त्या काळात उपलब्ध साधनांचा वापर करून गरजेनुसार भांडी तयार होत गेली, त्यांचे स्वरूप बदलले; परंतु जोपर्यंत मानवी समाज आहे तोपर्यंत भांडी असणारच, म्हणूनच भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.

प्रश्न ४.
तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा.
उत्तर:
आमच्या घरातील निरूपयोगी वस्तूंचा शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करतो. वस्तू जास्त खराब झाल्या नसतील तर गरजूंपर्यंत ती वस्तू पोहचवतो. निरूपयोगी, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करतो आणि ते ही शक्य नसलेच तर त्या वस्तू भंगार सामानामध्ये विकतो.

प्रश्न ५.
दोन-दोन उदाहरणे लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत 5
उत्तर:
(१) मातीची भांडी – माठ – रांजण
(२) चामड्यापासून बनवलेली भांडी – बुधले – पखाल
(३) लाकडी भांडी – काठवट – लाटणे
(४) तांब्याची भांडी – कलश – ताम्हण
(५) चिनी मातीची भांडी – किटली – सुरई
(६) नॉनस्टिकची भांडी – तवा – कढई
(७) काचेची भांडी – पेला / ग्लास – वाडगा

खेळूया शब्दांशी

• कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा.
(अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे, सगेसोयरे)

(अ) संत तुकारामांनी वृक्षांना ……….. संबोधून त्यांचा गौरव केला.
(आ) ………… वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.
(इ) आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर ……….
(ई) कुटुंब हे मानवी जीवनाचे ……… आहे.
उत्तर:
(अ) सगेसोयरे
(आ) नित्योपयोगी
(इ) विराजमान झाले
(ई) अविभाज्य अंग

उपक्रम :

प्रश्न १.
तुमच्या घरातील सर्वांत जुन्या चार भांड्यांची चित्रे काढा व रंगवा.
प्रश्न २.
जुन्या भांड्यांच्या चित्रांचा संग्रह करा व संग्रहवहीत चिकटवा. प्रत्येक चित्राखाली त्या भांड्याचे नाव व त्यांचा उपयोग एक-दोन ओळींत लिहा.
(हे उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)

चर्चा करूया.

• अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
उत्तर:
सध्या पाणी तापवण्यासाठी विजेवर चालणारे बंब वापरले जातात, त्यामुळे एक बटण दाबल्यावर काही सेकंदांतच गरम पाणी मिळणे सोर्ष झाले आहे. पूर्वीच्या बंबांना पाणी तापण्यासाठी लागणारा वेळ आजच्या विदयुत बंबांच्या तुलनेत अधिक होता व त्यासाठी लाकूडफाट्याची गरज लागे, त्यामुळे वृक्षतोड होत असे; पण वेळ व श्रमही खर्ची पडत, म्हणून आज अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय, विदयुत ऊर्जेची बचत करणारे पर्यावरणपूरक असे, सौर बंबही पाणी तापवण्यासाठी आजकाल वापरले जाते.

• दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.
उत्तर:
हल्ली चांदीची भांडी दैनंदिन उपयोगासाठी वापरणे श्रीमंतीचे लक्षण गणले जाईल, कारण चांदीचे दर / किंमत जास्त आहे. शिवाय ही भांडी हवेच्या संपर्कात येऊन काळी पडतात, त्यामुळे त्यांची वेळोवेळी, दक्षतेने स्वच्छता करणे अत्यावश्यक ठरते. काळ्या पडलेल्या चांदीच्या भांड्यात शिजवलेले अन्न सेवन करण्याने त्रासही होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात चांदीची भांडी खिशाला परवडणे, त्यांची रोज काळजी घेणे, स्वच्छता राखणे, ती चोरीला जाऊ. नयेत यासाठी दक्षता घेणे हे फार जिकीरीचे काम आहे.

शिवाय, प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहज उपलब्ध होणारी व वापरायला सोपी असणारी भांडी खरेदी करतो, म्हणून दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.

माहिती मिठ्ठवूया

* पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात ?
उत्तर:
साल, पळस, वड, फणस इत्यादी झाडांच्या सुकलेल्या पानांचा वापर मुख्यतः पत्रावळी तयार करण्यासाठी केला जातो.

* पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या साहाय्याने जोडली जातात ?
उत्तर:
पत्रावळीची पाने बारीक लहान आकाराच्या लाकडी काड्यांनी एकमेकांना जोडली जातात.

* पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत ?
उत्तर:
पूर्वी झाडांच्या सुकलेल्या पानांपासून हाताने पत्रावळी बनवत असत, तर आता कागदाच्या, प्लास्टिक, थर्माकॉल, सिल्व्हर कोटेड अशा विविध प्रकारच्या मशीनवर बनवलेल्या पत्रावळ्या उपलब्ध आहेत.

कल्हई म्हणजे काय ?

स्वयंपाकघरातल्या जुन्या तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांची जागा जशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली, तसतशी कल्हई आणि कल्हईवाले दुर्मीळ होत गेले. तांब्या, तांब्या, पितळेची भांडी चकचकीत करून त्यावर कथील धातूचा थर लावण्याचे काम हे कल्हईवाले करत. गल्लीगल्लीतून फिरून ‘कल्हईवालाऽऽ’ अशी आरोळी ठोकल्यानंतर एखादया झाडाखाली कल्हईवाला त्याचे दुकान थाटत असे.
Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत 6
तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनवले असता, त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता निर्माण होते. काही वेळेस अन्नाची चव बिघडते, तर काही वेळेस अन्नपदार्थांच्या रंगात बदल होतो. त्यातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. हे टाळावे म्हणून तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांना आतून कल्हई केली जाते.

जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली जाते. त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने तापवले जाते. पांढऱ्या रंगाची नवसागराची (अमोनिअम क्लोराइड) भुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ, लख्ख केले जाते. हे करताना पांढरा, उग्र वासाचा धूर तयार होतो. भांडे गार होण्यापूर्वीच कथील (टिन) धातूचा छोटा तुकडा भांड्यात टाकला जातो. कथील हा मऊ, लकाकणारा, निळसर- पांढऱ्या रंगाचा उपयुक्त धातू आहे. तो पटकन वितळतो.

अतिशय कौशल्याने कल्हईवाला तो वितळलेला धातू पटकन भांड्यात सर्वत्र पसरवून त्याचा लेप देतो. भांडे थंड करण्यासाठी ते थंड पाण्यात टाकले जाते. कल्हई केलेल्या भांड्यात बनवलेले जेवण शरीरासाठी अपाय करत नाही, म्हणून दर काही महिन्यांनी तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई करणे गरजेचे असते.

शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांकडून या पाठाचे सादरीकरण करून घ्यावे. तसेच वरील उताऱ्याचे प्रकट वाचन करून घ्यावे. उताऱ्यातील कृती क्रमाने सांगण्याची सूचना दयावी. घटनाक्रम सांगताना योग्य ते मार्गदर्शन करावे.

• वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, किती वेळा घडली, कशी घडली यांवरून क्रियाविशेषण अव्ययांचे चार मुख्य प्रकार पडतात.

क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार

Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत 7

• खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा.
तिथे, दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.
Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत 10
उत्तर:

  1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यये – दररोज, क्षणोक्षणी, परवा, सतत
  2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये – तिकडे, वर, तिथे
  3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये – सावकाश, कसे, झटकन
  4. परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये – अतिशय, जरा, मुळीच, थोडा, पूर्ण

• खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषणे लपलेली आहेत. उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत 9
उत्तर:

  1. थोडासा
  2. मोजके
  3. काही
  4. हळू
  5. जरा
  6. वर
  7. जिकडे
  8. आज
  9. तिकडे
  10. मोज
  11. अनेकदा
  12. तसा
  13. खाली
  14. सावकाश
  15. रोज
  16. जरासा

Class 7 Marathi Balbharati Chapter 5 भांड्यांच्या दुनियेत Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.

i. थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास.
उत्तर:
वरील वाक्य दगडी पाटा जात्याला उद्देशून म्हणाला.

ii. तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची.
उत्तर:
वरील वाक्य काठवट मंदाला उद्देशून म्हणाली.

iii. म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग होऊ लागला, असंच तुला म्हणायचंय का?
उत्तर:
वरील वाक्य अरुण जात्याला म्हणाला.

iv. तुम्ही आम्हांला भांड्यांच्या दुनियेची सफरच घडवून आणली !
उत्तरः
अदितीने मुलांतर्फे सर्व भांड्यांचे आभार मानताना वरील वाक्य म्हटले आहे.

प्रश्न २.
खालील आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत 11
उत्तर:
१. खुर्ची
२. दारे
३. खिडक्या
४ टेबल
४. कढई, तवा इत्यादी

प्रश्न ३.
यांना काय म्हणतात ?

