Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 17 Question Answer अन्नजाल (कविता) for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 17 Question Answer अन्नजाल (कविता)
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 17 अन्नजाल (कविता)
अन्नजाल (कविता) Question Answer
प्रश्न १.
अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे
उत्तर:
१. मनुष्याने कड्या जोडून तयार केलेली साखळी
२. कोळ्याने विणलेले जाळे
प्रश्न २.
चुकीचे विधान शोधा.
(अ)
(१) मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.
(२) निसर्गनारायणाने महयजयल निर्माण केले.
(३) कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो.
(४) कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये.
उत्तरः
मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.
(आ)
(१) अन्नलयतील प्रिजयती नष झयल्यि ते क्ि हरोे.
(२) करोयच्य जयळयतील कयही धयगे तुटले तर कयही सबघडत नयही.
(३) एक प्रिजयत नष झयली तर अन्नखळी तुटते.
(४) अनेक प्रिजयती मयरल्य तरी अन्नल सटकून रयहते.
उत्तर:
अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
प्रश्न ३.
कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा.
उत्तरः
प्रश्न ४.
खालील कृतीचा/घटनेचा परिणाम लिहा.
मानवाने प्राण्यांना मारले तर –
उत्तरः
अन्नजाल अत्यंत कमकुवत होऊन काही काळाने संपूर्णपणे नष्ट होईल.
प्रश्न ५.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(अ) तुम्हांला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दांत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
अन्नसाखळीमध्ये एक सजीव दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतो. यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. गवत जमिनीतील पोषकद्रव्ये शोषून सूर्यकिरणांच्या साहाय्याने स्वतः चे अन्न स्वतः तयार करते. या गवतावर नाकतोडा जगतो. नाकतोड्यावर बेडूक जगतो. बेडकाला साप खातात. सापाला मुंगूस खाते. मुंगुसाला गिधाड खाते. गिधाडाचा मृत्यू झाल्यावर मातीतील अनेक विघटक त्याचे विघटन करतात. ते मातीत मिसळले जाते. अशाप्रकारे मातीपासून पुन्हा मातीपर्यंतचा हा प्रवास असतो. यावरून निसर्गाने अन्नसाखळ्या निर्माण करत निसर्गाचे संतुलन कसे साधले आहे हे आपल्या लक्षात येते.
(आ) कवितेच्या आधारे ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे
सुवचन स्पष्ट करा.
उत्तर: ‘जीवो जीवस्य जीवनम्’ याचा अर्थ एक जीव दुसऱ्या जीवाला जगवतो. प्रत्येक जीव अन्नासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. निसर्गात अन्नसाखळी कार्यरत असते. ती ‘जीवो जीवस्य जीवनम्’ चे उत्तम उदाहरण आहे. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. शाकाहारी प्राणी अन्नासाठी या वनस्पतींवर अवलंबून असतात. शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी प्राणी अवलंबून असतात. म्हणजेच एक जीव दुसऱ्या जीवाला जगवतो किंवा प्रत्येक जीव अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो असे आपण म्हणू शकतो.
खेळ खेळूया.
* दोन्याचे एक रीळ घ्या. वर्गातील सर्व मुले वर्गात किवा मैदानावर उभे राहा. दोन्याचे एक टोक एका मुलाच्या बोटाला बांधा. रिळाचा दोरा मोकळा करत एकेका मुलाला दोरा बोटाने धरून ठेवायला सांगा. वर्गातील सर्व मुलांनी दोरा बोटाने धरून ठेवेपर्यंत कृती कोणत्याही क्रमाने चालू ठेवा. शेवटच्या मुलाच्या बोटाला दोरा बांधा किंवा रीळ धरून ठेवायला सांगा. ही कृती चालू असताना काय घडले त्याचे निरीक्षण करा.
अन्नजालाप्रमाणे दोऱ्याचे जाळे तयार झाले का? कृती करताना दोरा सुटला किंवा तुटला, तर काय होते ते पाहा. त्यावरून अन्नजालाचे महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.
(टीप: वरील उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करून पाहावा. अन्नजालाचे महत्त्व सांगण्यासाठी विदयार्थ्यांनी उपक्रमासोबतच ‘कवितेवर आधारित कृती’ मधील कृ. १ व कृ. २ या उत्तरांचा संदर्भ वापरावा.)
शोध घेऊया.
* अन्नसाखळी नष्ट झाल्याचे दुष्परिणाम विज्ञान अभ्यासातून स्पष्ट होण्यासाठी आंतरजालाची मदत घ्या.
