SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers

Maharashtra Board SSC Class 10 Marathi Question Paper July 2023 with Answers Solutions Pdf Download.

SSC Marathi Question Paper July 2023 with Answers Pdf Download Maharashtra Board

Time: 3 Hours
Total Marks: 80

कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही. तसेच, या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग 5 – उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

विभाग 1 : गदय

प्रश्न 1.
(अ) उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
(1) कारणे लिहा: [2]
(i) रेखामावशींची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत; कारण …………..
(ii) स्नेहलने कॉलेजला जाताना सायकल वापरण्याचा निर्णय घेतला; कारण …………..

“काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत”, सुमित बोलत होता. “बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवयं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत”, स्नेहल गहिवरून म्हणाली.

अभिषेक भारावून म्हणाला, “माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!”

“खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट”, अभिषेकचे बाबा म्हणाले.

(2) उत्तरे लिहा. [2]
(i) अभिषेकने केलेला निश्चय ………..
(ii) पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची आवश्यकता ………..
(3) ‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. [3]
(आ) उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
(1) कृती करा: [2]
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 1

कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही वाघिणीची पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखादया पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ‘ऑऽवऽ’ असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती – कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येताहेत, की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अद्याप भान नव्हतं.

(2) आकृती पूर्ण करा:
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 2
(3) ‘लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली’ हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
अपठित गदय
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कोण ते लिहा
(i) ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देणारे – ______________
(ii) अविदया हे सर्व अनर्थांचे मूळ आहे असे सांगणारे – ______________

शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची श्रद्धा आहे. शिक्षण हा एकूणच मानवी जीवनाचा पायाभूत संस्कार आहे आणि शाळा हे संस्कारकेंद्र आहे. थोर समाजचितकांनी ‘विदधे’ ला ‘ज्ञाना’ ला महत्त्व का दिले याचे इंगित हेच आहे. विद्या जीवनाला वळण देते, सुधारते. विदयेची वाढ होणे सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्याचे लोकहितवादींनी प्रतिपादिले होते. नव्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी प्राचीन व्यवस्थेची चिकित्सा करणे त्यांना आवश्यक वाटत होते. गोपाळ गणेश आगरकर नव्या ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देत होते, तर महात्मा जोतीराव फुले यांनी ‘विदयेविना मती गेली’ असे विदयेचे महत्त्व प्रतिपादून ‘अविदया हे सर्व अनर्थाचे मूळ आहे’ असे सांगितले.

(2) विधाने पूर्ण करा:
(i) शाळा हे ………..
(ii) ‘विदयेविना ………..’
उत्तर:
(अ)
(1) i. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही.
ii. तिला तिचे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत.

(2) i. आजपासून मी वसनंच ये-जा करणार.
ii. कार्बनडाय ऑक्साइडच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसण्याकरिता.

(3) ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या थोड्या प्रदूषणाचा आता भस्मासूर झाला आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. मागचा पुढचा विचार न करता केली जाणारी जंगलतोड प्रथमतः थांबवली पाहिजे. विषारी धूर, रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर नियम लावले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. याव्यतिरिक्त, वातानुकूलित यंत्र (एसी), शीतकपाट (फ्रीज), परफ्युम्स इत्यादी घातक वायू निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर कमी केला पाहिजे. अशाप्रकारे, आपण ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण कमी करू शकतो. प्रत्येकाने किमान एक झाड लावून, त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. तरच ही भयानक परिस्थिती टाळता येईल.

(आ)
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 3
[टीप : विदयार्थ्यांनी कोणतीही दोन उत्तरे लिहावीत.]

(3) लेखकाने वर्णन केल्याप्रमाणे शिकारीवरून परतलेली वाघीण रात्रभर पायपीट करून थकली भागली असली, तरी त्या त्रासाचा राग तिनं पिल्लांवर काढला नाही. उलट, पिल्लांनी अंगावर उड्या मारल्या, दंगामस्ती करून त्रास दिला तरी ती फारशी रागावली नाही. पिल्लांचं पोट भरावं म्हणून तिने मोठ्या कष्टाने शिकार केली होती आणि त्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी ती त्यांना शिकारीकडे घेऊन गेली. जंगलात जाताना आपली सगळी पिल्लं आपल्या सोबत असावीत याचीही तिनं काळजी घेतली होती. या सगळ्या घटनांवरून हे स्पष्ट होते, की वाघिणीला पिल्लांच्या सुरक्षेची खूप काळजी होती. ती कुठेही गेली तरी तिचं मन नेहमी पिल्लांकडे एकवटलेलं होतं, पिल्लांसाठी कितीही त्रास सोसण्याची तिची तयारी होती. पिल्लांना व्यवस्थित खाऊपिऊ घालण्याबाबत ती सावधान होती. एखादी प्रेमळ, दक्ष, कर्तव्यतत्पर आई, आपल्या बाळाचं जसं संगोपन करते, तसंच ती आपल्या पिल्लांचं संगोपन करत होती. त्यामुळेच, लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली.

