Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 17 Question Answer दुखणं बोटभर for exam preparation.
Std 6 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer दुखणं बोटभर
Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 17 दुखणं बोटभर
दुखणं बोटभर Question Answer
प्रश्न १.
चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: ‘दुखणं बोटभर’ या डॉ. चित्रा सोहनी यांच्या पाठात त्यांनी आपल्या बोटास झालेल्या दुखापतीचे वर्णन विनोदाचा वापर करून खुमासदार शैलीत केले आहे.)
(अ) लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले?
उत्तर:
कुठलातरी कडक गूळ बत्त्याने ठेचताना व गप्पा मारताना एक घाव उजव्या हाताच्या बोटावर बसल्याने लेखिकेच्या बोटास दुखापत झाली. घाव बसताच वेदनेने लेखिकेने बोट तोंडात घातले. सुरुवातीस लेखिकेने बोटास मलम लावले, गरम पाण्याने शेकले; पण कशानेच आराम मिळेना तेव्हा, भाच्याचा सल्ला ऐकून लेखिका डॉक्टरांकडे गेली.
(आ) ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे?
उत्तर:
सुरुवातीस लेखिकेचे बोट ठसठसू लागले तेव्हा जाहिरातीत पाहिल्याप्रमाणे लेखिकेने मलम लावून पाहिले; पण बोट कामासाठी वळले नाही, उलट मानी माणसाप्रमाणे ताठले. लेखिकेने गरम पाण्यानेही शेकून पाहिले तर बोटाने ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा मराठी बाणा दाखवला व रागाने हुप्प होऊन फुगून बसले, म्हणजेच टम्म फुगले. बोटाला मस्का मारण्यासाठी लेखिकेने तेलमालीशही केले; पण त्यानेही बोटावर परिणाम झाला नाही, ते ‘टस ते मस’ झाले नाही. अशाप्रकारे विनोदी शैलीत लेखिकेने आपल्या ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन केले आहे.
(इ) बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला ?
उत्तर:
लेखिकेच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी बोटाला स्ट्रपिंग केले. त्यामुळे, लेखिकेचा हात अक्षरशः बांधला गेला. त्यामुळे, त्यांना कामावरून रजा घेऊन घरी बसावे लागले. त्यांनी डाव्या हाताने काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे काहीच नीट जमेना.
प्रश्न २.
का ते लिहा.
(अ) लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली.
उत्तर:
लेखिकेच्या बोटास झालेल्या दुखापतीमुळे, तीन महिने बोटावर चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यांमुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली.
(आ) लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली.
उत्तर:
बोटास दुखापत झाल्यानंतर लेखिकेने अनेक घरगुती उपाय करून पाहिले; परंतु कशानेच दुखणे कमी होईना. शेवटी भाच्याचा ‘हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड’ हा सल्ला ऐकून लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली.
(इ) दवाख्यान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला.
उत्तर:
दवाखान्यात गेल्यावर लेखिकेने पाहिले की कोणाचा पाय प्लास्टरमध्ये आहे, कोणी कुबड्याधारी आहे, तर कोणाचा हात गळ्यात बांच्नलेला आहे. लोकांची अशी अवस्था पाहून लेखिकेच्या पोटात गोळा आला.
(ई) दवाखान्यातून, लेखिका जड अंतःकरणाने घरी परतली.
उत्तरः
दवाखान्यात डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटास स्ट्रॅपिंग केले. यामुळे, लेखिकेचे एकच बोट नव्हे, तर बाजूची दोन बोटेही ताणून बांधल्याने हात जड झाला व या सर्व खर्चामुळे पर्स हलकी झाली. त्यामुळे, लेखिका दवाखान्यातून जड अंतःकरणाने घरी परतली.
(उ) लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे.
उत्तर:
बोटाच्या दुखण्याने लेखिका कोणतीही कामे करू शकत नव्हती. त्यामुळे, आपल्याकडे ‘प्रभाते करदर्शनम्’ करण्याची प्रथा का पडली असावी हे लेखिकेला समजून चुकले, म्हणून आता बोटाचे महत्त्व समजले आहे असे लेखिका म्हणते.
प्रश्न ३.
तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली, तर तुम्ही त्याला कशी मदत कराल?