उत्तर:
उत्तरासाठीचे मुद्देः
i. दुर्मिळ प्राणिप्रजाती नष्ट होणे
ii. परिसंस्था नष्ट होणे
iii. अन्नजालावर वाईट परिणाम होणे
iv. निसर्गचक्र बिघडणे / निसर्गाचे असंतुलन
(टीप: वरील मुद्दे वापरून विद्यार्थी आंतरजालाच्या मदतीने अन्नसाखळी नष्ट झाल्याचे दुष्परिणाम शोधू शकतील.)
उपक्रम : तुमच्या परिसरातील एका अन्नसाखळीत समाविष्ट कीटक, पशुपक्षी यांचा शोध घेऊन त्यांची माहिती मिळवा.
उत्तर:
परिसरातील काही अन्नसाखळ्या:
i. जलवनस्पती → सूक्ष्म जलचर → लहान मासे → मोठे मासे → मानव.
ii. वनस्पती → अळ्या → चिमणी किंवा इतर पक्षी → मांजर किंवा इतर प्राणी.
(टीप: विद्यार्थी अशा प्रकारच्या अन्नसाखळ्या स्वतः शोधून त्यांची माहिती स्वत: मिळवू शकतील.)
वाचा.
* खालील उतारा वाचा.
विद्यार्थिजीवनात चांगल्या सवर्यींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही.
तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हांलाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.
Class 8 Marathi Balbharati Chapter 17 अन्नजाल (कविता) Question Answer
संकलित मूल्यमापन
कविता
कृती १ आकलन
प्रश्न १.
खालील चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
i. निसर्गनारायण
ii. महाजाल
कृती २ – आकलन
१. खालील कृतीचा/घटनेचा परिणाम लिहा.
i. साखळीतील मधली एक कडी तोडली तर
उत्तर:
संपूर्ण माला म्हणजेच साखळी भंगून जाईल.
प्रश्न २.
‘खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. मनुष्य साखळी कशाप्रकारे बनवतो?
उत्तर:
एक कडी दुसऱ्या कडीला दुसरी तिसऱ्या कडीला ‘अशाप्रकारे कड्या जोडत मनुष्य साखळी बनवतो.
ii. कोळी जाळे कसे विणतात?
उत्तर:
एका धाग्याला अनेक धागे, त्या अनेक धाग्यांना पुन्हा कित्येक धागे जोडत कोळी जाळे विणतात.
iii. महाजाल कशामुळे क्षीण झाले असे कवीला वाटते?
उत्तर:
असंख्य प्राणिजाती मारल्या गेल्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्यामुळे, महाजाल क्षीण झाले, असे कवीला वाटते.
कृती ३ – सरळ अर्थ
प्रश्न १.
‘जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाइ संपूर्ण माला’ या ओळींतील सरळ अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
माणूस एकात दुसरी दुसऱ्यात तिसरी अशाप्रकारे कड्या एकमेकांत गुंफून साखळी तयार करतो. त्यातील मधली एखादी कडी तोडली, तर संपूर्ण साखळीच भंगून जाते, असा अर्थ कवी येथे व्यक्त करतो.
कृती ४ – काव्यसौंदर्य
प्रश्न १.
‘बहुतांस त्या जोडलेले कित्येक बिघडते न जरिही तुटले अनेक’ या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
‘अन्नजाल’ या कवितेत कवी हर्ष परचुरे यांनी जीवसृष्टीतील अन्नजालाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. ते पटवून देताना कवी कोळ्याच्या जाळ्याचे उदाहरण देतात.
कोळी त्यांचे जाळे विशिष्ट पद्धतीने विणतात. या जाळयातील प्रत्येक धाग्यास अनेक धागे जोडलेले असतात. या अनेक धाग्यांना पुढे आणखी बरेच धागे जोडलेले असतात. त्यातील अनेक धागे जरी तुटले तरी काही बिघडत नाही. म्हणजेच साखळीप्रमाणे कोळ्याच्या जाळ्याचे अस्तित्व नष्ट होत नाही, ते टिकून राहते. हेच या ओळींमधून कवीला स्पष्ट करायचे आहे.
प्रश्न २.