अपठित गदय

(इ)
(1) i. गोपाळ गणेश आगरकर
ii. महात्मा जोतीराव फुले.

(2) i. शाळा हे संस्कारकेंद्र आहे.
ii. ‘विदयेविना मती गेली’.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers

विभाग 2 : पदय

प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) चौकटी पूर्ण करा: [2]
(i) क्षणिक सुख देणारे – _____________
(ii) चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी – _____________
(iii) व्यक्तीला सदैव सुख देणारा – _____________
(iv) चिरकाल टिकणारा आनंद – _____________

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।
जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।
जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।
उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।
उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।
योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।
उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।
योगियांचे गोडपण पाहतां होय निवविता सर्वेन्द्रियां।।
मेघखें अध: पतन। उदकाचें देखोनि जाण।
अधःपातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।
तैसे योगियासी खालुतें येणें जे इहलोकी जन्म पावणें।
जन निववी श्रवणकीर्तनें निजज्ञानें उद्धरी।।

(2) आकृती पूर्ण करा: [2]
जीवांसी पांखोवा
योग्याचे मुद्रत्व सर्वांशी त्याप्रमाणे
(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा: [2]
(i) तृषित =
(ii) मृदुत्व =
(iii) रसना =
(iv) निवविणे =
(4) ‘योगीपुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. [2]

(आ) खालील मुद्दयांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 4
उत्तर:
(अ) (1) i. क्षणिक सुख देणारे – उदक
ii. चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी – चकोर
iii. व्यक्तीला सदैव सुख देणारा – योगीपुरुष
iv. चिरकाल टिकणारा आनंद – स्वानंद

(2)
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 5

(3) i. तृषित – तहानलेला
ii. मृदुत्व – मऊपणा
iii. रसना – जीभ
iv. निवविणे – संतुष्ट करणे, शांत करणे

(4) ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना करून योगीपुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध उदाहरणे देऊन संत एकनाथ पटवून देतात.

जगण्यासाठी सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. त्यांच्याकरिता पाणी हेच जीवन असते; मात्र पाणी फक्त बाह्यांग स्वच्छ करू शकते, ते आपले अंतरंग स्वच्छ करू शकत नाही; परंतु योगीपुरुष मात्र त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ करतो. तहानलेल्या जीवाला पाणी प्यायल्यावर मिळणारे सुख हे तात्पुरते असते. ते सुख चिरकाल टिकत नाही. हा सुखाचा अनुभव पुन्हा तहान लागेपर्यंतच टिकतो. योगीपुरुष मात्र त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला कधीही न संपणाऱ्या स्वानंदाचा अनुभव देतो. तहान भागवणाऱ्या पाण्याचा गोडवा जिभेलाच सुखावतो; परंतु आपल्याला अंतर्बाह्य शुद्ध करणारा योगीपुरुष आपल्या वाणीने आपल्या उपदेशाने आपल्या सर्व इंद्रियांना संतुष्ट करतो. ढगातून पडणाऱ्या पावसामुळे शेतीभाती पिकून सर्वांना अन्नधान्य मिळते, त्याचप्रमाणे योगीपुरुषाच्या येण्याने सर्वसामान्यांना आत्मज्ञान होऊन त्यांचा उद्धार होतो. अशाप्रकारे, योगीपुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करता येते.

