Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 14 Question Answer फुलपाखरे for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 14 फुलपाखरे

फुलपाखरे Question Answer

प्रश्न १.
वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 17
उत्तर:

फुलांचे नाव देठ पाने फुले
१. झेनिया राठ रुक्ष बहुरंगी आणि बहुढंगी, सुंदर
२. पारिजातक खडबडीत, खडबडीत, रुक्ष खडबडीत, खरखरीत, रुक्ष नाजूक, खरखरीत, सुंदर, सुगंधी

प्रश्न २.
कारणे लिहा.

(अ) लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता; कारण…
उत्तर:
लेखकाची प्रकृती बरी नसल्याने, शरीराच्या अस्वास्थ्यामुळे त्याच्या मनावर मळभ आले होते; मनॉला मरगळ आली होती.

(आ) लेखकाच्या मनावरचे मळभ दूर झाले; कारण…
उत्तर:
लेखकाने झेनियाची वाऱ्यावर डुलणारी बहुरंगी, बहुढंगी, सुंदर फुले व त्यांवर नाचणारी फुलपाखरे यांचे अप्रतिम जीवननृत्य पाहिले.

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे

प्रश्न  ३.
योग्य जोड्या लावा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 18
उत्तर:
(१) – ब,
(२) – ड,
(३) – अ,
(४) – क

प्रश्न ४.
पाठाच्या आधारे तुलना करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 19
उत्तर:

फुलपाखराचे जीवन मानवी जीवन
i. फुलपाखराचे आयुष्य काही दिवसांचेच असते. मानवाचे आयुष्य त्यामानाने कित्येक पटींनी मोठे असते.
ii. फुलपाखरांची आयुष्याकरिता असलेली आस्था खूप मोठी असते. मानव आपल्या आयुष्याप्रति कधी समाधानी, आनंदी नसतो.
iii. फुलपाखरांना आनंदाने जगता येते. माणूस फुलपाखराएवढे आनंदाने जगत नाही.
iv. फुलपाखरांना जीवनाचा रसास्वाद घेता येतो. माणूस फुलपाखरासारखा जीवनाचा रसास्वाद घेत नाही.

प्रश्न ५.
पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

(अ) या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.
उत्तर:
प्रस्तुत पाठातून लेखकाने जीवनाचा मूलमंत्र सांगितला आहे. आपण प्रत्येकानेच साऱ्या अडचणी, सारी संकटे, सारे रोग, सारी निराशा बाजूला सारून जीवनाकडे आनंदाने आणि आशादायी दृष्टिकोन ठेवून पाहायला हवे असा संदेश या पाठातून मिळतो. जीवनात नेहमी सकारात्मकता बाळगली असता, सोशिकपणे जगले असता, संकटांना खिलाडू वृत्तीने तोंड दिले असता जीवनातील संकटांशी दोन हात करता येतात. ही प्रेरणा आपल्याला निसर्गातील प्रत्येक घटक देऊ पाहतो.

निसर्गातील प्रत्येक सजीव आपल्या जीवनाप्रति आस्था बाळगून असतो. त्यामुळे, तो स्वत:च्या जीवनाचा आनंद लुटू शकतो. हीच स्फूर्ती निसर्गातून आपण घेतली पाहिजे. त्यातून आपले जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक, बहारीचे बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानवाला बुद्धीचे वरदान मिळाले आहे. त्याचा सदुपयोग करून आपले जीवन प्रचंड आनंदात पार पाडले पाहिजे.

(आ) निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.
उत्तर:
मानव हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे, मानव आणि निसर्ग यांमधील नाते घनिष्ट आहे. मानवाच्या आयुष्यात वेळोवेळी अनेक अडथळे, अनेक अडचणी येत असतात. यांमुळे तो नैराश्य, ताण-तणाव यांना बळी पडताना दिसतो. निसर्ग मात्र आपल्या या अपत्याला या तणावाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सदैव तत्पर असतो. निसर्गात मुळातच चैतन्य ठासून भरलेले आहे. आपली सतत बदलणारी रूपे, सळसळणारी पाने, डोलणारी फुले, त्यांचे दरवळणारे सुगंध ही या चैतन्याचीच रूपे आहेत. हे चैतन्य अनुभवले असता मानवाच्या मनावरील नैराश्याचे, थकव्याचे ढग आपोआपच सरतात.

