Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 2 Question Answer माझ्या देशावर माझे प्रेम आहे for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer माझ्या देशावर माझे प्रेम आहे
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
माझ्या देशावर माझे प्रेम आहे Question Answer
प्रश्न १.
पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
(अ) प्रतिज्ञा
उत्तर:
प्रस्तुत पाठ म्हणजे लेखकांनी पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय उलगडण्याचा केलेला प्रयत्न होय. प्रतिज्ञा म्हणजे केवळ काही वाक्यांचा संच नसून प्रतिज्ञा म्हणजे काया, वाचा, मनाने केलेला एक संकल्प असतो. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्द हा मनात स्फुरण चढवणारा असतो; कारण या प्रत्येक शब्दामागे संकल्पांचे बळ असते. आपण जे प्रतिज्ञेद्वारे बोलत आहोत तेच आपल्याला साध्य करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमागे दडलेला असतो. त्याकरिता आपण सवयीने बोलत असलेल्या या प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दाचा खरा अर्थ जाणून घेतल्यास त्या शब्दांना आपल्याला न्याय देता येतो. प्रतिज्ञा व तिच्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य यांची जाण प्रत्येकाला असणे गरजेचे असते.
(आ) सस्यश्यामला माता
उत्तर:
भारताचे गौरव असलेल्या राष्ट्रगीतामध्ये भारतभूमीला ‘सस्यश्यामला माता’ असे म्हटले आहे. या शब्दांचा अर्थ बहरलेल्या पिकांनी समृद्ध झालेली, साऱ्या भारतीयांचे पालनपोषण करणारी माता असा होतो. सस्य म्हणजे धान्य, पीक होय. हे धान्य जेव्हा परिपक्व होते तेव्हा ते काहीसा गडद रंग दर्शवू लागते. हा काळासावळा, रंग समृद्धीची चाहूल घेऊन येतो. अशी समृद्धी धारण करणारी माता म्हणजेच आपली भारतभूमी सस्यश्यामल माता होय. या मातेचे भूमिपुत्र म्हणून तिची ही समृद्धता टिकवून ठेवणे हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ही हिरवळ, ही समृद्धी राखण्यासाठी कष्ट करणे, प्रयत्नशील राहणे हा देशप्रेमाचाच एक भाग आहे.
प्रश्न २.
खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ)
(१) ‘भारतमाता की जय’मधील भारतमाता म्हणजे → ▭
उत्तरः
भारतातले सर्व लोक
(२) महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये → ▭ ▭
उत्तर:
१. प्रेम सक्रिय पाहिजे
२. प्रेम सुबुद्ध हवे
(आ)
उत्तरः
१. न्याय
२. स्वातंत्र्य
३. समता
४. आपलेपणा
प्रश्न ३.
खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा.
उत्तर:
१. पंडित जवाहरलाल नेहरू
२. महात्मा गांधी
३. साने गुरुजींच्या
[एक मुलगा म्हणाला ………..
……….. तसे सुबुद्धही हवे. “]
प्रश्न ४.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) प्रतिज्ञेतील एखादया शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.
उत्तर:
आपल्या प्रतिज्ञेतील ‘भारत माझा देश आहे’ या पहिल्याच वाक्याचा अर्थ गुरुजींनी उलगडून सांगितला आणि या वाक्यातील ‘माझा’ या शब्दाचा मला नव्याने अर्थ उमगला. माझा माझ्या देशाकडे, आजूबाजूच्या परिसराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्या दिवशी शाळेतून घरी जाताना आमच्या इमारतीबाहेरील कचराकुंडीच्या आजूबाजूला पडलेला कचरा माझ्या निदर्शनास आला. लोकांनी कचरा कचराकुंडीत टाकण्याऐवजी बाहेर टाकलेला दिसला.