(आ)

‘दोन दिवस’ किंवा ‘हिरवंगार झाडासारखं’
1. कवी नारायण सुर्वे 1. कवी – जॉर्ज लोपीस
2. कष्टकऱ्याच्या जीवनाचे वास्तव व त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रेखाटणे हा या कवितेचा विषय आहे. 2. झाडांमधील सहनशीलता, दातृत्व सहकार्याची वृत्ती, खंबीरपणा, इत्यादी गुण मानवाने स्वतः मध्ये रुजवावेत असा संदेश देणे हा या कवितेचा विषय आहे.
3. पोलाद जेव्हा झोतभट्टीत तापवले जाते. तेव्हा त्याची उपयुक्तता, गुणवत्ता वाढते. त्याचप्रमाणे जीवनातील अनंत दु:खांच्या संकटांच्या भट्टीत पोळून निघाल्याने या कष्टकऱ्यांचे सामर्थ्य, चिकाटी वाढीस लागली. 3. पक्षी जेव्हा दमूनभागून झाडाच्या फांदयांवर विश्रांती घेतात तेव्हा ते या झाडाचे कुणीही नसतात. त्यांचे व झाडाचे कोणतेही नाते नसते. तरीही ते हक्काने झाडावर बसतात, फांदयांवर विश्रांती घेतात; कारण झाडाने त्यांना आपलेसे केलेले असते.
4. प्रस्तुत कवितेत खूप कष्ट सोसूनही जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या कामगाराच्या जीवनाचे यथार्थ वर्णन कवीने केले आहे. या कष्टकऱ्याप्रमाणेच आपणही जीवनात येणारे दुःख, अडचणी, संकटे पचवण्याची हिंमत बाळगायला हवी. त्यांचा बाऊ करू नये. त्यातूनही वाट काढत आयुष्य नव्याने जगायला शिकायला हवे असा प्रेरणादायी व सकारात्मक संदेश या कवितेतून मिळतो. 4. “हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत झाडांची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणांचे वर्णन केले आहे. आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी वाणवायला हवेत. तसेच, झाडांसारखे हिरवेगार, ताजे व प्रफुल्लित जीवन जगायला हवे असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे.
5. ‘दोन दिवस’ या कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी मांडलेले कामगारांचे भावविश्व जीवनाचे एक वेगळेच रूप दाखवते. अडी-अडचणींच्या काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशादायी व सकारात्मक दृष्टिकोन देते. कबीने साध्या-सोप्या भाषेत जगण्याचे तत्वज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. गयासारखी भासणारी निवेदनात्मक लेखनशैली मला फार आवडली. भाकरीचा चंद्र, माना उंचावलेले किंवा कलम झालेले हात अशा सुंदर कल्पना मला फार आवडल्या. जीवनाचे धगधगीत वास्तव रेखाटतानाही कामगाराचे जीवन जगण्यावरील प्रेम कायम आहे, ते प्रेम टिपणारी ही कविता मला फार आवडते. 5. “हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत साध्या- सोप्या शब्दांत कवीने झाडांच्या गुणांचे वर्णन केले आहे. झाड जणू काही एखादे व्यक्तिमत्त्व आहे, असे समजून कवी झाडांविषयी बोलत आहे. ही कवीची अनोखी कल्पना मला फार आवडली. झाडांविषयीच्या उत्कट, तरल (सूक्ष्म) भावना कवी सहजपणे व्यक्त करतो. पानझडीचा काळ संपल्यावर झाड हिरव्यागार, नव्याकोया पानांनी नव्या नवरीप्रमाणे सजून जाते ही कविकल्पना मला फार आवडली. झाडाचे गुण कवीने बारकाव्यांसह अत्यंत संवेदनशीलपणे टिपले आहेत. या सर्व गोष्टींमुळे ही कविता मला फार आवडते.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers

विभाग 3: स्थूलवाचन

प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : [6]
(1) ‘जाता अस्ताला’ या कवितेतील तुम्हांला समजलेली सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
(2) ‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’ हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो….’ या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(3) खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 6
उत्तर:
(1) या कवितेतील सूर्याची भूमिका ही एखादया घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे वाटते. जसे एखादा कुटुंबप्रमुख, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये, म्हणून योग्य ती सोय करून ठेवतो, तसाच सूर्यही त्याच्या अस्तानंतर पृथ्वीच्या प्रकाशमान भविष्याची सोय करू इच्छितो. सूर्य अस्ताला जाताच पृथ्वी अंधारामध्ये जाणार आहे, तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे यावे असे त्याला वाटते. पृथ्वीच्या चिंतेने त्याचे डोळे पाणावतात. त्याच्यामागे पृथ्वीला आधार देणारे कोणीतरी असावे यासाठी तो संपूर्ण सृष्टीला विनंती करतो; परंतु पृथ्वीच्या रक्षणासाठी कोणीही पुढे येत नाही. हे काम करण्यासाठी जेव्हा इवलीशी पणती स्वतःहून पुढे येते तेव्हा हा सूर्य तिच्या हिमतीचे कौतुक करतो. तिचे नम्र; पण आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यांत पाणी येते. तो बिनधास्तपणे तिच्यावर पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवतो. जणू त्याच्यामागे पणती पृथ्वीला सांभाळून घेईल, तिला अंधारात बुडू देणार नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे तो शांतपणे अस्ताकडे झुकतो.

