Class 6 Marathi Balbharati Chapter 20 Question Answer ओळख थोरांची

Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 20 Question Answer ओळख थोरांची for exam preparation.

Std 6 Marathi Bialbharati Chapter 20 Question Answer ओळख थोरांची

Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 20 ओळख थोरांची

ओळख थोरांची Question Answer

चर्चा करून सांगूया

(अ) तुम्हांला सर्वांत जास्त कोणता खेळ आवडतो?
उत्तर:
मला सर्वांत जास्त आवडणारा खेळ म्हणजे खो-खो खो खो खेळताना मला विरुद्ध गटातील खेळाडूंना चकवा देत या खेळाडूंच्या मधून पळायला खूप आवडते. स्वतः अधिक न धावता बाद करायला येणाऱ्या खेळाडूंना टोलवत राहणे हे फार कौशल्याचे काम असते. या खेळामुळे शारीरिक चपळता, लवचीकता, मनाची स्थिरता यांचा कस लागतो.

(आ) तुम्हांला कोणता खेळाडू सर्वांत जास्त आवडतो? का आवडतो?
उत्तर:
क्रिकेटचा देव मानला जाणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर हा खेळाडू मला सर्वांत जास्त आवडतो, कारण सचिन तेंडुलकर हा एक अत्यंत मेहनती, तितकाच नम्र आणि माणुसकी जपणारा खेळाडू आहे. क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक दिव्य विक्रम त्याच्या नावे आहेत. क्रिकेटसोबतच इतरही विविध खेळांना तो वेळोवेळी प्रोत्साहन देतो.

विविध सामाजिक उपक्रमांना नि:स्वार्थपणे, कोणताही गाजावाजा न करता दान करतो, म्हणून मला सचिन तेंडुलकर फार आवडती.

(इ) दूरदर्शनवरील क्रीडाजगतातल्या बातम्या पाहा व ऐका. वर्गात त्यावर चर्चा करा.
(टीप: हा उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वत: करावा.)

Class 6 Marathi Balbharati Chapter 20 Question Answer ओळख थोरांची

नवीन काही शोधूया

(अ) धान्य व फळांच्या दुकानात जा. खालील वस्तूंच्या जातींची नावे विचारा. यादी करा.
(१). गहू –
(२). केळी –
(३). ऊस –
(४). डाळिंब –
(५). तांदूळ –
(६). संत्री –
(७). ज्वारी –
(८). आंबे –
(९). तूर –
उत्तर:
(१). गहू
लोकवन, उपवन, खांडवा, सिहोरी, सोनालिका, निफाड जाती, कल्याण सोना, सरबती, सोनोरा इत्यादी.

(२). केळी
वेलची, राजेळी, सोनकेळी, लालकेळी, बसराई, वामनकेळी, बनकेळ, राजापुरी, श्रीमंती इत्यादी.

(३). ऊस
को ८०१४ (महालक्ष्मी), को सी ६७१ (वसंत – १), को ८६०३२ (नीरा), को ९४०१२ (फुले सावित्री), को एम ०२६५ (फुले २६५), को ९२००५ इत्यादी.

(४). डाळिंब
भगवा, गणेश, मृदुला, आरक्ता, जी- १३७ इत्यादी.

(५). तांदूळ
कोलम, बासमती, आंबेमोहोर, सुरती कोलम, सिल्की कोलम, आजरा घनसाळ, इंद्रायणी, जिरेसाळ, मोगरा, हरकल, कमोद, काळी साळ, कोळंबा, चिमणसाळ, जिरवेल, बुगडी, तांदूळ, मासडभात इत्यादी.

(६). संत्री
नागपूर, नाशिक, किन्नो नं. १८२ इत्यादी.

(७). ज्वारी
सिलेक्शन- ३, फुले अनुराधा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, फुले सुचित्रा, मालदांडी ३५-१, फुले वसुधा, फुले यशोदा, सीएचव्ही २२, पीकेव्ही क्रांती इत्यादी.

(८). आंबे
पायरी, हापूस / कलमी, तोतापुरी, रायवळ, लंगडा, चिक्कूळ्या, दशेहरी, नीलम, केशर, देवगड, बदामी, खोक्या, गोटी इत्यादी.

