Maharashtra Board SSC Class 10 Marathi Sample Paper Set 1 with Answers Solutions Pdf Download.
Maharashtra Board Class 10 Marathi Model Paper Set 1 with Answers
Time : 3 Hours
Max. Marks : 80
कृतिपत्रिकेसाठी सूचना
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
विभाग 1 : गदा (१८ गुण)
पठित गदय
प्रश्न 1.
(अ) उताचाच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा.
(i) ‘माशेल’ गाव सोडणारे – …………………..
(ii) वयाच्या सहाव्या वर्षी वारणारे – …………………..
आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल, माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले, तिथल्या एका |मैदानावर खेळळ्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!
पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही| शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
2. आकृती पूर्ण करा.
3. स्वमत.
‘शिक्षण घेण्यासाठी ‘गरिबी’ हा अडसर ठरत नाही’, या विधानाबाबत तुमचे मत लिहा.
(आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. का ते लिहा.
(i) माशेलकरांना ‘माशेल’ हे गाव सोडावे लागले, कारण………………….
(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत माशेलकरांना अनवाणीच राहावं लागलं, कारण…………………
माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्याएवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो! माझा जन्म पुण्याच्या एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दुःखे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडविणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे कैन्या, पेरू पाहून त्यांच्या यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा! तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत.
2. आकृती पूर्ण करा.
3. स्वमत.
तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(i) शेती | प्रकाश |
(ii) सूर्य | वस्त्र |
(iii) वृक्ष | हंगाम |
(iv) पैठणी | ओबी |
(v) भात | पाने |
शेतीभातीचे ते दिवस व कापणीचा हंगाम, अगोदरच त्या गावाला झाडी अतोनात, तशात प्रात:काळचा तो वेळ, सूर्य नुकताच वर आला होताच त्याचे कोवळे ऊन पावसाने आपल्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून टवटवीत केलेल्या वृक्षांची हिरवीगार पाने अधिक सतेज दिसत होती. सभोवार कणसांवर आलेली विस्तीर्ण शेतेच दृष्टीस पडत होती. आमच्या पायांपासून तो थेट समोरच्या डोंगरापर्यंत पिवळसर हिरव्या रंगाचे गालिचेच पसरले आहेत की काय असा भास होई. मधून-मधून नाचण्यांची हिरवीगार शेत दिसत, त्यामुळे असा भास होई की, सृष्टिदेवी हिरव्या बुट्ट्यांनी युक्त अशी पिवळी | पैठणीच नेसून विहार करीत आहे. आत दाणा झाल्याकारणाने शेतातील भाताच्या ओंब्या अगदी वाकून गेल्या होत्या. नाना तऱ्हेचे व चित्रविचित्र रंगांचे पक्षी मंजूळ गायन करीत इकडून-तिकडे उडून जाताना दृष्टीस पडत आणि शेतामधून काम करणारी माणसेही मधून-मधून दिसत, शीतल व सुवासिक फुलांच्या वासाने सुगंधित असा वारा झुळझुळ वाहत होता. तो शेतावरून वाहताना समुद्रावर वर खाली होणाऱ्या लाटांप्रमाणे त्या शेतांची शोभा दिसत होती. वारा लागून त्या ओंब्याचा जो सळसळ आवाज होई तो किती मनोहर!
2. एका शब्दात उत्तरे लिहा.
(i) पायापासून डोंगरापर्यंत पसरलेले पिवळसर हिरव्या रंगाचे – ……………..
(ii) मंजूळ गावन करणारे – ……………..
उत्तर:
(अ) 1. (i) माशेलकर
(ii) माशेलकरांचे वडील
2. (i) दारिद्र्याशी संघर्ष करणारी
(ii) धैर्यशील खंबीर
(iii) मुलाच्या शिक्षणासाठी जिद्द ठेवणारी
(iv) खूप कष्ट करणारी – कष्टाळू.
3. कोणतीही गोष्ट करायची इच्छा असली की मार्ग आपोआप सुचत असतात. त्यासाठी मग कोणतेही व कितीही संकटांचे डोंगर पार करायला तयार असते. ती संकटे म्हणजे आपल्यासमोर आव्हानच आहे असे वाटू लागते. त्यासाठी मनापासून इच्छा मात्र हवी.
डॉ. आंबेडकर यांचे अतिशय चांगले उदाहरण आहे. त्यांची परिस्थिती बेताची होती. पण त्यांना शिक्षणाबद्दल प्रेम होते. स्वतः अर्धपोटी राहून त्यांनी पुस्तके खरेदी केली आणि आपला दिवसातील बराचसा वेळ ते पुस्तकांच्या सान्निध्यात घालवत असत. त्यासाठी त्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. यावरून ‘शिक्षण’ घेण्यासाठी ‘गरिबी’ हा अडसर ठरत नाही याची आपणाला प्रचिती येते.
