Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 6 Question Answer असा रंगारी श्रावण (कविता) for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 6 Question Answer असा रंगारी श्रावण (कविता)
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 6 असा रंगारी श्रावण (कविता)
असा रंगारी श्रावण (कविता) Question Answer
प्रश्न १.
खालील चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
१. रंगारी
२. चित्रकार
३. कलावंत
४. खेळगा/खेळगडी
५. गोपाळ
६. खटयाळ
(टीप: विदयार्थ्यांनी कोणतीही तीन उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.)
प्रश्न १.
(अ) ‘श्रावण’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
कवीच्या मते, सृष्टीचा चित्रकार कोण आहे ?
(टीप: विदयार्थी ‘श्रावण’ हे उत्तर येईल अशा प्रकारचे इतरही प्रश्न तयार करू शकतात.)
(आ) ‘इंद्रधनुष्याचा बांध’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
श्रावणमास नभाला कोणता बांध घालतो?
प्रश्न ३.
अर्थ लिहा.
(अ) रंगारी
(आ) सृष्टी
(इ) झुला
(ई) खेळगा
उत्तर:
(अ) रंगकाम करणारा
(आ) निसर्ग
(इ) झोका
(ई) खेळगडी, खेळातील सोबती
प्रश्न ४.
आकृती पूर्ण करा.
उत्तर:
१. निसर्गाला हिरवेगार करणारा, रंगवणारा
२. सुंदर निसर्गदृश्यांची पंगत मांडणारा
३. निसर्गातील घटकांशी (डोंगरदऱ्या, नदया, झाडेवेली) खेळ खेळणारा
४. वेलींच्या वेण्या बांधून, पानाफुलांच्या पातळाने त्यांना सजवणारा
५. पोरीबाळींना झोके बांधून देणारा, त्यांच्या गाण्याला लय देणारा
६. चिंब भिजून लहानग्यांच्या दहीहंडीच्या खेळात रमणारा.
७. ऊन-पावसाचा खेळ दाखवणारा
८. इंद्रधनुष्याने आभाळ, तर रंगीबेरंगी फुलांनी रान सजवणारा
९. हिरव्यागार सृष्टीत घर करून राहणारा
(टीप: विदयार्थ्यांनी कोणतीही चार उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.)
५. स्वमत
(अ) ‘जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत’, या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
‘असा रंगारी श्रावण’ या कवितेतून कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी श्रावण महिन्यातील विलोभनीय निसर्गाचे अतिशय सुंदर शब्दांत वर्णन केले आहे.
श्रावणात निसर्ग विविध रूपांनी खुलून दिसतो. विविध रंगांची उधळण करून हा रंगारी श्रावण संपूर्ण सृष्टीला रंगीबेरंगी व आकर्षक बनवतो. सर्वत्र पसरलेली हिरवळ, विविधरंगी पाना-फुलांनी बहरलेले रानोमाळ, फेसाळणारे धबधबे, झुळझुळ वाहणारे झरे, नदया, पावसात भिजलेली झाडेवेली अशा प्रकारची मनमोहक निसर्गदृश्ये श्रावणात आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. आपली सर्व कला ओतून निसर्गाची विविध मनमोहक रूपे साकारणारा हा कलावंत जणू उत्तमोत्तम चित्रांची पंगतच मांडत आहे, अशी कल्पना कवी येथे करतो.
(आ) ‘नागपंचमी’ आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘असा रंगारी श्रावण’ या कवितेतून कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी श्रावण महिन्यातील विलोभनीय निसर्गाचे अतिशय सुंदर शब्दांत वर्णन केले आहे.
