Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 8 Question Answer गचकअंधारी for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer गचकअंधारी
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 8 गचकअंधारी
गचकअंधारी Question Answer
प्रश्न १.
खालील वाक्ये वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
(अ) सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
उत्तर:
सदाचा गाडगी, मडकी करण्याचा धंदा होता. तो ती भाजलेली मडकी पंचक्रोशीतील गावांतल्या बाजारात विकायला नेत असे. जाताना गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवलेली असत; मात्र येताना गाढवाच्या पाठीवर काहीच नसे, कारण सदाची मडकी विकली जात किंवा मडकी शिल्लक राहिल्यास सदा ती ओळखीच्या घरी ठेवत असे.
म्हणून, सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
(आ) गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
उत्तर:
लहानगा गजानन आपले वडील आठवड्यातून दोन-तीन वेळा कुठेतरी बाजारात जातात हे कळू लागल्यामुळे सदाकडे बाजारात जाण्यासाठी हट्ट करू लागला होता. एके दिवशी पहाटे त्याने असाच हट्ट धरला असताना सदाने त्याला वाघ, कोल्हा, लांडग्याची, अंधाराची भीती दाखवली. तरीही गजानन आपला हट्ट सोडण्यास तयार नव्हता. शेवटी सदाने खतरनाक जनावर गचकअंधारीची भीती दाखवली. ही गचकअंधारी वाघसिंहासारख्या प्राण्यालाही एका घासात खाते, अशा खरतनाक जनावराबद्दल ऐकताच गज्या घाबरला व त्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
(इ) वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
उत्तर:
आपल्या पाठीवर गचकअंधारी बसल्याचा समज झाल्याने वाघ हादरला होता, तर सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता. सूर्योदय होण्याच्या बेतात असताना सदाला आपण वाघाच्या पाठीवर बसल्याचे लक्षात आले व तो थाड्थाड् उडू लागला. या छेडछाडीने गचकअंधारी झटके देऊन आपल्याला खायची तयारी करत असल्याचा वाघाचा समज झाला. व वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
(ई) सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
उत्तर:
पहाटेच्या अंधारात सदा गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसला. वाघ आपल्या पाठीवर गचकअंधारी बसल्याचे समजून पटापट चालू लागला; मात्र सूर्योदय होण्याच्या बेतात असताना सदाला आपण गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसल्याची जाणीव झाली आणि त्याला भीतीने कापरे भरले. वाघाला आपण दिसलो, तर वाघ आपले नरडे फोडल्याशिवाय राहणार नाही या भीतीने सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
प्रश्न २.
खालील मुद्द्यांवर दोन-तीन वाक्यांत माहिती लिहा.
उत्तर:
सदाचा गाडगी, मडकी तयार करून, बाजारात नेऊन विकण्याचा धंदा होता. वडिलांसोबत बाजारात जाण्यासाठी सदाचा लहान मुलगा गजानन खूप हट्ट करत असे. एके दिवशी भल्या पहाटे बाजारात जात असताना गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसल्यामुळे सदाची फार मोठी फजिती होते; मात्र सदा फार हुशारीने व अत्यंत चपळाईने वडाच्या पारंब्या पकडून वाघाच्या पाठीवरून निसटतो व या संकटातून स्वत:ची सोडवणूक करून घेतो.
प्रश्न ३.
कोण, कोणास व का म्हणाले?
(अ) “कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा.”
उत्तर:
प्रस्तुत वाक्य गजानन आपल्या वडिलांना उद्देशून म्हणाला, कारण वडील आपल्याला बाजारात न नेण्यासाठी वाघाचे भय दाखवतात, हे त्याला समजले होते.
(आ) “या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले. ”
उत्तर:
प्रस्तुत वाक्य सदा आपला मुलगा गजानन बाजारात येऊ नये, म्हणून त्याला भीती दाखवताना म्हणाला.
(इ) ‘गचकअंधारी झटके देऊन रायली.’