  1. जेवणात पंक्तीत वापरण्यात येणारे ताट
  2. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे
  3. दुधासाठीचे भांडे
  4. ताकासाठीचे भांडे
  5. पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे
  6. तुपाचे भांडे
  7. लोण्याचे भांडे
  8. अंघोळीचे पाणी तापवण्यासाठीचे भांडे
  9. पाणी साठवण्यासाठी वापरायचे भांडे
  10. जेवणाच्या पंगतीतील वाट्या
  11. गृहिणींचे धान्याचे पीठ दळण्यासाठीचे साधन
  12. मिरच्या, धणे असे काहीबाही कुटण्यासाठी वापरण्याचे साधन

उत्तर:

  1. पत्रावळी
  2. तस्त
  3. चरवी / कासंडी
  4. कावळा
  5. घंगाळे
  6. बुधली
  7. वाडगा
  8. बंब
  9. कळशी, हंडा, घागर, तपेले
  10. द्रोण
  11. जाते
  12. उखळ – मुसळ, खल, खलबत्ता

प्रश्न ४.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. उन्हाळ्याच्या सुट्टीत अरुण व अदिती कोठे गेले होते?
उत्तर:
उन्हाळ्याच्या सुट्टीत अरुण व अदिती आजीआजोबांकडे गेले होते.

ii. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा कोणता कार्यक्रम निश्चित असायचा ?
उत्तर:
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे हा कार्यक्रम निश्चित असायचा.

iii. मुले दुपारी कोणता खेळ खेळत होती ? का?
उत्तर:
उन्हामुळे आजी मुलांना दुपारी घराबाहेर जाऊ दयायची नाही, त्यामुळे मुले घरातच लपाछपीचा खेळ खेळत होती.

iv. खलबत्त्याने काठवटीचा कोणता उपयोग मुलांना सांगितला ?
उत्तर:
गव्हाचे, बाजरीचे, ज्वारीचे पीठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी काठवटीचा उपयोग केला जायचा असे खलबत्त्याने मुलांना सांगितले.

v. कोणत्या धातूंच्या शोधाने भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ व विकसित होत गेली ?
उत्तरः
तांबे आणि लोखंड या धातूंच्या शोधाने भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ व विकसित होत गेली.

vi. तांबे आणि चांदीला पर्याय म्हणून कशापासून भांडी बनवली जाऊ लागली ?
उत्तर:
तांबे आणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू, पितळ, कांसे या धातूंपासून भांडी बनवली जाऊ लागली.

vii. पितळी व तांब्याच्या भांड्यांची जागा कोणत्या प्रकारच्या भांड्यांनी घेतली?
उत्तर:
पितळी व तांब्याच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनिअम, हिंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली.

viii. प्रत्येकजण कोणत्या प्रकारची भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो?
उत्तर:
प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो.

ix. अदितीने भांड्यांचे आभार का मानले?
उत्तर:
अदितीने भांड्यांचे आभार मानले, कारण त्यांनी मुलांना भांड्यांच्या दुनियेची सफर घडवून आणली होती.

x. जातेभाऊने आपली व्यथा कशी मांडली ?
उत्तर:
हल्ली लोक जात्याचा वापर फक्त लग्नात हळद दळण्यासाठीच करतात आणि मग जाते कोपऱ्यात ठेवून देतात, अशा शब्दांत जातेभाऊने आपली व्यथा मांडली.

xi. मातीच्या भांड्यांचा आज कशाप्रकारे वापर होतो असे माधवने सांगितले?
उत्तर:
मातीच्या भांड्यांपैकी थंडगार पाणी पिण्यासाठी माठाचा व दही लावण्यासाठी छोट्या मडक्यांचा, मातीच्या भांड्यांचा आजही वापर होतो असे माधवने सांगितले.

