Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 19 Question Answer मले बाजाराला जायाचं बाई for exam preparation.
Std 6 Marathi Balbharati Chapter 19 Question Answer मले बाजाराला जायाचं बाई
Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 19 मले बाजाराला जायाचं बाई
मले बाजाराला जायाचं बाई Question Answer
प्रश्न ४.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: प्रभा बैकर यांच्या ‘मले बाजाराला जायाचं बाई!’ या पाठात भारुडाच्या स्वरूपातील पथनाट्यातून ‘प्लॅस्टिक टाळा, `पृथ्वी वाचवा!’ असा बहुमोलाचा संदेश दिला आहे.)
(अ) बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात ?
उत्तर:
बाजाराला गेल्यावर हल्ली सर्व सामान कॅरीबॅगमध्ये देतात. घरी आल्यावर ते सामान डब्यांमध्ये भरले जाते आणि पिशव्या फेकून दिल्या जातात. या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे नाले तुडुंब भरतात, हे प्लॅस्टिक पोटात गेल्याने जनावरे, जलचर मरतात. शेत जमिनीचेही नुकसान होते, म्हणून प्लॅस्टिकची पिशवी टाळण्यासाठी बाई म्हणतात, की मला बाजाराला जायचे नाही.
(आ) कॅरीबॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते?
उत्तर:
कॅरीबॅग इतरत्र फेकून दिल्याने त्या गटारात अडकतात व नाले तुडुंब भरतात. तसेच, जनावरे व जलचर यांच्या पोटात खाण्यातून प्लॅस्टिक गेल्यास ती मृत्युमुखी पडतात. शेत जमिनीमध्ये प्लॅस्टिक जमा झाल्यास ती ओसाड होते.
(इ) बाईच्या हरणीचे मरण का ओढवले?
उत्तर:
हरणी म्हणजे बाईची म्हैस. हरणीने चारा समजून किंवा चारा खाताना चुकून प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्या. प्लॅस्टिक पोटात गेल्याने बाईच्या हरणीचे मरण ओढवले.
प्रश्न २.
असे का घडले?
(अ) काळी माय ओसाड झाली.
उत्तर:
शेतजमिनीत प्लॅस्टिकच्या पिशव्या साचून प्लॅस्टिकची जाळी तयार होते व त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणूनच, काळी माय ओसाड झाली आहे.
(आ) सरकारने आदेश काढून संदेश दिला.
उत्तर:
प्लॅस्टिकच्या अतिरेकाने जनावरे, जलचर मृत्युमुखी पडत आहेत. शेते, नाले व एकंदर पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत. या सर्वांस आळा घालण्यासाठी सरकारने आदेश काढून संदेश दिला.
(इ) समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले.
उत्तर:
समुद्रात प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्या जातात. त्या जलचरांच्या पोटात गेल्याने जलचर मरून पडले.
(ई) बाई बाजाराला जायला तयार झाल्या.
उत्तर:
बाजारात प्लॅस्टिकच्या पिशव्या देतात आणि या पिशव्यांचा निसर्गावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे, बाई बाजाराला जायला तयार नव्हत्या; पण सर्वांनी मिळून प्लॅस्टिकच्या ऐवजी कापडी व कागदी पिशव्या वापरायचे ठरवले तेव्हा बाई बाजाराला जायला तयार झाल्या.
प्रश्न ३.
कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
(अ) ‘सांग रे बाबा सांग. मले आठवत नाय. पेपरात आलंय तरी काय?’
उत्तर:
असे तिसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीस म्हणाली. पहिली व्यक्ती जेव्हा पेपरात ‘सजीवांना वाचवूया’ हा संदेश दिलाय असे सांगते तेव्हा तिसरी व्यक्ती तिला हा प्रश्न विचारते.
(आ) ‘प्लॅस्टिकची जाळी वरती आली.’
