Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 18 Question Answer जलदिंडी for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 18 जलदिंडी

जलदिंडी Question Answer

प्रश्न १.
खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतींचे आहेत ते सांगा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 19
उत्तर:

परिणाम घटना / कृती
(अ) लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. नौका थांबवण्याची विनंती करणाऱ्या लेखकाच्या मुलाला लेखक रागावून भित्रट बोलले व नाव किनाऱ्याकडे वळवली.
(आ) नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. शहराची धगधग आणि निष्काळजीपणा
(इ) इतर लोक आपली घृणा विसरले. बाकी सर्व लोकांना दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा काढताना पाहिले.

 

प्रश्न २.
खालील आकृत्या पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 9
उत्तर:
१. पाण्यावर तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या
२. अमर्याद वाढलेली जलपर्णी
३. घाणीमुळे काळे पडलेले खडक
४. दलदल झालेली काठावरली माती

प्रश्न ३.
लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या संबंधीच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता बनवा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 21
उत्तर:
१. सांडपाणी शुद्ध होऊन ते झाडांसाठी खतपाणी म्हणून वापरणे.
२. झाडांचे फोफावणे

प्रश्न ४.
पालखीसोहळा या शब्दातील अक्षरांपासून पालखी व सोहळा हे शब्द सोडून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 20
उत्तर:
पाल, लळा, सोपा, सोळा

प्रश्न ५.
स्वमत लिहा.

(अ) नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा.
उत्तरः
नदीचे पाणी प्रदूषित होण्यास सर्वस्वी मानवच जबाबदार असल्याचे जाणवते. मानवाचा निष्काळजीपणा हा या प्रदूषणास कारणीभूत ठरतो. मानवाने कारखान्यांमधील सांडपाणी प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. नदीमध्ये कपडे धुणे, भांडी धुणे, नदीत आंघोळ करणे, गुरे धुणे इत्यादी कारणांमुळेही नदीचे पाणी प्रदूषित होते. निर्माल्य, कचरा टाकाऊ वस्तू मानव निर्धास्तपणे नदीमध्ये टाकून देतो. ‘वापरा आणि फेका’ ही संस्कृती ल्यालेला मानव वापरून टाकाऊ झालेल्या वस्तू सरळ नदीपात्रात फेकून देतो. प्लॅस्टिकसारखा विघटन न होऊ शकणारा पदार्थ या नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात टाकल्याचे दिसून येते. मैलापाणी नदीमध्ये विचार न करता सोडले जाते.

नदीपात्रांची स्वच्छता न केल्याने जलपर्णीची बेबंद वाढ होते. रासायनिक खतांचा अनर्बंध वापर केल्याने ही खते पाण्यामधून वाहत जाऊन नदीपात्रात मिसळून प्रदूषण करतात. शिवाय, अशी रसायने शैवालीच्या वाढीला पोषक ठरतात व शैवालाची अतिवाढ नदीतील पाण्यास दुर्गंधीयुक्त करते. कीटकनाशके, तणनाशकेही पाण्याबरोबर वाहत जाऊन नदीच्या पाण्यात मिसळतात व नदीचे पाणी प्रदूषित करतात. अशाप्रकारे, अनेक मानवी कृती नदीचे पाणी प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरतात.

(आ) पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हांला समजलेले कारण स्पष्ट करा.
उत्तर:
लेखकाच्या मुलाला उत्तम पोहता येत असूनही मुळा-मुठेच्या संगमपात्राच्या पाण्यात पडायला मात्र तो घाबरत होता. ही भीती पाण्याची नसून त्यात असणाऱ्या कचऱ्याची, घाणीची होती. या नदीतील पाणी करंगळीने स्पर्श करता येणार नाही इतके दूषित झाले होते. पाण्याचा रंग, त्यावर तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक, दलदल झालेली काठावरली माती, एक नकोसा वाटणारा उग्र दर्प पाण्यावर पसरलेली काळी साय, पाण्यावर पसरणारा गाळ या गोष्टी पाण्याच्या दूषित असण्याची साक्ष देत होत्या.

