Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 12 Question Answer सलाम नमस्ते for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 12 Question Answer सलाम नमस्ते
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 12 सलाम नमस्ते
सलाम नमस्ते Question Answer
प्रश्न १.
खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.
(अ) लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटते. ________
(आ) माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. ________
(इ) “मॅडम, तुम्हांला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती.’ ________
(ई) त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. ________
(उ) “मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.” ________
उत्तरः
(अ) लेखिकेतील माणुसकी
(आ) शेख महंमदचा प्रेमळपणा.
(इ) झुबेदाची कृतज्ञता
(ई) लेखिकेची दयाळू वृत्ती
(उ) शेख महंमदचा कनवाळूपणा (दुसऱ्याच्या दुःखाविषयीची जाणीव)
प्रश्न २.
स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
१. संकोची वृत्ती
२. समाधानी
३. कष्टाळू वृत्ती
४. प्रामाणिकपणा
प्रश्न ३.
शेख महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते ?
उत्तर:
वरील घटनेचा विचार करता असे वाटते, की माणसाने आपल्यावर कितीही मोठी संकटे आली तरी त्यांना सामोरे जावे, तसेच आपल्या मनाचा तोल ढासळू न देता प्रामाणिकपणे वागावे. शिवाय केवळ आपलेच दुःख, यातना मोठ्या आहेत, असे न मानता दुसऱ्यांच्या दु:खाची जाणीव असणे आणि याबाबत संवेदनशील असणे महत्त्वाचे असते. याचाच अर्थ असा, की माणसाने आपल्यावरील बिकट परिस्थितीतही इतरांचा विचार करून माणुसकीने वागावे.
प्रश्न ४.
लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
i. झुबेदाच्या मृत्यूनंतर शेख आपल्या भाचीला तबस्सुमला घेऊन एके दिवशी लेखिकेच्या ऑफिसमध्ये आला. चौकशीअंती लेखिकेला झुबेदा गेल्याचे समजल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या चार वर्षांच्या तबस्सुमचे लेखिकेला वाईट वाटले.
ii. मामाने तबस्सुमला लेखिकेला सलाम करायला सांगितल्यानंतर तबस्सुमने आपल्या इवल्याशा हातांनी लेखिकेला सलाम केला. तिची निरागसता पाहून लेखिका निःशब्द झाल्या.
iii. तबस्सुमची आई झुबेदा हिची इतर गरजू रुग्णांविषयीची कळकळ पाहून लेखिकेने पैशांचा लिफाफा शेखला परत केला. ते पैसे तबस्सुमच्या शिक्षणासाठी वापरावेत व तबस्सुमनेही इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याबाबतीत आईच्याही पुढे वे अशी अपेक्षा लेखिकेने व्यक्त केली. यासाठी लेखिकेने केव्हाही मदत देण्याचे आश्वासनही दिले.
अशारीतीने, एका अनाथ मुलीविषयी आस्था वाटून तिच्या उज्ज्वल भविष्याकरता मदत करण्यास लेखिकेने तयारी दाखवली.
खेळूया शब्दांशी
• खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.
(१) ऑफिस
(२) हॉस्पिटल
(३) ऑपरेशन
(४) चेक
(५) अॅडव्हान्स
(६) कॅन्सर
उत्तर:
(१) कार्यालय
(२) रुग्णालय
(३) शस्त्रक्रिया
(४) धनादेश
(५) आगाऊ
(६) कर्करोग
विचार करा.सांगा
• या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हांला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा.
• या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा.
माहिती मिळवूया
• गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा.
उत्तर:
गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्थांची माहिती आंतरजालावरून मिळते. त्यापैकी काही संस्था खालीलप्रमाणे:
- सर रतनलाल टाटा ट्रस्ट, मुंबई.
- रिलायन्स फाऊंडेशन
- आशाकिरण चॅरिटेबल ट्रस्ट
- बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट
- सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट.
- प्रधानमंत्री मदतनिधी, महाराष्ट्र.
- हिरानंदानी फाऊंडेशन
- एच. एम. मेहता चॅरिटी ट्रस्ट
- जमनालाल बजाज फाऊंडेशन
- श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट
• खालील स्वभाववैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा.