उत्तर:
असे बाई तिसऱ्या व्यक्तीस म्हणाल्या. तिसऱ्या व्यक्तीने काळी माय ओसाड कशी होत आहे हे विचारल्यावर त्याला उत्तर देताना बाईंनी, नांगरणी करताना प्लॅस्टिकची जाळी वर येते हे स्पष्ट करताना हे वाक्य उच्चारले.
प्रश्न ४.
कोणकोणत्या प्लॅस्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल? याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा.
उत्तर:
- प्लॅस्टिकच्या बाटल्या, डबे, कुंड्या यांचा कोरडे सामान / धान्य साठवण्यासाठी, तसेच शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी वापर करता येईल.
- प्लॅस्टिकच्या, मोडक्या वस्तू, निरुपयोगी वायर, पिशव्या इत्यादी भंगारमध्ये विकल्यास त्यांवर प्रक्रिया करून (recycle) नवीन वस्तू तैयार करता येतील.
प्रश्न ५.
तुम्ही किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लॅस्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही, काका व दुकानदार यांच्यातील संवाद लिहा.
उत्तर:
काका : (दुकानदारास) वा! यादीप्रमाणे सर्व सामान मिळाले. आता पटकन प्लॅस्टिकच्या पिशवीत हे सामान भरून दया.
दुकानदार : त्याचे जादा पैसे लागतील!
काका : लागू दया; पण पिशवी दया.
मी : थांबा काका. तुम्हांला माहीत नाही का की प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे ?
काका : हो का? पण का बुवा?
मी : प्लॅस्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी म्हणजेच आपल्यासाठी घातक ठरत आहेत.
काका : साधी प्लॅस्टिकची पिशवी इतकी काय घातक असणार!
मी : याच पिशव्यांमुळे गटारे तुंबतात. कचऱ्याचे विघटन होत नाही व सर्वत्र घाण पसरते. गुराढोरांच्या खाण्यात या
पिशव्या आल्याने ती दगावतात. समुद्रात टाकलेल्या पिशव्यांमुळे जलचरही मरतात.
काका : : इतक्या समस्या ! याचा मी कधी इतका बारकाईने कधी विचारच केला नाही.
मी : आणि दुकानदारकाका, तुम्हीदेखील अशी प्लॅस्टिकची पिशवी विकणे / देणे दंडनीय अपराध आहे.
दुकानदार : अरे हो. मला ठाऊक आहे; पण ग्राहकांचे मन राखण्यासाठी दयावी लागते कधीकधी; पण आता मी दुकानाबाहेर सूचनाच लावतो की ‘प्लॅस्टिकची पिशवी मागू नये.’
काका : आणि मीही आजपासून कापडी किंवा कागदी पिशव्याच वापरेन.
मी : (दोघांना) धन्यवाद काका!
काका : अरे धन्यवाद कसले? हे तर आमचे कर्तव्यच आहे.
प्रश्न ६.
ओला कचरा व सुका कचरा यांमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा.
उत्तर:
ओला कचरा | सुका कचरा |
i. नैसर्गिकरित्या विघटन होणारे पदार्थ या प्रकारात मोडतात. | विघटनासाठी प्रक्रिया करावे लागणारे व ज्यांचा पुनर्वापर शक्य आहे असे पदार्थ या प्रकारात मोडतात. |
ii. उदा. उरलेले अन्न, भाज्या / फळांची साले, केस, नखे, मांस, हाडे, अंड्याची कवचे, शेंगांची टरफले, डायपर इत्यादी. | उदा. प्लॅस्टिकच्या पिशव्या व तुटके सामान, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, बल्ब, ट्यूब, पत्र्याची भांडी इत्यादी. |
प्रश्न ७.
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा.
उत्तर:
प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद केल्याने पुढील फायदे होतील:
- गटारे, नाले तुंबणार नाहीत.
- कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुकर होईल.
- जलचर, गुरे मरणार नाहीत.
- शेतजमिनीच्या सुपीकतेवर वाईट परिणाम होणार नाहीत.