(2) ‘मोठे होत असलेल्या मुलांनो…’ हा पाठ म्हणजे भारतातील पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे अनुभव कथन आहे. त्यांना या उच्चपदापर्यंत पोहोचवणाऱ्या अनुभवांविषयी त्यांनी सविस्तर माहिती यात दिली आहे. कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा यांच्या भेटीतून त्यांच्याबरोबरच्या चर्चेतून आपणाला स्वतःच स्वतः ला सक्षम करता आले पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वत: चे मार्ग शोधता आले पाहिजेत हा महत्त्वाचा संदेश त्यांना मिळाला. हा अनुभव गाठीशी बांधून डॉ. अनिल काकोडकरांनी आपल्या यशाचा मार्ग आखला. पुढे वार्कमध्ये इंजिनियर म्हणून काम करताना सुरुवातीलाच डॉ. काकोडकरांवर एका महत्त्वाच्या कामाची जबाबदारी टाकली गेली.

त्यासाठी इतर कुणाची मदतही नाकारली गेली. डॉ. काकोडकरांनी हे आव्हान स्विकारून स्वत: कुणाचीही मदत न घेता ते काम यशस्वीपणे पार पाडले. त्यानंतर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तुम्ही काय करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही हा धडा डॉ. काकोडकर या अनुभवातून शिकले. हे अनुभव जेव्हा त्यांनी स्वतः घेतले तेव्हा त्यातील बारकावे त्यांना कळले आणि यशाचा मार्ग त्यांना सर करता आला. म्हणूनच, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’ हे विधान या पाठातून आपल्या प्रत्ययास येते.

(3) १९३८ साली मुंबई येथे स्वा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ पार पडले. यात ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जवाबदारी सोपवली गेली. १९४६ साली या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतर या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers

विभाग 4: भाषाभ्यास

प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:
(1) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा: [2]
(1) माझ्या वडिलांची बदली परत पुण्यास झाली.
(ii) तुम्ही आतापर्यंत किती झाडं लावली?
(2) पुढील वाक्यांत कंसातील सूचनेनुसार बदल करा: [2]
(i) साहित्याचे रंग खूप आहेत. (उद्गारार्थी करा.)
(ii) रेखामावशींचे पाय स्वच्छ आहेत. (नकारार्थी करा.)
(3) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन): [4]
(i) भान ठेवणे.
(ii) पारंगत असणे.
(iii) झोकून देणे.
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
(1) शब्दसंपत्ती:
(i) विरुद्धार्थी शब्द लिहा: [1]
सत्य × ………..
खर्च × ………..
(ii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: [1]
वाऱ्याचा वेगवान प्रवाह ………..
(iii) वचन बदला: [1]
पणती ………..,
दिवस ………..
(iv) लिंग बदला: [1]
शिक्षक ………..
कवी ………..
(2) लेखननियमांनुसार लेखनः [2]
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा
(i) अब्दूलने एकवार तीच्याकडे बघितले.
(ii) वाळवंटी प्रदेशात वर्षातुन एखादाच पाउस पडतो.
(3) खालील विरामचिन्हे ओळखा: [2]
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 7
उत्तर:
(अ)
(1) i. विधानार्थी वाक्य
ii. प्रश्नार्थी वाक्य

(2) i. किती रंग आहेत साहित्याचे!
ii. रेखामावशींचे पाय अस्वच्छ नाहीत.

(3) i. भान ठेवणे – जाणीव ठेवणे,
वाक्य : सार्वजनिक वाहने स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
ii. पारंगत असणे – तरबेज असणे, कुशल असणे.
वाक्य : कुशलची आजी स्वयंपाकात पारंगत होती.
iii. झोकून देणे मनापासून काम करणे/पूर्णपणे सहभागी होणे.
वाक्य : लोकमान्य टिळकांनी देशकार्यात स्वत:ला झोकून दिले होते.
(टीप: कोणतेही दोन वाक्प्रचार व त्यांचे अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)

(आ) (1) (i) सत्य × असत्य
खर्च × बचत
(ii) वाऱ्याचा वेगवान प्रवाह – झोत
(iii) पणती – दिवस
पणत्या – दिवस
(iv) शिक्षक – शिक्षिका
कवी – कवयित्री

(2) i. अब्दुलने एकवार तिच्याकडे बघितले.
ii. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो.