प्रश्न ५.
खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

v. चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाण कमी होत आहे.
उत्तर:
स्वयंपाक चुलीवर शिजवण्यासाठी खूप सरपण लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, तसेच लाकूड ‘जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुरामुळे श्वसनसंस्थेचे विकार उद्भवण्याची दाट शक्यता असते. शिवाय, चुलीवर अन्न शिजण्यास तुलनेने जास्त वेळ लागतो व लाकूडफाटा आणण्यापासून ते अन्न शिजवण्यापर्यंत खूप श्रम खर्ची पडतात, म्हणून गॅस शेगडीच्या शोधामुळे वेळ व श्रम या दोन्हींची बचत होते, हे लक्षात आल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रमाण कमी होत आहे.

vi. माती वापरण्याची परंपरा म्हणजे साहित्य संस्कृतीचा पाया मानला जातो.
उत्तर:
फार पूर्वी धातूंचा शोध लागण्याआधी स्वयंपाकासाठी लोक मातीची भांडी वापरत. कालांतराने धातूंचा शोध लागला व विविध धातूंची, चांदीची भांडी बनवली जाऊ लागली; पण मातीची भांडी बनवणे बंद झाले नाही. माणसाने रोजच्या वापरासाठी उपयुक्त अशी मातीची भांडी बनवली जी आजही वापरली जात आहेत. गरजेनुसार व उपलब्ध साधनांनुसार मातीच्या भांड्यांचे थोड्याफार प्रमाणात स्वरूप बदलले; परंतु आजही मोठ्या प्रमाणात चिनी माती वा सिरॅमिक्सची भांडी व वस्तू वापरल्या जातात. झाकणाची, नक्षीकाम केलेली, रत्नजडित अशा विविध स्वरूपातली भांडी कलात्मक आहेत, म्हणून माती वापरण्याची परंपरा म्हणजे साहित्य संस्कृतीचा पाया मानला जातो.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. सगेसोयरे =
  2. विकास =
  3. मजा =
  4. सफर =
  5. भीती =
  6. श्रम =
  7. विविधता =
  8. मानव =

उत्तर:

  1. नातेवाईक
  2. प्रगती
  3. मौज
  4. प्रवास, सैर
  5. भय
  6. मेहनत, कष्ट
  7. वेगळेपण, वैविध्य
  8. माणूस, मनुष्य, मनुज

प्रश्न २.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. निश्चित ×
  2. जन्म ×
  3. स्थिर ×
  4. आवश्यक ×
  5. ग्रामीण ×
  6. वापर ×
  7. उलट ×
  8. उपलब्ध ×
  9. सोपे ×
  10. खरेदी ×

उत्तर:

  1. अनिश्चित
  2. मृत्यू
  3. अस्थिर
  4. अनावश्यक
  5. शहरी
  6. गैरवापर
  7. सुलट
  8. अनुपलब्ध
  9. कठीण
  10. विक्री

प्रश्न ३.
खालील शब्दांचे लिंग ओळखून लिहा.

  1. आजी
  2. जाते
  3. अदिती
  4. पलंग

उत्तर:

  1. स्त्रीलिंग
  2. नपुंसकलिंग
  3. स्त्रीलिंग
  4. पुल्लिंग

प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला व त्यांचा वाक्यात उपयोग करा.

  1. विहीर
  2. भांडी
  3. झाकणे
  4. खोली
  5. मडके
  6. मुले

उत्तर:

  1. विहीर – विहिरी
    वाक्य: उन्हाळ्यात विहिरी पाण्याविना कोरड्या पडतात / आटून जातात.
  2. भांडी – भांडे
    वाक्यः काचेचे भांडे जपून हाताळावे लागते.
  3. झाकणे – झाकण
    वाक्य:माठाला व्यवस्थित झाकण लावावे.
  4. खोली – खोल्या
    वाक्य:आमचे गावचे घर दहा खोल्यांचे आहे.
  5. मडके – मडकी
    वाक्य: कुंभार मातीची सुबक मडकी घडवतो.
  6. मुले – मूल
    वाक्य: ते मूल फार निरागस, गोंडस आहे.

प्रश्न ५.
खालील वाक्प्रचारांचा / शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. आतुरतेने वाट पाहणे
  2. विराजमान होणे उत्तर:
  3. मान डोलावणे
  4. आभार मानणे

उत्तरः

  1. आतुरतेने वाट पाहणे – उत्सुकतेने वाट पाहणे.
    वाक्य:उन्हाळ्याच्या सुट्टीची मुले आतुरतेने वाट पाहात असतात.
  2. विराजमान होणे – स्थानापन्न होणे.
    वाक्य:गणेशचतुर्थीला बाप्पा चौरंगावर विराजमान झाले.
  3. मान डोलावणे – संमती देणे.
    वाक्यः बाबांनी सहलीला जाण्यास मान डोलावली आणि चिंटू खूश झाला.
  4. आभार मानणे – धन्यवाद देणे
    वाक्य:समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल जीवरक्षकाचे सर्वांनी आभार मानले.

प्रश्न ६.
खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार लिहा.

  1. आज कार्यालये बंद आहेत.
  2. पूर्वी पोलिसांचा गणवेष निळ्या रंगाचा होता.
  3. येथून माझे घर जवळ आहे.
  4. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही भरपूर आंबे खाल्ले.
  5. साधना जलद चालते.
  6. केलेले कष्ट व्यर्थ जाणार नाहीत.
  7. भाजीत मीठ किंचित कमी आहे.

उत्तर:

  1. आज – कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
  2. पूर्वी – कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
  3. येथून – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
  4. भरपूर – संख्यावाचक परिमाणवाचक / क्रियाविशेषण अव्यय
  5. जलद – रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
  6. व्यर्थ – रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
  7. किंचित – संख्यावाचक परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय

प्रश्न ८.
हे शब्द असेच लिहा.
रत्नजडित, स्मितहास्य, खुर्ची, गृहिणी, संस्कृती, प्रगल्भ, संमिश्र, प्रयत्न, सर्रास, अविभाज्य.

लेखी कार्य

प्रश्न १.
माहिती मिळवा. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २०, २१, २२)

i. उन्हाळ्यात माठाला ओले, सुती कापड का बांधतात ?
उत्तर:
जेव्हा ओले सुती कापड माठाला बांधले जाते तेव्हा ओल्या कापडातील गारवा माठाच्या पृष्ठभागावर पसरून माठ थंड ठेवण्याच काम करतो. यामुळे बाहेरील उष्णता पाण्यापर्यंत न पोहोचता आतील पाणी थंड राहते.

ii. मातीचा माठ, रांजण जमिनीत का पुरतात ?
उत्तर:
पूर्वीच्या काळी मातीचा माठ, रांजण जमिनीत पुरत असत. असे केल्याने बाहेरील उष्णता जमिनीच्या खाली पोहोचत नाही. जमिनीखाली असलेल्या नैसर्गिक गारव्यामुळे येथे साठवलेले पाणी आपसूकच थंड राहते, म्हणून मातीचा माठ, रांजण
जमिनीत पुरतात.

iii. बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा ?
उत्तर:
लोखंड हा धातू इतर धातूंच्या तुलनेत अतिशय मजबूत आहे, तसेच लोखंड तापल्यावर त्याला हवा तसा आकार देणे सहज शक्य आहे. लोखंडाची उच्च तापमान सहन करण्याची क्षमताही उत्तम असते आणि ते माफक किमतीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, म्हणून बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.

iv. लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी का करतात?
उत्तर:
आपल्या शरीराला नियमित स्वरूपात लोहाची गरज असते. लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी केल्याने कढई वा तव्यातील लोह भाजीत उतरते. या भाजीच्या सेवनाने आपल्या शरीराला पुरेसे लोह मिळते व शरीराचे योग्य पोषण होते, म्हणूनच लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी करतात.

v. भांडी बनवण्यासाठी धातूंचा वापर का सुरू झाला असावा ?
उत्तर:
जसजसा काळ पुढे गेला, तसतसा मानव सर्वच क्षेत्रांत प्रगती करू लागला. त्याने अनेक सोई-सुविधा निर्माण केल्या. त्याच्या गरजाही दिवसेंदिवस वाढू लागल्या. कालांतराने धातूंचा शोध लागला व अन्न हे उत्तमरीत्या शिजवले, साठवले जावे या हेतूने भांडी बनवण्यासाठी धातूंचा वापर केला गेला. गरज व उपलब्ध साधनांच्या बळावर माणूस धातूची भांडी वापरू लागला. धातू हे उत्तम उष्णतावाहक असल्यामुळे धातूंच्या भांड्यांत अन्न शिजण्याची प्रकिया जलद गतीने घडून येते, हे त्याला समजले.

vi. चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते?
उत्तर:
ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर जोरात फुंकर घातल्यामुळे पुरेसा ऑक्सिजन मिळून ज्वलनास मदत होते व आगीची ज्वाला मोठी होऊन अग्नी चांगल्या प्रकारे प्रज्वलित होतो.

vii. चहाची किटली, कपबश्या, प्लेट्स, वाट्या इत्यादी भांडी चिनी मातीची किंवा सिरॅमिक्सची का असतात?
उत्तर:
चिनी माती (सिरॅमिक्स) गरम केल्याने तिची चकाकी व काठिण्य वाढते. म्हणून चहाची किटली, कपबश्या, प्लेट्स, वाट्या इत्यादी भांडी चिनी मातीची किंवा सिरॅमिक्सची असतात.

प्रश्न ३.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २४ वरील उतारा वाचा. त्यातील घटना क्रमाने सांगा.
उत्तरः
योग्य घटनाक्रमः

  1. हल्ली तांब्या-पितळेच्या भांड्यांऐवजी स्टेनलेस स्टीलचा वापर होतो, यामुळे कल्हई व कल्हईवाले दुर्मीळ झाले आहेत.
  2. तांब्याच्या भांड्यात आम्लधर्मी / आबंट पदार्थ बनवल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन विषबाधा होण्याची शक्यता टाळण्यासाठी कल्हई करणे आवश्यक असते.
  3. यासाठी जमिनीत खड्डा खणून, भट्टी तयार केली जाते.
  4. त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने तापवले जाते.
  5. त्यात पांढऱ्या रंगाच्या नवसागराची (अमोनिअम क्लोराइड) भुकटी टाकल्यावर पांढरा, उग्र वासाचा धूर तयार होतो. भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ केले जाते.
  6. भांडे गार होण्यापूर्वीच कथील (टिन) धातूचा छोटा तुकडा भांड्यात टाकला जातो.
  7. हा निळसर पांढऱ्या रंगाचा, मऊ व लकाकणारा कथील त्यात पटकन वितळतो.
  8. तो वितळलेला धातू कुशलतेने कल्हईवाला भांड्यात सर्वत्र पसरवतो.
  9. मग भांडे पाण्यात टाकून थंड केले जाते.
  10. कल्हई केलेले भांडे स्वयंपाक बनवण्यासाठी सुरक्षित असल्यामुळे दर काही महिन्यांनी तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई करणे आवश्यक असते.

भांड्यांच्या दुनियेत पाठाचा परिचय :

माणसाच्या आयुष्यात भांड्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. अन्न शिजवणे, धान्याची साठवण, अन्न सेवन करणे इत्यादी कामांसाठी माणसाला भांड्यांची गरज भासते. जेव्हापासून मनुष्य स्थिर जीवन जगू लागला तेव्हापासून त्याला भांड्यांची आवश्यकता भासू लागली. माणसांची गरज आणि उपलब्ध साधनसामग्री यांनुसार भांडी तयार होत गेली व आजही विविध स्वरूपात होत आहेत. प्रस्तुत पाठात भांडी व मुले यांच्यातील संवादाद्वारे भांड्यांच्या स्वरूपातील बदलांचा प्रवास मांडण्यात आला आहे.

भांड्यांच्या दुनियेत शब्दार्थ

Class 7 Marathi Balbharati Chapter 5 Question Answer भांड्यांच्या दुनियेत 1

भांड्यांच्या दुनियेत वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

आतुरतेने वाट पाहणे. उत्सुकतेने वाट पाहणे.
आभार मानणे. धन्यवाद देणे.
मान डोलावणे. संमती देणे.
विराजमान होणे. स्थानापन्न होणे.


भांड्यांच्या दुनियेत टिपा

उखळ-मुसळ पदार्थ कुटण्यासाठी दळण कांडण करण्यासाठी वापरण्यात येणारे साधन.
काठवट पीठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी वापरली जाणारी लाकडी परात.
कावळा येथे अर्थ – ताकासाठीचे भांडे.
कासंडी / चरवी दुधाचे भांडे.
घंगाळं अंघोळीसाठी वापरले जाणारे टबच्या आकाराचे धातूचे भांडे.
तस्त हात, तोंड धुताना थुंकण्याचे रुंद तोंडाचे भांडे, पिकदाणी.
तुंबे भोपळ्यापासून बनवलेले पात्र.
द्रोण पानांना काटे टोचून बनवलेली वाटी.
पत्रावळी जेवणाच्या पंगतीत वापरले जाणारे पानांपासून बनवलेले ताट.
बुडकुली, ओगराळी, पळी, तसराळी, कुंडा पूर्वीच्या काळातील भांड्यांची विविध नावे.
बुधले तेल, तूप इत्यादी ठेवण्याचे लहान तोंडाचे भांडे.
बंब अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी वापरायचे साधन.
सुरई अरुंद तोंडाचे भांडे.
हिंडालियम भांडी तयार करण्यासाठी वापरला जाणारा अल्युमिनिअमसारखा संमिश्र धातू.

Leave a Comment