Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख

Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 14 Question Answer कवितेची ओळख for exam preparation.

Std 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख

Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 14 कवितेची ओळख

कवितेची ओळख Question Answer

प्रश्न १.
खालील चौकटी पूर्ण करा.

(अ) आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ – _______
(आ) सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत – _____
(इ) बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण – _____
(ई) कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण – _______
उत्तर:
(अ) आकलनशक्ती वाढवणे.
(आ) कवितेत संभाषण करणे.
(इ) कवितांचा लळा लागावा म्हणून.
(ई) सुधीरला कवितांचा लळा लागला म्हणून.

प्रश्न २.
पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा.

Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख

प्रश्न ३.
या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा.
उत्तर:
कवितेचा प्रकल्प

एकदा सुधीरला शाळेत बाईंनी ‘काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न’ या विषयावर प्रकल्प तयार करण्यास सांगितले. सुधीरला मोठा प्रश्न पडला, की इतक्या अवघड विषयावर प्रकल्प कसा बरे करायचा? तो याच विचारात घरी पोहोचला. त्याची विचारमुद्रा पाहून आजोबांनी त्याला काय झाले ते विचारले. विषय कळताच आजीने सुधीरला विषय समजावून सांगितला. मग घरातल्या सर्वांनी मिळून सुधीरची मदत करायचे ठरवले.

त्यासाठी त्यांनी रोजचे संभाषण कवितेत, यमक जुळवून करायला सुरुवात केली. सुरुवात आजी-आजोबांनी केली. मग सुधीरलाही त्यातली गंमत उमगली. त्यानेही कवितेतील संभाषणात सहभाग घेतला. पाहता पाहता सुधीरचे आई आणि बाबाही संभाषणात सामील झाले; एवढेच काय, पण अचानक आलेल्या ताईनेही या संभाषणात उत्साहाने सहभाग घेतला. तिने तर कवितेतूनच त्याला कवितेबद्दल उपदेशही केला.

सुधीर हे सर्व लिहून घेतले आणि पाहता पाहता त्याचा प्रकल्प आकाराला येत होता; परंतु सुधीरच्या बाबांच्या लक्षात आले, की एवढ्याने काही सुधीरची हौस पूर्ण होणार नाही, म्हणून त्यांनी ऑफिसमधून येताना कवितांची काही पुस्तके सुधीरसाठी आणली. सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून त्यांनी ती त्याच्या हातात दिली.

पुस्तके मिळताच सुधीरने एकेक करून सर्व पुस्तके वाचली. त्याला तल्लीनतेने वाचताना पाहून घरातल्या सर्वांना त्याचे कौतुक वाटले. सुधीरने शांता शेळकेंची ‘बाग’ कविता, नारायण सुर्वेची ‘गिरणी’ कविता, गदिमांची ‘घर’ आणि बालकवींची ‘फुलराणी’ या कविता वाचल्यावर तो इतका भारावला, की त्याने उत्स्फूर्तपणे कविता केली. ती ऐकताच घरातल्या सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या व त्याचे कौतुक केले.

अशाप्रकारे, सुधीरचा प्रकल्प केवळ त्याच्या वहीतच नव्हे, तर त्याच्या अभिरुचीतही उमटला होता.

प्रश्न ४.
‘आम्ही चित्र काढतो’ या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा.

प्रश्न ५.
पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.

प्रश्न ६.
खालील आकृती पूर्ण करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख 2
उत्तर:
१. शांता शेळके
२. नारायण सुर्वे
३. गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा)
४. बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

चर्चा करूया.

• तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल ?
• तुम्ही ‘काव्यवाचना’चा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हांला कसा वाटला, याबाबत मित्रांशी चर्चा करा.

खेळूया शब्दांशी.

• खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख 5
(अ) खो देणे.
(आ) पाश सोडणे.
(इ) हेका धरणे.
(ई) भावनांचे मोहोळ चेतवणे.
उत्तर:
(अ) नकार देणे.
(आ) बंधनातून मुक्त होणे.
(इ) हट्ट करणे.
(ई) भावना जागृत करणे.

खेळ खेळूया

(अ) खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा.

(अति तिथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली)

(अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. _______
(आ) एखादयाकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले, की त्याला सोडून दयायचे. _____
(इ) सर्वत्र परिस्थिती समान असणे. _____
(ई) थोडे थोडे जमवून संचय करणे. ____
(उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे.
(ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो.
(ए) `न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती पसंत पडत नाही.
उत्तर:
(अ) गर्वाचे घर खाली.
(आ) कामापुरता मामा.
(इ) पळसाला पाने तीनच.
(ई) थेंबे थेंबे तळे साचे.
(उ) आगीतून उठून फुपाट्यात पडणे.
(ऊ) अति तिथे माती.
(ए) नावडतीचे मीठ अळणी.

Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख

(आ) खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा.