माझ्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी माझी असली पाहिजे या विचाराने घरी जाऊन नाकाला मास्क लावून, हातमोजे घालून मी परतलो आणि झाडूने सर्व कचरा एकत्र केला. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहून चर्चा करू लागले; पण मी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता सगळा कचरा कचरापेटीत जमा केला. माझी ही कृती पाहण्यासाठी परिसरातील बरीच मंडळी जमली होती. त्यांना त्यांची चूक कळाली होती. त्यानंतर मात्र मला कधीही कचरा कचराकुंडीच्या बाहेर दिसला नाही. देश माझा आहे प्रत्येकाने स्विकारले, तर देशाची प्रगती निश्चितच होईल, असा विश्वास मला या अनुभवाने मिळवून दिला.
(आ) तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा.
उत्तर:
मी पाचव्या इयत्तेत असताना आमच्या परिसरात पावसाने कहर मांडला होता. मी त्यावेळी शाळेत होते. पाण्याची वाढती पातळी पाहून शाळेतून मुलांना घरी पाठवण्यासाठी पालकांना बोलवले होते. माझे घर आणि शाळा यांच्यामध्ये एक ओढा होता. पावसामुळे त्याला प्रचंड पाणी आले होते. माझ्या शाळेतील माझे सर्व मित्र घरी निघून गेले होते. बाबा कामाच्या ठिकाणी अडकले होते. मला घेऊन जाण्यासाठी घरातून निघालेली आई मात्र अजून आली नव्हती; पण काही वेळातच मला पूर्ण भिजलेली, घाबरीघुबरी झालेली आई माझ्या दिशेने येताना दिसली. चिखलाने माखलेली, डोळ्यांत अश्रूंच्या धारा लागलेल्या आईला मला पाहताच हायसे वाटले. तिने मला ‘कवेत घेतले आणि ती रडू लागली. माझ्या काळजीने ती त्या ओढ्याच्या कंबरेपर्यंत वाढलेल्या पाण्यातून वाट काढत आली होती. आपल्या मुलीच्या काळजीने तिने त्या पाण्याच्या प्रवाहाचाही विचार केला नाही. आईचे प्रेम हीच या धाडसामागची प्रेरणा होती.
खेळूया शबदामशी
(अ) समान अर्थाचे जोडशब्द तयार करा.
उदा. पालनपोषण
(१) दंगा
(२) कोड
(३) थट्टा
(४) धन
(५) बाजार
उत्तर:
(१) दंगामस्ती
(२) कोडकौतुक
(३) थट्टामस्करी
(४) धनदौलत
(५) बाजारहाट
(आ) गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा.
(१) मी, आपण, रत्ना, . त्यांचे
(२) राहणे, वाचणे, गाणे, आम्ही
(३) तो, हा, सुंदर, आपण.
(४) भव्य, सुंदर, विलोभनीय, करणे
उत्तर:
(१) रत्ना – हे नाम असून इतर सर्व सर्वनामे आहेत.
(२) आम्ही – हे सर्वनाम असून इतर सर्व क्रियापदे आहेत.
(३) सुंदर – हे विशेषण असून इतर सर्व सर्वनामे आहेत.
(४) करणे – हे क्रियापद असून इतर सर्व विशेषणे आहेत.
(इ) खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा.
गाव, गावे, देश, काम, शेला, सणंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत, भाषा.
उत्तर:
(ई) खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
गगनभेदी घोष करणे,
रचनात्मक काम करणे,
पोटापलीकडे पाहणे,
कचाट्यात सापडणे
उत्तरः
सचिनने मैदानात पाऊल टाकताच साऱ्यांनीच गगनभेदी घोष केला,
जेष्ठ समाजसेवक भाऊंनी समाजासाठी रचनात्मक काम केले,
खरा देशभक्त देशहितासाठी पोटापलीकडे पाहतो,
जंगलात रस्ता चुकलेली गाय सिंहाच्या कचाट्यात सापडली.
चर्चा करूया.
- शाळेसंबंधी विदयार्थ्यांची कर्तव्ये कोणती, याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा.
- संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून चर्चा करा. त्याचा तुम्हांला कळलेला अर्थ वर्गात सांगा.
माझे वाचन
• ‘प्रतिज्ञा’ हे यदुनाथ थत्ते यांचे पुस्तक मिळवा व त्याचे वाचन करा.
