Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता)

Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता) for exam preparation.

Std 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता)

Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 15 असे जगावे (कविता)

असे जगावे (कविता) Question Answer

प्रश्न १.
जोड्या लावा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता) 2
उत्तर:
(१ – ई),
(२ – इ),
(३ – अ),
(४ – आ)

प्रश्न २.
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना

प्रश्न ३.
संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
ही कविता शिकवते, की आयुष्यातील संकटांकडे आव्हान म्हणून पाहावे. संकटांच्या काळातच माणसाची खरी परीक्षा होते. त्याला वेगवेगळे अनुभव येतात. संकटांना सामोरे जाताना माणसाला आयुष्यभर उपयोगी ठरेल असा धडा मिळतो, त्यामुळे संकटाच्या काळात घाबरून न जाता, अतिशय खंबीरपणे त्यातून मार्ग काढावा. आपल्यावर आलेले संकट झेलण्यास आपण समर्थ असतो. प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर प्रत्येक संकटातून तरून जाण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. अशा रीतीने संकटात निर्भयतेने, खंबीरपणे आणि आत्मविश्वास ढळू न देता वागावे असे या कवितेत म्हटले आहे.

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता)

प्रश्न ४.
‘संकटांना न घाबरता तोंड दयावे’ याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखादया प्रसंगाचे वर्णन करा.
उत्तर:
ऑक्टोबर २०१२ मध्ये पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या तालिबानी अतिरेक्यांनी शालेय विदयार्थिनी मलाला युसूफझाई हिच्यावर प्राणघातक हल्ला केला. तीन गोळ्या लागून मलाला गंभीर जखमी झाली. या जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या अवघ्या १५ वर्षांच्या मलालाने हिमतीने आपले शिक्षण सुरू ठेवले. एवढेच नव्हे, तर मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध तिने जागतिक पातळीवर आवाज उठवला. आज ती जगातल्या अनेक मुलींची प्रेरणास्थान ठरली आहे. या कामगिरीर्साठी तिला २०१४ मध्ये ‘नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रश्न ५.
कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘असे जगावे’ या कवितेत कवी गुरू ठाकूर यांनी, आयुष्यातील संकटांनी खचून न जाता, उलट संकटांना आव्हान देत सामोरे जा असा संदेश दिला आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणत्याही संकटांतून मार्ग काढू शकतो. गरज असते ती मोठी स्वप्नं पाहण्याची आणि त्यासाठी झटण्याची. त्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते. फक्त आपले पाय जमिनीवर ठेवता यायला हवेत. आपल्या हातून असे श्रेष्ठ कार्य घडावे, की ज्यामुळे जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ तेव्हा कठोर अशा काळालाही गहिवरून येईल. अत्यंत बाणेदारपणे, स्वाभिमानी, स्वकर्तृत्वाने व्यापलेले असे जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते:

चर्चा करूया

  • ‘आयुष्य जगताना स्वप्ने पाहावी’ आणि
  • ‘इच्छा असेल, तर मार्ग मिळतो’, या विषयांवर चर्चा करा.

खेळूया शब्दांशी

(अ) खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता) 3

(आ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

(१) अत्तर
उत्तर:
अत्तर – उत्तर, बेहत्तर, कातर

(२) ताऱ्यांची
उत्तर:
ताऱ्यांची – स्वप्नांची, ज्याची, नक्षत्रांची

(३) जाताना
उत्तर:
जाताना – जाताना, घेताना

(इ) खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.

(१) पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना.
उत्तर:
पाय असावे जमिनीवरती, कवेत आसमंत घेताना.

(२) असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर.
उत्तर:
असे जगावे, छाताडावर आमंत्रणाचे लावून अत्तर.

(३) असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर.
उत्तर:
असे दांडगी इच्छा ज्याची, पथ तयाला मिळती सत्तर.

(४) नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर.
उत्तर:
नजर रोखुनी नजरेमध्ये, जीवनाला दयावे उत्तर.

(५) स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर.
उत्तर:
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा हळवा हळवा.

वाचा.