(९). तूर
आय.सी.पी.एल.-८७, ए. के. टी -८८११, विपुला, टी विशाखा – १, बी. डी. एन – २, सी – ११, संतुर १ इत्यादी.

(आ) तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्याची यादी तयार करा.
उत्तर:
तांदूळ या धान्यापासून तयार केले जाणारे पदार्थ: खिचडी, भात, भाकरी, पेज, पोहे, खीर, मोदक, पुलाव, शेवया, पापड, घावणे, आंबोळ्या, इडली असे अनेक पदार्थ बनवले जातात.

(इ) आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांत तांदळाचे उत्पादन घेतले जाते याची माहिती मिळवा व लिहा.
उत्तर:
महाराष्ट्रामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण), पालघर, गोंदिया, भंडारा (विदर्भ), सातारा, सांगली, कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र) या भागांत तांदळाचे उत्पादन घेतले जाते.

उपक्रम :

तुम्हांला आवडणाऱ्या थोर व्यक्ती, खेळाडूंविषयी माहिती विविध संदर्भग्रंथांतून मिळवा. वर्गातील सर्व मुलांनी लिहिलेल्या माहितीचे मासिक, हस्तलिखित तयार करा.
(टीप: हा उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वत: करावा.)

Class 6 Marathi Balbharati Chapter 20 ओळख थोरांची Question Answer

भाग १ – खाशाबा जाधव

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

i. खाशाबांचे आजोबा उत्तम …………. होते. (कुस्तीपटू, क्रिकेटपटू, बॅडमिंटनपटू)
उत्तर:
कुस्तीपटू

ii. खाशाबांनी वयाच्या …………वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती. (सतराव्या, आठव्या, पहिल्या)
उत्तर:
आठव्या

iii. खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळप्रकारात ………. मिळवून दिले. (रौप्यपदक, सुवर्णपदक, कांस्यपदक),
उत्तर:
कांस्यपदक

iv. १९५२ साली ऑलिंपिक क्रीडास्पर्धेचा पंधरावा महोत्सव फिनलँडची राजधानी ……… येथे पार पडला. (हेलसिंकी, बोस्टन, न्यूयॉर्क)
उत्तर:
हेलसिंकी

प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. खाशाबा जाधव यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तरः
खाशाबा जाधव यांचा जन्म कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर या छोट्याशा गावी झाला.

ii. खाशाबा जाधव यांच्या आई – वडिलांचे नाव काय होते?
उत्तरः
खाशाबा जाधव यांच्या आईचे नाव पुतळाबाई व वडिलांचे नाव दादासाहेब होते.

iii. खाशाबांनी वडिलांकडून कोणते धडे आत्मसात केले?
उत्तर:
‘कुस्तीत प्रतिस्पर्धी मल्लाला चीत कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केले.

iv. ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत भारताला मिळालेले पहिले पदक कोणते?
उत्तर:
ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत खाशाबांनी कुस्तीमध्ये मिळवलेले कांस्यपदक हेच या स्पर्धेतील भारताला मिळालेले पहिले पदक होय.

Class 6 Marathi Balbharati Chapter 20 Question Answer ओळख थोरांची

प्रश्न ३.
दोन-तीन वाक्यांत उत्तर लिहा.

(टीप : खालील उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना: ‘ओळख थोरांची’ (भाग १ – खाशाबा जाधव) या संजय दुधाणे यांच्या पाठात ‘ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव’ यांचा जीवनप्रवास उलगडला आहे.)

i. खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना कशाप्रकारे केली?
उत्तर:
वडिलांकडून कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या लहानग्या खाशाबांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज पाच किलोमीटर पळत जायचे आणि अंधार पडण्यापूर्वी शाळेतून घरी पोहोचण्यासाठी पळत यायचे.

या त्यांच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगला तयार झाला. अनवाणी पायांनी धावल्यामुळे त्यांचे पाय काटक बनले. तसेच, पावसाळ्यात झाडे-झुडपे, गुडघ्यापर्यंत चिखल आणि पाऊस या सर्व अडथळ्यांची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.

