Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 16 Question Answer सफर मेट्रोची for exam preparation.
Std 6 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer सफर मेट्रोची
Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 16 सफर मेट्रोची
सफर मेट्रोची Question Answer
प्रश्न १.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: प्रस्तावना खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः क्रांती गोडबोले – पाटील यांच्या ‘सफर मेट्रोची’ या पाठात मेट्रोच्या पहिल्या महिला पायलट रुपाली चव्हाण यांची मुलाखत दिली आहे.)
(अ) मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते?
उत्तरः
मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते व अवघड चाचणी परीक्षा पास व्हावे लागते. त्यानंतर उमेदवारांची मानसिक व शारीरिक चाचणी होते. या सर्व चाचण्या पास झाल्यावर मुलाखत घेतली जाते. मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवाराला मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या सर्व टप्यांतून पार पडल्यावरच मेट्रो पायलट बनता येते.
(आ) पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मन:स्थिती कशी झाली होती ?
उत्तर:
पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीच्या मनात थोडी भीती होती, कारण पहिली मेट्रो चालवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी तिच्यावर होती. त्यामुळे, आपण सर्वांना व्यवस्थित घेऊन जाऊ की नाही? अशी तिला भीती वाटत होती; परंतु तिने मेट्रो चालवायला सुरुवात करताच तिची भीती क्षणात पळून गेली व ती आत्मविश्वासाने मेट्रो चालवू लागली.
(इ) मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता?
उत्तर:
पहिल्यांदा धावणाऱ्या मेट्रोची, रुपाली ही पहिली महिला पायलट होती. या उद्घाटनास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया व रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती. या सर्वांना मेट्रोने घेऊन जाण्याची जबाबदारी रुपालीवर होती, म्हणूनच मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता.
प्रश्न २.
मेट्रोबाबत पुढील मुद्दयांवर थोडक्यात माहिती लिहा.
(अ) केबिनः
(आ) कॅमेरे
(इ) मेट्रोचा प्रवास
(ई) जिने
(उ) दरवाजे
(ऊ) प्रवासी संख्या
(ए) इंजिन
(ऐ) तिकीट
उत्तर:
(अ) केबिनः मेट्रोमध्ये पायलटसाठी बंद केबिन असते. या केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते. केबिनमध्ये इंजिन असल्याने असे केबिन मेट्रोच्या दोन्ही बाजूंस असतात.
(आ) कॅमेरे: मेट्रोच्या डब्यांमध्ये व स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सी. सी. टिव्ही कॅमेरे लावलेले असतात.
(इ) मेट्रोचा प्रवास: अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याने मेट्रोचा प्रवास आनंददायी व सुखकारक आहे. पावसाळ्यात उड्डाण पुलावरून जाणाऱ्या मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत असल्याचा अनुभव येतो व बोगद्यातून जाताना जणू काही जगाशी संबंध तुटतो. मेट्रोने प्रवास करताना मेट्रोचे तिकीट म्हणजे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते. मेट्रोच्या सोईमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत.
(ई) जिने : मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी व उतरण्यासाठी स्वयंचलित सरकते जिने असतात.
(उ) दरवाजे: मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात, तर बंद होताना मात्र ते पायलटला आपल्या केबिनमधून बंद करावे लागतात.
(ऊ) प्रवासी संख्या: मेट्रोमध्ये एका वेळी साधारणत: पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात.
(ए) इंजिन: लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूंस इंजिन असते. हे इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते व त्यातच मेट्रो चालवण्याची संपूर्ण यंत्रणा बसवलेली असते.
(ऐ) तिकीट: मेट्रोचे तिकीट म्हणजे टोकन. तसेच रोज प्रवास करण्यासाठी प्रीपेड कार्डही मिळते. या कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपतात. ते संपल्यावर पुन्हा पैसे भरून कार्ड वापरता येते. हे टोकन किंवा कार्ड मशीनवर ठेवल्यावरच मेट्रो स्टेशनचे दरवाजे उघडतात व प्लॅटफॉर्मवर जाता येते.
प्रश्न ३.
खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर:
प्रश्न ४.
मेट्रो तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा. मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा.
उत्तर:
मी मेट्रो बोलते आहे…!