(टीप: वरील कृती विदयार्थ्यांनी स्वत: करावी.)
• या पाठ्यपुस्तकातील ‘जलदिंडी’ हा पाठ वाचा व त्याचा या पाठाशी संबंध कसा जोडता येईल ते सांगा.
(टीप: वरील कृती विदयार्थ्यांनी स्वत: करावी.)
उपक्रम :
आपल्या कार्यातून देशावर आणि देशातील लोकांवर प्रेम करणाऱ्या तुमच्या परिसरातील पाच व्यक्तींची माहिती मिळवा. ती माहिती लिहून काढा व वर्गात वाचून दाखवा.
(टीप: वरील उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करावा.)
आपण समजून घेऊया
• वाचा व उत्तरे लिहा.
प्रमुख विदयार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले.
(अ) वरील शब्दसमूह वाक्य आहे काय? ▭
(आ) वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का ? ▭
(इ) अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा. __________
उत्तर:
(अ) नाही.
(आ) नाही.
(इ) प्रमुख पाहुण्यांनी विदयार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले.
जेव्हा आपण ‘प्रमुख पाहुण्यांनी विदयार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले’, अशी रचना करतो तेव्हाच ते अर्थपूर्ण वाक्य होते.
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
लक्षात ठेवा :
(अ) नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी त्यांच्यापुढे जी अक्षरे जोडली जातात, त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.
(आ) विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो, त्याला ‘सामान्यरूप’ म्हणतात.
Class 8 Marathi Balbharati Chapter 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे Question Answer
संकलित मूल्यमापन
परिच्छेद १
कृती १ – आकलन
१. आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. भूमी
२. भूमिपुत्र
ii.
उत्तर:
१. आपल्या मुलांचे पालनपोषण करते
२. त्यांना वाढवते
iii.
उत्तर:
१. देशाचे पालनपोषण करायचे
२. देशाचा गौरव वाढवायचा
२. चौकटी पूर्ण करा.
i.
उत्तर:
प्रार्थनेची
ii.
उत्तर:
लेखक
iii.
उत्तर:
देशातील सर्व लोक
[मी एकदा एका ………..
………. मुले म्हणाली.]
(टीप: परिच्छेदावर आधारित कृतींकरिता संपूर्ण परिच्छेद न देता केवळ परिच्छेदाची सुरुवात व शेवट यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार, विदयार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील परिच्छेद वाचून कृतींचा अभ्यास करावा.)
कृती २ आकलन
१. चुकीचे विधान शोधा.
अ. लेखक शाळेत गेले तेव्हा मुले प्रार्थनेहून परतत होती.
ब. देशबांधवांवर प्रेम करणे एक वेळ सोपे; पण देशावर करणे अवघड.
क. काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात.
ड. परिच्छेदातील संवाद लेखक आणि विदयार्थी यांमध्ये घडला आहे.
उत्तर:
देशबांधवांवर प्रेम करणे एक वेळ सोपे; पण देशावर करणे अवघड.
२. खालील अर्थाची ओळ शोधा.
देशाबद्दल प्रेम न बाळगणारे दुर्दैवी आम्ही मुळीच नाही.
उत्तरः
“आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत !”
३. का ते लिहा.
i. लेखक शाळेत गेले असता सुखावले.
उत्तरः
लेखक शाळेत गेले असता त्यांनी मुलांना पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणताना पाहिले, त्यामुळे ते सुखावले.
ii. मुले आश्चर्याने लेखकाकडे पाहत राहिली.
उत्तर:
विदयार्थ्यांना तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता ? असा कोणीही न विचारलेला प्रश्न लेखकाने त्यांना विचारल्याने मुले आश्चर्याने लेखकाकडे पाहत राहिली.
परिच्छेद २
कृती १ आकलन
१. खालील आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. जात
२. धर्म
३. वंश
४. भाषा
ii.
उत्तर:
१. ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे
२. आपणही आनंदी व्हायचे
iii.
उत्तर:
१. अश्रू
२. हास्य
कृती २ – आकलन
१. योग्य विधान शोधा.
अ. आपले देशावर असलेले प्रेम आपत्काळी असावे.
ब. गांधीजी लोकांना ‘भारत माता की जय’ म्हणजे काय ते विचारू लागले.
क. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी, म्हणून संकटांना आमंत्रण दयायचे असते.
ड. भगतसिंह, राजगुरू इत्यादींचे देशावर खरेखुरे प्रेम होते.
उत्तर:
भगतसिंग, राजगुरू इत्यादींचे देशावर खरेखुरे प्रेम होते.
२. हे केव्हा घडले ते लिहा.
लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची गाडी अडवली, जेव्हा…
उत्तर:
पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते.
३. ‘जागतिक भाषा’ ही संकल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
लेखकाच्या मते हास्य आणि अश्रू यांची भाषा ही ‘जागतिक भाषा’ आहे. संपूर्ण जगभरात बोलल्या जाणाऱ्या, जगातील प्रत्येक माणसाला समजणाऱ्या अशा या भावनांच्या भाषेला प्रांतांचा, धर्म, पंथांचा अडसर नाही. ती मनाने समजून घ्यायची भाषा आहे. त्यामुळे, ती विशिष्ट प्रदेशापुरती विशिष्ट देशापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जगाची भाषा आहे.
कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती
१. अश्रू आणि हास्य यांची भाषा ही जागतिक भाषा आहे, याचा अनुभव तुम्ही घेतला आहे का ?
उत्तरः
हो. मागील वर्षी मुंबईतील मोठ्या बाजारामध्ये मला एक परदेशी मुलगा दिसला. त्या गर्दीत भांबावलेला तो मुलगा रडत होता. त्याचे अश्रू त्याच्या मनातील भीती दाखवून देत होते. नक्कीच काहीतरी झाले असावे असे मला जाणवले. मी माझ्या पालकांच्या मदतीने त्या मुलाची विचारपूस केली; पण भाषा कळत नसल्याने थोडा अडसर जाणवला; मात्र त्याचे न थांबणारे अश्रू तो गर्दीत हरवला असल्याची साक्ष देत होते. आम्ही तत्काळ पोलिसांची मदत घेत त्याच्या आई-वडिलांशी त्याची गाठ घालून दिली. त्याच्या आणि त्याच्या आई व वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्याने त्यांच्या साऱ्या भावना स्पष्ट झाल्या. हे हास्य आम्हांला विलक्षण समाधान देऊन गेले. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी हास्य आणि अश्रूंच्या भाषेने या मर्यादा तोडल्या होत्या.
परिच्छेद ३
कृती १ – आकलन
१. आकृती पूर्ण करा.
उत्तर:
१. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे
२. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे
२. चौकटी पूर्ण करा.
i.
उत्तर:
कामाचा संदर्भ
ii.
उत्तर:
स्वार्थी वृत्ती
iii.
उत्तर:
निःस्वार्थी वृत्ती
३. कोण ते लिहा.
- देशासाठी सणंग विणतो आहे अशा भावनेने शेले विणणारे-
- पदार्थामध्ये प्रेमाची चव मिसळणारी –
उत्तर:
- संत कबीर
- आई
[पण शांततेच्या काळात ………
……. निर्माण करत असतो.]
कृती २ आकलन
१. परिच्छेदात तुलना केलेल्या बाबींचा तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
२. हे केव्हा घडेल ते लिहा.
आपण केलेल्या कार्यान्ची गुणवत्ता निश्चितच वेगळी
असेल, जेव्हा …..
उत्तरः
ते कार्य आपण देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने करू.
३. परिणाम लिहा.
देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने केलेल्या कार्याची
गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल, याची जाणीव
नसल्यास.
परिणाम: अनेक अडचणी आणि गैरसोई आपण निर्माण करू.
४. कारण लिहा.
संत कबीर यांचे शेले विणायचे काम अपूर्व असायचे, कारण …….
