Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र

Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र for exam preparation.

Std 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र

Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 22 वडिलांस पत्र

वडिलांस पत्र Question Answer

प्रश्न १.
चार ते पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: ‘वडिलांस पत्र’ या पाठात समीर आपल्या वडिलांना सहलीत पाहिलेल्या किल्ल्यांचे वर्णन पत्राद्वारे कळवत आहे.)

(अ) राजगडाला ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ असे का म्हणतात ?
उत्तर:
‘महाराष्ट्र’ या किल्ल्यांच्या राज्यात मावळ प्रांतातील सह्याद्रीच्या सर्वांत उंच शिखरावर ‘राजगड’ किल्ला वसलेला आहे. तो जुना, दुर्लक्षित, ओसाड असला तरीही त्याचे बांधकाम बळकट आहे. या अतिउंच किल्ल्याचा घेर बारा कोस आहे. तसेच, हा प्रचंड भव्य किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होता.

शिवरायांनी राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम करून घेतले होते. महाराजांच्या हिंदवी स्वराज्यस्थापनेचे कार्य, नव्या मोहिमांची तयारी, लढे, तह, शिवरायांचे, त्यांच्या मावळ्यांचे वास्तव्य अनुभवलेला हा ऐतिहासिक किल्ला आहे, म्हणून राजगडाला ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ म्हणतात.

(आ) शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली?
उत्तर:
सहलीला जाण्यापूर्वी शिक्षकांनी शाळेत विदयार्थ्यांना राजगडाची प्रतिकृती दाखवली होती. १६४६ साली छत्रपती शिवरायांनी राजगड ताब्यात घेतला होता. हा गड जुना, दुर्लक्षित, उजाड ; पण मजबूत आहे. तसेच, हा अतिउंच किल्ला अवघड डोंगरावर वसलेला आहे. स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृतींमध्ये भारतातील राजगडाचा समावेश आहे, अशी माहिती शिक्षकांनी मुलांना दिली.

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र

(इ) राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे का म्हटले असावे?
उत्तर:
शिवरायांच्या राजधानीचे ठिकाण असणारा राजगड हा प्रचंड भव्य किल्ला आहे. त्याच्या उत्तर दिशेला गुंजवणी नदी – दक्षिणेकडे वेळखंड नदीवरील भाटघर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता आणि पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा आहे. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि तेथून दिसणारे सृष्टिसौंदर्य अप्रतिम आहे. यामुळे, राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे, असे म्हटले असावे.

(ई) मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली ?
उत्तर:
राजगड हा किल्ला सर्वांत उंच आहे. त्याचा घेर तब्बल बारा कोसांचा आहे. शिवरायांनी या किल्ल्याचा विस्तार करून त्याला राजधानीचे स्थान दिले. राजधानी म्हणून आवश्यक असलेले सर्व प्रकारचे बांधकाम त्यांनी या गडावर करून घेतले अशी राजगडाची तपशीलवार माहिती मार्गदर्शकाने मुलांना पुरवली.

(उ) समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा का जाणवला ?
उत्तर:
समीरला किल्ल्याची रचना उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखी वाटली, कारण राजगडाचा बालेकिल्ला पंख्याच्या मध्यभागी असणाऱ्या उंचवट्याप्रमाणे आहे. तसेच, पद्मावती, सुवेळा व संजीवनी या तीन माच्या पंख्याच्या तीन पात्यांप्रमाणेच दिसतात, म्हणून समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवला.

(ऊ) राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत?
उत्तर:
राजगडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर अशा शिवरायांच्या महान मावळ्यांचे वास्तव्य होते. राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहिली. अंधाऱ्या रात्रीतील गूढ चर्चा ऐकल्या.

महाराजांनी आखलेल्या विविध नव्या मोहिमांची तयारी पाहिली. अफजलखानाशी लढण्याचा बेत, पुरंदरचा तह या सर्व घटनांचा तो साक्षीदार होता. शिवाजी महाराज आग्र्याहून सहीसलामत सुटून संन्याशाच्या वेशात राजगडावर परत आले. अशा सर्व ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिल्या आहेत.

प्रश्न २.
समीर असे का म्हणाला असावा.

(अ) महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे.
उत्तर:
शैक्षणिक सहलीमुळे समीरला महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत, या गोष्टीची जाणीव झाली. म्हणून, महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे तो म्हणाला असावा.

(आ) किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं.
उत्तर:
समीरला सहलीच्या निमित्ताने प्रचंड व भव्य राजगड किल्ला पाहता आला. उत्तर दिशेला वाहणारी गुंजवणी नदी, दक्षिण दिशेकडे वेळखंड नदीवरील भाटघर धरण, पूर्वेकडचा पुणे – सातारा रस्ता व पश्चिमेला असणारा सहयाद्री अशा चौफेर भौगोलिक वैशिष्ट्यांनी नटलेला राजगड त्याने पाहिला. भाटघर धरणाचे अथांग जलाशय व आजूबाजूचे सृष्टिसौंदर्य पाहून समीर इतका हरखून गेला, की त्याला तेथून परतावेसे वाटेना म्हणून तो असे म्हणाला असावा.

(इ) मला एक फलक खूप आवडला.
उत्तर:
राजगडाचा देखणा व प्रसन्न परिसर अनुभवत असताना समीरने परिसरात पर्यटकांसाठी लावलेले फलक पाहिले, वाचले, त्यांपैकी एका फलकावर राजगडावर वास्तव्य करणाऱ्या शिवरायांच्या महान मावळ्यांविषयी माहिती लिहिली होती. तसेच, राजगडाने पाहिलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांविषयी माहिती लिहिली होती. ती वाचून या ऐतिहासिक किल्ल्याचे महत्त्व नव्याने जाणून घेता आल्यामुळे समीर ‘मला एक फलक खूप आवडला’ असे म्हणाला असावा.

(ई) आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे.
उत्तरः
स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृतींमध्ये भारतातील राजगडाचा समावेश आहे हे ऐकून समीरला अभिमान वाटला. त्याकाळी शिवरायांनी किल्ल्याचा विस्तार करून एक राजधानी म्हणून राजगडाला परिपूर्ण बनवले. योग्य ते बांधकाम करून घेतले.

आपल्या पुरातन वास्तूंमध्ये आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला असतो. त्यामुळे, अशा या उत्कृष्ट बांधकामाची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली याचे त्याला कौतुक वाटले असावे, म्हणून तो आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे म्हणाला असावा.

(उ) आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का?
उत्तर:
राजगडाचे वैभव पाहताना समीरला फार अभिमान वाटला. आपल्या प्राचीन वास्तूंमध्ये आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास सामावलेला असतो, हे त्याला कळले. या किल्ले पाहण्याच्या अभ्यासपूर्ण आनंददायी सहलीने तो प्रेरित झाला. त्यामुळे, आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का? असे समीरने बाबांना विचारले असावे.

(ऊ) आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते.
उत्तर:
समीर शिक्षण घेण्यासाठी आपल्या घरापासून दूर एका वसतिगृहात राहतो. त्यामुळे त्याला वसतिगृहात जेवावे लागते. वसतिगृहातल्या जेवणाची चव बरी असली तरी आईच्या हातच्या जेवणाची मजा त्याला येत नसावी म्हणून, ‘आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते’ असे समीर म्हणाला असावा.

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र

प्रश्न ३.
बसस्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात ? त्यांतील तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा.
उत्तर:
बसस्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना प्रादेशिक भाषा (महाराष्ट्रात मराठी), हिंदी किंवा इंग्रजीतून दिल्या जातात. त्या सूचना पुढीलप्रमाणे:

  1. स्वत:च्या सामानाची काळजी घ्या.
  2. अनोळखी संशयास्पद वस्तूंना हात लावू नका.
  3. हात दाखवा, बस थांबवा.
  4. रांगेत चढा, रांगेत उतरा.
  5. बसमध्ये चढताना मागच्या दरवाजाचा, तर बसमधून उतरताना पुढच्या दरवाजाचा वापर करावा.

प्रश्न ४.
राजगडाने कार्य पाहिले, खलबते ऐकली असे वर्णन आले आहे म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे. खालील वस्तूंचे या पद्धतीने दोन ओळींत वर्णन लिहा.
उदा.,
Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र 2
उत्तर:

  1. या घराने अनेक वादळे निधड्या छातीने झेलली आहेत.
  2. या रंगीबेरंगी छत्रीने दोन चिमुकल्या हातांचा गोड स्पर्श अनुभवला आहे. या छत्रीने अनेक पावसाळे पाहिले आहेत.
  3. या फळ्याने अनेक पिढ्यांना घडवले आहे. तो कधी गणिताचे धडे देतो, तर कधी मराठी कवितेची चव चाखवतो.
  4. या तबल्याने ताक्धिनाधीन धा गाऊन किती जणांचे मनोरंजन केले असेल ! त्याच्या रोमारोमांतून तालमय नादध्वनी उमटले असतील.

प्रश्न ६.
राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र 3
उत्तर:
Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र 1

प्रश्न ७.
तुम्ही पाहिलेल्या एखादया किल्ल्याचे आठ-दहा वाक्यांत वर्णन करा.
उत्तर:
लोणावळ्याजवळच्या मळवली स्टेशनला उतरून लोहगडाला जाता येते. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी ३४२० फूट उंच असा हा गड आदिलशहाच्या ताब्यातून जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. गडावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा ही चार मुख्य प्रवेशद्वारे आहेत. कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट हे या गडाचे मुख्य वैशिष्ट्य. ही सर्पाकार रेखीव वाट पार करताना वेगवेगळे बुरूज लागतात.

महादरवाजातून आत चालत गेल्यावर एक शिवमंदिर आहे त्याच्या जवळ एक छोटेसे अष्टकोनी तळे आहे. त्याच्यापुढे थोडेसे चालत गेल्यावर एक मोठे सोळाकोनी तळे आहे, जे नाना फडणविसांनी बांधले होते. ‘विंचूकाटा’ हेही लोहगडाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. गडावरून पाहिल्यावर हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून याला ‘विंचूकाटा’ असे नाव पडले. या ठिकाणाचा उपयोग गडाच्या आसपासच्या भागाची टेहळणी करण्याकरता होत असावा, असे मानले जाते.

गडावर १०० लोक मावू शकतील एवढी प्रचंड मोठी गुहा आहे. लोहगडाचा उपदुर्ग म्हणजे विसापूर. गडावरून पवना धरणाचे सुंदर दृश्य दिसते. इतर गडांच्या तुलनेने लोहगडाचे प्राचीन अवशेष दुर्गप्रेमींनी विशेषत्वाने जतन करून ठेवले आहेत. आबालवृद्धांनाही सहज चढाई करता येईल असा हा गड आहे.

खेळूया शब्दांशी

(अ) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.

(अ) वसतिगृहातले
(आ) भारतातील
(इ) राजधानी
उत्तरः
(अ) हाव, सहा, गृहातले, हास, हात, सवत.
(आ) भार, भाता, भाल, रती, तार, ताल, तीर, लता, भारती.
(इ) राज, राधा, नीरा, नीज, जरा, धारा.

(आ) खालील शब्दांना दायी, शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा.

(अ) गौरव
(आ) वैभव
(इ) सुख
(ई) भाग्य
(उ) आनंद
(ऊ) आराम
उत्तरः

शब्द दायी प्रत्यय शाली प्रत्यय
i. गौरव गौरवदायी गौरवशाली
ii. वैभव वैभवदायी वैभवशाली
iii. सुख सुखदायी
iv. भाग्य भाग्यदायी भाग्यशाली
v. आनंद आनंददायी
vi. आराम आरामदायी

शोध घेऊया

स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये जगातील चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत. त्या किल्ल्यांची नावे आंतरजालावरून मिळवा व लिहा.
(टीप: हा उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी आंतरजालाच्या साहाय्याने स्वत: करावा.)

वाचा.

खालील तक्त्यात पत्राचे काही मायने दिले आहेत, त्यांचे वाचन करा.

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र 4

सारे हसूया.

शिक्षक : (रिनाला) – समज तुझ्याकडे १० बकऱ्या आहेत, त्यांपैकी ५ बकऱ्या भिंत ओलांडून निघून गेल्या तर किती उरतील ?
रिना : सर, काहीच नाही.
शिक्षक : ते कसं ? तुला वजाबाकी करता येत नाही ?
रिना : सर, तुम्हांला बकऱ्यांबद्दल ठाऊक नाही ! एक गेली की तिच्यामागे सगळ्या निघून जातात.

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र 5

नेहमी लक्षात ठेवा

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र 6

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र

विचार करून सांगूया.

संध्याकाळी अचानक ध्वनिक्षेपक वाजू लागला. आधी पोरांची गर्दी झाली मग गावची माणसेही आली. अरे वाह…! सरपंच आलेले दिसतात. आज गावात ग्रामसभा आहे तर !
अचानक कशासाठी ही सभा घेतली असावी ?

आपण समझून घेऊया

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र 7

• खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) मी खूप शिक्षण घेणार.
(२) नंदिनी सायकल चालवणार.
(३) मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार.
वरील वाक्यांतील सर्व क्रियापदे भविष्यकाळातील आहेत.

• खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) वैमानिकाने विमान चालवले असेल.
(२) प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल.
(३) वाहनचालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल.

वरील वाक्यांतील चालवले असेल, मिळालेले असेल, ठेवलेली असेल ही या क्रियापदांवरून क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे असे दर्शवतात. हा पूर्ण भविष्यकाळ आहे.

• खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) तो निबंध लिहीत असेल.
(२) गाडी प्लॅटफॉर्मवर येत असेल.
(३) श्रेया स्पर्धा जिंकत असेल.

वरील वाक्यांतील लिहीत असेल, येत असेल, जिंकत असेल या क्रियापदांवरून भविष्यकाळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो, म्हणून ती वाक्ये अपूर्ण भविष्यकाळातील आहेत.

• खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील.
(२) पक्षी चिवचिवाट करत राहतील.
(३) साहिल कविता रचत राहील.

वरील वाक्यांतील म्हणत राहील, करत राहतील, रचत राहील या क्रियापदांवरून भविष्यकाळात क्रिया सुरू राहतील, अशी रीती (प्रथा) सांगितल्यामुळे इथे तो रीती भविष्यकाळ आहे.

• खालील सारणी पूर्ण करा.

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 Question Answer वडिलांस पत्र 8

Class 6 Marathi Balbharati Chapter 22 वडिलांस पत्र Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

i. सहल खूपच आनंददायी आणि…………….. झाली. (सुखकारक, मनोरंजक, अभ्यासपूर्ण)
उत्तर:
अभ्यासपूर्ण

ii. रायगडाप्रमाणेच ……….. सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण. (रामगड, राजगड, पूर्णागड)
उत्तर:
राजगड

iii. राजगडाचा घेर ……….. कोसांचा आहे. (बारा, तेरा, दहा)
उत्तर:
बारा

iv. जगातील सर्वोत्कृष्ट चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती …….. मधील म्युझियममध्ये ठेवल्या गेल्या आहेत. (स्वित्झर्लंड, आयर्लंड, पोलंड)
उत्तर:
स्वित्झर्लंड

प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. राजगड कोठे वसला आहे?
उत्तर:
राजगड हा मावळ प्रांतातील सहयाद्रीच्या सर्वांत उंच शिखरावर वसला आहे.

ii. राजगडावरील तीन माच्या कोणत्या ?
उत्तर:
पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या राजगडावरील तीन माच्या आहेत.

iii. राजगडावर कोणत्या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते?
उत्तर:
राजगडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते.

iv. राजगडाविषयी अभिमानाची गोष्ट कोणती ?
उत्तरः
स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या गेलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृतींमध्ये भारतातील राजगडाचा समावेश आहे, ही राजगडाविषयी अभिमानाची गोष्ट आहे.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.

  1. राजा =
  2. खलबत =
  3. तह =
  4. बैरागी =
  5. वेश =
  6. पुरातन =
  7. किल्ला =

उत्तर:

  1. नृप, भूपती, नृपती, नरेश
  2. चर्चा
  3. करार, सौदा, समेट
  4. संन्याशी, साधू
  5. पोशाख, पेहराव
  6. प्राचीन
  7. गड, दुर्ग

प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. बळकट ×
  2. बोलका ×
  3. प्रसन्न ×
  4. वैभव ×

उत्तर:

  1. कमकुवत
  2. मितभाषी
  3. अप्रसन्न
  4. दारिद्र्य

प्रश्न ३.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.

i. ऊर अभिमानाने भरून येणे – छाती अभिमानाने फुलणे.
उत्तरः
भारतदेशाचा झेंडा उंचावला जातो, तेव्हा सर्वच भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो.

ii. मुकणे – न मिळणे, गमावणे.
उत्तर:
यंदा गणपतीच्या सुट्टीत गावी जायला न मिळाल्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवाला मी मुकलो.

iii. तह करणे – समेट / सौदा करणे.
उत्तर:
शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंगांशी तह केला.

iv. वास्तव्य करणे – एका जागी मुक्काम करणे.
उत्तर:
सज्जनगडावर काही काळ समर्थ रामदासांचे वास्तव्य होते.

प्रश्न ४.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. ब्यात घेणे.
  2. दर्शन घेणे.
  3. विस्तार करणे.

उत्तर:

  1. आपल्या कब्जात घेणे.
  2. डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणे.
  3. व्याप्ती वाढवणे.

प्रश्न ८.
खालील सारणी पूर्ण करा.
उत्तर:

काळ सामान्य अपूर्ण पूर्ण रीतिकाळ
वर्तमानकाळ मधुबाला तबला वाजवते. मधुबाला तबला वाजवत आहे. मधुबालाने तबला वाजवला आहे. मधुबाला तबला वाजवत असते.
भूतकाळ मधुबालाने तबला वाजवला. मधुबाला तबला वाजवत होती. मधुबालाने तबला वाजवला होता. मधुबाला तबला वाजक्त असे.
भविष्यकाळ मधुबाला तबला वाजवेल. मधुबाला तबला वाजवत असेल. मधुबालाने तबला वाजवला असेल. मधुबाला तबला वाजवत राहील.


मुक्तोत्तरी प्रश्न

प्रश्न १.
समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा.
उत्तर:

दि. ३० नोव्हेंबर, २०२०

चिरंजीव समीर,
अनेक शुभाशीर्वाद.

तू सहलीत पाहिलेल्या स्थळाबाबत जे भरभरून लिहिलेस, ते वाचून मला खूप आनंद झाला. अक्षरश: राजगडाचा परिसर माझ्या डोळ्यांपुढे साकार झाला. या पत्रामुळे तू फार चांगले लिहितोस याची झलक मला पाहायला मिळाली. एखाद्या ठिकाणाला भेट देताना त्याचा इतिहास – भूगोल थोडाबहुत माहीत असणं आणि त्या प्रवासादरम्यान मिळालेल्या माहितीची सांगड घालत ते स्थळ प्रत्यक्ष अनुभवणं, योग्य समर्पक शब्दांत मांडणं हे तुला छान जमलं आहे. तू रोज लिहित जा.

तुमचे शिक्षक तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासाबाबत किती जागरूक असतात ते या सहलीमुळे कळले. अशा शैक्षणिक सहलीद्वारे तुमचे शिक्षक विदयार्थ्यांना इतिहास – भूगोल प्रत्यक्ष वाचायला शिकवतात आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने तुमच्या माहितीत भर घालतात, तसेच गौरवशाली इतिहासाची समृद्ध परंपरा अनुभवण्याची संधी तुम्हां मुलांना उपलब्ध करून देतात याबद्दल त्यांचे खरंच कौतुक वाटते !

तुझा अभ्यास कसा चालू आहे? परीक्षा कधी आहेत? वेळापत्रक कळव, इकडे सर्व मजेत आहेत. छोट्या अशितीला शाळेत उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. आज तिच्या वाढदिवशी मी तुला पत्र लिहावे म्हणून ती हट्ट धरून बसली होती. सुट्टीत तू घरी येण्याची आम्ही सर्व वाट पाहत आहोत.

प्रकृतीची काळजी घे. अभ्यास वेळेवर कर.
तुझ्या पत्राची वाट पाहत आहे.

तुझे बाबा.

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. ८८ वरील ‘वाचा’

प्रश्न २.
विचार करून सांगूया. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८९)
अंतर्गत दिलेल्या तक्त्याचे वाचन करा.
संध्याकाळी अचानक ध्वनिक्षेपक वाजू लागला. आधी पोरांची गर्दी झाली मग गावची माणसेही आली. अरे वाह…! सरपंच आलेले दिसतात. आज गावात ग्रामसभा आहे तर ! अचानक कशासाठी ही सभा घेतली असावी?

लेखी कार्य

प्रश्न १.
पुढील तक्त्यात संदेशवहनांच्या काही साधनांची नावे दिली आहेत. तुम्ही संवाद साधताना ज्या साधनांचा वापर करता त्यापुढे ✓ अशी खूण करा. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८५)
उत्तर:

टपाल सुविधा इ-सुविधा
पत्र दूरध्वनी
स्पीडपोस्ट मोबाइल
पार्सल एस. एम. एस
कुरियर इ-मेल


वडिलांस पत्र पाठाचा परिचय

पत्र ही मानवी भावना व्यक्त करण्यास साहाय्यभूत ठरणारी बाब आहे. अशाच एका पत्राद्वारे समीर नावाचा मुलाने आपण सहलीत अनुभवलेला आनंद आपल्या वडिलांस कळवला आहे. हे पत्र ‘वडिलांस पत्र’ या पाठाच्या स्वरूपात देण्यात आले आहे.

वडिलांस पत्र शब्दार्थ

अत्युच्च सर्वांत उंच
अथांग ज्याचा थांग लागत नाही असा
अद्ययावत प्रगत
उमगणे कळणे, समजणे
गुणगुणणे हळू आवाजात गाणे / पुटपुटणे
गुप्त खलबते गूढ चर्चा
तज्ज्ञ निष्णात, प्रवीण, विद्वान
दुर्लक्षित लक्ष न दिला जाणारा.
पुरातन प्राचीन
प्रतिकृती एखादया वस्तूचे / वास्तूचे लहान रूप
बैरागी संन्याशी, साधू
मोहीम स्वारी, सैन्याची चाल
वास्तू बांधकाम
सर्वोत्कृष्ट सर्वांत उत्तम


वडिलांस पत्र वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

ऊर अभिमानाने भरून’येणे. अभिमानाने छाती फुलणे.
तह करणे. सौदा करणे, समेट करणे.
ताब्यात घेणे. आपल्या कब्जात घेणे.
दर्शन घेणे. डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणे.
मुकणे. न मिळणे, गमावणे.
वास्तव्य करणे. एका जागी मुक्काम करणे / वसणे / राहणे.
विस्तार करणे. व्याप्ती वाढवणे.


वडिलांस पत्र टिपा

कोस जमिनीचे अंतर मोजण्याचे एक परिमाण.
बालेकिल्ला डोंगरी किल्ल्याचा उंच असा पोटकिल्ला, उपरकोट.
माची चढण, पर्वताचा पायथा ते शिखर यांमधील जागा.
मावळ महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील पठार.
राजगड, रायगड शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील राजधान्या.
सहयाद्री महाराष्ट्रातील एक पर्वतरांग.

Leave a Comment