Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Class 7 Marathi Grammar व्याकरण for exam preparation.
Maharashtra Board Class 7 Marathi Vyakaran Grammar
शब्दजाती
विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण अक्षरांपासून शब्द तयार होतो. या शब्दांपासून वाक्य बनते. वाक्य बनण्यासाठी शब्दांच्या रूपात काही वेळा बदल केले जातात. त्यावरून शब्दांच्या जाती किंवा प्रकार पडतात. शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत. ज्या शब्दांमध्ये बदल घडतो त्यांना ‘विकारी’ अथवा ‘सव्यय शब्द’ म्हणतात, तर ज्या शब्दांमध्ये बदल घडत नाहीत त्यांना ‘अविकारी’ किंवा ‘अव्यय शब्द’ म्हणतात.
नाम
त्यांपैकी आता आपण विकारी शब्द (सव्यय) विस्ताराने अभ्यासणार आहोत.
१. सामान्यनामः एखादया वस्तूचा, व्यक्तीचा बोध करून देणाऱ्या नावाला सामान्यनाम म्हटले जाते. त्यास जातिवाचक नाम असेही म्हणतात.
उदा. मुलगा, नदी, झाड.
२. विशेषनाम: विशेषनामाद्वारे आपल्याला ठरावीक वस्तू, व्यक्तीचा बोध होतो. त्यास व्यक्तिवाचक नाम असेही म्हणतात. उदा. गंगा, रमेश, जास्वंद.
३. भाववाचकनाम: या नामांद्वारे आपल्याला एखादी व्यक्ती, वस्तू व पदार्थ यांच्यातील भाव, गुणधर्म किंवा स्वभाववैशिष्ट्यांविषयी बोध होतो. या शब्दांनी वास्तू किंवा प्राण्यांचा बोध होत नाही.
नामांना ई, आई, की, गिरी, पण, पणा, वा, ता, त्व, य लागून भाववाचक नामे तयार होतात.
उदा.
- धीट + आई = धीटाई
- कठीण + पणा = कठीणपणा
वाक्ये:
- मला सशाची चपळाई आवडली.
- त्याची आई माझ्याशी आपुलकीने बोलली.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खालील वाक्यांतील नामे अधोरेखित करा व त्यांचे प्रकारांनुसार वर्गीकरण करा.
- मधु गुणी मुलगा आहे.
- लताबाईंच्या गाण्यात गोडवा आहे.
- माधवी खूप मेहनत करून पुस्तके जमवत होती.
- आकाशात काळे ढग दाटून येतात.
- कृष्णाला दही आवडते.
उत्तर:
- मधु गुणी मुलगा आहे.
- लताबाईंच्या गाण्यात गोडवा आहे.
- माधवी खूप मेहनत करून पुस्तके जमवत होती.
- आकाशात काळे ढग दाटून येतात.
- कृष्णाला दही आवडते.
सामान्यनाम | विशेषनाम | भाववाचकनाम |
मुलगा | मधु | गुणी |
गाणे | लताबाई | गोडवा |
पुस्तक | माधवी | |
ढग | आकाश | |
काळे | ||
कृष्ण, दही |
[टीप: प्रत्येक सामान्यनामाचे विशेषनाम असते; पण प्रत्येक विशेषनामासाठी सामान्यनाम मिळेलच असे नाही.]
प्रश्न २.
खालील नामांचे प्रकार, ओळखून लिहा.
- कर्ण
- गंभीरता
- झाड
- रत्न
- शहाणपणा
- ओलावा
- ताजमहल
- शाळा
उत्तर:
- विशेषनाम
- भाववाचकनाम
- सामान्यनाम
- सामान्यनाम
- भाववाचकनाम
- भाववाचकनाम
- विशेषनाम
- सामान्यनाम
सर्वनाम
नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय.
वाक्यात एखादे नाम येऊन गेल्यानंतरच त्याबद्दल सर्वनाम वापरले जाते.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खाली दिलेली सर्वनामे ओळखा व त्यांचा उपयोग करून वाक्ये लिहा.
i. हा
ii. त्या
iii. कोणाला
iv. तुम्ही
v. ज्याला त्याला
उत्तर:
i. हा – दर्शक सर्वनाम
हा मुलगा अभ्यासात हुशार व चुणचुणीत आहे.
ii. त्या – तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
त्या मुली गरबा खेळायला जात आहेत.
iii. कोणाला – प्रश्नार्थक सर्वनाम
तू वही कोणाला दिलीस?
iv. तुम्ही – द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
तुम्ही सर्वजण खेळायला जा.
v. ज्याला त्याला – संबंधी सर्वनाम
ज्याला आपले ध्येय साध्य करण्याची प्रबळ इच्छा असते, त्याला यश हमखास मिळते.
विशेषण
नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास ‘ विशेषण’ म्हणतात व त्या नामाला ‘विशेष्य’ म्हणतात.