श्रावणात मानवाचे जीवन सण, उत्सव, क्रीडा यांमुळे खुलून गेलेले असते. या ऋतूत नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात. यांचा संदर्भ कवीने कवितेत सुंदररित्या वापरला आहे. श्रावणात विशेषत: नागपंचमीच्या सणादिवशी सर्व माहेरवाशिणी माहेरी येतात. नागोबाची पूजा करतात. झाडांना झोके बांधून त्यावर बसून मनसोक्त झुले झुलतात. ‘या पोरीबाळींसाठी श्रावणच जणू झाडाला झुले टांगतो. त्यांना झुलवतो. झोक्यावर निवांतपणे झुलताना त्या जी गाणी गातात, त्यांना लय देण्याचे काम हा श्रावण करतो.’ असा उल्लेख कवी कवितेत करतो.
तसेच, गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आठवण म्हणून दहीकाल्याने भरलेली हंडी मानवी मनोरे रचून फोडली जाते. या दहीहंडीच्या उत्सवात श्रावण स्वत: लहानग्यांसोबत खेळगडी होऊन खेळतो. तो गोपाळ (श्रीकृष्ण) बनून त्या खेळात सामील होतो, चिंब होतो. सर्वत्र प्रेम, आनंद पसरवतो, असा संदर्भ कवी कवितेत वापरतो.
(इ) कवितेतून व्यक्त झालेला ‘रंगारी श्रावण’ तुम्हांला का आवडला ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘असा रंगारी श्रावण’ या कवितेतून कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी श्रावण महिन्यातील विलोभनीय निसर्गाचे अतिशय सुंदर शब्दांत वर्णन केले आहे.
संपूर्ण सृष्टीला विविध रंगांनी नटवणाऱ्या श्रावणाला कवी ‘रंगारी श्रावण’ म्हणतो. हा श्रावण सर्वत्र हिरवाई पसरवतो, निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवतो. तो साऱ्या सृष्टीमध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण करतो. कवीने वर्णन केलेली त्याची सारी रूपे मनाला आकर्षित करतात. या कारणांमुळेच, निसर्गासोबतच माणसाच्या जीवनातही आनंद, उत्साह भरणारा, सृष्टीला नटवणारा हा कवितेतला मनमोहक श्रावण मला फारच आवडला.
खेळूया शब्दांशी
• कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा.
१. नदीशी
२. लाजल्या
३. झाडाला
४. बांधतो
उत्तर:
१. झाडांशी
२. सजल्या
३. गाण्याला
४. लपतो
उपक्रम
१. ‘आश्विन’ महिन्यातील निसर्गाचे निरीक्षण करा, त्याचा अनुभव घ्या व अनुभवलेखन करा.
उत्तर:
ते आश्विन महिन्यातील दिवस होते. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. या दिवसांत पहाटेच्या वेळी गवताची पाती दवबिंदूंनी शहारतात. दिवसा ऊन- पावसाचा पाठशिवणीचा खेळ पाहताना, क्वचित इंद्रधनुष्याचे सौंदर्य अनुभवताना मन प्रसन्न होत असे. या काळात पीक कापणीसाठी तयार झालेले असते. त्यामुळे, पिवळसर सोनेरी रंगांनी सजलेली शेते मी तासन्तास न्याहाळत असे. कधीमधी चुकार पक्ष्यांचा थवा दाणे टिपण्यासाठी पिकांवर झेपावत असे.
दुपारी कडक उन्हामुळे अंगाला घामाच्या धारा लागल्या, अंगाची लाही लाही झाली, की मनाला ऑक्टोबर हीटची जाणीव होई; मात्र रात्री चंद्राचा शीतल प्रकाश मनाला गारवा दयायचा. नवरात्रीत तर चांदण्या रात्री घटस्थापनेभोवती फेर धरताना मन अगदी दंगून जायचे. दसरा-दिवाळी या सणांच्या चाहुलीने मन प्रसन्न झालेले असते. निसर्गात ऊन थंडी यांचा समन्वय साधत, आपल्या जीवनात आनंद घेऊन येणारा हा आश्विन माझ्या मनाला खूप भावला.
चला संवाद लिहूया.
• झोका व झाड दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
झोका : ………………………………………………………….
