Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 3 Question Answer लाखाच्या कोटीच्या गप्पा for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 3 Question Answer लाखाच्या कोटीच्या गप्पा
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा
लाखाच्या कोटीच्या गप्पा Question Answer
प्रश्न १.
आकृत्या पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
१. कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालणे
२. बुकस्टॉलवरची वर्तमानपत्रं वाचत जागेवर आडवे पडणे
३. दगडी बाकावर बसून गप्पा मारणे
४. गप्पा मारून कंटाळा आल्याने चहा घेऊन पुन्हा गप्पांमध्ये रंगणे
(आ)
उत्तर:
१. पासपोर्ट मिळवला
२. व्हिसा काढला
३. नवीन कपडे टेलरकडून शिवून घेतले, सूट आणि नेहमीचे कपडे सोबत घेतले
४. काकांनी दिलेले भारी किमतीचे घड्याळ वापरायला
प्रश्न २.
योग्य विधान शोधा.
(अ)
(१) लेखकाची नागपूर-दादर पॅसेंजर गाडी होती.
(२) म्हातारा व तरुण करोडपती होते.
(३) तरुण वकिली करायला परदेशात जात होता.
(४) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !
उत्तरः
(४) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !
(आ)
(१) म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते.
(२) म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.
(३) म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते.
(४) म्हातारा व तरुण बेजबाबदार होते.
उत्तरः
(२) म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.
प्रश्न ३.
तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा.
उत्तर:
समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेले वक्तव्य प्रसंगानुरूप असल्याचे जाणवते. दोन नाटकवाल्यांच्या लाखा – कोटींच्या गप्पा ऐकल्यानंतर रेल्वे प्रवासात त्यांच्या बॅगा चोरीला जाणे साहजिकच होते. त्यामुळे, इतके पैसे बाळगून निशिचतपणे श्री टायरमधून म्हणजेच अगदी सर्वांत स्वस्त असलेला रेल्वेप्रवास करणे व आपल्याकडील संपत्तीचा जोरजोरात गाजावाजा करणे किती चुकीचे आहे याची जाणीव हा प्रवासी करून देताना दिसतो. त्यातून त्याला परिस्थितीचे भान असल्याचे, जगण्याची सर्वसामान्य रीत ठाऊक असल्याचे कळते. त्या प्रवाशाने चोरी झाल्याची तक्रार तत्काळ स्टेशनवरील रेल्वे पोलिसांकडे करण्याचा दिलेला उपदेश हे त्या व्यक्तीचे प्रसंगावधान दर्शवते.
यामुळे, लवकर कारवाई होऊन चोर लवकर पकडले जाण्याची शक्यता वाढते. हा म्हातारा प्रवासी केवळ उपदेशाचे डोस पाजणारा नाही. तो दयाळूही आहे. लाखा- कोटींच्या बॅगा चोरीला गेल्यावरही त्याने प्रवासाकरिता मदत म्हणून पैसे देण्याची दाखवलेली तयारी माणुसकी अजून जिवंत असल्याची पोचपावती देते. चोरी झाल्यानंतरही ते दोन प्रवासी शांत असलेले पाहून साहजिकच या प्रवाशाला आश्चर्य वाटले. मनुष्यसुलभ प्रश्नही त्याच्या मनात उभे राहिले. त्याचे हे प्रश्न त्याच्या मनातील मनुष्यसुलभ शंकांचे काहूर स्पष्ट करणारे आहेत. अशाप्रकारे, समोरच्या बाकावरील प्रवाशाने केलेल्या वक्तव्यावरून तो प्रसंगाचे भान असणारा, दयाळू व्यक्ती असल्याचे दिसून येते.
(आ) पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.
उत्तर:
पाठाच्या प्रारंभी तरुण व म्हातारा प्रवासी यांमध्ये पुतण्या-काकाचे नाते असून काका पुतण्यासाठी काहीही करायला तयार असल्याचे जाणवते. हा काका कोट्यधीपती असून आपल्या पुतण्याच्या शिक्षणाकरिता, त्याच्या सुखसोईंकरिता आपल्याकडील करोडोंची संपत्ती देऊ करायला तयार आहे हे लक्षात घेत त्याच्याविषयी आदर वाटल्यावाचून राहत नाही. तो दिलदार तर आहेच; पण भावनाशील असून तो वाहवत जाणाराही आहे. काहीवेळा त्याच्या या दिलदारपणाचा रागही येतो.