विशेषण साधारणपणे नामाच्या आधी येते.
नामाला कसा, कशी, कसे, कोणता, कोणती, कोणते असे प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येते, ते विशेषण असते.
ते नामाबद्दल अधिकची मर्यादित किंवा निश्चित माहिती पुरवते.
उदा. काळेभोर डोळे. यात ‘डोळे’ हे नाम, आहे. ते विशेष्य झाले. ‘काळेभोर’ ही डोळ्यांविषयीची विशेष माहिती आहे. म्हणजे ‘काळेभोर’ हे विशेषण झाले.
१. गुणवाचक विशेषण : नामाचे रंग, रूप, आकार, चव असे विशेष गुण सांगणाऱ्या विशेषणाला ‘गुणवाचक विशेषण’ म्हणतात.
उदा. ते गोंडस बाळ खुदकन हसले.
२. संख्यावाचक विशेषण : नामाची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला ‘संख्यावाचक विशेषण’ म्हणतात.
उदा. लाखो, अनेक, खूप, असंख्य, अधिक.
३. सार्वनामिक विशेषण: सर्वनामांपासून तयार झालेल्या विशेषणांना ‘सार्वनामिक विशेषण’ म्हणतात. ही सर्वनामे नामांपुढे येतात व विशेषणाचे कार्य करतात.
सार्वनामिक विशेषण होताना सर्वनामांच्या स्वरूपात बदल होतो. उदा. हे माझे पुस्तक आहे. (मी – माझे)
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खालील शब्दसमूहांतील विशेषणांचे त्यांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा.
काटेरी कुंपण, उंच झोका, माझी वही, हजारो हात, निस्सीम प्रेम, अप्रतिम बाग, कडक चहा, तेजस्वी डोळे.
उत्तरः
गुणवाचक विशेषण | संख्यावाचक विशेषण | सार्वनामिक विशेषण |
काटेरी, उंच, निस्सीम, अप्रतिम, कडक, तेजस्वी | हजारो | माझी |
प्रश्न २.
खालील चौकोनातील गुणवाचक विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.
उत्तर:
- समृद्ध भाषा
- भयानक वादळ
- निळाशार समुद्र
- शीतल चांदणे
- तप्त लोह
- सुंदर मुलगी
क्रियापद
क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
उदा. बाळ आईच्या कुशीत झोपले.
या वाक्यात ‘झोपले’ या क्रियावाचक शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, म्हणून ‘झोपले’ हे क्रियापद आहे.
१. सकर्मक क्रियापद (कर्म असलेले क्रियापद) : ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, त्यांना ‘सकर्मक क्रियापद’ म्हणतात.
उदा.
२. अकर्मक क्रियापद (कर्म नसलेले क्रियापद) : ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नसते, त्यांना ‘अकर्मक क्रियापद’ म्हणतात.
उदा.
या वाक्यातील क्रियापदाला (झोपले) काय हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळत नाही, म्हणून ह्या वाक्यात कर्म नाही, त्याला अकर्मक क्रियापद असे म्हटले जाते.
३. संयुक्त क्रियापदः जेव्हा वाक्यांमध्ये क्रिया कळण्यासाठी दोन क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात, तेव्हा त्या जोड क्रियापदांना ‘संयुक्त क्रियापद’ म्हणतात. या दोन्ही क्रियापदांवरून एकाच क्रियेचा बोध होतो.
उदा. मीना पुस्तक वाचत आहे.
येथे, ‘वाचत’ व ‘आहे’ या दोन क्रियादर्शक शब्दांनी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून या जोड क्रियापदांना ‘संयुक्त क्रियापद’ म्हणतात.
४. सहायक क्रियापदः संयुक्त क्रियापदात मूळ क्रियापदाला सहाय्य करणाऱ्या क्रियापदास ‘सहायक क्रियापद’ म्हणतात. उदा. ‘बाळ लाडू खाऊ लागले.’ या वाक्यात खाऊ लागले हे संयुक्त क्रियापद असून, त्यातील ‘खाऊ’ या मूळ क्रियापदाला ‘लागले’ या क्रियापदाची जोड मिळाल्याने वाक्य पूर्ण होते, म्हणून ‘लागले’ हे येथे सहायक क्रियापद आहे.
५. धातुसाधित: मूळ रूपाचे कृदंत रूप जे अपूर्ण क्रिया दर्शवते, त्या शब्दांना ‘धातुसाधिते’ म्हणतात.
उदा. ‘चोर पोलिसाला पाहून पळाला.’ या वाक्यात ‘पळाला’ हे मुख्य क्रियापद असून ‘पाहून’ हे धातुसाधित आहे, कारण ते वाक्यातील क्रिया अपुरी आहे हे दर्शवते.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खालील वाक्यांतील क्रियापदे सकर्मक, की अकर्मक ते ओळखून लिहा.