- प्लॅस्टिकच्या पिशव्या नष्ट करताना पसरणाऱ्या धुराने होणारे वायू प्रदूषण टळेल.
- पर्यावरण संवर्धनात साहाय्य होईल.
प्रश्न ८.
शाळा – शाळांमधून प्लॅस्टिक कचरामुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला. प्लॅस्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा.
उत्तर:
शाळेच्या प्लॅस्टिक कचरामुक्त अभियानात मी प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकचे पेले, खादयपदार्थांची पाकिटे, प्लॅस्टिकच्या शीतपेयांच्या बाटल्या, चॉकलेटची आवरणे, रस्त्यावर फेकलेल्या, मोडलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू इत्यादी वस्तू उचलल्या.
खेळूया शब्दांशी
(अ) खालील शब्द प्रमाणभाषेत लिहा.
१. न्हाई
२. सौंसाराला
३. म्हंजी
४. समदया
५. म्हन्ते
६. माजी
७. त्याच्यासाठी
८. डोळ्यांतून
९. एवढेच
१०. हाय
११. व्हय
१२. त्यो
उत्तर:
१. नाही
२. संसाराला
३. म्हणजे
४. सगळ्या
५. म्हणते
६. माझी
७. त्याच्यासाठी
८. डोळ्यांतून
९. एवढेच
१०. आहे
११. होय
१२. तो
(आ) खालील वाक्य वाचा.
माझी आजी अंगठाबहाद्दर आहे. अंगठाबहाद्दर म्हणजे अशिक्षित. तसे खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) अकलेचा कांदा – मूर्ख मनुष्य.
(२) उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा.
(३) उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती.
(४) एरंडाचे गुऱ्हाळ – कंटाळवाणे भाषण करणे.
(५) कळीचा नारद – भांडणे लावणारा.
(६) गळ्यातला ताईत – अतिशय प्रिय.
(७) जमदग्नी – अतिशय रागीट मनुष्य.
(८) झाकले माणिक – साधा पण गुणी मनुष्य. (९) दीड शहाणा – मूर्ख.
(१०) लंकेची पार्वती – अंगावर दागिने नसलेली स्त्री.
हे करून पाहूया.
(अ) टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये रोपटी लावा व छान बाग तयार करा.
(आ) प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याच्या संदर्भात गटनिहाय किमान दहा घोषवाक्ये तयार करा.
उत्तर:
- घातक आहे प्लॅस्टिक पिशवी
घरोघरी आणा कापडी पिशवी. - प्लॅस्टिकचा वापर टाळा,
प्रदूषणाला घाला आळा. - प्लॅस्टिकमुळे होते घाण,
प्राणिमात्रांचा घेते प्राण. - पॉलीथीनवर येता बंदी,
निसर्ग होईल आनंदी. - मुक्या प्राण्यांचा करा विचार,
प्लॅस्टिक पिशवीवर टाका बहिष्कार. - प्लॅस्टिक बंदीची करूया चळवळ,
नदया-नाले वाहतील खळखळ. - प्लॅस्टिकचा करा पुनर्वापर,
आपले जीवन होईल सुकर. - प्लॅस्टिक करी काळ्या मातीचा घात,
प्लॅस्टिकपासून दूर राहा चार हात. - पॉलीथीन आहे शेतीसाठी घातक,
करू नका असे पातक. - पॉलीथीनमुक्त समुद्रकिनारे,
वाहू दया स्वच्छतेचे वारे.
(इ) ‘मले बाजाराला जायाचं बाई’ या पथनाट्याचे वर्गात सादरीकरण करा.
(टीप: वरील उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
आपण समजून घेऊया.
• काळाचे मुख्य प्रकार
(१) वर्तमानकाळ
(२) भूतकाळ
(३) भविष्यकाळ
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा.
(१) रमाकांत गाणे ऐकतो.