त्याचा पुतण्या मात्र ऐषोआरामाची हाव असणारा, काकाच्या भोळेपणाचा फायदा उचलणारा, बेफिकीर मुलगा आहे असे लक्षात येते. मोठेपणा गाजवणाऱ्या या मुलाला पैशाची कदर नाही असेही वाटते. या दोघांच्या रेल्वेस्टेशनवरील आपल्या संपत्तीबाबतच्या गप्पा ऐकून त्यात त्यांचा बेफिकिरपणा जाणवतो. परिणामांचा विचार न करता बढाई मारणाऱ्या या . दोघांची चर्चा काही काळानंतर मूर्खपणाची वाटू लागते. हजारांवरून सुरू झालेल्या गप्पा जेव्हा करोडोंपर्यंत पोहोचतात तेव्हा मात्र या गप्पांमधील फोलपणा जाणवू लागतो. अशाप्रकारे, पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी संमिश्र स्वरूपाचे विचार मनात येतात.
खेळूया शब्दांशी.
(अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
(१) “राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना?”
(२) “तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी.’
(३) “तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये.
(४) “म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!”
उत्तर:
(१) प्रश्नार्थी वाक्य
(२) विधानार्थी वाक्य
(३) आज्ञार्थी वाक्य
(४) उद्गारार्थी वाक्य
(आ) खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
(इ) खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
(१) गप्पा रंगणे
(२) पंचाईत होणे
उत्तरः
(१) बाई वर्गावर आल्या नसल्याने वर्गात सर्वांच्या छान गप्पा रंगल्या होत्या.
(२) पाकीट हरवल्याने ऐनवेळी राधाची पंचाईत झाली.
(ई) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) त्यांचा खेळातील दम संपत आला.
(२) कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
(३) क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
उत्तर:
(१) त्याचा खेळातील दम संपत आला.
(२) कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला.
(३) क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
चर्चा करूया.
• ‘राजाचे परदेशातील खर्चाचे अंदाजपत्रक’ या विषयावर वर्गातील मित्र-मैत्रिणींशी चर्चा करा.
शोध घेऊया.
• विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व त्यांचे साहित्य यांचा शोध आंतरजालाच्या साहाय्याने घ्या. त्याची यादी तयार करा.
उपक्रम
(१) पुढील महिन्यात होणाऱ्या तुमच्या घरातील खर्चाविषयी आईशी गप्पा मारा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा.
(टीप: वरील उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावा.)
(२) या पाठाचे नाट्यरूपांतर करून वर्गात सादर करा.
(टीप: वरील उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करावा.)
आपण समजून घेऊया.
विभक्तीचे प्रत्यय
• खालील तक्ता वाचा.
‘घर’ या नामाची विभक्तीची रूपे पाहा.
लक्षात ठेवा :
(अ) प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो.
(आ) यांतील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पदयात होतो. उदा., चतुर्थी एकवचन ‘ते’, सप्तमी एकवचन ‘आ’.
(इ) अनेकवचनी प्रत्यय लावताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार येतो.
(ई) नामाप्रमाणे सर्वनामांनाही प्रत्यय लावून रूपे तयार होतात.
• खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा Question Answer
संकलित मूल्यमापन
परिच्छेद १
१. चौकटी पूर्ण करा.
- इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इगतपुरी स्टेशनवर थांबलेली रेल्वे → ▭
- म्हाताऱ्या प्रवाशाने तरुण प्रवाशाला संबोधले ते नाव → ▭
- राजा जाणार होता तो देश → ▭
- राजाच्या घड्याळाची किंमत → ▭
- दगडी बाकावर गप्पा मारणारा तरुण व म्हातारा प्रवासी यांचे नाते → ▭
उत्तर:
- नागपूर-दादर एक्सप्रेस
- राजा
- इंग्लंड
- दहा हजार रुपये
- पुतण्या-काका
[इंजिनमध्ये बिघाड …………
………. तुझ्यासाठी घेतलं होतं.]
कृती २ – आकलन
१. ‘पिटस्बर्ग’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
राजाचे घड्याळ खरेदी केले त्या ठिकाणाचे नाव लिहा.