- अंजूने चित्र काढले.
- रमण कमळ बघ.
- मिहिर उद्या घरी जाणार.
- सरस्वती वीणा वाजवते.
- विदित छान गायला.
उत्तर:
- सकर्मक क्रियापद
- सकर्मक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
- सकर्मक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
प्रश्न २.
खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा व त्यातील धातुसाधिते व सहायक क्रियापदे ओळखून लिहा.
उत्तर:
वाक्य | धातुसाधित / कृदंत | सहायक क्रियापद |
i. उदा. अभिनय चांगला नाचू शकतो. | नाचू | शकतो |
ii. अशिती ‘दमूनभागून आली होती. | आली | होती |
iii. आता मला तुझे बोलणे सहन होत नाही. | होत | नाही |
iv. स्वेच्छाने छान केक करून आणला. | करून | आणला |
v. मी परवा संपूर्ण पुस्तक वाचून काढेन. | वाचून | काढेन |
आता आपण क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये, केवलप्रयोगी अव्यये या चार अविकारी शब्दजातींचा अभ्यास करू. लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम घडत नाही, त्यांच्या रूपात बदल घडत नाही. म्हणून त्यांना ‘अविकारी’ म्हटले जाते.
क्रियाविशेषण अव्यय
खालील परिच्छेद वाचा.
रवी वारंवार आजारी पडतो. त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे. मी अनेकदा त्याच्या घरी जातो. आजही गेलो होतो. मला पाहताच तो झटकन उठला. मी त्याला म्हणालो, “तू हल्ली सारखा आजारी पडतो आहेस. मी काल तुझी खूप वाट पाहिली. मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. मी तुला नेहमी सांगतो, की दररोज व्यायाम कर, तुझ्या शरीराची ताकद आपोआप वाढेल.”
वरील परिच्छेदातील अधोरेखित केलेले शब्द क्रियाविशेषण अव्यये आहेत. क्रियाविशेषण अव्यये वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात.
क्रियाविशेषण अव्ययांचे वाक्यातील क्रिया केव्हा, कोठे, किती वेळा व कशी घडली यांवरून चार मुख्य प्रकार पडतात.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खाली दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा व त्यांचा वाक्यात उपयोग करा.
i. इकडून
ii. थोडाफार
iii. सावकाश
iv. सध्या
v. दररोज
vi. सर्वत्र
उत्तर:
i. इकडून – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
मुग्धा म्हणाली, “अगं आई, इकडून ये.”
ii. थोडाफार – परिमाणवाचक / संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
काल रात्री थोडाफार पाऊस पडला.
iii. सावकाश – रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
पाणी सावकाश प्यावे.
iv. सध्या – कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
सध्या दहावीच्या निकालामध्ये शंभर टक्के गुणांचे पीक आले आहे.
v. दररोज – कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
संध्या दररोज वर्तमानपत्र वाचते.
vi. सर्वत्र – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
भगवंत सर्वत्र आहे, ही जाणीव मनात रुजवली, की हातून वाईट कृत्य घडणार नाहीत.
प्रश्न २.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
शब्दयोगी अव्यय
योग (युज्) म्हणजेच जोडले जाणे.
शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडूनच येतात. ते ज्या शब्दांना जोडून येतात त्यांचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी संबंध जोडण्याचे कार्य करतात.
खालील परिच्छेद वाचा.
शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली. शाळेच्या फाटकासमोर काही मुलांचे पालक उभे होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. मुलांसाठी वाहने थांबली. मुलांनी रस्ता ओलांडला.
वरील अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. – बाहेर, – समोर, वर, – साठी हे शब्द अनुक्रमे शाळा, फाटके, रस्ता, मुले या शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत. वरील परिच्छेदात शाळे, मुलां, रस्त्या, वाहनां – हे सामान्यरूप झालेले शब्द आहेत.
– पूर्वी, पुढे, – आधी, नंतर, – पर्यंत, आत, – बाहेर, मागे, मुळे, – शिवाय हीदेखील शब्दयोगी अव्यये आहेत.
अनेक क्रियाविशेषणे शब्दयोगी अव्यये म्हणून वापरली जातात. अशा वेळी ती प्रत्ययांप्रमाणे शब्दांना जोडूनच लिहायची असतात. शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये यांतील फरक समजून घेण्यासाठी खालील दोन गटांतील वाक्ये वाचू.
गट १ | गट २ |
i. मी झाडामागे लपलो. | i. मागे हिरवागार डोंगर होता. |
ii. आम्ही मैदानावर खेळतो. | ii. वर काळे ढग दाटून आले. |
वरील दोन्ही गटांमध्ये मागे, वर हे शब्द दिसतात. पहिल्या गटात ते शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत, तर दुसऱ्या गटात ते शब्द स्वतंत्रपणे आले आहेत व वाक्यातील क्रियापदांविषयी विशेष माहिती देत आहेत, म्हणून ती क्रियाविशेषण अव्यये आहेत.