‘जर का दुजी जात मेली समस्त उभी साखळी होउनी जाय नष्ट!’ या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘अन्नजाल’ या कवितेत कवी हर्ष परचुरे यांनी जीवसृष्टीतील अन्नजालाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
अन्नसाखळीत एका प्राणिजातीस दुसरी प्राणिजात खाते, तर दुसरीस तिसरी प्राणिजात खाते. जर दुसरी प्राणिजात मेली तर तिच्यावर अवलंबून असणारी संपूर्ण अन्नसाखळी नष्ट होते. म्हणजेच अन्नसाखळीतील एक प्राणिजात जरी नष्ट झाली तरी संपूर्ण अन्नसाखळीच कोलमडते; कारण त्यांच्यावर अन्नासाठी अवलंबून असणाऱ्या इतर प्राण्यांना अन्न मिळत नाही व ते उपासमारीने मरतात, ज्यामुळे संपूर्ण अन्नसाखळीच नष्ट होते. असा अर्थ येथे व्यक्त होतो.
मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी कृती
प्रश्न १.
खालील मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
i. प्रस्तुत कवितेच्या कवी / कवयित्रीचे नाव लिहा.
उत्तर:
कवी – हर्ष सदाशिव परचुरे
ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तर:
निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नजालाची प्रक्रिया हा या कवितेचा विषय आहे.
iii. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) कडी
(ब) बहू
(क) माला
(ड) समस्त
उत्तर:
(अ) साखळी
(ब) पुष्कळ
(क) माळा
(ड) सर्व
iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तर:
अन्नजालातील काही प्रजाती कायमच्या नष्ट झाल्यामुळे अन्नजाल कमकुवत बनले. अन्नजाल पूर्णपणे तुटून जाण्यापूर्वी आपण प्राणिजातीचे रक्षण करायला हवे हा संदेश या कवितेतून देण्यात आला आहे.
v. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्टचे लिहा.
उत्तर:
वनाचे श्लोक मधून घेतलेल्या या कवितेच्या चरणांची रचना श्लोकांप्रमाणे आहे. चार-चार चरणांची यमकप्रधान रचना सोप्या शब्दांत मांडलेले सृष्टीचे तत्त्वज्ञान मनाचा ठाव घेणारे आहे. कवितेच्या निवेदनात्मक भाषाशैलीमुळे कवीने दिलेला संदेश थेट आपल्यापर्यंत पोहोचतो.
vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.
उत्तर:
निसर्गाने जीवसृष्टीमध्ये अनेक अन्नसाखळ्या निर्माण केल्या आहेत. यातील काही प्रजाती नष्ट झाल्यामुळे अन्नजाल कमकुवत झाले. आपण प्राणिजातीचे रक्षण करून अन्नजाल वाचवणे आवश्यक आहे हा विचार या कवितेत व्यक्त झाला आहे.
vii. प्रस्तुत कवितेतील पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा.
‘निसर्गनारायण देखिले हे अन् वीपिले अन्नजालासि पाहे!’
उत्तर:
जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षांत अनेक अन्नसाखळ्या तुटून नष्ट झाल्या ते पाहून निसर्गनारायणानेच अन्नजाळे निर्माण केले.
viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर:
निसर्गातील एक मोठे तत्त्व अतिशय सोप्या पद्धतीने या कवितेत मांडलेले आहे. कोळ्याच्या जाळ्याचे उदाहरण देऊन अन्नजालाचे केलेले स्पष्टीकरण खूपच सुलभ आहे. निसर्गाचा चमत्कार आणि आपण घ्यावयाची काळजी यांचा सुंदर मिलाफ कवीने या कवितेत साधला आहे. म्हणून मला ही कविता आवडली.
काव्यपंक्तींचे रसग्रहण
प्रश्न १.
पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
मारीत जाता बहू प्राणीजाती
तुटोनि संपेल ते जाल पुढती
उत्तर:
कवी हर्ष सदाशिव परचुरे यांनी ‘अन्नजाल’ या कवितेत निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नजालाची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. अन्नजालातील काही प्रजाती नष्ट झाल्यास हे महाजाल क्षीण होईल असा इशारा कवीने कवितेत दिला आहे.
त्यासाठी प्राणिजीवन वाचवणे आवश्यक आहे. निसर्गाने प्राणिजातीची अन्नसाखळी स्वतः तयार केली आहे. प्राणी एकमेकांना खाऊन आपले आयुष्य जगत असतात. या प्रक्रियेत काही जीवजाती नष्ट झाल्या तरी हे महाजाल तुटणार नाही; मात्र ते कमकुवत होईल. म्हणूनच, माणसाने आपल्या फायदयासाठी प्राण्यांची विनाकारण हत्या न करता त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. नाहीतर एक दिवस हे महाजाल तुटेल.