(आ) 1. (i) माशेलकरांच्या वडिलांचे निधन झाले आणि उदरनिर्वाहा कारणी त्यांना ‘माशेल’ हे गाव सोडावे लागले.
(ii) त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखाची होती.
2.
3. लहानपणी लेखक घरात जळण्यासाठी आणलेल्या लाकडांपासून स्टंप व बॅट बनवून खेळत असे. यावरून त्यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्याचे दिसून येते. नंतर लेखक त्यांच्या चुलत्याकडे वाय. एम. सी. ए. च्या कंपाउंडमध्ये राहायला गेले. तेथे ग्राऊंड जवळ असल्याने शाळा सुटल्यावर ते धावतच ग्राऊंडकडे जात असत आणि तेथे चालू असणाऱ्या खेळात बॉल टाकण्याचे काम करत असत. यातून त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली. वडिलांनी आणून दिलेल्या जुन्या बॅटमुळे लेखक अतिशय आनंदी झाले. पुण्याच्या ग्राऊंडवर झालेल्या क्रिकेटचा सामना लेखकांनी झाडावर चढून पाहिला. त्या सामन्यानंतर तेथील खेळाडूंची स्वाक्षरी घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून लेखकाच्या मनात विचार आले. आपण मोठे झाल्यावर खेळाडू झालो तर स्वाक्षरीसाठी आपल्याभोवतीही अशीच गर्दी होईल. यातून लेखक क्रिकेटची स्वप्ने पाहू लागले. अशाप्रकारे लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज रुजले आणि उगवले.
(इ) 1.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(i) शेती | हंगाम |
(ii) सूर्य | प्रकाश |
(iii) वृक्ष | पाने |
(iv) पैठणी | वस्त्र |
(v) भात | ओंबी |
2. (i) गालिचे
(ii) पक्षी
विभाग 2: पद्य (१६ गुण )
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. चौकटी पूर्ण करा.
(i) दारिद्र्याकडे गहाण पडलेले – _____________
(ii) कवीचा जवळचा मित्र – _____________
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले,
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.
दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले.
2. आकृती पूर्ण करा.
3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा
(i) फुलले
(iii) झोतभट्टी
(ii) धुंद
(iv) पोलाद
4. काव्यसौंदर्य:
‘हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’ या ओळीतील अर्धसौंदर्य स्पष्ट करा.
(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवाः
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ किंवा ‘दोन दिवस’ | |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | ||
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | ||
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘फुलामुलांतून हसतो श्रावण। मातीचे हो मंगल तनमन॥ |
‘झोतभट्टींत शेकावे पोलादा तसे आयुष्य दान शेकले॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | ||
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) संपदा (ii) बळकट (iii) उत्क्रांती (iv) चैतन्य |
(i) वाळविले (ii) पेलावे (iii) हरघडी (iv) अगा |
उत्तर:
1. (i) हात
(ii) अश्रू
2.
3. (i) उमललेले
(ii) उन्मत
(iii) अग्नीच्या मोठी ज्वालाची भट्टी
(iv) कठीण व लवचीक केलेले लोखंड
4. वरील ओळी कवी नारायण सुर्वे यांनी लिहिलेल्या ‘दोन दिवस’ या कवितेतील आहे.
या कवितेत कवीने कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थिती व कामगारांच्या मनातील व्यथा यांचे चित्रण केले आहे.
दु:ख गिळून जगण्याची उमेद निर्माण करणारी ही कविता आहे. आयुष्यात सदैव दुःखच वाट्याला आल्यामुळे पुढे कधीतरी सुखाचे दिवस येतील असा आशावाद कवीने व्यक्त केला आहे. आपल्या नशिबात अजून किती दिवस कष्ट आहेत हे अजमावताना कवी म्हणतो. अजून डोईवर उन्हाळे आहेत याचा हिशोब करतो. कारण कष्टापासून सुटका तर नाहीच; पण त्याच्या मनात येते. आपल्या वाट्याला असे किती कष्ट व दुःख येणार आहे.
या ओळीमुळे कामगारांच्या – कष्टकऱ्यांच्या जीवनातील भयाण वास्तवता आपल्या काळजाला भिडते आणि आपण अंतर्मुख होतो.