उत्तर:
प्रस्तुत वाक्य वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. गाढवाऐवजी वाघावर बसल्याचे लक्षात येताच सदा थाडथाड उडू लागला. आपल्या पाठीवर पण गचकअंधारीच बसली आहे असा समज झाल्यामुळे वाघ हे वाक्य मनाशी म्हणाला.
(ई) ‘गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती.’
उत्तर:
प्रस्तुत वाक्य सदा चपळाईन वाघापासून अलग होताच सुटकेचा निःश्वास टाकताना स्वतःशीच म्हणाला.
खेळूया शब्दांशी
(अ) खालील वाक्प्रचार अभ्यासा.
‘भीती वाटणे’ हा खालील वाक्प्रचारांचा अर्थ आहे.
एकाच अर्थाचे इतके वाक्प्रचार असणे, हे मराठी भाषेच्या समृद्धीचे लक्षण आहे. याप्रमाणे एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा.
(आ) आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून ‘पंचक्रोशी’ म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा.
(अ) ज्यास कोणी शत्रू नाही, असा.
(आ) मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण.
(इ) धान्य साठवण्याची जागा.
(ई) दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा.
(उ) डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता.
उत्तर:
(अ) अजातशत्रू
(आ) पाणपोई
(इ) कोठार, गोदाम
(ई) मनकवडा
(उ) बोगदा
(इ) खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.
उत्तरः
विशेष्य | विशेषण |
i. पारंबी | लोंबणारी |
ii. पाऊस | वादळी |
iii. चपळाई | विलक्षण |
iv. काळोख | किट्ट |
v. अंधार | गुडूप |
vi. हवा | थंडगार |
vii. जनावर | खतरनाक |
(ई) कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य तो बदल करून वाक्ये पूर्ण करा.
(पळ काढणे, मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, प्रभा फाकणे, करुणा भाकणे, सुसाट पळत सुटणे, शंकेची पाल चुकचुकणे.)
(अ) पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच ………
(आ) उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात ……..
(इ) लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव ……
(ई) पोलिसांना बघून चोर ………..
उत्तरः
(अ) गिल्ला केला.
(आ) शंकेची पाल चुकचुकली.
(इ) मेटाकुटीला आला.
(ई) सुसाट पळत सुटले.
विचार करा. सांगा
• हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा.
उत्तर:
- वाघाला गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला.
- सदाच्या अंगाला घाम फुटला. तो वाघाच्या पाठीवर बसला. पण त्यामुळे वाघ घाबरला. त्याला वाटले की गचकअंधारी आता आपल्याला पाण्यात भिजवून भिजवून खाणार.
- आपला जीव वाचण्यासाठी सदा वडाच्या झाडावर चढला. पण वाघाला मात्र आपणच गचक अंधारीपासून सुटलो याचा आनंद झाला आणि तो पळत सुटला.
• ‘गचकअंधारी’ हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
‘गचकअंधारी’ हे पाठातील पात्र काल्पनिक आहे, कारण सदाने आपला मुलगा गजानन याला घाबरवण्यासाठी हे पात्र उभे केलेले आहे. वडिलांबरोबर बाज़ारात जाण्यासाठी दररोज हट्ट धरणाऱ्या गजाननला सदाने अंधाराची, कोल्हयाची, लांडग्याची, वाघाची भीती दाखवून पाहिली; पण तो हट्ट सोडायला तयार नाही हे पाहून सदाने त्याला गचकअंधारीचे भय दाखवले. या पात्राबद्दल सांगताना तो खराखुरा वाटेल असा एक भास निर्माण केला, त्यामुळे गजाननचा त्यावर विश्वास बसला. वाघालाही गचकअंधारीचे भय वाटले; परंतु खरे पाहता, ‘गचकअंधारी’ हे सदाने निर्माण केलेले काल्पनिक पात्र आहे, असे मला वाटते.