(गप्पिष्ट, लाजाळू, रागीट, शांत, हजरजबाबी)
• खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
उत्तर:
i. अ. अहाहा ! किती सुंदर मोर आहे.
ब. अरे वा ! मोराचा तुरा रुबाबदार आहे.
ii. अ. अरेरे! हा किती दीनवाणा दिसत आहे !
ब. अगाई ! काय हा अवतार !
• खालील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यये लिहा.
(अ) …………….. काय सुंदर आहे ताजमहाल !
(आ) ……… किती जोरात ठेच लागली !
(इ) ………… किती उंच आहे ही इमारत !
उत्तर:
(अ) अहाहा!
(आ) अगाई!
(इ) अबब!
वाचा.
• खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उताऱ्यास योग्य शीर्षक दया.
वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या, “आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढंच नव्हे, तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. आपल्याला अवांतर वाचन करायला, मैदानावर खेळायला आवडत असेल, मित्रांची संगत, सोबत भावत असेल, तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्त्व फुलवण्यात साहाय्यक ठरतात. घरातल्या वातावरणाचा, संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना, प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं, त्या घरातील मुलं स्वतंत्र विचारांची व ठाम व्यक्तिमत्त्वाची होतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते.
याउलट काही मुलं फार आक्रमक असतात. ‘मी म्हणेन तेच खरं’ अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा, बेफिकीर वृत्ती जाणवते. ती कायम ढेपाळलेली, अरसिक, रूक्ष व निरुत्साही, घाबरलेली, चिंतित असतात. अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत व मनमोकळेपणानं वावरू शकत नाहीत.
तुम्हांला तुमचं व्यक्तिमत्त्व कसं घडवायचं आहे, हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वत:ला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं, की अरसिक, बेजबाबदार बनवायचं; स्वत:चे विचार व्यक्त करायला शिकायचं, की दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं ; दिलखुलास जगायचं की रडतखडत, घाबरत घाबरत जगायचं, तुम्हीच ठरवा, स्वतःला कसं घडवायचं.”
Class 7 Marathi Balbharati Chapter 12 सलाम नमस्ते Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
- शेख महंमदच्या दुकानाची जागा ……. होती. (स्वत:ची, लेखिकेची, भाड्याची)
- लेखिकेने शेखच्या हातावर ………. ठेवली. (मिठाई, बिस्किटे, चकली)
- लेखिकेने शेख महंमदला ……… चेक लिहून दिला. (दहा हजारांचा, पन्नास हजारांचा, एक लाखाचा)
- शेखचा चेहरा ………. दिसत होता. (दुःखी, हसरा, प्रफुल्लित)
- लिफाफ्यात, ……….. रुपये होते. (पन्नास हजार, पाच हजार, तीन हजार)
उत्तरः
- भाड्याची
- मिठाई
- पन्नास हजारांचा
- दुःखी
- तीन हजार
प्रश्न २.
खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
- शेख महंमदचं फार मोठं दुकान होतं.
- शेखचं स्वत:चं छोटसं घर होतं.
- झुबेदाच्या ऑपरेशनसाठी लेखिकेने फाऊंडेशनद्वारे मदत केली.
- शेख ऑपरेशनच्या खर्चातून उरलेले पैसे देण्यासाठी लेखिकेच्या ऑफिसमध्ये आला.
उत्तर:
- असत्य
- असत्य
- सत्य
- सत्य
प्रश्न ३.
पाठातील खालील प्रसंग क्रमाने लिहा.
- लेखिकेने शेख महंमदच्या घरी अॅडव्हान्स चेक पाठवून दिला.
- लेखिकेने पैशांचा लिफाफा परत केला.
- शेख हॉस्पिटलची कागदपत्रे घेऊन लेखिकेच्या ऑफिसात आला.
- लेखिकेने शेखच्या हातावर मिठाई दिली.
- शेख तबस्सुमला घेऊन लेखिकेच्या ऑफिसात आला.
उत्तर:
- लेखिकेने शेखच्या हातावर मिठाई दिली.
- लेखिकेने शेख महंमदच्या घरी अॅडव्हान्स चेक पाठवून दिला.
- शेख हॉस्पिटलची कागदपत्रे घेऊन लेखिकेच्या ऑफिसात आला.