लक्षात ठेवा: शब्दयोगी अव्यये सामान्यतः नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात; पण कधी कधी ती क्रियापदे व क्रियाविशेषणे यांनाही जोडून येतात. उदा., बोलल्यावर, आल्यानंतर, थोडासुद्धा, कालपर्यंत, पूर्वीपेक्षा.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखून लिहा.
- आजी दररोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावत असे.
- त्याने झाडावर चढून टोपलीभर जांभळे काढली.
- सात जूननंतर महाराष्ट्रात पावसाळा सुरू होतो.
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबून शेतकरी थकून जातात.
- जेवणाआधी आणि जेवणानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत.
- अस्ताला जाणारा सूर्य बघता बघता डोंगरामागे नाहीसा झाला.
उत्तर:
- समोर
- वर, भर
- नंतर
- पासून पर्यंत
- आधी, नंतर
- मागे
प्रश्न २.
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यय ओळखून लिहा.
- आईची कामे सूर्योदयापासून सुरू होतात.
- पावसाची संततधार मला घराबाहेर पडू देत नव्हती.
- मला पावसापेक्षा हिवाळा ऋतू आवडतो.
- मामाकडे सुमीबरोबर कुसुमही आली.
उत्तर:
- पासून
- बाहेर
- पेक्षा
- कडे, बरोबर, ही
प्रश्न ३.
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
i. मला त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली.
उत्तर:
त्याच्याविषयी – विषयी हा शब्दयोगी अव्यय त्याच्या या सर्वनामाला जोडून आला आहे.
ii. किती प्रेम एका प्राण्याकडून !
उत्तर:
प्राण्याकडून – कडून हा शब्दयोगी अव्यय प्राणी या नामाला जोडून आला आहे.
iii. रान, पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा.
उत्तर:
इशाऱ्यावर – वर हा शब्दयोगी अव्यय इशारा या नामाला जोडून आला आहे.
प्रश्न ४.
खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये व शब्दयोगी अव्यये ओळखा.
i. तो पूर्वी सैन्यात होता. युद्धापूर्वी तो सदैव तयार असे.
ii. शाळा जवळच होती. शाळेजवळ मंदिर होते.
iii. मला जेवणानंतर बाहेर जायचे आहे. आपण नंतर भेटू.
iv. माझ्या मागे कुत्रा लागल्यामुळे, मी झाडामागे लपलो.
उत्तर:
क्रियाविशेषण अव्यये | शब्दयोगी अव्यये |
i. पूर्वी | युद्धापूर्वी |
ii. जवळ | शाळेजवळ |
iii. नंतर | जेवणानंतर |
iv. मागे | झाडामागे |
उभयान्वयी अव्यये
‘उभय’ म्हणजे दोन व ‘अव्यय’ म्हणजे संबंध. दोन शब्द किंवा दोन वाक्यांचा संबंध जोडण्याचे कार्य उभयान्वयी अव्यये करते. म्हणजेच, दोन किंवा अधिक शब्दांना किंवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी अव्ययाला ‘उभयान्वयी अव्यये’ असे म्हणतात.
खालील परिच्छेद वाचा.
नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या अन् पावसाची रिमझिम सुरू झाली. आई नंदाला म्हणाली, ” तू कांदे, बटाटे व लसूण घे, तोपर्यंत मी भाजीपाला घेते.” आईने भाजीपाला खरेदी केला, शिवाय फळेही घेतली. नंदाने आईला विचारले, “आई, लसूण घेऊ, की आले घेऊ?” आई म्हणाली, “दोन्ही घे; पण लवकर आवर, कारण जोराचा पाऊस सुरू होईल. पाऊस आला, तर आपण भिजू, म्हणून तुला ‘घाई कर’ असं सांगत आहे.” नंदा म्हणाली, “कशाला एवढी चिंता करतेस? आपण रिक्षा किंवा बसने घरी जाऊ, म्हणजे आपण पावसात भिजणार नाही.”
वरील परिच्छेदातील आणि, अन्, व, तोपर्यत, शिवाय, की, पण, कारण, तर, म्हणून, किंवा, म्हणजे हे शब्द उभयान्वयी अव्यये आहेत. याव्यतिरिक्त परंतु, अथवा, नि, वा, अगर, यास्तव, का, की, सबब यांचाही उभयान्वयी अव्ययांत समावेश होतो.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा.
- म्हणून
- परंतु
- की
- आणि
उत्तर:
- सुरक्षारक्षक वेळेवर आले म्हणून चोर पकडला गेला.
- बागेत अनेक प्रकारची फुले होती; परंतु गुलाबाची फुले नव्हती.
