Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम
Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Textbook Questions and Answers
स्वाध्याय :
1. ताक्ता पूर्ण करा.
प्रश्न 1.
ताक्ता पूर्ण करा.
उत्तर:
वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
चकोर | पूर्णिमेचा चंद्रमा | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन |
लेंकी | माहेरचे बोलावणे येणे | दिवाळीचा सण |
भुकेलेले बाळ | माउलीची | भूक |
संत तुकाराम | पांडुरंगाची | भेटीची आस |
2. योग्य अर्थ शोधा.
प्रश्न 2.
योग्य अर्थ शोधा.
अ. आस लागणे म्हणजे ………….
1. ध्यास लागणे
2. उत्कंठा वाढणे
3. घाई होणे
4. तहान लागणे
उत्तर:
1. ध्यास लागणे
आ. बाटुली म्हणजे ………….
1. धाटुली
2. वाट
3. वळण
4. वाट पहाणे
उत्तर:
2. वाट
3. भावार्थाधारित.
प्रश्न अ.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हाला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
उत्तरः
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहते. तिच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे. परिणामी हा दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो.
प्रश्न आ.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, हे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.
उपक्रम :
1. संत बहिणाबाईंचा ‘जलाविण मासा’ हा अभंग मिळवून वर्गात त्याचे वाचन करा.
2. संत कान्होपात्रा यांचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग मिळवून वाचा.
भाषाभ्यास :
अलंकार
आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो. तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात त्या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकांमुळे ठरते, त्यातील एक घटक म्हणजे ‘अलंकार’. अलंकार भाषेचे सौंदर्य कसे खुलवतात, हे आपल्याला आणखी काही उदाहरणे घेऊन पहायचे आहे.
Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Additional Important Questions and Answers
पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार
कृती करा: कृती 1 : आकलन कृती
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा
उत्तरः
प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. जीवाला कोणती आस लागली आहे?
उत्तरः
जीवाला विठ्ठल भेटीची आस लागली आहे.
ii. विठ्ठलाची वाट कोण पाहत आहे?
उत्तर:
संत तुकारामांचे मन विठ्ठलाची वाट पाहत आहे.
iii. अति शोक कोण करत आहे ?
उत्तर :
भुकेलिवा बाळ अति शोक करत आहे.
iv. संत तुकारामांना कशाची भूक लागली आहे?
उत्तरः
संत तुकारामांना श्रीमुख दर्शनाची भूक लागली आहे.
v. संत तुकाराम विठ्ठलाला कोणती विनंती करत आहेत?
उत्तरः
संत तुकाराम विठ्ठलाला श्रीमुख दर्शनाची विनंती करत आहेत.
प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
- तैसें माझें …………………. वाट पाहे । (जीवा, उरि, मन, श्रीमुख)
- दिवाळीच्या मुळा ………… आसावली । (मुली, बाया, लेंकी, स्त्रिया)
- पाहातसे वाटुली …………. । (आळंदीची, पंढरीची, पंढरपुराची, विठ्ठलाची)
- भुकेलिवा बाळ अति ………… करी । (गडबड, मस्ती, दुःख, शोक)
- वाट पाहे ……………….. माउलीची । (उरि, दारी, आई, विठाई)
- धावूनि ……………………. दांवी देवा। (दर्शन, श्रीमुख, प्रदर्शन, मुखदर्शन)
उत्तर:
- मन
- लेंकी
- पंढरीची
- शोक
- उरि
- श्रीमुख
प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. भेटीलागी जीवा | (अ) वाट तुझी |
2. तैसें माझें मन | (ब) चकोराजीवन |
3. पाहे रात्रंदिवस | (क) वाट पाहे |
4. पूर्णिमेचा चंद्रमा | (ड) लागलीसे आस |
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. भेटीलागी जीवा | (ड) लागलीसे आस |
2. तैसें माझें मन | (क) वाट पाहे |
3. पाहे रात्रंदिवस | (अ) वाट तुझी |
4. पूर्णिमेचा चंद्रमा | (ब) चकोराजीवन |
कृती 2 : आकलन कृती
प्रश्न 1.
