Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 9 Question Answer नात्याबाहेरचं नातं for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 9 Question Answer नात्याबाहेरचं नातं
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 9 नात्याबाहेरचं नातं
नात्याबाहेरचं नातं Question Answer
प्रश्न १.
खालील विधांनामागील कारणे लिहा.
(अ) लेखकांनी कुत्र्यांच्या पिल्लाला थेट घरी आणले.
कारण:लेखकाच्या मनात त्या कुत्र्याच्या पिल्लाविषयी कणव निर्माण झाली. त्या पिल्लाला भरलेली हुडहुडी रोखण्यासाठी त्यांनी स्वत:चा मफलर पिल्लाच्या अंगावर टाकला. लहानग्या पिल्लाला हवा असलेला आधार मिळाला. लेखकालाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. त्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा, म्हणून लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
(आ) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्या ठेवले.
कारण:थंडीने गारठलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला हवा असलेला पक्का आधार मिळाल्यामुळे कुत्र्याचे पिल्लू आणि लेखक दोघांनाही एक मित्र मिळाल्याचे समाधान मिळाले होते. या नवीन मित्राचे – पिल्लाचे नामकरण करताना त्याची दणकट, दांडगी शरीरयष्टी पाहून लेखकाने त्याचे नाव डांग्या ठेवले.
(इ) लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात.
कारण: डांग्या घरादाराची, शेताची राखण अत्यंत प्रामाणिकपणे करत होता. अट्टल चोरालाही घाबरवेल अशी त्याची राखणदारी होती.
त्याची भारदस्त छाती पाहून झाडांवरील माकडे घाबरत. त्याच्या भीतीने खारूताईही उपाशी राही. त्याच्या दणकट शरीराची इतर प्राण्यांनाही भीती वाटे. कोण व्यक्ती कोणत्या कारणासाठी शेतात आली आहे याचा तो त्याच व्यक्तीच्या डोळ्यांत पाहून सहजतेने अंदाज घेई. त्याची हुशारी व चपळाई कौतुकास्पद होती, म्हणून लेखक डांग्याला पक्का हिमतीचा राखण्या म्हणतात.
प्रश्न २.
खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
१. सर्वांगाला वेढून टाकणारा
२. रान, पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा
३. नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा
४. रात्र आगेकूच करू लागली आहे हे सांगणारा
(आ)
उत्तर:
१. दिसणे – प्रसन्न चेहरा, कापसासारखे रूप, मऊ कान, लांबट नाक
२. शरीरयष्टी – दणकट, तरणेबांड शरीर
३. चाल – दुडुदुडु
४. नजर – बोलके, तेजस्वी डोळे, तीक्ष्ण नजर
(इ)
उत्तर:
१. एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू. अंगाचं गाठोडं करून पडलेलं. समोरच्या दोन्ही पायांत मान खुपसलेली.
२. हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न, आम्हांला सुन्न करून गेला.
३. थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कुणी पाणीच शिंपडलंय की काय असा भास झालेला.
४. अधूनमधून त्याचं चाललेलं कण्हणं, विराम शांततेचा भंग करणारं.
५. त्यानं उठण्याचा प्रयत्न केला; पण पाय बधीर झालेले.
प्रश्न ३.
खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा.
(१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला.
परिणाम:थंडीने कुडकुडत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाजवळ जाताच लेखकाच्या मनात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. तो गारठा कमी व्हावा यासाठी लेखकाने आपला मफलर पिल्लाच्या अंगावर टाकला. मफलरमुळे पिल्लाला ऊब मिळाल्याने त्याचा चेहरा अधिकच खुलला व त्याची हुडहुडीही थांबली.
(२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरूणापाशी झोपलं.
परिणामः कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरूणापाशी झोपल्यामुळे त्याला हवा असलेला आधार मिळाला. लेखकाच्या अंगावरील ब्लँकेटच्या उबेने त्याला थंडीपासून संरक्षण मिळाले. दोघांच्याही चेहऱ्यावर एक मित्र मिळाल्याचे समाधान झळकू लागले. प्रेमाची ऊब मिळाल्यामुळे पिल्लाला शांत झोप लागली, त्याला वेदनांचा विसर पडला.