२. परिणाम लिहा.
i. नागपूर – दादर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला.
परिणाम : ही रेल्वे इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबून राहिली.
ii. राजा आणि त्याचे काका मोठ्यानं हसत आणि बोलत होते.
परिणाम:राजा आणि त्याच्या काकाचा शब्द नि शब्द दूरवर ऐकू जात होता.
३. कारणे लिहा.
i. दगडी बाकावर बसलेल्या प्रवाशांनी चहा मागवला; कारण…
उत्तर:
एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही प्रवासी कंटाळले होते.
ii. काकांनी राजाला दिलेले घड्याळ विशेष होते; कारण………
उत्तर:
ते घड्याळ दहा हजार रुपयांचे असून ते पिटस्बर्गवरून काकांनी खास त्याच्यासाठी आणले होते.
कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती
१. प्रवासात अडकल्याचा तुमचा एखादा अनुभव लिहा.
उत्तरः
मागच्या वर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणं झालं. रेल्वेने प्रवास सुरू झाला. आमच्यासारखीच अनेक कुटुंबे प्रवास करत होती; मात्र सारी आपापल्या विश्वात रममाण होती. बाहेर पावसाने धुमाकूळ घातला होता. खेडच्या परिसरात रेल्वे अचानक थांबली. सगळीकडे पाणीच पाणी साठलेले दिसत होते. सर्व प्रवासी खिडकी-दरवाजांतून याची गंमत पाहत होते; पण थोड्याच वेळात स्थिती गंभीर झाली. पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली.
मग मात्र आम्ही सारेच हादरलो. दूरदूरवर पाणीच पाणी दिसत होते. रेल्वे पुढे जाणे शक्य नव्हते आणि पावसाचे कोसळणे सुरूच होते. यावेळी मात्र सारे प्रवासी आपापल्या कोशांतून निघून एकमेकांशी बोलू लागले. चर्चा करू लागले. एकमेकांमध्ये खाऊ, जेवण यांचे वाटप होऊ लागले. रेल्वेतून प्रवास करणारी अनेक कुटुंबे आता एक झाली होती. सारे प्रार्थना करत होते. काही तरुण मदतीसाठी अनेकांशी फोनवरून संपर्क साधत होते. संकटसमयी सारे भेद विसरून सर्व एकत्र आले होते. थोड्याच वेळात एन. डी. आर. एफ. ची तुकडी आली आणि एक-एक करून आम्हांला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. सारे प्रवासी सुखरूप होते. काही तासांचा हा थरारक अनुभव, त्यातच अनुभवलेला आपलेपणा या प्रवासाची आठवण कायम ठेवून गेला.
परिच्छेद २
कृती १ – आकलन
१. आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. विमानाने इंग्लंडला जाणे
२. इंग्लंडमध्ये तीन वर्षे राहणे
३. इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होणे
४. स्वतंत्र बंगल्यात राहणे
५. कॉलेजात मोटारीने जाणे
६. सारा युरोप पाहणे
७. प्रत्येक देशात किमान एक वर्षभर तरी राहणे व त्यासाठीचा निम्मा खर्च स्वतः करणे
ii.
उत्तर:
१. दोन चहाचे मळे
२. एक सफरचंदाचा मळा
iii.
उत्तर:
१. कोट्यधीपती
२. प्रेमळ
३. दिलदार
४. मोकळ्या मनाचे
iv.
उत्तर:
१. चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने
२. शेअर्स विकून आलेले नगद ऐंशी लाख
३. बँकेतून काढलेले वीस लाख
४. चहाचे दोन व सफरचंदाचा एक मळा विकून आलेले १० कोटी
२. चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
i. मुंबई
ii. चाळीस तोळे
iii. पंधरा लाख रुपये
[विमान प्रवासासाठी तुला ………
………………..कण्यात ठेवले आहेत. “]
कृती २ – आकलन
१. योग्य जोड्या जुळवा.
उत्तर:
(i – ब),
(ii – ड),
(iii – अ),
(iv – क)
२. तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
३. कारण लिहा.