सहसंबंध लिहा.
i. जीवा : आस :: वाट : ………….
ii. लेंकी : आसावली :: उरि : ………….
उत्तरः
i. रात्रंदिवस
ii. माउलीची
प्रश्न 2.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.
i. (अ) पूर्णिमेचा चंद्रमा हेच चकोर पक्ष्याचे जीवन असते.
(ब) मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.
(क) तसेच माझे मन तुझी वाट पाहत आहे.
उत्तर:
(अ) पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
(ब) पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
(क) तैसें माझें मन वाट पाहे ।।
ii. (अ) हे देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
(ब) हे विठ्ठला, पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायाला येईल याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
उत्तर :
(अ) धांवूनि श्रीमुख दांवी देवा।।
(ब) पाहातसे वाटुली पंढरीची।।
प्रश्न 3.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.
- पाहे, मन, चंद्रमा, जीवा
- पंढरीची, श्रीमुख, माउलीची, आसावली
- तुका, मुळा, बाळ, शोक
उत्तर :
- जीवा, चंद्रमा, मन, पाहे
- आसावली, पंढरीची, माउलीची, श्रीमुख
- मुळा, बाळ, शोक, तुका
प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. दिवाळीच्या मुळा | (अ) अति शोक करी |
2. भुकेलिवा वाळ | (ब) दांवी देवा |
3. तुका म्हणे | (क) मज लागलीसे भूक |
4. धावूनि श्रीमुख | (ड) लेकी आसावली |
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. दिवाळीच्या मुळा | (ड) लेकी आसावली |
2. भुकेलिवा वाळ | (अ) अति शोक करी |
3. तुका म्हणे | (क) मज लागलीसे भूक |
4. धावूनि श्रीमुख | (ब) दांवी देवा |
प्रश्न 5.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.
- धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
- पाहातसे वाटुली पंढरीची।।
- वाट पाहे उरि माउलीची।।
- भुकेलिवा बाळ अति शोक करी।
उत्तर:
- पाहातसे वाटुली पंढरीची ।।
- भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
- वाट पाहे उरि माउलीची ।।
- धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।
प्रश्न 6.
कोण ते लिहा.
उत्तरः
शोक करणारा – भुकेलिवा बाळ |
प्रश्न 7.
प्रश्न तयार करा.
i. तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
ii. भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
उत्तर:
i. भूक कोणाला लागली आहे?
ii. बाळ अति शोक का करत आहे?
कृती 3 : काव्यसौंदर्य
खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
प्रश्न 1.
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन।
तैसें माझें मन वाट पाहे।।
उत्तरः
संत तुकारामांना लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना, संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात. ज्याप्रकारे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे संत तुकारामांचे जीवन आहे. त्यामुळे संत तुकारामांचे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठलदर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.
प्रश्न 2.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
उत्तरः
संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे अचूक वर्णन केले आहे. संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहून कोणीतरी मुन्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.
प्रश्न 3.
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
उत्तर:
विठ्ठलभेटीची तीव्र ओढ योग्य उदाहरणातून तुकाराम महाराज व्यक्त करतात, अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात की, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठलदर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात, की हे देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे.
पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न 1.
भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
उत्तरः
संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, है
विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस
तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.
प्रश्न 2.
भुकेलिबा बाळ अति शोक करी ।
वाट पाहे उरि माउलीची ।।
उत्तरः
विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करतं म्हणजे रडतं, तळमळत असतं व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे.
प्रश्न 3.