उत्तर:
माझ्या वर्गमित्राला दुखापत झाल्यास सर्वप्रथम मी त्याच्यावर प्रथमोपचार करेन. शिक्षकांनाही कळवेन. त्याची जखम स्वच्छ धुऊन त्यावर मलमपट्टी करेन. मुका मार असल्यास औषध लावून बँडेज करेन व शिक्षकांच्या साहाय्याने लवकरात लवकर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाईन, त्याच्या पालकांनाही कळवेन.
प्रश्न ४.
पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा.
उत्तर:
- बत्त्याने उजव्या बोटावर घाव बसणे.
- लोकांच्या वायफळ चर्चा, तीन महिने खर्च.
- जाहिरात पाहून बोटास मलम लावणे.
- गरम पाण्याने शेकणे.
- बोटास तेलमालीश करून पाहणे.
- भाच्याने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देणे.
- दवाखान्यात जाऊन बोटाची तपासणी करणे.
- डॉक्टरांनी बोटास स्टॅपिंग करणे.
- डाव्या हाताने काहीच काम करता न येणे.
- कामावर रजा टाकून घरी बसणे.
- बोट न वळणे.
- चेंडू वळणे, कागदाचे घट्ट बोळे करणे इत्यादी व्यायाम करणे.
- बोट हळूहळू बरे होणे.
- बोटाचे महत्त्व समजणे.
प्रश्न ५.
दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा-बारा ओळी लिहा.
उत्तर:
आई गं! खूप दुखतंय रे मला! आणि अर्थात माझ्यामुळे तुलाही रडू येतंय. असा नवलाने पाहतोस काय… मीच तुझं इजा झालेलं बोट. डॉक्टरांनी औषध लावलंय खरं; पण त्याने आराम पडायलाही वेळ लागेल. तोपर्यंत आपल्याला सहन करावंच लागेल. काय रंगात आलेली क्रिकेटची मॅच ! तू विकेट किपिंगही छान करत होतास; पण नेहमीसारखा हातमोजे (ग्लोव्हज) घालायला कंटाळा केलास! परिणामी चेंडूच्या फटक्याने मी जायबंदी झालो ! तरी आई सकाळी निघतानाच म्हणाली होती, हातमोजे घेऊन जा! आता वाटतंय ना? आईचं ऐकलं असतं, तर बरं झालं असतं! आता इथून पुढे आपण काळजी घेऊया! वेळेवर औषधं घे आणि आराम कर. मग बघ मी कसा लवकर बरा होतो!
प्रश्न ६.
तुम्हांला ठेच लागून जखम झाली तर… काय कराल ते लिहा.
उत्तर:
शाळेत किंवा घरी असताना ठेच लागल्यास मी प्रथमोपचाराच्या पेटीतील साहित्य वापरून तात्पुरती मलमपट्टी करेन. आई- बाबांना सांगून डॉक्टरांकडे जाईन. बाहेर रस्त्यावरून जाताना ठेच लागल्यास माझ्या दप्तरात ठेवलेले बँडेज लावेन किंवा जवळपास औषधांचे दुकान असल्यास तेथून घेईन. काहीच उपलब्ध नसल्यास जखमेस धूळ माती लागू नये म्हणून रुमालाने बांधेन. मोठी जखम किंवा मुकामार असल्यास डॉक्टरांकडे जाईन.
खेळूया शब्दांशी
(अ) खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा.
(अ) वहिनी =
(आ) कथा =
(इ) आघात =
(ई) ललाट =
(उ) त्रास
(ऊ) सकाळ =
(ए) नवल =
(ऐ) तोरा =
(ओ) हात =
उत्तर:
(अ) भावजय
(आ) कहाणी
(इ) घाव
(ई) कपाळ
(उ) हैराण
(ऊ) प्रभात
(ए) आश्चर्य
(ऐ) ताठा
(ओ) कर
(आ) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) गरम ×
(आ) घट्ट ×
(इ) उजवा ×
(ई) दुर्लक्ष ×
उत्तर:
(अ) थंड
(आ) सैल
(इ) डावा
(ई) लक्ष
(इ) वाक्यात उपयोग करा.
(अ) वायफळ चर्चा –
(आ) बट्ट्याबोळ –
(इ) ठसठसणे –
(ई) हत्तीच्या पावलांनी येणे –
(उ) बाळबोध –
(ऊ) मुंगीच्या पावलांनी जाणे –
(ए) जड अंत:करण –
(ऐ) जायबंदी –
उत्तर:
(अ) वायफळ चर्चा : दिनकररावांना कामाच्या ठिकाणी वायफळ चर्चा आवडत नाही.