त्याच्या मनातही अनंत असा उत्साह, नवे चैतन्य संचारते. हे चैतन्य त्याला आनंदाने जगायला शिकवते. केवळ निसर्गाचा सहवास मानवाला शरीराने आणि मनानेही आनंदी जीवन जगण्यासाठी पुरेसे चैतन्य बहाल करते. प्रकृती ठीक नसलेला, मनाला मरगळ आलेला लेखकही निसर्गाच्या सौंदर्यपूर्ण रूपाने आपली सारी व्यथा, वेदना, आजार विसरून जातो. तो या निसर्गात एवढा रमतो, की आनंदी जीवनाचे गमकच जणू त्याला गवसते. निसर्गातील फुले, फुलपाखरे जणू लेखकाला आनंदी व्हायला, दुःख विसरायला भाग पाडत असतात. यावरून लक्षात येते, की निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवन आनंदी करत असतो.

प्रश्न ६.
‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ या वचनातील विचार स्पष्ट करा.
उत्तर:
कोणत्याही गोष्टीला अनेक बाजू असतात. आपण त्या गोष्टीकडे कोणत्या बाजूने पाहतो आहोत यावर त्या गोष्टीबाबतचे आपले मत अवलंबून असते. त्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी जशी असते तशी सृष्टी आपल्याला दिसते व तशीच वृत्ती आपल्यात निर्माण होते. एखादया व्यक्तीचा एखादया माणसाकडे, घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक असेल, तर तो माणूस कितीही चांगला वागलाती घटना कितीही चांगली, लाभदायी असली तरी त्या व्यक्तीला त्या माणसातले, त्या घटनेतले दोषच दिसतात.

त्यातील सकारात्मक बाजू त्याच्या दृष्टीस पडतच नाही. त्यामुळे, अशा व्यक्ती आनंदास हमखास मुकतात; मात्र काही व्यक्ती प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. त्यामुळे, प्रत्येक घटना त्यांना विलक्षण आनंद देऊन जाते. अशा व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य या सुंदर सृष्टीच्या म्हणजेच सुंदर अनुभवांच्या साथीने आनंदात पार पाडतात. म्हणूनच, जर दृष्टी सकारात्मक असेल, तर सृष्टीचे सौंदर्य आपणांस सहज अनुभवता येईल.

प्रश्न  ७.
‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने परिच्छेदातील वाक्ये शोधा व लिहा. उदा. जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती.
उत्तरः

  1. नाचरे ओढे आणि हरिततृणांचे गालिचे, माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते.
  2. एखादया पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते.
  3. त्या नाचणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिल्यावर फुलपाखरे कोणती अन् फुले कोणती असा भ्रम मला तरी क्षणभर झाला.
  4. उडताहेत ती फुले, की डोलताहेत ती फुले, अशी शंका वाटण्याइतके रंगांचे सादृश्य झेनियाच्या फुलांत नि त्या फुलपाखरांत होते.

खेळूया शब्दांशी

१. खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा.

(अ) सतीश वारंवार आजारी पडतो.
(आ) रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती.
(इ) आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते.
(ई) शाब्बास! तू खूप छान खेळलास.
उत्तर:
(अ) वारंवार – क्रियाविशेषण अव्यय
(आ) रस्त्यावर – शब्दयोगी अव्यय
(इ) कारण – उभयान्वयी अव्यय
(ई) शाब्बास! – केवलप्रयोगी अव्यय

लिहिते होऊया.

‘मी फुलपाखरू झालो / झाले तर….. या विषयावर निबंधलेखन करा.
(टीप: या कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील निबंधलेखन पाहावे.)

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे

शोध घेऊया.

• आंतरजालाच्या साहाय्याने विविध प्रकारच्या फुलपाखरांची माहिती मिळवा. त्या माहितीचा संग्रह करा.
(टीप: ‘शोध घेऊया’ मधील कृतीच्या उत्तराकरिता शेजारील QR Code स्कॅन करावा.)

उपक्रम :
तुमच्या परिसरातील उदयानाला भेट देऊन त्याचे निरीक्षण करा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा.
(टीप: वरील उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करावा.)

प्रकल्प :
तुमच्या परिसरात आढळणाऱ्या किमान पाच फुलांचे नमुने गोळा करा. वर्गात त्याचे प्रदर्शन भरवा. तुम्ही जमा केलेल्या ‘फुलांचे विशेष’ या विषयीची माहिती वर्गात सांगा. कोणती फुले तुमच्या परिसरात जास्त प्रमाणात आढळतात, ते जमा केलेल्या फुलांच्या नमुन्यांवरून सांगा.
(टीप: वरील प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)

• खालील शब्दकोड्यामध्ये नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे लपली आहेत. ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 20
उत्तरः
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 15

आपण समजून घेऊया

खालील वाक्ये वाचा व अभ्यासा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 31

उत्तरे लिहा.