श्लोकांप्रमाणे असणारी चरण रचना निसर्गाचे एक महान तत्त्व स्पष्ट करते. चार-चार चरणांची यमकप्रधान रचना या कवितेत मांडली आहे. संपूर्ण कविता निवेदनात्मक शैलीत संदेश देणारी आहे. यातील सहज सोप्या शब्दांमुळे हा संदेश वाचकांपर्यंत थेट पोहोचतो. अतिशय कमी शब्दांत निसर्गाचे तत्त्व विशद करण्यात ही कविता यशस्वी ठरते.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
प्रश्न १.
खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / विधानार्थी आज्ञार्थी / उद्गारार्थी)
- तुला काय म्हणाली ?
- जरा मला लिहून दे रे, निखिल.
- अगाई जोरात खरचटलंय मला!
- गोधडी म्हणजे मायेचा स्पर्श होय.
उत्तर:
- प्रश्नार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- विधानार्थी वाक्य
प्रश्न २.
खालील शब्दांचा संधिविग्रह करा.
- पुनर्जन्म
- दुष्परिणाम
- खिडकीत
- नि:संदेह
उत्तर:
- पुनर् + जन्म
- दुः + परिणाम
- खिडकी आत
- नि: + संदेह
प्रश्न ३.
प्रस्तुत कवितेतील यमक साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तर:
- कडीला साखळीला माला
- कित्येक अनेक
- प्राणिजात साखळीत समस्त
- हे पाहेराहे
- ते होते
- प्राणिजाती पुढती
प्रश्न ४.
खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
i. सोसता सोसेना । संसाराचा ताप त्याने मायबाप ।
होऊ नये ।
उत्तर:
अनुप्रास, यमक
ii. पोटापुरता पसा पाहिजे । नको पिकाया पोळी ।
उत्तर:
अनुप्रास
iii. ती बिजलीप्रमाणे कडाडली.
उत्तर:
उपमा
iv. अर्धपायी पांढरीशी विजार । गमे विहगांतिल बडा फौजदार!
उत्तर:
उत्पेक्षा, यमक
प्रश्न ५.
खालील विग्रहांपासून सामासिक शब्द तयार करा आणि समासाचे नाव लिहा.
- कर्जातून मुक्त
- नर आणि नारी
- धोक्याशिवाय
- पीत (पिवळे) आहे अंबर (वस्त्र) ज्याचे असा तो
उत्तर:
- कर्जमुक्त – तत्पुरुष समास
- नरनारी – द्वांद्व समास
- बिनधोक – अव्ययीभाव समास
- पीतांबर – बहुबीही समास
प्रश्न ६.
खालील ओळींतील वृत्त ओळखा.
- नकळत भिजती रानातली सर्व झाडे टपटप पडती पानातले थेंब थोडे
- कुणी दुष्ट अंगास लावील हात
- आहे पसंत मुलगी वद याच जागी सांगू नको सबबही नचती अभागी
उत्तर:
- मालिनी वृत्त
- भुजंगप्रयात वृत्त
- वसंततिलका वृत्त
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- मनुष्य
- माया
- धागा
- संपूर्ण
- प्राणी
उत्तर:
- मानव, मनुज
- ममता, प्रेम
- सूत, दोर
- समस्त
- पशू, जनावरे
२. खालील शब्दांचे वचन बदला.
- कडी
- साखळ्ठी
- जाळे
- माळा
- जात
उत्तर:
- कड्या
- साखळ्या
- जाळी
- माळ
- जाती
३. शब्दांच्या नंतर ‘सर’ हा प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
वेडसर, ओलसर, काळसर, पिवळसर, लालसर, भोळसर, इत्यादी.
४. खालील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.
- चप्पल न घालता –
- लोकांमध्ये प्रिय असलेला –
- जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, ती जागा –
- पायाच्या नखांपासून शेंडीपर्यत –
- आधी जन्मलेला
उत्तर:
- अनवाणी
- लोकप्रिय
- क्षितिज
- नखशिखांत
- अग्रज
५. लेखननियमांनुसार अचूक शब्द शोधून लिहा.
- अंनजाल / अन्नजाल / अण्णजाल / अन्नझाल
- घनिष्ठ / घनीष्ठ / घनिष्ट / घनीष्ट
- सूर्यकिरण / सूर्यकीरण / सुयर्कर रण / सुर्यकीरण
- परिस्थिती / परीस्थिती / परीस्थीती / परिस्थिति
- दुदेव / दुर्देव / दुदैव / दूर्देव
उत्तर:
- अन्नजाल
- घनिष्ट
- सूर्यकिरण
- परिस्थिती
- दुर्देव
६. खालील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
- रश्मीने वर्गात शांतताप्रिय हा किताब पटकावला
- ललितने तुला संगणकाची माहिती दिली का
- रमेश म्हणाला होता की सूरजला मुंबईला यायला खूप वेळ आहे
- मधुकरने काय सुंदर तैलचित्र काढले होते
- अनयने पुजाला विचारले किती वाजले
उत्तर:
- रश्मीने वर्गात ‘शांतताप्रिय’ हा किताब पटकावला.
