Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 7 Question Answer माझी मराठी (कविता) for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer माझी मराठी (कविता)
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 7 माझी मराठी (कविता)
माझी मराठी (कविता) Question Answer
प्रश्न १.
खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
मुलगी
(आ)
उत्तर:
मराठी भाषेचे अमृत प्राशन करणारा
(इ)
उत्तर:
१. भावनांना अर्थ देणारी
२. विविध बोलींनी सजलेली
३. कोणत्याही पंथाबाबत दुजाभाव न करणारी
(ई)
उत्तर:
१. आई
२. अमृत
३. रत्नकांचन
प्रश्न २.
खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
(अ) विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.
उत्तर:
लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली.
(आ) माझ्या मराठीची ओवी दूर देशांतही ऐकायला मिळते.
उत्तर:
दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी.
प्रश्न ३.
खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,
तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई .
उत्तर:
माझी मराठी भाषा माझी आई आहे. ती माझ्या प्रत्येक भावनेला शब्दरूप देते, अर्थ देते. अशा आईचे आपण कायम उपकार मानावेत. तिच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ नये.
प्रश्न ४.
खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्ये तयार करा.
(१) ऋण
(२) थोरवी
(३) उतराई
(४) भाषा
उत्तर:
(१) ऋण – भगवंताचे ऋण चुकवणे ही अशक्यप्राय गोष्ट होय.
(२) थोरवी – छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अवर्णनीय आहे.
(३) उतराई – आपण आईच्या प्रेमाचे उतराई कधीच होऊ शकत नाही.
(४) भाषा – जगात टिकून राहण्यासाठी विविध भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
चर्चा करूया
• जागतिक मराठी राजभाषा दिनाचे तुमच्या शाळेत आयोजन करायचे आहे. त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन कराल, त्याची यादी तयार करा.
(टीप: खालील मुद्दयांच्या आधारे चर्चा करता येईल.)
मुद्देः
- कविता वाचन
- कथाकथन स्पर्धा
- वक्तृत्व स्पर्धा’
- निबंध / कथालेखन स्पर्धा
- प्रसिद्ध लेखक /कवी यांची मुलाखत
- वादविवाद स्पर्धा
- मराठी पुस्तक प्रदर्शन
(वरील मुद्दयांच्या आधारे चर्चा करावी.)
खेळूया शब्दांशी
• कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा
(१) आई
(२) भिजली.
(३) थोरवी
उत्तर:
(१) उतराई, देई
(२) सजली, बोली
(३) ओवी
कल्पक होऊया
• खाली दिलेल्या भेटकार्डावर तुमच्या आवडत्या मित्र / मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करा.
उत्तर:
• खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्यानिमित्ताने तुमच्या मित्र/मैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा.
शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने भेटकार्डे तयार करून घ्यावीत. प्रसंगानुरूप शुभेच्छा संदेश तयार करून घ्यावेत…
उत्तरः
सण | संदेश |
i. गुढीपाडवा | स्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे ! |
ii. रंगपंचमी | रंग साठले मनी अंतरी, उधळू त्यांना नभी चला, आला आला रंगोत्सव हा आला ! |
iii. दसरा | उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा ! |
iv. दिवाळी | सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल देती, येता घरोघरी दीपावली, मनसुमने प्रफुल्लित झाली. |
v. आषाढ एकादशी | भक्तीचा सोहळा रंगे भीमातीरी । मुखी नाम सदा तुझे पांडुरंगा ।। |
vi. मकरसंक्रांत | विसरूनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा । आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा ! |
vii. गणेशोत्सव | रूप तुझे मोहक सुंदर, नाव तुझे लंबोदर, पाहता ते रूप देवा, होती सर्व चिंता दूर, गुण किती गाऊ देवा, यावे आम्हां आशीर्वाद देण्या ! |
Class 7 Marathi Balbharati Chapter 7 माझी मराठी (कविता) Question Answer
संकलित मूल्यमापन
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
i. मराठी भाषा दूरवर पसरली आहे.
उत्तर:
रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली.
ii. मराठी भाषेतील प्रत्येक शब्द अमूल्य आहे.