• पाठाच्या दृष्टीने ‘गचकअंधारी’ या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तर:
‘गचकअंधारी’ या अशोक मानकर लिखित पाठात सदा, सखू, गजानन, वाघ ही खरी पात्रे असून ‘गचकअंधारी’ हे काल्पनिक पात्र लेखकाने संवादाद्वारे उभे केले आहे. गचकअंधारी या काल्पनिक पात्रामुळे पाठात तीन महत्त्वाच्या घटना घडतात. या खतरनाक जनावराच्या भीतीमुळे दररोज वडिलांसोबत बाजारात जाण्यासाठी हट्ट धरणाऱ्या गजाननचा हट्ट थांबतो. सदाचे बोलणे ऐकल्यानंतर वाघाच्या मनातही गचकअंधारीचे भय निर्माण होते, त्यामुळे पाठीवर बसलेल्या सदाला तो गचकअंधारी समजतो, तसेच अंधारात वाघाला गाढव समजल्यामुळे सदाचीही फजिती होते. या तीन घटना घडल्यामुळे विनोद निर्माण होतो.
माझे वाचन
मराठी साहित्यात विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची शिक्षक व पालक यांच्याकडून माहिती घ्या. विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाचे एखादे पुस्तक वाचा. त्यातील एखादी गोष्ट वर्गात सादर करा.
(हा उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)
आपण समजून घेऊया
• खालील परिच्छेद वाचा.
शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली. शाळेच्या फाटकासमोर काही मुलांचे पालक उभे होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. मुलांसाठी वाहने थांबली. मुलांनी रस्ता ओलांडला.
वरील अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. -बाहेर, – समोर, -वर, -साठी हे शब्द अनुक्रमे शाळा, फाटक, रस्ता, मुले या शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत. –पूर्वी, –पुढे, -आधी, -नंतर, -पर्यंत, -आत, -बाहेर, -मागे, मुळे, -शिवाय हीदेखील शब्दयोगी अव्यये आहेत.
अनेक क्रियाविशेषणे शब्दयोगी अव्यये म्हणून वापरली जातात. अशा वेळी ती प्रत्ययांप्रमाणे शब्दांना जोडूनच लिहायची असतात.
ही दोन वाक्ये पहा.
(१) तो पूर्वी सैन्यात होता. ‘पूर्वी’- क्रियाविशेषण अव्यय
(२) जेवणापूर्वी हात धुवावेत. ‘-पूर्वी’ शब्दयोगी अव्यय
या पूर्वी आपण प्रत्यय जोडण्यापूर्वी नामांचे, सर्वनामांचे सामान्यरूप होते, हे पाहिले. शब्दयोगी अव्यये जोडण्यापूर्वीही नामांचे, सर्वनामांचे सामान्यरूप होते.
वरील परिच्छेदात शाळे-, मुलां-, रस्त्या-, वाहनां – हे सामान्यरूप झालेले शब्द आहेत.
• खालील परिच्छेद वाचा. त्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखादया मित्राप्रमाणे वाटते.
उत्तर:
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखादया मित्राप्रमाणे वाटते.
भाषेची गंमत
भाषेचा वापर करत असताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याचवेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.
उदा.,
(१) इथे वाहन लावू नये.
इथे वाहन लावून ये.
(२) हिरवळीवर कचरा टाकू नये.
हिरवळीवर कचरा टाकून ये.
या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा.
शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांना शब्दयोगी अव्ययांची विविध उदाहरणे देऊन अधिक सराव करून घ्यावा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 8 गचकअंधारी Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.
- भाजलेली मडकी सदा ……….. गावांतल्या बाजारात विकायला नेई. (तालुक्यातील, जिल्ह्यातील, पंचक्रोशीतील)
- एके दिवशी सदाला ………. विकायला शेजारच्या गावात जायचे होते. (भाजी, भांडी, मडकी)
- ……… धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने ….. केला. (पलंगावरून; कल्ला, खाटेवरून; गिल्ला, सोफ्यावरून; हल्ला)
- रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा ……… पाऊस झाला होता. (मुसळधार, वादळी, कडाक्याचा)
- इकडे शोध, तिकडे शोध करत त्याला एक पडके ……. दिसले. (खिंडार, घर, झाड)
- स्वारीने गाव ओलांडले. ………. रस्ता धरला. (जंगलाचा, शहराचा, वेशीचा)
- ……… प्रभा फाकण्याच्या बेतात आली. (पश्चिमेला, आकाशात, पूर्वेला)
उत्तर:
- पंचक्रोशीतील
- मडकी
- खाटेवरून; गिल्ला
- वादळी
- खिंडार
- जंगलाचा
- पूर्वेला
प्रश्न २.
खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
- सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले.
- सदाचे व्यवस्थित चालले होते.
- सदा आकाशाकडे पाहून करुणा भाकू लागला.
- सदाचा गाडगी, मडकी करण्याचा धंदा होता.
- गजा वडिलांकडे हट्ट करू लागला.
- सदा अलगत वेगळा होताच, ‘जमलं बाबा ! सुटलो,’ असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला.
उत्तर:
- सदाचा गाडगी, मडकी करण्याचा धंदा होता.
- सदाचे व्यवस्थित चालले होते.
- गजा वडिलांकडे हट्ट करू लागला.
- सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले.
- सदा आकाशाकडे पाहून करुणा भाकू लागला.
- सदा अलगत वेगळा होताच, ‘जमलं बाबा ! सुटलो,’ असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला.
प्रश्न ३.
कोण, कोणास व का म्हणाले?
i. “मी येतो, मी येतो.”
उत्तर:
प्रस्तुत वाक्य लहानगा गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला, कारण त्याला वडिलांसोबत बाजारात जायचे होते.
ii. “मी नै येत मंग जा तुमीच.”
उत्तर:
प्रस्तुत वाक्य गचकअंधारीच्या भीतीमुळे बाजारात जाण्यासाठी नकार देताना गजानन आपल्या वडिलांना उद्देशून म्हणाला.
iii. ‘लोय जोऱ्यानं चालून रायलं गधळं.’
उत्तर:
प्रस्तुत वाक्य सदा स्वतःशीच बोलला, कारण रात्रीच्या अंधारात वाघाला गाढव समजून, त्याची चालण्याची जलद गती जाणवल्यावर सदाने मनाशी विचार केला.
iv. ‘हे इस्वरा, काय बुद्धी देली बाबा.’
उत्तर:
प्रस्तुत.वाक्य आपण वाघावर बसल्याचे लक्षात येताच ईश्वराची करुणा भाकताना सदा स्वतःशीच म्हणाला.
प्रश्न ४.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. सदा कोणता धंदा करत असे?
उत्तर:
सदांचा गाडकी, मडकी करण्याचा धंदा होता.
ii. बाजारात मडकी विकायची शिल्लक राहिल्यास सदा काय करत असे?
उत्तर:
बाजारात मडकी विकायची शिल्लक राहिल्यास सदा ती मडकी कोण्या ओळखीच्या घरी ठेवत असे.
iii. लहानगा गजानन काय हट्ट करत असे?
उत्तर:
लहानगा गजानन वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी हट्ट करत असे.
iv. गजानन सोबत येऊ नये म्हणून सदाने कोणाकोणाचे भय दाखवले?
उत्तर:
गजानन सोबत येऊ नये, म्हणून सदाने रात्रीच्या अंधाराचे, कोल्हयाचे, लांडग्याचे, वाघाचे, तसेच गचकअंधारीचे भय दाखवले.
v. सदाने गजाननला गचकअंधारीबद्दल काय सांगितले?
उत्तर:
गचकअंधारी हे खतरनाक जनावर असून ते वाघ, सिंहालादेखील एका घासात खाते, असे सदाने गजाननला सांगितले.
vi. गाढवाला शोधण्यासाठी सदा कुठे कुठे गेला ?
उत्तर:
गाढवाला शोधण्यासाठी सदा गल्लीत, उकिरड्यावर, तसेच घरामागील खिंडाराजवळ गेला.
vii. सदाच्या मनात शंकेची पाल केव्हा चुकचुकली?
उत्तरः
सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलेला असताना त्याला गाढवाच्या राखाडी रंगाऐवजी पिवळा रंग व त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
प्रश्न ५.