झाड : ……………………………………………………………
झोका : ………………………………………………………….
झाड : ……………………………………………………………
झोका : ………………………………………………………….
झाड : ……………………………………………………………
झोका : ………………………………………………………….
झाड : ……………………………………………………………
झोका : ………………………………………………………….
झाड : ……………………………………………………………
झोका : ………………………………………………………….
झाड : ……………………………………………………………
झोका : ………………………………………………………….
झाड : ……………………………………………………………
(टीप : या कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील ‘संवादलेखन’ पाहावे.)
Class 8 Marathi Balbharati Chapter 6 असा रंगारी श्रावण (कविता) Question Answer
संकलित मूल्यमापन
१. खालील चौकटी पूर्ण करा.
- रंग उधळत येतो तो → □
- कलागत दाखवणारा कलावंत असा आहे → □
- झाडाला टांगला जातो तो → □
- लख्ख उन्हात बांधलं जातं ते → □
- हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहणारा → □
उत्तर:
- रंगारी श्रावण
- साजिरा
- झुला
- पावासाचं घर
- श्रावण
[असा रंगारी ……….
………. करून राहती.]
कृती २ – आकलन
१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. श्रावणाने कशाची पंगत मांडली आहे ?
उत्तरः
श्रावणाने जागोजागी सुंदर निसर्गचित्रांची पंगत मांडली आहे.
ii. श्रावण कोणाच्या वेण्या गुंफितो?
उत्तरः
श्रावण वेलींच्या वेण्या गुंफितो.
iii. वेली कशाप्रकारे सजल्या आहेत?
उत्तर:
वेली पावसाच्या थेंबांची नक्षी असलेले, रंगीबेरंगी पानाफुलांनी नटलेले पातळ नेसून सजल्या आहेत.
iv. पोरींच्या गाण्याला लय कोण देतो?
उत्तर:
पोरींच्या गाण्याला श्रावण लय देतो.
v. श्रावण खेळगा कशासाठी बनतो ?
उत्तरः
श्रावण पोरांमध्ये खेळायला खेळगा बनतो.
कृती ३ – सरळ अर्थ
१. ‘नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी
रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तरः
श्रावण डोंगरदऱ्यांना हिरवाईने नटवतो. श्रावणात नदयानाले दुथडी भरून वाहतात. झाडे रिमझिम पावसात चिंब न्हाऊन निघतात. जणू काही श्रावण डोंगरदऱ्यांत नाचत नदीशी झिम्मा खेळतो आणि रिमझिम पावसांच्या सरींतून झाडांसोबत गाणे गातो, अशी कल्पना कवी येथे करतो.
२. ‘इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो
रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो.’ या काव्यपंक्तींतील सरळ अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
श्रावणात आकाशात सुंदरसे इंद्रधनुष्य उमटते. हा सप्तरंगी पट्टा म्हणजे जणू आकाशाला घातलेला बांध असल्यासारखे कवीला वाटते. श्रावणात माळरानांवर विविधरंगी, सुंदर रानफुले फुलतात. हिरव्यागार रानात ही फुलांची रंगीबेरंगी नक्षी म्हणजे जणू सृष्टीला केलेले गोंदण आहे, अशी कल्पना कवी येथे करतो.
कृती ४ – काव्यसौंदर्य
१. ‘सृष्टीचा गा चित्रकार हिर्वा देखावा रेखितो’ या ओळींतील अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
‘असा रंगारी श्रावण’ या कवितेतून कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी श्रावण महिन्यातील विलोभनीय निसर्गाचे अतिशय . सुंदर शब्दांत वर्णन केले आहे.