सर वर्गात आले. त्यांनी निबंधलेखन स्पर्धेचा निकाल सांगितला व म्हणाले, “मला अनिताचा व सुरेशचा निबंध खूप आवडला. कोणाचा निबंध निवडावा हे मला समजत नव्हते. दोघांच्याही निबंधांतला आशय मनाला विचार करायला लावणारा आणि स्वत:च्या अंतरंगात डोकवायला भाग पाडणारा आहे; पण तरीही मी सुरेशच्या निबंधाची निवड का केली असावी, तर सुरेशचे सुवाच्य, वळणदार अक्षर व शुद्ध, बिनचूक लेखन.”

प्रत्येकाच्या अक्षराचे वळण वेगवेगळे असते. काहींचे अक्षर टपोरे, वाटोळे व बाकदार असते. अक्षरांत एकसारखेपणा असतो. दोन अक्षरांतले, दोन शब्दांतले अंतर सारखे असते. अक्षरांचा आकार योग्य असतो. लेखनात स्वच्छता, टापटीप जाणवते. अशा लेखनाला, अक्षरांना एक सौंदर्य प्राप्त झालेले असते, तर काहींचे अक्षर खूप गिचमीड असते. ते वाचनीय नसते. हत्तीचा पाय मुंगीला लावल्यावर जसे दिसेल तसे ते अक्षर असते. असे अक्षर कुणाला ‘वाचावेसे वाटेल का ? अशुद्ध लेखन वाचताना कंटाळा येतो आणि डोळ्यांवर ताण येऊन उगाचच दमणूक होते.

आपले लेखन जेवढे सुवाच्य, सुंदर, वळणदार पाहिजे, तेवढेच शुद्ध आणि बिनचूकही असावे. अशा सुंदर अक्षराची देणगी मिळवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. सुंदर अक्षर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात. न थकता, न कंटाळता रोजच्या सरावातून अक्षरांना योग्य वळण मिळते. अक्षरांना बाकदारपणा येतो आणि मग हळूहळू मोत्यांसारखी सुरेख अक्षरे कागदावर उमटू लागतात. अक्षर बिघडू नये, यासाठी कधीही अक्षरांकडे डोळेझाक करून चालत नाही. सुंदर अक्षर हा सुरेख दागिना आहे. ‘हा दागिना मी कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवीन,’ असा वसा प्रत्येकानेच घेतला पाहिजे.

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता)

सारे हसूया.

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता) 4

मैत्री तंत्रज्ञानाशी

मुलांनो, तुम्ही दररोज मोबाईल व संगणक हाताळत आहात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विविध सोईसुविधा आपल्याला या माध्यमांद्वारे पुरवल्या जातात.

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता) 5

या सुविधा म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर अप्लिकेशन्स असतात. त्याला तुम्ही अप्स असेही म्हणता.

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता) 6

तुम्हांला येथे काही अप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही अप्स कशासाठी वापरली जातात, याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा.

• विचार करा. सांगा.

  • तुम्हांला मोबाईल / संगणकावरील कोणती अप्स वापरायला आवडतात ?
  • अभ्यास करण्यासाठी अशा एखादया ॲपचा वापर करणे तुम्हांला आवडते का? सकारण सांगा.
  • या विविध अप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का? असल्यास / नसल्यास का ते सांगा.
  • मोबाईल / संगणकावरील अप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल ?

• तुम्हांला अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कठीण वाटतात ? त्यासाठी कोणती ॲप्स तयार व्हावीत असे तुम्हांला वाटते?

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 असे जगावे (कविता) Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
कवितेच्या ओळी पूर्ण करा.

i. असे जगावे, छाताडावर ………
……… आयुष्याला दयावे उत्तर !
ii. ………, भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, ……….
iii. …….., कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती.
iv. करून जावे असेही काही, ………..
………., निरोप शेवट देताना
उत्तर:
i. असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर !

ii. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची

iii. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना

iv. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना

प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. आयुष्याला भिडताना कशाची चैन करावी, असे कवीने म्हटले आहे?
उत्तर:
आयुष्याला भिडताना स्वप्नांची चैन करावी असे कवीने म्हटले आहे.

ii. संकटांना काय ठणकावून सांगावे असे कवीने म्हटले आहे?
उत्तर:
मी तयार आहे, तुम्ही बेहत्तर (खुशाल) या हे संकटांना ठणकावून सांगावे असे कवीने म्हटले आहे.

iii. सत्तर (अनेक) मार्ग कोणाला मिळतील असे कवीला वाटते?
उत्तर:
ज्याची इच्छा प्रबळ असेल त्याला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सत्तर (अनेक) मार्ग सापडतील असे कवीला वाटते.

iv. तुम्हांला निरोप देताना सगळ्या जगाला कशामुळे गहिवरून येईल असे कवीला वाटते?
उत्तरः
तुम्ही चांगले काम करून गेल्यास तुम्हांला निरोप देताना सगळ्या जगाला गहिवरून येईल असे कवीला वाटते.