- शेख तबस्सुमला घेऊन लेखिकेच्या ऑफिसात आला.
- लेखिकेने पैशांचा लिफाफा परत केला.
प्रश्न ४.
कोण कोणास व का म्हणाले ते लिहा.
i. “माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त.”
उत्तर:
असे शेख महंमद लेखिकेला म्हणाला. जेव्हा लेखिकेने त्याला मिठाई दिली तेव्हा ती मिठाई पाहून आपली मुलगी व भाची
या लहानग्यांना अधिक आनंद होईल असे वाटल्याने शेख महंमद असे म्हणाला.
ii. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.”
उत्तर:
असे शेख महंमद लेखिकेला म्हणाला, कारण शेख महंमद हा माणुसकीने वागणारा व समाधानी माणूस होता, त्याला दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव होती. लेखिकेने झुबेदाच्या ऑपरेशनच्या पैशांबाबत विचारपूस करून मदतीची तयारी दाखवली तेव्हा शेखने आपल्यापेक्षा इतरांचा विचार केला, म्हणून वरील उद्गार काढले.
iii. बेटी, मॅडम को सलाम करो!”
उत्तर:
शेख आपल्या भाचीला, तबस्सुमला घेऊन लेखिकेच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याने तिला लेखिकेस अभिवादन करण्यासाठी सलाम करण्यास सांगितले. लेखिकेबद्दलची कृतज्ञता त्याने आपल्या भाचीलाही व्यक्त करण्यास सांगितले.
प्रश्न ५.
स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
i.
उत्तर:
१. कष्टाळू
२. सहनशील
३. निःस्वार्थी
४. कृतज्ञ
५. प्रामाणिक
६. कनवाळू
प्रश्न ६.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. शेखच्या घरी कोणकोण राहत होते ?
उत्तर:
शेखच्या घरी शेख, शेखची बायको, त्यांची एक मुलगी, त्यांची बहीण झुबेदा व तिची मुलगी तबस्सुम राहत होते.
ii. फाऊंडेशनच्या मदतीबाबत लेखिकेचा कोणता आग्रह होता ?
उत्तर:
मदत न मिळाल्यास एखादी व्यक्ती आयुष्यातून उठेल असे वाटले, तर त्याच व्यक्तीला फाऊंडेशनने मदत करण्याबाबत लेखिकेचा आग्रह होता.
iii. शेखने लेखिकेकडे अॅडव्हान्स चेक कशासाठी मागितला ?
उत्तर:
शेखची विधवा बहीण झुबेदा हिला कॅन्सर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी तिचे ऑपरेशन असल्यामुळे शेखने लेखिकेकडे अॅडव्हान्स चेक मागितला.
iv. शेखने झुबेदाच्या ऑपरेशनसाठी पैशांची कशी सोय केली?
उत्तर:
शेखने झुबेदाचे व स्वतःच्या बायकोचे सर्व दागिने विकले आणि बँकेकडून कर्ज घेऊन झुबेदाच्या ऑपरेशनसाठी पैशांची सोय केली.
v. लेखिकेला कोणत्या गोष्टीने विस्मयचकित केले?
उत्तर:
अत्यंत गरिबीत असताना आणि आजारामुळे होणाऱ्या वेदना सहन करत असतानाही झुबेदाने दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार केला होता व उरलेले पैसे परत पाठवले होते. या गोष्टीने लेखिकेला विस्मयचकित केले.
प्रश्न ७.
थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीस खालील प्रस्तावना जोडता येईल.
प्रस्तावना: ‘सलाम – नमस्ते !’ या पाठात लेखिका सुधा मूर्ती यांनी शेख महंमद व त्याची बहीण झुबेदा यांच्यातील प्रामाणिकपणा, निःस्वार्थ व समाधानी वृत्ती यांचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे.)
i. शेख महंमदच्या आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर:
लेखिकेच्या ऑफिसजवळ शेख महंमदचे छोटेसे भाड्याचे दुकान होते व तेथे तो वह्यांची किरकोळ विक्री करत असे. तो आर्थिकदृष्ट्या गरीब होता. त्याच्या कुटुंबामध्ये स्वतः शेख, त्याची बायको, लहान मुलगी, त्याची विधवा बहीण झुबेदा आणि तिची लहान मुलगी तबस्सुम असे पाच जण राहत होते. ते एका लहान भाड्याच्या घरात राहत होते. अत्यंत गरीब परिस्थितीमुळे शेखची बायको व त्याची बहीण झुबेदा दोघी मिळून शिवणाचा व्यवसाय करत असत. असे असले तरीही ते सर्वजण समाधानी होते.
ii. फाऊंडेशनची मदत घेण्याबाबत लेखिकेला इतर लोकांचे कोणते अनुभव आले होते ?