(२) दादा सायकल चालवतो.
(३) पक्षी किलबिल करतात.
वरील सर्व क्रिया वर्तमानकाळात घडतात. म्हणून वरील सर्व वाक्यांत साधा वर्तमानकाळ आहे.
• खालील वाक्यांचे निरीक्षण करा.
(१) माझ्या ताईने गाणे गायले आहे.
(२) सूर्य पश्चिमेला मावळला आहे.
(३) संजय घरी पोहोचला आहे.
वरील वाक्यांमधील गाणे गाण्याची, सूर्य मावळण्याची, घरी पोहोचण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, म्हणून हा पूर्ण वर्तमानकाळ होय.
• पुढील वाक्यांचे निरीक्षण करा.
(१) पूनम अभ्यास करत आहे.
(२) आई भाजी चिरत आहे.
(३) मुले क्रीडांगणावर खेळत आहेत.
वरील वाक्यांत अभ्यास करण्याची, भाजी चिरण्याची, क्रीडांगणावर खेळण्याची क्रिया अजून अपूर्ण असल्यामुळे हा अपूर्ण वर्तमानकाळ होय.
• खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.
(१) संध्या गीत गात असते.
(२) रोहिणी चित्र रंगवत असते.
(३) आई उत्तम पदार्थ बनवत असते.
वरील क्रियापदांवरून गाण्याची, चित्र रंगवण्याची, पदार्थ बनवण्याची क्रिया सतत, नेहमी घडण्याची रीत (प्रथा) आहे असा अर्थ व्यक्त होतो, म्हणून त्याला रीती वर्तमानकाळ म्हणतात.
• खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
साधा वर्तमानकाळ | अपूर्ण वर्तमानकाळ | पूर्ण वर्तमानकाळ |
i. आज भाजी विकते. | आज भाजी विकत आहे. | आजीने भाजी विकली आहे. |
ii. सोनार दागिना घडवतो. | सोनार दागिना घडवत आहे. | सोनाराने दागिना घडवला आहे. |
iii. आज पाऊस आला. | आज पाऊस पडत आहे. | आज पाऊस पडला आहे. |
iv. अजय सहलीला जातो. | अजय सहलीला जात आहे. | अजय सहलीला गेला आहे. |
v. आई बाळाला भात भरवते. | आई बाळाला भात भरवत आहे. | आईने बाळाला भांत भरवला आहे. |
शिक्षकांसाठी : वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळ यांच्या प्रकारांची विविध उदाहरणे देऊन उपयोजनात्मक सराव करून घ्यावा.
• खालील चित्राचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा.
उत्तर:
• खालील चौकटींत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.
उत्तर:
नावडतीचे मीठ अळणी.
नाचता येईना अंगण वाकडे.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
हातच्या कंकणाला आरसा कशाला?
Class 6 Marathi Balbharati Chapter 19 मले बाजाराला जायाचं बाई Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(कॅरीबॅगमध्ये, सजीवांना, वसुंधरा, ओसाड)
i. आता तर समया वस्तू …….. देतात की.
उत्तर:
कॅरीबॅगमध्ये
ii. सरकारनी काढलेल्या आदेशामध्ये ‘……. वाचवूया’ हा संदेश दिलाय.
उत्तर:
सजीवांना
iii. आपली काळी माय ……. होत हाय.
उत्तर:
ओसाड
iv. होत नाही त्याचा निचरा, आर्ततेने सांगते …….
उत्तर:
वसुंधरा
प्रश्न २.
कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
i. ‘आता समदया वस्तू कॅरीबॅगमध्ये देतात की’
उत्तर:
असे दुसरी व्यक्ती बाईंना म्हणाली. बाई सामान कशात आणू ? असा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना उत्तर देताना दुसऱ्या व्यक्तीने हे वाक्य उच्चारले.
ii. आणखी आक्रीत घडलंय काय?
