Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 20Question Answer शब्दकोश for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 20 Question Answer शब्दकोश
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 20 शब्दकोश
शब्दकोश Question Answer
प्रश्न १.
नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द ‘अकारविल्हे’ प्रमाणे लावा.
उत्तर:
आलोक, अंबर, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समिरा, समीर.
प्रश्न २.
तुम्हांला पाठातील एखादया शब्दाचा अर्थ शोधायचा असेल, तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल ? सोदाहरण सांगा.
उत्तर:
पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल, तर यापुढे तो अर्थ मी शब्दकोशामध्ये शोधेन, शब्दकोशामध्ये लिपीतील वर्णाच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते. शब्दांचे पहिले अक्षर किंवा वर्ण विचारात घेऊन ही रचना केलेली असते. त्यामुळे, पाठातील ज्या शब्दाचा अर्थ मला शोधायचा आहे, त्या शब्दाचे पहिले अक्षर लक्षात घेऊन त्यानुसार शब्दाचा शोध घेईन. उदा. पाठातील ‘शब्द’ हा शब्द शब्दकोशात शोधायचा असेल, तर सर्वप्रथम पहिले अक्षर म्हणजेच ‘श’ वर्णमालेत कोणत्या स्थानी आहे याचा शोध घ्यावा लागेल. ‘श’ या वर्णाने सुरू होणाऱ्या शब्दांची यादी समोर आल्यावर त्यामध्ये ‘श’ नंतर येणारे ‘ब’ हे अर्धे व्यंजन आणि ‘द’ हे पूर्ण व्यंजन शोधावे लागेल. अशारीतीने, आपल्याला ‘शब्द’ हा शब्द शब्दकोशामध्ये शोधता येईल.
प्रश्न ३.
शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
आपल्या भाषेमध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. बोलताना लिहिताना आणि वाचताना योग्य आणि नेमका अर्थबोध होण्यासाठी आपल्याला वापरलेल्या शब्दाचा नेमका अर्थ माहीत असणे आवश्यक ठरते. हा अर्थ आपल्याला शब्दकोशाद्वारे समजून घेता येतो. शब्दकोशामध्ये वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते. त्यामुळे आपल्याला हवा असलेला शब्द चटकन शोधणे शक्य होते. शब्दकोशामध्ये शब्दाच्या विविध अर्थछटांबरोबरच शब्दांचे योग्य उच्चार, त्यांचा उगम, समानार्थी शब्द, संदर्भानुसार बदलणारे अर्थ हेदेखील दिलेले असतात. त्याद्वारे आपल्याला संबंधित शब्दाची परिपूर्ण माहिती मिळू शकते. त्यामुळे आपल्याला भाषेचा मनापासून आनंद घेता येतो आणि आपली भाषा समृद्ध होण्यास मदत होते.
प्रश्न ४.
शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.
उत्तर:
दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक नवनवीन शब्द आपल्या कानावर पडत असतात. शब्दकोशाच्या मदतीने आपण या शब्दांचा नेमका अर्थ समजून घेऊ शकतो. अर्थ समजून घेतल्यामुळे या शब्दांचा अधिक समर्पकपणे आणि परिणामकारकपणे वापर करणे शक्य होते. यामुळे आपली भाषा समृद्ध होते. शब्दांचे मोल लक्षात येते. त्याचबरोबर शब्दकोशाद्वारे शब्दांचे योग्य उच्चार कसे करावेत हेदेखील लक्षात येते.
प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे लक्षात घेऊन शब्दाचा योग्य अर्थ जाणून घेण्याची सवय लागणे, शब्दाच्या अर्थछटा समजून घेणे, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे, शब्दकोश हाताळता येणे अशी विविध उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून शब्दकोश पाहिला जातो.
आपण समजून घेऊया.
तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही धडे वाचता, , कविता वाचता. धडे आणि कविता म्हणजेच गदय आणि पदय यांच्या रचनेत फरक आहे, हे तुम्हांला माहीत आहे. हा फरक असतो मुख्यतः लयीचा. पढ्य गाता येते किंवा लयीत वाचता येते. गदयाचे तसे नसते. लय निर्माण कशी होते? कोणत्या गोष्टीमुळे होते ?
वृत्त, छंद यांसारख्या गोष्टींमुळे कवितेला लय मिळते. कवितेतील म्हस्व, दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो, त्याला ‘वृत्त’ म्हणतात. याचाच अर्थ असा, की कविता एका विशिष्ट वृत्तामध्ये रचलेली असते, म्हणूनच कविता आपल्याला लयीत म्हणता येते. वृत्तासंबंधीच्या काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊया.
• खालील तक्ता अभ्यासा.
• वृत्तांतील लघुगुरूक्रम ठरवण्याचे काही नियम आहेत.
या इयत्तेत आपल्याला अक्षरगणवृत्ते शिकायची आहेत. ज्या वृत्तांतील अक्षरांची संख्या ठरावीक असते व त्या अक्षरांचा लघुगुरूक्रम सुद्धा ठरावीकच असतो, त्या वृत्तांना ‘अक्षरगणवृत्ते’ म्हणतात.
गण निश्चितीसाठी काही संकल्पना
(१) चरणातील तीन-तीन अक्षरांचे मिळून गण तयार होतात. उर्वरित प्रत्येक अक्षराचा स्वतंत्र गण पाडावा. य, र, त, न, भ, ज, स, म असे एकूण आठ गण आहेत. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप. लघुगुरुक्रमानुसार हे गण ठरतात. यात प्रत्येक गणाच्या आरंभीच्या अक्षरापासून गणाचे नाव ठरते. उदा., ‘य’ गण म्हणजे ‘यमाजी’. यु मा जी यात ‘य’ हे अक्षर लघू आणि ‘मा’, ‘जी’ ही अक्षरे गुरू आहेत.
(२) उच्चार सुलभ व्हावा म्हणून पदयाच्या चरणातील ज्या ठिकाणी थांबायचे असते त्याला ‘यती’ असे म्हणतात. यती प्रत्येक चरणाच्या शेवटी व कधी कधी मध्येही असतो.
• लघुगुरूक्रम ओळखण्यासाठी खाली दिलेल्या गणांचा तक्ता पहा.
• आता आपण भुजंगप्रयात, मालिनी, वसंततिलका या अक्षरगणवृत्तांचा अभ्यास करणार आहोत.
(१) भुजंगप्रया
वृत्ताची लक्षणे
(अ) या वृत्तात चार चरण असतात.
(आ) प्रत्येक चरणात १२ अक्षरे असतात.
(इ) यती ६ व्या व १२ व्या अक्षरावर असतो.
(ई) भुजंगप्रयात वृत्ताचे गण- य-य-य-य असे पडतात.
उदा., मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे बदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥
• खालील ओळींचे गण पाडा.
(अ) मना सज्जना तू कडेनेच जावे.
उत्तर:
(आ) सदा सर्वदा योग तूझा घडावा.
उत्तर:
(२) वसंततिलका
वृत्ताची लक्षणे
(अ) या वृत्तात चार चरण असतात.
(आ) प्रत्येक चरणात १४ अक्षरे असतात.
(इ) यती ८ व्या व १४ व्या अक्षरावर असतो.
(ई) या वृत्ताचे गण-त-भ-ज-ज-ग-ग असे पडतात.
उदा., द्रव्यास हे गमन-मार्ग यथावकाश ।
की दान भोग अथवा तिसरा विनाश ।
जो घे न भोग- जरि पात्र करी न देही ।
त्याच्या धनास मग केवळ नाश पाही ।।
• खालील ओळींचे गण पाडा.
(अ) फेकी रसाल तरुही मधुगंधपाश.
उत्तर:
(आ) मातीत ते पसरले अति रम्य पंख.