(३) लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला.
(४) लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली.
परिणामःलेखकाच्या मित्रमंडळींची शीळ दूरवरून ऐकू आली की डांग्या शिळेच्या आवाजाने दुडदुडत यायचा. त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वानेच साऱ्या गावाला भुरळ घातली होती.
प्रश्न ४.
योग्य जोड्या लावा.
उत्तर:
(१ – ड),
(२ – क),
(३ – ब),
(४ – अ)
खेळूया शब्दांशी
(अ) खालील शब्दांचे तुम्हांला समजलेले अर्थ लिहा.
१. हुडहुडी
२. रुखरूख
३. फुलोर
४. अष्टपैलू व्यक्तिमत्व
५. विश्वस्त
६. सोहळा
उत्तर:
१. हुडहुडी – थंडीने कुडकुडणे.
२. रुखरूख – चिंता, काळजी
३. फुलोर– बहर
४. अष्टपैलू व्यक्तिमत्व – अनेक क्षेत्रात तरबेज व्यक्तिमत्त्व.
५. विश्वस्त – विश्वास ठेवण्याजोगा, खात्रीचा, विश्वासू
६. सोहळा – उत्सव-समारंभ, आनंददायक प्रसंग
(आ) खालील शब्दांचा सहसंबंध लावा. (रंगछटा आणि नामे)
उत्तर:
- शुभ्र चांदणे
- प्रसन्न सकाळ
- लालसोनेरी पट्टे
- निळसर प्रकाश
- हळदुली किरणे
(इ) खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन-दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा.
- थंड ×
- शांत ×
- मान ×
- स्वदेश ×
- आरंभ ×
उत्तर:
- थंड × गरम, उष्ण
- बडबड्या, बोलका
- अवमान, अपमान
- परदेश, विदेश
- शेवट, अखेर
(ई) खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
उत्तर:
(१ – अ),
(२ – ई),
(३ – आ),
(४ – इ),
(उ) खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा.
(१) नखशिखान्त – पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत
उत्तर:
पावसाच्या जोरदार सरीमुळे मी नखशिखान्त भिजलो.
(२) आपादमस्तक- पायापासून डोक्यापर्यंत
उत्तर:
वर्गात नवीन आलेल्या सायलीला आम्ही आपादमस्तक न्याहाळले.
उपक्रम :
टीव्हीवरील विविध वाहिन्यांवर प्राणिजीवनविषयक प्रसारित होणारे कार्यक्रम तुम्ही पाहता. तुम्हांला आवडणाऱ्या प्राणिजीवनविषयक कार्यक्रमांची यादी तयार करा.
(वरील उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)
लिहिते होऊया
वरील दोन्ही गटांत ‘पूर्वी, समोर, वर’ हे शब्द दिसतात. पहिल्या गटात ते शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत. दुसऱ्या गटात ते स्वतंत्रपणे आले असून वाक्यांतील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून ती क्रियाविशेषण अव्यये आहेत.
• खालील शब्दांचा ‘क्रियाविशेषण’ व ‘शब्दयोगी अव्यये’ असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा.
पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर.
उत्तर:
• खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
(अ) मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे.
उत्तर:
परीक्षेनंतर – नंतर हा शब्दयोगी अव्यय परीक्षा या नामाला जोडून आला आहे.
(आ) तुझ्यादेखील हे लक्षात कसे आले नाही ?
उत्तर:
तुझ्यादेखील – देखील हा शब्दयोगी अव्यय तुझ्या या सर्वनामाला जोडून आला आहे.
(इ) रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते.
उत्तर:
रस्त्यावरील – वरील हा शब्दयोगी अव्यय रस्ता या नामाला जोडून आला आहे.
(ई) देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का ?
उत्तर:
देण्यासाठी, तुमच्याकडे – साठी हा शब्दयोगी अव्यय देणे या क्रियापदाला तर कडे हा शब्दयोगी अव्यय तुमच्या या सर्वनामाला जोडून आला आहे.