(3) i. एकेरी अवतरण चिन्ह
ii. अर्धविराम

SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers

विभाग 5 – उपयोजित लेखन

प्रश्न 5.
(अ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा: [6]
(1) पत्रलेखन:
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 8

किंवा

(2) सारांशलेखन:
विभाग – 1 : गदय (इ) (प्र. क्र. 1 – इ) मधील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : [10]
(1) जाहिरातलेखन :
संगणक वर्गाची जाहिरात तयार करा.
(2) बातमीलेखन:
नवजीवन विदयालय, भंडारा या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
(3) कथालेखन:
अपूर्ण कथा पूर्ण करा.
आज राहूल अतिशय आनंदात होता; कारण त्यांच्या शाळेची सहल पालगड येथे जाणार होती. लवकरच तो शाळेत पोहोचला. त्याचे सर्वच मित्र तयारीनिशी आले होते. सहल सुरू झाली. गाडीत सर्वांची मस्ती चाललेली होती. घाटातून गाडी चालली होती. निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद सर्व मुले घेत होती. घाटात गाडी एका वळणावर थांबली आणि ……..
(इ) लेखनकौशल्य (100 ते 120 शब्द) [8]
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
(1) प्रसंगलेखन :
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 9
वरील समारंभास तुम्ही पारितोषिकप्राप्त विदयार्थी म्हणून उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
(2) आत्मकथनः
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 10
वरील मुद्दयांच्या आधारे सैनिकाचे आत्मकथन लिहा.
(3) वैचारिक:
मुद्दे – भारतात साक्षरतेची गरज – ग्रामीण भागातील अज्ञान – लिहिता वाचता आल्याचे फायदे – देशाचा विकास – साक्षर देश म्हणून जगात नावलौकिक.
वरील मुद्दयांच्या आधारे ‘साक्षरता एक अभियान’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर:
(अ)
(1) अभिनंदन पत्र (अनौपचारिक)
दि. ०९ नोव्हेंबर २०२३
प्रिय मित्र सुहास,
सर्वप्रथम तुझे मनापासून अभिनंदन! मागील आठवड्यात झालेल्या क्रीडा शिबिरात तुला सहभागी होता आलं ; याचा मला खूप आनंद झाला. शिबिरात मर्यादित जागा उपलब्ध असल्याने माझ्या ओळखीतल्या अनेक मित्रांना येथे सहभागी होता आले नाही. तुला ती संधी मिळाल्याचे कळताच, मला खूप छान वाटले. फुटबॉलविषयीचे तुझे ज्ञान आणि त्या खेळाविषयीची तुझी आवड मला माहिती होती. म्हणूनच मी तुला वा शिबिराची जाहिरात पाठवली होती. तेथे जाऊन तुझ्या ज्ञानात भर पडली असेल आणि तुला फूटबॉलमधल्या करिअर संधीदेखील समजल्या असतील असा विश्वास वाटतो.

या शिबिराचा तुला फायदा होऊन उत्तरोत्तर तुला क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल यश मिळो आणि भविष्यात तू एक प्रसिद्ध फूटबॉलपटू म्हणून नावारूपास येवो, हीच प्रार्थना. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!
तुझाच मित्र,
वरद नाईक.
१२३, नाईक भवन,
शिंदे मार्ग,
नागपूर – ××××××,
[email protected]

किंवा

विनंती पत्र (औपचारिक)
दिनांक २८ सप्टेंबर २०२३
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
संत रोहीदास विवद्यालय,
चैत्यभूमी चौक,
नागपूर – xxxxxx
विषय : आपल्या विद्यालयात क्रीडा शिबीर आयोजित करण्याबाबत.