(आ) बट्ट्याबोळ : अचानक आलेल्या पावसाने मैदानातील सांस्कृतिक कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला.
(इ) ठसठसणे : चिनूच्या पायाची जखम ठसठसत होती.
(ई) हत्तीच्या पावलांनी येणे : सुभानरावांवर संकटे आली ती हत्तीच्या पावलांनी!
(उ) बाळबोध : उमाला नेहमीच बाळबोध प्रश्न पडतात.
(ऊ) मुंगीच्या पावलांनी जाणे : सीमाचा ताप मुंगीच्या पावलांनी जात होता.
(ए) जड अंत:करण : युद्धावर निघालेल्या आपल्या सैनिक मुलास आईने जड अंत:करणाने निरोप दिला.
(ऐ) जायबंदी : बैलाने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे कैलासराव जायबंदी झाले.
(ई) ‘हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड’ यासारखे यमक जुळवून खालील वाक्ये लिहा.
(अ) त्याचा खिसा गरम, ………
(आ) मोडेन पण वाकणार नाही, ……..
(इ) बोटभर दुखणं, ……
(ई) मनावरचा उतरला ताण, ……..
उत्तर:
(अ) त्याचा खिसा गरम, ज्याच्या अंगी श्रम!
(आ) मोडेन पण वाकणार नाही, पडेन पण झुकणार नाही.
(इ) बोटभर दुखणं, मणभर सलणं.
(ई) मनावरचा उतरला ताण, समस्यांची, चिंतांची उडवली दाणादाण.
(उ) ‘हाडबिड’ यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा.
उत्तर:
- पाठपोट
- हातबित
- तोंडबिंड
- डोळाबिळा
- केसबिस
- नखंबिखं
- नाकबिक
- कानबिन
(ऊ) गप्प, हुप्प, टम्म, यांसारखी जोडाक्षरे लिहा.
उत्तर:
- खुट्ट
- ठप्प
- मठ्ठ
- लठ्ठ
- घट्ट
(ए) आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.
(अ) मात्र
(आ) बत्ता
(इ) पळ
(ई) गर्दी
(उ) साड़ी
उत्तर:
(अ) मात्र
(आ) बत्ता
(इ) पळ
(ई) गर्दी
(उ) साड़ी
(ऐ) ‘बोट’ याप्रमाणे ‘हात’ व ‘पोट’ यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा.
उत्तर:
(ओ) हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दांत हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या.
हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत.
शोध घेऊया.
(अ) या पाठातील विनोदी वाक्ये शोधून लिहा.
उत्तर:
पाठातील विनोदी वाक्ये!
- आता दहा हात साडीही नीट न पुरणाऱ्या बाई, बोटभर चिंधीचं काय करणार होत्या ?
- तो घाव ‘वर्मी’ बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं.
- कुणाचे हात गळ्यात (म्हणजे स्वत:चे हात स्वत:च्या गळ्यात)
- जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंत:करणानं घरी परतले.
- आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं?
- ‘रॅपिंग’ असा सोपा शब्द सोडून ‘स्ट्रॅपिंग’ असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे.
- आणखी थोड्या गोळ्यांची फैर झडली…
- पण अजूनही मी (कोणाच्याही नावानं) बोटं मोडू शकत नाही.
(आ) या पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा.
उत्तर:
(इ) हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा.
उत्तर:
- हत्ती गेला, शेपूट राहिले.
- नाकापेक्षा मोती जड.
- चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला.
- असून अडचण नसून खोळंबा.
- आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.
- आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास
• पुढील वाक्यांतील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा.
१. आई भाकरी करते. _______
२. गणेश रस्त्यात पडला. _______
३. उद्या दिवाळी आहे. _______
४. अनुराधा पत्र लिहिते. _______
५. सुरेखाचे डोके दुखते. _______
६. गाई झाडाखाली बसल्या. _______
उत्तर:
१. सकर्मक
२. अकर्मक
३. अकर्मक
४. सकर्मक
५. सकर्मक
६. अकर्मक
• खालील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा.
(१) क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
(२) मीना पुस्तक वाचत आहे.
(३) सरिताने सर्व अभ्यास करून आणला.