लक्षात ठेवा : शब्दयोगी अव्यये सामान्यतः नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात; पण कधीकधी ती क्रियापदे व क्रियाविशेषणे यांनाही जोडून येतात. उदा., बोलल्यावर, आल्यानंतर, थोडासुद्धा, कालपर्यंत, पूर्वीपेक्षा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 9 नात्याबाहेरचं नातं Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
- थंडीचा ………. झंकार सर्वांगाला वेढून टाकणारा. (हळुवार, हळवा, सुखद)
- शेकोटीभोवती …… कणसांचा भुसा पडलेला. (ज्वारीच्या, बाजरीच्या, मक्याच्या)
- वाऱ्याच्या झोतात हलणारी ……… मन आकर्षित करणारी. (डहाळी, फांदी, पाने)
- मला येताना पाहून,कुत्र्याच्या पिल्लाला …….. वाटलं. (शांत, हायसं, हुश्श)
- पुन्हा बाबांचा ……… शब्दांचा मार निमूटपणे सोसला. (मुक्या, धारदार, तीव्र)
- माझ्या अंगावरील ………. उबेमुळे कुत्र्याच्या पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळालं. (चादरीच्या, ब्लॅकेटच्या, रजईच्या)
- डांग्याच्या ……… व्यक्तिमत्त्वानं थेट माझ्या हृदयात शिरकाव केला. (अष्टपैलू, लोभस, धाडसी)
उत्तर:
- हळवा
- मक्याच्या
- डहाळी
- हायसं
- मुक्या
- ब्लॅकेटच्या
- अष्टपैलू
प्रश्न २.
खालील प्रश्नांची एक दोन शब्दांत उत्तरे लिहा.
- शेकोटी पेटवून बसलेल्या घोळक्यातील लोकांची संख्या.
- चांदण्यांच्या प्रकाशकिरणांत चाललेला खेळ.
- कुत्र्याच्या पिल्लाला घरी घेऊन येण्यास सक्त विरोध करणारे.
- कुत्र्याच्या पिल्लाचे नवीन नाव.
- डांग्याच्या डोळ्यांच्या खाली असणाऱ्या पट्ट्यांचा रंग.
- डांग्याच्या भीतीने उपवास पाळणारी.
उत्तर:
- चार- सहा
- भेंड्या
- लेखकाचे बाबा
- डांग्या
- पिवळसर
- खारूताई
प्रश्न ३.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. थंडीची लाट कशात बंदिस्त झाली होती ?
उत्तर:
थंडीची थरथरती लाट मफलर, कानटोपी आणि स्वेटरमध्ये बंदिस्त झाली होती.
ii. शेकोटीभोवती कोणत्या वस्तू आपल्या अस्तित्वाची चाहूल देत होत्या?
उत्तर:
मक्याच्या कणसांचा भुसा, चार-दोन गवऱ्या या वस्तू शेकोटीभोवती आपल्या अस्तित्वाची चाहूल देत होत्या.
iii. लेखकाला आश्चर्याचा धक्का का बसला?
उत्तर:
कडूलिंबाच्या झाडाच्या बुंध्याशी थंडीने गारठलेले कुत्र्याचे पिल्लू पाहून लेखकाला आश्चर्याचा धक्का बसला.
iv. लेखकाने कोणाला साक्ष ठेवून पिल्लाचा नामकरण सोहळा आटोपला ?
उत्तर:
सकाळच्या प्रसन्न हळदुल्या किरणांना साक्ष ठेवून लेखकाने पिल्लाचा नामकरण सोहळा आटोपला.
v. डांग्या आणि लेखकाचे नाते अविस्मरणीय का होते ?
उत्तर:
नात्यागोत्याचा नसतानाही डांग्याने लेखकाला लळा लावला म्हणून नकळतपणे, वेळ- प्रसंगाने घडून आलेले डांग्या आणि लेखकाचे नाते अविस्मरणीय होते.
प्रश्न ५.