(आ)
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ किंवा ‘दोन दिवस’ | |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवी किशोर पाठक | कवी नारायण सुर्वे |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे आवाहन | कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रदर्शन |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | हिरवागार समृद्ध श्रावण लहान मुलांच्या मुखातून व बहरलेल्या ‘फुलांतून दिसून येतो. या मातीचे मंगलमय व्हावै तनमन. | ज्याप्रमाणे झोतभट्टीत लोखंड वितळत असते त्याचप्रमाणे कामगारांचे जीवनही तापदायक असते. कामगार जीवनातील दाहक वास्तवेत छान शेकत असतो. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | आवडली, कारण कवीने एकजुटीचे बळ व श्रमशक्तीचे महत्त्व या कवितेत दर्शवले आहे. देशाची प्रगती व आपली स्वप्ने यावरच अवलंबून आहेत. | आवडली, कारण कवीने दैनिक उदर निर्वाह करणारे कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्र दाहक शब्दांत मांडले आहे पोटाच्या भुकेसाठी कामगारांचे जीवनखर्ची वडते. |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) संपदा – संपत्ती (ii) बळकट – मजबूत (iii) उत्क्रांती – उन्नती (iv) चैतन्य – जीव |
(i) वाळविले – सुकविले (ii) पेलावे – झेलावे, तोलावे (iii) हरघडी – प्रत्येक वेळी (iv) अगा – अरे, असा |
विभाग 3 : स्थूलवाचन (६ गुण)
प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
1. ‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’ हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
2. खालील मुद्दयांच्या आधारे ‘व्युत्पत्तिकोश’ या विषयावर टीप लिहा.
व्युत्पत्तिकोश | ||
निर्मितीचा ठराव | निर्मितीची जबाबदारी | निर्मितीसाठी अर्थसाहाय्य |
3. सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा.
उत्तर:
1. व्युत्पत्ती कोशाचे कार्य व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाची मुळ्यापासून माहिती देणे. हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे. याचे प्रामुख्याने चार प्रकार पडतातः।
- शब्दाचे मूळ रूप दाखवणे : बदलत जात असलेल्या भाषेचे व शब्दांचे मूळरूप आपण व्युत्पत्ती कोशात पाहू शकतो.
- अर्थांतील बदल स्पष्ट करणे : बदलत्या काळानुसार शब्दाचा मूळ अर्थासोबत आणखी एक अर्थ सापडतो.
- उच्चारातील बदल व फरक दाखवणे : एखाद्या शब्दाचा इतिहास, अर्थ व भाषेत तो कसा प्रचलित झाला. याची माहिती मिळते,
- बदलांचे कारण स्पष्ट करणे : सोपेशब्द वापरण्यासाठी बहुधा आपण शब्दांत बदल करतो. आणि ते प्रचलित सुद्धा होतात.
2. १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्व. सावरकर होते. या संमेलनात व्युत्पत्तिकोश रचनेचे कार्य हाती घ्यावे हा ठराव मंजूर झाला. या कार्याची जबाबदारी कृ. पां. कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली. यासाठी बॅ. मुकुंदराव जयकर यांनी आर्थिक मदत केली. श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केले. या दोघांनी उचललेल्या जबाबदारीमुळे व्युत्पत्तिकोश निर्मितीच्या कार्यास मोलाची मदत झाली. या कोशाचे पहिले प्रकाशन १९४६ साली झाले आणि त्यानंतर व्युत्पत्तिकोशाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या.
3. सूर्य : माझी मावळायची वेळ झाली आहे. आता पृथ्वीची अंधारापासून सुटका कोण करणार?
पणती : सूर्यदेवा, तुम्ही काळजी करू नका. आपले काम पुढे चालू ठेवण्याचा मी प्रयत्न करीन.
सूर्य : तू तर एवढीशी पणती ! तुझा जीव तर अगदीच लहान आणि तू हे करणार?
पणती : होय सूर्यदेवा. मी जरी लहान असले तरी मी हे कार्य करायचा प्रयत्न करीन.
सूर्य : काय? तू माझे कार्य पुढे नेणार?
पणती : होय सूर्यदेवा, मी माझ्या तेजाने जमले तेवढी पृथ्वी प्रकाशित करेन.
सूर्य : वा! हे तर खूपच छान.
पणती : या कामासाठी सूर्यदेवा आपले आशीर्वाद मला हवेत.
सूर्य : हो, नक्कीच.
पणती : आपले आशीर्वाद असल्यावर मी खरोखरच यात यशस्वी होईन.
विभाग 4 : भाषाभ्यास (१६ गुण)
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्याचा प्रकार ओळखा:
(i) या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.
(ii) तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच.
2. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा:
तक्ता पूर्ण करा.
(i) आज गाडीत प्रचंड गर्दी!
विधानार्थी वाक्य तयार करा.
(ii) ताजमहाल खूप सुंदर आहे.
उद्गारवाचक वाक्य तयार करा.
