Class 6 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer बहुमोल जीवन (कविता)

Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 18 Question Answer बहुमोल जीवन (कविता) for exam preparation.

Std 6 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer बहुमोल जीवन (कविता)

Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 18 बहुमोल जीवन (कविता)

बहुमोल जीवन (कविता) Question Answer

प्रश्न १.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे?
उत्तरः
गुलाबाच्या आसपास काटे असले तरी गुलाब काट्यांना दोष देत नाही, उलट त्यांचा स्वीकार करतो. गुलाबाचे हे मोठेपण कवीने सांगितले आहे.

(आ) ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो ?
उत्तर:
ग्रीष्मात उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे धरणी भाजून निघते, असा परिणाम धरणीवर होतो.

(इ) निराश – आशा कवीला कोणाबद्दल वाटते ?
उत्तर:
दररोज आकाशाचे रंग बदलत असतात. आकाश कधी मोकळे असते, तर कधी आकाशात ढग दाटून आलेले असतात. त्यामुळे, नक्षत्रांबद्दल कवीला निराश – आशा वाटते.

(ई) सुख-दुःखाची ऊन-सावली म्हणजे काय?
उत्तर:
ज्याप्रमाणे कधी ऊन असते, तर कधी सावली तसेच सुखदुःखाचा खेळ सुरू असतो.

(उ) आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात ?
उत्तर:
आयुष्य हे बहुमोल आहे. ते गमावल्यावर पुन्हा मिळत नाही. म्हणून, आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात.

प्रश्न २.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रस्तावना प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: ‘बहुमोल जीवन’ या कवितेतून कवी रमण रणदिवे संदेश देतात, की जीवनात सुखदुःखांना सामोरे जाताना निराश न होता, उमेदीने संकटांना तोंड देता यायला हवे.)

(अ) मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात ?
उत्तर:
कवी म्हणतात, जीवनात सर्वकाही आपल्या मनासारखे घडत नाही, हे स्पष्ट करताना ते पुढील उदाहरणे देतात:
फुले गळून पडली तरी न झडणारे झाड, काटे असले तरी त्यांना दोष न देणारा गुलाब, काटे मिळाले म्हणून मातीवर न रागावणारी वेल, ग्रीष्माचे चटके सहन करणारी धरणी, आकाशाच्या रंग बदलण्यामुळे व ढग दाटून आल्याने ढगांआड जाणारी नक्षत्रे, अमावास्या पाहून न रुसणारी पौर्णिमा व सुखदुःखरूपी ऊनसावली यांची उदाहरणे कवी कवितेतून देतात.

(आ) कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे?
उत्तर:
जीवनात नेहमीच आपल्या मनाप्रमाणे सर्वकाही होत नाही. ऊन सावलीप्रमाणे व सुखदुःखं येत-जात असतात. जे काही वाट्यास येईल ते भोगावेच लागते. म्हणून, येणाऱ्या संकटांस बिनधास्तपणे भिडावे. संकटांना घाबरून,आयुष्याचा त्याग करू नये. आयुष्य एकदा गमावल्यावर पुन्हा मिळत नाही. ते अनमोल आहे. त्यामुळे, संकटांनी निराश न होता आनंदाने जगत राहावे, असा बहुमोल संदेश कवीने माणसाला दिला आहे.

प्रश्न ३.
तुमच्या मनाने उत्तरे लिहा.

(अ) तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता?
उत्तर:
मी जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा ती पूर्ण होण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. जरी ती गोष्ट मला हवी तशी घडली नाही तरीही मी प्रयत्न सोडत नाही. कधीकधी चिडचिड होते किंवा खूप वाईटही वाटते; परंतु मी खचून जात नाही. पुन्हा जोमाने कामाला लागतो.

(आ) ढग दाटून येतात; परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात?
उत्तरः
ढग दाटून आल्यावर पावसाची अपेक्षा असते; परंतु पाऊस पडला नाही, तर माझे मन खट्टू होते. तसेच, शेती आणि शेतकरी यांच्याविषयी काळजी वाटते, कारण पावसाशिवाय शेती होऊ शकत नाही. पावसाविना अन्नधान्यांची टंचाई तर होईलच, शिवाय शेतकऱ्यांचेही खूप नुकसान होईल. सोबतच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होईल या विचाराने भीतीही वाटते.