अरे मुलांनो, असे आश्चर्याने काय पाहताय ? मी मेट्रो ! तुमच्या लोकल ट्रेनसारखी दिसते; परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानातून माझा आविष्कार झाला आहे. आज तुम्हांला माझ्यातून प्रवास करताना झालेला आनंद पाहून मीही खूश आहे. मुळात प्रवास सुखकारक व आनंदी व्हावा यासाठीच तर माझी सर्व रचना करण्यात आली आहे!
सरकते जिने, तिकिटांची टोकन पद्धत, आधुनिक इंजिन, वातानुकूलित डबे, उघडबंद होणारे दरवाजे, डब्यात, स्टेशनवरील सी.सी.टिव्ही कॅमेरे या सगळ्यांचे सर्वांना नवल वाटत आहे व या सोईंमुळेच प्रवासी सुखाने प्रवास करत आहेत. वेगाने उड्डाण पुलावरून धावताना तर मला ढगात तरंगल्याचा भास होतो.
तुमचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी मी सदैव तत्पर असेन.
प्रश्न ५.
तुम्हांला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल? का ते सांगा.
प्रश्न ६.
तुमच्या परिसरातील रिक्षाचालक, एस. टी. चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्न तयार करा.
उत्तर:
रिक्षाचालक, एस.टी चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रश्न:
- तुम्ही किती वर्षांपासून रिक्षा / एस.टी. चालवता?
- तुम्ही सर्वप्रथम रिक्षा / एस. टी. कधी चालवली?
- दिवसातील किती वेळ तुम्हांला गाडी चालवावी लागते?
- गाडी चालवण्याचे प्रशिक्षण किती दिवसांचे असते?
- प्रशिक्षण सोडून वाहन-चालवण्यास कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?
- पावसाळ्यात गाडी चालवताना कोणत्या अडचणी येतात?
- अपघातांचे प्रमाण वाढत आहे, तुम्ही तुमचे वाहन सुरक्षितपणे चालवण्यासाठी कोणती काळजी घेता?
- प्रवाशांसोबत आलेल्या अनुभवांपैकी एखादा अनुभव सांगू शकाल का? रिक्षाचालकास
- रिक्षा तुमची स्वत:ची आहे का? असल्यास तिच्या देखभालीसाठी दरमहा किती खर्च येतो?
- भाड्याने चालवत असल्यास, दरमहा किती भाडे दयावे लागते?
- रिक्षा चालवताना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? एस. टी. बस चालकास
- एस. टी. बस दिवसरात्र चालू असतात का?
- एस. टी बसने आधुनिक बस सेवा सुरू केल्या आहेत त्यात कोणकोणत्या सुविधा असतात?
नवीन काही शोधूया.
(अ) आंतरजालाचा वापर करून भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते याची माहिती घ्या व त्या ठिकाणांची यादी तयार करा.
उत्तर:
भारतात खालील सहा शहरांत मेट्रो सुविधा उपलब्ध आहे:
- दिल्ली
- कोलकाता
- बंगळुरू (बँग्लोर)
- मुंबई
- जयपूर
- चेन्नई
(आ) वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा.
(इ) महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रांत नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व क्षेत्रांची यादी करा.
(टीप: वरील उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
आपण समजून घेऊया
• पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा.
वरील वाक्यांच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की १, २, ३ क्रमांकांच्या वाक्यांत कर्म आहे व ४, ५, ६ क्रमांकांच्या वाक्यांत कर्म नाही.
ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, ती ‘सकर्मक’ क्रियापदे होय.
ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, ती अकर्मक क्रियापदे होय.
उत्तर:
वाक्य | कर्ता | कर्म | क्रियापद |
i. तेजवंत फुटबॉल खेळतो. | तेजवंत | फुटबॉल | खेळतो |
ii. शिक्षक कविता गातात. | शिक्षक | कविता | गातात |
iii. निशा निबंध लिहिते. | निशा | निबंध | लिहिते |
iv. जोसेफ रस्त्यात पडला. | जोसेफ | – | पडला |
v. दादा घरी आला. | दादा | – | आला |
vi. सुरेश उद्या पुण्याला जाईल. | सुरेश | – | जाईल |
सारे हसूया.
बंड्या आपल्या मामाकडे आला होता. दिवसभर त्याच्या उचापती चालायच्या. प्रारंभी मामांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्याचा वाह्यातपणा फारच वाढू लागला. तेव्हा एके दिवशी त्याला समोर बसवून मामांनी भरपूर उपदेश दिला.