(१) आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.
(२) सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही.
(३) एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला.
दूरध्वनीवर ते मला म्हणाले, “सर, आपण आमच्या शाळेला भेट दया.” मी त्यांना विचारले, “काय भेट देऊ?” ते शिक्षक म्हणाले, “ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा.”
उत्तर:
(१) जर साडीच्या किनारीस जर नसेल, तर मी साडी खरेदी करतच नाही.
(२) सर वीज संचारल्यासारखे उंच शिखर सर करून आले.
(३) कितीही प्रयत्न कर; पण कर काही कमी होत नाही.
मैदानातून जाताना मला जोरात चेंडू लागला, तेव्हा मला औषधच लावावे लागले.

विचार करा. सांगा.

• तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल. यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला, त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्यांचा ओघतक्ता बनवा.
(हा उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)

आपण समजून घेऊया.

• वाक्य म्हणजे काय, हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत.

(१) विधानार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.

(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(आ) तो रोज व्यायाम करत नाही.
या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.

(२) प्रश्नार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) तुला लाडू आवडतो का ?
(आ) तुम्ही सकाळी कधी उठता?
या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.

(३) उद्गारार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) अरेरे! फार वाईट झाले.
(आ) शाबास ! चांगले काम केलेस.
या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.

(४) आज्ञार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) मुलांनो, रांगेत चला.
(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.
या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.

• वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.

शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांना वाक्यांचे प्रकार समजावून सांगावेत. विविध उदाहरणे देऊन वाक्य प्रकार ओळखण्यास सांगावे. अधिकाधिक सराव करून घ्यावा.

कविता करूया.

• पाठामधील सुधीरचा प्रकल्प तुम्ही पूर्ण झालेला पाहिला. सगळ्यांच्या मदतीने त्याने कविता तयार करण्याचा प्रयत्न केला. शेवट समान असणारे शब्द त्याने शोधले. फक्त शेवट समान असणारे शब्द वापरणे म्हणजे कविता
करणे नव्हे. त्यासाठी ज्या विषयावर कविता करायची तो विषय समजून घेऊन त्या विषयाशी संबंधित गोष्टींचा विचार करता यायला हवा. त्यासाठी खाली दिलेले संकल्पना चित्र अभ्यासा.

Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख 6

Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख 7

वरील शब्दांना गुंफून आपल्याला छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये तयार करता येतात. त्याचप्रमाणे शेवटी समान शब्द आल्यामुळे गेयता असलेली वाक्येही तयार होतात.

वरील शब्दांचा वापर करून तुम्हांला अशा काव्यात्मक ओळी तयार करता येतात का ते पाहा. प्रयत्न करा व छानशी कविता तयार करा.

Class 7 Marathi Balbharati Chapter 14 कवितेची ओळख Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.
(यमक, मळा, संभाषण, मोहोळ, पाऊस, आकलनशक्ती)

  1. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली ………. वाढवणे, म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणे.
  2. आपण आजपासून कवितेत ………… करायचं.
  3. सुधीर तू लिहून घे नीट, ……… जुळायला हवे फिट.
  4. बस झाला कवितांचा ………., अशाने थोडीच पूर्ण होणार हौस.
  5. हा घे थोरांच्या कवितांचा …….. वाचून लागेल तुला कवितांचा लळा.
  6. चेतवले भावनांचे ………. तुमच्या मनी.

उत्तर:

  1. आकलनशक्ती
  2. संभाषण
  3. यमक
  4. पाऊस
  5. मळा
  6. मोहोळ

प्रश्न २.
सत्य की असत्य ते लिहा.

  1. त्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर सुधीर दंगामस्ती करत होता.
  2. सुधीरची आजी रात्रीच्या जेवणासाठी बटाट्याची भाजी करणार होती.
  3. सुधीरच्या बाबांनी त्याला कवितांची काही पुस्तके आणून दिली.

उत्तर:

  1. असत्य
  2. असत्य
  3. सत्य

Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख

प्रश्न ३.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.

i. आज बाईंनी शाळेत आम्हांला ‘काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न’ हा प्रकल्प दिलाय.
उत्तरः
असे सुधीर आजोबांना म्हणाला.

ii. आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांदयाची पात.
उत्तरः
असे आजोबा आजीला म्हणाले.

iii. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश.
उत्तर:
असे आजी सुधीरच्या बाबांना म्हणाली.

iv. तुम्हांला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही.
उत्तर:
असे आजी आजोबांना म्हणाली.

v. अंघोळ कर पटकन, नाष्टा कर चटकन. झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला.
उत्तरः
असे ताई सुधीरला म्हणाली.

vi. हा घे थोरांच्या कवितांचा मळा,
वाचून लागेल तुला कवितेचा लळा.
उत्तर:
असे बाबा सुधीरला म्हणाले.