श्रावण महिन्यात सृष्टी जणू हिरवा साज घालून सजते. डोंगरदऱ्या, रानोमाळ, जंगले, मैदाने सर्वत्र हिरवळीचे गालिचे पांघरल्यासारखे वाटते. सृष्टीचे हे विलोभनीय सौंदर्य, हिरवाईने रंगलेले रमणीय रूप श्रावणात पाहायला मिळते. म्हणूनच, कवीने श्रावणाला ‘सृष्टीचा चित्रकार’ म्हटले आहे. हा श्रावण जणू आपल्या कुंचल्याने हा हिरवागार देखावा रेखाटतो, अशी कल्पना कवी येथे करतो.
२. ‘पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो
खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो’ या ओळींतील भाव स्पष्ट करा.
उत्तर:
‘असा रंगारी श्रावण’ या कवितेत कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी श्रावण महिन्यातील विलोभनीय निसर्गाचे सुंदर शब्दांत वर्णन केले आहे.
श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा एक अनोखा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. कधी रिमझिम पावसात ऊन पडते, तर कधी लख्ख ऊन असतानादेखील पाऊस पडत असतो. म्हणजे हा श्रावणमास जणू काही पावसाचे घर लख्ख उन्हात बांधून, एखादया खोडसाळ मुलाप्रमाणे त्याची खोडी काढून स्वतः झाडामागे लपत आहे, असे वर्णन कवी येथे करतो. श्रावणाला खोडसाळ मुलाची उपमा देऊन कवीने निसर्गातील ऊन-सावलीच्या खेळाचे सुंदर वर्णन केले आहे.
मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी कृती
१. खालील मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
प्रस्तुत कवितेच्या कवी / कवयित्रीचे नाव लिहा.
उत्तर:
कवी – ऐश्वर्य पाटेकर
ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तरः
श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन हा कवितेचा विषय आहे.
iii. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) अवघा
(ब) देखावा
(क) पातळ
(ड) सृष्टी
उत्तर:
(अ) संपूर्ण
(ब) दृश्य
(क) साडी
(ड) निसर्ग
iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तरः
श्रावण महिन्यात निसर्ग विवध रंगांनी नटतो. निसर्गसौंदर्या- बरोबरच सृष्टीमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणाऱ्या श्रावणाचा आपण मनमुराद आनंद घ्यावा.
v. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन करणारी ही यमकप्रधान रचना आहे. कवीची भाषाशैली चित्रदर्शी असून कवितेला स्वतःची आंतरिक लय आहे. रंग उधळणारा श्रावण हा रंगारी असल्याचे वर्णन करून कवीने कवितेत उपमा अलंकार साधला आहे. ‘कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत वेण्या गुंफित वेलींच्या वेली लाजल्या’ यासारख्या ओळींतून अनुप्रास अलंकार साधल्यामुळे नादमाधुर्य निर्माण झाले आहे.
vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.
उत्तरः
श्रावण महिन्यात निसर्गासह मानवही श्रावणरंगात रंगून जातो. माणसाचे जीवन उत्साह व चैतन्याने फुलवण्याचे काम श्रावणातील अनेक सण, उत्सव करतात. सृष्टीत होणाऱ्या मनमोहक बदलांचा मानवी मनाने मनमुराद आस्वाद घेतला पाहिजे हा विचार या कवितेतून व्यक्त होतो.
vii. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. सृष्टीचा गा चित्रकार हिर्वा देखावा रेखितो.
उत्तर:
श्रावण हा जणू रंगारी असून तो रंगांची उधळण करतो. सृष्टीचा चित्रकार असलेला श्रावण आपल्यासमोर हिरव्या रंगाचे सुंदर असे चित्र रेखाटतो.
viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर:
संपूर्ण सृष्टीला विविध रंगांनी रंगवणाऱ्या श्रावणाला कवी ‘रंगारी श्रावण’ म्हणतो. साऱ्या सृष्टीत हिरवाई पसरवणारा श्रावण नवचैतन्य व उत्साह घेऊन येतो याचे वर्णन करताना कवीने वर्णन केलेली श्रावणाची रूपे आपल्या मनाला आकर्षित करतात. श्रावणाचे एखाद्या माणसाप्रमाणे केलेले वर्णन आनंद देऊन जाते. म्हणून, मला ही कविता खूप आवडली.