चांगल्या वातावरणात वाढलेल्या लेखकाच्या मुलाला या प्रदूषणाची, या पाण्याची किळस वाटल्यावाचून राहिली नसेल. त्याच घृणेपोटी त्याला या पाण्याला स्पर्श करणेही पटत नसावे. म्हणूनच पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला अशा पाण्यात पडण्याची साहजिकच भीती वाटत असावी.

(इ) ‘जलदिंडी’ मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा.
उत्तर:
मुळात जलदिंडीसारख्या स्तुत्य उपक्रमात मला सहभागी होता येणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असेल. त्यामुळे, येथील सर्वप्रकार कामे करायला मला आवडतील. मोहिम कशी राबवावी, मार्ग कोणता असावा, मोहिमेत सहभागी सदस्यांची व्यवस्था, त्यासाठी गावांना भेटी देऊन, अनेक लोकांशी बोलून सर्व व्यवस्था लावणे इत्यादी कामांमध्ये मी मदत करेन. या मोहिमेची व्याप्ती अधिकाधिक वाढत जावी याकरिता प्रयत्न करायला मला आवडेल. मी माझ्या संपर्कातील होतकरू लोकांना माझ्या मित्रांना, त्यांच्या पालकांना या उपक्रमाचे महत्त्व पटवून देईन. त्यांचा या जलदिंडीला हातभार लागावा यासाठी मी प्रयत्न करेन.

जलदिंडीला आर्थिक सहकार्य मिळवून देण्याकरिताही मी धडपड करेन. याशिवाय, प्रत्यक्ष दिंडीमध्ये सुट्टीच्या काळात सहभागी होऊन नदीतील कचरा स्वतः साफ करण्यासाठी मी पुढे सरसावेन. नदीचे प्रदूषण होऊ नये याकरिता प्रयत्नशील राहिन. अशाप्रकारे, जलदिंडीमध्ये सहभागी होऊन मी त्यात माझे योगदान देण्याचा प्रयत्न करेन.

(ई) ‘स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला’ लेखकांच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा.
उत्तर:
‘स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला’ हा लेखकांच्या आईचा उपदेश कोणतेही मोठे कार्य करण्याची सुरुवात ‘स्व’ पासून करावी हे स्पष्ट करणारा आहे. कोणताही मोठा बदल, मोठी मोहिम फत्ते करायची झाल्यास त्या कार्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली, तर ते कार्य सहज साध्य होते. इतरांना सूचना करून, त्याविषयी चर्चा करून, विविध आराखडे आखून काम पार पडत नाही. ते पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष कामाला हात घालावा लागतो. अशी कामाची सुरुवात प्रत्येक व्यक्तीने केली, तर अशक्य असे काहीच उरणार नाही.

उदाहरणार्थ: पर्यावरण संवर्धनाकरिता वृक्षांची लागवड करणे आज काळाची गरज बनली आहे; मात्र कोणीतरी येऊन या कामाची सुरुवात करेल, प्रत्येकजण या कामात सहभागी होईल तेव्हाच ते शक्य होईल असा विचार करत बसल्यास पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरूच होणार नाही. उलट याची सुरुवात स्वत:पासून केल्यास, स्वतः एक तरी झाड लावल्यास, वृक्षतोडीला स्वतः विरोध केल्यास आपल्या बरोबरीने अनेक माणसं उभी राहतात. प्रत्येकाने अशा कार्याची सुरुवात स्वतःपासून केल्यास एक-एक करून अनेक लोक वा कार्यात सहभागी होऊन कार्य सिद्धीस जाते.

खेळूया शब्दांशी

(अ) खालील वाक्यांतील काळ ओळखा.