माननीय महोदय,
मी वरद नाईक, आपल्या शाळेचा विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. अंशुल स्पोर्टस् क्लबतर्फे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत एक क्रीडा शिबीर आयोजित करण्यात येते. या वर्षी हे शिबीर आपल्या महाविदयालयात आयोजित करावे अशी बऱ्याच विदयार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांचीदेखील इच्छा आहे. हे शिवीर दिनांक ०१ ते ०८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ०५ या वेळेत घेण्यात येणार आहे. या शिबिराचा फायदा आपल्या विद्यालयातील अनेक विदयार्थ्यांना होऊ शकेल. त्यामुळे, या शिबिरासाठी आपली शाळा उपलब्ध करून देण्यास परवानगी दयावी, ही विनंती.
आपला आज्ञाधारक,
वरद नाईक
(विद्यार्थी प्रतिनिधी),
संत रोहिदास विवद्यालय, चैत्यभूमी चौक
नागपूर – ××××××,
[email protected]

किंवा

(2) सारांश:
मानवाच्या आयुष्याला उभारी देणाऱ्या, समाजाचे हित जोपासणाऱ्या, चिकित्सकपणे अभ्यास करून ज्ञानाची कवाडे खुली करणाऱ्या व्यक्तीच्या भावनांना महत्त्व देणाऱ्या पावन शिक्षणाचे महत्त्व साया विचारवंतांनी जाणले. विदयेअभावी अज्ञानाचा अंधकार समाजाला विचारांनी अधू बनवून अनुचित घडण्यास कारणीभूत ठरतो.

(आ)
(1) जाहिरातलेखन
SSC Maharashtra Board Marathi Question Paper July 2023 with Answers 11

(2) बातमीतेलन

लोकवार्ता

नवजीवन विद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा

दिनांक : ६ सप्टेंबर, २०२३
आमच्या प्रतिनिधीकडून,

भंडारा : येथील नवजीवन विद्यालयात काल शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता शाळेच्या सभागृहात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती. विजया कौर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सरस्वतीदेवी व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या तसविरीला हार घालण्यात आला. या कार्यक्रमानिमित्ताने कथावाचनाची स्पर्धा आयोजित केली होती. तसेच, कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस वितरणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गशिक्षकांना, विषय शिक्षकांना भेटकार्ड देऊन त्यांना एक सुखद धक्का दिला.

मुख्याध्यापिका श्रीमती. विजया कौर यांनी शाळेतील सर्व विदयाथ्यांचे कौतुक केले व शिक्षकांचे आभार मानले. यानंतर शाळेतर्फे सगळ्यांना अल्पोपाहार देण्यात आला व दुपारी १ वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

(3) कथालेखन
प्रसंगावधान
…. एकच गोंधळ कानी पडला. बसमधून उतरून साऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. क्षणात घडलेल्या प्रसंगाची कल्पना आम्हांला आली. घाटात गाडी थांबवून सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण पाय घसरून खाली पडला होता. नशिबाने एका झाडाच्या फांदीला तो अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते.

आमच्या गुरुजींनी प्रसंगाचे गांभीर्य जाणले आणि तत्काळ बसमध्ये असलेली रस्सीखेच खेळण्यासाठी घेतलेली दोरी आणली. दगडाला एक टोक बांधून दुसरे टोक त्या झाडाला लटकलेल्या तरुणाकडे फेकले. तो तरुण त्या टोकाला पकडून वर आला. भीतीने थरथरणाऱ्या जखमी तरुणाला तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले. गुरुजींनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला. सान्यांनी गुरुजींचे कौतुक केले. गुरुजींनी आम्हां विदयार्थ्यांना असे प्रसंग आपण स्वतः ओढावून घेत असतो, तंत्रज्ञानाच्या आहारी जाताना वास्तवाचे भान ठेवायला हवे’ असा धडा दिला आणि गुरुजींविषयी मनात अभिमान भरून आम्ही सहलीच्या ठिकाणाच्या दिशेने पुढे सरसावलो.

तात्पर्य : प्रसंगावधान राखले असता मोठ्या संकटांतून सुखरूप बाहेर पडता येते.
तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन वास्तवाचा विसर पडणे हे नेहमीच धोकादायक ठरते.

(इ) लेखनकौशल्य
(1) प्रसंगलेखन :
अविस्मरणीय प्रसंग
२४ डिसेंबर हो! याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता आमच्या जनता विदयालय, ओझर या शाळेचा क्रीडास्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला आम्ही शाळेतील सर्व मुले उपस्थित होतो. शाळेच्या पटांगणावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. वेळेच्या अर्धा तास आधी आम्ही सर्व मुले येथे जमलो होतो. यावर्षी मला शाळेचा उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून पुरस्कार मिळणार होता. त्यामुळे, मी आणि माझे मित्रमंडळ विशेष जोशात होतो.