(अ) दोन्ही गटांतील वाक्याचा अर्थ एकच आहे का? _______
(आ) दोन गटांतील शब्द सारखे आहेत का? _______
(इ) ‘अ’ गटातील व ‘ब’ गटातील अधोरेखित शब्दांमधील फरक लिहा. _______
उत्तर:
(अ) होय.
(आ) नाही.
(इ) ‘अ’ गटातील शब्द विस्ताराने मांडले आहेत, तर ‘ब’ गटात तेच शब्द एकत्रित करून त्यांचे जोडशब्द वापरले आहेत.

बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्परसंबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाळून सुटसुटीत असे शब्द तयार करतो. उदा., ग्रंथाचे आलय = ग्रंथालय. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला ‘समास’ असे म्हणतात. शब्दांच्या या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्यांना ‘सामासिक शब्द’ म्हणतात.

समासाचा विग्रह- सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ‘समासाचा विग्रह’ असे म्हणतात.

• खालील सामासिक शब्द वाचा व समजून घ्या.

(अ) ज्ञानरूपी अमृत – ज्ञानामृत
(आ) पाच आरत्यांचा समूह – पंचारती
(इ) प्रत्येक घरी-घरोघरी
(ई) निळा आहे कंठ ज्याचा असा तो-नीलकंठ
(उ) गुरू आणि शिष्य – गुरुशिष्य

• समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला ‘पद’ असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे चार प्रकार ठरतात.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 24

सूचनाफलक

• सूचनाफलक तयार करणे.
एखादया गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे. दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना दयाव्या लागतात. दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो. अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे. इयत्ता सहावी व सातवीमध्ये तुम्ही सूचनाफलक वाचून त्यांचा अभ्यास केला आहे. या इयत्तेत तुम्ही स्वतः सूचनाफलक तयार करायला शिकणार आहात.

• सूचनाफलकाचे विषय

(१) शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना.
(२) सहलीसंदर्भात सूचना.
(३) रहदारीसंबंधी सूचना.
(४) दैनंदिन व्यवहारातील सूचना.

• सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी

(१) सूचना कमीत कमी शब्दांत असावी.
(२) सूचेनेचे लेखन स्पष्ट शब्दांत, नेमके व विषयानुसार असावे.
(३) सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावेत.
(४) सूचनेचे लेखन शुद्ध असावे.

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे

• सूचनाफलक तयार करा. यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा.

विषय – ‘उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहील. ‘

नमुना कृती १

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 27

विषय – ‘कणखर’ गिर्यारोहण संस्थेतर्फे शिबिराचे आयोजन.

नमुना कृती २

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 29

• तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
(टीप: या कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील सूचनाफलक पाहावे.)

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 फुलपाखरे Question Answer

परिच्छेद १

कृती १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 3
उत्तर:
१. सुजल
२. सुफल
३. सस्यश्यामल

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 4
उत्तर:
१. निरर्थक
२. क्षणिक

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 5
उत्तर:
१. नाचरे ओढे
२. हरित तृणांचे गालिचे

iv.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 6
उत्तर:
१. सुंदर
२. बहुरंगी
३. बहुढंगी

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे

v.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 7
उत्तर:
१. जीवन जर कोठे फुलत असेल, डुलत असेल, नाचत असेल, गात असेल तर ते इथेच
२. जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजीच येथे थुई थुई उडत होती

२. चौकटी पूर्ण करा.

  1. लेखकाने नाराज मनाला दिलेली उपमा → □
  2. लेखकाला येथे सुंदर बाग दिसली → □

उत्तर:

  1. पोरक्या पोराची
  2. स्टेशनच्या आवारात

[मी प्रवासात ………..
………. चक्राबरोबरच सुरू झाले.]

कृती २ – आकलन

१. ‘मकरंदास्वाद’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
फुलांवर उडून फुलपाखरे काय घेत होती ?

२. परिणाम लिहा.
लेखकाच्या मनाला मरगळ आली होती.
परिणामः त्याला सर्व गोष्टी त्या वेळेकरिता निरर्थक व क्षणिक वाटत होत्या.