(अ) जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल.
(आ) मदतीचा हात लगेच पुढे आला.
(इ) त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते.
(ई) पंढरपूरला लोक चालत जातात.
उत्तर:
(अ) साधा भविष्यकाळ
(आ) साधा भूतकाळ
(इ) पूर्ण भूतकाळ
(ई) रीती भूतकाळ

(आ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

(अ) पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का?
(आ) पण एवढं मोठं कार्य
(इ) त्यांना थकवा जाणवत नव्हता.
(ई) कंचरा काढायला स्वतःचेच हात वापर.
उत्तर:
(अ) प्रश्नार्थी वाक्य
(आ) उद्गारार्थी वाक्य
(इ) विधानार्थी वाक्य
(ई) आज्ञार्थी वाक्य

चर्चा करूया.

• वर्गातील मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून ‘वापरा आणि फेका’ या संस्कृतीत मोडणाऱ्या वस्तूंची यादी करा. प्रदूषण टाळण्यासाठी या वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी, याबद्दल तुमचे मत वर्गात सांगा.
• प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामागील कारणांची चर्चा करा. या निर्णयाची अंमलबजावणी यशस्वी व्हावी, म्हणून तुम्ही काय कराल ते वर्गात सांगा.
उपक्रम : नदी/तलाव/विहीर/ओढा यांपैकी उपलब्ध जलस्रोतांची पाहणी करा. पाणीप्रदूषण व त्याची कारणे, जलचरांवरील परिणाम आणि पाणी वापराबाबत लोकांच्या सवयी यांबाबत माहिती लिहा.
(टीप: ‘चर्चा करूया’ आणि ‘उपक्रम’ मधील कृतींच्या उत्तरांकरिता शेजारील स्कॅन करावा.)

आपण समजून घेऊया.

(३) द्वंद्व समास

• खालील उदाहरणे अभ्यासा व त्यांतील सामासिक शब्द शोधा.

(अ) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.
(आ) ताई गावाहून चार-पाच दिवसांत परत येईल.
(इ) दूरच्या प्रवासात सोबत अंथरुणपांघरुण न्यावे.

उत्तर:
(अ) आईवडील
(आ) चार-पाच
(इ) अंथरुणपांघरुण

• खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(१) भाजीपाला
(२) सुखदुःख
(३) स्त्रीपुरुष
(४) केरकचरा
उत्तर:
(१) भाजी, पाला, कोथिंबीर इत्यादींसारखे इतर पदार्थ
(२) सुख किंवा दुःख
(३) स्त्री आणि पुरुष
(४) केर, कचऱ्यातील इतर वस्तू / घटक

• खालील उदाहरणे अभ्यासा व त्यांतील सामासिक शब्द शोधा.

(अ) चंद्र, तारे अनंत आकाशात उगवतात.
(आ) शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले.
(इ) लंबोदराला मोदक आवडतात.
(ई) दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे ?
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 27
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 28
उत्तर:
(अ) अनंत
(आ) चौकोन
(इ) लंबोदर
(ई) निर्धन

• खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(१) नीरस
(२) दशमुख
(३) निर्बल
(४) मूषकवाहन
उत्तर:
(१) रस नाही ज्यात असे ते (काव्य)
(२) दहा मुखे आहेत ज्याला असा तो (रावण)
(३) निघून गेले आहे बल ज्याच्यातून असा तो
(४) मूषक (उंदीर) ज्याचे वाहन आहे असा तो (गणपती)

• खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 29
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 30

Class 8 Marathi Balbharati Chapter 18 जलदिंडी Question Answer

संकलित मूल्यमापन

परिच्छेद १

कृती १- आकलन

१. खालील आकृत्या पूर्ण करा.
i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 5
उत्तर:
१. मुळा
२. मुठा

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 6
उत्तर:
१. झुळझुळत्या वाऱ्यानं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेल
२. काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला
३. उन्हं डोक्यावर स्थिर झालेली
४. संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत, झुलत होते.
५. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेली होती