काव्यपंक्तींचे रसग्रहण
१. पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या
पाना-फुलांचे पातळ थेंबाथेबांनी सजल्या.
उत्तर:
कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी ‘ असा रंगारी श्रावण’ या कवितेतून श्रावणातील विलोभनीय निसर्गाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. हा अल्लड श्रावणमास वेलींच्या वेण्या घालून त्यांना सजवतो तेव्हा त्या वेली लाजतात. आणि त्यांनी नेसलेल्या पानाफुलांच्या साड्यांवर पावसाचे थेंब त्यांचे सौंदर्य वाढवतात असे वर्णन या ओळींमध्ये कवीने केले आहे.
श्रावण महिन्यात संपूर्ण सृष्टी सौंदर्याचा साज चढवते. या काळात सर्वत्र हिरवळ पसरते. झाडेवेली, पाना-फुलांनी बहरतात. पावासाचे थेंब भिजलेल्या झाडावेलींचे सौंदर्य वाढवतात. श्रावणमासात जणू वेली पानाफुलांचा साजशृंगार करून तयार होतात अशी कल्पना कवीने येथे केली आहे.
या ओळींतील चित्रदर्शी भाषेमुळे एकमेकांत गुंतलेल्या वेली आणि त्यांच्या पानाफुलांवर सांडलेले पावसाचे टपोरे थेंब यांचे सुंदर चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ‘ते’ या अक्षराच्या वारंवार वापराने कवीने अनुप्रास अलंकार साधला आहे. लाजल्या, सजल्या या शब्दांतून साधणाऱ्या यमकांमुळे या ओळींना नादमाधुर्य प्राप्त होते. पानाफुलांना दिलेली पातळाची उपमा वेलींच्या गुंफलेल्या वेण्या यांतून एखादी सुंदर स्त्री डोळ्यांपुढे उभी राहते.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे विभक्ती प्रत्यय व सामान्यरूप ओळखून लिहा.
- सृष्टीचा
- डोंगरात
- नदीशी
- पोरींना
- दहीहंडीच्या
- नभाला
उत्तर:
शब्द | विभक्ती प्रत्यय | सामान्यरूप |
i. सृष्टीचा | चा | सृष्टी |
ii. डोंगरात | त | डोंगरा |
iii. नदीशी | शी | नदी |
iv. पोरींना | ना | पोरीं |
v. दहीहंडीच्या | च्या | दहीहंडी |
vi. नभाला | ला | नभा |
२. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / विधानार्थी / आज्ञार्थी / उद्गारार्थी)
- श्रावण ऋतूत निसर्गाचे सौंदर्य खुलते.
- पाऊस कसा पडतो?
- वा! काय छान वातावरण आहे बाहेर!
- नीना, मला चहा करून दे.
- इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?
उत्तर:
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
३. खालील वाक्यांतील काळ ओळखून लिहा.
- सृष्टीचा चित्रकार सुंदर निसर्गचित्र रेखाटत होता.
- पावसामुळे धरणी न्हाऊन निघाली होती.
- आकाशात इंद्रधनुष्याची कमान उमटली असेल.
- आम्ही श्रावणात गावी जात असू.
उत्तर:
- अपूर्ण भूतकाळ
- पूर्ण भूतकाळ
- रीती भूतकाळ
- पूर्ण भविष्यकाळ
४. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.
- फूल उमलले.
- जसलीन क्रिकेट खेळते.
- मोरूने गाय बांधली.
- त्याला आता चालवते.
उत्तर:
- कर्तरी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
५. खालील शब्दांचा संधिविग्रह करा.
- देवालय
- गिरीश
- देवर्षि
- महोत्सव
- तपोधन
- दुर्जन
उत्तर:
- देव + आलय
- गिरि + ईश
- देव + ऋषि
- महा + उत्सव
- तपः + धन
- दु: + जन
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.