वरील वाक्यांमध्ये एकाच वाक्यात दोन क्रिया दिसतात. त्यांतील एक क्रिया वगळली तर वाक्य पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही. इतकेच नाही तर काळही कळत नाही, म्हणून वाक्यांमध्ये क्रिया कळण्यासाठी दोन क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात, म्हणजेच जोड क्रियापद वापरावे लागते. अशी जोड क्रियापदे म्हणजे ‘संयुक्त क्रियापदे’ होय.
वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेले खेळू हे धातुसाधित (कृदन्त) आहे, तर ‘खेळ’ ही मूळ क्रिया किंवा धातू आहे.
Class 6 Marathi Balbharati Chapter 17 दुखणं बोटभर Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(डावखोरी, क्षुल्लक, करदर्शनम्)
i. ‘बोटभर’ हा शब्द अगदी छोटंसं, ……….. या अर्थी वापरला जातो.
उत्तर:
क्षुल्लक
ii. तू ……… नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं ?
उत्तर:
डावखोरी
iii. आपल्याकडे ‘प्रभाते …… करण्याची प्रथा का पडली असावी, हे समजून चुकलं आहे.
उत्तर:
करदर्शनम्
प्रश्न २.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
i. ‘ हा नाद सोड. डॉक्टरांचा फोन जोड’
उत्तर:
असे लेखिकेचा भाचा लेखिकेस म्हणाला.
ii. ‘प्लास्टरसुद्धा नकोय. नुसतं स्ट्रॅपिंग करायचं.’
उत्तर:
असे डॉक्टर लेखिकेस म्हणाले.
प्रश्न ३.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. बोट ठसठसायला लागल्यावर लेखिकेला कोणती जाहिरात आठवली ?
उत्तर:
बोट ठसठसायला लागल्यावर लेखिकेस एका मलमाची, ‘मलम मलिए, काम पे चलिए’ ही जाहिरात आठवली.
ii. लेखिकेस डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला कोणी दिला?
उत्तर:
लेखिकेस डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला लेखिकेच्या भाच्याने दिला.
iii. लेखिकेस हात चोळत गप्प का बसावे लागले ?
उत्तर:
लेखिकेस डाव्या हाताने विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे असे काहीच काम करता न आल्याने हात चोळत गप्प बसावे लागले.
iv. लेखिकेस बोट वळण्यासाठी स्ट्रॅपिंगनंतर कोणते व्यायाम करावे लागले ?
उत्तर:
लेखिकेस बोट वळण्यासाठी स्ट्रॅपिंगनंतर चेंडू वळणे, कागदाचे घट्ट बोळे करणे असे व्यायाम करावे लागले.
प्रश्न ४.
चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: ‘दुखणं बोटभर’ या डॉ. चित्रा सोहनी यांच्या पाठात त्यांनी आपल्या बोटास झालेल्या दुखापतीचे वर्णन विनोदाचा वापर करून खुमासदार शैलीत केले आहे.)
i. लेखिका दवाखान्यात गेल्यावर काय झाले?
उत्तर:
लेखिका दवाखान्यात गेली तेव्हा तिथे खूप गर्दी होती. कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात पाहून लेखिकेच्या पोटात गोळा आला व तिला तिथून पळ काढावा असे वाटत होते; परंतु असह्य वेदनेमुळे डॉक्टरांना भेटणे भाग होते. बोटाची तपासणी, क्ष- किरणांनी फोटो वगैरे झाल्यावर डॉक्टरांनी लेखिकेच्या बोटास स्ट्रपिंग केले आणि लेखिकेचे दुखरे बोट व बाजूची दोन बोटेही ताणून बांधून हात लेखिकेच्या गळ्यात अडकवला.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- कडक ×
- उशिरा ×
- जड ×
- सूज्ञ ×
उत्तर:
- नरम
- लवकर
- हलके
- अविचारी, अज्ञ
प्रश्न २.
खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे ओळखा.
- बाळ आज रांगू लागले.
- सोहम बाजारात गेला.
- मांजर दूध पिऊ लागले.
- मुलांनी फुले तोडून आणली.
- आजीने स्वयंपाक केला.
उत्तर:
संयुक्त क्रियापदे :
- रांगू लागले.
- पिऊ लागले.
- तोडून आणली.
प्रश्न ३.
खालील धातूंपासून धातुसाधित तयार करा.