उत्तर:
संत कबीर इतर विणकरांसारखेच शेले विणायचे; मात्र देशासाठी गवितो आहे अशा भावनेने ते शेले विणत असत.
कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती
१. ‘पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही’ या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तरः
‘पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही’ हे वाक्य देशप्रेमाची परिभाषा सांगणारे आहे. मानवाने स्वार्थाचा त्याग करून देशाचा, देशाच्या हिताचा विचार करणे इथे अभिप्रेत आहे. आपले सुख, आपली सुरक्षा, आपले जीवन, आपला फायदा या सर्व गोष्टी वेगळ्या ठेवून समाजाचा फायदा हा विचार जेव्हा आपण करू तेव्हाच हे शक्य होईल. देशातील प्रत्येक व्यक्ती मिळून देश बनतो. त्यामुळे, या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करणे त्या प्रत्येक व्यक्तीची काळजी करणे म्हणजेच देशप्रेम असते. आपली कृती आपल्या देशासाठी लाभदायक आहे, की नाही याचा विचार जेव्हा प्रथम केला जाईल तेव्हाच आपले देशावरचे प्रेम सिद्ध होईल. त्यामुळे, देशावर प्रेम करण्यासाठी स्वार्थ सोडावाच लागेल असे लेखक या वाक्यातून सुचवू पाहत आहेत.
परिच्छेद ४
कृती १ – आकलन
१. आकृती पूर्ण करा.
उत्तर:
१. देशावरील प्रेम प्रकट करण्यासाठी
२. देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी
२. चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
i. देशबांधवांवरील
ii. प्रेम
iii. संवर्धक शक्ती
iv. खरा धर्म
३. कोण ते लिहा.
- देशावर प्रेम करण्याचा दावा फोल ठरणारे –
- ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ असे खऱ्या अर्थाने म्हणू शकणारे –
उत्तर:
- देशबांधवांवर प्रेम न करता येणारे
- खऱ्या धर्माचे उपासक
४. खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा.
उत्तर:
साने गुरुजी
[एस. टी. च्या, रेल्वेच्या ………
……. माझे प्रेम आहे.’]
कृती २ – आकलन
१. तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
i. जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते.
ii. देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असते.
१. हे केव्हा घडेल ते लिहा.
गाड्या घाण राहणार नाहीत, जेव्हा …..
उत्तर:
एस. टी. च्या, रेल्वेच्या कामगारांमध्ये, प्रवाशांमध्ये आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम, आस्था निर्माण होईल.
३. का ते लिहा.
देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे; कारण…..
उत्तर:
मोठ मोठे प्रश्न उभे राहतात तेव्हा तर आपण देशबांधवांवरील प्रेम दाखवतोच; मात्र असे मोठे प्रसंग जीवनात एखादया वेळीच आले तर येतात; पण छोटे छोटे प्रसंग मात्र रोजच येत असतात.
कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती
१. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:
आज सारे विश्व धर्म, पंथ, जात, भाषा यांच्या नावाखाली विभागले गेले आहेत; पण साने गुरुजींच्या मते मानवाचा एकच खरा धर्म आहे, तो म्हणजे माणसावर प्रेम करणे. हा धर्म माणसामाणसांत भेदा-भेदाच्या भिंती उभारणारा नाही. खरा धर्म हा सारी बंधने, सारे भेद बाजूला सारून केवळ प्रेम करत माणसांना जवळ आणणारा आहे. या धर्मात कुणी उच्च-नीच नाही. सारे समान आहेत. प्रत्येक मानवाने इतर मानवांचा मानवतेने विचार करणे, सुख-दुःखात एकमेकांची साथ देणे, परस्परांना प्रेमाने वागवणे, दुःखी माणसांचे अश्रू पुसून त्यांना प्रेमाने आनंद देऊ करणे हे या धर्मात अपेक्षित आहे. हा धर्म माणसात रुजला, तर सारे विश्व आनंदाने नांदू लागेल.
परिच्छेद ५
कृती १ – आकलन
१. आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. आपली गावे मलमूत्राने वेढलेली नसती
२. आपले डोंगर उघडेबोडके दिसले नसते
ii.