- दृश्य
- निसर्ग
- आकाश
- जंगल
उत्तर:
- देखावा
- सृष्टी
- नभ
- रान
२. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- नदी
- झाड
- पाऊस
- फूल
उत्तर:
- तटिनी, सरिता
- तरु, वृक्ष, पादप
- वर्षा, पर्जन्य
- सुमन, कुसुम
३. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
- तिने फुलांच्या वेण्या गुंफल्या.
- तो देखावा मनमोहक होता.
- ती वेल कुंडीत छान बहरली.
- पाने वाढ.
- पोरी खेळायला आल्या.
- रमेश खोड्या काढतो.
- तिने वहीवर छान नक्षी काढली.
उत्तर:
- तिने फुलांची वेणी गुंफली.
- ते देखावे मनमोहक होते.
- त्या वेली कुंड्यांत छान बहरल्या.
- पान वाढ.
- पोर खेळायला आली.
- रमेश खोडी काढतो.
- तिने वह्यांवर छान नक्षी काढली.
४. शब्दांच्या नंतर ‘वंत’ हा प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
कलावंत, यशवंत, कीर्तीवंत, वरदवंत, गुणवंत इत्यादी.
५. खालील शब्दसमूहांसाठी आलंकारिक शब्द लिहा.
- लांबत जाणारे काम –
- दुर्मिळ वस्तू –
- मार –
- फार काळ न टिकणारे –
उत्तर:
- मारुतीचे शेपूट
- उंबराचे फूल
- चौदावे रत्न
- अळवावरचे पाणी
६. लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.
- इंद्रधनुश्य / इंदधनुश्य / इंद्रधनुष्य / इंद्रधनूष्य
- सृश्टी / सूश्टी / सृष्टी / सृष्ठी
- लख्ख / लख्क / ल्लख्ख / ल्लक्ख
- खट्ट्याळ / खट्याळ / खद्याल / खट्टयाल
उत्तर:
- इंद्रधनुष्य
- सृष्टी
- लख्ख
- खट्याळ
असा रंगारी श्रावण (कविता) कवितेचा आशय
कवी ऐश्वर्य पाटेकर यांची ‘असा रंगारी श्रावण’ ही कविता ‘किशोर, ऑगस्ट २०१७ या मासिकातून घेण्यात आली आहे. श्रावण महिन्यात निसर्गासह मानवही श्रावणरंगांत रंगून जातो. माणसाचे जीवन अनेक सण, उत्सवांनी, क्रीडांनी फुलून जाते. श्रावणातील मनमोहक बदलांचे आणि त्यांचा मनमुराद आस्वाद घेणाऱ्या मानवी मनाचे सुंदर वर्णन कवीने या कवितेत केले आहे.
असा रंगारी श्रावण (कविता) कवितेचा भावार्थ
‘असा रंगारी…………….. रेखितो’
कवी श्रावणाला सृष्टीचा चित्रकार, रंगारी म्हणतो. श्रावणात निसर्गाचे सौंदर्य खुलते. हा श्रावणमास जणू सृष्टीवर मनसोक्त रंगांची उधळण करत येतो. ग्रीष्माने रंग उडालेल्या सृष्टीला सृष्टीचा हा चित्रकार हिरव्या रंगाने रंगवतो, हिरवाईने नटवतो.
‘कलावंत …………..पंगत’
श्रावण हा सुंदर कलाकार आहे. त्याची कारागिरी काय वर्णावी? तो संपूर्ण सृष्टी अशा कौशल्याने रंगवतो, सजवतो, की जणू त्याने प्रत्येक ठिकाणी सुंदर चित्रांची पंगतच (रांग) मांडली आहे. असे वाटते.