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा (कोणतेही दोन)
(i) चक्कर मारणे
(ii) भिकेला लागणे
(iii) ताब्यात घेणे
(आ) भाषिकघटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती-
(i) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(i) बिकट – ___________
(ii) दास – ___________
(ii) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(i) गरिबी × …………..
(ii) प्रगती × …………..
(iii) शब्दासमूहाबदद्दल एक शब्द लिहा.
कर्जाच्या ओझ्याखाली दबणे, कर्जात बुडणे
(iv) वचन बदला.
(i) पदार्थ – ___________
(ii) बटाटा – ___________
2. लेखननियमांनुसार लेखन:
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
(i) हळुहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या, गरिब श्रमिकांना!
(ii) तु उत्तम नागरीक आहेस.
3. विरामचिन्हे
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
(i) रमा म्हणाली मला ही साडी खूप आवडली.
(ii) शी किती कचरा पसरलाय ह्यू
उत्तर:
(अ) 1. (i) विधानार्थी वाक्य
(ii) नकारार्थी वाक्य
2. (i) विधानार्थी आज गाडीत प्रचंड गर्दी होती.
(ii) उदगारार्थी – वाह ! ताजमहाल किती सुंदर आहे!
3. (i) फेरी मारणे. वाक्य: मानू आजोबा नव्वद वर्षाचे आहेत. पण दररोज न चुकता बाहेर एक तरी चक्कर मारतातच.
(ii) दारिद्र्य येणे, वाक्य सावकाराकडून घेतलेली कर्जे फेडता फेडता अनेक शेतकरी भिकेला लागले.
(iii) कब्जात घेणे वाक्य: शिवरायांनी आपत्या शौर्याच्या बळावर अनेक गड ताब्यात घेतले.
(आ) 1. (i) (i) कठीण
(ii) गुलाम
(ii) (i) श्रीमंती
(ii) अधोगती
(iii) कर्जबाजारी
(iv) (i) पदार्थ
(ii) बटाटे
2. (i) हळूहळू मी सगळ्या शाली गरीब श्रमिकांना वाटून टाकल्या.
(ii) तू उत्तम नागरिक आहेस.
3. (i) रमा म्हणाली, “मला ही साडी ‘खूप आवडली.’
(ii) शी! किती कचरा पसरलाय हा!
विभाग 5 : उपयोजित लेखन २८ गुण
प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा:
1. पत्रलेखन:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
किंवा
2. सारांशलेखन:
खालील उतारा वाचा व त्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
वनस्पतींमध्ये अखंड चोवीस तास पाणीपुरवठा होत असतो. घरातल्या नळाला जसं पाईपलाईनने पाणी पुरवलं जातं. तसं वनस्पतींमध्येही अनेक छोटे पाईप (झायलेम) एकमेकांवर बसवलेले असतात. त्यामुळे मुळांमध्ये जमिनीतून शोषलेलं पाणी या लांबलचक तयार झालेल्या पाईपद्वारे झाडांच्या शेंड्यापर्यंतही पुरवलं जातं. वनस्पतींमधलं स्वयंपाकघर म्हणजे हिरवी पानं! हरितद्रव्याच्या साहाय्यानं सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानं अन्न तयार करतात. ते विशिष्ट प्रकारच्या पेशींमधून (फ्लोएम) झाडाच्या इतर भागांपर्यंत पोहोचवलं जातं, त्या-त्या भागात अन्नावर प्रक्रियाही होते. याशिवाय गरजेनुसार या पेशींशिवाय अनेक पेशी असतात. त्यांची कामंही निरनिराळी असतात. काही वनस्पती पाण्यात राहूनही भिजत नाही; कारण त्यांच्या पेशींवर मेणाचा थर असतो. काही पाण्यात तरंगतात, कारण त्यांच्यात हवेच्या पिशव्या असतात. अशा अनेकविध प्रकारच्या पेशी वेगवेगळ्या झाडात त्यांच्या गरजेनुसार आणि झाडांच्या गुणधर्मानुसार असतात.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
1. जाहिरातलेखनः
पुढील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा:
कृती सोडवा-
2. बातमीलेखन:
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी करून लिहा.
3. कथालेखन:
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
तळेगाव गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची थोडीफार शेती होती व शेतीसाठी दोन बैलही त्याच्यापाशी होते. एक ढवळ्या व दुसरा पवळयअशी त्यांची नावे होती. त्यांची चांगली मैत्री होती. शेतात काम करायला ते एकत्र जात व एकत्रच परत येत पण एके दिवशी………………….
(इ) लेखनकौशल्य:
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
1. प्रसंगलेखन:
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
2. आत्मकथन:
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा विषय:
रविवारची सुट्टी नसती तर ………….!