३ कारणे लिहा.

i. स्टेशनवरच्या एका सुंदर दृश्याकडे लेखकाचे मन वेधले गेले; कारण…
उत्तर:
लेखक शेवटच्या डब्यात बसल्याने तेथे उतारूंची ये-जा झाली नाही.

परिच्छेद २

कृती १- आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 8
उत्तर:
१. उत्साह
२. स्फूर्ती

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 9
उत्तर:
१. सोशिकपणा
२. खिलाडू वृत्तीने

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 10
उत्तर:
जीवन असे बनवावे:
१. सुखदायक
२. आनंददायक
३. रसदायक
४. बहारीचे
जीवन असे बनवू नये:
१. बुजरे
२. भांबावलेले

[त्या फुलांनी आणि ………..
…………. बनता कामा नये.]

कृती २ – आकलन

१. असत्य विधान ओळखा.

अ. फुलपाखरांना जसे आनंदाने जगता येते तसे आपल्यालाही येऊ शकते.
ब. फुलपाखरांप्रमाणे आपल्यालाही जीवनातील रसास्वाद घेता येऊ शकतो.
क. आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा ओढू नये.
ड. फुलपाखरांखेरीज जीवनासंबंधी फाजील विचार दुसरं कोणीही करत नसेल.
उत्तर:
फुलपाखरांखेरीज जीवनासंबंधी फाजील विचार दुसरं कोणीही करत नसेल.

२. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने परिच्छेदातील वाक्ये शोधा व लिहा. उदा. जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती.
उत्तर:

  1. फुलांचे नि फुलपाखरांचे आयुष्य ते किती आणि त्या मानाने त्यांनी त्या आयुष्याकरिता दाखवलेलीं आस्था किती?
  2. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही.

३. हे केव्हा घडते ते लिहा.

i. अडचणी, संकटे, रोग फार मोठे किंवा असहय वाटतात.
उत्तर:
जेव्हा ती आपणावर आक्रमण करतात.

ii. आपण अडचणी, संकटे, रोग यांना का घाबरलो हे आपणांस समजत नाही.
उत्तर:
जेव्हा त्या अडचणी, ती संकटे, ते रोग ओसरतात.

iii. आजारी व संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात.
उत्तर:
जेव्हा ते थट्टा विनोद करतात.

४. कारणे लिहा.

i. अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे कारण नाही; कारण…
उत्तर:
अडचणी आणि रोग कायमचे नसतात.

ii. अडचणी, संकटे, रोग यांना आपण घाबरतो; कारण…
उत्तर:
आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते.

iii. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत; कारण…
उत्तर:
ती असतानाही जीवन चालू असते.

iv. आपण आपले मूळचे आनंदी स्वरूप, आनंदी जीवन विसरून बसलो आहोत; कारण…
उत्तर:
आपण एक तर फार विचार करतो किंवा अविचार तरी करतोच.

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे

५. साम्य लिहा.
सूर्य आणि जीवन
उत्तर:

सूर्य जीवन
मळभ आल्याने सूर्य नाहीसा होत नाही. रोगांनी आणि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही.

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांचा संधिविग्रह करा.

  1. अत्युत्तम
  2. रत्नच्छाया
  3. तेजःकण
  4. निष्पाप
  5. घामोळे
  6. काहीसा

उत्तरः

  1. अति + उत्तम
  2. रत्न + छाया
  3. तेजस् + कण
  4. निः + पाप
  5. घाम + ओळे
  6. काही + असा

२. खालील वाक्ये वाचा. त्यातील उपमेय, उपमान व साम्यवाचक शब्द शोधून लिहा.

  1. ते पाणी अमृतासमान आहे.
  2. तिचा सुंदर मुखडा वाटे पूर्ण चंद्रमा !
  3. कोमल प्राजक्तासम नाजूक होती.

उत्तर:

वाक्य उपमेय उपमान साम्यवाचक शब्द
ते पाणी अमृतासमान आहे. ते पाणी अमृत समान
तिचा सुंदर मुखडा वाटे वाटे पूर्ण चंद्रमा! तिचा मुखडा (चेहरा) पूर्ण चंद्र वाटे
कोमल प्राजक्तासम नाजूक होती. कोमल प्राजक्ताचे फूल सम

३. खालील वृत्तांची लक्षणे वाचून वृत्त ओळखा.

  1. प्रत्येक चरणात १२ अक्षरे असतात.
  2. प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात.
  3. प्रत्येक चरणात १४ अक्षरे असतात.