खालील वाक्ये वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः ‘गचकअंधारी’ या अशोक मानकर लिखित पाठात सदाने आपल्या मुलाला घाबरवण्यासाठी निर्माण केलेल्या ‘गचकअंधारी’ या काल्पनिक प्राण्याच्या भीतीने वाघाची झालेली फजिती आणि वाघाला गाढव समजल्यामुळे सदाची झालेली फजिती यांचे वर्णन केले आहे.)
i. वाघ प्रचंड हादरला.
उत्तर:
खिंडाराच्या भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाने सदाचे बोलणे ऐकले असल्यामुळे ‘गचकअंधारी’ सारख्या खतरनाक प्राण्याची त्याला भीती वाटत होती. थोडेसे उजाडल्यावर निघून जाण्याचा विचार करत असताना सदा गाढव समजून गचकन वाघाच्या पाठीवर बसला. आपल्या पाठीवर गचकअंधारीच बसली असल्याचा समज झाल्याने वाघ प्रचंड हादरला.
प्रश्न ६.
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
i. सदा व सखू मेटाकुटीला का येत असत ?
उत्तर:
सदाचा गाडगी, मडकी तयार करून विकण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी विकण्यासाठी सदा बाजारात जात असे. आठवड्यातील दोन-तीन दिवस आपले वडील कुठेतरी बाजारात जातात हे लहानग्या गजाननला कळू लागल्यामुळे तो वडिलांसोबत बाजारात जाण्यासाठी सारखा हट्ट करत असे. त्याची समजूत घालताना सदा व सखू मेटाकुटीला येत असत.
ii. वाघ सदाच्या गावात येऊन का धडकला ?
उत्तर:
एका रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडून गारपीट झाली होती. त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघाने गोंधळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी आसरा शोधत वाघ सदाच्या गावात येऊन धडकला होता.
iii. पहाटे जंगलाच्या रस्त्यावर वातावरण कसे होते?
उत्तर:
पहाटे जंगलाच्या रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता. आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या. एकंदरीत पहाटे जंगलाच्या रस्त्यावरील वातावरण आल्हाददायक होते.
iv. सदाने सुटकेसाठी कोणता मार्ग अवलंबला ?
उत्तर:
आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळताच सदाला भीतीने कापरे भरले. सुटकेचा एखादा मार्ग शोधण्याकरता तो इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या. जेव्हा वाघ या झाडाखालून जाऊ लागला, तेव्हा सदाने चपळाईने लोंबणारी पारंबी पकडून, वाघापासून स्वत:ची सुटका करून घेतली.
v. वाघ सुसाट का पळत सुटला?
उत्तर:
आपण गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसल्याचे लक्षात येताच सदाला भीतीने कापरे भरले होते, तर आपल्या पाठीवर
गचकअंधारी बसल्याचा समज झाल्याने वाघाचे काळीज धडधडत होते. दोघेही आपापल्या सुटकेचा मार्ग शोधत होते. सदाने वडाच्या लोंबणाऱ्या पारंब्यांचा आधार घेऊन स्वत: ची वाघापासून सुटका केली. अशाप्रकारे, सदा अलगत वेगळा होताच आपल्यावरील गचकअंधारीचे संकट टळले असे समजून वाघ सुसाट वेगाने पळत सुटला.
भाषाभ्यास आणि व्याकरण
प्रश्न १.
खालील चौकोनांतील समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा.
उत्तर:
- गाव = ग्राम
- गाढव = गदर्भ
- जंगल = वन
- हट्टी = जिद्दी
- आश्रय = आसरा
- रात्र = निशा
- कान = कर्ण
- अंधार = काळोख
- मडके = माठ
प्रश्न २.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- ऊन ×
- दिवस ×
- अस्पष्ट ×
- थंड ×
- काळोख ×
- पूर्व ×
- ईश्वर ×
उत्तरः
- सावली
- रात्र
- स्पष्ट
- उष्ण
- उजेड
- पश्चिम
- दानव, राक्षस
प्रश्न ३.
खालील शब्दांचे लिंग बदला.