उत्तर:
फाऊंडेशनची मदत घेऊन गोरगरिबांसाठी निधी मिळावा म्हणून ऑफिसमध्ये येताना काही बायका स्वत:च्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून ठेवतात, तर काही श्रीमंत कुटुंबातील पालक स्वतःच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून आपली मुलं अनाथ असल्याचे सांगतात, तसेच काहीजण आपल्या आईला निराधार ठरवून फाऊंडेशनची मदत घेण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय, ज्यांना फाऊंडेशनने मदत केली आहे असे लोक मदत घेऊन संकट दूर झाल्यानंतर फाऊंडेशनशी बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. अशा विविध प्रकारचे अनुभव लेखिकेला इतर लोकांसबंधी आले होते.
iii. लेखिकेने तबस्सुमचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
बहीण झुबेदाच्या मृत्यूनंतर एके दिवशी शेख आपली भाची तबस्सुम हिला घेऊन लेखिकेच्या ऑफिसमध्ये आला होता.
त्यावेळी लेखिकेने तबस्सुमला पाहिले. ती चार वर्षांची मुलगी होती. तिने साधाच सुती फ्रॉक घातला होता; परंतु तो साधा फ्रॉकही बटणं व झालरी लावलेला असल्याने सुरेख दिसत होता. तिच्या केसांना खूप तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. मोठे ऑफिस व अनोळखी माणसे यांमुळे तबस्सुम बावरलेली होती. अशा शब्दांत लेखिकेने तबस्सुमचे वर्णन केले आहे.
प्रश्न ८.
का ते लिहा.
i. लेखिकेचे मन हेलावले.
उत्तर:
जेव्हा लेखिकेने शेखला फोन करून त्याच्याकडे झुबेदाच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांच्या व्यवस्थेबाबत विचारणा केली, तेव्हा शेखने आपली बायको व बहीण झुबेदा यांचे दागिने विकल्याचे सांगितले. माझ्याकडे मदत का नाही मागितली असे लेखिकेने विचारता, शेखने या मदतीची निकड स्वतःपेक्षा इतरांना अधिक असल्याचे सांगितले. शेखचे हे उत्तर ऐकून कठीण प्रसंगीही शेखची समाधानी वृत्ती व त्याला असलेली इतरांच्या दुःखाची जाणीव पाहून लेखिकेचे मन हेलावले.
ii. शेखने लिफाफा दिल्यानंतर लेखिका थक्क झाली.
उत्तर:
शेखने लिफाफा दिल्यानंतर लेखिकेने तो उघडून पाहिला असता त्यामध्ये तीन हजार रुपये होते. यामुळे लेखिका गोंधळून गेल्याचे लक्षात येताच, शेखने त्याबाबत खुलासा केला. झुबेदाला जेव्हा समजले, की आता काही आपण वाचू शकणार नाही, तेव्हा तिने औषधोपचाराचे उरलेले पैसे लेखिकेला परत करण्यास सांगितले, कारण हे पैसे कुणा गरजूला त्याच्या आजारात उपयोगी पडले, तर त्याचे प्राणही वाचू शकतील असे तिला वाटले.
लेखिका झुबेदाला कधीही भेटली नव्हती; परंतु एवढ्या मोठ्या आजारातही इतरांचा विचार करण्याची झुबेदाची वृत्ती व कळकळ पाहून लेखिका थक्क झाली.
iii. झुबेदासारख्या लोकांमुळेच आपल्या भूमीचे ऐश्वर्य वाढणार आहे, असे लेखिका म्हणाली.
उत्तर:
गरिबी व कॅन्सरसारख्या आजारामुळे यातना होत असूनही झुबेदाने उपचाराचे उरलेले पैसे इतर रुग्णांसाठी परत केले. तिची सहनशीलता, समाधानी वृत्ती व दुसऱ्यांविषयीची कळकळ पाहून अशी माणसे जगात फारच कमी असतात असे लेखिकेला वाटले. जात, धर्म, शिक्षण यांपेक्षाही हृदयातील करुणा अधिक महत्त्वाची आहे, तसेच अशा लोकांमुळेच परस्पर सहकार्याने देशातील समस्या दूर होऊन देश मोठा बनतो, त्यामुळे अशी माणसेच देशाची खरी संपत्ती आहेत असे लेखिकेचे मत असल्याने, ‘झुबेदासारख्या लोकांमुळेच आपल्या भूमीचे ऐश्वर्य वाढणार आहे’ असे लेखिका म्हणाली.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- संकोची =
- मेहेरबानी =
- कळकळ =
- यातना =
- करुणा =
- समाधान =
- कुटुंब =
- उदास =
उत्तर :
- लाजाळू, भिडस्त
- कृपा, उपकार
- आस्था
- वेदना, दुःख
- दया
- संतुष्टी
- परिवार
- हताश, निराश
प्रश्न २.
पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- किरकोळ ×
- विक्री ×
- समाधानी ×
- अनाथ ×
- सधन ×
- निराधार ×
- दुर्मीळ ×
उत्तर:
- घाऊक
- खरेदी
- असमाधानी, असंतुष्ट
- सनाथ
- निर्धन, गरीब
- साधार
- मुबलक
प्रश्न ३.
पुढील शब्दांचे लिंग बदला.
i. भाची
उत्तर:
भाचा
ii. बायको
उत्तर:
नवरा
iii. बहीण
उत्तर:
भाऊ
iv. बेटी
उत्तर:
बेटा
प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला.
i. वही
उत्तर:
वया
ii. महिने
उत्तर:
महिना
iii. बातमी
उत्तर:
बातम्या
iv. हात
उत्तर:
हात
प्रश्न ५.
‘दर’ हा उपसर्ग वापरून नवीन शब्द तयार करा. जसे – दरवर्षी
उत्तरः
- दरसाल
- दरमजल
- दररोज
- दरमहा
- दरशेकडा
- दरदिवशी
- दरवेळी
प्रश्न ६.
पाठात ‘वान’ व ‘दार’ हे दोन प्रत्यय वापरून शब्द आले आहेत. या प्रत्ययांचा वापर करून प्रत्येकी चार नवीन शब्द
तयार करा.
i.
ii.
उत्तर:
i. १. नशीबवान
२. धनवान
ii. १. दुकानदार
२. रखवालदार
ii.
१. दारवान
२. गुणवान
३. खजिनदार
४. भालदार
प्रश्न ७.
खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.
- बँक
- फाऊंडेशन
- रिसेप्शन काऊंटर
- सॉरी
- प्लीज
उत्तर:
- पतपेढी
- स्थापित संस्था
- स्वागत कक्ष
- क्षमस्व
- कृपया
प्रश्न ८.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचे वाक्यांत रूपांतर करा.
i. गोडी असणे – आवड असणे.
वाक्य: बहुतेक लहान मुलांना चॉकलेटची फार गोडी असते.
ii. मेहेरबानी असणे – कृपा असणे.
वाक्यः शेतकऱ्यांची आपल्यावर मेहेरबानी असल्यामुळेच आपल्याला अन्न मिळते.
iii. हृदयाला स्पर्श करून जाणे – मनाला भिडणे.
वाक्यः देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील शिरीषकुमारच्या बलिदानाची गोष्ट हृदयाला स्पर्श करून जाते.
iv. मन हेलावणे – दुःख वाटणे.
वाक्यः ऊन-पावसात रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबांची जगण्यासाठीची धडपड पाहून माझे मन हेलावले.
v. मनावर न घेणे – दुर्लक्ष करणे.
वाक्य : घरातील मोठी माणसे, लहान मुलांमधील भांडणे फारशी मनावर घेत नाहीत.
vi. कष्ट न घेणे – श्रम करण्याचे टाळणे.
वाक्यः कष्ट न घेता यशस्वी होणे अशक्य असते.
vii. पाऊल टाकणे – प्रवेश करणे.
वाक्य:प्रथमच बालवर्गात पाऊल टाकणारी लहान मुलं पहिल्या दिवशी खूप घाबरतात.
प्रश्न ९.
कंसातील वाक्प्रचार योग्य ठिकाणी वापरून वाक्ये पूर्ण करा.
(पचनी पडणे, मन उदास होणे, आयुष्यातून उठणे, झुंज देणे, थक्क होणे, तोंडून शब्द न फुटणे)
- १९९३ च्या लातूरमध्ये झालेल्या भूकंपात बरीचशी कुटुंबे …………
- अंध विदयार्थ्यांची ती कलाकृती पाहून माझ्या …………
- ऐतिहासिक वास्तूचे प्रत्येक बारकावे पाहत असता आपण …………
- एव्हरेस्ट पर्वत सर करणारा प्रत्येक गिर्यारोहक वादळी वाऱ्याशी ………… शिखर सर करतो.
- दटावण्यापेक्षा शांतपणे सांगितलेल्या शहाणपणाच्या गोष्टी लहानांच्या सहज ………..
- माहेरच्या आठवणीने सासरी आलेल्या सावित्रीचे………..
उत्तरः
- आयुष्यातून उठली.
- तोंडून शब्द फुटले नाहीत.
- थक्क होतो.
- झुंज देत.
- पचनी पडतात.
- मन उदास झाले.
प्रश्न ११.
खालील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यये लिहा.
- ……….! तो असे म्हणालाच नाही !
- …….! सुमेध, चांगले काम केलेस !
- ……….! काय छान गातो सुनीत !
- ……..! मला हे अजिबात आवडलं नाही !
- ……….! तो सिंह पहा !
उत्तर:
- अंहं!
- शाब्बास!
- वा!
- छे!
- बापरे!
प्रश्न १२.
हे शब्द असेच लिहा.
माणुसकी, ऑफिस, संकोची, बहीण, मिठाई, फाऊंडेशन, आग्रह, आश्चर्य, लिफाफा, विस्मयचकित
आकारिक मूल्यमापन
लेखी कार्य
प्रश्न १.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ५९ वरील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उताऱ्यास योग्य शीर्षक दया.
उत्तर:
परिच्छेद १ (वर्गातील मुलांना बाई …… सहाय्यक ठरतात.)
परिच्छेद २ (घरातल्या वातावरणाचा …… वावरू शकत नाहीत.)
परिच्छेद ३ (तुम्हांला तुमचं ……. स्वतःला कसं घडवायचं.)
शीर्षक – घडण व्यक्तिमत्वाची.
(टीप: विदयार्थी याहून वेगळे शीर्षक देऊ शकतात.)
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न १.
माहिती मिळवा. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ५५)
तुमच्या परिसरातील गरजू, अनाथ, अपंग इत्यादी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांविषयी माहिती मिळवा.
(वरील उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
सलाम नमस्ते पाठाचा परिचय :
प्रस्तुत पाठ प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या ‘पुण्यभूमी भारत’ या कथासंग्रहातून घेतला आहे. यामध्ये शेख महंमद व कॅन्सरमुळे मृत्यूच्या दारात उभी असलेली त्याची बहीण झुबेदा यांची ही छोटीशी कथा आहे. अतिशय गरीब परिस्थितीतही कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा, माणुसकी व इतरांच्या दुःखाविषयीची जाणीव शेख महंमद व झुबेदाच्या ठायी आहे. त्याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन लेखिकेने केले आहे.
सलाम नमस्ते शब्दार्थ
सलाम नमस्ते वाकप्रचार व त्यांचे अर्थ
सलाम नमस्ते टिपा
कुड्या | स्त्रियांनी कानात घालण्याचा एक दागिना. |
कॅन्सर | कर्करोग, काही कारणांस्तव शरीरातील पेशींची संख्या अनियमितपणे वाढल्याने होणारा आजार. |
पोनीटेल | लहान घोड्याच्या शेपटासारखी दिसणारी एक प्रकारची केशरचना. |
मधुमेह | माणसाच्या शरीरात रक्तातील शर्करेचे / साखरेचे संतुलन बिघडल्याने होणारा आजार. |
विधवा | जिच्या पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री. |