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 7
उत्तर:
१. एका हातात नौकेचे सुकाणू होते
२. दुसऱ्या हातात शिडाची दोरी होती

iv.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 8
उत्तर:
१. वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली
२. पाण्यावर पडलेला कचरा व घाण

v.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 10
उत्तर:
१. पाण्याचा रंग
२. पाण्यावर तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या
३. अमर्याद वाढलेली जलपर्णी
४. घाणीमुळे काळे पडलेले खडक
५. दलदल झालेली काठावरली माती
६. नदीचा नकोसा वाटणारा उग्र दर्प
७. काठाजवळील पाण्यावर पसरलेली काळी साय
८. बुडबुड्यांसहित उठणारा आणि पाण्यावर पसरणारा तळाचा गाळ

२. एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

  1. वातावरणात हुळहुळून गेलेली –
  2. नौका मुळा-मुठेच्या संगमावर आणणारे-
  3. लेखकाच्या मुलाचे वय –
  4. पहिल्यांदाच नौकेत बसणारा-
  5. स्वच्छ पाण्याचे तलाव-
  6. लेखकाच्या मुलाच्या पिढीने याचा -हास पाहिला.

उत्तर:

  1. शिडाची नाव
  2. लेखक
  3. सहा-सात वर्षे
  4. लेखकाचा मुलगा
  5. खडकवासला
  6. पर्यावरणाचा

कृती २ आकलन

१. ‘भित्रट’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
लेखक रागाने आपल्या मुलाला काय म्हणाले?

२. परिणाम लिहा.

i. नौका वेगाने धावू लागली व जोराने हेलकावू लागली.
परिणाम: नौकेत बसलेल्या लेखकाच्या मुलाच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं व त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली.

ii. लेखकाच्या मुलाच्या नौका किनाऱ्यावर नेण्याच्या विनवण्या रडक्या आवाजात चालूच होत्या.
परिणामः न राहवून रागवून लेखकाने त्याला ‘भित्रट’ म्हणत नाव काठाकडे वळवली.

३. कारणे लिहा.

i. नाव जोराने हेलकावे खात असतानाही मुलाने काळजी करण्याचे काही कारण नव्हते; कारण…
उत्तरः
नाव उलटली तरीही त्याला पोहता येत होतं.

ii. लेखकाचा मुलगा नौकेत बसावला भित होता, कारण…
उत्तर:
नदीच्या कचरा असलेल्या घाण पाण्यात त्याला पडायचे नव्हते.

iii. पर्यावरणाचा -हास झाला आहे हे लेखकाला जाणवले; कारण…
उत्तर:
जे पाणी प्यायलं जायचं ते करंगळीनेही स्पर्श नये इतकं दूषित झालं होतं.

परिच्छेद २

कृती १ आकलन

१. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 11
उत्तर:
१. प्लॅस्टिकच्या पिशव्या
२. कचरा

२. चौकटी पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 12
उत्तर:
उत्तर:
i. काहीतरी केलं पाहिजे
ii. स्वच्छतेचे अभियान

३. नदीसफाईची सुरुवात दर्शवणारा ओघतक्ता तयार करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 13
उत्तर:
i. त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
ii. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली.

कृती २ आकलन

१. हे केव्हा घडले ते लिहा.

i. लेखक उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लॅस्टिक काढू लागले.
उत्तर:
जेव्हा त्यांना, “हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हातांनी काम करवून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला” हे त्यांच्या आईचे शब्द आठवले.

ii. लेखकाचे मन कातरले.
उत्तर:
जेव्हा त्याने नदीच्या दूषित पाण्याची व्याप्ती बघितली.

२. परिणाम लिहा.
लेखक झाडीत अडकलेलं प्लॅस्टिक काढू लागले.
उत्तर:
परिणाम: ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून आठ-दहा दिवस हलले नव्हते, ते आठ-दहा मिनिटांत पार पडले.