3. वैचारिक:
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दऱ्यांच्या आधारे तुमचे विचार लिहाः
‘तिकिट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं- पैसेचा नियोजन — पैसेचा महत्त्व – सदुपयोग।
उत्तर:
(अ) 1. दिनांक : 3 ऑक्टोबर, 2014.
प्रति,
शालेय विद्यार्थी,
स. न. वि. वि.
दरवर्षी 2 ऑक्टोबर हा दिवस आपल्या शाळेमध्ये ‘स्वच्छता सप्ताह’ म्हणून साजरा करतो. स्वच्छतेचे महत्त्व हे सर्वांना माहीत व्हावे या उद्देशाने शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून याची सुरुवात होणे गरजेचे आहे.
यावर्षी पण आपल्या शाळेने शालेय परिसर स्वच्छता ही मोहीम राबवून शाळेचा परिसर स्वच्छ केला आहे. याचे गावातील लोकांकडून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला सर्वांचाच हातभार लागणे गरजेचे होते, हे आपण जाणवले. कार्यक्रमामध्ये सक्रिय झाला त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
आपल्यासारखेच इतर विद्यार्थी पण जास्तीतजास्त संख्येने हजर राहून ही स्वच्छता मोहीम अधिक चांगली करावी ही सदिच्छा. पुन्हा एकदा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपले अभिनंदन करत आहे.
आपला कृपाभिलाषी
अ.ब.क.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
आदर्श शाळा, मिरज
किंवा
दिनांक : 29 सप्टेंबर, 2017.
प्रति,
माननीय श्रीकांत राजेभोसले,
वरिष्ठ सेवक,
आदर्श शाळा, मिरज.
महोदय,
स. न. वि. वि.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील आपल्या शाळेत स्वच्छता सप्ताह निमित्त दिनांक २ ऑक्टोबर रोजी शालेय परिसर स्वच्छता मोहीम करण्याचा कार्यक्रम सकाळी 10:00 वाजता आयोजित केला आहे.
शाळेतील बरेच विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. स्वच्छतेसाठी आम्हाला काही साहित्य आवश्यक आहे. तेव्हा त्याची यादी या पत्रासोबत जोडली आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूने मी हे काम करून घेणार असल्यामुळे सोबतच्या यादीप्रमाणे साहित्य मिळावे ही विनंती.
आपला कृपाभिलाषी,
अ.ब.क.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
आदर्श शाळा, मिरज.
2. वनस्पतीमध्ये अनेक छोटे पाईप (झायलेम) असतात. त्याद्वारे घरातील नळाप्रमाणे वनस्पतींना अखंड पाणीपुरवठा होतो. म्हणून जमिनीतील पाणी शेंड्यापर्यंत पुरविले जाते. झाडाची पाने हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाने अन्न तयार करून विशिष्ट पेशीद्वारे (फ्लोएम) झाडाच्या इतर भागांना पोहोचवितात. म्हणून पानांना स्वयंपाकघर म्हणतात. झाडाच्या त्या-त्या भागात अन्नावर प्रक्रिया होते. याशिवाय इतर पेशीपण गरजेनुसार काम करतात. काही झाडे पाण्यात भिजत नाहीत; कारण पेशीवर मेणाचा थर असतो आणि काही झाडे पाण्यात तरंगतात. कारण पेशीमध्ये हवेच्या पिशव्या असतात. झाडांच्या गरजेनुसार व गुणधर्मानुसार अनेक पेशी असतात.
(आ) 1. दैनिक समाचार
2. गडचिरोली : 2 मार्च (वार्ताहर) रवीनगर येथील आदर्श विद्यालयामध्ये 28 फेब्रुवारी रोजी विज्ञानदिनानिमित्त वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सिटी कॉलेजचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्री विजय आफळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनास विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले.
विज्ञानातील प्रगती पाहून सर्वांना समाधान वाटले. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला आणि संशोधनात्मक विचारांना चालना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हे प्रदर्शन खूप उपयोगी पडेल. तेव्हा असा हा प्रदर्शनाचा उपक्रम विविध ठिकाणी सतत चालू राहिला पाहिजे असे विचार उद्घाटक श्री आफळे यांनी मांडले.
3. पण एका दिवशी काम करत असताना ढवळ्या नावाचा बैलाचा पाय खड्ड्यात पडतो आणि बैल अडखळतो. पायाला इजा होते. त्यातून रक्त यायला लागते. तेव्हा शेतकरी घरी जाऊन घरातून हळद घेऊन येतो आणि त्या जखमेवर घालतो. त्यामुळे रक्त थांबते. पण बैलाच्या डोळ्यातील पाणी काही थांबत नव्हते. यावरून त्याला वेदना होत होत्या. हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यालाही खूप वाईट वाटले. जवळपास औषध देणारे कोणी डॉक्टर नव्हते आणि औषधासाठी तालुक्याच्या गावास जावे लागत होते. आता यावेळी तर अंधार पडू लागला. तालुक्याला जाणे अशक्य होते. दुसऱ्या पवळ्या बैलाच्या डोळ्यातूनपण पाणी येत होते. मोठ्या जड अंत:करणाने शेतकऱ्याने कसेतरी तेथे एक झोपडी बनविली आणि त्या ढवल्या बैलाला घेऊन तो नावाचे घरी आला आणि गोठ्यात पवळ्या बैल बांधून उद्या ढवळ्या बैलाचे काय करायचे असा विचार करून झोपी गेला.
सकाळी उठून पाहतो तर गोठ्यात बैल दिसत नाही. त्याला काही सुचत नव्हते. तो तसाच शेतात आला आणि पाहतो तर दुसरा बैल पवळ्या गोठ्यातून त्याला बांधलेली दोरी तोडून या ढवळ्या बैलाजवळ येऊन बसला होता. त्याच्याही डोळ्यात पाणी होते.
यावरून शेतकन्याला हे दोन बैल प्राणी असून किती जीवापाड प्रेम करतात आणि आपण माणसंबुद्धी असून एकमेकांच्या जीवावर उठतो. साध्या साध्या गोष्टीमधून वैर उत्पन्न करतो आणि आपला नाश करून घेतो. हे या दोधी बैलांच्या प्रेमावरून दिसून आले.
(इ) 1. ‘केल्याने देशाटन’ या उक्तीप्रमाणे मी साकेत, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे गिर्यारोहण कॅम्पमध्ये सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर कळसूबाई’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या शिखरावर जाण्यासाठी नाव नोंदवून आलो. साधारणपणे आठ-दहा दिवसांचा अवधी होता. म्हणून इतर गिर्यारोहणासाठी लागणारे साहित्याची जमाजमव सुरू होती. माझ्या मित्रांना पण याचे आश्चर्य वाटले. त्यांना माझ्या गिर्यारोहणाबद्दल विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी यामध्ये तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी भरपूर सराव सुरू केला. माझे मार्गदर्शक शिक्षक श्री थोरात सर यांनी खूप कष्ट घेऊन मला चांगले तयार केले.
गिर्यारोहणाची तारीख ठरलेली होती. ती जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मनामध्ये एक वेगळीच भीती येऊ लागली. आपल्याला हे जमेल काय? आपण यात यशस्वी होईन काय ? वगैरे शंका व प्रश्न निर्माण होत होते. मी कशाचाही विचार न करता ठरलेल्या तारखेस शिखर चढाईसाठी सज्ज झालो. वातावरण खूपच प्रतिकूल होते. मे महिन्याचे अखेरचे दिवस असल्यामुळे मध्येच पाऊस, मध्येच कडक ऊन अशी विचित्र हवा होती यातूनच चढाई सुरू केली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी पुढे-पुढे जात होतो. मनात शिखराशिवाय दुसरा कोणताही विचार नव्हता. पुढे पुढे परिस्थिती अधिकच बिकट होत होती. माझे सहकारी मधून-मधून मागे फिरत होते. मी मात्र पुढे बघून चालत होतो. असे होता-होता एकदम शिखर दिसू लागले आणि नंतर मग मी त्या शिखरावर पोहोचलो.
मी शिखरावर पोहोचल्यावर तेथे ध्वज फडकवला. माझ्या नावाची पाटी त्या ठिकाणी रोवली. तेथे अजून काही नावाच्या पाट्या होत्या. आणि नंतर मी परत माघारी यशस्वी होऊन आलो. गावात आल्यावर मिरवणूक काढून मला घरी नेले. माझी सफर यशस्वी झाली ही बातमी काही क्षणात सर्वांना समजली.
माझ्या या यशासाठी विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. त्याबद्दल मला कळविण्यात आले. ठरल्याप्रमाणे मी त्या सोहळ्यात व्यासपीठावर सत्कार मूर्ती म्हणून बसलो होतो. माझे शिक्षक, मार्गदर्शक आणि इतर मान्यवरांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याचप्रमाणे इतरांनी पण माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. असा हा अभूतपूर्व सोहळा पाहून माझे मन भरून आले. माझ्या भाषणामध्ये मी शिक्षकांनी आणि मार्गदर्शकांनी कसे प्रोत्साहन दिले, कसे प्रशिक्षण दिले हे सांगितले. खरोखरच मी यांचा ऋणी आहे हे कळवून दिले. त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम संपला. हा सोहळा माझ्या जीवनामध्ये अविस्मरणीय ठरला खूप काही सांगून गेला.