कार्यक्रम वेळेवर सुरू झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री. अभय राठोड यांचे आगमन झाले. आम्ही सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. राष्ट्रीय पातळीवर नावाजलेला क्रीडापटू, आपला अभय दादा, शाळेचा माजी विद्यार्थी आहे हे वधून अभिमानाने ऊर भरून आला. इतका कीर्तीवंत असूनही त्याच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा साधेपणा होतो. त्यामुळेच, अभवदादा मनाला विशेष भावला.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलामुलींचे कौतुक करत असताना अभय दादाने आवर्जून माझे नाव त्याच्या भाषणात घेतले. मन अभिमानाने फुलून आले. शेवटी तो क्षण आलाच; ज्याची मी उत्सुकतेने वाट बघत होतो. पारितोषिक वितरण सुरू झाले आणि उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून माझे नाव घोषित करण्यात आले. उपस्थित सर्वांनी टाळयांचा कडकडाट केला. मी माझ्या गुरुजनांना पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि अभिमानाने पारितोषिक स्विकारले. त्यावेळी माझ्या मित्रांनी केलेला कल्ला आणि न थांबणाऱ्या टाळ्या यांमुळे हा प्रसंग माझ्या कायम स्मरणात राहिला.

कार्यक्रम संपला; पण माझ्या मनात आता अभय दादासारखं क्रीडापटू बनून पुन्हा माझ्याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून यायचं स्वप्न होतं. घरी आल्यावर आई-बाबांनी खूप कौतुक केलं. माझ्या जीवनातला तो अविस्मरणीय दिवस होता.

किंवा

(2) आत्मकथन:
सैनिकाचे आत्मकथन
मी भारतीय सैन्यदलाचा एक माजी अधिकारी आहे. मला निवृत्त होऊन पाच वर्षे झाली. एक निवृत्त सैनिक म्हणून मला अभिमान वाटतो; कारण कितीतरी वर्षे मी माझ्या मातृभूमीची सेवा केली. माझे वडीलही भारतीय सैनिक होते. त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली आणि मी सैनिक व्हायचा निश्चय केला.

कॉलेजला असताना एन. सी. सी. मध्ये मी भाग घेतला आणि माझ्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. भारतीय जवानांविषयी मला प्रचंड आदर होता. देशसेवा हे आपले कर्तव्य आहे हीच भावना मनात ठेवून मी भारतीय सैन्यात दाखल झालो आणि उत्तर सीमेवर माझी नेमणूक करण्यात झाली. यादरम्यान मी अतिशय खडतर प्रशिक्षणाला सामोरा गेलो. त्यातून तावून-सुलाखून बाहेर पडलो ते सैनिक होऊनच. पुढे रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आम्ही अनुभवला. कारगिल युद्धात आमची तुकडी सहभागी होती. आमचा सामना पाकिस्तानी सैनिकांसोबतच दहशतवाद्यांशीसुद्धा होत होता. शत्रूने नीतिमत्ता सोडून या दहशतवादी संघटनांची मदत घेतली होती. त्यावेळी माझे वय जेमतेम २३ असेल. या लढाईत मी पाच दहशतवादयांना कंठस्नान घातले; पण त्याचबरोबर माझे दोन सहकारीही मी गमावले. लढाई जिंकल्याचे, ध्येय प्राप्तीचे हसू आणि सहकाऱ्यांना वीरमरण आल्याचे आसू दोन्ही एकाच वेळी अनुभवले. भारतमातेच्या रक्षणासाठी मी जे देशसेवेचे कार्य केले ते मी माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण समजतो.

अनेक वेळा देशभरातील आमच्या भगिनी, माता आम्हांला राख्या, दिवाळीचा फराळ पाठवत. त्यांच्या स्नेहाने प्रेमाने आमचे सण घरापासून इतक्या दूर असूनही आनंदात जायचे. घरची आठवण यायची, तेव्हा घरून आलेली पत्रे, फोनवरची संभाषणे आठवून मन रमवायचो, दिवसरात्र कष्ट करण्याचे वळ मिळवायचो. हे सगळं आठवून आपलं कर्तव्य पार पाडल्याच्या जाणिवेने मन भरून येतं.

पण, सध्याची परिस्थिती पाहिली, की मात्र तीव्र दु:ख होते. अनेकदा राजकीय भाषणांतून काहीजण देशाच्या सैनिकांबद्दलच अवमानकारक वक्तव्य करतात. तसेच काश्मीरसारख्या ठिकाणी सैनिकांवर होणारे हल्ले पाहिले, की मला प्रचंड राग येतो. ज्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर राहून खडतर स्थितीत, प्रतिकूल हवामानातसुद्धा आमच्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करत असतो, कधी शत्रू सैन्याशी, तर कधी दहशतवाद्यांशी लढून शहीद होतो तेच नागरिक आमच्यावर हल्ले करतात. हिंसक आंदोलने करून देशाच्या मालमत्तेचे नुकसान करतात. पोलीस, सैनिकांवर हात उगारतात. देशाच्या नागरिकांना खरंच आमच्याप्रति प्रेम आहे का? असा प्रश्न मला पडतो.