उत्तर:
(३) मालिनी
वृत्ताची लक्षणे
(अ) एकूण चार चरण असतात.
(आ) प्रत्येक चरणात १५ अक्षरे असतात.
(इ) यती ८ व्या अक्षरावर असतो.
(ई) या वृत्ताचे गण- न न म य य असे पडतात.
उदा., पखरण बघ घाली भूवरी पारिजात,
परिमल उधळी हा सोनचाफा दिशात ;
गवतहि सुमभूषा दाखवी आज देही,
धरणि हरितवस्त्रा मालिनी साजते ही.
• खालील ओळींचे गण पाडा.
(अ) अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी-
उत्तर:
(आ) वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एकटावे-
उत्तर:
भाषासौंदर्य
• खाली काही कवी व कवयित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत. या ओळी कोणाच्या आहेत त्याचा शोध घ्या व दिलेल्या चौकटींत त्यांची नावे लिहा.
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 20 शब्दकोश Question Answer
पाठाधारित कृती
१. आकृती पूर्ण करा.
i. ‘शब्दकोश कसा पाहावा’ याचा योग्य क्रम दर्शवणारा खालील आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
१. अकारविल्हे क्रम समजून घ्या
२. अर्थ शोधा
३. एका शब्दाचे विविध अर्थ समजून घ्या
ii.
उत्तर:
१. शब्दांचा संग्रह
२. शब्दांचे प्रमाण उच्चार
३. व्युत्पत्ती
४. समानार्थी प्रतिशब्द
५. संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ
६. अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र
७. प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ
२. एका वाक्यात उत्तर लिहा.
‘शब्द’ म्हणजे काय ?
उत्तर:
ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात.
३. शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांमध्ये नेमका काय फरक आहे?
उत्तर:
‘कोश’ या शब्दाचा अर्थ ‘संग्रह’ असा होतो; मात्र शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांमध्ये त्यांच्या रचनेच्या स्वरूपानुसार फरक असतो. ‘शब्दसंग्रह’ ही मर्यादित संकल्पना असून शब्दकोश ही व्यापक संकल्पना आहे. एखादया भाषेतील विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला ‘शब्दसंग्रह’ (Glossary) असे म्हणतात. भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह, एखादया विशिष्ट रचनापद्धतीचा अवलंब करून दिला जातो, तेव्हा त्याला ‘शब्दकोश’ (Dictionery) असे म्हणतात.
४. पाठामध्ये दिन आणि दीन हे वरवर साम्य दिसणारे मात्र लेखनातील फरकामुळे वेगळे अर्थ व्यक्त करणारे शब्द दिले आहेत. यांसारखे आणखी शब्द शोधून त्यांचे अर्थ लिहा.
उत्तर:
i. पाणि, पाणी
वर दिलेल्या ‘पाणि’ या शब्दाचा अर्थ हात असा होतो, तर दुसऱ्या ‘पाणी’ या शब्दाचा अर्थ पिण्याचे पाणी असा होतो.
ii. शिर, शीर
वर दिलेल्या ‘शिर’ या शब्दाचा अर्थ डोके, मस्तक असा होतो. तर, ‘शीर’ याचा अर्थ रक्तवाहिनी, नस असा होतो.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
४. खालील वाक्यांतील काळ ओळखून लिहा.
- दररोज शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद घेत जावा.
- त्याने लिपीतील वर्णांच्या क्रमाने शब्दयोजना केलेली होती.
- आपण हा विषय समजून घेत आहोत.
- या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल.
- मी उदद्या वाचत असेन.
उत्तर:
- रीती वर्तमानकाळ
- पूर्ण भूतकाळ
- अपूर्ण वर्तमानकाळ
- साधा भविष्यकाळ
- अपूर्ण भविष्यकाळ
५. खालील शब्दांचा संधिविग्रह करा.