उत्तर:
१. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नाही
२. फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागत नाहीत
iii.
उत्तर:
१. जात
२. धर्म
३. वंश
४. भाषा
२. चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
i. सस्यश्यामल
ii. सुजलाम सुफलाम
iii. भूमीची सुफलता
[खरोखरच आपल्या देशावर ……….
……….. देशावर प्रेम करणे.]
कृती २ – आकलन
१. योग्य विधान लिहा.
अ. देशातील हवा, पाणी, निसर्ग बिघडून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल.
ब. ‘वंदे मातरम्’ गीतातील आदर्श वास्तवात येण्यासाठी धडपडण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे.
क. भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे सहज शक्य होईल.
ड. देशावर प्रेम करणे म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांचा द्वेष करणे होय.
उत्तर:
‘वंदे मातरम्’ गीतातील आदर्श वास्तवात येण्यासाठी धडपडण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे.
कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती
१. तुमचे देशावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी या देशाचा नागरिक म्हणून तुम्ही काय कराल?
उत्तर:
देशाचा नागरिक म्हणून माझी सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन. राहतो त्या परिसराची स्वच्छता करणे, निसर्गसंवर्धनास हातभार लावणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, व्यवहारात प्रामाणिक राहणे इत्यादी कर्तव्ये मी पूर्ण करेन. कोणताही भेदाभेद न मानता माणूस म्हणून माणसांशी प्रेमाने वात्सल्याने वागेन. साऱ्या भूमिपुत्रांना आपले मानेन. स्वार्थाचा त्याग करून गरजूंची सेवा करेन. देश संरक्षणाकरिता सतत दक्ष राहीन. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क आवर्जून बजावेन. आपल्या देशाविषयी व देशवासियांविषयी प्रेम आणि आस्था बाळगेन. इंधनांचा, पाण्याचा, विजेचा जपून वापर करेन. प्लॅस्टिकसारख्या गोष्टीचा वापर करणे टाळेन. मी भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणार नाही, अशारीतीने देशाचा नागरिक म्हणून मी देशसेवेसाठी नेहमी तत्पर राहीन.
पाठाधारित कृती
*१. खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर:
१. देशाच्या नवनिर्माणासाठी रनचात्मक कार्य करणे
२. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे
३. कोणतेही काम करताना याचा आपल्या देशावर व देशवासियांवर काय परिणाम होईल याचा विचार करणे
४. ‘आपल्या पोटापलीकडे जाऊन पाहणे
५. खऱ्या धर्माचा उपासक बनणे
६. भूमी सस्यश्यामल व्हावी म्हणून घाम गाळायची तयारी ठेवणे
७. देश प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी खटपट करणे
८. देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसणे
९. ‘वंदे मातरम्’ गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा, यासाठी धडपडणे
१० . सर्व समाजघटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता येणे
(टीप: विदयार्थ्यांनी वरीलपैकी कोणतीही चार उत्तरे लिहावीत.)
२. खालील शब्दांचे मूळ शब्द व सामान्यरूप ओळखून लिहा.
i. शाळेत
ii. लोकांनी
iii. काळात
iv. देशाच्या
उत्तर:
४. खालील वाक्यांचे प्रकार ओळखा.
(विधानार्थी / प्रश्नार्थी / उद्गारार्थी / आज्ञार्थी)
- हो, हो, करते तर!
- देशावर प्रेम करायचे, तर तुम्ही काय कराल?
- मुलांनो, शांतपणे ऐका.
- प्रेमात अपार संवर्धक शक्ती असते.
उत्तरः
- उद्गारार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- विधानार्थी वाक्य
५. खालील वाक्यांतील काळ ओळखा.
- मी शाळेत गेलो होतो.
- आमचे आमच्या देशावर प्रेम आहे.
- मी माझ्या देशाचा गौरव वाढवेन.
- तो नेता निवडणुकीच्या दौऱ्यासाठी येत आहे.
