Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला

Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला for exam preparation.

Std 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला

Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 6 पण थोडा उशीर झाला

पण थोडा उशीर झाला Question Answer

प्रश्न १.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: संदीप हरी नाझरे यांनी लिहिलेल्या ‘पण थोडा उशीर झाला…’ या पाठात एका सैनिकाच्या मनातील मातृभूमीविषयी असलेले प्रेम आणि आपल्या आईविषयी असलेला जिव्हाळा दाखवणाऱ्या उत्कट प्रसंगाचे या पाठात वर्णन केले आहे.)

(अ) लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते?
उत्तर:
काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील कारगीलसारख्या प्रदेशात अतिशय थंड हवामान, जीवघेणा पावसाळा आणि हिवाळा, सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा अशी प्रतिकूल परिस्थिती असते. त्यामुळे, अशा अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशात सेवा बजावणे हे लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम वाटते.

(आ) पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे?
उत्तर:
दुर्गम भागात आणि सतत तणावपूर्ण सरहद्दीवर काम करणारे सैनिक फार क्वचितच आपल्या घरी जाऊ शकत असत. घरातल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी पत्राशिवाय अन्य संपर्क साधने नव्हती. त्यामुळे, सैनिकांना खूप एकटे वाटायचे, घरून आलेले पत्र वाचून त्यांना दिलासा मिळत असे. घराला आणि सैनिकांना जोडणारा पत्र हा एकमेव दुवा होता. पत्र घेऊन येणारा पोस्टमन आठ-पंधरा दिवसांतून एकदाच येत असे. आपल्या घरची खुशाली जाणून घेण्यासाठी सैनिक फार उत्सुक असत. त्यामुळे, पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड उडत असे.

Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला

(इ) गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली?
उत्तर:
गावाकडून आलेल्या सांगाव्यात सैनिकाच्या आईने लिहिले होते, की ‘मी आजारी आहे; पण सर्वजण माझी काळजी घेतात. तू मात्र भारतमातेला जप.’ ते वाचून सैनिकाचं मन ढसाढसा रडलं. त्याच्या डोळ्यांतील पाणी हटेना. जीव घाबराघुबरा झाला. त्याचे मन सैरभैर झाले आणि तातडीने मेजरकडून परवानगी घेत लेखक गावाकडे रवाना झाले.

प्रश्न २.
का ते लिहा.

(अ) कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.
उत्तर:
कारगीलसारख्या हिमालयातील दुर्गम भागात अतिशय खडतर हवामान असते. येथील अतिथंड हवामानामुळे पावसाळा आणि हिवाळा जीवघेणा असतो; पण उन्हाळ्यात मात्र पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंच रंगाने नटून जातात. जणू पृथ्वीने हिरवा शालू परिधान केला आहे, असे वाटते. अशा रमणीय निसर्गामुळे कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.

(आ) लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
उत्तर:
लेखकाच्या पत्नीने पाठवलेल्या अंतर्देशीय पत्रात कोणताही मजकूर लिहिलेला नव्हता. त्या पत्रावर फक्त तिच्या अश्रूंचे
सुकलेले डाग होते. पतीविषयी वाटणारे प्रेम, त्याच्या भेटीची ओढ, घरातील एकंदर परिस्थिती तिने आपल्या अश्रूंमधून नि:शब्दपणे व्यक्त केली होती. या पत्रातून लेखकाला पत्नीची व एकूणच घरच्या माणसांची मनाची स्थिती समजली. त्यामुळे, लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र असे म्हटले आहे.

(इ) गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते.
उत्तर:
गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाच्या आईचे दुखणे वाढल्याचा निरोप सांगितला. हे ऐकल्यावर लेखक गावाकडे जायला निघाला. आईच्या तब्येतीची चिंता त्याला सतावत होती. कधी एकदा आईला पाहीन असे त्याला वाटत होते. आईच्या कुशीत शिरण्यासाठी, तिच्याकडून लाड करून घेण्यासाठी त्याचे मन आसुसले होते. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. अशा मनस्थितीत आठ-दहा दिवसांचा प्रवास करताना वेळ सरता सरत नव्हता. त्यामुळे, गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते.

(ई) पण थोडा उशीर झाला… असे लेखकाने म्हटले आहे.
उत्तर:
आजारी आईला भेटण्यासाठी लेखक आठ-दहा दिवसांचा प्रवास करून गावी पोहोचला. गावच्या वेशीत प्रवेश करताना गावकरी आपल्याकडे कावऱ्याबावऱ्या नजरेने पाहत आहेत, असे त्याला वाटले. काहीतरी विपरीत घडले आहे हे जाणून, हातातल्या जाडजूड ट्रंका गावाच्या पाराजवळच टाकून त्याने घराकडे धाव घेतली. घरी पोहोचल्यावर बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या, आईला शोधण्यासाठी त्याची नजर घरभर फिरत होती. तिच्या शब्दांसाठी, स्पर्शासाठी लेखकाचे मन आसुसले होते; पण आई कुठेच दिसत नव्हती. लेखक घरी पोहोचण्याआधीच ती हे जग सोडून गेली होती यापुढे ती त्याला कधीही दिसणार नव्हती, म्हणून पण थोडा उशीर झाला… असे लेखकाने म्हटले आहे.

प्रश्न ३.
पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो, ते माहीत करून घ्या.
(टीप: पुढील मुद्दयांच्या आधारे ही माहिती गोळा करा.
टपालपेटी – टपालांची विभागणी टपालांची ने-आण – पोस्टमन)

प्रश्न ४.
वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हांला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा.
उत्तर:
वसुंधरेचे वर्णन :

  1. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंच रंगाने नटून जातात. जमीन अशी दिसतच नाही; जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे. असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्हसित करायचा.

सैनिकाच्या मनाचे वर्णन :

  1. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही.
  2. आईनं कुशीत घ्यावं अन् मीही आसुसल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत असं विचारांचं काहूर डोक्यात माजलं होतं.
  3. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं.

Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला

प्रश्न ५.
तुम्हांला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्न तयार करा.
उत्तर:
सैनिकाच्या मुलाखतीसाठी प्रश्नः

  1. तुम्हांला सैन्यात भरती होण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
  2. सैन्यात भरती होण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे तयारी केली?
  3. सैन्यात भरती होण्याच्या तुमच्या इच्छेला आईवडिलांनी पाठिंबा दिला होता का?
  4. सैन्यात भरती झाल्यावर तुम्हांला कोणकोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले?
  5. प्रशिक्षणानंतर तुमची प्रथम नेमणूक कोठे करण्यात आली?
  6. सध्या तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात?
  7. तुमचा दिनक्रम कसा असतो?
  8. तुम्हांला वर्षातून कोणत्या वेळी सुट्टी मिळते ?
  9. सीमेवर असताना तुम्ही कोणत्या माध्यमातून घरच्यांशी संपर्क साधता ?
  10. मोठेपणी सैनिक होऊ इच्छिणाऱ्या मुलांना तुम्ही कोणता संदेश दयाल ?

प्रश्न ६.
सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसे तुम्हांला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते?
उत्तर:
सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसे मला देशासाठी अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात. उदा. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा सन्मान करणे, स्वतः स्वच्छता राखून इतरांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, किल्ले, स्मारके अशा ठिकाणांचे जतन करणे, सुट्टीमध्ये मित्रांच्या मदतीने काही उपक्रम राबवून सामाजिक संस्थांना मदत करणे अशा उपक्रमांत सहभागी व्हावे असे मला वाटते.

प्रश्न ७.
कारगील या ठिकाणचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला 3
उत्तर:
Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला 2

खेळूया शब्दांशी.

(अ) ‘मन’ शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा.
उत्तर:

  1. मन उल्हासित करणे.
  2. मन चंद्रमण्यासारखे पाझरणे.
  3. मन सैरभैर होणे.
  4. मन आतुरणे.
  5. मन हेलावणे.

(आ) ‘पाव्हणेरावळे’ यासारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा. त्या जोडशब्दांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर:

  1. आबालवृद्ध – गावच्या जत्रेसाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.
  2. आळोखेपिळोखे – थकून आलेल्या राजूने आळोखेपिळोखे देत आईला चहा ठेवायला सांगितला.
  3. शेजारीपाजारी – कोणताही वेगळा पदार्थ केला, की आई शेजारीपाजारी सर्वांना वाटते.
  4. कावराबावरा – गर्दीत हरवलेला लहानगा विनू आईबाबा दिसत नाहीत हे पाहून कावराबावरा झाला होता.

ओळख पाहू!

१. हात आहेत; पण हालवत नाही. ___
२. पाय आहेत; पण चालत नाही. ___
३. दात आहेत; पण चावत नाही. ____
४. नाक आहे; पण श्वास घेत नाही. ___
५. केस आहेत; पण कधी विंचरत नाही. ___
उत्तर:
१. खर्ची
२. टेबल
३. फणी
४. सुई
५. दात घासायचा ब्रश

Class 6 Marathi Balbharati Chapter 6 पण थोडा उशीर झाला Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(बटालियन, कारगील,;अंतर्देशीय, आल्हाददायी)

i. इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीवघेणा तेवढा उन्हाळा सुखावह आणि …….
उत्तर:
आल्हाददायी

ii. तसं ………… सारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं.
उत्तर:
कारगील

iii. …… मध्ये आठ-पंधरा दिवसांतून एकदा पोस्टमन येत असे.
उत्तर:
बटालियन

iv. बायकोनं पाठवलेलं ……… पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो.
उत्तर:
अंतर्देशीय

Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला

प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. सैनिकाच्या बायकोने पाठवलेल्या पत्रात काय लिहिले होते?
उत्तर:
सैनिकाच्या बायकोने पाठवलेल्या पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेले नव्हते.

ii. सैनिकाची आई आजारी का पडली ?
उत्तर:
सैनिकाच्या पाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून त्याची आई आजारी पडली.

प्रश्न ३.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: संदीप हरी नाझरे यांनी लिहिलेल्या ‘पण थोडा उशीर झाला…’ या पाठात एका सैनिकाच्या मनातील मातृभूमीविषयी असलेले प्रेम आणि आपल्या आईविषयी असलेला जिव्हाळा दाखवणाऱ्या उत्कट प्रसंगाचे या पाठात वर्णन केले आहे.)

iv. सैनिकाच्या मनात भारतमातेबद्दल कोणत्या उदात्त भावना यायच्या ?
उत्तर:
भारतमातेच्या संरक्षणाची जबाबदारी सैनिकाला त्याच्या घराइतकीच महत्त्वाची वाटायची. त्याला वाटायचे, भारतमातेसाठी लढताना बलिदान दयावे लागले, तर त्याच्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. ते पाहताना त्याच्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.

  1. बर्फ =
  2. निरोप =
  3. बायको =
  4. डोळा =
  5. माऊली =
  6. अंतरंग =
  7. घर =
  8. गाव =

उत्तर:

  1. हिम
  2. सांगावा
  3. पत्नी, भार्या
  4. नयन, नेत्र
  5. आई, माता, जननी
  6. मन, मानस, चित्त
  7. गृह, सदन, आलय
  8. ग्राम, खेडे

प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. थंड ×
  2. प्रतिकूल ×
  3. धाकटा ×
  4. नामंजूर ×
  5. प्रेमळ ×

उत्तर:

  1. उष्ण
  2. अनुकूल
  3. थोरला
  4. मंजूर
  5. निष्ठुर

प्रश्न ३.
दिलेल्या शब्दांत लपलेले शब्द शोधा.

i. तळवट
उत्तर:
तळ, तट, वळ, वट

ii. हिरवागार
उत्तर:
हिरवा, रवा, वार, गार,

प्रश्न ४.
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
i. आठवणींनी फेर धरणे अ. जुन्या आठवणी ताज्या करणे
ii. आठवणींना उजाळा देणे ब. मनात आठवणी दाटणे
iii. ऊर अभिमानाने फुलून येणे क. खूप अभिमान वाटणे

उत्तर:
(i – ब),
(ii – अ),
(iii – क)

प्रश्न ५.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. अंतरंगाचा ठाव घेणे
  2. अंथरूण धरणे
  3. कानोसा घेणे
  4. जीव घाबराघुबरा होणे
  5. जीव तीळ तीळ तुटणे
  6. कावराबावरा होणे
  7. झुंबड उडणे
  8. ढसाढसा रडणे

उत्तर:

  1. मनाला भिडणे
  2. आजारी पडणे
  3. अंदाज घेणे
  4. खूप खूप घाबरणे
  5. अतिशय काळजी वाटणे
  6. गोंधळून जाणे
  7. गर्दी होणे
  8. खूप जोराने रडणे

Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला

प्रश्न ६.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.

  1. बलिदान देणे
  2. विचारांचे काहूर माजणे
  3. सेवा बजावणे
  4. पुरून उरणे

उत्तर:

  1. अनेक वीरांनी देशासाठी बलिदान दिले.
  2. परीक्षेचे वेळापत्रक लागताच रामच्या मनात
  3. लॉकडाऊनमध्ये कोव्हीड योद्धे आपली होते.
  4. झाशीची राणी इंग्रजांना पुरून उरली.