2. रविवारची सुट्टी नसती तर
सर्व ऑफिसेस, शाळा, कारखाने इत्यादी बहुतेक ठिकाणी आठवड्यातील रविवारची सुट्टी असते. बऱ्याच दिवसापासून ही सुट्टी चालू आहे. त्यामुळे ही गोष्ट सर्वांच्या अंगवळणीच पडली आहे. रविवार म्हटले की सुट्टी असतेच हे आता फिक्सच झाले आहे. पण अचानक रविवारची सुट्टी रद्द केली किंवा रविवारची सुट्टी नसती तर काय झाले असते? ही कल्पनाच मोठी गहन आहे. म्हणून ही कल्पनाच करवत नाही.
याचा असा विचार केला की, सुट्टी नसती तर अनेक कामे मागे पडली असती. घरातील स्वच्छता, मुलांच्या शालेय वस्तूंची खरेदी तसेच इतरही अनेक कामे तशीच राहिली असती. कारण आपणाला ऑफिसमधून येण्यास संध्याकाळचा बराच वेळ होतो. फक्त साधारण एक तास कसा तरी मोकळा मिळतो. त्यातून मोठ्या शहरामध्ये ट्रॅफिक जाम यामुळे येण्यास वेळ जाणार तेव्हा मोकळा वेळ मिळणेही कठीण आणि कामे होणे कठीण. तेव्हा कामे मागे पडणार. मग एखादा दिवस रजा घ्यावी लागणारच. अशी सारखी सारखी रजा घेऊन कार्यालयीन कामाचा खोळंबा होणार. त्याचा परिणाम ऑफिस कामावर होणार असे दुष्टचक्र सुरू राहणार.
तेव्हा रविवारची सुट्टी मिळाली की भरपूर वेळ मिळतो. त्यामध्ये आपणाला आठवड्याचा थकवा घालवण्यासाठी जरा जास्त वेळ झोप आणि आराम मिळतो. इतर गोष्टींकडे मन वळल्यामुळे दैनंदिन कामातून थोडा आराम मिळतो. थोडा उत्साह वाढतो असे अनेक फायदे रविवारच्या सुट्टीमुळे मिळतात. पण या सुट्टीचा काही लोक दुरुपयोग पण करतात. तो असा की, दिवसभर नुसते लोळत पडणे, सुट्टी म्हणून उशिरा उठणे, नाष्टा जेवण उशिरा करणे, त्यामुळे सर्वत्र वेळेचा खोळंबा होत जातो आणि सगळा बिनकामाचा जातो. तसेच काही जण रविवारला जोडूनच सुट्टी काढून वारंवार लांब फिरणे किंवा सहलीला जाणे असे करतात. त्यामुळे कार्यालयीन कामाचा खोळंबा होतो.
रविवारच्या सुट्टीचे काही फायदे आणि काही तोटे आपण बघितले. यावरूनच सुट्टी आवश्यकच आहे का? असे म्हटले तर कोणत्याही गोष्टींचा अतिरेक केला तर त्या गोष्टींचे तोटेच होतात. तेव्हा या गोष्टीचा अतिरेक न करता योग्य तो उपयोग केला पाहिजे. म्हणजे जास्त वेळ झोपणे, उगाचच फिरणे या अतिरेकाच्या गोष्टी टाळल्या तर ही सुट्टी खूप फायदेशीर ठरते. मनाला विरंगुळा (आनंद) मिळतो. कामात बदल होतो, उत्साह वाढतो व विश्रांतीही मिळते. तेव्हा सुट्टीचा सदुपयोग करून घ्यावा.
3. लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!
शाळेत एखादे शिक्षक गैरहजर म्हणजे त्यांच्याऐवजी कोणीतरी दुसरे शिक्षक वर्गावर येता. या शिक्षकांतील संस्कृतचे गुरुजी मला फार आवडतात. अशा वेळी ते आम्हांला नवीन श्लोक व सुभाषिते शिकवतात. आजच त्यांनी आम्हाला दोन सुभाषिते शिकविली. एका सुभाषितात असे म्हटले होते- दरिद्री माणसाच्या मनात अनेक इच्छा जन्म पावतात अन् नाहीशा होतात आणि दुसऱ्याचा मथितार्थ असा होता, की पुरुषाचे भाग्य केव्हा उदयाला येईल ते सांगता येतनाही. या सुभाषितांतील सुंदर विचार मनात फिरत असतानाच मी घराकडे चाललो होतो. रस्त्याच्या कोपऱ्यावर एका मोठऱ्या फलकावर सरकारी लॉटरीची जाहिरात मला दिसली. त्यावर लिहिलेले होते:
‘तिकिट एक रुपयाचं, बक्षीस मात्र लाखाचं.’