‘नाचे दरी……….. बोलतो झाडांशी’
श्रावणात सारी सृष्टी आनंदून गेलेली असते. श्रावणमास जणू डोंगर, दऱ्यांसोबत नाचतो, नदीशी आनंदाने झिम्मा खेळतो, असे वाटते. म्हणजेच, श्रावणात डोंगरदऱ्या हिरवाईने नटतात, नदयानाले दुथडी भरून वाहतात. पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या हलक्या सरींतून जणू श्रावण झाडांसोबत गाणे गात असल्याचा अनुभव येतो.
‘वेण्या गुंफितो…………..सजल्या’
हा अल्लड श्रावणमास वेलींच्या वेण्या घालून त्यांना सजवतो, तेव्हा त्या वेली खूप लाजतात. त्या विविधरंगी पानाफुलांच्या जणू सुंदर साड्या नेसून सजतात. त्यावर खड्यांप्रमाणे उठून दिसणारे ते पावसाचे थेंब वेलींचे सौंदर्य वाढवतात.
‘झूले पोरींना………. गाण्याला ‘
या आनंदाच्या ऋतूत मुली झाडाला झुले टांगून निवांतपणे झोके घेतात आणि झुलता झुलता आनंदाने गाणी गातात. हा श्रावणमास अशाप्रकारे, झाडांना झुले टांगून मुलींना झोके देतो, आनंदाची गाणी गातो, त्या मुलींच्या गाण्याला नादमय लय देतो.
‘पोरांमध्ये………… अवघा ‘
हा श्रावण लहान मुलांसोबत एक खेळगडी होऊन खेळतो. म्हणजेच, लहान मुले विविध खेळ खेळून श्रावणाचा आनंद लुटतात. दहीहंडीमध्ये तर हा श्रावणमास गोपाळ (श्रीकृष्ण) होऊन चिंब भिजतो, सर्वत्र प्रेम, आनंद पसरवतो.
‘पावसाचं घर……… तो लपतो’
श्रावण महिन्यात ऊन आणि पावसाचा खेळ सुरू असतो. कधी लख्ख उन्हात पाऊस, तर कधी पावसात ऊन पडते. हा श्रावण जणू काही पावसाचे घर उन्हात बांधून एखादया खोडकर मुलाप्रमाणे त्याची खोडी काढत आहे आणि पटकन झाडामागे लपत आहे, असे वाटते.
‘इंद्रधनुष्याचा ………….गोंदतो’
श्रावणात ऊन-पावसाच्या खेळामुळे आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटते. ज्यामुळे, आभाळालाच जणू सप्तरंगी बांध घातल्यासारखे वाटते. श्रावणात रानामध्ये विविधरंगी, सुंदर रानफुले फुलतात. हिरव्यागार रानात ही रंगीबेरंगी फुलांची नक्षी म्हणजे जणू सृष्टीला केलेले नक्षीदार गोंदण वाटते.
‘असा रंगारी ……….. राहतो’
असा हा रंगारी श्रावण संपूर्ण सृष्टीला आपल्या रंगांत रंगवतो. सर्वत्र आनंदीआनंद निर्माण करतो. हिरव्यागार अशा सृष्टीच्या मळ्यात एक सुंदरसा खोपा करून राहतो. म्हणजेच, सृष्टीला हिरवेगार करून हा श्रावण स्वतः त्या सृष्टीतच घर करून राहतो.
असा रंगारी श्रावण (कविता) शब्दार्थ
असा रंगारी श्रावण (कविता) वाक्प्रचार व त्याचा अर्थ
खोडी काढणे. | कळ काढणे, मस्करी करणे. |
असा रंगारी श्रावण (कविता) टिपा
गोंदणे | सुईच्या साहाय्याने अंगावर नक्षी काढणे. |
झिम्मा | लहान मुलींचा एक खेळ, ज्यात गोल फेर धरून नाचतात. |
दहीदंडी | गोकुळाष्टमीला मानवी मनोरे रचून दहीकाल्याची हंडी फोडण्याचा सण. |