  1. नदी =
  2. गाव =
  3. मुलगा =
  4. काठ =
  5. वडील =
  6. पाय =

उत्तर:

  1. सरिता, तटिनी, तरंगिणी
  2. ग्राम, खेडे
  3. पुत्र, तनय, सुत, नंदन, तनुज
  4. तीर, तट
  5. तात, पिता, जनक
  6. पद, चरण

प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. छोटेसे ×
  2. तरुण ×
  3. दूर ×
  4. लवकर ×

उत्तर:

  1. मोठेसे
  2. वृद्ध
  3. जवळ
  4. उशिरा

प्रश्न ३.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

i. श्रीगणेशा होणे –
उत्तर:
अर्थ : प्रारंभ होणे, सुरुवात होणे.

ii. धडे आत्मसात करणे –
अर्थ : मनापासून शिकणे.
वाक्य : पाहुण्यांचे आगमन होताच आमच्या स्नेहसंमेलनाचा श्रीगणेशा झाला.

iii. तमा न बाळगणे –
उत्तर: अर्थ : पर्वा न करणे, फिकीर किंवा चिंता न करणे.
वाक्य : आर्या आंबेकरने आपल्या आईकडून गायनाचे धडे आत्मसात केले.
उत्तर:
वाक्य : सीमेवर लढणारे सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी स्वत: च्या प्राणांचीही तमा बाळगत नाहीत.

iv. साधना करणे –
उत्तर:
अर्थ : खडतर मेहनत करणे.
वाक्य : घवघवीत यश मिळवण्यासाठी कठोर साधना करावी लागते.

v. चीत करणे –
उत्तर:
अर्थ : हरवणे.
वाक्य : आर्याने उत्तम राग गाऊन वीणाला स्पर्धेमध्ये चीत केले.

vi. पट काढणे –
उत्तरः
अर्थ : आपल्या प्रतिस्पर्धी पहिलवानाचा पाय खेचणे.
वाक्य : शरदने आपल्या मुलाला पट काढायला शिकवले.

प्रश्न ४.
कंसातील नामांचे दिलेल्या सारणीत योग्य वर्गीकरण करा.
(कृष्णा, नदी, गाव, ऑलिंपिक, राजधानी)
उत्तरः
सामान्यनाम: नदी, गाव, राजधानी
विशेषनाम: कृष्णा, ऑलिंपिक

प्रश्न ५.
खालील नामांना दोन-दोन विशेषणे लावा.

i. ………. माय
उत्तर:
अनवाणी पाय
काटक पाय

ii. ……. कुस्तीपटू
उत्तर:
उत्तम कुस्तीपटू
तरुण कुस्तीपटू

Class 6 Marathi Balbharati Chapter 20 Question Answer ओळख थोरांची

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
ऑलिंपिक स्पर्धांत कोणकोणते खेळ खेळले जातात, ते सांगा.

भाग २ – दादाजी रामजी खोब्रागडे

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

i. ……….. ही तांदळाची जात दादाजी खोब्रागडे यांनी शोधली. (एचएमटी / कोलम / लोकवन)
उत्तर:
एचएमटी

ii. ……… बाजारात तांदळाच्या नव्या जातीला फार मागणी मिळाली. (नागपूर / नांदेड / तळोधी बाळापूर)
उत्तर:
तळोधी

iii. दादाजी खोब्रागडे यांना ……… हा पुरस्कार मिळाला. (कृषिरत्न / कृषिभूषण / कृषिजवाहर)
उत्तर:
कृषिभूषण

iv. दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाच्या………. जाती शोधून काढल्या. (आठ / सात / सहा)
उत्तर:
आठ

Class 6 Marathi Balbharati Chapter 20 Question Answer ओळख थोरांची

प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. दादाजी खोब्रागडे यांचे गाव कोणते?
उत्तर:
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड हे दादाजी खोब्रागडे यांचे गाव होय.

ii. दादाजींच्या वडिलांनी दादाजींना कोणता सल्ला दिला ?
उत्तरः
‘चांगले बी पेरले, तर चांगली उगवण होते’ असा सल्ला दादाजींच्या वडिलांनी त्यांना दिला.

iii. दादाजी खोब्रागडे यांना प्रयोग करण्यासाठी किती शेतजमीन मिळाली ?
उत्तर:
दादाजी खोब्रागडे यांना प्रयोग करण्यासाठी अवघी दीड एकर शेतजमीन मिळाली.