३. कारणे लिहा.
i. लेखकाने जलपर्णी निर्मूलनाचे काम हाती घेतले.
उत्तरः
नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी हे नदीच्या आणि लोकांच्याही अनारोग्याचे कारण आहे. लेखकाला जाणवल्याने त्याने जलपर्णी निर्मूलनाचे काम हाती घेतले.

ii. लेखकाला चापट बसून जाग आली.
उत्तर:
लेखक व समविचारी मित्रांमध्ये नदीच्या स्वच्छता अभियानाविषयी चर्चाच जास्त होत होती आणि प्रत्यक्षात सफाईचे काम मात्र नगण्य झाले होते. हे जाणवल्याने लेखकाला चापट बसून जाग आली.

परिच्छेद ३

कृती १ आकलन

१. खालील आकृत्या पूर्ण करा.
i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 14
उत्तर:
१. मैलापाणी
२. रसायनं
३. गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत तरंगत-बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू
४. वापरा आणि फेका या संस्कृतीतील सर्व बाबी
५. बेबंद वाढलेली जलपर्णी

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 15
उत्तर:
१. नदीपात्रातील प्रदूषणाची अग्रणी
२. बेबंद वाढलेली
३. केवळ नदीचा काठच तिला रोखत होता
४. तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 16
उत्तर:
१. उन्हात राबणे
२. वल्हवणे
३. वाकून कचरा उपसणे

iv.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 17
उत्तर:
१. सुंदर काठ
२. जलपर्णी आणि कचराविरहित पात्र

२. चौकटी पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 18
उत्तर:
i. वापरा आणि फेका
ii. जलपर्णी

कृती २ – आकलन

१. परिणाम लिहा.
लेखक आणि सहकाऱ्यांनी आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता.
उत्तर:
परिणामः ते पाहून लेखकाला कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला.

२. का ते लिहा.
i.. दिवसभर कष्ट करूनही लेखकाला थकवा जाणवत नव्हता; कारण…
उत्तरः
नदीचा स्वच्छ भाग पाहून त्याला एक विलक्षण समाधान मिळाले होते.

ii. लेखक व सहकाऱ्यांचे सर्व श्रम वाया गेले होते; कारण…
उत्तर:
आदल्या दिवशी स्वच्छ केलेल्या नदीपात्रामध्ये प्रवाहाबरोबर कचरा वाहत आला होता. त्यामुळे नदीपात्र कचऱ्याने व पाल्याने भरले होते.

परिच्छेद ४

कृती १ आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.
i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 22
उत्तर:
१. गाव
२. कसबा
३. महानगर

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 23
उत्तर:
१. सकारात्मक स्वास्थ्य
२. पर्यावरण
३. अध्यात्म

२. जलदिंडीचा मार्ग पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 24
उत्तर:
१. इंद्रायणी नदीतून प्रवास
२. पंढरपूर

३. चौकटी पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 25
उत्तर:
i. नदीचे स्वच्छ रूप
ii. नदीतून पंढरपूर
iii. २००२
iv. १६ वर्षे

कृती २ आकलन

१. चुकीचे विधान ओळखा.
अ. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे हे लेखकाला जाणवले.
ब. नदीतून शैवाल काढण्याचे काम पुन्हा सुरू झाले.
क. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागले.
ड. दररोज नदी सफाईचे काम करणे ही लेखकाची जीवनशैलीच बनली.
उत्तर:
नदीतून शैवाल काढण्याचे काम पुन्हा सुरू झाले.

२. कारण लिहा.
मोहिमेचे नाव जलदिंडी असे ठेवण्यात आले.
उत्तर:
पंढरपूरला पालखी सोहळ्यासाठी सगळे लोक चालत जातात. बरोबर दिंड्या चालू लागतात. ही मोहिमही एक प्रकारची दिंडीच असून ती नदीच्या प्रवाहातून जाणार असल्याने तिचे नाव जलदिंडी ठेवण्यात आले.