- आई
- गाढव
- मुलगी
- वाघ
- कोल्हीण
- बोका
उत्तर:
- वडील
- गाढवीण
- मुलगा
- वाघीण
- कोल्हा
- मांजर
प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला.
- मडके
- गाढव
- भाकरी
- चप्पल
- भिंत
- टाचा
- पट्टा
- पारंब्या
उत्तर:
- मडकी
- गाढवे
- भाकऱ्या
- चपला
- भिंती
- टाच
- पट्टे
- पारंबी
प्रश्न ५.
आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून ‘पंचक्रोशी’ म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा.
- गाय वासरे राहण्याची जागा.
- मातीच्या वस्तू बनवणारा.
- शेतीची कामे करणारा.
उत्तर:
- गोठा
- कुंभार
- शेतकरी
प्रश्न ६.
कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य तो बदल करून वाक्ये पूर्ण करा.
(पळ काढणे, प्रभा फाकणे, करुणा भाकणे, सुसाट पळत सुटणे.)
- दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहून शेतकरी ईश्वराची ………
- आपल्या शिक्षकांना पाहताच विदयार्थ्यांनी मैदानातून ………
- पूर्वेला दृश्य नयनरम्य ……
उत्तर:
- करुणा भाकू लागले.
- पळ काढला.
- प्रभा फाकली होती.
प्रश्न ७.
खाली दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i. युक्ती फळाला येणे – यशस्वी होणे.
वाक्य:सोहमला वाचनाची आवड लावण्यासाठी आईने केलेली युक्ती फळाला आली.
ii. हिव भरणे – थंडीने गारठून जाणे.
वाक्य:अभ्यास झालेला नसताना उद्या परीक्षा असल्याचे कळताच मला हिव भरले.
iii. दरदरून घाम फुटणे – भीती वाटणे.
वाक्य:जंगलात अचानक समोर आलेल्या वाघाला बघताच सुहासला दरदरून घाम फुटला.
iv. जीवात जीव येणे – निश्चिंत होणे.
वाक्य: लहानग्या तृप्तीचा ताप उतरल्यामुळे मेघनाच्या जीवात जीव आला.
v. कापरे भरणे – भीतीने हुडहुडी भरणे.
वाक्य:जंगलात फेरफटका मारताना अचानक काळी, सळसळणारी लांब आकृती सामोरी आलेली पाहून मला कापरे भरले.
प्रश्न ८.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ३६ वरील वाक्प्रचार अभ्यासा. याप्रमाणे एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा.
i. पळून जाणे
ii. मृत्यू होणे
उत्तर:
i.
ii.
प्रश्न ९.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ३८ वरील ‘भाषेची गंमत’ या अंतर्गत दिलेली गमतीदार वाक्ये अभ्यासा. या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा.
उत्तर:
i. हिरवळीवर कचरा टाकू नये.
हिरवळीवर कचरा टाकून ये.
ii. इथे धूम्रपान करू नये.
इथे धूम्रपान करून ये.
iii. काकूला निरोप सांगून ये.
काकूला निरोप सांगू नये.
iv. स्वच्छता राखा.
स्वच्छ तारा खा.
प्रश्न १०.
खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.
i. “लेका, रस्त्यावर या वक्ती कोला असते बरं.’
उत्तरः
“बाळा, रस्त्यावर या वेळी कोल्हा असतो बरे.”
ii. ‘लोयच आटेल पोट्टं दिसून रायलं इचिन.’
उत्तर:
‘खूपच हट्टी मुलगा आहे हा.’
iii. “गचकअंधारी मैत नै तुले? लेका, गचकअंधारी वाघसिंव्हालेई एका घासात खाते म्हंतात.”
उत्तर:
“गचकअंधारी माहीत नाही का तुला? बाळा, गचकअंधारी वाघसिंहालाही एका घासात खाते म्हणतात.”
iv. ‘त हा माही नळ्ली फोळल्याशिवाय राहयत नै..’
उत्तर:
‘तर हा माझे नरडे फोडल्याशिवाय राहणार नाही…’
प्रश्न ११.