वागणुकीसंबंधीचे दहा नियमच त्यांनी बंड्याला घालून दिले अन् शेवटी म्हणाले, “या दहा नियमांपैकी एक जरी नियम तू मोडलास तर काय होईल ठाऊक आहे?”
“नऊ उरतील.” बंड्या पटकन म्हणाला.
शिक्षकांसाठी : क्रियापदांच्या विविध प्रकारांची उदाहरणे देऊन विदयार्थ्यांकडून उपयोजनात्मक सराव करून घ्यावा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 16 सफर मेट्रोची Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
i. …… या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या. (संगीता चव्हाण, रुपाली चव्हाण, स्वाती पाटील)
उत्तर:
रुपाली चव्हाण
ii. मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी ……. व्हावे लागते. (इंजिनियर, ड्रायव्हर, तंत्रज्ञ)
उत्तर:
इंजिनियर
iii. उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो …….. स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली. (वर्सोवा, कुलाबा, अंधेरी)
उत्तर:
वर्सोवा
iv. मेट्रोत एकावेळी साधारणतः …….. प्रवासी प्रवास करू शकतात. (अठराशे, पंधराशे, सोळाशे)
उत्तर:
पंधराशे
प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. रुपाली चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या महाविदयालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले?
उत्तर:
रुपाली चव्हाण यांनी सिंधुदुर्ग प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविदयालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
ii. मेट्रोमध्ये किती पायलट असतात ?
उत्तर:
मेट्रोमध्ये एक पायलट असतो.
iii. मेट्रोला किती डबे असतात ?
उत्तर:
मेट्रोला चार डबे असतात..
iv. मेट्रो किती वेळ सुरू असते ?
उत्तर:
मेट्रो सकाळी ५.२० वाजल्यापासून ते रात्री १२.०० वाजेपर्यंत सुरू असते.
प्रश्न ३.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: प्रस्तावना खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः क्रांती गोडबोले – पाटील यांच्या ‘सफर मेट्रोची’ या पाठात मेट्रोच्या पहिल्या महिला पायलट रुपाली चव्हाण यांची मुलाखत दिली आहे.)
i. मेट्रोने कोणीही विनातिकीट प्रवास का करू शकत नाही ?
उत्तर:
मेट्रोने प्रवास करतेवेळी मेट्रोचे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते. हे टोकन टाकल्यावर किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रो स्टेशनचे दरवाजे उघडतात व प्लॅटफॉर्मवर जाता येते, म्हणूनच मेट्रोने कोणीही विनातिकीट प्रवास करू शकत नाही.
ii. रुपालीने मेट्रोचे वेगळेपण काय सांगितले?
उत्तर:
मेट्रोचे वेगळेपण सांगताना रुपालीने माहिती दिली, की मेट्रोचे डबे हे स्टेनलेस स्टीलने बनवलेले असतात. विशेष म्हणजे हे ड़बे वातानुकूलित असतात. डब्यांमध्ये व स्टेशनवर सी. सी. टिव्ही कॅमेरे असतात. मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात मात्र ते बंद करण्याचे काम पायलट आपल्या केबिनमधील यंत्रणा वापरून करतो. अशाप्रकारे, मेट्रोचे तंत्रज्ञान हे अत्याधुनिक आहे.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
‘धाकधूक’ सारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा.
उत्तर:
- चूकभूल
- ठीकठाक
- खाडाखोड
- दशदिशा
- नाजूकसाजूक
- काळाकुट्ट
प्रश्न २.
समानार्थी शब्द लिहा.
- दिवस =
- जग =
- साम्य =
- अवघड =
- ढग =
उत्तर:
- दिन
- विश्व
- साधर्म्य
- कठीण
- नभ, आकाश
प्रश्न ३.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
i. उघड ×
उत्तर:
बंद
ii. अविस्मरणीय ×
उत्तर:
विस्मरणीय
iii. अत्याधुनिक ×
उत्तर:
अप्रगत, मागास
iv. सुखकारक ×
उत्तर:
दुःखदायक
प्रश्न ४.
दिलेल्या शब्दांत लपलेले शब्द शोधा.
- घाटकोपर
- पायलट
उत्तर:
- घाट, कोपर, कोट, कोप, घार, कोर, पर, टर, रट, पट.