३. परिच्छेदाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. जलदिंडीची तयारी
उत्तर:
जलदिंडीच्या तयारीमध्ये सर्वप्रथम दिडीचा मार्ग आखण्यात आला. आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नदयांतून प्रवास करत, नदीची स्वच्छता करत नदीमार्गेच पंढरपूरला पोहोचायचे हे ठरवून प्रवासाची ढोबळ योजना आकार घेऊ लागली. पुढील काही महिने साधनसामग्री गोळा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी घेण्यात आल्या. मित्रांशी बोलणे झाले. संस्थांना सांगून: त्यांना सहकार्यासाठी विणवण्यात आले. मदतीचे हात सरसावून ‘नदीतून पंढरपूर प्रवाशांचे एक कुटुंब तयार होऊ लागले. शेवटी या दिडीचे जलदिंडी असे नामकरण केले गेले. अशारीतीने जलदिंडीची तयारी करण्यात आली.

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

१. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i. आनंदाच्या डोहात बुडणे
ii. रोमांचित होणे
iii. हेलकावे घेणे
iv. धीर देणे
v. मन कातरणे
vi. खांदयावर भार पडणे
vii. आश्वासन देणे
viii. फळी तयार होणे
ix. चापट बसणे
x. उत्साहाचं वादळ येणे
xi. पानही न हलणे
xii. हातावर हात ठेवून बसून राहणे
xiii. गतकर्माची फळे भोगणे
xiv. सांगड घालणे
उत्तर:
i. आनंदाच्या डोहात बुडणे – खूप आनंदी असणे.
वाक्य: मीराचं घर नेहमीच आनंदाच्या डोहात बुडालेलं असायचं.

ii. रोमांचित होणे अंगावर काटे उभे राहणे, अंग शहारणे.
वाक्यः सीमेवरील भारतीय जवानांची शौर्यगाथा ऐकून श्रोते रोमांचित झाले.

iii. हेलकावे घेणे डोलणे, तरंगणे.
वाक्य: पक्षी उडून जाताच फांदी बराच वेळ हेलकावे घेत राहिली.

iv. धीर देणे मानसिक आधार देणे, हिंमत देणे.
वाक्य: रोहनच्या मनावरचा परीक्षेचा ताण जावा, म्हणून मी त्याला धीर दिला.

v. मन कातरणे मनात भीती दाटणे.
वाक्य: पहिलवान राघवचे कॅन्सरमुळे खालावलेले कृश शरीर पाहून माझे मन कातरले.

vi. खांदयावर भार पडणे जबाबदारीचे भान येणे.
वाक्य: कोरोना काळात घरातील इतर सर्व बेरोजगार झाल्याने अंकिताच्या खांदयावर भार पडला.

vii. आश्वासन देणे – वचन देणे, हमी देणे.
वाक्य: निवडून येताच पाणीटंचाईची समस्या सोडवू असे नव्या नेत्याने जनतेला आश्वासन दिले.

viii. फळी तयार होणे लोकांचा गट तयार होणे.
वाक्य: पाणी फाऊंडेशनच्या कार्यात सहभागी होण्यासाठी समविचारी लोकांची फळी तयार होऊ लागली.

ix. चापट बसणे- थप्पड / चपराक बसणे.
वाक्य: निसर्गाकडून माणसाला करोनासारखी चापट बसली.

x. उत्साहाचं वादळ येणे अंगात खूप उत्साह संचारणे.
वाक्य: गणेशाचं आगमन होताच मंडळात जणू उत्साहाचं वादळ आलं होतं.

xi. पानही न हलणे काहीच काम न होणे.
वाक्यः रक्तदानाचा उपक्रम राबवण्यासंबंधी सभा होऊनही प्रत्यक्ष पानही हलले नव्हते.

xii. हातावर हात ठेवून बसून राहणे काहीही काम न करणे.
वाक्यःघरात सत्यनारायणाची पूजा घातली असतानाही सुरेश मात्र हातावर हात ठेवून बसून राहिला होता.

xiii. गतकर्माची फळे भोगणे केलेल्या कामाचे परिणाम भोगणे.
वाक्य: निसर्गाचे संतुलन बिघडले, की माणूस आपल्या गतकर्मांची फळे भोगतो.

xiv. सांगड घालणे- मिलाफ करणे, जुळवून आणणे.
वाक्य: तिने आपल्या कामाची व वेळेची योग्य सांगड घातली होती.