उत्तर:

  1. भुजंगप्रयात वृत्त
  2. मालिनी वृत्त
  3. वसंततिलका वृत्त

४. खालील वाक्यांतील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

i. नदीनाल्यांतून आणि भातशेतांतून पाणी तुडुंब भरून वाहत होते.
ii. माझ्याच मनावर मळभ आल्याने मी सृष्टीशी समरस होऊ शकत नव्हतो.
iii. स्टेशनवरील एका सुंदर दृश्याकडे माझे मन वेधले गेले.
iv. माझे विचारचक्र गाडीच्या चक्रांबरोबरच सुरू झाले.
v. अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे मानवाला काय कारण आहे?
उत्तर:
i. तुडुंब भरून वाहणे – पावसाळ्यात सावित्री नदी तुडुंब भरून वाहू लागते.

ii. अ. मनावर मळभ येणे – कोरोनाच्या काळात नकारात्मक बातम्यांमुळे विकासच्या मनावर मळभ आले होते.
ब. समरस होणे – वारकरी विठ्ठलाच्या भजनात समरस झाले.

iii. मन वेधले जाणे – बागेतील त्या सुंदर, नाजूक गुलाबाकडे माझे मन वेधले गेले.

iv. विचारचक्र सुरू होणे – बाईंनी विज्ञान उपक्रमाचा विषय देताच सोहमचे विचारचक्र सुरू झाले.

v. भांबावून जाणे – आईच्या नव्या मोबाइलविषयीच्या असंख्य प्रश्नांनी मधुरा भांबावून गेली.

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

१. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे समानार्थी शब्द लिहून वाक्ये पूर्ण करा.

  1. माझी प्रकृती बरी नव्हती.
  2. स्टेशनच्या आवारात एक सुंदर बाग होती.
  3. फुलपाखरे मकरंदाचा आस्वाद घेत होती.
  4. तिचे नृत्य पाहून माझ्या मनावरील मळभ नाहीसे झाले.
  5. फुलपाखरांचे जीवन किती कमी असते!

उत्तर:

  1. माझी तब्येत बरी नव्हती.
  2. स्टेशनच्या परिसरात / अंगणात एक सुंदर उदयान होते. / बगीचा होता.
  3. फुलपाखरे मधाचा आस्वाद घेत होती.
  4. तिचा नाच पाहून माझ्या चित्तावरील / मानसावरील मळभ नाहीसे झाले.
  5. फुलपाखरांचे आयुष्य किती अल्प असते!

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे

२. ख़ालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. निरर्थक ×
  2. क्षणिक ×
  3. सुगंध ×
  4. सादृश्य ×
  5. आस्था ×
  6. समाधानी ×
  7. रोगी ×
  8. असहय ×

उत्तरः

  1. अर्थपूर्ण
  2. दीर्घकालीन
  3. दुर्गंध
  4. वैविध्य
  5. अनास्था
  6. असमाधानी
  7. निरोगी
  8. सुसह्य

३. खालील शब्दांचे अनेक अर्थ लिहा.

i. मान
ii. वात
उत्तर:
i. मान – अ. सन्मान, आदर
ब. शरीराचा अवयव

ii. वात – अ. कफ, पित्त या त्रिदोषांपैकी एक दोष
ब. वारा, वायू, पवन
क. दिव्यात लावायची कापसाची वात

४. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा.

  1. ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी का करता
  2. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती

उत्तर:

  1. ते म्हणाले, “तुम्ही त्याची काळजी का करता?”
  2. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती; पण कोणीही ती वापरली नव्हती.

फुलपाखरे पाठाची पार्श्वभूमी

मानवी जीवनात येणाऱ्या नव्या अडचणी, त्यामुळे मनावर येणारे ताण-तणाव यांमुळे मन नैराश्यात जाते; परंतु मानव जेव्हा निसर्गाच्या असीम सौंदर्यात न्हाऊन जातो, या रोज नव्या रूपात अवतरणाऱ्या निसर्गातील चैतन्य जेव्हा तो अनुभवतो, तेव्हा त्याच्या मनावरील नैराश्याचे ढग अलवार बाजूला जातात. निसर्गातील वृक्षवेली, पशु- पाखरे, फुले-फुलपाखरे इत्यादी आपल्याला ‘जीवनाकडे आनंदाने आणि आशादायक दृष्टीने पहावे’ असा शुभ संदेश देतात.

फुलपाखरे शब्दार्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 1

फुलपाखरे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 14 Question Answer फुलपाखरे 2

Leave a Comment