- पाय, पाल, पाट, टपाल, लट.
प्रश्न ५.
खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
i. मान्यता मिळणे
उत्तर:
शासनाकडून नवीन विद्यापीठास मान्यता मिळाली.
ii. झुंबड उडणे
उत्तरः
शाळेमध्ये भरलेल्या आनंद मेळाव्यास विदयार्थ्यांची झुंबड उडाली.
iii. धाकधूक होणे
उत्तर:
निकालाचा दिवस उजाडताच अन्वरला धाकधूक होऊ लागली.
प्रश्न ७.
पुढील वाक्यांतील सकर्मक व अकर्मक क्रियापदे ओळखा.
- बोका छपरावर चढला.
- सतीशने आंबे आणले.
- सुधा फणसाची भाजी छान करते.
- मोर पाऊस पडल्यावर नाचतात.
- सुमेधने आईसाठी साडी आणली.
- उमा पलंगावर पडली.
उत्तर:
- अकर्मक क्रियापद
- सकर्मक क्रियापद
- सकर्मक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
- सकर्मक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
प्रश्न ८.
चुकीची विरामचिन्हे ओळखून वाक्य दुरुस्त करून लिहा.
i. तो म्हणाला; मी जातो?
उत्तर:
तो म्हणाला, “मी जातो.”
ii. “वाह” काय चांगली गाडी आहे:
उत्तर:
वाह! काय चांगली गाडी आहे.
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न १.
तुमचा रेल्वे प्रवासाचा एखादा अनुभव सांगा.
उत्तर:
आम्ही पुण्याला रेल्वे गाडीने गेलो होतो तो माझा रेल्वे प्रवासाचा पहिला अनुभव होता. ट्रेन निघण्याआधी सर्व प्रवाशांची आपापली जागा शोधण्याची लगबग सुरू होती. आम्हीही आपल्या जागेवर बसलो. गाडी धावू लागली तसे मला आजूबाजूचा धावणारा निसर्ग बघण्याची गंमत वाटू लागली. ट्रेनमधील छोटेसे कँटिन पाहून तर मला नवलच वाटले. चवीचे खाऊन, शेजारी प्रवाशांसोबत गप्पा मारून आम्ही या प्रवासात खूप मज्जा केली.
लेखी कार्य
प्रश्न १.
खालील तक्त्यात दिलेल्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांची नावे लिहा. (पाठ्यपुस्तकं पृष्ठ क्र. ६१)
उत्तर:
सफर मेट्रोची पाठाचा परिचय
विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकविध शोधांपैकी ‘मेट्रो’ या वाहतुकीच्या जलद व सहज-सोप्या वाहनाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न या पाठाद्वारे करण्यात आला आहे. मेट्रो चालवणारी पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवादरूपाने या पाठात करून देण्यात आला आहे.
सफर मेट्रोची शब्दार्थ
अजब | विलक्षण |
अविस्मरणीय | विसरता न येण्यासारखे, कायम आठवणीत राहणारे |
आवर्जून | नक्की |
प्रशिक्षण | उपयोजित शिक्षण |
बिनधास्त | न घाबरता |
यंत्रणा | व्यवस्था |
सफर | प्रवास |
साम्य | सारखेपणा, साधर्म्य |
सारथी | चालक |
सफर मेट्रोची वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
झुंबड उडणे. | गर्दी होणे. |
मान्यता मिळणे. | परवानगी मिळणे. |
धाकधूक होणे. | भीती वाटणे. |
सफर मेट्रोची टिपा
कारशेड | रेल्वे गाड्यांचे विसाव्याचे ठिकाण. |
सी.सी. टिव्ही. | ठरावीक भागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बसवलेली कॅमेरा यंत्रणा. |
टोकन | मेट्रोचे तिकीट. |
तंत्रज्ञान | यंत्रांपासून बनलेल्या प्रणाली व त्यांचे उपयोजन. |
प्रीपेड कार्ड | आधीच (सेवेचे) पैसे भरून मिळालेले कार्ड. |
मीडिया | वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी (टिव्ही) व इतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी. |
युग | हजारो वर्षांचा काळ |
वर्सोवा, घाटकोपर | मुंबईतील उपनगरे. |
सिंधुदुर्ग | कोकणातील एक जिल्हा. |