उत्तर:
- पूर्ण भूतकाळ
- साधा वर्तमानकाळ
- साधा भविष्यकाळ
- अपूर्ण वर्तमानकाळ
६. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.
- कोंबडा आरवतो.
- आईने भाकऱ्या थापल्या.
- कावळे प्रार्थना म्हणतात.
- मला आज मळमळते.
उत्तर:
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- भावे प्रयोग
७. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i. संकटांना आमंत्रण देणे
ii. प्रकट करणे
iii. कवेत घेणे
iv. आलिंगन देणे
v. घाम गाळणे
vi. कंबर कस
vii. खटपट करणे
viii. फळ मिळणे
ix. शब्दांकित करणे
x. आश्वासन देणे
उत्तरः
i. संकटांना आमंत्रण देणे – संकट स्वतःवर ओढवून घेणे.
वाक्य:व्यसने करून लोक उगाच संकटांना आमंत्रण देतात.
ii. प्रकट करणे – व्यक्त करणे.
वाक्य: विदयार्थी प्रतिनिधी म्हणून रमाने शिस्तीविषयी आपले मत प्रकट केले.
iii. कवेत घेणे – कुशीत घेणे.
वाक्य: छोटी मीना रडू लागताच आईने तिला कवेत घेतले.
iv. आलिंगन देणे – मिठी मारणे, गळाभेट घेणे.
वाक्यः खूप दिवसांनी चारुला पाहताच प्रियाने तिला आलिंगन दिले.
v. घाम गाळणे – कष्ट करणे, मेहनत करणे.
वाक्य: राघोबाने शेतात खूप घाम गाळला.
vi. कंबर कसणे – काम करायला तयार होणे.
वाक्य: दहावीच्या परीक्षेकरिता विजयने कंबर कसली.
vii. खटपट करणे – प्रयत्न करणे.
वाक्य: नोकरीसाठी राजनने खूप खटपट केली.
viii. फळ मिळणे – यश मिळणे.
वाक्य: मुलगी पोलीस झाली आणि रमाकाकूंना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले.
ix. शब्दांकित करणे – शब्दांत व्यक्त करणे.
वाक्यः रघूला आपल्या आईविषयीचे भाव शब्दांकित करता आले नाही.
x. आश्वासन देणे – हमी देणे, खात्री देणे.
वाक्य:सरपंचांनी शाळादुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले.
भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- प्रार्थना
- भूमी
- भेद
- सक्रिय
- सज्ञान
- पोट
उत्तर:
- अर्चना, आराधना
- धरती
- फरक
- क्रियाशील
- सुज्ञ
- उदर
२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- दुर्दैवी × …………
- गुलाम × ……….
- भेद × ………
- निष्क्रिय × ……..
- सुबुद्ध × ……….
- स्वार्थी × ………..
- न्याय × ………
उत्तर:
- सुदैवी
- मालक
- साम्य
- सक्रिय
- निर्बुद्ध, दुर्बुद्ध
- नि:स्वार्थी
- अन्याय
३. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा.
- मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता
- संत कबिरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना
- मुले शांतपणे ऐकत होती
- सर्व भूमिपुत्रांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे
उत्तर:
- मी विचारले, “तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता?”
- संत कबिरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना?
- मुले शांतपणे ऐकत होती.
- सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे, म्हणजेच देशावर प्रेम करणे.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे पाठाची पार्श्वभूमी
पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा उलगडलेला आशय म्हणजे ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ हा पाठ होय. काया, वाचा, मनाने केलेला संकल्प म्हणजे प्रतिज्ञा होय. प्रतिज्ञेतील शब्द म्हणजे केवळ शब्द नसून त्यामागे एक दृढ संकल्प असतो, काहीतरी करण्याचा ठाम विश्वास असतो. विदयार्थी आणि लेखकाच्या संवादरूपातील हा पाठ प्रतिज्ञेचा अर्थ अगदी सहजपणे वाचकाच्या मानत रुजवतो.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे शब्दार्थ
माझ्या देशावर माझे प्रेम आहे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
माझ्या देशावर माझे प्रेम आहे टिपा