प्रश्न ७.
पीठ या शब्दाचे सामान्यरूप समजून घ्या.
उदा. पीठाला, पीठाचे, पिठात, पिठासाठी याप्रमाणे खालील शब्दांमध्ये बदल करा.

  1. विदयार्थी
  2. तलाव
  3. पाणी
  4. हवा

उत्तर:

  1. विदयार्थी-विद्यार्थ्याला, विद्यार्थ्याचे, विदयार्थ्यांना, विदयार्थ्यांसाठी.
  2. तलाव – तलावात, तलावाचा, तलावांमध्ये, तलावांसाठी.
  3. पाणी – पाण्याला, पाण्याचे, पाण्यात, पाण्यासाठी.
  4. हवा – हवेला, हवेचे, हवेत, हवेसाठी.

प्रश्न ८.
खालील वाक्यांत अधोरेखित केलेल्या सर्वनामांचे प्रकार ओळखा.

  1. तू आणि मी शाळेत जाऊया.
  2. हा माझा जवळचा मित्र आहे.
  3. जो तळे राखील तो पाणी चाखील.
  4. झाड कोणी लावले.

उत्तर:

  1. पुरुषवाचक सर्वनाम
  2. दर्शक सर्वनाम
  3. संबंधी सर्वनाम
  4. प्रश्नार्थक सर्वनाम

प्रश्न ९.
पुढील वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हे लिहा.

i. माझं लेकरू आलं या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो
उत्तर:
‘माझं लेकरू आलं, ‘ या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो.

ii. मी तिला भेटायला आलो होतो पण थोडा उशीर झाला
उत्तर:
मी तिला भेटायला आलो होतो; पण थोडा उशीर झाला…

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
तुम्हांला मोठे झाल्यावर सैन्यात भरती व्हायला आवडेल का? कारण सांगा.
प्रश्न २.
भारतीय सैन्याची तीन दले कोणती ?

लेखी कार्य

प्रश्न १.
सैन्यदलाबाबत अधिक माहिती करून घेण्यासाठी तुम्ही काय कराल?
उत्तरः
आमच्या शाळेतील शिक्षकांना विदयार्थ्यांसाठी सैनिकांसह संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सुचवेन. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना युद्धनौकेला भेट देण्यासाठी शाळेची सहल आयोजित करण्याबाबत सुचवेन. मी स्वतः या संदर्भातील पुस्तकांचे वाचन करून माहिती मिळवेन. ओळखीच्या सैनिकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांचे अनुभव जाणून घेईन.

उपक्रम / प्रकल्प

प्रश्न १.
तुमच्या चित्रकलेच्या वहीत सैनिकाचे चित्र काढून रंगवा.
(टीप: हा उपक्रम/प्रकल्प विद्यार्थ्यांनी स्वतः करावा.)

पण थोडा उशीर झाला पाठाचा परिचय

देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांच्या मनातील देशप्रेम व आपल्या आईप्रती असणारी ओढ यांच्या भावविभोर करणाऱ्या प्रसंगाचे वर्णन म्हणजे ‘पण थोडा उशीर झाला…’ हा पाठ होय. कारगीलसारख्या सतत तणावपूर्ण असलेल्या सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी अनेक दिवसांचा प्रवास करून घरी पोहोचतो; पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. सैनिकाच्या मनाची होणारी तगमग या पाठात संदीप नाझरे यांनी अचूक मांडली आहे.

पण थोडा उशीर झाला शब्दार्थ

Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला 4

Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला

पण थोडा उशीर झाला वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

Class 6 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer पण थोडा उशीर झाला 1

पण थोडा उशीर झाला टिपा

अंतर्देशीय पत्र महत्त्वाचा आणि खाजगी मजकूर पाठवण्यासाठी वापरले जाणारे, चिकटवून पाठवता येण्याजोगे पत्र.
चंद्रमणी एक काल्पनिक रत्न.
ट्रंक पूर्वी सामान ठेवण्यासाठी वापरली जाणारी पत्र्याची पेटी.
पार सावली देणाऱ्या मोठ्या वृक्षांभोवती बांधलेला ओटा.
बटालियन पलटण, १००० सैनिकांची तुकडी.
बंकर सैनिकांना लपून बसण्यासाठी जमिनीखाली केलेले खड्डे.
मेजर सैन्यातील अधिकाऱ्यांचा एक हुद्दा.
वेस गावाची सीमा.
शालू सामान्यपणे लग्नात नेसली जाणारी भरजरी साडी.

Leave a Comment