- ललितने तुला संगणकाची माहिती दिली का ?
- रमेश म्हणाला होता, की ‘सूरजला मुंबईला यायला खूप वेळ आहे.’
- मधुकरने काय सुंदर तैलचित्र काढले होते!
- अनयने पुजाला विचारले, “किती वाजले?”
अन्नजाल (कविता) कवितेचा आशय
‘अन्नजाल’ ही कविता हर्ष परचुरे यांच्या ‘वनाचे श्लोक’ मधून घेण्यात आलेली आहे. निसर्गात जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षांत अनेक अन्नसाखळ्या तुटत गेल्या. मग निसर्गानेच अन्नजाळे निर्माण केले. प्रत्येक जीव एकाहून अधिक जीवांना खाऊन जगू लागला. यामुळे जरी अन्नजालातील काही प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या, तरी अन्नजाल पूर्ण नष्ट झाले नाही; पण ते कमकुवत बनले. यापुढे अशाप्रकारे प्राणिजाती नष्ट होत राहिल्या, तर मग अन्नजाल पूर्णपणे तुटून जाईल. म्हणून, आपण प्राणिजातींचे रक्षण करायला हवे, हा आशय कवीने कवितेतून मांडला आहे.
अन्नजाल (कविता) कवितेचा भावार्थ
‘कडीस जोडोनि …………….. संपूर्ण माला ! ।। १ ।।’
माणूस एक कडी दुसऱ्या कडीला याप्रमाणे एकेक कडी जोडत साखळी बनवतो. जरी यातील एक मधली कडी तोडली तरी साखळी तुटून जाते, संपूर्णपणे नष्ट होते.
‘पाहा कसे …………… तुटले अनेक ।। २ ।।’
कोळ्याचे जाळे मात्र साखळीपेक्षा वेगळे असते. कोळी कसे विशिष्ट पद्धतीने जाळे विणतात, ते पाहा. त्यांच्या जाळयात एका धाग्याला इतर अनेक धागे जोडलेले असतात व त्या अनेक धाग्यांना पुन्हा कितीतरी धागे जोडलेले असतात. त्यातले अनेक धागे तुटले तरी जाळे बिघडत नाही, ते टिकून राहते.
‘एकीस खायी ……………जाय नष्ट! ।। ३ ।।’
अन्नसाखळीत एका प्राणिजातीस दुसरी प्राणिजात खाते, तर दुसरीस तिसरी प्राणिजात खाते. जर दुसरी प्राणिजात मेली, तर तिच्यावर अवलंबून असणारी संपूर्ण अन्नसाखळी नष्ट होते.
‘निसर्गनारायणें …………… महाजाल राहे ! ।।४ ॥’
जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षांत अनेक अन्नसाखळ्या तुटून नष्ट झाल्या. ते पाहून निसर्गनारायणानेच अन्नजाळे निर्माण केले. यात प्रत्येक जीव एकाहून अधिक जीवांना खाऊन जगू लागला. यामुळे अन्नजालातील काही प्राणिजाती काळाच्या ओघात नष्ट झाल्या तरीही निसर्गाचे हे महाजाल टिकून -राहिले आहे.
‘तगले असे ……………….. जाल पुढती ! ।।५।।’
निसर्गनारायणाने विणलेले हे महाजाल अजूनही टिकून आहे; परंतु प्रमाणापेक्षा जास्त प्राणिजाती नष्ट झाल्याने ते आता कमकुवत झाले आहे. यापुढे जर अशाच पद्धतीने आपण प्राणिजाती मारत राहिलो, तर एक दिवस असा येईल, की हे जाळे संपूर्णपणे तुटलेले म्हणजेच नष्ट झालेले असेल.
अन्नजाल (कविता) शब्दार्थ
अन्नजाल (कविता) वाक्प्रचार व त्याचा अर्थ
क्षीण होणे. : कमकुवत होणे.
अन्नजाल (कविता) टीप
साखळी : गोल किंवा लंबगोलाकृती कड्यांची एकमेकांत गुंफून केलेली माळ. येथे अन्नसाखळी या अर्थानेही हा शब्द वापरला आहे. अन्नसाखळीत अन्नासाठी एका प्राण्यावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा अशाप्रकारे कित्येक प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात.