Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा

Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 15 Question Answer बालसभा for exam preparation.

Std 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा

Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 15 बालसभा

बालसभा Question Answer

प्रश्न १.
दोन-तीन ओळींत उत्तरे लिहा.

(अ) इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते?
उत्तर:
महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन केले होते.

(आ) बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला ?
उत्तर:
बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर, चंदर, कुणाल या मुलांनी सहभाग घेतला.

(इ) बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली?
उत्तर:
बालसभेचे नियोजन करताना मुलांना वर्गशिक्षिका, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी यांनी, तसेच शाळेतील मीनल, जॉन, कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिनप्पा या विदयार्थ्यांनीही मदत केली.

प्रश्न २.
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ-दहा ओळींत लिहा.
उत्तर:
महात्मा फुले:
महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. प्रथम त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईंना शिक्षण दिले. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून नेमले. विधवांच्या केशवपनास त्यांनी विरोध केला. त्यासाठी न्हाव्यांचा मोठा संप घडवून आणला. महात्मा फुले यांनी विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले, तसेच अनाथालये काढली. तेव्हाच्या धार्मिक कर्मकांडांवर त्यांनी टीका केलीच व स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वांवर आधारित सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज व मुंबईत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. डॉ. आंबेडकरांनी जन्मभर अस्पृश्यतेच्या विरोधात लढा दिला. त्यासाठी अनेक सत्याग्रह, आंदोलने त्यांनी केली. दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जन्मभर प्रयत्न केले. त्यांनी विदयार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहेही सुरू केली. त्यांना वाचनाची खूप आवड होती.

Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा

प्रश्न ३.
तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळास्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल? ते क्रमाने लिहा.
उत्तर:
सर्वप्रथम विज्ञान प्रदर्शनासाठी मुख्याध्यापकांची परवानगी घेऊ. विज्ञान शिक्षकांच्या साहाय्याने विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजन समितीचे सदस्य निवडू. समिती सदस्य व विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाने प्रदर्शनाच्या खालील बाबी निश्चित करू.

  1. प्रदर्शनातील सहभागांची व प्रयोगांची संख्या
  2. प्रदर्शन भरवण्याचे ठिकाण, वेळ
  3. प्रदर्शनात शिस्त राखण्यासाठी शिस्तमंत्री व स्वयंसेवक
  4. प्रदर्शनाची सजावट पाहण्यासाठी सजावट समिती
  5. प्रदर्शनाच्या दिवसाच्या कार्यक्रमांची रूपरेषा

अशाप्रकारे, विदयार्थ्यांच्या व शिक्षकांच्या साहाय्याने विज्ञान प्रदर्शन पार पाडू.

प्रश्न ४.
शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा.
उत्तर:
शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणारे इतर कार्यक्रमः

  1. वार्षिक स्नेहसंमेलन
  2. प्रजासत्ताक दिन
  3. स्वातंत्र्यदिन
  4. क्रीडा स्पर्धा
  5. निबंध / चित्रकला / वर्तृत्व स्पर्धा
  6. शिक्षक दिन
  7. पर्यावरण दिन
  8. थोर व्यक्तींचे जन्मदिन, स्मरणदिन
  9. विज्ञान प्रदर्शन

प्रश्न ५.
बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात? त्या विषयांची यादी करा.
उत्तर:
बालसभा खालील विषयांवर घेतल्या जातात:

  1. बालदिन
  2. पर्यावरण जागरूकता
  3. स्वयंशिस्त
  4. साक्षरता प्रसाराबाबत

प्रश्न ६.
तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत. त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ? ते लिहा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा 4
उत्तर:
Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा 1

हे करून पाहूया.

(अ) तुमच्या शाळेत ‘बालिका दिन’ साजरा केला आहे. त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
उत्तरः
उत्तरः
सरस्वती विदयालयाचा बालिका दिन सोहळा.
मुंबई, ४ जानेवारी २०२१.
(प्रतिनिधी)
सरस्वती विदयालय दादर – मुंबई येथे ‘राष्ट्रीय बालिका दिना’ निमित्त ३ जानेवारी, २०२१ रोजी मोठ्या उत्साहात बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्राध्यापिका लीना केदारे यांना आमंत्रित करण्यात आले होते. विदयालयाच्या सभागृहात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. स्वागतासाठी शाळेतील विदयार्थिनींनी सरस्वती वंदना गायली. त्यानंतर विविध क्षेत्रांत आपली चमक दाखवणाऱ्या विदयार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात, ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन असल्याने बालिका दिन म्हणून साजरा केला जातो याची माहिती दिली. तसेच, सर्व मुली, स्त्रिया या शिक्षणाच्या जोरावर मोठ्यात मोठे पद कसे मिळवू शकतात याची प्रेरक उदाहरणे दिली व अशा समारंभास बोलावल्याबद्दल आभार मानले.

कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शन व ‘वंदे मातरम्’ च्या गायनाने करण्यात आला.

(आ) स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हांला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रणपत्रिका पाठवायची आहे. शिक्षकांच्या मदतीने निमंत्रणपत्रिका तयार करा.
उत्तरः
अगत्यपूर्वक निमंत्रण
स्वातंत्र्यदिन समारंभ

महोदय,

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी, सकाळी ७.०० वाजता दिगंबर विदयालयाच्या मैदानात सर्व | विदयार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. नारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून आपली उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवेल.
कार्यक्रमांची रूपरेषा:

  • झेंडावंदन
  • राष्ट्रगीत गायन
  • देशभक्तिपर गीते
  • प्रमुख पाहुण्यांचे भाषण
  • आभार प्रदर्शन

:निमंत्रकः
दिगंबर विद्यालय
विदयार्थी मंडळ

(इ) तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघतक्ता खाली दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडास्पर्धेचा ओघतक्ता तयार करा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा 5
उत्तर:
Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा 3

वाचा.

बऱ्याचदा आपला असा समज होतो, की ज्यांना कार्यक्रमांत प्रत्यक्ष रंगमंचावर अथवा व्यासपीठावर संधी प्राप्त होते, त्यांच्याच गुणांचे संवर्धन होते, परंतु असे नाही. अशा कार्यक्रमांतून त्याचे नियोजन, रंगमंचाची मांडणी, साहित्यांची जमवाजमव अशा अनेक कामांतून व्यवस्थापन, नेपथ्य, सजावट, रंगभूषा अशा कलात्मक कार्याचा अनुभव घेऊन, आपण आपल्यातील सुप्त गुणांना संधी देऊ शकतो. चित्रकलेचे प्रदर्शन, क्रीडास्पर्धा, संगीत, नाट्य अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून आपण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात अवश्य सहभाग घेतला पाहिजे.

शिक्षकांसाठी : शाळेमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे, म्हणून त्यांना प्रोत्साहन दयावे.

Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा

आपण समजून घेऊया.

वाक्यातील क्रियापदाला ‘कोण’ असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते, तो शब्द त्या वाक्याचा ‘कर्ता’ असतो. वाक्यातील क्रियापदाला ‘काय’ असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते, तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील ‘कर्म’ होय.

• खालील वाक्ये वाचा.

(१) श्रीरंगने बासरी वाजवली.
(३) राजूने पतंग उडवला.
(२) सुगंधाने आंबे खाल्ले.
(४) मधूने पुस्तक वाचले.
वरील वाक्यांतील क्रियापदांना ‘कोण’ आणि ‘काय’ या शब्दांनी प्रश्न विचारूया.
Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा 6
उत्तरः

क्रियापद ‘कोण’ ने प्रश्न उत्तर (कर्ता) ‘काय’ ने प्रश्न उत्तर (कर्म)
वाजवली वाजवणारा कोण? श्रीरंग वाजवले ते काय? बासरी
खाल्ले खाणारी कोण? सुगंध खाल्ले ते काय? आंबे
उडवला उडवणारा कोण? राजू उडवले ते काय? पतंग
वाचले वाचणारी कोण ? मधू वाचले ते काय? पुस्तक

• पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा 7
उत्तर:

वाक्य कर्ता कर्म क्रियापद
i. तारा क्रिकेट खेळते. तारा क्रिकेट खेळते
ii. यास्मीन पुस्तक वाचते. यास्मीन पुस्तक वाचते
iii. पक्षी किलबिल करतात. पक्षी किलबिल करतात
iv. राजू अभ्यास करतो. राजू अभ्यास करतो
v. शबाना स्वयंपाक करते. शबाना स्वयंपाक करते
vi. जॉन व्यायाम करतो. जॉन व्यायाम करतो

विचार करून सांगूया.

परीक्षेची वेळ झाली होती. सीमाने सायकल काढली आणि ती निघाली. रोजच्यासारखी आज ती रमतगमत जात नव्हती. तिला वेळेच्या आत शाळेत पोहोचायचे होते. तेवढ्यात सायकल पंक्चर झाली. ओह…. आता काय करावे ? उशीर होऊन चालणार नाही. पेपरला वेळेवरच पोहोचायला पाहिजे. सीमाने काय केले असेल बरे?

शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांना वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखण्यास सांगून उपयोजनात्मक सराव करून घ्यावा.

Class 6 Marathi Balbharati Chapter 15 बालसभा Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

i. महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …….. निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. (जन्मदिन, पुण्यतिथी, स्मरणदिन)
उत्तर:
पुण्यतिथी

ii. डॉ. बाबासाहेब यांचे सर्वांत जवळचे मित्र म्हणजे. …….. (पुस्तके, महात्मा फुले, वर्तमानपत्रे)
उत्तर:
पुस्तके

iii. महात्मा फुले यांनी. ……. समाजाची स्थापना केली. (आर्य, प्रार्थना, सत्यशोधक)
उत्तर:
सत्यशोधक

iv. ऊर्मिला माने हिच्या ……… च्या शाळेतील मुलांनीदेखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. (पुणे, सोलापूर, दापोली)
उत्तर:
दापोली

प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. कोणत्या शाळेतील सहावीच्या विदयार्थ्यांनी बालसभा आयोजित केली ?
उत्तर:
पाळंदूर शाळेतील सहावीच्या विदयार्थ्यांनी बालसभा आयोजित केली.

ii. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय?
उत्तर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी होय.

iii. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दोन कॉलेजची स्थापना केली ?
उत्तर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली.

iv. विधवा विवाहास प्रोत्साहन कोणी दिले?
उत्तर:
महात्मा फुले यांनी विधवा विवाहास प्रोत्साहन दिले.

प्रश्न ३.
दोन-तीन ओळींत उत्तरे लिहा.

iv. ऊर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील बालसभेत कोणकोणते कार्यक्रम झाले?
उत्तर:
ऊर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील बालसभेत, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले गेले, नाटिका सादर करण्यात आल्या, तसेच त्यांच्या जीवनातील प्रसंगांचे तक्ते व बॅनर्स तयार केले गेले.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
‘घरोघरी’ यासारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा.

  1. पानोपानी
  2. दारोदारी
  3. देशोदेशी
  4. गल्लोगल्ली
  5. गावोगावी
  6. रस्तोरस्ती

प्रश्न २.
समानार्थी शब्द लिहा.

  1. पुण्यतिथी =
  2. शाळा =
  3. अभिवादन =
  4. संदेश =
  5. वडील =
  6. देश =

उत्तर:

  1. स्मरणदिन
  2. विदयालय
  3. वंदन
  4. निरोप
  5. जनक
  6. राष्ट्र

Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा

प्रश्न ३.
खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.

i. सूत्रसंचालन
उत्तर:
सूत्र, संचालन, चाल, सून, संत्र, नत्र.

ii. सत्यशोधक
उत्तर:
सत्य, शोधक, शोध, शोक, कस, धक.

प्रश्न ४.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

i. अहोरात्र झटणे –
उत्तर:
अर्थ दिवसरात्र मेहनत करणे.
वाक्य : स्त्रियांना शिक्षण घेता यावे म्हणून अनेक समाजसुधारक अहोरात्र झटले.

ii. प्रोत्साहन देणे –
उत्तर:
अर्थ प्रेरणा देणे.
वाक्य : पी.व्ही. सिंधू व साक्षी मलिक यांनी ऑलिंपिक पदक मिळवून अनेक खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.

iii. बारीक लक्ष असणे –
उत्तर:
अर्थ : काळजीपूर्वक लक्ष देणे.
वाक्य : खोडकर दिनूवर आजीचे बारीक लक्ष असते.

iv. संकल्प करणे –
उत्तर:
अर्थ निर्धार करणे.
वाक्य : सलीलने नववर्षापासून रोजनिशी लिहिण्याचा संकल्प केला.

प्रश्न ५.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. अर्पण करणे
  2. अभिवादन करणे
  3. दरवाजे खुले करणे
  4. न डगमगणे
  5. प्रेरित होणे
  6. भर घालणे
  7. भूमिका पार पाडणे
  8. विचारांचा पगडा असणे
  9. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे
  10. संपन्न करणे
  11. सवय जडणे
  12. हातभार लावणे.

उत्तर:

  1. आदरपूर्वक देणे.
  2. नमस्कार करणे.
  3. प्रवेश देणे.
  4. न घाबरणे.
  5. प्रेरणा मिळणे.
  6. अधिक जोडणे.
  7. दिलेले काम चोखपणे करणे.
  8. विचारांचा प्रभाव असणे.
  9. घरोघरी शिक्षणाचा प्रसार करणे.
  10. व्यवस्थित पार पडणे.
  11. सवय होणे.
  12. मदत करणे.

प्रश्न ६.
खालील वाक्यांतील संख्यावाचक विशेषण ओळखा आणि अधोरेखित करा.

  1. काही माणसे रस्ता चुकली.
  2. मराठीत चारच गुण कमी पडले.

उत्तर:

  1. काही माणसे रस्ता चुकली.
  2. मराठीत चारच गुण कमी पडले.

प्रश्न ७.
खालील वाक्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून पुन्हा लिहा.

i. धन्यवाद कुणाल आता आभार प्रदर्शन चंदर करेल
उत्तर:
धन्यवाद कुणाल ! आता आभार प्रदर्शन चंदर करेल.

ii. या बालसभैला मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो
उत्तर:
या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. ५९ वरील ‘वाचा’ अंतर्गत दिलेला उतारा वर्गात मोठ्याने वाचा.

प्रश्न २.
तुम्हांला हे आठवते का? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ५६)

अ. इयत्ता पाचवीमध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या ?
ब. त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता?
क. बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का?
ड. बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल, तर बालसभांची तयारी तुम्ही कशी केली होती?

लेखी कार्य

प्रश्न १.
हे करून पाहूया.

उपक्रम / प्रकल्प

प्रश्न १.
तुमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा वृत्तान्त लिहा.
(टीप : हा उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वत: करावा.)

Class 6 Marathi Balbharati Chapter 15 Question Answer बालसभा

बालसभा पाठाचा परिचय

प्रस्तुत पाठाची रचना विदयार्थ्यांना ‘बालसभा’ या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्याकरता करण्यात आली आहे. या बालसभेचे नियोजन, कामाचे स्वरूप, कामात विविधता कशी आणावी याबाबत मार्गदर्शन मिळून देण्याकरता ‘बालसभा’ या पाठाची योजना करण्यात आली आहे.

बालसभा शब्दार्थ

अभिवादन नमस्कार
अहोरात्र रात्र आणि दिवस
आयोजन व्यवस्था करणे
आस्था आवड, आपुलकी
उत्तुंग महाकाय, प्रचंड
कुशाग्र कसबी, प्रवीण
डगमगणे डळमळीत होणे, कचरणे
त्याग बलिदान, समर्पण
तळमळ आपुलकी, आस्था
नियोजन अखणी, पूर्व योजना करणे
पगडा प्रभाव
प्रतिमा छायाचित्र
रमणे मग्न होणे
वतीने बाजूने, तर्फे
विकास प्रगती
व्यासंगी अभ्यासू
वृंद समूह
शालाबाह्य शाळेच्या बाहेरील
स्थानापन्न आसनस्थ, जागेवर बसणे
संकल्प निर्धार, निश्चय


बालसभा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

अर्पण करणे. (एखादी वस्तू) आदरपूर्वक देणे.
अभिवादन करणे. नमस्कार करणे.
अहोरात्र झटणे. दिवसरात्र मेहनत करणे.
दरवाजे खुले करणे. प्रवेश देणे.
न डगमगणे. न घाबरणे.
प्रेरित होणे. प्रेरणा मिळणे.
प्रोत्साहन देणे. प्रेरणा देणे.
बारीक लक्ष असणे. काळजीपूर्वक लक्ष देणे.
भर घालणे. अधिक जोडणे.
भूमिका पार पाडणे. दिलेले काम चोखपणे करणे.
विचारांचा पगडा असणे. विचारांचा प्रभाव असणे.
शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे. घरोघरी (सर्वत्र) शिक्षणाचा प्रसार करणे.
संकल्प करणे. निर्धार करणे.
संपन्न होणे. व्यवस्थित पार पडणे.
सवय जडणे. सवय होणे.
हातभार लावणे. मदत करणे.


बालसभा टिपा

कवी विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध कवी, लेखक.
दीपस्तंभ समुद्रात रात्रीच्या वेळेस दिशा दर्शवण्यासाठी उभारलेला प्रकाशस्तंभ (खांब).
पुण्यतिथी स्मरणदिन, मृत्यू दिन.
सूत्रसंचालन कार्यक्रमाचे प्रसंगानुरूप सुसूत्र निवेदन.

Leave a Comment