प्रश्न ३.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप : खालील प्रस्तावना प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस लिहिता येऊ शकते.
प्रस्तावना : ‘ओळख थोरांची’ (भाग २ – दादाजी रामजी खोब्रागडे) या पाठात दादाजी खोब्रागडे या संशोधक शेतकऱ्याचा प्रयोगशील प्रवास उलगडला आहे.)

i. एचएमटी तांदळाच्या जातीचा शोध कसा लागला ?
उत्तर:
एकदा शेतात फिरताना दादाजी खोब्रागडे यांना भाताच्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या काही ओंब्या दिसल्या. त्या तयार ओंब्या त्यांनी वेगळ्या पिशवीत काढून ठेवल्या. दुसऱ्या वर्षी त्यांनी हे बियाणे शेताच्या मधोमध पेरले.

या बियाण्याच्या ओंब्यांना इतरांपेक्षा अधिक दाणे येतात असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अनेक वर्षे असे पीक घेतल्यानंतर हे बियाणे चांगले व जास्त उत्पादन देऊ शकते अशी त्यांची खात्री पटली. अशाप्रकारे, एचएमटी तांदळाच्या जातीचा शोध लागला.

ii. दादाजी खोब्रागडे यांनी शोधून काढलेल्या तांदळाच्या जातीला एचएमटी हे नाव कसे पडले?
उत्तरः
दादाजी खोब्रागडे यांनी शोधून काढलेल्या तांदळाचे बियाणे गावातील लोकांनी आपल्या शेतात लावले नाही; पण गावातील शेतकरी भीमराव शिंदे यांच्या चार एकर शेतजमिनीवर या तांदळाचे ९० क्विंटल उत्पादन झाले. जेव्हा हा तांदूळ तळोधी बाळापूरच्या बाजारात गेला तेव्हा व्यापाऱ्यांकडून त्याला प्रचंड मागणी मिळाली आणि तांदळाची ही जात ‘एचएमटी’ या नावाने प्रसिद्ध झाली.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
समानार्थी शब्द लिहा.

  1. बी =
  2. शेती =
  3. गडद =
  4. हंगाम =
  5. पुरस्कार =
  6. विनंती =

उत्तर:

  1. बीज, बियाणे
  2. कृषी
  3. दाट, गर्द
  4. मोसम
  5. मान, सन्मान
  6. विनवणी, आर्जव

प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. नवी ×
  2. काळजी ×
  3. खराब ×
  4. लक्ष ×
  5. परिपक्व ×
  6. गडद ×

उत्तर:

  1. जुनी
  2. निष्काळजी
  3. चांगले
  4. दुर्लक्ष
  5. अपरिपक्व
  6. फिकट

प्रश्न ३.
खालील विशेषण व नाम यांच्या जोड्यांचे दिलेल्या योग्य गटांत वर्गीकरण करा.
(चार एकर, चांगले बी, अधिक दाणे, हे बियाणे, आठ जाती, गडद पिवळ्या ओंब्या, हा शेतकरी)
उत्तर:

संख्यावाचक विशेषण गुणवाचक विशेषण सार्वनामिक विशेषण
चार एकर चांगले बी हे बियाणे
अधिक दाणे गडद, पिवळ्या ओंब्या हा शेतकरी
आठ जाती

प्रश्न ४.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. उड्या पडणे.
  2. उदरनिर्वाह करणे.
  3. हेरून ठेवणे.

उत्तर:

  1. तुटून पडणे
  2. पोट भरणे.
  3. नीट पाहून ठेवणे, लक्षपूर्वक पाहणे.

मुक्तोत्तरी प्रश्न

प्रश्न १.
तांदळापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी सर्वांत तुमचा आवडता पदार्थ कोणता? का ते लिहा.
उत्तर:
तांदळापासून बनवले जाणारे सर्वच पदार्थ मला फार आवडतात; पण ‘मोदक’ आणि ‘तांदळाची खीर’ हे दोन पदार्थ मला अत्यंत आवडतात. मोदक उकडताना घरभर दरवळणाऱ्या गोड सुवासामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटते.