काका राजाला ‘तू स्वतंत्र बंगला घे’ असे म्हणाले; कारण…
उत्तर:
कोट्यधीपती काकांच्या पुतण्याने कुठल्यातरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेले काकांना पटणार नव्हते. शिवाय, राजाला बॅरिस्टरच्या अभ्यासाकरिता निवांत जागा हवी असे काकांना वाटत होते.
कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती
१. तुमच्या प्रवासातील एखादा माणुसकी अनुभवलेला प्रसंग लिहा.
उत्तर:
माझी शाळा माझ्या घरापासून दूर असल्याने मला रोज एस. टी. ने प्रवास करावा लागतो. चौथीत असताना मी नेहमीप्रमाणे रोजची एस. टी. पकडली. घाईघाईत जाऊन जागाही पटकावली. थोड्याच वेळात कंडक्टर काका तिकिटाकरिता विचारू लागले. मी घाईनेच दप्तरात हात घातला; पण… पण पास हाती लागेना. रात्री दप्तर भरताना पास बाहेर काढला होता, तो भरायचाच राहून गेला. पैसेही नव्हते. मला तर रडूच कोसळले. काय करावे सुचेना.
माझा रडवेला चेहरा रोज आमच्या एस. टी. ने प्रवास करणाऱ्या एका भाजीवाल्या मावशींनी पाहिला. रोज एकाच गाडीने प्रवास करत असल्याने चेहरा ओळखीचा झाला होता. त्या मावशींनी काहीही न बोलता कंडक्टरला बोलवून माझ्या तिकिटाचे पैसे दिले. फारशी ओळख नसतानाही मावशींनी माझे तिकीट काढले. मला हायसे वाटले त्यांबद्दल मी त्यांचे आभार मानले. आज त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे माझा निंदेचा क्षण वाचला. दुसऱ्या दिवशी मी त्यांचे पैसे परत करू लागले; पण त्यांनी मात्र माझ्याकडून फक्त एक गोड पापा घेतला.
परिच्छेद ३
कृती १ – आकलन
१. आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. ते आपल्या डब्यात शिरले
२. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले
३. पाच-दहा मिनिटांतच पेंगायला लागले
४. चक्क घोरायला लागले
ii.
उत्तर:
१. तुमच्यासारख्या लखपती माणसांनी थ्री टायरमधून प्रवास करणे योग्य नाही
२. कल्याण रेल्वे पोलिसांकडे बॅगा चोरीला गेल्याची तक्रार करा. बॅगा अजून सापडतील!
२. चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
i. कल्याण
ii. कल्याण
iii. भामटा
[त्यांचं असं बोलणं ………….
……….. बॅगा अजून सापडतील!]
कृती २ – आकलन
१. हे केव्हा घडेल ते लिहा.
चोरीला गेलेल्या बॅगा सापडतील जेव्हा…
उत्तर:
कल्याण रेल्वे पोलिसांकडे बॅगांची चोरी झाल्याची तक्रार केली जाईल.
२. का ते लिहा.
i. म्हातारा प्रवासी दचकून जागा झाला.
उत्तर:
कल्याण स्टेशन आल्यावर तरुण प्रवाशाला जाग आली. त्यावेळी त्याला सीटखालील त्याची व म्हाताऱ्या प्रवाशाची बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. ही बातमी म्हाताऱ्या प्रवाशाला सांगताच तो दचकून जागा झाला.
ii. तरुण आणि म्हाताऱ्या प्रवाशाच्या बॅगा चोरीला गेल्या.
उत्तर:
तरुण आणि म्हातारा प्रवासी इगतपुरी स्टेशनवर गप्पा मारताना स्वत:च्या बॅगांमध्ये किती रकमा आहेत हे उघड उघड मोठ्याने बोलत होते. हे बोलणे एखादया भामट्याने ऐकल्यामुळे त्यांच्या बॅगा चोरीला गेल्या असाव्यात.
कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती
१. तुमची एखादी प्रिय गोष्ट चोरीला गेली आहे का? त्यावेळची तुमची प्रतिक्रिया लिहा.
उत्तर:
हो. लहान असताना बाबांनी माझ्यासाठी एक सायकल आणली होती. मला ती अत्यंत प्रिय होती. मी शाळेतून आलो, की सायकलवर संपूर्ण गावात फेरफटका मारायचो. सकाळीही बाबांसोबत शर्यंत लावायचो; पण एक दिवस सकाळी बाहेर आल्यावर अंगणात सायकल दिसलीच नाही. मी बेचैन झालो. घराभोवती फिरून सायकल शोधली; पण सायकल दिसली नाही.
पाण्याने भरलेल्या डोळ्यांसह मी आईला आणि बाबांना यासंदर्भात विचारलं; पण त्यांनाही सायकलविषयी काही माहीत नव्हतं. मग मात्र माझी जोरदार रडारड सुरू झाली. मग बाबांनी मला समजावून पोलीस स्टेशनला नेले. सायकल चोरीला गेल्याची तक्रार आम्ही नोंदवली. हताश मनाने आम्ही घरी परतलो. दिवसभर मी जेवलोही नाही. संध्याकाळी पोलीस स्टेशनमधून सायकल सापडल्याचा फोन आला आणि मला एवढा आनंद झाला, की त्या भरात मी नाचू लागलो. त्या दिवसापासून मी माझ्या वस्तूंची अधिक काळजी घेऊ लागलो.
परिच्छेद ४
कृती १ – आकलन
१. आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. बॅगा चोरीला जाणारे आहेत तरी कोण ?
२. तुम्हांला नव्या मिश्या कशाला लागतात?
३. कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे?
ii.
उत्तर:
१. राजा गोसावी
२. शरद तळवलकर
२. चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
i. मुंबई
ii. तीन-चार रुपये
iii. नाटकवाले
iv. मेकअपचे सामान
[आता तुमच्याकडे ………
………… रिहर्सल करत होतो. “]
कृती २ – आकलन
१. योग्य विधान शोधा.
अ. राजा गोसावी आणि शरद तळवलकरांकडे मुंबईला जाईपर्यंत पुरतील एवढे पैसे नव्हते.
ब. बॅगा गेल्यामुळे शरद तळवलकरांची पंचाईत होणार होती.
क. म्हातारा व तरुण प्रवासी खूप मोठमोठ्यानं रडत होते.
ड. चोरीला गेलेल्या बॅगांमध्ये सोन्याचे दागिने होते.
उत्तर:
ब. बॅगा गेल्यामुळे शरद तळवलकरांची पंचाईत होणार होती.
२. कारणे लिहा.
i. राजा गोसावी यांनी समोरच्या बाकड्यावरील प्रवाशाने देऊ केलेल्या पैशांना नकार दिला; कारण….
उत्तरः
राजा गोसावी यांना पैशांची गरज नव्हती. त्यांच्याकडे
तीन-चार रुपये असून त्यात त्यांचा चहाचा खर्च भागणार होता.
ii. शरद तळवलकरांना बॅगा चोरीला गेल्यामुळे दुःख झाले; कारण….
उत्तरः
त्या बॅगांमध्ये त्यांच्या मिश्या होत्या. शिवाजी नाट्यमंदिरात गेल्या गेल्या त्यांना नव्या मिशा घ्याव्या लागणार असल्याने त्यांना दहा रुपयांचा दंड बसून त्यांची पंचाईत होणार होती.
iii. बॅगा चोरीला जाऊनही तरुण व म्हातारा प्रवासी शांत होते; कारण….
उत्तरः
त्यांच्या बॅगांमध्ये लाखो-करोडोंचा माल नसून त्यात केवळ मेकअपचे सामान होते.
३. उत्तर लिहा.
इगतपुरी स्टेशनवरील तरुण आणि म्हाताऱ्या प्रवाशामधील लाखाच्या – कोटीच्या गप्पांमागील गुपित काय होते?
उत्तर:
इगतपुरी स्टेशनवरील तरुण आणि म्हातारा प्रवासी एकमेकांबरोबर मारत असलेल्या लाखांच्या कोटींच्या गप्पा म्हणजे त्यांनी वेळ घालवण्यासाठी केलेली त्यांच्या’ नव्या नाटकाची रिहर्सल होती.
कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती
१. प्रस्तुत परिच्छेदातून राजा गोसावी आणि शरद तळवलकर यांचे कोणते गुण दिसून येतात?
उत्तर:
प्रस्तुत परिच्छेदातून राजा गोसावी आणि शरद तळवलकर यांच्यातील मुरलेले अभिनेते ठळकपणे दिसून येतात. अगदी खरा वाटावा असा अभिनय त्यांनी उत्तम वठवलेला दिसतो. पैशांची गरज नसताना समोरून देऊ केलेले पैसे नाकारल्याच्या प्रसंगातून त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो.
चहाचा खर्च भागेल एवढेच पैसे उरल्यानंतरही तितकेच समाधानी व त्या परिस्थितीत शांत राहणारे हे दोन अवली शांततेची, नि:स्वार्थीपणाची मूर्तिमंत उदाहरणे समोर उभी करतात. नाटकात काम करणाऱ्या कलाकारांचे फारसे वैभवशाली नसलेले आयुष्य या दोघांच्या वर्तनातून दिसून येते. बॅगांची चोरी होऊनही कोणत्याही प्रकारचा त्रागा न करणारे हे कलाकार संयमी स्वभावाचे असल्याचे लक्षात येते. या प्रसंगीही हसत हसत परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती दिसून येते.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
१. खालील वाक्यांतील काळ ओळखून लिहा.
- गांडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले.
- ते घड्याळ पिटस्बर्गला घेतले आहे.
- आम्हांला पंधरा लाख खर्च आला.
- आम्ही नाटकवाले आहोत.
उत्तर:
- अपूर्ण भूतकाळ
- पूर्ण वर्तमानकाळ
- साधा भूतकाळ
- साधा वर्तमानकाळ
२. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.
- मी हाक मारली.
- आम्ही चहा घेतला.
- मी तिथे गेलो.
- आज आकाशात गडगडते.
उत्तर:
- कर्मणी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- भावे प्रयोग
३. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग ‘करा.
i. येरझारा घालणे
ii. आडवे होणे
iii. पक्कं होणे
iv. हरी हरी करत बसणे
उत्तरः
i. येरझारा घालणे – ये-जा करणे, अस्वस्थ होऊन इकडे- तिकडे फेऱ्या मारणे.
वाक्य: विजयला रात्री घरी परतण्यास उशीर झाल्याने बाबा येरझारा घालत होते.
ii. आडवे होणे – झोपणे, पहुडणे.
वाक्य: क्रिकेट खेळून थकलेला दादा घरी येताच आडवा झाला.
iii. पक्कं होणे – निश्चित होणे.
वाक्य: अनूचं मुंबईला जाणं पक्कं झालं होतं.
iv. हरी हरी करत बसणे – काही काम न करता नुसते बसून राहणे.
वाक्य:रमेश शाळेतून आला, की हरी हरी करत बसून राहतो.
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
२. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.
- किंमत
- अर्धा
- चिंता
- युवक
- वृद्ध
उत्तर:
- रक्कम
- निम्मा
- काळजी
- तरुण
- म्हातारा
३. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.
- ते घड्याळ खूप किमतीचं आहे.
- तू निष्काळजीपणा करू नकोस.
- त्याने काहीही निश्चित केले नाही.
- ती जागा घाणेरडी आहे.
उत्तर:
- ते घड्याळ कमी किमतीचं नाही.
- तू काळजी घे.
- त्याचे सर्व अनिश्चित आहे.
- ती जागा स्वच्छ नाही.
४. खालील शब्दांचे अनेक अर्थ लिहा.
i. सारा
ii. जागा
iii. दंड
उत्तर:
i. सारा –
अ. संपूर्ण, सगळा
ब. जमिनीवरील कर
ii. जागा –
अ. न झोपलेला
ब. ठिकाण
iii. दंड –
अ. शिक्षा
ब. खांदयापासून कोपरापर्यंतचा हात
लाखाच्या कोटीच्या गप्पा पाठाची पार्श्वभूमी
प्रस्तुत पाठ हा रेल्वेमध्ये इंजिन बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या राजा गोसावी आणि शरद तळवलकर या दोन प्रसिद्ध मराठी अभिनेत्यांमधील एक गमतीदार प्रसंग होय. या अभिनेत्यांच्या लाखा – कोटींच्या गप्पांना मिळालेली कलाटणी आणि त्यातून उद्भवलेला विनोदी प्रसंग या पाठात चितारला आहे.
लाखाच्या कोटीच्या गप्पा शब्दार्थ
लाखाच्या कोटीच्या गप्पा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
लाखाच्या कोटीच्या गप्पा टिपा