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता)

प्रश्न ३.
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(टीप: दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात सुरुवातीस खालील प्रस्तावना लिहिता येईल.
प्रस्तावनाः ‘असे जगावे’ या कवितेत कवी गुरू ठाकूर यांनी, संकटांचा हसून सामना करावा, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर
संकटांत मार्ग काढावा आणि आयुष्याला धैर्याने सामोरे जावे. तसेच, जग आपल्याला लक्षात ठेवेल असे कार्य करून जावे असा संदेश दिला आहे.)

i. असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला दयावे उत्तर !
उत्तर:
आयुष्यातील संकटांना, प्रश्नांना, समस्यांना सामोरे जाताना मोठ्या धैर्याने सामोरे जावे. छातीवर संकटे झेलताना आव्हानांचे सुगंधीत असे अत्तर लावून म्हणजेच अत्यंत निर्भिडपणे जगावे असे कवी म्हणतो. आयुष्यातील कठीण प्रसंगांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी त्यांच्या नजरेला नजर देऊन खंबीरपणे त्यांचा सामना करावा, त्यांच्यापासून पळू नये, तर त्यांना थेट भिडावे.

ii. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची
उत्तर:
नक्षत्र, ग्रह-तारे यांच्या परिणामांमध्ये अडकू नये. या अज्ञात गोष्टींची मुळीच गुलामी करू नये व त्यांची भीतीही मनात बाळगू नये. उलट या सर्वांची पर्वा न करता आव्हानांना भिडताना भरपूर मोठमोठी स्वप्ने पाहावीत. ज्याची इच्छा दांडगी असते, प्रबळ असते त्याला स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक मार्ग सापडतात.

iii. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
उत्तर:
या जगातून कायमचे निघून जाण्यापूर्वी म्हणजेच मृत्यूपूर्वी लोकांच्या हिताचे असे काहीतरी काम करावे. या कामाच्या रूपाने मृत्यूनंतरही तुम्ही जिवंत राहाल. एवढे मोठे काम आपल्या हातून घडावे, की तुम्हांला निरोप देताना साऱ्या जगाला अश्रू अनावर होतील.

भाषाभ्यास आणि व्याकरण

प्रश्न १.
गटात न बसणारा विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

  1. अंबर, आकाश, भूमी, नभांगण
  2. पाय, पद, चरण, मस्तक
  3. आरंभ, शेवट, अंत, अखेर

उत्तर:

  1. भूमी
  2. मस्तक
  3. आरंभ

प्रश्न २.
खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

i. उत्तर
ii. अंबर
iii. कातर
iv. निरोप
उत्तर:
i. उत्तर – दिशा
– प्रश्नाचे उत्तर

ii. अंबर – वस्त्र
– आकाश

iii. कातर – हळवे
– कैची

iv. निरोप – सांगावा
– शेवटची भेट

प्रश्न ३.
कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.

  1. आयुष्याला –
  2. दयावे –
  3. भिडतानाही –
  4. नजर –

उत्तर:

  1. आयुष्याला – तयाला
  2. दयावे – जावे
  3. भिडतानाही – संकटासही, असेही, काही, काळाचाही
  4. नजर – गहिवर, स्वर, कठोर

प्रश्न ४.
खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
i. नजर रोखणे. अ. वास्तवाचे भान ठेवणे.
ii. पाय जमिनीवर असणे. ब. प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.
iii. हसू ओठांवर असणे. क. निर्भयपणे पाहणे.
iv. कवेत अंबर घेणे. ड. आनंद होणे.
v. काळीज काढून देणे. इ. अशक्य गोष्ट शक्य करणे.

उत्तर:
(i – क),
(ii – अ),
(iii – ड),
(iv – इ),
(v – ब)

प्रश्न ५.
खालील शब्द असेच लिहा.
नक्षत्रांची, भिडतानाही, ठणकावून, क्षणभर, गहिवर, कातर, आव्हान, अत्तर, उत्तर, दांडगी इच्छा.