उत्तर:
असे पहिल्या व्यक्तीने बाईंना विचारले. बाई प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या निसर्गाच्या -हासाबद्दल माहिती सांगत असताना पहिल्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला.
प्रश्न ३.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. बाईला बाजारातून कशाकशाची खरेदी करायची आहे?
उत्तर:
बाईला बाजारातून डाळ, तांदूळ, भाजीपाला, साबण, कपडे, चपला आणि संसाराला लागणाऱ्या इतर वस्तूंची खरेदी करायची आहे.
ii. ‘प्लॅस्टिक वापरू नका’ हा आदेश कोणी काढला ?
उत्तर:
‘प्लॅस्टिक वापरू नका’ हा आदेश सरकारने काढला.
iii. या पाठात प्लॅस्टिकऐवजी कोणत्या पिशव्या वापरण्याचा सल्ला दिला आहे?
उत्तर:
या पाठात प्लॅस्टिकऐवजी कापडी आणि कागदाच्या पिशव्या वापरण्याचा सल्ला दिला आहे.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.
- जंगल =
- संदेश =
- आदेश =
- समुद्र =
- वसुंधरा =
उत्तर:
- अरण्य, वन
- निरोप, सांगावा
- हुकूम, आज्ञा
- सागर, रत्नाकर
- पृथ्वी, अवनी
प्रश्न २.
दिलेल्या शब्दांत लपलेले शब्द शोधा.
- अंगठाबहाद्दर
- जलचरसुदीक
उत्तर:
- अंग, अंगठा, बहाद्दर, गर, ठार, हार, अंबर, बहार, रंग, रद्द.
- जल, चर, कर, चल, सुकर, दीर, सुचक, जर, चरक, सुजल, कल, कच.
प्रश्न ४.
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा.
उत्तर:
(i – ब),
(ii – अ)
प्रश्न ५.
खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यात उपयोग करा.
उदा. अंगठाबहाद्दर – अशिक्षित व्यक्ती.
माझी आजी अंगठाबहाद्दर आहे.
i. अकलेचा कांदा – मूर्ख मनुष्य.
वाक्य : ताई सुमेधला नेहमी अकलेचा कांदा म्हणून चिडवते.
ii. उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा.
वाक्य: शेतीची काहीही माहिती नसलेला शरद उंटावरचा शहाणा बनून गावाला शेती शिकवत होता.
iii. उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती
वाक्य : वर्षातून एकदा येणारी कुसुम मावशी म्हणजे उंबराचे फूलच.
iv. एरंडाचे गुऱ्हाळ – कंटाळवाणे भाषण करणे.
वाक्यः सोसायटीच्या कार्यक्रमात सदू काकांनी एरंडाचे गुऱ्हाळच सुरू केले.
v. कळीचा नारद – भांडणे लावणारा.
वाक्य : दिनू हा घरातील कळीचा नारद होता.
vi. गळ्यातला ताईत – अतिशय प्रिय.
वाक्य : गुणी रमा शाळेत नवीन असूनही लवकरच सर्व शिक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली.
vii. जमदग्नी – अतिशय रागीट मनुष्य..
वाक्य : शिस्तीचे पालन झाले नाही, तर दीपूची आई जमदग्नीचे रूप धारण करते.
viii. झाकले माणिक – साधा पण गुणी मनुष्य.
वाक्य: डॉ. अब्दुल कलाम हे जणू झाकले माणिक होते.
ix. दीड शहाणा – मूर्ख.
वाक्य : दीड शहाणा संकेत नेहमी कामात घोळ घालत असतो.
x. लंकेची पार्वती – अंगावर दागिने नसलेली गरीब स्त्री.
वाक्यः अचानक आलेल्या दारिद्र्यामुळे मालतीताई लंकेची पार्वती झाल्या.
प्रश्न ८.
खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा.
- सरांनी आपुलकीने प्रश्न विचारला.
- मुसळधार पावसाने नदीला पूर आला.