उत्तर:
तिच्या एकेका शब्दाला रत्न – कांचनाचे मोल.
iii. जो मराठी भाषेचे अमृत चाखेल, तो भाग्यवंत असेल.
उत्तर:
माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत.
iv. मराठी भाषेशी कृतज्ञ असावे. तिच्या ऋणातून मुक्त होऊ नये.
उत्तर:
तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.
प्रश्न २.
खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
ii. तिच्या एकेका शब्दाला रत्न – कांचनाचे मोल,
कधी तप्त लोहारी कधी चांदणे शीतल.
उत्तर:
मराठी भाषेतील प्रत्येक शब्द रत्न – कांचनाप्रमाणे अमूल्य आहे. कधी तो तापलेल्या लोखंडाप्रमाणे अतिशय गरम, तप्त असतो, तर कधी चांदण्याप्रमाणे शीतल, थंड असतो.
iii. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली,
लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली.
उत्तर:
मराठी भाषा रानवाऱ्याच्या गंधात न्हाऊन निघाली आहे, विविध बोलीभाषांनी सजली आहे.
iv. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत,
तिचा नाही दुजाभाव असो कोणताही पंथ.
उत्तर:
जो कोणी मराठी भाषेचे अमृत चाखेल तो खरा भाग्यवंत होय. कोणताही पंथ असो, ती कधीही दुजाभाव, भेदाभेद करत नाही.
v. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी,
दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी.
उत्तर:
मराठी भाषेची थोरवी अवर्णनीय आहे. तिच्या ओवीचे सूर दूरदेशीही ऐकू येतात.
प्रश्न ३.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. मराठी भाषेतील प्रत्येक शब्दाला कशाचे मोल आहे ?
उत्तर:
मराठी भाषेतील प्रत्येक शब्दाला रत्न – कांचनाचे मोल आहे.
ii. कवयित्रीने मराठी भाषेतील शब्दांची कोणती दोन रूपे सांगितली आहेत?
उत्तर:
रत्न – कांचनाचे मोल असणारे शब्द, कधी तप्त लोखंडासारखे, तर कधी शीतल चांदण्यासारखे असतात. अशी शब्दांची दोन रूपे कवयित्रीने कवितेत सांगितली आहेत.
iii. मराठी भाषा कशाने सजली आहे ?
उत्तर:
मराठी भाषा विविध बोलींनी सजली आहे.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- आई =
- ऋण =
- मोल =
- लोह =
- गंध =
- भाग्यवंत =
- थोरवी =
उत्तरः
- माता, जननी
- उपकार
- मूल्य, किंमत
- लोखंड
- सुवास
- नशीबवान
- महानता, महात्म्य
प्रश्न २.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- शीतल ×
- सुगंध ×
- भाग्य ×
- अर्थ ×
- अमृत ×
उत्तर:
- उष्ण
- दुर्गंध
- दुर्भाग्य
- अनर्थ
- विष
प्रश्न ३.
खालील शब्दांचे त्यांच्या लिंगानुसार वर्गीकरण करा.
भाषा, भावना, ऋण, शब्द, रत्न, चांदणे, गंध, बोली, अमृत, पंथ, थोरवी, देश
उत्तर:
स्त्रीलिंग | पुल्लिंग | नपुंसकलिंग |
भाषा | शब्द | ऋण |
भावना | गंध | रत्न |
बोली | पंथ | चांदणे |
थोरवी | देश | अमृत |
प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला.
- भावना
- रत्न
- शब्द
- ओवी
उत्तर:
- भावना
- रत्ने
- शब्द
- ओंव्या
प्रश्न ५.
कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.
- मोल
- अमृत
उत्तर:
- शीतल
- भाग्यवंत
प्रश्न ६.
खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्ये तयार करा.
- भावना
- दुजाभाव
- पंथ
उत्तर:
- भावना – माणसाचे मन म्हणजे चांगल्या-वाईट भावनांचे घर असते.
- दुजाभाव – आई आपल्या लेकरांमध्ये कधीच दुजाभाव करत नाही.
