Class 8 Marathi Balbharati Chapter 1 Question Answer भारत देश महान

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 1 Question Answer भारत देश महान for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 1 Question Answer भारत देश महान

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 1 भारत देश महान

भारत देश महान Question Answer

माधव विचारे : प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे.

हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा-यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे. प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे. प्रस्तुत गीत हे ‘गीतपुष्पांचा फुलोरा’ या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेले आहे.

• ऐका. वाचा. म्हणा.

Class 8 Marathi Balbharati Chapter 1 Question Answer भारत देश महान 1

शिक्षकांसाठी : प्रस्तुत गीत विदयार्थ्यांकडून तालासुरांत म्हणवून घ्यावे. तसेच इतर समूहगीतांच्या ध्वनिफिती ऐकवाव्यात.

Class 8 Marathi Balbharati Chapter 1 भारत देश महान Question Answer

(टीप: प्रस्तुत गीत काव्यानंदासाठी दिले आहे. विदयार्थ्यांनी ते तालासुरांत म्हणावे.)

कवितेचा भावार्थ

‘चला चला…………. देश महान ।। धृ ।। ‘
चला, आपण ‘भारत देश महान’ हे गीत एक होऊन, एकासुरात गाऊया.

‘हिमालयाची हिमशिखरे……….. पवित्र स्नान । । १ । । ‘
आपली भारतभूमी निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. तिच्या डोक्यावर म्हणजेच उत्तरेस हिमालयाची हिमशिखरे डौलाने
विराजमान झालेली आहेत येथे वाहणाऱ्या गंगा, यमुना आणि गोमती अशा पवित्र नदया या भूमीला मंगल स्नान घालतात.

‘इतिहास नवा…………….. जागवी राष्ट्राभिमान । । २ । । ‘
भारतभूमीला त्यागाचा पराक्रमाचा महान इतिहास लाभला आहे. तिच्या मातीत जन्मलेल्या सुपुत्रांनी तिच्या रक्षणासाठी शौर्य गाजवले, आपल्या प्राणांचे महान बलिदान दिले. शौर्याची व पराक्रमाची मोठी परंपरा लाभलेली ही भारतभूमी साऱ्या जगाला समतेचा व विश्वशांतीचा संदेश देते. आपल्यातील राष्ट्राभिमान सतत जागवते.

‘शौर्याने जे………… उंच निशाण ।। ३ ।।
भारतभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी अनेक वीर प्राणपणाने लढले. ते भारतमातेसाठी रणांगणावर बलिदान देत पावन झाले, इतिहासात अजरामर झाले. या भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न तिच्या सुपुत्रांनी शर्थीचे प्रयत्न करून, तिचा ध्वज डौलात फडकवत सत्यात उतरवले.

शब्दार्थ

एकमुखाने एकासुरात
गान गाणे
जागवणे जागृत करणे
डोल डुलणे
निशाण ध्वज, झेंडा
पवित्र शुद्ध, निर्मळ
बलिदान त्याग, आत्मसमर्पण
महान थोर, श्रेष्ठ
रणांगण युद्धभूमी
राष्ट्राभिमान देशाचा अभिमान
विश्वशांती संपूर्ण जगात शांतता टिकवणे
वीर पराक्रमी योद्धा
शिरी ‘डोक्यावर
शौर्य शूरता, वीरता
समता बरोबरी, सारखेपणा
स्नान अंघोळ
हिमशिखर हिमालयाचे बर्फाच्छादित शिखर, हिमालयाचे टोक


वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

पावन होणे. पवित्र होणे.
स्वप्न रंगणे. येथे अर्थ- स्वप्न सत्यात उतरणे.


भाषाभ्यास विभाग

१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.

  1. तोंड
  2. गीत
  3. बर्फ
  4. डोके
  5. अंघोळ
  6. वीरता
  7. युद्धभूमी
  8. पवित्र

उत्तर:

  1. मुख
  2. गान
  3. हिम
  4. शीर
  5. स्नान
  6. शौर्य
  7. रणांगण
  8. पावन

Leave a Comment