खालील विधांनामागील कारणे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना : ‘नात्याबाहेरचं नातं’ या पाठात लेखक सुभाष किन्होळकर यांनी स्वतःची थंडीच्या तडाख्यात सापडलेल्या कुत्र्याशी कायमची मैत्री जुळल्यावर बहरलेले अनोखे नाते उलगडले आहे.)
i. लेखकाची पावले बुंध्याच्या दिशेने वळली.
कारण: थंडीच्या एका रात्री लेखक गावाबाहेर असताना कडुलिंबाच्या झाडाच्या बुंध्याशी त्यांना हालचाल जाणवली. तिथे त्यांची नजर वळली. त्या बुंध्याच्या जवळ कुणीतरी असल्याचे लक्षात येताच त्यांची पावले बुंध्याच्या दिशेने वळली.
ii. कुत्र्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली.
कारण:कडुलिंबाच्या बुंध्याजवळ असलेल्या, कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असहय होत होती. ते पिल्लू समोरच्या दोन्ही पायांत मान खुपसून अंगाचे गाठोडे करून पडलेले होते. त्याचा थंडी रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न चालला होता. बुंध्याच्या दिशेने गेलेल्या लेखक व त्यांच्या मित्रांवर त्या छोट्याशा पिल्लाची तीक्ष्ण नजर खिळली. मदतीचा आधार शोधणारी त्याची दृष्टी त्याच्या सगळ्या वेदना डोहात टाकणारी होती. त्याचे वेदनेन कण्हणं, शांततेचा भंग करणारे होते, म्हणून त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली.
iii. बाबांच्या शब्दांचा मार लेखकांनी मुकाट्याने सोसला.
कारण:लेखक पिल्लाला कायमचा आधार देण्यासाठी थेट घरी घेऊन आले; मात्र पिल्लाला पाहून घरातली मंडळी एकदम गोंधळून गेली. बाबांनीही त्याला फटकारले. आपण पिल्लाला सोडून दिल्यास त्याचे काय होईल? तो कोठे जाईल? त्याला आधार देणारे, लळा लावणारे कोण असेल? या विचाराने लेखकांनी बाबांच्या शब्दांचा मार मुकाटयाने सोसला.
प्रश्न ५.
खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा.
i. लेखकाची पावले नकळत पिल्लाकडे खेचली गेली.
परिणाम: लेखक कुत्र्याच्या पिल्लाकडे गेले असता त्यांना दिसले, की पिल्लू थंडीने गारठून गेले होते. लेखकाला त्याच्या नजरेत आधाराची गरज दिसली. लेखकांची पावले त्याच्या दिशेने वळताच पिल्लाला हायसे वाटले. आधार देण्यासाठी कोणी धावून आल्याची त्याला जाणीव झाली. लेखकाच्या हाताचा स्पर्श होताच पिल्लाच्या डोळ्यांत लख्ख प्रकाश जाणवला.
ii. झाडांवरील माकडांची घाबरगुंडी उडायची.
परिणाम:आपल्या शरीराला अनुरूप नाव असलेला डांग्या शरीरयष्टीने अतिशय दणकट होता. तो अत्यंत प्रामाणिकपणाने शेताची, घरादाराची राखण करत असे. त्याची भारदस्त छाती पाहून झाडांवरील माकडांची अक्षरशः घाबरगुंडी उडायची. डांग्या झाडाखाली नुसते बसून राहिला तरी माकडांच्या काळजात धस्स होत असे, त्यामुळे शेताची, घरादाराची योग्य तऱ्हेने राखण होई.
iii. रात्र वाढली तशी थंडीची लाटही वाढली.
परिणामःथंडीच्या वाढत्या लाटेमुळे सगळ्यांनी मफलर, कानटोपी, स्वेटरमध्ये स्वतःला बंदिस्त केले. अनेक गावकरी चांदण्यांत शेकोटी पेटवून मक्याच्या कणसांचा आस्वाद घेत भेंड्या खेळत होते.
प्रश्न ६.
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
i. कडूलिंबाच्या झाडाचे वर्णन लेखकाने कसे केले आहे?