ही पाटी पाहताचक्षणी माझ्याही मनात एक विचार चमकला आपणही एक रुपया खर्चून लॉटरीचे तिकीट घ्यावे नि पाहावी नशिबाची परीक्षा! कुणी सांगावे, पुरुषाचे भाग्य केव्हा उजळते ते मी पटकन विक्रेत्याकडे गेलो. एक तिकीट विकत घेतले अन् घरी आलो. सारा दिवस बक्षिसाचाच विचार कुणी सांगावे योगायोगाने मलाच पहिले बक्षीस मिळाले तर!
कोणत्याही गोष्टीला योजनापूर्वक आखणी हवी. योजना आखण्याचाच ही वेळ आहे. मग चाला लॉटरीचा अपवाद कशाला म्हणावे? बक्षीस मिळाल्यानंतर आखणी करण्यापेक्षा तिचा विनियोग कसा करायचा याचा मी आराखडा तयार केला. ऐकता का? ऐका तर मग –
समजा, मला दैवयोगाने पहिले बक्षीस लाभले अन् एक लाख रुपये मिळाले तर प्रथम मी बाजारात जाईन अन् दोन किलो पेढे आणीन. त्यांतले पाच देवापुढे ठेवून असेच सुखाचे दिवस दाखविण्यासाठी देवाची करुणा करीन. माझ्या सर्व इष्टमित्रांना पैठे देतदेतच ही गोड बातमी सांगेन.
माझीही काही योजने आहेत. वैयक्तिक स्वार्थ साधून आप्तेष्ट, समाज अन् देश यांची ऋणे फेडण्याची संधी मिळाली तर तिचा फायदा मी अवश्य घेईन. माझ्या आईच्या अंगावरील फाटके लुगडे पाहून मला सारखे वाटायचे – मला नोकरी लागली, की पहिल्या पगारातून तिला एक चांगले पातळ आणून द्यावे. आता तर काय? चांगली लॉटरी लागलेली आहे ! कृतज्ञतेची पहिली भेट म्हणून आईला चांगली पातळे आणि कापड आणून देईन. तसेच वडिलांचे कपडे बदलता आले तर केवढे समाधान वाटेल! त्यांच्यासाठी कोट, शर्ट, धोतरे टोपी साफा पोशाख आणून त्यांना आश्चर्याचा एक संधी देईन. आईवडिलांप्रमाणे माझ्या भावंडांची दैन्यावस्था दूर करण्यासाठी कपडे, पुस्तके, वह्या आणि आवश्यक त्या वस्तू त्यांना आणून देईन.
मला स्वत:साठी चांगले कपडे, उत्कृष्ट फर्निचर, आवडत्या ग्रंथांनी भरलेले छोटेसे ग्रंथालय, क्रीडेची नी करमणुकीची साधने, स्कूटर इत्यादि ज्या ज्या वस्तू हव्याहव्याशा वाटायच्या त्या सर्व या पैशातून मी विकत घेईन.
इतक्या चांग्ल्या मी वस्तुं नी सुखासमाधानाने राहायचे म्हणजे आजचे छोटे नी अपुरे घर बदलायलाच हवे. या नव्या वैभवाला साजेसा एक मालकीचा टुमदार फ्लॅट घेऊन टाकीन.
अशा तऱ्हेने निम्म्यापेक्षा अधिक पैसेखर्च झाल्यावर जगता यावे म्हणून काही रक्कम कायमची ठेव म्हणून सरकारी कर्जरोख्यांत वा अल्पबचत योजनेत गुंतवीन. यावर येणारे व्याज दरमहा घरखर्चासाठी वडिलांच्याकडे देईन. राष्ट्राचा पैसा राष्ट्राच्या कल्याणसाठी गुंतवणे हे माझे मी कर्तव्यच समजेन. माझ्या गरिबीच्या परिस्थिततीत माझ्या शिक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी मला साहाय्य केले त्या व्यक्ती व संस्था यांच्यासाठी मला काही करता आल्यास मी करेन. त्या शिवाय अनाथ मुलांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संस्थानां काही देणगी देईन. समाजऋण फेडणे हे मी माझे कर्तव्यच मानेन.
हे सर्व आखल्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करीन. पण केव्हा? मला लॉटरीत एक लाख रुपये मिळाले तर! माझे भाग्य केव्हा उजळेल हे कोण सांगेल ? मात्र याच वेळी गुरुजींनी सांगितलेले पहिले सुभाषितही आठवले ‘उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथा:।’ (दरिद्री माणसांच्या इच्छा जशा त्यांच्या मनात उगवतात तशाच त्या मावळतात.) त्यामुळे स्वैर मनाला मला त्याच वेळीच लगाम घालता आला.