भक्त व विठ्ठल आणि चकोर व चंद्र यांतील साधर्म्य तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
भक्त श्रीविठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. त्याला विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. त्याचे संपूर्ण जीवन हे विठ्ठलमय झालेले असते. विठ्ठलदर्शनाशिवाय त्याला अन्न-पाणी गोड लागत नाही. विठ्ठलदर्शन हेच त्याच्या जीवनाचे साध्य असते. त्याचप्रमाणे चकोर पक्षी चंद्रकिरणांसाठी आतुर झालेला असतो. कविकल्पना आहे की, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसला की, चकोर पक्ष्याला आनंद होतो. तो फक्त चंद्राचे कोवळे किरणच प्राशन करतो. चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते. अशाप्रकारे भक्त व चकोर हे अनुक्रमे विठ्ठल व चंद्र यांच्या भेटीसाठी तळमळत असतात.
प्रश्न 4.
विठ्ठलदर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. या विधानातील समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
विठ्ठलाचे दर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. विठ्ठलाचे दर्शन होताच भक्तांची तहान-भूक हरवून जाते. त्यांचे नयन दिपून जातात व त्यांचे हृदय सुखद आनंदाने भरून जाते. विठ्ठलदर्शन ही भक्ताच्या आत्म्याला लागलेली अध्यात्मिक भूक असते. म्हणून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरला जातात. एकदा का विठ्ठलदर्शन झाले की
मानवाचे सर्व प्रकारचे पाप-ताप आणि वेदना संपुष्टात येतात.
प्रश्न 5.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/ कवयित्रीचे नाव – संत तुकाराम (तुकाराम बोलोबा अंबिले – मोरे)
2. संदर्भ – ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग संत तुकाराम’ यांनी लिहिला आहे. हा अभंग ‘सकलसंतगाथा खंड दुसरा: श्री तुकाराम महाराजांची अभंगगाथा’ या पुस्तकातून घेतला आहे.
3. प्रस्तावना – ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग ‘संत तुकाराम’ यांनी लिहिला आहे. या अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ योग्य उदाहरणातून व्यक्त केली आहे.
4. वाङ्मयप्रकार’ – भेटीलागी जीवा’ ही कविता नसून एक अभंग आहे.
5. कवितेचा विषय – विठ्ठलभेटीची अनावर ओढ विविध उदाहरणांद्वारे व्यक्त करणारा संत तुकारामांचा ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे.
6. कवितेतील आवडलेली ओळ
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
7. मध्यवर्ती कल्पना – संत तुकारामांनी तन, मन, धन अर्पून विठ्ठलाची भक्ती केली. अगदी मनापासून त्याचे नामस्मरण केले. अशा या आपल्या भगवंताच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भेटीची अनावर ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यासाठी अतिशय समर्पक उदाहरणे वापरून त्यांनी ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून ती ओढ व्यक्त केली आहे.
8. कवितेतून मिळणारा संदेश –
संत तुकाराम यांना विठ्ठलभेटीची ओढ लागली आहे. त्यासाठी अतिशय योग्य उदाहरणे वापरून त्यांनी ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग लिहिला आहे. या उदाहरणांचा अभ्यास केला असता संत तुकारामांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची किती अनावर ओढ आहे हे लक्षात येते. अशीच आपणही परमेश्वराची भक्ती केली तर आपणासही परमेश्वराची प्राप्ती होईल असाच संदेश ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून आपणास मिळतो.
9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
‘भेटीलागी जीवा’ हा संत तुकारामाचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण म्हणजे विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करण्यासाठी त्यांनी निसर्गातील, संसारातील अगदी चपखल उदाहरणांचा वापर केलेला आहे. रोजच्या व्यवारातील उदाहरणे वापरून अपेक्षित परिणाम त्यांनी साधला आहे.
10. भाषिक वैशिष्ट्ये –
संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवझर आणि अध्यात्म यांची
सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
प्रश्न 1.
भेटीलागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन।
तैसें माझें मन वाट पाहे ।।
उत्तरः
‘संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते. संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना, संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात.
ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.
प्रश्न 2.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
भुकेलिया बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची।।
उत्तर:
‘संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते.
संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेराहून कोणीतरी मुन्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.
विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडते, तळमळते. आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते, त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सागड त्यांच्या अभंगातून दिसून येते.
प्रश्न 3.
भुकेलिवा बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची।।
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
उत्तर:
‘संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते.
विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेनं शोक करते म्हणजे रडते, तळमळते आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं, त्याप्रमाणे मीदेखील तुझी वाट पाहत आहे.
मलादेखील लहान बाळाप्रमाणे विठ्ठलदर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा तुझे श्रीमुख मला दिसावे म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.
पाठाखालील स्वाध्याय :
प्रश्न 1.
‘तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात’ हे सांगण्यासाठी एखादा दृष्टान्त वापरा व तो स्पष्ट करा.
उत्तर:
“दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहातसे वाटुली पंढरीची”
जवळच्या मित्राच्या भेटीला आसुसले आहोत यासाठी वरील दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो, कारण ज्याप्रमाणे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरच्या ओढीने व्याकुळ होतात. दिवाळीच्या सणात कोणीतरी मुन्हाळी माहेरहून मला भेटण्यासाठी येईल व काही दिवसांसाठी मला माहेरपणाला घेऊन जाईल या विचाराने त्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या अमेरिकेतील मित्राच्या भेटीसाठी आसुसलेलो आहे.
संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Summary in Marathi
कवीचा परिचय :
नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
कालावधी : 1608-1650 व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संतकवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात.
प्रस्तावना :
‘भेटीलागी जीवा’ हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिला आहे. या अभंगात संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक उदाहरणांद्वारे व्यक्त केली आहे.
“Bhetilagi Jiva’, this Abhang is written by Saint Tukaram Saint Tukaram explains his affinity of meeting with Lord Vitthala with felicitous examples in this ‘Abhanga
भावार्थ :
भेटीलागी जीवा ……………. रात्रंदिवस वाट तुझी ।
संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.
पूर्णिमेचा चंद्रमा ……………. मन वाट पाहे ।
आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.
दिवाळीच्या मुळा ……………. वाटुली पंढरीची ।
संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहन कोणीतरी मुजाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.
भुकेलिवा बाळ अति …………….. उरि माउलीची ।
विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडत, तळमळत असते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते. तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे.
तुका म्हणे ……………. श्रीमुख दांवी देवा ।
अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मलादेखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
शब्दार्थ :
- भेट – गाठ (meeting)
- जीवा (जीव) – आत्म्याला (to the soul)
- आस – इच्छा, अपेक्षा, आशा (desire, an expectation)
- पूर्णिमा – पौर्णिमा (The full moon day)
- चंद्रमा – चंद्र (the moon)
- जीवन – आयुष्य (life)
- तैसें – तसे (in that way)
- मन – चित्त (mind)
- मुळा – मुबळी (लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी गेलेली माहेरची व्यक्ती)
- लेंकी – मुलगी (a daughter)
- आसावणे – आतुर होणे, व्याकुळ होणे
- वाटुली – वाट, मार्ग, रस्ता (a way, a path)
- भुकेलिवा – भुकेलेले (hungry)
- शोक – दुःख, खेद (sorrow, grief)
- उरी – (येथे अर्थ) हृदयापासून (from the bott heart)
- तुका – संत तुकाराम
- मज – मला, माझे (to me, to mine)
- भूक – क्षुधा, खाण्याची इच्छा (hunger, desire)
- मुख – चेहरा (the face)
- दावी – दाखव (please show)
टीप :
चकोर पक्षी – एक पक्षी (हा पक्षी चंद्रकिरणांवर जगतो असा कविसंकेत आहे.) (a kind of bird) (It is said that this bird feeds itself on the moonlight)
वाक्प्रचार :
- आस लागणे – उत्कंठा लागणे, इच्छा होणे
- वाट पाहणे – प्रतीक्षा करणे
- शोक करणे – दुःख करणे, आकांत करणे
9th Marathi Digest Pdf भाग-१