(इ) खूप ऊन लागू लागले, की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हांला काय वाटते?
उत्तरः
खूप ऊन असताना सावलीमध्ये येताच शांत वाटते व थकवा निघून जातो. त्यातही जर सावली झाडांची असेल, तर छान गारवा मिळतो! डोळ्यांनाही थंडावा मिळतो. अशावेळी मला वृक्ष संवर्धनाचे महत्त्व नव्याने जाणवते. वृक्षतौड होत राहिली, तर अशी सावली मिळणे कठीणच होईल.

प्रश्न ४.
या कवितेत मनासारखे काही घडते का? असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे, असे तुम्हांला वाटते? कल्पना करा व लिहा.
उत्तर:
मला वाटते, की आईने नेहमी माझ्या आवडीचेच पदार्थ बनवावेत. तसेच, मला आवडतात ते सर्व खेळ, खेळणी माझ्याकडे असावीत. शाळेच्या सहली दर महिन्याला असाव्यात म्हणजे मला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खूप धमाल करता येईल. मला परीक्षेत नेहमी चांगले गुण मिळावेत. त्यामुळे, आई – बाबाही खूश होतील.

खेळूया शब्दांशी

(अ) या कवितेत सुखदुःख, ऊनसावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी पाच शब्द लिहा.
उत्तर:

  1. आंबटगोड
  2. खरेखोटे
  3. भलेबुरे
  4. हारजीत
  5. गुणदोष
  6. दिवसरात्र
  7. पापपुण्य

(आ) समानार्थी शब्द लिहा.

(अ) लतिका =
(आ) धरणी =
(इ) देह =
(ई) नभ =
उत्तर:
(अ) वेल
(आ) भूमी, जमीन, वसुंधरा
(इ) तनू, शरीर, काया
(ई) आकाश, गगन

उपक्रम : वसंतऋतूत झाडांना पालवी फुटते अशा वेळी झाडांचे निरीक्षण करा व कडूनिंबाच्या झाडाचे पानाफुलांसहित चित्र काढा. रंग दया.
(टीप: वरील उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वत: करावा.)

सुविचार.

(१) जीवन हा महासागर होय. त्याच्या तुफान लाटांना बघून मनुष्य घाबरतो; परंतु त्याच्या तळाशी दडलेल्या रत्नांचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करत नाही.
(२) जीवन फुलासारखे असू दया. मात्र ध्येय मधमाशीसारखे ठेवा.

• खालील धातूंपासून धातुसाधिते तयार करा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer बहुमोल जीवन (कविता) 1
उत्तर:

मूळ धातू धातुसाधि
i. बोल बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून, बोलला
ii. कर करणे, करत, करता, करणारा, करून, केला
iii. धाव धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून, धावला

• खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा.

(१) मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली.
(२) पालक मुलांसाठी सतत राबत असतात.
(३) गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली.
(४) मला चित्रे रेखाटायला आवडते.
उत्तर:
(१) मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली.
(२) पालक मुलांसाठी सतत राबत असतात.
(३) गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली.
(४) मला चित्रे रेखाटायला आवडते.

• खालील तक्ता वाचा व समजून घ्या.

Class 6 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer बहुमोल जीवन (कविता) 2

वाचा.

आपल्या भारत देशाला पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. वर्षातून एकदा तरी डोळ्यांतून पाणी आणण्याइतपत तर कधी कधी तोंडचे पाणी पळण्याइतपत पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. पावसाचा अनियमितपणा, भूजल पातळी खालावणे, पावसाच्या पडणाऱ्या व वाहून जाणाऱ्या पाण्याचे | संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष, पाण्याचा भरमसाट वापर यांमुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे.