प्रश्न ६.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. सुधीरच्या बाईंनी. त्याला कोणत्या विषयावर प्रकल्प करायला सांगितला होता ?
उत्तरः
सुधीरच्या बाईंनी त्याला ‘काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न’ या विषयावर प्रकल्प करायला सांगितला होता.

ii. आजोबा सुधीरला काय आणून दयायला सांगतात ?
उत्तर:
आजोबा सुधीरला दातांची कवळी आणून दयायला सांगतात.

iii. शिवणकाम कोण शिकले आहे?
उत्तर:
सुधीरची आई शिवणकाम शिकली आहे.

iv. थंडीपासून बचावासाठी आजी आजोबांना काय काय दयायला सुचवते?
उत्तरः
थंडीपासून बचावासाठी आजी आजोबांना स्वेटर, मफलर आणि कानटोपी दयायला सुचवते.

v. कामामुळे कंटाळलेले बाबा कोणते पाणी मागतात?
उत्तर:
कामामुळे कंटाळलेले बाबा वाळा टाकलेले पाणी मागतात.

vi. आईने बाबांना कोणते काम सांगितले?
उत्तर:
आईने बाबांना सुधीरच्या डब्यासाठी बटाटे चिरायला सांगितले.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. कविता =
  2. संभाषण =
  3. अंघोळ =
  4. घर =
  5. रात्र =
  6. सूर्य =
  7. माया =

उत्तर:

  1. काव्य
  2. संवाद
  3. स्नान
  4. गृह, सदन
  5. रजनी, यामिनी
  6. भास्कर, दिनकर
  7. प्रेम, लोभ

प्रश्न २.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. शांत ×
  2. रडणे ×
  3. धीट ×
  4. गार ×

उत्तर:

  1. अशांत
  2. हसणे
  3. भित्रा
  4. गरम

प्रश्न ३.
खालील शब्दांचे लिंग ओळखा.

  1. शाळा
  2. कविता
  3. कांदा
  4. दही
  5. काठी
  6. माया
  7. सूर्य

उत्तर:

  1. स्त्रीलिंग
  2. स्त्रीलिंग
  3. पुल्लिंग
  4. नपुंसकलिंग
  5. स्त्रीलिंग
  6. स्त्रीलिंग
  7. पुल्लिंग

प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला.

i. कविता
उत्तर:
कविता

ii. कागद
उत्तर:
कागद

iii. सांजवात
उत्तर:
सांजवाती

iv. सूर्य
उत्तर:
सूर्य

v. चिमण्या
उत्तर:
चिमणी

प्रश्न ५.
संभाषण या शब्दासारखे ‘सं’ ने सुरू होणारे आणखी शब्द शोधा आणि लिहा.
उत्तर:
संकलन, संचालन, संपादन, संगणन, संवेदन, संवर्धन, संघटन, संप्रेषण.

प्रश्न ६.
‘आकलनशक्ती’ या शब्दासारखे आणखी जोडशब्द शोधा आणि लिहा.
उत्तर:
कल्पनाशक्ती, इच्छाशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती, मन:शक्ती इ.

Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख

प्रश्न १०.
विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
उत्तर:
i. विधानार्थी वाक्ये:
अ. यावर्षी पाऊस खूप लवकर सुरू झाला.
ब. मला कविता करायला आवडते.
क. बागेत विविध रंगांची सुंदर फुले बहरली होती. ड.
ड. मे महिन्याच्या सुट्टीत मी आजीच्या गावाला गेले होते.

ii. प्रश्नार्थी वाक्ये:
अ. तू दररोज शाळेत जातोस का?
ब. आपली सहल कधी जाणार आहे ?
क. यावर्षी पंधरा ऑगस्ट कोणत्या वारी आला आहे?
ड. मी पण येऊ का तुमच्यासोबत ?

iii. उद्गारार्थी वाक्येः
अ. बापरे ! केवढा मोठा साप !
ब. अरेच्चा ! तू इतक्या लवकर आलास.
क. वा ! किती सुंदर दृश्य आहे हे.
ड. अहं ! मला नकोय लाडू.

iv. आज्ञार्थी वाक्येः
अ. रस्त्यावरून चालताना डाव्या बाजूने चाला.
ब. मुलांनो, शाळेत वेळेवर या.
क. बागेतील फुले तोडू नका.
ड. जेवणाआधी हात स्वच्छ धुवा.

प्रश्न ११.
हे शब्द असेच लिहा.
काव्यप्रतिभा, आकलनशक्ती, संभाषण, शुभंकरोती, सांजवात, बाजी, यमक, लळा, फुलराणी, मोहोळ.

कवितेची ओळख पाठाचा परिचयः

‘कवितेची ओळख’ या एकांकिकेत लेखिका शारदा दराडे यांनी काव्यरूपी संभाषणातील गंमत मांडली आहे. सुधीरला ‘काव्यप्रतिभा’ विषयावरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातले कशाप्रकारे साहाय्य करतात ते या एकांकिकेत पाहावयास मिळते.

कवितेची ओळख शब्दार्थ

Class 7 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer कवितेची ओळख 1

कवितेची ओळख वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

पाश तोडणे. बंधनातून मुक्त होणे.
हेका धरणे. हट्ट करणे.


कवितेची ओळख टिपा

गदिमा कवी आणि लेखक गजानन दिगंबर माडगूळकर.
‘बाग’, ‘गिरणी’, ‘घर’, ‘फुलराणी’ अनुक्रमे शांता शेळके, नारायण सुर्वे, गजानन दिगंबर माडगूळकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या प्रसिद्ध कविता.
बालकवी कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे.
शांताबाई कवयित्री शांता शेळके.
सुर्वे कवी नारायण सुर्वे.

Leave a Comment