Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 4 Question Answer श्रावणमास (कविता) for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer श्रावणमास (कविता)
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 4 श्रावणमास (कविता)
श्रावणमास (कविता) Question Answer
प्रश्न १.
खालील प्रसंगी काय घडते ते लिहा.
उत्तर:
प्रसंग | काय घडते |
i. पहिला पाऊस आल्यावर | तापलेली धरणी शांत होते. मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. |
ii. सरीवर सरी कोसळल्यावर | सृष्टी ओलीचिंब होते. वृक्षराजी हिरवीगार होते. |
प्रश्न २.
निरीक्षण करा व लिहा.
उत्तर:
प्रश्न ३.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
१. हरीण, खिल्लारे
२. बगळे, पाखरे
३. पारिजात, केवडा, सुवर्णचंपक (सोनचाफा)
प्रश्न ४.
‘सुंदर बाला या फुलमाला’ या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे
पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.
उत्तर:
- ‘तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.’
- ‘सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.’
- ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे’
- ‘उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा’
- ‘फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती’
- ‘सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती’
- ‘देवदर्शना निघती ललना हर्ष माझा हृदयात’
प्रश्न ५.
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा.
(अ) क्षणात पाऊस पडतो, तर क्षणात ऊन पडते.
उत्तर:
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
(आ) झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.
उत्तर:
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.
(इ) हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात, बागडत आहेत.
उत्तर:
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.
प्रश्न ६.
कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
उत्तर:
श्रावण महिन्यात सूर्य, ढगांसोबत जणू काही लपाछपी खेळत आहे असे वाटते. कधी ऊन, तर कधी पाऊस असा रम्य खेळ सुरू असतो. पावसाच्या सरींनी न्हाऊन निघालेली सृष्टी हिरवीगार होते. सृष्टीचे हे विलोभनीय रूप डोळ्यांना सुखावणारे असते, म्हणूनच मनही उल्हासित होते.
खेळूया शब्दांशी
प्रश्न १.
खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
१. बासरी =
२. स्त्रिया =
३. आकाश =
४. मेघ =
५. गुराखी =
६. पृथ्वी
७. वृक्ष =
८. मुख =
९. राग =
उत्तर:
१. पावा
२. ललना
३. नभ
४. जलद
५. गोप
६. अवनी, धरणी
७. तरु
८. वदन
९. रोष
प्रकल्प :
बालकवींच्या आणखी निसर्गकविता मिळवा. त्यांतील तुम्हांला आवडलेली कविता परिपाठात तालासुरांत सादर करा. बालकवींच्या कवितांचा संग्रह करा.
खेळ खेळूया.
• खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हांला उतरून दाखवल्या आहेत. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हांला उतरायच्या आहेत.
उत्तर:
१. नेता
२. तारीख
३. खग
४. गगन
५. नयन
६. नवल
लिहिते हेऊया
• श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
श्रावण – वैशाख
- श्रावणात सृष्टी हिरवीगार असते. – वैशाखात वातावरण उष्ण व तप्त असते.
- आकाशात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. – सर्वत्र रखरखाट असतो.
- पावसाचे पाणी पिऊन झाडे-वेली तजेलदार दिसतात. – कडक उन्हाने झाडे-वेली कोमेजलेली, सुकून गेल्यासारखी दिसतात.
- वातावरण आल्हाददायक असते. – उष्णतेने साऱ्या अंगाची काहिली होत असते.
आपण समजून घेऊया
• मागील इयत्तेत आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या विकारी शब्दांचा अभ्यास केला आहे.
या इयत्तेत आपण क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये व केवलप्रयोगी अव्यये या अविकारी शब्दांचा अभ्यास करणार आहोत. क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये व केवलप्रयोगी अव्यये या शब्दप्रकारांना अविकारी म्हणतात, कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींमुळे त्या शब्दप्रकारांतील शब्दांच्या मूळ रूपांमध्ये काही बदल होत नाही.
• खालील परिच्छेद वाचा.
रवी वारंवार आजारी पडतो. त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे. मी अनेकदा त्याच्या घरी जातो. आजही गेलो होतो. मला पाहताच तो झटकन उठला. मी त्याला म्हणालो, “तू हल्ली सारखा आजारी पडतो आहेस. मी काल तुझी खूप वाट पाहिली. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. मी तुला नेहमी सांगतो, की दररोज व्यायाम कर, तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल.’
वरील परिच्छेदातील अधोरेखित केलेले शब्द क्रियाविशेषण अव्यये आहेत. क्रियाविशेषण अव्यये वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात.
लक्षात ठेवा : विशेषणे नाम व सर्वनामांबद्दल अधिक माहिती देतात, तर क्रियाविशेषण अव्यये क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात.
शिक्षकांसाठी : क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार यांची विविध उदाहरणे देऊन विदयार्थ्यांकडून अधिकाधिक सराव करून घ्यावा. क्रियाविशेषण अव्ययांचा वापर करून वाक्ये तयार करण्यास सांगावे.
चला संवाद लिहूया
• पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा, हा संवाद वर्गात सादर करा.
उत्तर:
पाऊस : कशी आहेस छत्री ताई? गेल्या वर्षी पाहिले तुला. त्यानंतर थेट आज पाहतोय.
छत्री : अरे पाऊस दादा, मी बरी आहे रे ! तूही वर्षांनंतरच भेटतोस नेहमी.
पाऊस : आता लवकरच आपल्या भेटी होतील आणि तुझी तारांबळ उडेल.
छत्री : हो, पण माझ्यामुळे लोक न भिजता आपापल्या कामांना जाऊ शकतात, बरं का!
पाऊस : ते खरंच, पण माझ्यामुळे तर ही सारी सृष्टी जिवंत राहते. मीच नसलो, तर पाणी कुठून मिळेल लोकांना?
छत्री : तुझंही बरोबर आहे रे ! पण तुझ्यापासून बचाव करण्यासाठीच लोक माझा उपयोग करतात ना!
पाऊस हो, पण माझ्या सरीवर सरी कोसळायला लागल्या आणि सोबत जोराचा वारा असला, की मग तुझी त्रेधातिरपिट उडते ना!
छत्री : अरे पाऊस दादा, शेवटी तू निसर्गाचा एक मुख्य घटक आहेस आणि मी ठरले मानवनिर्मित. मग तूंच श्रेष्ठ असणार हे उघडच आहे.
पाऊस : तरीही मी बरसत असताना लोकांना तुझ्या सोबतीची गरज लागतेच की! चल, छत्री ताई आता माझी बरसण्याची . वेळ झाली. तयार रहा !
सारे हसूया
Class 7 Marathi Balbharati Chapter 4 श्रावणमास (कविता) Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
एक – दोन शब्दांत उत्तरे लिहा.
- आकाशात कशाचा दुहेरी गोफ विणला आहे?
- सुंदर हरिणी कोणासह बागडत आहेत?
- रानात कोण चरत आहे ?
- ललना कोठे निघाल्या आहेत?
- मंजुळ पावा कोण वाजवत आहे?
- सुंदर बाला काय खुडत आहेत ?
उत्तर:
- इंद्रधनूचा
- आपल्या पिल्लांसह
- खिल्लारे
- देवदर्शनास
- गोप
- फुले पत्री
प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. श्रावण महिन्याचे कोणते वैशिष्ट्य कवितेत सांगितले आहे?
उत्तर:
क्षणात ऊन, तर क्षणात पाऊस हे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य कवितेत सांगितले आहे.
ii. ‘कल्पसुमांची माळ’ असे कोणाला म्हटले आहे?
उत्तर:
आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या रांगेला ‘कल्पसुमांची माळ’ असे म्हटले आहे.
iii. पारिजात पाहून कोणाचा रोष मावळला आहे?
उत्तर:
पारिजात पाहून कृष्णपत्नी सत्यभामेचा रोष मावळला आहे.
iv. श्रावणात कोणकोणती फुले फुलली आहेत?
उत्तर:
श्रावणात रानामध्ये सोनचाफा, केवडा, पारिजात ही फुले फुलली आहेत.
v. पिवळे ऊन कशावर पडले आहे ?
उत्तर:
पिवळे ऊन झाडांच्या शेंड्यांवर, उंच घरांवर पडले आहे.
प्रश्न ३.
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा.
iii. आकाशात उडणारी बगळ्यांची रांग कल्पनेतली फुलांची माळच वाटते.
उत्तर:
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते.
v. पाखरे आपले भिजलेले पंख सावरत आहेत.
उत्तर:
‘फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती.’
vi. देवदर्शनाला निघालेल्या स्त्रियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
उत्तर:
देवदर्शना निघती ललना हर्ष माइना हृदयात.
प्रश्न ४.
कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
ii. सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला,
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला!
उत्तरः
श्रावण महिना म्हणजेच विविध फुलांना बहर येण्याचा मोसम ! या महिन्यात जंगलात पारिजात, सोनचाफा, केवड्याचा घमघमाट सुटला आहे. दारी फुललेला पारिजात पाहून कृष्णपत्नी सत्यभामेचा राग शांत झाला आहे.
iii. देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत !
उत्तर:
‘सणांचा महिना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या श्रावण महिन्यात काही सुंदर स्त्रिया देवदर्शनाला जात आहेत. त्यांच्या मनात आनंद मावेनासा झाला आहे. इतका की, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले श्रावण महिन्याचे आनंदगीत स्पष्ट वाचता येईल.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
- आनंद =
- अरण्य =
- सुंदर
- मुलगी
- मन
- महिना =
- संध्याकाळ =
- बगळे =
- फुले
- पक्षी
उत्तर:
- हर्ष
- विपिन, रान
- रम्य
- बाला
- मानस
- मास
- सांज, संध्या
- बलाक
- सुम
- पाखरे
प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- मंगल ×
- ऊन ×
- सुर्यास्त ×
- सुंदर ×
- मंजुळ ×
- हर्ष ×
उत्तर:
- अमंगल
- सावली
- सूर्योदय
- कुरूप
- कर्कश, बेसूरं
- दुःख, खेद
प्रश्न ३.
खालील स्त्रीलिंगी नामांची पुल्लिंगी रूपे लिहा व ती वाक्यात वापरा. लांडोर, विदुषी, युवती, शिक्षिका, माळीण
उत्तर:
i. लांडोर — मोर
आम्ही जंगलात पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहिला.
ii. विदुषी – विद्वान
राजाभाऊ शास्त्री शहरातले विद्वान वकील आहेत.
iii. युवती – युवक
तो युवक पोलीस दलात भरती झाला.
iv. शिक्षिका – शिक्षक
माझे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत.
v. माळी – माळीण
आज आमच्या बागेतील माळी काका आले नाहीत.
प्रश्न ४.
पुढे दिलेल्या एकवचनी नामांची अनेकवचनी रूपे लिहा व त्यांचा वाक्यात उपयोग करा.
भाषा, रस्ता, कवी, नदी, काठी
उत्तर:
- भाषा भाषा
वाक्य: रीमाला आठ भाषा बोलता येतात. - रस्ता – रस्ते
वाक्य: हे चारही रस्ते शंकराच्या देवळाकडे जाऊन संपतात. - कवी – कवी
वाक्य: साहित्य संमेलनात फक्त पंचवीसच कवी उपस्थित होते. - नदी – नदया
वाक्य: गंगा, गोदावरी, यमुना या भारतातील महत्त्वाच्या नदया आहेत. - काठी – काठ्या
वाक्य:आदिवासी पाड्यातील लोक बिबट्याच्या मागे काठ्या घेऊन लागले होते.
प्रश्न ५.
कवितेत आलेल्या खालील शब्दांत लपलेले शब्द शोधून लिहा.
- श्रावणमास – श्रावण, मास, सण
- नभावर – भार, वर, भान, नर, भाव, वन, रव
- निजबाळांसह – निज, हस, बास, बाळांसह, बाज
- दरवळला – लाद, दर, वर, लाळ, वळ, दळ, रव, लाव, दव, दरवळ
प्रश्न ६.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
i. रोष मावळणे – राग शांत होणे.
उत्तर:
गिरणी मालकाने सर्व अटी मान्य केल्यावर कामगारांचा रोष मावळला.
ii. आनंद हृदयात मावेनासा होणे – खूप आनंद होणे.
उत्तर:
सलग दोन वर्षे दुष्काळात सापडलेल्या महाराष्ट्रात यंदा मनासारखा पाऊस पडलेला पाहून शेतकरीराजाचा आनंद हृदयात
मावेनासा झाला.
प्रश्न ७.
खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा.
- राम जलद धावतो.
- मी घाईघाईत जेवण उरकले.
- माझ्यावर मनू वस्क्वन् ओरडली.
- पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगू नकोस.
उत्तर:
- राम जलद धावतो.
- मी घाईघाईत जेवण उरकले.
- माझ्यावर मनू वस्कन् ओरडली.
- पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगू नकोस.
प्रश्न ८.
कंसातील योग्य क्रियाविशेषण अव्यये निवडून वाक्ये पूर्ण करा.
(झटपट, चमचम, दररोज, मोजके)
उत्तर:
- आभाळात बिजली चमचम करत होती.
- आम्ही सर्व कामे झटपट संपवली.
- ओम फार मोजके बोलतो.
- विशाखा दररोज सूर्यनमस्कार घालते.
प्रश्न ९.
हे शब्द असेच लिहा.
श्रावण, खिल्लारे, हर्ष, रोष, रूप, हृदय, सुवर्णचंपक, संध्याराग, इंद्रधनू, देवदर्शन.
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न १.
तुम्हांला भावलेला श्रावण कसा आहे, थोडक्यात वर्णन लिहा.
उत्तर:
‘श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा,
उलगडला पानांत, अवचित हिरवा मोरपिसारा.’
अशा शब्दांत मंगेश पाडगांवकर यांनी समर्पक वर्णन केलेला हा श्रावण मला फारच आवडतो. पावसाची विविध रूपे याच ऋतूत अनुभवायला मिळतात. रिमझिमणारा, ऊन-सावलीचा खेळ खेळणारा, गरजणारा, धुवाँधार कोसळणाऱ्या श्रावणसरी मनाला मोहरून टाकतात. हिरवाकंच निसर्ग पाहण्याची, ‘सण’ साजरे करण्याची, गोडधोड खाण्याची, पावसात भिजण्याची संधी देणारा श्रावण माझ्यासाठी नेहमीच आनंदाची पर्वणी घेऊन येतो.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
१. तुमच्या आवडत्या ऋतूविषयी थोडक्यात माहिती सांगा.
२. मराठी महिन्यांची नावे क्रमाने सांगा.
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न २.
‘श्रावण’ या विषयावरच्या कविता मिळवा. त्यांचे वर्गात सादरीकरण करा.
(हे उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
कवितेचा भावार्थ:
त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांची ‘श्रावणमास’ ही कविता खूप प्रसिद्ध आहे. या कवितेत त्यांनी श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे, ते असे:
श्रावण महिन्यात निसर्गसृष्टी सौंदर्याने बहरलेली आहे. सर्वत्र हिरवळ दाटलेली आहे, त्यामुळे अतिशय आल्हाददायक वातावरण निर्माण होऊन मन आनंदित झाले आहे. क्षणात आभाळ दाटून पावसाच्या सरी बरसणे, तर क्षणात ऊन पडणे असा नयनमनोहर खेळ सुरू आहे.
आकाशात वर पाहिले असता इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान एखादया दुहेरी गोफासारखी (माळेसारखी) शोभून दिसत आहे, जणू काही आकाशरूपी मंडपात कुणीतरी मंगल तोरण बांधले असावे असा भास होत आहे.
आता दिवस मावळल्यासारखा वाटत आहे. अहाहा! आकाशात किती सुंदर संध्याकाळ अवतरली आहे ! मावळतीच्या सूर्याची पिवळी किरणे झाडांच्या शिखरांवर, उंच घरांवर चमकताना दिसत आहेत.
मावळतीच्या लाल, गुलाबी, सोनेरी अशा असंख्य रंगछटा ल्यालेले ढग पाहा. त्यांनी व्यापलेले आकाश जणू सुंदरतेचे महान रूप आहे.
आकाशात उडणारी बगळ्यांची रांग ही जणू कल्पनेतील फुलांच्या माळेप्रमाणे भासत आहे. जणू काही आकाशातील ग्रहतारे पृथ्वीवर एकत्र उतरून येत असावेत असे वाटत आहे.
पक्षी आपले भिजलेले पंख फडफड करत सावरताना दिसत आहेत आणि सुंदर हरिणी आपल्या पिल्लां हिरव्यागार कुरणांमध्ये बागडताना दिसून येत आहेत.
जंगलात गाई-गुरांना चरायला घेऊन गेलेला गुराखी आनंदाने गाणी गात फिरत आहे. त्याच्या बासरीतून येणारे मंजुळ स्वर जणू काही श्रावणमहिमाच गात आहेत असे वाटते.
श्रावणात विविध फुलांना बहर आला आहे. सोनचाफा फुललेला आहे, जंगलात रम्य केवड्याचा सुवास दरवळत आहे. दारी फुललेला पारिजात पाहून कृष्णपत्नी सत्यभामेचा रागही शांत झाला आहे.
सुंदर, निर्मळ मनाच्या बाला नगराजवळील बागेत हातात सुंदर परडी घेऊन फुले, पाने खुडत आहेत. भक्तिभावाने देवदर्शनाला निघालेल्या या सुंदर स्त्रियांचा आनंद हृदयात मावेनासा झाला आहे. इतका की, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले श्रावण महिन्याचे आनंदगीत स्पष्ट वाचता येईल.
श्रावणमास (कविता) शब्दार्थ
श्रावणमास (कविता) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
आनंद हृदयात मावेनासा होणे. | अत्यंत आनंद होणे, हर्षभरित होणे. |
रोष मावळणे. | राग शांत होणे. |
श्रावणमास (कविता) टिपा
फुले पत्री खुडणे. | फुले-पत्री देठासकट तोडण्याची क्रिया, नखांनी देठ कापणे. |
भामा | कृष्णपत्नी सत्यभामा |