खालील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
i. तो बाहेर पडणार तोच गज्याला नेमकी जाग आली
उत्तर:
तो बाहेर पडणार, तोच गज्याला नेमकी जाग आली.
ii. अन् वाघानं खाल्लं त तुले सदानं म्हटलं
उत्तर:
“अन् वाघानं खाल्लं त तुले ?” सदानं म्हटलं.
iii. बापरे हे गचकअंधारी हाय असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं
उत्तर:
‘बापरे ! हे गचकअंधारी हाय !’ असं स्वत:शी म्हणताना त्याला हिव भरलं.
प्रश्न १२.
हे शब्द असेच लिहा.
पंचक्रोशी, शिल्लक, व्यवस्थित, स्पष्ट, मार्ग, घाबरगुंडी, दुप्पट, काळीज, झुंजूमुंजू, शिदोरी.
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न १.
लहानपणी तुम्हांला कशाची भीती वाटत असे?
उत्तर:
माझ्या लहानपणी मी खूप रडायला लागले किंवा रात्री झोपले नाही, की आई मला बागुलबुवाची भीती दाखवत असे. मोठ्या मोठ्या डोळ्यांच्या काळ्याकुट्ट, विचित्र दिसणाऱ्या भल्यामोठ्या बागुलबुवाची मला त्यावेळी प्रचंड भीती वाटे. बागुलबुवाची
भीती दाखवताच मी आईला घट्ट बिलगत असे व निमूटपणे तिच्या कुशीत झोपत असे, तसेच मला त्यावेळी झुरळ, पाल, कीड, गोम अशा प्राण्यांची भीती वाटे. खूप उंचीची, एकटे राहण्याची, अंधाराची, जखम होण्याचीही भीती वाटत असे.
प्रश्न २.
परीक्षेची भीती वाटू नये, म्हणून तुम्ही काय कराल?
उत्तर:
परीक्षेची भीती वाटू नये, म्हणून मी नियमितपणे अभ्यास करेन. शाळेत दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करेन. रोज पाठ्यपुस्तकांचे वाचन करेन. गणितांचा सराव करेन. इंग्रजीचे शब्दार्थ पाठ करेन. अभ्यासाचे सातत्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेन.
आकारिक मूल्यमापन
लेखी कार्य
प्रश्न १.
मराठी साहित्यातील विनोदी लेखन करणारे लेखक व त्यांचे साहित्य (पुस्तके) याची माहिती लिहा.
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३३)
उत्तर:
लेखक – पुस्तकांची नावे
- चिं. वि. जोशी – आणखी चिमणराव, निवडक गुंड्याभाऊ, चिमणरावांचे चऱ्हाट, एरंडाचे गुऱ्हाळ
- पु. ल. देशपांडे – वाऱ्यावरची वरात, असा मी असामी, बटाट्याची चाळ, हसवणूक, खोगीर भरती, व्यक्ती आणि वल्ली
- द. मा. मिरासदार – भुताचा जन्म, मिराजदारी, माझ्या बापाची पेंड, हुबेहूब
गचकअंधारी पाठाचा परिचय :
लेखक अशोक मानकर यांच्या ‘गचकअंधारी’ या पाठात पावसाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी सदाच्या घरामागे आलेला वाघ व अंधारात चुकून त्याच्याच पाठीवर स्वार होऊन बाजारात जाणारा सदा यांच्यात प्रवासादरम्यान घडलेल्या घटनांचे वर्णन आले आहे. सदाने आपल्या मुलाला घाबरवण्यासाठी निर्माण केलेल्या ‘गचकअंधारी’ या काल्पनिक प्राण्याच्या भीतीने वाघाची झालेली फजिती व वाघाला गाढव समजल्यामुळे सदाची झालेली फजिती यांचे वर्णन यात केले आहे.
गचकअंधारी शब्दार्थ
गचकअंधारी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
गचकअंधारी टिपा
पंचक्रोशी | चार-पाच कोसांच्या आतील गावे |
झुंजूमुंजू | पहाटेचा संधिप्रकाश |
गारपीट | गारांच्या पावसाने झोडपून निघणे. |
गचकअंधारी | काल्पनिक प्राणी |