आपले आई-वडील किंवा आपले आजी-आजोबा म्हणताना आपण ऐकतो, की आमच्या लहानपणी प्रत्येकाच्या घरामागे स्वयंपाकघरातील, स्नानगृहातील पाणी छोट्या-छोट्या ओहळांतून अळू, केळी, फुलझाडे, मिरच्या किंवा वांग्यांची झाडे यांना दिले जाई. म्हणजेच सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग होता, असे आपल्या लक्षात येते.

घरगुती सांडपाण्यात स्वयंपाकघरातील सांडपाणी, हात-पाय धुणे, तोंड धुणे, अंघोळ करणे, कपडे-भांडी यांच्या धुणावळीचे पाणी येते. हे सांडपाणी राखाडी रंगाचे असते. ते मलमूत्र असलेल्या सांडपाण्यापेक्षा कमी प्रदूषित असते. तंत्रज्ञानाचा उपयोग करून ह्या पाण्याचे शुद्धीकरण करणे व त्याच्या पुनर्वापरावर भर देणे गरजेचे आहे.

पावसाचे पडणारे पाणी संवर्धित करून त्याचा उपयोग शेती वा अन्य हितकर कामांसाठी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन, चर्चा विनिमय करून प्रयत्न करणे, ठोस पावले उचलणे हितावह ठरेल.

Class 6 Marathi Balbharati Chapter 18 बहुमोल जीवन (कविता) Question Answer

संकलित मूल्यमापन

कवितेवर आधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
खाली दिलेल्या कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा.

i. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला
उत्तर:
गुलाबाचे फूल इतके सुंदर असते; परंतु त्यालाही काटे असतातच. तरीदेखील गुलाब त्या काट्यांचे दुःख करत बसत नाही. काट्यांना दोषही देत नाही.

ii. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी
उत्तर:
जीवनातील संकटांमुळे आशा निराशेने कोमेजून जातात; परंतु कालांतराने त्या पुन्हा पल्लवित होतात, नक्षत्रांप्रमाणे प्रकाशित होतात व आपल्याला मार्ग दाखवतात.

iii. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का?
उत्तर:
जीवन हे अनमोल आहे. ते एकदा गमावल्यावर पुन्हा मिळत नाही. त्यामुळे, आयुष्य हे आनंदाने जगावे.

iv. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का?
उत्तरः
आपल्या आयुष्यात माणसाला सतत काही ना काही हवे असते; परंतु आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही. जीवनात सुखदुःखांचे, यश अपयशाचे चक्र सतत सुरू असते. त्यामुळे, जीवनात सर्वकाही आपल्याला हवे तसे, आपल्या मनासारखे घडेलच असे नाही.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.

  1. फूल =
  2. मन =
  3. सृष्टी =

उत्तर:

  1. पुष्प, सुमन
  2. चित्त, मानस
  3. निसर्ग

प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

i. त्याग ×
उत्तर:
स्वीकार

ii. नवे ×
उत्तर:
जुने

iii. ऊन ×
उत्तर:
सावली

iv. सुख ×
उत्तर:
दुःख

v. राग ×
उत्तर:
लोभ, प्रेम

प्रश्न ३.
दिलेल्या शब्दांत लपलेले शब्द शोधा.

  1. ऊनसावली
  2. मातीवरती

उत्तर:

  1. ऊन, सावली, वन, साव, नव, लीन, नऊ, सान.
  2. माती, वर, मार, रती, वरती, तीर.

प्रश्न ४.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.

  1. दाटून येणे
  2. बोटे मोडणे
  3. भोगावे लागणे
  4. लीलया भिडणे

उत्तर:

  1. आकाशात काळे मेघ दाटून आले.
  2. चुलीवरचे सर्व दूध फस्त झालेले पाहून आजी बोक्याच्या नावाने बोटे मोडत होती.
  3. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात.
  4. छोटा विनय कुस्तीपटूबरोबर लीलया भिडला.

प्रश्न ५.
खालील धातूंपासून धातुसाधिते तयार करा.
उत्तर:

  1. वाच – वाचणे, वाचत, वाचताना, वाचणारा, वाचून, वाचला
  2. जा – जाणे, जात, जाता, जाणारा, जाऊन, गेला

प्रश्न ६.
खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा.