- तू माझ्या घरी खेळायला येतोस, की मी तुझ्याकडे येऊ.
- सुरेश आणि निलेश सख्खे भाऊ आहेत.
प्रश्न २.
पुढील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा.
(आणि, परंतु, अथवा, शिवाय, अन्)
उत्तर:
- गोपाळ आणि माधव दररोज सकाळी व्यायामशाळेत जातात.
- नाटक नेहमी वेळेत सुरू होते; परंतु वीज गेल्यामुळे आज थोडा उशीर झाला.
- तुम्ही लवकर उठा अथवा उशिरा उठा सूर्य मात्र दररोज वेळेतच उगवतो.
- सकाळी लवकर उठल्याने कामे लवकर आटोपतात शिवाय मनही प्रसन्न राहते.
- क्षणार्धात अंधारून आले अन् विजा कडाडू लागल्या.
प्रश्न ३.
खालील विधानांतील उभयान्वयी अव्यये ओळखून लिहा.
- सुमनने खूप अभ्यास केला होता, म्हणून ती उत्तम गुण मिळवून पास झाली.
- मी स्टेशनवर इतका वेळ वाट पाहिली; पण ती काही आली नाही.
- तुम्हांला पोळी खायला आवडेल, की फुलके खायला आवडतील असे आईने विचारले.
- वारा म्हणजे वायू.
उत्तर:
- म्हणून
- पण
- की
- म्हणजे
केवलप्रयोगी अव्यये
आपल्या मनातील विचार किंवा भावनांचा स्फोट आपण एखादया उद्गाराद्वारे व्यक्त करतो. हे उद्गार दाखवणारे शब्द म्हणजेच ‘केवलप्रयोगी’ अव्यये होत. त्यांना ‘उद्गारवाचक शब्द’ असेही म्हणतात.
ही अव्यये वाक्याच्या सुरुवातीला स्वतंत्रपणे येतात.
उदा. अरेरे! काल भारत क्रिकेटचा सामना हरला!
अहाहा ! काय सुंदर बाग आहे ही!
बापरे ! केवढे भयानक स्वप्न ते!
शाब्बास ! असेच यश मिळवत राहा. !
वरील वाक्यांतील अरेरे, अहाहा, बापरे, शाब्बास तसेच वा, आहा, अबब, ठीक, अंहं, छे, शी, अगाई, हाय हाय, अरेच्चा, वाहवा, फक्कड, अच्छा, थु:, चुप् ही केवलप्रयोगी अव्यये आहेत.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खाली दिलेल्या केवलप्रयोगी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा.
- वा
- आहा
- अबब
- ठीक
- अंहं
- छे
उत्तर:
- वा! किती छान सुगंध पसरलेला आहे.
- आहा ! काय झकास चौकार मारला धोनीने !
- अबब ! केवढा मोठा पहाड !
- ठीक ! उद्या भेटू.
- अंहं! मला नको कारल्याची भाजी.
- छे! मला काही माहीत नाही.
प्रश्न २.
खालील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यये लिहा.
- ……..! काय हे दप्तर तुझं !
- ……….! केवढे मोठे फळ !
- …….! तू इथे कसा काय !
- ……. ! एक चकार शब्दही बोलू नकोस !
उत्तर:
- शी!
- अबब!
- अय्या!
- चुप ! / गप्!
वाक्य
संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला ‘वाक्य’ म्हटले जाते.
वाक्याचे दोन भाग असतात.
१. उद्देश्य
२. विधेय
१. उद्देश्य – बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो ते
२. विधेय – उद्देश्याविषयी जे बोलतो ते
उदाहरणार्थ, मी गेल्या वर्षी गावी गेलो. या वाक्यात ‘मी’ हा उद्देश्य तर ‘गावी’ गेलो’ हे विधेय आहे.
‘गेल्या’, ‘वर्षी’ हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खालील वाक्यांतील उद्देश्य, विधेय व त्यांचा विस्तार ओळखून तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा.
जसे – रमेची मुलगी रिमा आज कार्यक्रमात छान गाणे गायली.
उद्देश्य : रिमा
उददेश्याचा विस्तार : रमेची मुलगी
विधेय : गाणे गायली
विधेयाचा विस्तार : आज कार्यक्रमात छान
i. आपल्या कुटुंबासाठी आई दिवसभर खूप काम करते.
ii. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेच्या हिताकरता स्वराज्याची स्थापना केली.
iii. पंढरीचे वारकरी वर्षातून दोन वेळा वारीला जातात.
iv. काळ्या ढगांनी संपूर्ण आकाश व्यापून टाकले.
v. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
प्रश्न २.
खालील वाक्यांतील उद्देश्य व विधेय ओळखा व त्यांचा विस्तार करा.
i. नंदा रोज अभ्यास करते.
उद्देश्य – नंदा
विधेय – अभ्यास करते.
उद्देश्य विस्तारं – वर्गात सदैव हजर असणारी
विधेय विस्तार – मन लावून
संपूर्ण वाक्य: वर्गात सदैव हजर असणारी नंदा रोज मन लावून अभ्यास करते.
ii. उषा खेळायला गेली.
उद्देश्य – उषा
विधेय – खेळायला गेली.
उद्देश्य विस्तार – अभ्यास संपवून
विधेय विस्तार – मैदानावर
संपूर्ण वाक्य: अभ्यास संपवून उषा मैदानावर खेळायला गेली.
वाक्याचे प्रकार
वाक्याचे प्रकार खालीलप्रमाणे:
१. विधानार्थी वाक्य – या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.
उदा. राम शाळेत जातो.
२. प्रश्नार्थी वाक्य- या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.
उदा. तू काल शाळेत का गेला नाहीस?
३. उद्गारार्थी वाक्य – या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार असतो.
उदा. बापरे! केवढे मोठे संकट !
४. आज्ञार्थी वाक्य – या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.
उदा. सूर्योदयापूर्वी उठावे.
५. केवलवाक्यः केवलवाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एकच उद्देश्य व एकच विधेय असते. केवलवाक्य हे साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यांपैकी कोणत्याही प्रकारचे असू शकते.
उदा. गवईबुवा गाणे गाऊ लागले.
६. मिश्रवाक्य: मिश्रवाक्यांत दोन किंवा अधिक वाक्ये असतात. ती वाक्ये एकमेकांवर अवलंबून असतात. यामध्ये अर्थाच्या दृष्टीने जे वाक्य स्वतंत्र असते ते मुख्य वाक्य, तर या मुख्य वाक्यावर अवलंबून असते ते ‘गौण वाक्य’ समजले जाते. उदा. जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा शेतीभाती पिकेल.
या वाक्यात ‘जेव्हा पाऊस पडेल’ हे मुख्य वाक्य असून ‘तेव्हा शेतीभाती पिकेल’ हे गौण वाक्य आहे. हे गौणवाक्य मुख्य वाक्यावर अवलंबून आहे.
अशाप्रकारे, एक मुख्य वाक्य व त्यावर अवलंबून असणारी एक किंवा अधिक गौणवाक्ये उभयान्वयी अव्ययाने एकमेकांस जोडली जातात, तेव्हा मिश्रवाक्य तयार होते.
७. संयुक्तवाक्यः संयुक्तवाक्यात दोन वाक्ये एकमेकांना उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात, पण ती दोन्ही वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र, छोटी केवलवाक्ये असतात. संयुक्त वाक्य हे एक जोडवाक्यच असते.
उदा. ओंकार रोज सकाळी दूध पितो व अभ्यासाला बसतो.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा व लिहा.
- मी इयत्ता सातवीत शिकते..
- तू केव्हा परत येणार आहेस?
- अबब ! केवढा मोठा अजगर !
- देव तुमचे भले करो.
- बाबा कोल्हापूरला गेले
- उदया सकाळी लवकर उठा.
- तुझ्या यशाचे गुपित काय?
उत्तर:
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- विधानार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
प्रश्न २.
खालील वाक्यांच्या प्रकारांनुसार दोन-दोन वाक्ये लिहा.
- प्रश्नार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- विधानार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
उत्तर:
- प्रश्नार्थी वाक्य – अ. उद्या शाळेला सुट्टी आहे का ?
ब. कोण आहे रे तिकडे ? - उद्गारार्थी वाक्य – अ. अरे वा ! किती सुंदर चित्र काढलंस!
ब. अहाहा ! काय सुंदर फुले फुलली आहेत! - विधानार्थी वाक्य – अ. सकाळची हवा जास्त शुद्ध असते.
ब. विजय दररोज सकाळी झाडांना पाणी घालतो. - आज्ञार्थी वाक्य – अ. कृपया, शांतता राखा.
ब. दररोज व्यायाम करा.
प्रश्न ३.
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
i. रोज सकाळी व्यायाम करा. | अ. प्रश्नार्थी वाक्य |
ii. सुजाता इथे आहे का ? | ब. विधानार्थी वाक्य |
iii. उद्या मंगळवार आहे. | क. उद्गारार्थी वाक्य |
iv. अहाहा ! चहा एकदम फक्कड झाला आहे. ! | ड. आज्ञार्थी वाक्य |
उत्तरः
i. आज्ञार्थी वाक्य
ii. प्रश्नार्थी वाक्य
iii. विधानार्थी वाक्य
iv. उद्गारार्थी वाक्य
प्रश्न ४.
खालील वाक्यांचे प्रकार ओळखा. (केवलवाक्य, मिश्रवाक्य, संयुक्तवाक्य)
- लक्ष्मी स्वयंपाक करते.