माझ्या मते, प्रत्येक व्यक्तीसाठी सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण असावे, ज्यामुळे एक सैनिक बनण्यासाठी लागणारे श्रम काय असतात याची समज भारतीय नागरिकांना येईल. तेव्हाच सैनिकांचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल.
‘राष्ट्र जगले तरच इथला नागरिक जगेल’ ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी आणि देशहितासाठी प्रयत्न करायला हवा. एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. जय हिंद! जय भारत! वंदे मातरम्!

किंवा

(3) वैचारिक लेखन:
साक्षरता एक अभियान
‘अविदया हे सर्व अनर्थाचे मूळ आहे’ हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे वचन शिक्षणाचे साक्षरतेचे महत्त्व प्रतिपादन करण्यास पुरेसे ठरते. लिहिता वाचता येणारी व्यक्ती साक्षर मानली जाते. शिक्षण क्षेत्रात भारताने विकासाची झेप घेतली असली तरी आजही भारतातील विविध क्षेत्रांत साक्षरतेचा अभाव दिसून येतो. भारतासारख्या विकसनशील देशाला प्रगतीपथावर नेण्याकरिता ‘साक्षरता’ हे महत्त्वाचे शस्त्रच उपयोगी ठरू शकते.

भारतातील अनेक खेडी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील साक्षरतेचा अभाव त्यांना अज्ञानाच्या गर्तेत ढकलत आहे. एकूणच ही निरक्षरता या भारतीय नागरिकांना प्रगती करण्यापासून रोखत आहे.

इंदिरा गांधी यांच्या मते, ‘विकासरूपी सूर्याची किरणे त्या ठिकाणीच पडतात, ज्या ठिकाणी लोक शिकलेले असतात. हे विधान भारताच्या विकासाची गुरुकिल्ली साक्षर असल्याचे स्पष्ट करते. व्यक्तीला लिहिता, वाचता येणे ही बाब त्या व्यक्तीचा केवळ शैक्षणिक विकासच घडवते असे नाही, तर व्यक्तीचा आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विकास साधण्यासही साहाय्यभूत ठरते.

भारत हा कृषिप्रधान देश असून येथील अधिकाधिक जनता शेती व्यवसायावर विसंबून आहे. ही जनता साक्षर झाली, तर शेती संबंधीचे व्यवहार करणे त्यांना सोपे जाईल. वैज्ञानिक शेती कशी करावी हे शिकून त्यानुसार शेतीमध्ये उत्क्रांती घडवता येईल. साक्षर व्यक्तीला भल्या बुऱ्याची जाणीव निर्माण होते. त्यामुळे त्याचा सर्वांगीण विकासही साधला जातो. आपल्या आयुष्याचे निर्णय त्याला अधिक समजपूर्वक घेता येतात व त्याला राजकारण व त्याचे त्याच्या जीवनावर होणारे परिणाम यांची जाण झाल्याने मतदानाच्या अधिकाराची किंमत कळते व योग्य प्रतिनिधीची निवड करून देशाच्या प्रगतीस हातभार लावणे त्याला शक्य होते. घरातील एक स्त्री शिकली, तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं असे म्हणतात, यावरून साक्षरतेचे मूल्य आपणांस लक्षात येते. समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या स्त्रियांनी शिक्षण घेऊन पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून प्रगती केली, तरच देशाच्या विकासाचा रथ स्त्री-पुरुष या दोन चाकांच्या बळावर भरधाव दौडेल. यासाठी साक्षरतेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचणे व त्याची अमलबजावणी होणे आज काळाची गरज बनली आहे. आज प्रत्येक साक्षर व्यक्तीने एका निरक्षर व्यक्तीस साक्षर करण्याचा वसा उचलला तरीही संपूर्ण भारत साक्षर होईल. गरज आहे थोड्या प्रयत्नांची! निरक्षरतारूपी कीड या समाजाला पोखरत आहे. त्यातून या देशाला तारण्यासाठी साक्षरता अभियानाला पर्याय नाही हे निश्चित.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper with Answers

Leave a Comment