  1. क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
  2. दीपू रस्त्याने जात होता.
  3. आजीला आता जास्त चालवत नाही.

उत्तर:

  1. क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
  2. दीपू रस्त्याने जात होता.
  3. आजीला आता जास्त चालवत नाही.

प्रश्न ७.
खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

i. तुला हे पुस्तक आवडले का
उत्तर:
तुला हे पुस्तक आवडले का?

ii. डोंगरावरून शेती नदी घरे यांचे दृश्य असे दिसते
उत्तर:
डोंगरावरून शेती, नदी, घरे यांचे दृश्य असे दिसते.

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. ७२ वरील ‘वाचा’ अंतर्गत दिलेला उतारा मोठ्याने वाचा.

प्रश्न २.
तुम्हांला आवडलेले कोणतेही पाच सुविचार सांगा.

बहुमोल जीवन (कविता) कवितेचा भावार्थ:

रमण रणदिवे यांच्या ‘बहुमोल जीवन’ या कवितेत त्यांनी जीवनातील संकटांना तोंड देऊन, आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश दिला आहे.

कवी म्हणतात, की जीवनात प्रत्येक वेळी आपल्याला हवे तसेच होईल असे नसते. त्यामुळे, येणारी संकटे, दुःखं पचवण्याची ताकद आपल्यात असावी. झाडांवरची फुले गळून पडली तरी झाड गळून पडत नाही.

सर्वांनाच आपापल्या वाट्याला येणाऱ्या दुःखांना, संकटांना तोंड दयावेच लागते. सोबत काटे असले तरी गुलाबाचे फूल कोणाला दोष देत नाही, तसेच वेलीसुद्धा आपल्याला काटे दिले म्हणून मातीवर चिडत नाहीत, कारण जीवनात सर्वकाही आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. वसंत ऋतूत फुले फुलतात, तर ग्रीष्मात उन्हाने जमीन होरपळून निघते; पण पुन्हा पावसाच्या आगमनाने हिरवीगार होऊन जाते. हे चक्र सतत सुरू असते. तरी आपले शरीर उन्हाने जळले म्हणून धरती कधी तक्रार करत नाही.

रोज आकाशाचे रंग बदलत असतात. कधी मोकळे आकाश, तर कधी ढग भरून येतात. ढगांमुळे लपलेली नक्षत्रे पुन्हा आकाशात दिसतात, त्याचप्रमाणे कोमेजलेल्या आशाही नक्षत्राप्रमाणे पुन्हा नव्याने उभारी घेतात. अमावास्येच्या अंधाऱ्या रात्रीला पाहून पौर्णिमा कधी रुसत नाही, कारण जीवनात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडत नाही.

आयुष्यात ऊन-सावल्यांप्रमाणेच सुखदुःखं येत जात राहतात, त्यांचा राग धरू नये. आयुष्यात येणाऱ्या संकटांना न घाबरता सामोरे जावे. त्यासाठी आयुष्याचा त्याग करू नये, कारण आपले जीवन हे बहुमोलाचे आहे ते एकदा गमावल्यावर पुन्हा मिळत नाही, कारण जीवनात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडेल असे नाही.

बहुमोल जीवन (कविता) शब्दार्थ

अवस अमावास्या
आयुष्य जीवन
घन ढग
देह शरीर, तनू
धरणी जमीन, धरती
नभ आकाश
निखळणे गळून पडणे
बहुमोल जीवन मौल्यवान जीवन
लतिका वेल
शालू भरजरी साडी
सकला सर्वांना


बहुमोल जीवन (कविता) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

दाटून येणे. भरून येणे.
बोटे मोडणे. दोष देणे.
भोगावे लागणे. सोसणे, सहन करावे लागणे.
लीलया भिडणे. सहजपणे करणे, सहज निभावून नेणे.


बहुमोल जीवन (कविता) टिपा

ग्रीष्म एक मराठी ऋतू. या ऋतूत तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो.
नक्षत्र ताऱ्यांचा समूह.
वसंत निसर्गाचे रूप बहरण्याचा ऋतू.

Leave a Comment