मोदकाचा पांढराशुभ्र रंग मला फारच आवडतो. मोदकाच्या आवरणावरील पाकळ्या, आतील गोड सारण पाहून व चव चाखून मन अगदी तृप्त होते. तांदळाची खीर खाताना पांढराशुभ्र भात, ओले खोबरे, गूळ, तूप, नारळाचे दूध, सुकामेवा असे सर्व पदार्थांचे चविष्ट मिश्रण चाखायला मिळते.

Class 6 Marathi Balbharati Chapter 20 Question Answer ओळख थोरांची

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
तुम्ही कधी घरातल्या टाकाऊ वस्तूंवर संशोधन केले आहे का, अनुभव सांगा.

खाशाबा जाधव पाठाचा परिचय

भारताला ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव आणि तांदळाची एचएमटी नावाची जाती शोधून काढणारे संशोधक शेतकरी दादाजी रामजी खोब्रागडे यांचा थोडक्यात परिचय या पाठाद्वारे करून देण्यात आला आहे.

खाशाबा जाधव शब्दार्थ

अनवाणी पायांत चपला न घालता
आखाडा कुस्तीचा सराव जेथे होतो ते मैदा
उरूस जत्रा
काटक मजबूत
छोट्या चणीचा उंचीने लहान, लहान अंगयष्टीचा
टोपणनाव प्रेमाने हाक मारतात ते नाव
तालीम सराव (येथे अर्थ – कुस्तीचा सराव)
दम श्वासावरील ताबा
प्रतिस्पर्धी दुसरा स्पर्धक
मल्ल पहिलवान, कुस्तीपटू


खाशाबा जाधव वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

चीत करणे. आपल्या प्रतिस्पर्धी पहिलवानाला पाठीवर उताणे पाडणे, हरवणे.
तमा न बाळगणे. पर्वा न बाळगणे, फिकीर / काळजी न करणे.
धडे आत्मसात करणे. मनापासून शिकणे.
पट काढणे. आपल्या प्रतिस्पर्धी पहिलवानाचा पाय खेचणे.
श्रीगणेशा होणे. प्रारंभ होणे, सुरुवात होणे.
साधना करणे. खडतर मेहनत करणे, मिळवणे.


खाशाबा जाधव टिपा

ऑलिंपिक एक प्रसिद्ध क्रीडास्पर्धा, जेथे जागतिक स्तरावर विविध देशांचे प्रतिनिधी खेळाडू विभिन्न प्रकारचे खेळ खेळतात.
कराड महाराष्ट्रातील एक जिल्हा.
कांस्यपदक सुवर्णपदक (सोन्याचे), रौप्यपदक (चांदीचे) व कांस्यपदक अशा तीन पदकांच्या गटातील कांस्य धातूपासून बनवलेले पदक.
फिनलँड उत्तर युरोपीय देश.


दादाजी रामजी खोब्रागडे शब्दार्थ

ओंब्या भाताची कणसं
उगवण मातीत रुजवलेले बी उगवणे, तरारून येणे
परिपक्व पिकून तयार होणे, पूर्ण पिकणे
पेरणी नांगरणी नंतरची प्रक्रिया (शेतात बियांची रुजवण करणे)
बियाणे पेरावयाचे बी, धान्याचे बीज
हंगाम मोसम


दादाजी रामजी खोब्रागडे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

उड्या पडणे. तुटून पडणे.
उदरनिर्वाह करणे. पोट भरणे.
हेरून ठेवणे. नीट पाहून ठेवणे, लक्षपूर्वक पाहणे.


दादाजी रामजी खोब्रागडे टिपा

एकर जमीन मोजण्याचे एक परिमाण. (१ एकर = ४० गुंठे जमीन)
एचएमटी तांदळाच्या बियाण्याची एक जात.
कृषिभूषण शेतीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्याला शासनातर्फे दिला जाणारा पुरस्कार.
क्विंटल धान्य मोजण्याचे एक परिमाण. (१ क्विंटल = १०० किलो)
चंद्रपूर महाराष्ट्र राज्यातील विदर्भ प्रांतातला एक जिल्हा.

Leave a Comment