- पळ
- चाल
- दाखव
- जा
- भेट
- ਤਰ
उत्तर:
- पळून
- चालून
- दाखवून
- जाऊ
- भेटून
- उठून
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
या मुलाची अवस्था अशी का झाली असेल? विचार करा. या मुलाची अशी अवस्था होण्यामागची कारणे सांगा. चर्चा करा. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६५)
प्रश्न २.
तुमच्या हाताला जखम झाली, तर रोजची कामे तुम्ही कशी कराल ? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६५)
उपक्रम /प्रकल्प
प्रश्न १.
तुमच्या वर्गासाठी प्रथमोपचार पेटी तयार करायची आहे. त्यात ठेवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करा.
प्रश्न २.
शरीराच्या अवयवाच्या नावावरून असलेल्या म्हणींची यादी तयार करा.
(टीप: वरील उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
दुखणं बोटभर पाठाचा परिचय
‘दुखणं बोटभर’ या पाठात लेखिका ‘बोटभर’ म्हणजेच अतिशय क्षुल्लक दुखण्याने किती आणि कशा हैराण होतात याचे मजेशीर वर्णन करण्यात आले आहे. बोट आणि हात या अवयवांवर आधारित शब्दसमूह, वाक्प्रचार, शब्दांच्या छटा, गमती, शाब्दिक विनोद या पाठाची लज्जत वाढवतात.
दुखणं बोटभर शब्दार्थ
अलौकिक | जगावेगळा, असामान्य |
आलबेल | नीट, व्यवस्थित |
अंतःकरण | मन |
अंमळ | जरासा |
खुशाली | खबरबात |
गिळंकृत | गिळणे |
डावखोरी | डाव्या हाताने लिहिणारी |
चिंधी | जुन्या फाटक्या कापडाचा तुकडा |
त्वेष | आवेश |
नामक | नावाचे |
प्रथा | रीत, पद्धत |
बाळबोध | लहान मुलांप्रमाणे |
भ्रमनिरास | अपेक्षाभंग |
मथितार्थ | तात्पर्य, सारांश |
मर्मज्ञान | महत्त्वाचे ज्ञान, सुप्त/कुशल ज्ञान |
वर्मी | मुख्य ठिकाणी, मुख्य जागी |
वायफळ | निष्फळ, निरर्थक |
शब्दशः | शब्दाप्रमाणे |
सुज्ञ | समजूतदार |
क्षुल्लक | फुटकळ, मामुली |
दुखणं बोटभर वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
अवसान गोळा करणे. | शक्ती एकवटणे. |
आश्चर्याने तोंडात बोटे घालणे. | खूप नवल वाटणे. |
हात कपाळाला लावणे. | निराश होणे, वैतागणे. |
टस की मस न होणे. | अजिबात न ऐकणे, न बदलणे. |
ताठा कमी होणे. | अहंकार कमी होणे. |
पळ काढणे. | घाबरून पळून जाणे. |
पोटात गोळा येणे. | भीती वाटणे. |
कामाचा बट्ट्याबोळ होणे. | कामात अडचणी निर्माण होणे. |
बोट ठेवणे. | दोष दाखवणे. |
भ्रमनिरास होणे. | अपेक्षाभंग होणे. |
मन हलके होणे. | बरे वाटणे. |
मस्का मारणे. | खुशामत करणे, पुढेपुढे करणे. |
मुंगीच्या पावलांनी बरे होणे. | हळूहळू बरे वाटणे. |
रागाने हुप्प होणे. | गप्प बसणे. |
वर्मी बसणे. | नाजूक, दुखऱ्या भागावर घाव बसणे. |
हात चोळत गप्प बसणे. | काहीच करू न शकणे. |
हैराण करणे. | वैतागून सोडणे. |
दुखणं बोटभर टिपा
कुबड्याधारी | बुडत्याला काडीचा आधार. |
प्रभाते करदर्शनम् | सकाळी उठल्यावर हात पाहणे (श्लोकाची ओळ). |
बत्ता | खलबत्त्याचा दांडा. |
भावजय | भावाची बायको. |
स्ट्रपिंग | जखमेस पट्टी गुंडाळणे. |
दुखणं बोटभर म्हणी
मोडेन पण वाकणार नाही. | प्रतिकूल परिस्थितीत लहानशा आशेचा आधार वाटणे. |
कुबड्या घेऊन चालणारी व्यक्ती. | प्राण गेले तरी तत्त्वांशी तडजोड न करणे. |