Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 6 Question Answer थोरांची ओळख for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer थोरांची ओळख
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 6 थोरांची ओळख
थोरांची ओळख Question Answer
प्रश्न १.
खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
(अ) तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्याविषयीच्या कथा ऐकत असत.
(आ) भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं.
(इ) लोकमान्य टिळकांच्या सहवासात राहणे भाऊंना आवडत नसे.
(ई) लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला.
उत्तर:
(अ) सत्य
(आ) असत्य
(इ) असत्य
(ई) सत्य
प्रश्न २.
खालील आकृत्या पूर्ण करा.
उत्तर:
१. स्वदेशी चळवळ
२. भारतीय इतिहास
३. भारतीय स्वातंत्र्य
प्रश्न ३.
कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.
(अ) भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी ………. येथे प्राप्त केली. (जपान, अमेरिका, मेक्सिको)
(आ) …….. या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. (फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथमॅटिक्स)
(इ) भाऊंनी ……… या विषयात डॉक्टरेट मिळवली. (वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, कृषिशास्त्र)
उत्तर:
(अ) अमेरिका
(आ) जेनेटिक्स
(इ) कृषिशास्त्र
प्रश्न ४.
मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, त्यांची यादी तयार करा.
उत्तर:
- मक्याच्या पीठाचे वडे
- मक्याची भाजी
- मक्याचे कटलेट
- मक्याचे भाजलेले कणीस
- मक्याचे सॅलेड
- मक्याची भेळ
- मक्याचे सूप
- मक्याच्या लाह्यांचा चिवडा
- मक्याच्या पिठाची रोटी
- मक्याची भजी
चर्चा करूया
• कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे, या विषयावर वर्गात चर्चा करा.
(टीप: खालील मुद्दयांच्या आधारे चर्चा करता येईल.)
मुद्दे: भारत हा कृषिप्रधान देश आहे. पिकांच्या नवीन जातींचा शोध घेणे, शेतीचा विस्तार करणे, शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, जमीन व पिकांचे योग्य संगोपन करणे अशा विविध उद्देशाने कृषिशास्त्रात विविध संशोधने सुरू असतात. अशा संशोधनात माती परीक्षण, हवामानाचा अंदाज, पाण्याची उपलब्धता व नियोजन, कोरडा व ओला दुष्काळ, सेंद्रिय शेती, उत्पन्न मिळून देणारी पिके अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला जातो. या अभ्यासातून निष्पन्न झालेल्या संशोधनातील प्रयोग यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न केले जातात, यामुळेच धान्याची विपुलता वाढण्यास मदत होते.
शोध घेऊया
• दूरदर्शन, वृत्तपत्रे, पुस्तके, आंतरजाल यांसारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हांला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा. त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा.
तुम्ही क्या कराल?
• तुम्ही सहलीसाठी गडावर गेले आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हांला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे.
उत्तर:
गड, किल्ले यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करणे, त्यांची स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे, म्हणून गडावर पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसल्यास आम्ही तो उचलण्यासाठी पुढाकार घेऊ. तिथे असलेल्या कचरापेटींचा वापर करू. तेथे
उपस्थित असलेल्या सर्वांना कचरा इतरत्र न टाकण्याची विनंती करू व कोणी कचरा टाकत असल्यास तेथील अधिकाऱ्यांना याविषयी कल्पना देऊ.
वाचा
आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशाचा राज्यकारभार घटनेनुसार चालतो. भारतीय घटनेने सर्व भारतीयांना काही मूलभूत हक्क दिले आहेत. जसे, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क. दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजातील विविध घटकांवर अवलंबून राहावे लागते. अनेक घटकांच्या खरेदीसाठी आपण बाजारात जातो. दुकानात जातो.
मालाची वा वस्तूंची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात, तर माल वा वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यक्तीला विक्रेता म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहे. काही प्रसंगी ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये विवाद होतात, त्यांच्या हितसंबंधांत बाधा वा दुरावा निर्माण होतो. या दोहोतले हितसंबंध चांगल्या प्रकारे राहावेत, ग्राहकांच्या हितसंबंधांचे रक्षण व्हावे, ग्राहकांसंबंधी विवाद मिटावेत व याच्याशी संबंधित अशा इतर गोष्टींसाठी ‘ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६’ या नावाचा कायदा करण्यात आला.
आपण खरेदी करत असलेल्या मालावर, वस्तूवर वा वस्तूच्या पुडक्यावर लिहिलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत जर विक्रेता आपल्याकडून घेत असेल किंवा मागत असेल, तर त्याविरुद्ध आपण आवाज उठवू शकतो. कोणताही विक्रेता नागरिकांच्या जीवितास वा सुरक्षिततेस घातक ठरणारा माल, बनावट माल ग्राहकांस विकत असेल, तर आपण या कायदयाचा आधार घेऊ शकतो. तक्रार निवारण करून घेण्यासाठी प्रत्येक ग्राहकास योग्य त्या ग्राहकमंचाकडे जाण्याचा हक्क असतो.
• खालील दिलेला तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
क्रियापद | क्रियाविशेषण | क्रियाविशेषणाचा प्रकार |
i. गेला | काल | कालवाचक क्रियाविशेषण अव्यय |
ii. जेवतो | भरभर | रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय |
iii. मिळतात | इथे | स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय |
iv. वाचला | दोनदा | परिमाणवाचक / संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय |
v. जातो | क्वचित | परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय |
vi. झाला | रात्री | कालवाचक क्रियाविशेषण अव्यय |
vii. होता | सतत | रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय |
viii. घेला | दूर | स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय |
प्रश्न ७.
खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा.
(ढसाढसा, पटापट, सावकाश, धो-धो, टप्टप्, आपोआप, हळूहळू)
(अ) माझ्या डोळ्यांतून …….. आसवे गळू लागली.
(आ) मी आईच्या गळ्यात पडून ……… रडलो.
(इ) रात्र होताच सगळ्यांचे डोळे …….. मिटू लागतात.
(ई) पक्ष्याने आपले पंख ……… फडफडवले.
उत्तर:
(अ) टप्टप्
(आ) ढसाढसा
(इ) आपोआप
(ई) सावकाश
Class 7 Marathi Balbharati Chapter 6 थोरांची ओळख Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.
- लहानपणापासूनच ……….. सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. (इंग्रज, पेशवे, ब्रिटिश)
- भाऊंना ………. शिकावं असं वाटत होतं. (मानसशास्त्र, कृषिशास्त्र, रणशास्त्र)
- सन १९०६ साली …….. यांच्या सांगण्यावरून भाऊंनी मायदेश सोडला. (लोकमान्य टिळक, तात्या आजोबा, लाला हरदयाळ)
- भाऊंनी ………. डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. (सोया, तूर, चणा)
उत्तरः
- इंग्रज
- रणशास्त्र
- लोकमान्य टिळक
- सोया
प्रश्न २.
खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
- १९१३ साली भाऊंनी मास्टर ऑफ आर्टस् ही पदवी मिळवली.
- कृषि शिक्षण घेत असताना भाऊंनी अमेरिकेत क्रांतिकेंद्रे काढली.
- भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले.
उत्तर:
- असत्य
- सत्य
- सत्य
प्रश्न ३.
खालील आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. महान क्रांतिकारक
२. आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ
३. गदर क्रांतीचे प्रणेते
४. मेक्सिको शेतीतले जादूगार
ii.
उत्तर:
१. लाला हरदयाळ
२. पं. काशीराम
३. विष्णू गणेश पिंगळे
४. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय
५. भूपेंद्रनाथ दत्त
iii.
उत्तर:
१. जपान
२. अमेरिका
३. कॅनडा
४. इराण
५. मॉस्को
६. बर्लिन
प्रश्न ४.
खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे दया.
- भाऊंचे पूर्ण नाव
- अमेरिकेतील लष्करी शिक्षण देणाऱ्या अॅकॅडमीचे नाव
- भाऊंना डिप्लोमा मिळालेल्या ॲकॅडमीचे नाव
- भाऊंच्या शब्दाला मोल असणारा विषय
- मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न
उत्तर:
- डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे
- सान् राफाएल
- टमाल पेस मिलिटरी अकॅडमी
- जमीन आणि पिके
- मका
प्रश्न ५.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे दया.
i. भाऊ पुण्याला का गेले?
उत्तर:
स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले.
ii. भाऊ व त्यांचे मित्र कोणते डावपेच आखत असत ?
उत्तर:
भाऊ व त्यांचे सारे मित्र माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला पळवून लावण्याविषयीचे, डावपेच आखत असत.
iii. ‘सान् राफाएल’ येथील ॲकॅडमीतील शिक्षकवर्ग भाऊंवर का खूश होता ?
उत्तर:
भाऊंचे शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामांतील तत्परता, शरीरचापल्य पाहून ‘सान् राफाएल’ ॲकॅडमीतील शिक्षकवर्ग भाऊंवर खूश होता.
iv. डॉ. खानखोजे यांनी ‘तेवो-मका’ ही मक्याची नवीन संकरित जात कशी निर्माण केली?
उत्तर:
डॉ. खानखोजे यांनी मेक्सिकोतील ‘तेवो – सिंतले’ ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून ‘तेवो-मका’ ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली.
v. मेक्सिकन सरकारने कोणता पुरस्कार देऊन डॉ. खानखोजेंचा गौरव केला?
उत्तर:
मेक्सिकन सरकारने १९३० सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि संशोधनासाठी दिला जाणारा पुरस्कार देऊन डॉ. खानखोजेंचा गौरव केला.
vi. भाऊंबाबत त्यांच्या वडिलांची काय इच्छा होती ?
उत्तर:
भाऊंनी आपले शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावे, लग्न करून संसार करावा, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
प्रश्न ६.
खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
i. इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे भाऊंनी का ठरवले?
उत्तर:
लहानपणापासूनच भाऊंच्या मनात इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, असे त्यांना वाटत होते, म्हणूनच त्याविरुद्ध लढा देण्याचे भाऊंनी ठरवले.
ii. लोकमान्य टिळकांनी भाऊंना कोणता सल्ला दिला ?
उत्तर:
भाऊंच्या रणशास्त्र शिकण्याच्या इच्छेला लोकमान्य टिळकांनी अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर देता यावी याकरता परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावे, असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला.
iii. मेक्सिकन सरकारने कोणत्या कामगिरीच्या आधारावर डॉ. खानखोजे यांना शेती सुधार मंडळात आमंत्रण दिले?
उत्तर:
डॉ. खानखोजेंचा ‘जेनेटिक्स’ या क्षेत्रातला अभ्यास, ‘जमीन आणि पिके’ या विषयावरील प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी कामगिरी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने डॉ. खानखोजे यांना आमंत्रण दिले.
iv. मेक्सिकन सरकारने कोणत्या कामांकरता डॉ. खानखोजेंची नेमणूक केली?
उत्तर:
डॉ. खानखोजे यांनी संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यासदौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषिसंस्था, संशोधन केंद्रे पाहावीत, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, त्यासंदर्भात सुधारणा सुचवाव्यात या कामगिरीकरता मेक्सिकन सरकारने त्यांची नेमणूक केली.
प्रश्न ७.
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः ‘थोरांची ओळख – डॉ. खानखोजे’ हा पाठ वीणा गवाणकर लिखित ‘डॉ. खानखोजे नाही चिरा…’ या पुस्तकातून घेतला आहे. या पाठात महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ असलेल्या डॉ. पांडुरंग खानखोजे यांच्या जीवनप्रवासाचे व कार्याचे वर्णन केले आहे.)
i. भाऊंनी कृषिशास्त्राचे शिक्षण पूर्ण करण्याचे का ठरवले?
उत्तर:
भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य शेती सुधारण्यावरच अवलंबून आहे. असे भाऊंना वाटत होते. शेतकरी व कष्टकरी एकत्र आले, तर इंग्रजांना सहज देशातून हकलून देऊ शकतील असा भाऊंना विश्वास होता, म्हणून शेतीच्या निमित्ताने बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल, अशा विचाराने त्यांनी कृषिशास्त्राचे शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले.
ii. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात भाऊंनी कोणते कार्य केले?
उत्तर:
अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात भाऊंनी त्यांच्या प्रयोगशाळेत व प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगांतून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात व उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फाचाही सामना करणारी, खूप उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी जातींचे वाण भाऊंनी तयार केले.
iii. मेक्सिकन सरकारने डॉ. खानखोजेंचा गौरव का केला?
उत्तर:
मेक्सिकोचा अभ्यासदौरा केल्यानंतर डॉ. खानखोजे यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याचे उत्पादन व दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील ‘तेवो सिंतले’ ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी ‘तेवो मका’ ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली.
या नव्या जातीची मक्याची कणसे डाळिंबाप्रमाण पूर्ण भरलेली व एका मक्याच्या ताटावर तीसच्या संख्येने येणारी होती. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत यशस्वीपणे राबवले, त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि उत्पादन उत्तमरीत्या वाढले. त्यांच्या या कार्यासाठी मेक्सिकन सरकारने १९३० सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉ. खानखोजेंचा गौरव केला.
iv. डॉ. खानखोजेंनी शेतकऱ्यांसाठी कोणते कार्य केले?
उत्तर:
डॉ. खानखोजेंनी गहू, मका यानंतर तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना उत्तेजन दिले, तसेच त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगांतील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व ‘सांगणारी’ पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. अशाप्रकारे, त्यांच्या शेतीविषयक कार्यातून त्यांच्यामधील शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक महान कृषितज्ज्ञ दिसून येतो.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.
- विस्मय =
- तीव्र =
- स्वदेश =
- लग्न =
- अनुमती =
- उन्नती =
- लौकिक =
- आई =
- मित्र =
उत्तर :
- अचंबा, आश्चर्य
- अतीव
- मायदेश
- विवाह
- परवानगी
- प्रगती
- प्रसिद्धी, ख्याती
- माता, जननी, माऊली
- सखा, सवंगडी
प्रश्न २.
खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.
- मित्र ×
- असंतोष ×
- स्वदेशी ×
- स्वातंत्र्य ×
- यश ×
- सक्रिय ×
- आधुनिक ×
- प्रगती ×
- सशस्त्र ×
उत्तर:
- शत्रू
- संतोष
- विदेशी, परदेशी
- पारतंत्र्य
- अपयश
- निष्क्रिय
- पुरातन
- अधोगती
- निःशस्त्र
प्रश्न ३.
खालील शब्दांचे लिंग बदला.
- भाऊ
- आजी
- आई
- मित्र
- विदयार्थी
- तज्ज्ञ
- क्रांतिकारक
उत्तरः
- बहीण
- आजोबा
- वडील
- मैत्रीण
- विदयार्थिनी
- तज्ज्ञ
- क्रांतिकारक
प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला.
- जादूगार
- चळवळ
- शस्त्रास्त्रे
- काम
- शेतकरी
- महाविदयालय
- सहकारी
- जात
- दौरे
- डाळ
- बी
- पुस्तके
उत्तर:
- जादूगार
- चळवळी
- शस्त्रास्त्र
- कामे
- शेतकरी
- महाविदयालये
- सहकारी
- जाती
- दौरा
- डाळी
- बिया
- पुस्तक
प्रश्न ५.
कंसातील वाक्प्रचार योग्य ठिकाणी लिहून वाक्य पूर्ण करा.
(साहसे अंगावर घेतात, विशद केले, गौरव करण्यात आला, संकरण करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा केली)
- कार्यक्रमाची सुरुवात करताना आयोजकांनी प्रथम कार्यक्रमाचे स्वरूप ………
- नवीन संकरित पिकाची लागवड करण्यासाठी शास्त्रज्ञ दोन वेगवेगळ्या पिकांचे ……..
- नदीत बुडणाऱ्या दोन लहानग्या मुलांना वाचण्यासाठी प्रथमेशने आपल्या …..
- शत्रूशी दोन हात करताना लष्करी जवान अनेक ………..
- संकल्पने केलेल्या साहसी कार्यासाठी सरकारतर्फे त्याचा ………
उत्तर:
- विशद केले.
- संकरण करतात.
- प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
- साहसे अंगावर घेतात.
- गौरव करण्यात आला.
प्रश्न ६.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
- मन वळवणे
- डावपेच आखणे
- प्रोत्साहित करणे
- टक्कर देणे
- कळकळ असणे
- दबदबा वाढणे
- शब्दाला मोल येणे
उत्तरः
- मन वळवणे – तयार करणे.
वाक्य : नवीन फोन घेण्यासाठी श्रियाने आपल्या वडिलांचे मन वळवले. - डावपेच आखणे – कटाची योजना आखणे.
वाक्य: युद्धभूमीवर विजय मिळवण्यासाठी सैनिकांनी डावपेच आखणे महत्त्वाचे असते. - प्रोत्साहित करणे – उत्तेजन देणे.
वाक्य: वयाची साठी ओलांडलेल्या आपल्या वडिलांना संगणक शिकण्यासाठी मीराने प्रोत्साहित केले. - टक्कर देणे – सामना करणे.
वाक्य:संकटांना न घाबरता धैर्याने टक्कर दिली पाहिजे. - कळकळ असणे – कळावळा असणे, मनापासून काळजी वाटणे.
वाक्य:देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सर्व देशवासियांना कळकळ असायला हवी. - दबदबा वाढणे – दरारा वाढणे.
वाक्य:भारतात इतर क्रिडाप्रकारांच्या तुलनेत क्रिकेटचा दबदबा अधिकच वाढला आहे. - शब्दाला मोल येणे – शब्दाला किंमत / महत्त्व प्राप्त होणे.
वाक्यः केवळ बोलण्यापेक्षा एखादी गोष्ट स्वतः कृतीत उतरवून बोलली, की बोलणाऱ्याच्या शब्दाला मोल येते.
प्रश्न ७.
खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा.
(ढसाढसा, पटापट, सावकाश, धो-धो, टप्टप्, आपोआप, हळूहळू)
- खेळायला जायची वेळ झाल्याने राहूलने अभ्यास ……… आटपला.
- बाहेर …….. पाऊस पडत होता.
- लहानगी सई …….. चालायला लागली होती.
उत्तर:
- पटापट
- धो-धो
- हळूहळू
प्रश्न ९.
खालील शब्द असेच लिहा.
क्रांती, विस्मयकारी, परिस्थिती, लष्करी, तत्परता, शस्त्रास्त्र, पदव्युत्तर, कृषिशास्त्र, राष्ट्रीयदृष्ट्या, कृषितज्ज्ञ
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
१. शेतीतील नांगरणी ते धान्य साठवणीपर्यंतच्या क्रियांची क्रमाने नावे सांगा. उदा. नांगरणी, पेरणी, ……… इत्यादी.
२. मक्याप्रमाणे ‘पीठ’ करता येणाऱ्या पाच अन्नधान्यांची नावे सांगा व त्यांपासून बनवल्या जाणाऱ्या प्रत्येकी दोन अन्नपदार्थांची नावे सुचवा.
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न २.
‘गदर क्रांती’ विषयी माहिती मिळवा. डॉ. खानखोजे व त्यांचे सहकारी यांविषयी माहिती गोळा करून वर्गात सादरीकरण करा.
(हे उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)