- चिंतातुर
- उज्ज्वल
- यथेष्ट
- दिगंतर
- अल्पाहार
उत्तर:
- चिंता आतुर
- उत् + ज्वल
- यथा + इष्ट
- दिक् + अंतर
- अल्प + आहार
६. खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
i. वाजवी सनई मारुतराणा कोकीळ घे तानांवर ताना |
ii. हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे।
iii. शाळेतील बाई आईसारख्या असतात.
iv. तिच्या कळया होत्या मिटलेल्या सगळ्या ।
जणू दमल्या फार खेळूनी, मग निजल्या
उत्तर:
i. यमक, अनुप्रास
ii. अनुप्रास, यमक
iii. उपमा
iv. उत्प्रेक्षा, यमक
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- मैत्रीण
- दिवस
- धडा
- गरीब
- प्रकाश
- मोल
उत्तर:
- सखी
- दिन
- पाठ
- दीन
- उजेड
- किंमत
२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- न्हस्व ×
- गुण ×
- मर्यादित ×
- विकसित ×
- आदव ×
- प्रकोश ×
- अप्रकट ×
उत्तर:
- दीर्घ
- अवगुण, दोष
- अमर्यादित
- अविकसित
- अंतिम
- अंधार
- प्रकट
३. खालील शब्दांचे वचन बदला.
- जोडाक्षरे
- सवय
- साधन
- उद्दिष्टे
- सुट्टी
- पुस्तक
उत्तर:
- जोडाक्षर
- सवयी
- साधने
- उद्दिष्ट
- सुट्ट्या
- पुस्तके
४. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
- दोन नद्यांमधील प्रदेश-
- उदयाला येत असलेला.
- इच्छिलेली वस्तू देणारी गाय –
- निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन-
उत्तर:
- दुआब / दोआब
- उदयोन्मुख
- कामधेनू
- मानधन
५. लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.
- सुखरुप / सुखरूप / सूखरूप / सूखरुप
- उद्दीश्टे / उद्दीष्टे / उद्दिष्टे / उद्दिश्टे
- वायच / वाच्यार्थ / वायर्थ / वार्च्याथ
- संग्रहीत / संग्रहिथ / संग्रहित / संगृहीत
- व्युत्पत्ती / व्युत्पत्ती / व्यूत्पत्ति / व्युत्पत्ती
उत्तर:
- सुखरूप
- उद्दिष्टे
- वाच्यार्थ
- संग्रहित
- व्युत्पत्ती
६. खालील वाक्यांत दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा.
त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.
i. शब्दकोश म्हणजे ‘शब्दसंग्रह’ होय.
ii. शब्दांची किती गंमत आहे ना!
iii. अक्षरांत वरवर साम्य आहे; पण लेखनातील फरकामुळे अर्थात भेद आहे.
iv. दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू?
v. नम्रता, विवेक, आनंद सहलीला गेले.
उत्तर:
i. एकेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम
वाक्य: ‘नमता’ हा अलौकिक गुण
ii. उद्गारवाचक चिन्ह आहे.
वाक्य: अरेरे! फार वाईट झाले त्याचे!
iii. अर्धविराम, पूर्णविराम
वाक्य: विजा कडाडल्या; परंतु पाऊस पडला नाही.
iv. प्रश्नचिन्ह
वाक्य: गणपतीला कोणते फूल प्रिय आहे ?
v. स्वल्पविराम, पूर्णविराम
वाक्य मला कैऱ्या, चिंचा, आवळे, बोरे खायला खूप आवडते.
शब्दकोश पाठाची पार्श्वभूमी
आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक शब्द सहजपणे वापरतो; मात्र शब्दाचा नेमका अर्थ समजून घेतल्यावरच आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. यासाठी शब्दकोशाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘शब्दकोश’ या पाठामध्ये शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, त्याची रचना आणि तो कसा पाहावा हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. या पाठाच्या अभ्यासामुळे तुम्हांला शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा शब्दकोशातून शोधता येतील आणि त्यामुळे तुमची भाषा समृद्ध होण्यास मदत होईल.
शब्दकोश शब्द