उत्तर:
गावाबाहेर कडाक्याच्या थंडीत शेकोटीभोवती लेखक इतर काही मित्रांसोबत भेंड्या खेळत होते. याच शेकोटीषासून दहा- पंधरा पावलांच्या अंतरावर एक कडूलिंबाचे झाड होते. ते चांदण्याच्या लख्ख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होते. वाऱ्याच्या झोतात हलणारी त्याची डहाळी मन आकर्षित करत होती. सर्व वातावरण भावस्पंदनावर झंकार उठवणारे होते. अशा शब्दांत लेखकाने कडूलिंबाच्या झाडाचे वर्णन केले आहे.
ii. थंडीने गारठलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची परिस्थिती कशी होती?
उत्तर:
कडूलिंबाच्या झाडाच्या बुंध्यापाशी अचानक हालचाल झाली असता लेखकाची पावले कडूलिंबाच्या बुंध्याच्या दिशेने वळली. तिथे कडाक्याच्या थंडीने गारठलेले एक लहानसे कुत्र्याचे पिल्लू अंगाचे गाठोडे करून पडले होते. समोरच्या दोन्ही पायात मान खुपसून हुडहुडी रोखण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न चालला होता.
थंडीच्या ओलसरपणाने पिल्लांच्या केसांवर कुणी पाणी शिंपडल्याचा भास होत होता. थंडी असह्य होत असल्याने ते आधार शोधत होते. अधूनमधून वेदनेने कण्हत होते. पाय बधीर झाल्यामुळे त्याला उठताही येत नव्हते. अशाप्रकारे, थंडीने गारठलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची अत्यंत बिकट अवस्था होती.
iii. मोठा झाल्यावर डांग्यामध्ये काय बदल झाले ?
उत्तर:
डांग्या लहानाचा मोठा होऊ लागताच त्याची शरीरयष्टी अधिक दणकट झाली. वाढत्या वयासोबत त्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला. त्याचे तरणेबांड शरीर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेला भुरळ घालणारे होते. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या खाली असलेले पिवळसर पट्टे आणि मागच्या पायांच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते. अशा प्रकारचे, शारीरिक बदल डांग्यामध्ये घडत गेले.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- लहर =
- हुडहुडी =
- कणव =
- कीर्ती =
- शीळ =
- काळीज =
उत्तर:
- तरंग
- थंडी, गारवा
- करुणा, दया
- प्रसिद्धी, ख्याती, लौकिक
- शिट्टी
- हृदय
प्रश्न २.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- पौर्णिमा ×
- प्रसन्न ×
- यशस्वी ×
- मऊ ×
- अनुरूप ×
- कीर्ती ×
उत्तर:
- अमावास्या
- अप्रसन्न, उदास
- अयशस्वी
- टणक, कडक
- विजोड
- अपकीर्ती
प्रश्न ३.
खालील शब्दांचे लिंग बदला.
- लेखक
- मित्र
- कुत्रा
- माकड
- पाहुणा
- चोर
- बाबा
उत्तर:
- लेखिका
- मैत्रीण
- कुत्री
- माकडीण
- पाहुणी
- चोर
- आई
प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला.
- लहर
- नदया
- लाट
- कणीस
- किरणे
- पिल्ल
- डहाळ्या
- प्राणी
- शेकोटी
उत्तर:
- लहरी
- नदी
- लाटा
- कणसे
- किरण
- पिल्ले
- डहाळी
- प्राणी
- शेकोट्या
प्रश्न ५.
खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
i. भास होने | अ. आपुलकी स्नेह प्रेम निर्माण होणे |
ii. स्नेहभावना उमलणे. | आ. आपलेसे वाटणे. |
iii. हृदयात शिरकाव करणे. | इ. समाज होणे |
उत्तर:
i. – इ,
ii – अ,
iii – आ
प्रश्न ६.
खालील शब्दसमूह / वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i. आनंदाची वृद्धी होणे – आनंद द्विगुणित होणे.
वाक्यःअत्यंत गुंतागुंतीची प्रसूती निर्विघ्नपणे पार पडून आई व बाळाचे प्राण वाचले, त्यामुळे सगळ्यांच्या आनंदाची वृद्धी झाली.
ii. न्याहाळणे एकाग्रतेने, बारकाईने पाहणे.