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. भीती
  2. ढग
  3. साथी
  4. सहकार्य
  5. विनवणी

उत्तर:

  1. भय
  2. जलद, मेघ
  3. सोबती, मित्र
  4. मदत
  5. विनंती

२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. गर्द
  2. स्थिर
  3. निष्काळजीपणा
  4. भित्रट
  5. आरोग्य
  6. स्वच्छता
  7. शुद्ध
  8. यश

उत्तर:

  1. विरळ
  2. अस्थिर
  3. काळजी, पर्वा
  4. शूर, वीर
  5. अनारोग्य
  6. अस्वच्छता
  7. अशुद्ध
  8. अपयश

३. खालील शब्दांचे वचन बदला.

  1. मोहिम
  2. लाटा
  3. प्रतिबिंब
  4. विनवण्या
  5. पिशव्या
  6. धरणे
  7. पिढ्या
  8. दिंडी

उत्तर:

  1. मोहिमा
  2. लाट
  3. प्रतिबिंबे
  4. विनवणी
  5. पिशवी
  6. धरण
  7. पिढी
  8. दिंड्या

४. शब्दांच्या आधी ‘बिन’ हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
बिनचूक, बिनतक्रार बिनधोक बिनहरकत, बिनकाम इत्यादी.

५. खालील वाक्यांतील चुकीची विरामचिन्हे बदलून तिथे योग्य विरामचिन्हे ढाका व वाक्य पुन्हा लिहा.
i. मी त्याला “भित्रट” म्हणालो ?
ii. तो तिला म्हणाला, ‘मला पोहता येत नाही!’
iii. कशी सुरुवात करावी –
iv. वाडी! कसबा नगर: महानगर अशी वाढ होतानाच नदीकाठचा काही पट्टा वनराईसाठी राखला जायला हवा होता.
v. कचरा उपसून बरेच कष्ट झाले होते. पण थकवा जाणवत नव्हता –
उत्तरः
i.मी त्याला ‘भित्रट’ म्हणालो.
ii. तो तिला म्हणाला, “मला पोहता येत नाही.
iii. कशी सुरुवात करावी ?
iv. वाडी, कसबा, नगर, महानगर अशी वाढ होतानाच नदीकाठचा काही पट्टा वनराईसाठी राखला जायला हवा होता.
v. कचरा उपसून बरेच कष्ट झाले होते; पण थकवा जाणवत नव्हता.

जलदिंडी पाठाची पार्श्वभूमी

लोकमाता असे म्हटल्या जाणाऱ्या नदयांच्या किनारी मानवी जीवन खऱ्या अर्थाने फुलले; मात्र ‘वापरा आणि फेका’ या आजकालच्या नव्या संस्कृतीमुळे या नदयांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर यांदरम्यानच्या इंद्रायणी-भीमा चंद्रभागा नदीच्या पात्रातील हे प्रदूषण स्वच्छ करण्यासाठी बारा वर्षे सातत्याने एक उपक्रम सुरू आहे. ‘जलदिंडी’ या रोमांचकारी जलप्रकल्पाची सुरुवात आणि त्याचा विस्तार यांचा परिचय प्रस्तुत पाढ़ात लेखकाने करून दिला आहे.

जलदिंडी शब्दार्थ:
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 1
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 2

जलदिंडी वाक्र्रचार व त्यांचे अर्थ:
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 3

जलदिंडी टिपा:
Class 8 Marathi Balbharati Chapter 18 Question Answer जलदिंडी 4

Leave a Comment