मुक्तोत्तरी प्रश्न

प्रश्न १.
‘कातर कातर अवस्था’ म्हणजे खूप वाईट वाटल्यावर होणारी स्थिती. तुमच्या मित्राची अशी अवस्था झाल्यास तुम्ही कोणती मदत कराल ?
उत्तर:
माझ्या जवळच्या मित्राला खूप वाईट वाटल्यास मलाही खूप दुःख होईल. त्याला कशामुळे वाईट वाटत आहे हे समजून घेण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. खूप वाईट वाटल्यावर आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलल्यास थोडे मोकळे वाटते, त्यामुळे मित्राला मी बोलता करेन. त्याच्या वाईट वाटण्याचे कारण कळल्यावर त्याला कोणत्या प्रकारची मदत करायची हे ठरवता येईल, त्यामुळे “तू दुःखी होऊ नकोस आपण काहीतरी मार्ग नक्की काढू”, असे सांगून मी त्याला धीर देईन.

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक ७२ वरील ‘वाचा’ या शीर्षकाखालील उतारा वाचा.

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता)

लेखी कार्य

प्रश्न १.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठक्रमांक ७३ वर काही अप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही ॲप्स कशासाठी वापरली जातात, याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा.
उत्तर:
Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता) 1

प्रश्न २.
विचार करा. सांगा.

i. तुम्हांला मोबाइल / संगणकावरील कोणती अप्स वापरायला आवडतात ?
उत्तर:
मला मोबाइल किंवा संगणकावरील जी-मेल, वॉट्सॲप ही संपर्काची ॲप्स, विविध खेळांची ॲप्स (जिगसॉ अप, कोड्यांची ॲप्स,) बुद्धिबळ, कॅरम, क्रिकेट, फुटबॉल या खेळांची ॲप्स मला वापरायला आवडतात. (इ – शब्दकोश) शैक्षणिक ॲप्स उदा. व्याकरण, गृहपाठाचे नियोजन, अभ्यासाच्या वेळेचे नियोजन, गणिताची सोपी सूत्रे यांची ॲप्सदेखील मी वापरतो.

ii. अभ्यास करण्यासाठी अशा एखादया ॲपचा वापर करणे तुम्हांला आवडते का? सकारण सांगा.
उत्तर:
अभ्यास करण्यासाठी अप्सचा वापर करणे मला आवडते. उदा. नेहमीच्या जाडजूड शब्दकोशापेक्षा मला इ- शब्दकोशाचा (इ-डिक्शनरीचा) वापर करणे सोपे जाते. एखादा शब्द अडल्यास पटकन शोधता येतो, त्यामुळे वेळही वाचतो आणि अभ्यासाचा उत्साह टिकून राहतो. गणितीय सूत्रे सोप्या पद्धतीने समजावणाऱ्या ॲप्समध्ये अनेकदा चित्रमय शैलीत मांडणी केलेली असते, त्यामुळे दृश्य प्रतिमांच्या रूपाने सूत्रे लक्षात ठेवणे सोपे जाते.

iii. या विविध अप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का? असल्यास / नसल्यास का ते सांगा.
उत्तर:
हो, या विविध अप्सचा उपयोग मला आवश्यक वाटतो, कारण त्यांच्या वापरामुळे वेळ वाचतो आणि नियोजित पद्धतीने अभ्यास करणे सुलभ होते. अर्थात, या अप्सचा अतिवापर टाळला पाहिजे, अन्यथा त्यावर अवलंबून राहण्यास सुरुवात होईल.

iv. मोबाइल / संगणकावरील अप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल?
उत्तर:
मोबाइल / संगणकावरील अप्स वापरताना मी त्यामध्ये व्हायरस नाही ना, याची खात्री करेन. त्यासाठी ही अप्स डाऊनलोड करण्याआधी त्यांचे व्हायरस स्कॅनिंग करून घेईन. मोबाइल / संगणकामध्ये अन्टी व्हायरस लोड करेन.
एखादे अप डाऊनलोड करण्याआधी, ज्यांनी हे ॲप वापरले आहे त्यांची मते वाचेन. त्यावरून ते ॲप किती उपयुक्त आहे याची खात्री करून मगच ते लोड करेन.
मोबाइल / संगणकातील जागा वाचवण्यासाठी खेळाच्या अप्सपेक्षा शैक्षणिक अप्स डाऊनलोड करण्यावर भर देईन.

प्रश्न ३.
तुम्हांला अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कठीण वाटतात? त्यासाठी कोणती अप्स तयार व्हावीत असे तुम्हांला वाटते?
उत्तर:
गणित, विज्ञान, इंग्रजी आणि भूगोल हे विषय फक्त पुस्तक वाचून समजून घेणे कठीण जाते. या विषयातील संकल्पना मराठीतून समजावून सांगणारी दर्जेदार ॲप्स तयार व्हावीत असे मला वाटते.

उपक्रम / प्रकल्प

प्रश्न १.
कवी गुरू ठाकूर यांनी अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. ते चित्रपट शोधून, त्यातील गीतांचे शब्द मिळवून शब्दसौंदर्य अनुभवा.
(हा उपक्रम विदयार्थ्यांनी स्वत: आंतरजालाच्या साहाय्याने करावा.)

कवितेचा भावार्थ:

‘असे जगावे’ या कवितेतून कवी गुरु ठाकूर यांनी आयुष्यातील आव्हानांना, संकटांना प्रबळ इच्छाशक्तीने बेधडक सामोरे जावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला आहे.

कवी म्हणतो, आपल्याला आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यावेळी भयभीत न होता, खुल्या मनाने छातीवर जणू काही आव्हानांचे अत्तर लावले असावे अशा धाडसाने संकटांना सामोरे जावे. अनेक संकटांच्या रूपाने आयुष्य आपल्यासमोर नवनवीन प्रश्न उभे करत असते. अशावेळी बेधडकपणे नजरेला नजर रोखून आयुष्याला निर्भिडपणे उत्तर दयावे.

नक्षत्र, ग्रह-तारे यांच्या परिणामांमध्ये अडकू नये. या अज्ञात गोष्टींची मुळीच गुलामी करू नये व त्यांची भीतीही मनात बाळगू नये. उलट ना सर्वांची पर्वा न करता आव्हानांना भिडताना भरपूर मोठमोठी स्वप्ने पाहावीत. ज्याची इच्छा दांडगी असते, प्रबळ असते त्याला स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक मार्ग सापडतात.

स्वप्न पाहणारा माणूसच अंबर आकाश कवेत घेऊ शकतो, अर्थात अशक्यप्राय गोष्ट प्रत्यक्षात आणू शकतो; पण हे करताना आपले पाय नेहमी जमिनीवरच असावेत. आपल्या कर्तृत्वाचा गर्व करू नये. आपल्याला अत्यंत प्रिय अशी गोष्ट 1 दुसऱ्याला देतानाही ओठावरचे हसू मावळू देऊ नये. आपण स्वत:ला एवढे खंबीर करावे, की संकटांनाही ‘केव्हाही या, मी तयार आहे तुम्हांला सामोरे जायला’, असे आवाहन करता आले पाहिजे.

कवी पुढे म्हणतो, हे मित्रांनो तुम्ही या दुनियेतून, या जगातून एक ना एक दिवस निघून जाल; पण जाताना असे चांगले काम करून जा, की तुम्हांला निरोप देताना साऱ्या जगाला अश्रू अनावर होतील. काळ हा सर्वांत कठोर असतो असे म्हणतात; पण तुमचे कर्तृत्व इतके थोर असावे, की ज्यामुळे या कठोर काळालाही तुमच्या जाण्याने दुःख होईल.

Class 7 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer असे जगावे (कविता)

असे जगावे (कविता) शब्दार्थ

अत्तर सुगंधी द्राव
अंबर आकाश, आसंमत
कठोर दयाशून्य, निष्ठुर
कातर स्वर कंप पावणारा आवाज
गुलामी दास्यत्व
छाताडावर छातीवर
दांडगी इच्छा प्रबळ इच्छा
बेहत्तर खुशाल, बिनधास्त


असे जगावे (कविता) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

अंबर कवेत घेणे. अशक्य गोष्टी शक्य करणे.
कातर होणे. हळवे होणे.
काळीज काढून देणे. प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे.
गहिवर येणे. आठवणींमुळे रडू येणे.
चैन करणे. सुख, मजा उपभोगणे.
ठणकावून सांगणे. न घाबरता सांगणे.
नजर रोखणे. निर्भयपणे पाहणे.
निरोप देणे. अलविदा करणे, शेवटची भेट घेणे.
पाय जमिनीवर असणे. वास्तवाचे भान असणे, गर्व न करणे.

Leave a Comment