वाक्य: परीक्षा केंद्रात परीक्षक सर्व विदयार्थ्यांना बारकाईने न्याहाळत होते.
iii. लळा लावणे – आपलेसे करणे, जीव लावणे
वाक्य:घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या लहानग्या मुलीने अल्पावधीतच सगळ्यांना लळा लावला.
iv. घाबरगुंडी उडणे – अतिशय घाबरणे.
वाक्य:भलीमोठी शिंगे असलेला बैल माझ्या दिशेने धावत येताना पाहून माझी घाबगुंडी उडाली.
प्रश्न ७.
खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा.
i. नखशिखान्त – पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत
उत्तर:
पावसाच्या जोरदार सरीमुळे मी नखशिखान्त भिजलो.
ii. आपादमस्तक- पायापासून डोक्यापर्यंत
उत्तर:
वर्गात नवीन आलेल्या सायलीला आम्ही आपादमस्तक न्याहाळले.
iii. आबालवृद्ध – बालांपासून वृद्धांपर्यंत
उत्तर:
कृष्ण हा आबालवृद्धांना अत्यंत प्रिय होता.
iv. आमरण – मरणापर्यंत
उत्तर:
क्रांतिकारकांनी भारतमातेची आमरण सेवा केली.
प्रश्न ८.
खालील शब्दांचे तुम्हांला समजलेले अर्थ लिहा.
- भावस्पंदने –
- चित्तवेधक –
- सोज्वळ –
उत्तर:
- भावस्पंदने – भावभावनांच्या सूक्ष्म लहरी.
- चित्तवेधक – लक्ष वेधून घेणारे, लक्षवेधी, आकर्षक
- सोज्वळ – निष्पाप
प्रश्न ९.
खालील वाक्यांत विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
i. रात्र काहीशी सामसूम पण मन वेल्हाळ
उत्तर:
रात्र काहीशी सामसूम; पण मन वेल्हाळ.
ii. कसली वळवळ म्हणावी कोण असावं
उत्तर:
कसली वळवळ म्हणावी? कोण असावं?
iii. टाक ते पिल्लू खाली टाक म्हणतो ना
उत्तर:
‘टाक ते पिल्लू खाली, टाक म्हणतो ना !’
iv. त्याच्या दांडग्या शरीराला अनुरूप असं त्याचं डांग्या नाव ठेवलं
उत्तर:
त्याच्या दांडग्या शरीराला अनुरूप असं त्याचं ‘डांग्या’ नाव ठेवलं.
v. किती प्रेम एका प्राण्याकडून ना नात्याचा ना गोत्याचा
उत्तर:
किती प्रेम का प्राण्याकडून! ना नात्याचा, ना गोत्याचा.
प्रश्न १०.
हे शब्द असेच लिहा.
हृदय, कर्तबगारी, अविस्मरणीय, स्मितहास्य, अस्तित्व, रुखरूख, प्रसन्न, नखशिखान्त, कण्हणे, द्विगुणित.
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न १.
तुम्ही अनुभवलेल्या एखादया ‘नात्याबाहेरच्या नात्याचे’ थोडक्यात वर्णन करा.
उत्तर:
मला मांजरी पाळण्याचे खूप वेड नाही; पण एका मुसळधार पावसाच्या रात्री आमच्या घराच्या आडोशाला बसून कण्हणारी एक मनीमाऊ मला दिसली. ती पावसात भिजल्यामुळे कुडकुडत होती. मी लगेचच तिला घरात आणले. सुक्या उबदार कापडाने तिचे अंग पुसले. एका टोपलीत मऊ कापूस अंथरून त्यावर तिला ठेवले. तिच्या अंगावर उबदार कापड घातले. तिला वाटीभर दूध पाजले. या प्रसंगानंतर तिची आमच्या घरातल्यांशी गट्टीच जमली. दमून आल्यानंतर ‘ती मनीमाऊ’ आमचे विरंगुळ्याचे माध्यम बनली. दुधासाठी तिने कधीच घरातली भांडी पाडली नाहीत किंवा कोणाला चावा घेतला नाही, नखे मारली नाहीत. एका मुक्या प्राण्याने घरातल्यांना इतका लळा लावला, की तिच्याशिवाय आमचा एकही दिवस जात नाही. ती आता आमच्या घरातली ‘लाडकी’ व्यक्ती आहे.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
थंडीच्या दिवसांत आपण कोणती काळजी घ्यावी?
लेखी कार्य
प्रश्न १.
लिहिते होऊया.
उत्तर:
लहानपणापासूनच मला प्राणीपक्ष्यांची फार आवड आहे. दूरदर्शनवर विविध वाहिन्यांवरील प्राणिजीवनविषयक कार्यक्रम पाहणे मला फार आवडते. विविध जंगली, तसेच पाळीव प्राण्यांची माहिती मिळवतानाच मला जवळचा वाटला तो ‘कुत्रा’ हा प्राणी. वाघ, सिंह, जिराफ, हत्ती अशा जंगली प्राण्यांबद्दल कुतूहल वाटत असतानाच कुत्रा, मांजर, गाय, म्हैस अशा पाळीव प्राण्यांची पण माहिती मिळवायला मी सुरुवात केली.
माझी प्राण्यांबद्दलची आवड कळताच माझ्या बाबांनी मला कुत्र्याचे एक लहान पिल्लू आणून दिले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या लोंबणाऱ्या कानांनी, मिचमिच्या निळ्या डोळ्यांनी, दुडदुड्या चालीने माझ्या मनाला भुरळ घातली. त्याचा स्वभाव अत्यंत लाघवी आहे. गेल्या दोन वर्षांतच त्याने सगळ्यांना जीव लावला. प्रामाणिकपणा, हुशारी, चपळता, धीटपणा या गुणांमुळे त्याने सगळ्यांच्या मनात घर केले. मी त्याचे नाव लाडाने मोती ठेवले.
एकदा मी, माझा धाकटा भाऊ व आई बाबा फिरायला बागेत गेलो होतो. मोती आमच्यासोबतच होता. माझा धाकटा भाऊ नकळत खेळता खेळता आमच्यापासून दूर गेला व एका दगडाला अडकून पडला. जखमी झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. मोतीच्या ते लक्षात आले व त्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात करून आमच्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या कृतीमुळे . आम्हांला माझा भाऊ पटकन सापडला व त्याच्यावर त्वरित उपचार करता आले. मोतीने केलेल्या मदतीचा आम्हांला कधीही विसर पडणार नाही.
असा हा गुणवान मोती आज आमच्या घरातील एक महत्त्वाचा सदस्य बनला आहे.
प्रश्न २.
एका कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाला इजा झाली आहे, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल ? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३९)
उत्तर:
एका कुत्र्याच्या पायाला इजा झाली असता मी त्या कुत्र्याला घरी नेऊन त्याची जखम धुवून काढेन व त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार करेन. माझ्या पालकांच्या मदतीने मी त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. उपचारांदरम्यान त्याच्या खाण्यापिण्याची राहण्याची योग्य काळजी घेईन.
प्रश्न ३.
तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत असल्यास तुम्ही काय कराल ? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ३९)
उत्तरः
घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत असल्यास मी ती जागा सुरक्षित आहे की नाही याचा अंदाज घेईन. असुरक्षित असल्यास मी ते घरटे अलगत उचलून सुरक्षित जागी नेऊन ठेवेन.
नात्याबाहेरचं नातं पाठाचा परिचय :
लेखक व थंडीच्या तडाख्यात सापडलेल्या कुत्र्याच्या पिल्लामधील अनोखे नाते ‘नात्याबाहेरचं नातं’ या पाठात लेखक सुभाष किन्होळकर यांनी उलगडले आहे. लेखकाने त्या कुत्र्याच्या वागण्यातील ऐट, त्याची स्वामिभक्ती, त्याचा कुटुंबाला लागलेला लळा अत्यंत समर्पक शब्दांत आपल्यासमोर मांडला आहे.
नात्याबाहेरचं नातं शब्दार्थ
नात्याबाहेरचं नातं वाक्प्रचार व त्यांचे अर्थ