- राधा नेहा किंवा अंजूला सोबत नेईल.
- जेथे वृक्षारोपण केले तेथे हिरवळ दिसू लागली.
- वारा आला की अंगावर शहारे येत.
- जर तू चुकलास, तर मागे राहशील.
- सुबोध माझा भाऊ आहे.
उत्तर:
- केवलवाक्य
- संयुक्तवाक्य
- मिश्रवाक्य
- मिश्रवाक्य
- मिश्रवाक्य
- केवलवाक्य
प्रश्न ५.
खालील वाक्यांतील केवलवाक्य, मिश्रवाक्य व संयुक्तवाक्य असे प्रकार ओळखून लिहा.
- जे चकाकते ते सर्व सोने नसते.
- आकाशात ढग भरून आले व अचानक पाऊस सुरू झाला.
- सैनिक लढता लढता मेला.
- आई रोज पहाटे लवकर उठते आणि सर्वांसाठी डबा तयार करते.
- छाया घरी परत येईल तेव्हा तिला तुझा निरोप देईन.
उत्तरः
- मिश्रवाक्य
- संयुक्तवाक्य
- केवलवाक्य
- संयुक्तवाक्य
- मिश्रवाक्य
सरळरूप, सामान्यरूप प्रत्यय
वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. वाक्यात जे शब्द वापरले जातात ते जसेच्या तसे वापरता येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या मूळ स्वरूपात काही बदल करावा लागतो.
उदा. मी घर जाते. ✗
मी घरी जाते. ✓
वरीलपैकी पहिले वाक्य चुकीचे, तर दुसरे वाक्य बरोबर आहे. पहिल्या वाक्यात मूळ शब्द जसाच्या तसा आला आहे, वाक्याचा सुसंघटित अर्थ सांगू शकत नाही. याउलट, दुसऱ्या वाक्यात ‘घर’ या मूळ शब्दाला ‘ई’ हा प्रत्यय लागला आहे. ज्यामुळे वाक्याचा अर्थ सहजपणे उलगडला जातो.
शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दात जो बदल घडतो, त्या बदलाला शब्दाचे सामान्यरूप म्हणतात आणि शब्दाच्या मूळ रूपाला ‘सरळरूप’ म्हणतात. उदाहरणार्थ, कल्पनाने कपात चहा ओतला.
या वाक्यात ‘कप~कपा’ हा बदल झालेला आहे. येथे ‘कप’ हे सरळरूप तर ‘कपा’ हे सामान्यरूप आहे.
टीप: नामांना किंवा सर्वनामांना लागणारे प्रत्यय पुढीलप्रमाणेः
उदाहरणार्थ: झाडास, झाडाला, झाडाचे इत्यादी.
लक्षात ठेवा:
प्रश्न १.
काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही.
उदा. ईकारान्त स्त्रीलिंगी नामे.
खिडकी – खिडकीला, खिडकीत
खोली – खोलीत खोलीची
२. सामान्यरूपातला शब्द व त्याचे प्रत्यय जोडूनच लिहायचे असतात.
उदा. मीना ने पेला ला हात लावला. ✗
मीनाने पेल्याला हात लावला. ✓
३. विशेषनामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्यरूप होत नाही, म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात बदल होत नाही.
उदा. अंजलीला, सुजाताला, रवीला
४. पौराणिक पात्रांची नावे सामान्यरूपात लिहितात.
उदा. रामाने, सीतेने, कृष्णाला
परंतु, हीच नावे आर्तांच्या जगातील व्यक्तींची असतील, तर त्यांचे सहसा सामान्यरूप होत नाही.
उदा. रामने, दशरथने इत्यादी.
५. आडनावांचे सामान्यरूप होते. उदा. फडक्यांना, मोऱ्यांना, पाटलांना इत्यादी; पण लिहिताना सामान्यरूप न वापरता – ‘फडके
यांना’, ‘मोरे यांना’, ‘पाटील यांना’ असे लिहितात.
६. गावांच्या, राज्यांच्या नावांचेही सामान्यरूप होते.
उदा. पुणे – पुण्याला, गोवा – गोव्याला
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
खालील तक्ता पूर्ण करा.
प्रश्न २.
खालील शब्दांचे सामान्यरूप लिहा.
- देशाबाहेर
- स्वातंत्र्यासाठी
- सांगण्यावरून
- केल्यानंतर
- शेतकऱ्यांच्या
- बियांपासून
उत्तरः
- देशा
- स्वातंत्र्या
- सांगण्या
- केल्या
- शेतकऱ्यां
- बियां
शुद्धलेखनाचे नियम
आपले लेखन अचूक व्हावे यासाठी आपण शुद्धलेखनाचे नियम जाणून घ्यायला हवेत. महाराष्ट्र साहित्य महामंडळाने निर्धारित केलेले शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे नियम पुढीलप्रमाणेः
नियम १ : शब्दांतील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरान्त असेल, तर आधीच्या उपान्त्य अक्षरातील इकार व उकार हस्व लिहितात.