- रंकाळा तलाव कोल्हापूरला आहे.
- थोडी साखर आण.
उत्तर:
- भाववाचकनाम
- सामान्यनाम
- विशेषनाम
- सामान्यनाम
प्रश्न ९.
चुकीची विरामचिन्हे ओळखून वाक्य दुरूस्त करून लिहा.
i. राक्षसा? काय केलेस तू हे
उत्तर: राक्षसा! काय केलेस तू हे ?
ii. अभ्यास! अभ्यास! अभ्यास! सारखा अभ्यासच का.
उत्तर:
अभ्यास, अभ्यास, अभ्यास! सारखा अभ्यासच का?
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
तुम्ही बाजाराला जाताना कापडी पिशव्या घेऊन जाता का?
प्रश्न २.
काही दुकानदार प्लॅस्टिक पिशवीऐवजी कोणता पर्याय वापरतात?
लेखी कार्य
प्रश्न १.
किराणा माल खरेदी करायला जाताना तुमचे आई-वडील कोणती तयारी करतात? त्याचे निरीक्षण करा व लिहा.
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७३)
उत्तर:
किराणा माल खरेदी करायला जाताना आई – बाबा घरात किती किराणा शिल्लक आहे हे पाहून लागणाऱ्या सामानाची यादी तयार करतात. सामान आणण्यासाठी आई मोठ्या कापडी पिशव्याही सोबत घेते आणि सामान विकत घेण्यासाठी पैसेही घेते. कोणत्या दुकानात काही सवलत आहे का हेसुद्धा आई – बाबा पाहतात.
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न ३.
जुनी वर्तमानपत्रे व टाकाऊ कागदांपासून पिशव्या तयार करा व दैनंदिन कामांसाठी वापरा.
(टीप: वरील उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
मले बाजाराला जायाचं बाई पाठाचा परिचय
मानवाने स्वतःच्या सुखसोई लक्षात घेत तयार केलेले प्लॅस्टिक आज पृथ्वीवरील सर्वांत मोठी समस्या बनले आहे. या प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे झालेले दुष्परिणाम आज माणसाबरोबरच इतर जनावरांना आणि संपूर्ण पर्यावरणाला त्रासदायक ठरत आहेत. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, याचे मार्मिक चित्रण या पाठातून करत लेखिकेने ‘प्लॅस्टिक टाळा, पृथ्वी वाचवा’ असा संदेश दिला आहे. भारुडाच्या अंगाने जाणारे हे पथनाट्य पर्यावरण संवर्धनाचा संदेश देते.
मले बाजाराला जायाचं बाई शब्दार्थ
आवं | अहो |
आसवं | अश्रू |
ओसाड | उजाड |
आर्ततेने | मनापासून |
अंगठा बहाद्दूर | अशिक्षित |
कॅरीबॅग | प्लॅस्टिकची पिशवी |
कशापायी | कशामुळे |
खंडीभर | खूप जास्त |
चाऱ्यागत | चाऱ्याप्रमाणे |
जलचरसुदीक | जलचरसुद्धा |
डोल्यातून | डोळ्यांतून |
तुडुंब | पूर्ण, काठोकाठ |
निचरा | येथे अर्थ – विघटन |
न्हाई | नाही |
वतून | ओतून |
वायदा | वचन |
समिंदर | समुद्र |
सम्द | सगळं |
मले बाजाराला जायाचं बाई वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
आक्रीत घडणे. | विचित्र घडणे. |
ध्यानात येणे. | लक्षात येणे. |
मले बाजाराला जायाचं बाई टिपा
खंडी | धान्य मोजण्येचे जुने परिमाण. |
पथनाट्य | रस्त्यावर सादर केली जाणारी लोकप्रबोधनपर नाट्यछटा. |
भारूड | संत एकनाथ यांनी जनजागृतीसाठी वापरलेला काव्यप्रकार. |
रेडकू | म्हशीचे पिल्लू. |