- पंथ – संत एकनाथ वारकरी पंथातील संत होते.
प्रश्न ७.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
i. उतराई होणे – ऋणातून मुक्त होणे.
उत्तर:
परमेश्वर, आई-वडील व गुरुजन यांच्या ऋणांचे उतराई होणे कठीण असते.
ii. प्राशन करणे-पिणे
उत्तर:
समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून भगवान शंकराने सर्व सृष्टीला वाचवले.
प्रश्न ८.
हे शब्द असेच लिहा.
थोरवी, ऋण, तप्त, दुजाभाव, अमृत, रत्न, अर्थ, उतराई, शीतल, पंथ.
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न १.
मराठी भाषा संवर्धनासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल?
उत्तर:
मराठी भाषा अस्खलित बोलता येण्यासाठी मी अवांतर वाचन वाढवेन. दररोज मराठी वृत्तपत्राचे मोठ्याने वाचन करेन. वर्गात परिपाठाच्या तासाला फळ्यावर एखादा नवीन मराठी शब्द अर्थासह लिहून त्याचा वाक्यात उपयोग करेन. जेणेकरून माझ्यासह इतरांचीही शब्दसंपदा वाढेल.
मराठी कविता पाठांतर स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा अशा आंतरशालेय स्पर्धांत मी भाग घेईन. रोजच्या संभाषणात शक्य तितके इंग्रजी शब्द टाळून मराठी प्रतिशब्द वापरण्याचा प्रयत्न करेन. यानिमित्ताने इंग्रजी शब्दांसाठी नवीन मराठी प्रतिशब्दांची ओळख होईल. अशा प्रतिशब्दांची दिनदर्शिका बनवून ती वर्गात लावेन.
मराठी ही माझी मातृभाषा आहे. तिचे संवर्धन करण्यासाठी मी रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करेन.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
१. मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे फायदे कोणते ?
२. मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी मुले आजच्या स्पर्धेच्या युगात मागे पडतात का? तुम्हांला काय वाटते?
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न १.
मराठी भाषेवर आधारित कविता, लेख यांचे संकलन करा. परिपाठाच्या तासाला त्यांचे वर्गात सादरीकरण करा.
(हा उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)
माझी मराठी (कविता) कवितेचा भावार्थ:
सर्व भाषांत व्यक्तीला जवळची असते ती स्वतःची मातृभाषा. कवयित्री मृणालिनी कानिटकर – जोशी यांनी ‘माझी मराठी या कवितेत मराठी भाषेची वैशिष्ट्ये, तिच्या विविध बोली व त्यांचे महत्त्व, मराठीची थोरवी व्यक्त केली आहे.
कवयित्री म्हणते,
भावनांना अर्थ देणारी माझी मराठी भाषा माझी आई आहे. तिच्याशी कृतज्ञ राहावे. कायम तिचे उपकार मानावेत. तिच्या ऋणातून मुक्त होऊ नये. आपण तिचे पांग फेडू शकत नाही.
माझ्या मराठी भाषेतील एक – एका शब्दाला रत्नांइतके, सोन्याइतके मूल्य आहे. (जणू तिचा एकेक शब्द म्हणजे रत्न- सुवर्णासम आहे.) कधी तापलेल्या लोखंडाप्रमाणेच उष्ण, तर कधी आकाशातील चांदण्याप्रमाणे शीतल असे हे शब्द आहेत. माझी मराठी भाषा रानवाऱ्याच्या सुगंधात न्हाऊन निघाली आहे, विविध बोली अंगावर लेऊन सजली आहे.
माझ्या मराठी भाषेचे अमृत जो कोणी चाखेल, तो भाग्यवंत असेल. ती कोणताही भेदाभेद करत नाही. कोणताही पंथ असो, ती सर्वांना जवळ घेते.
माझ्या मराठी भाषेचा महिमा काय वर्णावा ! तिच्या ओवीचे सूर दूरदेशीही ऐकू येतात.
माझी मराठी (कविता) शब्दार्थ
माझी मराठी (कविता) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
उतराई होणे. | ऋणातून मुक्त होणे. |
प्राशन करणे. | पिणे. |