उदाहरणार्थ, ‘महिमा’ या शब्दातील शेवटचे अक्षर ‘मा’ हे दीर्घ स्वरान्त आहे, म्हणून त्याच्याआधी येणाऱ्या ‘हि’ चा इकार ऱ्हस्व (पहिला) लिहिला जातो.
अपवाद: जेव्हा एखादया शब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा त्याच्या सामान्यरूपातील नामाचे उपान्त्य अक्षर हस्व होत नाही.
उदा. पालिला ✗
पालीला ✗
विहिरिला ✗
विहिरीला ✓
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
वरील लेखननियमानुसार आणखी पाच शब्द लिहा.
उत्तर:
किती, दिवा, चिकू, खुळा, विळा.
प्रश्न २.
वरील अपवादानुसार योग्य शब्दांपुढे ‘✓’ तर अयोग्य शब्दांपुढे ‘✗’ खूण करा.
उत्तर:
- झाडीला – ✓ – झाडिला – ✗
- दीव्याला – ✗ दिव्याला – ✓
- कुपीत – ✓ कुपित – ✗
- भिंतिला – ✗ भिंतीला – ✓
नियम २ : जेव्हा मराठी शब्दांतील शेवटच्या अक्षरास काना, मात्रा, वेलांटी, उकार दर्शवलेले नसतात, तेव्हा शेवटून दुसऱ्या अक्षरांतील इकार, उकार दीर्घ लिहितात.
उदाहरणार्थ, ‘पाऊस’ या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी किंवा उकार नाही, म्हणून शेवटून दुसऱ्या अक्षराचा उकार दीर्घ लिहिला आहे.
अपवादः (संस्कृत भाषेतून मराठीत आलेल्या) तत्सम शब्दांतील शेवटून दुसऱ्या अक्षराचा इकार / उकार संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणेच ऱ्हस्व लिहितात. उदाहरणार्थ, नूपुर, मानसिक, गुण इत्यादी.
सरावासाठी प्रश्न
प्रश्न १.
वरील लेखननियमांनुसार किमान दहा शब्द लिहा.
उत्तर:
ऊन, कठीण, फिरुन, मूल, बसून, हुरुप, कुळीद, समीर, फाजील, शाहीन
प्रश्न २.
वरील लेखननियमाचा अपवादानुसार तत्सम भाषेतील आणखी पाच शब्द लिहा.
उत्तर:
कायिक, वाचिक, वरुण, सलिल, सुख
शब्दसिदधी
कोणत्याही भाषेची सुरुवातीची शब्दसंख्या कमीच असते. जसजसा भाषेचा अधिकाधिक वापर केला जातो तसतशी भाषेतील शब्दसंख्या वाढू लागते. विविध भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होऊन भाषा समृद्ध होत जाते. हे इतर भाषेतील नवीन शब्द आपल्या भाषेत अगदी एकरूप होऊन जातात. इतके की, हा शब्द आपल्या भाषेतील नाही यावर आपला विश्वासच बसत नाही. हे नवीन शब्द कधी आपल्या भाषेत जसेच्या तसे वापरले जातात किंवा कधी त्यांच्या मूळ रूपांत बदल करून वापरले जातात किंवा कधी त्यांच्या मूळ रूपांत बदल करून वापरले जातात.
शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो यालाच ‘शब्दसिद्धी’ म्हटले जाते.
मराठी भाषेत चार प्रमुख प्रकारांतील शब्द आहेत.
१. तत्सम शब्द
संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या रूपांत काही बदल न होता आले आहेत. असे शब्द म्हणजे तत्सम शब्द होय.
उदा. कन्या, पुष्प, जल, भगवान इ.
२. तद्भव शब्द
संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे न येता, त्यांच्या रूपांत काही बदल होऊन आले आहेत. असे शब्द म्हणजे तद्भव शब्द होय.
उदा. गाव (ग्राम), दूध (दुग्ध), हात (हस्त), कोवळा (कोमल) इत्यादी.
३. देशी शब्द
जे शब्द अन्य भाषांतून आलेले नाहीत, अशा मूळ शब्दांना देशी शब्द म्हटले जाते.
उदा. वांगे, दगड, झाड, बाजरी इ.
४. परभाषीय शब्द
संस्कृतशिवाय इतर भाषांतील शब्ददेखील मराठीत समाविष्ट झालेले आहेत. असे शब्द म्हणजे परभाषीय शब्द होय. कानडी, इंग्रजी, तेलुगू, पोर्तुगीज, फारसी, अरबी, हिंदी, गुजराती अशा भाषांतून मराठीत आलेल्या शब्दांची काही उदाहरणे
पुढीलप्रमाणे: