Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Class 8 Marathi रचना उपयोजित लेखन विभाग for exam preparation.

Maharashtra Board Class 8 Marathi रचना (उपयोजित लेखन)

१. पत्रलेखन

पत्रलेखन ही एक कला आहे. एका व्यक्तीचे विचार / भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवण्याचे हे एक महत्त्वाचे आणि उत्तम साधन आहे. विषय आणि स्वरूपानुसार पत्रलेखनाचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

१. औपचारिक पत्र – हे पत्र कार्यालयीन स्वरूपाचे पत्र असते. यात विनंती पत्र, मागणी पत्र, तक्रार पत्र अशा पत्रांचा समावेश असतो.
२. अनौपचारिक पत्र – हे पत्र घरातील, नात्यातील जवळच्या व्यक्तींना लिहिले जाते.

आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहिती आणि विचारांची देवाणघेवाण यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे, पत्र लिहिण्याचे प्रमाण आज कमी झाले आहे. तरीदेखील अर्ज करणे, विनंती करणे, मागणी करणे अशा कामांसाठी कार्यालयीन पत्रव्यवहार करताना औपचारिक स्वरूपातील पत्र लिहावी लागतात. ही पत्र व्यक्तिगत किंवा सार्वजनिक स्तरावर लिहिली जातात. या वर्षी तुम्ही औपचारिक पत्रलेखनातील विनंती पत्र कसे लिहावे, हे शिकणारा अहात.

औपचारिक पत्रलेखनासाठी महत्त्वाच्या गोष्टी:

१. ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे तिचा उल्लेख योग्य पदासह आणि आदरपूर्वक करावा.
२. पत्रलेखनाची भाषा सुस्पष्ट, नेमकी आणि विषयानुरूप असावी.
३. संपूर्ण पत्र मुख्य विषयाला धरूनच लिहावे.
४. पत्र लिहिताना लेखननियमांचा काटेकोरपणे वापर करावा.
५. पत्र ज्यांना पाठवायचे आहे त्यांचे पद, शिक्षण, वय, योग्यता आदी बाबी लक्षात घेऊन पत्रात सुयोग्य भाषा वापरावी.

औपचारिक पत्रातील मुख्य घटक:

१. ज्यांना पत्र पाठवायचे त्यांचा पत्ता व दिनांक.
२. मायना व विषय
३. मुख्य मजकूर
४. समारोप
(टीप: नवीन ई मेल प्रारूपानुसार पत्रलेखन करावे.)

औपचारिक पत्राचे प्रारूप

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 1

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

औपचारिक पत्रे

१. वरील प्रारूपाचा अभ्यास करून खालील विषयावर पत्रलेखन करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा.
उत्तर:
दिनांक: १५ मे, २०२२.
प्रति,
माननीय किरण सावे सर,
वर्गशिक्षक,
महात्मा गांधी विदयालय,
तळेगाव, नांदेड xxxxxx.

विषय : ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ शिबिरात सहभागी करून घेण्यासाठी.

महोदय,

मी, कु. कुशल विजय सावंत, इयत्ता आठवी ‘अ’ चा विदयार्थी आपणांस हे पत्र लिहीत आहे. आपल्या शाळेने दिनांक २० मे २०२२ ते ३० मे २०२२ या दही दिवसांत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ या शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी होण्याची माझी खूप इच्छा आहे; कारण या शिबिरात प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव सर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याकडून हस्ताक्षर सुंदर करण्याची कला शिकून घेणं म्हणजे एक सुवर्णसंधीच आहे. ही सुवर्णसंधी मला लाभावी. शिबीर सुरू व्हायला फक्त चार दिवस बाकी आहेत. प्रवेशाच्या जागाही कमी आहेत.

कृपया, मला या शिबिरात सहभागी होण्याची संधी आपण दयावी, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,
कु. कुशल विजय सावंत
कु. कुशल विजय सावंत
४०५, रत्नधाम,
वडेगाव, शिरीषकुमार रोड,
नांदेड xxxxxx
इ-मेल: [email protected]

२. तुमच्या शाळेमध्ये दिवाळीच्या सुट्टीत ‘नाट्यदर्पण’ संस्थेने १५ दिवसांची अभिनय कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा.
उत्तर:
दिनांक: १० नोव्हेंबर, २०२२.
प्रति,
माननीय संतोष राणे सर,
वर्गशिक्षक,
शैलेंद्र विद्यालय,
दहिसर (पूर्व),
मुंबई xxxxxx.

विषय: ‘नाट्यदर्पण’ संस्थेच्या अभिनय कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी.

महोदय,

मी कु. तारा रवी साने, इयत्ता आठवी ‘अ’ ची विदयार्थिनी आपणांस सदर पत्र लिहीत आहे. आपल्या शाळेत येत्या दिवाळी सुट्टीत – दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या काळात ‘नाट्यदर्पण’ संस्थेने अभिनय कार्यशाळा आयोजित केली आहे. त्या कार्यशाळेत सहभागी होण्याची माझी खूप इच्छा आहे.

त्या कार्यशाळेत श्रीनिवास नार्वेकर सर अभिनयाचे धडे देणार आहेत. या सुवर्णसंधीचा मला लाभ करून घ्यायचा आहे; परंतु
कार्यशाळेसाठी केवळ पाच दिवस बाकी आहेत आणि प्रवेशाच्या जागा कमी आहेत.

कृपया, एक इच्छुक विदयार्थी म्हणून आपण मला या कार्यशाळेत सहभागी करून घ्यावे, ही नम्र विनंती.

आपली विश्वासू,
कु. तारा रवी माने
कु. तारा रवी साने
०५, विश्वविहंग,
सावेनगर, सावरपाडा,
दहिसर (पूर्व),
मुंबई xxxxxx
इ-मेल: [email protected]

अनौपचारिक पत्रे

१. धाकट्या भावाला काव्यवाचनाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करा.
उत्तर:
दिनांक: १ नोव्हेंबर, २०२२.
प्रिय आरव,
अनेक शुभाशीर्वाद.

कसा आहेस, बंधुराजा? कालच आईकडून छान बातमी कळली. तुला तुझ्या शाळेने आयोजित केलेल्या काव्यवाचनाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला, त्याबद्दल सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन !

ही आनंदाची बातमी कळताच मी हरखूनच गेलो होतो. आमच्या बोर्डिंगमधल्या शिक्षकांना, विदयार्थ्यांना, स्वयंपाकी राजूला, जो भेटेल त्याला हेच सांगत सुटलो होतो. तेही तुझं खूप कौतुक करत होते. खरं तर, तुला लहानपणापासून बालगीतं, बडबडगीतं गुणगुणायची सवय होती. आपण तुझं ते बोबडं सादरीकरण व्हिडिओ रेकॉर्ड करून जपून ठेवलंय. तू पाठ्यपुस्तकातील कवितांच्या वाचनात, सादरीकरणात खूप रमायचास. यावेळीही तू अगदी मन लावून मेहनत केलीस आणि बाईंनी तुझी खूप छान तयारी करून घेतली, म्हणून तुला हे यश मिळाले.

परंतु, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचाय. मोठमोठ्या कवींची, लेखकांची भाषणं ऐकायचीत, हो ना? त्यांच्या काव्यवाचनातून, अभिवाचनातून शिकत राहा. अशीच प्रगती पुढे कर.

आईबाबांना शिरसाष्टांग नमस्कार! मी येथे सुखरूप आहे. काळजी नसावी. दिवाळीच्या सुट्टीत घरी येईनच.

तुझाच,
दादा
कु. नितीन राम काळे
विदयाप्रशाला बोर्डिंग,
तळेगाव रोड, पर्वती,
पुणे xxxxxx
इ-मेल: [email protected]

२. कोरोनाच्या काळात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे पत्र आपल्या बहिणीला लिहा.
उत्तर:
दिनांक: २ मे, २०२०.
प्रिय प्राची,
खूप शुभाशीर्वाद.

कशी आहेस? काका-काकू कसे आहेत ? घरी आहात ना? सध्या हा कोरोना महामारीचा काळ खूप कठीण आहे. प्रत्येक गोष्ट, कृती करताना खूप सावधान राहावे लागते. कोरोनाचा हा ‘न दिसणारा’ जीवाणू नाकावाटे तोंडावाटे किंवा त्वचेवाटे शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणून, बाहेरून आल्यावर किंवा कोणतेही काम करण्याआधी ‘वारंवार साबणाने हात धुवा’ असे सांगितले जाते. काकू सांगत होती, की तुला वारंवार हात धुण्याचा कंटाळा येतो आणि तुला सतत खेळायला घराबाहेर जायचं असतं; पण एक सांगू का, प्राची? अगं, असं करण्यामुळे तुलाच त्याचा त्रास होईल. समजा, तुला स्वच्छतेच्या अभावी आणि काळजी न घेण्याने कोरोनाची लागण झाली, तर काका-काकूंनाही धोका निर्माण होईल.

आपण निष्काळजीपणा करून स्वतःवर संकट ओढवून घेण्यापेक्षा, डॉक्टरांच्या व इतरांच्या कामाचा व्याप वाढवण्यापेक्षा घरच्या घरी स्वच्छतेचे आणि सामाजिक दुरीचे नियम कटाक्षाने पाळले तर बरंच आहे, नाही का ?

त्यामुळे, २० सेकंद साबणाने व्यवस्थित हात चोळून पाण्याने धुणे, कुठेही जाताना मास्क वापरणे, तो गरजेनुसार बदलणे, गरम पाण्याने अंघोळ करणे, कोमट पाणी, काढा पिणे, गरजेनुसार सॅनिटायझर वापरणे, घरातील वस्तू सॅनिटाइझ करण्यात आईला मदत करणे या स्वच्छतेच्या, आरोग्याच्या चांगल्या सवयी आपण स्वत:हून लावून घेतल्या पाहिजेत.

बरं, स्वत:ची काळजी घे. काका-काकूंना शिरसाष्टांग नमस्कार सांग. कोरोनाची महामारी दूर झाल्यावर भेटूच. तोपर्यंत घरी राहा,
सुरक्षित राहा.

तुझीच, निशू दीदी
कु. निशा विकास घरत
०४, सुखशांती निवास,
शनिवार पेठ,
अप्पा बळवंत चौक,
पुणे xxxxxx

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

२. सारांशलेखन

आजच्या युगात आपले म्हणणे मोजक्या व नेमक्या शब्दांत सांगणे, हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. योग्य सरावाने सारांशलेखनाचे हे कौशल्य विदयार्थ्यांना आत्मसात करता येईल. सारांशलेखन करताना दिलेला मोठा उतारा वाचून, समजून घेऊन तो संपूर्ण आशय कमी शब्दांत मांडता येणे अपेक्षित आहे.

सारांशलेखनाच्या पायऱ्या

१. सर्वप्रथम, दिलेला उतारा व्यवस्थित वाचावा.
२. त्यात मांडलेला विचार समजून घ्यावा.
३. त्यात दिलेली उदाहरणे गाळून तो विचार आपल्या शब्दांत थोडक्यात मांडावा.

लक्षात ठेवा.

१. दिलेल्या उताऱ्याचा थोडक्यात (कमीतकमी) शब्दांत सारांश लिहिता यायला हवा.
१. उताऱ्याचा संपूर्ण आशय लक्षात येईल, असे सारांशलेखन आवश्यक आहे.
३. विषयाची मुख्य कल्पना स्वत:च्या शब्दांत मांडणे अपेक्षित आहे.
४. उताऱ्याचे किंवा सारांशाचे शब्द मोजून नोंद करण्याची आवश्यकता नाही.

सरावासाठी नमुने

उतारा १

१. खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहा.
आपल्यासारख्या सामान्यांना शब्दांवाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, सांधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते.

मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या ‘जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळीकतेमुळेच कधीकधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचं मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते.

सारांश

सर्वसामान्यांना शब्दांनी संवाद साधत बोललेलेच भावते, परवडते आणि हवेही असते. मित्रमैत्रिणींसोबत मोकळेपणाने असा संवाद साधताना एकमेकांना पुरते ओळखत असल्याने कधीकधी अवघडलेपणा येतो. ही जवळीक टिकवण्यासाठी मतभेदाचे, भावना दुखावणारे, मनाला बोचणारे विषय टाळावे लागतात. अशा अनेक बंधनांमध्ये हा ‘मोकळा’ संवाद गुंतलेला असतो.

२. खालील उतारे वाचा. त्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहा.

उतारा २
‘सुंदर हस्ताक्षर हा खरा दागिना आहे’, असे म्हटले जाते. आपले अक्षर स्वच्छ, सुंदर, वळणदार व शुद्ध असायला हवे, तर आपले लिखाण प्रभावी ठरते. सुंदर अक्षर ही नेहमी जमेची बाजू ठरते. संत रामदास म्हणतात,
‘वाटोळे सरळे मोकळे । वोतले मसीचे काळे |
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे । मुक्तमाळा जैशा ।

सरळ ओळीत अक्षरांचा डौल, गोलाई सांभाळत, काना- मात्रा- वेलांट्या यांची काळजी घेत ठसठशीतपणे लेखन करायला हवे. पांढऱ्यावर काळे करताना जणू काळ्या ठळक अक्षरांच्या ओळी म्हणजे मुक्तमाळा वाटायला हव्यात. हे महाकठीण नाही, प्रयत्नांनी साध्य होईल, असे आहे. न कंटाळता, अथकपणे केलेल्या सरावातून आपल्या हस्ताक्षरात सुधार होऊ शकतो. परीक्षैत सुरुवातीला चांगले अक्षर काढणाऱ्या लोकांचे शेवटी कोंबडीच्या पायाप्रमाणे होत गेलेले अक्षर वाचनीय नसते. आपण लिहिलेले संपूर्ण लेखन एकटाकी दिसायला हवे, यासाठीच कडी मेहनत घ्यायची असते. मग मोत्यासारखे टपोरे अक्षर पानावर उमटू लागते, जे पाहिल्यावर, वाचल्यावर मनात ठसते.

सारांश

सुंदर हस्ताक्षर हा एक अलंकार आहे. स्वच्छ, सुंदर, वळणदार व शुद्धलेखन नेहमीच प्रभावी, जमेची बाजू ठरते. एका सरळ ओळीत काना, मात्रा, वेलांट्या सांभाळत वळणदार अक्षरे ठळकपणे लिहिता येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सतत, अथक सरावानेच हस्ताक्षर सुधारते. ते एकटाकी, मोत्यासारखे सुंदर दिसण्यासाठी कष्ट घेतले, तर ते वाचनीय, प्रेक्षणीय ठरते, मनात ठसते.

उतारा ३

‘सुसंगती सदा घडो।’ हे सुभाषित प्रसिद्ध आहे. माणूस कोणाच्या संगतीत राहतो, त्यावरून तो कसा आहे, हे ठरते. संतांच्या, सज्जनांच्या संगतीत राहून आपणही सज्जन बनतो, तर दुष्टांच्या, वाईट लोकांच्या संगतीत राहून कळत नकळत आपल्यावरही वाईट संस्कार होतात. आपल्या जीवनात संगतीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. उदाहरणादाखल पाहायचे झाल्यास महात्मा गांधीजींनी पोरवयात असताना वाईट संगतीमुळे चोरी केली होती, तर वाल्या नावाचा दरोडेखोर नारदांच्या सहवासात आल्याने वाल्मिकी ऋषी बनला.

सज्जनांचा संग म्हणजे लोखंडाला होणारा परिसाचा संग, जो लोखंडाला म्हणजेच आपल्याला सोने करतो. म्हणून श्रेष्ठ मूल्ये, आदर्शत्व अंगी बाणवायचे असेल, तर सुसंगती महत्त्वाची ठरते. कळतनकळतही आपल्यावर चांगलेच संस्कार घडायला हवे असतील, तर सुसंगती आवश्यक आहे. वाईट गोष्टी पसरायला वेळ लागत नाही, त्या शिकाव्या लागत नाहीत; परंतु चांगल्या गोष्टी प्रयत्नपूर्वक शिकाव्या लागतात, आत्मसात कराव्या लागतात, खूप कालावधीनंतर त्यांचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे, आपण सुसंगतीत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सारांश

आपल्या जीवनात ‘सुसंगती’ चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सज्जनांच्या सहवासात आपणही त्यांच्यासारखे बनतो. लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा, तशी सज्जनांची संगत आपले सोने करते. श्रेष्ठ मूल्ये, आदर्शत्व आत्मसात करण्यासाठी, मनावर सतत चांगलेच संस्कार घडण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण सुसंगती धरली पाहिजे.

३. संवादलेखन

संवादलेखन हा लेखन प्रकारातील एक कल्पक व मजेशीर प्रकार आहे. त्यामध्ये दोन व्यक्तींमधील किंवा दोन घटकांमधील संवादाची कल्पना करून संवाद लिहावे लागतात.

संवादलेखन करताना घ्यावयाची काळजी

१. संवाद नेमका कोणाकोणांत होत आहे हे स्पष्टपणे समजेल, असे संवाद असावेत.
२. संवादातील व्यक्तींचे वय, लिंग, व्यवसाय यांनुसार त्यांची भाषा असावी.
३. संवादातील वाक्ये बोलीभाषेप्रमाणे सोपी, सुटसुटीत असावीत.
४. संवादाला योग्य प्रकारचा समारोप असावा.
५. संवादातून योग्य तो संदेश / विचार वाचकांपर्यंत पोहोचावा.
६. संवाद हो – नाही स्वरूपाचे नसावेत, तसेच पात्रांचे संवाद पाल्हाळिकही नसावेत.
७. संवाद ओढून – ताणून केल्यासारखा नसावा, तसेच बोलणे मध्येच थांबवल्याची भावना नसावी.
८. विषयाशी संबंधित मुद्दे सोडून भरकटणारा संवाद नसावा.

सरावासाठी नमुने

१. झोका व झाड दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
उत्तर:
झोका : मित्रा! कसा आहेस? खरं तर, माझा सारा भार तुला पेलावा लागतो. त्याबद्दल मला माफ कर.
झाड : अरे मित्रा, त्यात काय एवढं? आपण इतरांना आनंद देतो हे खूप महत्त्वाचं! ‘आनंद देणं’ हेच खूप समाधान देऊन जातं बघ.
झोका : खरंय! हे तर मी तुझ्याकडूनच शिकलो आहे. तू तुझं संपूर्ण आयुष्य इतरांसाठीच जगतोस.
झाड : मलादेखील तुझ्यामुळे खूप आनंद मिळतो. तुला माझ्या फांदीवर टांगला जाण्यापूर्वी इथे जास्त कोणी फिरकतही नव्हतं. फक्त फळं लागली, की सर्वजण येत असत. आता मात्र तुझ्यामुळे दररोज हे बालगोपाळ, पोरीबाळी माझ्याभोवती गोळा होतात, फेर धरतात. त्याचा मला खूप आनंद वाटतो.
झोका : हो ना ! मलादेखील त्यांच्यासोबत मनसोक्त झुलताना खूप मजा वाटते.
झाड : त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंद अनुभवताना खूपच समाधान मिळतं.
झोका : त्या माहेरवाशिणी मुली माझ्यावर बसून झुलतात. सर्व दुःख विसरून मोकळेपणाने काही क्षणांपुरती का होईना, आपलं जीवन जगतात.
झाड : झुलता झुलता त्या किती छान गाणी गातात! अगदी ऐकत राहावसं वाटतं.
झोका : हो ना, त्या माझ्या साथीने वाऱ्यावर स्वार होतात आणि तुझ्या पानांच्या सळसळीसोबत ताल धरतात.
झाड : सण-समारंभांमुळे थोडासा विरंगुळा मिळतो त्यांना; आणि त्यांच्यामुळे आपल्यालाही आनंद मिळतो.
झोका : या कार्यात ‘निमित्त’ ठरल्याने मला माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं; पण हे केवळ तुझ्या साथीमुळे शक्य आहे.
झाड : इतरांना श्रेय देण्याचा तुझा हा गुण मला खूप भावतो. म्हणूनच, तुझा मित्र असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो.
झोका : धन्यवाद मित्रा! त्या बघ, मुली खेळायला आल्या.
झाड : हो, चल आपण आपापल्या कामाला लागू.

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

२. पेन व वही यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
उत्तर:
पेन : काय गं वहीताई, कशी आहेस?
वही : अरे मी खूप खुश आहे; कारण मला वापरणारी ही जी मुलगी आहे – ती माझी खूपच काळजी घेते.
पेन : वा, वा! म्हणजे कोणती आणि कशी काळजी घेते ती तुझी?
वही : ती माझी पाने दुमडत नाही, कधीच फाडत नाही. माझे एकही पान रिकामे ठेवत नाही. मला इथे-तिथे फेकत नाही.
पेन : आणि तिचं अक्षरही किती सुंदर आहे! मला हातात धरून तुझ्यावर अक्षरे लिहिताना ती मागच्या पानावर उमटू देत नाही. माझी शाई लागून तुझी पाने खराब होणार नाहीत याची काळजी घेते. त्यामुळे तू खूप नीटनेटकी आणि छान दिसतेस.
वही : हो तर, तुला वापरतानाही ती अशीच काळजी घेते. त्यामुळेच, तू तिला झरझर लिहिण्यास आणि सुंदर अक्षर काढण्यास मदत करतोस, हो ना?
पेन : हो, मला आवश्यकतेनुसारच वापरणारी, इतरत्र न फेकणारी, माझ्या मदतीने सुंदर हस्ताक्षर काढणारी मुले फार आवडतात; पण काही वेळा माझा चुकीचा वापर केला जातो. काही मुले पुस्तकातील चित्रांना रंगवणं, तुझ्या पानांवर उगाच जोराजोरात रेघोट्या मारणं अशी कामं करतात, ते मला आवडत नाही.
वही : हो, ते तर मलाही बिलकूल आवडत नाही; कारण आपण तयार होत असताना आपल्याला किती विविध प्रक्रियांमधून जावे लागते! कष्ट सहन करावे लागतात! माझ्यासाठी तर झाडांनाही कापावे लागते.
पेन : बापरे! याचा अर्थ तुझ्या एका – एका पानाचा गैरवापर करणं म्हणजे एका झाडालाच नष्ट केल्यासारखं असेल. मलाही धातू किंवा प्लॅस्टिकपासून बनवलं जाताना वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावं लागतं. तेव्हा कुठे मी तयार होऊन साऱ्यापर्यंत पोहोचतो.
वही : पूर्वी लोक भूर्जपत्रांवर, ताडपत्रांवर लिहायचे. तेव्हा तर तूही अस्तित्वात नव्हतास. त्यामुळे झाडाच्या काठीला टोक काढून बोरू बनवला जायचा. त्याला शाईत बुडवून लिहिले जायचे.
पेन : तेव्हा तर लेखनकाम किती कठीण असेल! एवढा सर्व उपद्व्याप करून कसे लिहीत असतील, तेव्हाचे लोक! आता आपल्यामुळे खरंच किती गोष्टी सहज, सोप्या झाल्या आहेत.
वही : हो, हे समजून घेऊनच माणसांनी आपला सदुपयोग करायला हवा आहे.
पेन : त्यांना स्वत:च्या भूतकाळाची आठवण झाली, डोक्यात प्रकाश पडला, तर करतील ते. तोपर्यंत वाट पाहू.
वही : हो, आता आपापल्या कामाला लागू. आज वर्गशिक्षिका बाई मला तपासणार आहेत. चला, बाय.
पेन : मलाही पेपर लिहायचाय. बाय. पुन्हा भेटूच.

३. शेतकरी आणि तुमच्यात संवाद घडला आहे, अशी कल्पना करून संवादलेखन करा.
उत्तरः
मी : नमस्कार दादा, कसे आहात? शिवार काय म्हणतंय ?
शेतकरी : आम्ही मजेत ! शिवार पण कालपर्यंत पिकांनी बहरलेलं होतं.
मी : काय झालं आज ?
शेतकरी : पाऊस कालपासून सतत पडतोय. त्यामुळे, त्यानं पीक मातीत मिळवलं नाही, म्हणजे झालं!
मी : अच्छा, कोणतं पीक घेताय यंदा ?
शेतकरी : यंदा शेतात भात, नाचणी, भाजीपाला घेतोय.
मी : वा, वा! शेत पिकांनी बहरून जावं, म्हणून पिकांची काळजी कशी घेता?
शेतकरी : योग्य प्रमाणात पाणी, सेंद्रिय खते आणि कीटकनाशकं वापरली, की पीक भरघोस येतं आणि पीक पिकताना पाखरांकडे, प्राण्यांकडे लक्ष दयावं लागतं. बुजगावणं कामी येतंच; पण काही वेळेस आपण स्वत: शेतात हजर राहून जातीनं लक्ष दयावं लागतं.
मी : मला शेतीच्या कामांविषयी अधिक माहिती सांगा ना. मला शेती कशी करतात, ते शिकून घ्यायचं आहे.
शेतकरी : प्रथम पाऊस पडायच्या आधी शेताची नांगरणी करतात, शेत ट्रॅक्टर किंवा बैलांच्या मदतीने नांगरले जाते, मग तण काढले जातात, ढेकळ फोडून जमीन सारखी केली जाते.
मी : हो, मग पाऊस पडण्याच्या वेळी पेरणी करतात. बी पेरलं, की मग त्याच्यापासून छोटी छोटी रोपं उगवतात. भाताची रोपं असतील, तर ती एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावली जातात, त्याला ‘लावणी’ म्हणतात.
शेतकरी : बरोबर, त्यासाठी गुडघाभर चिखलपाण्यात राबावं लागतं. पिकं पिकून तयार होईपर्यंत डोळ्यांत तेल घालून काळजी घ्यावी लागते. मग कापणी, मळणी, झोडपणी, उफणणी केली जाते.
मी : मळणीत बैलांच्या मदतीने पिकांतील दाणे वेगळे केले जातात, होय ना? पण, झोडपणी आणि उफणणी म्हणजे काय ?
शेतकरी : हो, झोडपणीत पिकांची धाटं जमिनीवर झोडपून दाणे वेगळे केले जातात, या दाण्यांतील केरकचरा बाजूला काढण्यासाठी उंचावर उभे राहून सुपातून दाणे. जमिनीवर टाकले जातात. याला ‘उफणणी’ म्हणतात. यामुळे, वाऱ्याच्या मदतीने हलका कचरा उडून जातो.
मी : फारच छान माहिती दिलीत, दादा. मी येऊ का शेतात मदत करायला?
शेतकरी : ये की, उदयापासून तुला शेत फिरवतो, शेती कशी करतात ते सांगतो.
मी : धन्यवाद दादा. चला, भेटू उदया.
शेतकरी : हो नक्कीच!

४. शीर्षकलेखन

उताऱ्याला शीर्षक देणे हे वरवर पाहता सोपे वाटते, तरीदेखील संपूर्ण उताऱ्याचा अर्थ समजल्याशिवाय नेमके शीर्षक देणे शक्य होत नाही. उताऱ्याला शीर्षक देण्यासाठी सर्वप्रथम दिलेला उतारा शांतपणे वाचून त्याचा मूळ विषय समजून घ्यावा लागतो. त्यानंतर त्यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत. त्यामुळे, कमीतकमी शब्दांत नेमके शीर्षक देण्याच्या दृष्टीने विचार करणे सोपे जाते. नेमके आणि आकर्षक शीर्षक वाचकाला तो उतारा वाचण्यास प्रवृत्त करते. त्याचबरोबर आशयाची कल्पना येते.

उताऱ्यावरून प्रश्न सोडवांगे

एखादा उतारा वाचून त्याखाली दिलेले प्रश्न सोडवता येण्यासाठी उताऱ्याचे योग्य आकलन होणे गरजेचे असते. आकलन म्हणजे दिलेला उतारा नीट वाचून त्यातील म्हणणे, विचार समजून घेणे. ते झाल्यावर दिलेले प्रश्न लक्षपूर्वक वाचून उताऱ्यात उत्तरे शोधावीत. उत्तरांचे मुद्दे अधोरेखित करावेत. नेमक्या शब्दांत उत्तरे लिहावीत. उताऱ्याचे आकलन व त्यावरून समर्पक उत्तरे शोधणे हे कौशल्याचे काम आहे. ते सरावाने सहज आत्मसात करता येते.

यावर्षी आपण उतारा वाचून शीर्षक देणे आणि उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे शिकणार आहोत.

सरावासाठी काही नमुने

१. खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.
प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडूवृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या ऊर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.

नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा. चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो.

असे सुखदुःखाचे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात; मात्र या संघर्षाला जो धिराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.
उत्तर:
शीर्षक: सकारात्मक मनाचे सामर्थ्य

२. दिलेला उतारा वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

i. आयुष्यात कोण यश मिळवतात ?
उत्तर:
ज्या व्यक्ती सुखदुःखाच्या संघर्षांना, अडीअडचणींच्या प्रसंगांना धिराने, खिलाडूवृत्तीने सामोरे जातात, ज्या जिंकण्याच्या तीव्र इच्छेने हाती घेतलेले काम स्वयंप्रेरणेने पूर्ण करतात, त्याच जीवनात यशस्वी होतात.

ii. आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे का आवश्यक असते?
उत्तर:
वाईट प्रसंगांमुळे आपण हताश झालो, मनाने हरलो, तर पुढचे कार्य पूर्ण करण्यासाठी आपण मनाने तयार नसतो, हे टाळण्यासाठी आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.

iii. स्वत:च्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
उत्तरः
स्वतःला नकारात्मक विचार करण्यापासून रोखणे व आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणे या दोन गोष्टी करून आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकतो.

iv. लेखकाच्या मते, चांगल्या सवयी कोणत्या आहेत?
उत्तर:
लेखकाच्या मते, सतत चांगले वाचन करणे, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत धरणे, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध जपणे ह्या चांगल्या सवयी आहेत.

निमित्ताने सकाळी १० ते १२ या वेळेत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, कलाकार श्री. अभिराम नाचणकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन | झाल्यावर त्यांनी आपल्या भाषणात वाचिक अभिनयाचे प्रात्यक्षिक दाखवून लोकांना मंत्रमुग्ध केले.

आपल्या जीवनात नाट्यकला कशी रुजत गेली हे सांगताना, त्यांनी माणसाच्या अंगी असणारे कलागुण माणसाला कसे समृद्ध करतात त्याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमण जोशी सरांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या परीने नाट्यउतारा जिवंत साकारला. उपस्थितांची मने जिंकली.

राज्यभरातून पाचशे शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. दिवसभर सुरू असणाऱ्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

i. कोण ते लिहा.
१. समारंभाचे उद्घाटनकर्ते पाहुणे –
२. समारंभात शाळेतर्फे उपस्थित माननीय व्यक्ती –
३. या स्पर्धेत प्रतिसाद देणारे-
उत्तर:
१. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, कलाकार श्री. अभिराम नाचणकर
२. मुख्याध्यापक श्री. रमण जोशी
३. राज्यभरातील स्पर्धक

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

ii. चौकटी पूर्ण करा.

१. या स्पर्धेत सहभागी शाळांची संख्या → □
२. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे नाव → □
३. स्पर्धेची तारीख → □
४. प्रमुख पाहुण्यांची ओळख → □
उत्तर:
१. पाचशे
२. कलामंच
३. २ ऑक्टोबर (गांधी जयंती)
४. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, कलाकार

iii. एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना कसे मंत्रमुग्ध केले?
उत्तर:
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात वाचिक अभिनयाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

२. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना कोणते मार्गदर्शन केले ?
उत्तर:
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना ‘माणसाच्या अंगी असणारे कलागुण माणसाला कसे समृद्ध करतात’ त्याविषयी मार्गदर्शन केले.

३. खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

दिनांक: १ जुलै
लोकसंपदा
‘युनिक ब्लड’ संस्थेच्या रक्तदान शिबिराला लोकांचा भरभरून प्रतिसाद!
राळेगाव, नाशिक: दि. ३० जून रोजी ‘युनिक ब्लड’ या संस्थेने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिरात सातशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्यांत तरुणवर्गाची लक्षणीय उपस्थिती दिसली.

या शिबिरात लोकांनी रक्तदान करण्यासाठी स्वत:हून पुढे यावे म्हणून कीर्ती महाविदयालयाच्या एनएसएस पथकाने ठिकठिकाणी ‘रक्तदान जीवनदान!’ हे पथनाट्य सादर केले.

राळेगावातील सन्माननीय व्यक्ती श्री. उपेंद्र ढाले-पाटील, मा. सरपंच यांनीही याप्रसंगी रक्तदान करून सर्वांना प्रेरित केले. लोकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ‘युनिक ब्लड’ संस्थेने प्रत्येक महिन्यात नाशिक जिल्ह्यातील एकेका गावात हे शिबीर आयोजित करणार असल्याचे सांगितले.

i. आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 2
उत्तर:
१. आयोजक – ‘युनिक ब्लड’ संस्था
२. ठिकाण – राळेगाव, नाशिक
३. तारीख – ३० जून
४. वेळ – सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत
५. उपस्थितांची संख्या – सातशेहून अधिक

ii. कोण ते लिहा.
१. रक्तदानात लक्षणीय सहभाग असणारा वर्ग –
२. पथनाट्य सादर करणारे महाविद्यालय व त्याचे पथक
३. राळेगावातील सन्माननीय सरपंच –
उत्तर:
१. तरुणवर्ग
२. कीर्ती महाविदयालय, एनएसएस विभाग
३. श्री. उपेंद्र ढाले-पाटील

iii. एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. एनएसएस पथकाने सादर केलेल्या पथनाट्याचे नाव काय?
उत्तर:
एनएसएस पथकाने सादर केलेल्या पथनाट्याचे नाव ‘रक्तदान जीवनदान !’ हे होते.

२. रक्तदान शिबिरासाठी लोकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ‘युनिक ब्लड’ संस्थेने कोणता निर्णय घेतला?
उत्तरः
लोकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ‘युनिक ब्लड’ संस्थेने प्रत्येक महिन्यात नाशिक जिल्ह्यातील एकेका गावात हे शिबीर आयोजित करणार असल्याचा निर्णय घेतला.

५. बातमी लेखन

बातमी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपल्याला वृत्तपत्रे, टि.व्ही, रेडिओ आणि इंटरनेटवरील विविध संकेतस्थळे यांमधून मिळत असतात. बातम्यांद्वारे आपल्याला घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि घडणाऱ्या अनेक विविध घटनांची तपशीलवार माहिती मिळते.

बातमी लेखनासाठी चौफेर वाचन, भाषेचे उत्तम ज्ञान, लेखनकौशल्य, व्याकरणाची जाण, सोपी व सुटसुटीत वाक्यरचना हे गुण आवश्यक असतात.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 9
यावर्षी आपण दिलेली बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत.

सरावासाठी काही नमुने

१. खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक : २० डिसेंबर

लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. दिनांक १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थीच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

i. कोण ते लिहा.

१. समारंभाचे प्रमुख पाहुणे –
२. समारंभाचे अध्यक्ष
३. चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे.
उत्तर:
१. प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे
२. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे
३. रसिक

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

ii. चौकटी पूर्ण करा.

१. शिबिरार्थींची संख्या → □
२. शिबिरार्थींना शिबिरात शिकवलेली कला → □
३. शिबिराचे ठिकाण → □
४. शिबीर सुरू झाले ती तारीख → □
उत्तर:
१. पंचवीस
२. चित्रकला
३. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्रौली, ता. भोर.
४. १० डिसेंबर

iii.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 6
उत्तर:
१. चित्रकला शिबीर
२. शिबिराचे ठिकाण
३. शिबिराची वेळ आणि दिनांक
४. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत
५. चित्रांचे प्रदर्शन

२. खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

दि. ३ ऑक्टोबर

लोकसेवा’
‘कलामंच’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेला उदंड प्रतिसाद!

राजापूर (ता. रत्नागिरी): राजापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने ‘कलामंच’ या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन केले होते. दिनांक २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळी १० ते १२ या वेळेत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, कलाकार श्री. अभिराम नाचणकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर त्यांनी आपल्या भाषणात वाचिक अभिनयाचे प्रात्यक्षिक दाखवून लोकांना मंत्रमुग्ध केले.

आपल्या जीवनात नाट्यकला कशी रुजत गेली हे सांगताना, त्यांनी माणसाच्या अंगी असणारे कलागुण माणसाला कसे समृद्ध करतात त्याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमण जोशी सरांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या परीने नाट्यउतारा जिवंत साकारला. उपस्थितांची मने जिंकली.

राज्यभरातून पाचशे शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. दिवसभर सुरू असणाऱ्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड
प्रतिसाद लाभला.

i. कोण ते लिहा.
१. समारंभाचे उद्घाटनकर्ते पाहुणे –
२. समारंभात शाळेतर्फे उपस्थित माननीय व्यक्ती –
३. या स्पर्धेत प्रतिसाद देणारे –
उत्तर:
१. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, कलाकार श्री. अभिराम नाचणकर
२. मुख्याध्यापक श्री. रमण जोशी
३. राज्यभरातील स्पर्धक

ii. चौकटी पूर्ण करा.
१. या स्पर्धेत सहभागी शाळांची संख्या → □
२. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे नाव → □
३. स्पर्धेची तारीख → □
४. प्रमुख पाहुण्यांची ओळख → □
उत्तर:
१. पाचशे
२. कलामंच
३. २ ऑक्टोबर (गांधी जयंती)
४. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, कलाकार

iii. एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना कसे मंत्रमुग्ध केले?
उत्तर:
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात वाचिक अभिनयाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

२. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना कोणते मार्गदर्शन केले?
उत्तर:
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना ‘माणसाच्या अंगी असणारे कलागुण माणसाला कसे समृद्ध करतात’ त्याविषयी मार्गदर्शन केले.

३. खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
दिनांक: १ जुलै
लोकसंपदा
‘युनिक ब्लड’ संस्थेच्या रक्तदान शिबिराला लोकांचा भरभरून प्रतिसाद!

राळेगाव, नाशिक: दि. ३० जून रोजी ‘युनिक ब्लड’ या संस्थेने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. सकाळी १० ते रात्री १० या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिरात सातशेहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्यांत तरुणवर्गाची लक्षणीय उपस्थिती दिसली.

या शिबिरात लोकांनी रक्तदान करण्यासाठी स्वत:हून पुढे यावे म्हणून कीर्ती महाविदयालयाच्या एनएसएस पथकाने ठिकठिकाणी ‘रक्तदान जीवनदान!’ हे पथनाट्य सादर केले.

राळेगावातील सन्माननीय व्यक्ती श्री. उपेंद्र ढाले-पाटील, मा. सरपंच यांनीही याप्रसंगी रक्तदान करून सर्वांना प्रेरित केले. लोकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ‘युनिक ब्लड’ संस्थेने प्रत्येक महिन्यात नाशिक जिल्ह्यातील एकेका गावात हे शिबीर आयोजित करणार असल्याचे सांगितले.

i. आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 3
उत्तर:
१. आयोजक – ‘युनिक ब्लड’ संस्था
२. ठिकाण – राळेगाव, नाशिक
३. तारीख – ३० जून
४. वेळ – सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत
५. उपस्थितांची संख्या – सातशेहून अधिक

ii. कोण ते लिहा.

१. रक्तदानात लक्षणीय सहभाग असणारा वर्ग –
२. पथनाट्य सादर करणारे महाविदयालय व त्याचे पथक –
३. राळेगावातील सन्माननीय सरपंच –
उत्तर:
१. तरुणवर्ग
२. कीर्ती महाविद्यालय, एनएसएस विभाग
३. श्री. उपेंद्र ढाले-पाटील

iii. एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. एनएसएस पथकाने सादर केलेल्या पथनाट्याचे नाव काय?
उत्तर:
एनएसएस पथकाने सादर केलेल्या पथनाट्याचे नाव ‘रक्तदान जीवनदान!’ हे होते.

२. रक्तदान शिबिरासाठी लोकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ‘युनिक ब्लड’ संस्थेने कोणता निर्णय घेतला?
उत्तर:
लोकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ‘युनिक ब्लड’ संस्थेने प्रत्येक महिन्यात नाशिक जिल्ह्यातील एकेका गावात हे शिबीर आयोजित करणार असल्याचा निर्णय घेतला.

६. जाहिरात लेखन

वस्तू किंवा सेवांकडे ग्राहकांचे लक्ष वळवण्याची व त्यांची मागणी निर्माण करण्याची कला म्हणजे जाहिरात कला होय. काही जाहिराती या शासन व विविध समाजसेवी संस्था यांकडून समाजप्रबोधन व जनहित या हेतूने प्रसिद्ध केल्या जातात. ‘जाहिरात’ हा शब्द इंग्रजीत ‘Advertisement’ असा वापरला जातो. याचा अर्थ ‘जाहीर करणे’ असा होय. जाहिरात म्हणजे वस्तू आणि सेवा या चांगल्या कशा आहेत हे पटवून देणारे माध्यम असून उत्पादक आणि ग्राहक यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.

जाहिरात या घटकाच्या अभ्यासाचा मूळ हेतू

१. जाहिरात वाचून किंवा ऐकून त्यात नमूद केलेल्या उत्पादनाबाबत किंवा सेवेबाबत माहिती मिळवणे.
२. विक्रेता म्हणून इतर लोकांच्या मनात उत्पादनाबाबत कुतूहल व आकर्षण निर्माण करणे.
जाहिरातींचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या वाचनातून, श्रवणातून, निरीक्षणातून त्यांचे आकलन होणे हे आवश्यक कौशल्य आहे. त्यामुळे, त्याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

जाहिरातीचे घटक

१. मथळाः मथळ्याने जाहिरात लक्ष वेधून घेते. त्यामुळे, सुभाषित, उखाणा किंवा संतवचन अथवा काव्यपंक्ती यांच्या उपयोजनातून आकर्षित मथळा लिहिला जातो.
२. उपमथळा: मथळा संपूर्ण माहिती देत नाही. त्यामुळे, उपमथळ्यात माहितीचे स्पष्टीकरण दयायचे असते.
३. तपशील : ज्या उत्पादनाची / सेवेची जाहिरात करायची आहे त्याचे तपशील सविस्तररित्या मांडले जाते.
४. कंपनीची मुद्रा: जाहिरातीची विश्वासार्हता वाढावी यासाठी संबंधित कंपनीची मुद्रा जाहिरातीत समाविष्ट असणे आवश्यक असते.
५. कंपनीचे नाव व पत्ता: ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित कंपनीचे नाव व कार्यालयीन पत्ता जाहिरातीत दिला जातो.
६. बोधचिन्ह: बोधचिन्ह हे उत्पादन / सेवा आणि संबंधित कंपनी यांच्या प्रतिमेशी निगडित असते. त्यामुळे, बोधचिन्हाचा जाहिरातीत आवर्जून समावेश असतो.

यावर्षी आपण दिलेली जाहिरात वाचून, निरीक्षण करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत.

सरावासाठी काही नमुने

१. खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 4

i. उत्तरे लिहा.

१. जाहिरातीचा विषय
उत्तर:
डिजिटल शाळेतील प्रवेशनोंदणी

२. जाहिरात देणारे (जाहिरातदार)
उत्तर:
शाळा व्यवस्थापन समिती, पिसगाव.

३. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक
उत्तर:
विदयार्थी योजना

४. जाहिरात कोणासाठी आहे?
उत्तरः
इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी

ii. वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यांत कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
उत्तर:
वरील जाहिरातीमध्ये शाळेची वैशिष्ट्ये व विदयार्थी योजना आकर्षक चिन्हे (बुलेट्स) वापरून दाखवल्यास ते उठावदार वाटेल. ‘तंत्रज्ञानाची कास धरत, घडवूया उदयाचा भारत’ असे वाक्य शाळेच्या नावाखाली टाकता येईल. याशिवाय, शाळेचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक अथवा वेबसा नमूद केल्यास संपर्काकरिता योग्य माहिती उपलब्ध होईल. जाहिरातीत शाळेच्या बोधचिन्हाचाही वापर करता येईल.

iii.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 7
उत्तर:
१. डिजिटल शाळेचे चित्र
२. शाळेची मुद्देसूद वैशिष्ट्ये
३. आकर्षक विदयार्थी योजना
४. १००% गुणवत्तेची हमी

२. खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 5

i. उत्तरे लिहा.

१. जाहिरातीचा विषय –
उत्तर:
लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस, विविध पोशाख भाडेतत्त्वावर मिळणारे खारमधील दुकान

२. जाहिरात देणारे जाहिरातदार
उत्तर:
नारायण कवी (दुकानदार)

३. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक-
उत्तर:
पाचपेक्षा अधिक पोशाखांवर २०% ची सूट.

४. जाहिरात कोणासाठी आहे?
उत्तर:
लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस, विविध पोशाख हवे असणारे

ii. आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 6
उत्तर:
१. उत्तम दर्जा
२. वाजवी दर
३. फॅन्सी ड्रेस पोशाखावर इतर साधनसामग्री उपलब्ध
४. सर्व मापांचे फॅन्सी ड्रेस, पोशाख उपलब्ध
५. घरपोच सुविधा उपलब्ध (वेगळे पैसे लागतील.)
६. ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध

iii. या जाहिरातीला कोणत्या गोष्टींमुळे आकर्षक रूप प्राप्त झाले आहे?
उत्तर:
या जाहिरातीत दुकानाच्या नावाच्या खाली वाचकांचे लक्ष वेधून घेणारा मथळा लिहिला आहे. नेमक्या शब्दांत दुकानाची वैशिष्ट्ये टिपली आहेत. वाचकांना आकर्षित करेल, अशी सूट विशिष्ट पद्धतीने देण्यात आली आहे. दुकानाशी संबंधित स्थळ, संपर्क या गोष्टीही तिथे लिहिल्या गेल्या आहेत. या सर्व कारणांमुळे जाहिरात आकर्षक झाली आहे.

३. खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 7
आमची वैशिष्ट्येः

  • डिजिटल वाचनालय – संगणकीकृत व्यवस्था
  • विविध विषयांवरील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथसंपदा, संदर्भसाहित्य इतर पुस्तके उपलब्ध
  • प्रशस्त व हवेशीर अभ्यासिका विनामूल्य उपलब्ध
  • स्कॅनिंग आणि फोटोकॉपीची सोय वाजवी दरात उपलब्ध
  • वार्षिक सदस्यत्व नोंदणीसाठी काही खास सवलती
  • वाचकस्नेही सोयीसुविधांनी सुसज्ज
  • ग्रंथालयशास्त्राची पदवी किंवा डिप्लोमा केलेला प्रशिक्षित कर्मचारीवर्ग
  • दरमहा एका प्रसिद्ध वक्त्याच्या अभ्यासकाच्या किंवा तज्ज्ञ व्यक्तीच्या व्याख्यानांची मेजवानी

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना) 8

स्थळ : ज्ञानेश्वरी वाचनालय, तळमजला, नवरथ सोसायटी, नवापूर रोड, पालघर xxxxxx
संपर्क क्र: xxxxxxxxxx / xxxxxxxxxxx
इ-मेल: [email protected]

i. उत्तरे लिहा.

१. जाहिरातीचा विषय
उत्तर:
ही जाहिरात ज्ञानेश्वरी वाचनालयाविषयी आहे.

२. वाचनालयात उपलब्ध असणारे साहित्य
उत्तरः
वाचनालयात विविध विषयांवरील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथसंपदा, संदर्भसाहित्य इतर पुस्तके उपलब्ध आहेत.

३. वाचकांना मिळणारी विशेष विनामूल्य सुविधा
उत्तरः
वाचकांना विशेषरूपाने प्रशस्त व हवेशीर अभ्यासिकेची सुविधा विनामूल्य मिळणार आहे.

४. हे वाचनालय अदययावत तंत्रज्ञानाने युक्त आहे का? कशावरून?
उत्तर:
हो, कारण या ज्ञानेश्वरी वाचनालयाची सर्व व्यवस्था संगणकीकृत आहे. हे डिजिटल वाचनालय आहे. तसेच ते वाचकस्नेही अशा स्कॅनिंग, फोटोकॉपी इत्यादी सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

५. दर महिन्याला वाचकांना आकर्षित करण्यासाठी कोणता उपक्रम वाचनालय राबवत आहे?
उत्तरः
वाचकांना आकर्षित करण्यासाठी वाचनालय एका प्रसिद्ध वक्त्याच्या, अभ्यासकाच्या किंवा तज्ज्ञ व्यक्तीच्या व्याख्यानांची मेजवानी देणार आहे.

ii. चौकटी पूर्ण करा.

१. वाचकांना वाजवी दरात उपलब्ध असणाऱ्या सोयी → □
२. वाचनालयातील कर्मचारी वर्गाची शैक्षणिक पात्रता → □
३. वाचनालयाचे ठिकाण (जिल्हा) → □
उत्तर:
१. स्कॅनिंग, फोटोकॉपी
२. ग्रंथालय शास्त्राची पदवी किंवा डिप्लोमा
३. पालघर

iii. वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यांत कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
उत्तर:
अ. वार्षिक सदस्यत्व नोंदणीचा मुद्दा आकर्षक स्वरूपात देणे योग्य ठरेल.
ब. नावनोंदणीकरिता वाचकांना मासिक, अर्धवार्षिक फी संबंधीही माहिती देणे आवश्यक राहील.
क. शालेय, महाविदयालयीन विदयार्थ्यांसाठी विशेष सोयींची किंवा आकर्षक सवलतीची नोंद केल्यास जाहिरात अधिक आकर्षक होईल.
ड. वाचकांना ऑनलाईन पुस्तकखरेदी व ऑनलाईन पेमेंटचा पर्याय सुचवता येईल.

७. सूचनाफलक

सूचनेच्या माध्यमातून एखादया गोष्टीची माहिती समोरच्या व्यक्तिपर्यंत पोहोचवता येते. मानवाला आपला दैनंदिन व्यवहार करताना विविध प्रकारच्या सूचना दयाव्या लागतात. इतरांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे वाचन करून त्यांचा अर्थ समजून घेणे आवश्यक असते. त्या सूचनेनुसार कृती घडून येणे गरजेचे असते. त्याकरिता त्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. याचबरोबर इतरांना समर्पक शब्दांत सूचना देता येण्याकरिता सूचनाफलक तयार करण्याचे कौशल्य आपल्याला अभ्यासायचे आहे.

लक्षात ठेवा

१. सूचकरिता कमीतकमी शब्दांचा वापर करावा.
२. सूचना स्पष्ट शब्दांत, नेमकेपणाने व विषयाला अनुरूप असावी.
३. सूचनेचा अर्थ चटकन समजेल अशा प्रकारच्या शब्दांचा वापर सूचना देताना करावा.
४. सूचना लिहिताना शुद्धलेखनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.

सूचनाफलकाचे विषय

सूचनाफलक तयार करण्याकरिता शाळेतील सुट्टीविषयीची सूचना, दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सूचना असे विषय विचारात घेता येतात व त्यानुसार सूचनाफलक तयार करता येतात.
यावर्षी आपण विविध विषयांवरील सूचनाफलक तयार करणे शिकूया.

सरावासाठी नमुने

१. तुमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
उत्तर:

दि. २५ नोव्हेंबर

• सूचनाफलक •
शारदा विदयामंदिर, पिंपरी
आयोजित
विज्ञान प्रदर्शन: २०२१

शारदा विदयामंदिर, पिंपरीतर्फे शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेतील अनेक विदयार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाद्वारे आपल्या बुद्धीची चुणूक दाखवत कल्पक प्रतिकृती सादर केल्या आहेत. तरी सर्व पालकांनी या विज्ञान प्रदर्शनास उपस्थित राहून विदयार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करावे, त्यांना प्रेरणा दयावी ही विनंती.

२. कोरोनाच्या काळात शाळेने शाळा बंद ठेवण्याची सूचना दिली आहे. यासाठी सूचनाफलक तयार करा.
उत्तर:

दि. ३० मार्च २०२०

• सूचनाफलक •

सध्या ‘कोरोना’ आजाराचा वाढता प्रसार रोखण्यांसाठी शासनाच्या आवाहनानुसार ज्ञानप्रशाला विदयालय (प्राथमिक व माध्यमिक विभाग) बंद ठेवण्याचा निर्णय शाळेचे प्राचार्य श्री. सुयश डांगे यांनी जाहीर केला आहे, याची सर्व पालक, शिक्षक, विदयार्थीवर्गाने नोंद घ्यावी.

शाळा चालू करण्याविषयीचे सर्व निर्णय शासनाच्या नियमांनुसार घेण्यात येतील. तोपर्यंत [email protected] या शाळेच्या संकेतस्थळावर आपण संपर्क साधू शकता. www.vidyaprashala.com येथे अभ्यासक्रम व इतर सर्व सूचना दिल्या जातील. आपण सर्वांनी घरी राहून, स्वत:ची व घरातल्यांची काळजी घ्यावी.

३. रस्त्याचे दुरुस्तीकाम सुरू असल्याने सर्व वाहनचालकांना वाहने सावकाश व रहदारीचे नियम पाळून चालवण्याचे आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
उत्तर:

दिः ९ सप्टेंबर २०२०

• वाहतूक नियंत्रण विभाग •

सर्व वाहन चालकांना असे सूचित करण्यात येते, की बोरिवली ते घोडबंदर रोड या मार्गाचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल (ट्रॅफिक जाम) वाहतूक नियंत्रण विभाग, मुंबईतर्फे आम्ही दिलगीर आहोत. सर्व वाहनचालकांना नम्र निवेदन आहे, कीं आपण आपापली वाहने सावकाश व रहदारीचे नियम न मोडता चालवावीत. आम्हांला वाहतूक नियंत्रण करण्यात सहकार्य करावे,

सूचनेवरून,

४. शाळेने सहलीऐवजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयीची सूचना देणारा सूचनाफलक लिहा.
उत्तर:

दि. १० नोव्हेंबर

• सूचनाफलक •

यंदाच्या वर्षी ‘सरस्वती विद्यामंदिर’ शाळेने काही तांत्रिक अडचणींमुळे सर्व वार्षिक सहली रद्द करून त्याऐवजी वार्षिक स्नेहसंमेलने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या सर्व इतर सूचना वेळोवेळी विदयार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी.

८. निबंध लेखन

आपल्या भावना, कल्पना आणि सर्जनशीलता यांचा आविष्कार शब्दांकित करणे म्हणजेच ‘निबंधलेखन’ होय. स्वविचार प्रकट करण्याची ही क्षमता / कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंधलेखनाचा सराव होणे अत्यंत आवश्यक असते. यात विचारांची विषयानुरूप, मुद्देसूद मांडणी केली जाते. हा लेखन प्रकार तुमची मराठी भाषेची परीक्षा घेणारा असतो. तुमचे मराठी भाषेचे ज्ञान, सभोवताली घडणाऱ्या घटनांची जाण, तुमचे आकलन, तुमची भाषा, तुमचा इतर अभ्यास, तुमचे विचार मांडण्याचे कसब या सगळ्या गोष्टींची चाचपणी या लेखनातून केली जाते.

तुमच्या भाषासौंदर्याची, लेखनकौशल्याची येथे कसोटी लागते. लेखनसौंदर्य ही लेखनाची एक बाजू; पण लेखनात सोपी, सरळ, सहज भाषा वापरूनही आपण अतिशय सुंदर लेखन करू शकतो. सुंदर व सुवाच्य हस्ताक्षर, नीटनेटकेपणा, शुद्धलेखन, तसेच नवीन मुद्दयाची सुरुवात नवीन परिच्छेदाने करणे अशा गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे लेखन उत्कृष्ट होईल यात शंका नाही.

निबंधलेखन करताना घ्यावयाची काळजी

१. दिलेल्या विषयांपैकी तुम्ही कोणत्या विषयावर लिहू शकता, याचा प्रथम विचार करा.
२. ज्या विषयाची जास्त, तसेच योग्य माहिती आहे त्याचा विचार करूनच विषय निवडा.
३. त्या विषयावर आधारित काही महत्त्वाच्या ओळी, एखादी जुनी बातमी, सुविचार, संबंधित व्यक्ती या गोष्टींचाही विचार करा.
४. शुद्धलेखनाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.
५. तुमचा प्रत्येक मुद्दा लेखनाच्या विषयाला धरून असेल याकडे लक्ष असू दया.
६. आपल्या लेखनातून नवा विचार देण्याचा प्रयत्न करा.

लेखनाची सुरुवातः

लेखनाची’ सुरुवात आकर्षक असावी. सुरुवात त्या विषयाची व्याख्या देऊन, एखादया कवीच्या कवितेच्या ओळी देऊन, एखादा प्रसंग सांगून, एखादी वर्तमानपत्रातील बातमी सांगून, एखादी म्हण किंवा वाक्प्रचार सांगून, एखादा संवाद थोडक्यात देऊन किंवा एखादी गोष्ट सांगून करता येईल.

लेखनाचा मध्यभाग :
लेखनाच्या मध्यभागात विषयाचा मूळ विचार स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. उगाचच अनावश्यक बाबी लिहीत बसणे गरजेचे नाही. तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा येणार नाहीत याचे भान ठेवावे.

लेखनाचा शेवट:
लेखनाची सुरुवात जितकी महत्त्वाची व आकर्षक, तितकाच शेवटही परिणामकारक असावा. आपण संपूर्ण लेखनात मांडलेले विचार, आपले म्हणणे वाचकाला विचार करायला लावणारे असावे. ते विचार अत्यंत स्पष्टपणे मांडण्याचे कसब आपल्याकडे असायला हवे.
यावर्षी आपण वर्णनात्मक निबंध, आत्मकथन, कल्पनाप्रधान निबंध शिकणार आहोत.

१. वर्णनात्मक निबंध

यामध्ये आपल्याला आवडलेल्या घटकाचे ठिकाणाचे, पुस्तकाचे, शाळेचे, घराचे, प्राण्याचे वर्णन करायचे असते किंवा दिलेल्या विषयावर वर्णनपर सविस्तरपणे माहिती लिहायची असते. ही माहिती आकर्षक शब्दांत खुलवायची असते.

लक्षात ठेवा.

१. वर्णनात्मक निबंध लिहिताना दिलेल्या घटकांचे, विषयाचे सुसंगतपणे वर्णन करणे आवश्यक आहे.
२. प्रभावी व ओघवत्या भाषेचा वापर करावा.
३. भाषा खूप आलंकारिक असू नये. साधीसोपी तरीही आकर्षक भाषा वापरावी.

सरावासाठी काही नमुने

१. ‘माझी आवडती कला’ या विषयावर दहा ओळींत माहिती लिहा.
उत्तरः
माझी आवडती कला
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये रस असतोच. मलाही कागदांच्या विश्वात म्हणजेच हस्तकलेत रमायला आवडते. ‘ओरिगामी’ ही कला मी अगदी लहान असल्यापासून मला आनंद देत आली आहे. विविधरंगी कागदांना कुठेही न फाडता केवळ घड्या घालून विविध वस्तूंचे, प्राण्यांचे आकार तयार करण्याची कला म्हणजेच ओरिगामी होय.

मूळची जपानी असलेली ही कला प्राचीन काळापासून जपली गेली आहे. तिचे मूळ कपडेलत्ते विविध पद्धतीने घडी करण्यात दडलेले आहे. या कलेशी माझी ओळख करून दिली ती शिशुवर्गातील आमच्या हस्तकलेच्या बाईंनी. होडीपासून सुरू झालेला माझा हा कलाप्रवास विविधरंगी, विविधढंगी फुले, पक्षी इतर शोभेच्या वस्तू बनवण्यापर्यंत कधी गेला ते कळलेच नाही.

मी ओरिगामीतील नवनवीन प्रकार शिकून इतरांना शिकवायला लागले. इच्छुकांना माझ्या दिव्यांग, अंध मित्र- मैत्रिणींनाही ही कला मी मोफत शिकवते. त्यातून मला खूप आनंद व समाधान मिळते. भविष्यात या कलेलाच व्यावसायिक रूप देण्याचा माझा विचार आहे. त्यासाठी मी योग्य ते प्रशिक्षण घेत आहे.

ही कला मला फार जवळची वाटते. माझ्या आजूबाजूचे सारे प्राणिविश्व मी या कलेतून निर्माण करू शकते. या दुनियेत मी अगदी स्वत:ला हरवून बसते. प्रशिक्षणातून शिकलेल्या अनेक आकृत्या मी तयार करतेच. याशिवाय, आजूबाजूच्या विविध वस्तूंचे निरीक्षण करून त्यांची कागदी रचना करण्याचा प्रयत्न करते. विविध रंगांच्या कागदांचे, नानाविध आकाराचे हे विश्व माझ्या मनाला फारच भुरळ पाडते.

ही कला मला आनंद तर देतेच शिवाय माझे मन गुंतवून मला एकाग्र होण्यासही मदत करते. नव्या आकृत्या तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या घड्या किती नीटनेटक्या पद्धतीने कराव्यात, या विचारात मन सतत दंग राहते. ‘यामुळे, अभ्यास करतानाही एकाग्र होणे मला सोपे जाते.

मनाला आनंद, सुख, एकाग्रतेची शक्ती प्रदान करणारी ही कला मला फार आवडते.

२. ‘शब्दांचे सामर्थ्य’ या विषयावर निबंधलेखन करा.
उत्तर:
शब्दांचे सामर्थ्य
‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी!’
खरंच, शब्दांत किती सामर्थ्य दडलेले आहे, नाही! शब्द कधी हसवू शकतात, कधी रडवू शकतात. कधी आनंद, कधी दुःख, कधी माया तर कधी दया दर्शवणारे हे शब्द आपल्याला जीवनाचे दर्शन घडवतात. ‘आई’ या दोन अक्षरांच्या शब्दांत किती माया साठलेली आहे!

एखादया उजाड माळरानावर जणू एखादं सुंदर रानफूल दिसावं, त्याप्रमाणे एखादया नकारात्मक परिस्थितीत दोन मायेचे शब्द मनाला उभारी देतात. या प्रेमळ सकारात्मक शब्दांमुळे एखादयाचा जीव वाचू शकतो, एखादयाची चिंता, काळजी मिटते. एखादयाला जीवनाची दिशा सापडते. एखादयाला नवीन सुरुवात करण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन मिळते.

परंतु, हेच शब्द जर शस्त्र बनले तर? तर ते विध्वंस घडवून आणू शकतात. विखारी शब्दांमुळे युद्धे छेडली जाऊ शकतात. भांडणतंटे विकोपाला जाऊ शकतात. शब्दांचा अनाठायी, अयोग्य वापर केल्यामुळे माणसाचा मानसन्मान पणाला लागू शकतो. गैरसमज वाढून चुकीच्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे, शब्द अगदी जपून, काळजीपूर्वक वापरायला हवेत.

काही वेळा या शब्दरूपी शस्त्रांच्या धारेने समाजात क्रांतीही घडून येते. जसे, की लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? या अग्रलेखामुळे इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते. भारतीय लोकांमधील अस्मिता जागृत झाली होती. या धारदार शब्दांमुळे संतांनी समाजाचे प्रबोधन घडवून आणले होते. अंधश्रद्धा, अज्ञान, खोटी भक्ती, दांभिकता या वाईट गोष्टींवर त्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. लोकांची कानउघडणी केली होती. म्हणजेच, शब्दांचा वापर आपण जसा करू तसे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे
‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’
म्हणूनच, शब्दांचा वापर आपण जाणीवपूर्वक करायला

हवा. ज्यातून सकारात्मक चांगल्या कार्याची सुरुवात होईल.

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

३. ‘माझा आवडता ऋतू’ या विषयावर निबंधलेखन करा.
उत्तर:
माझा आवडता ऋतूः श्रावण

‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे।।’

खरंच, बालकवींनी श्रावण महिन्याचे किती सुरेख वर्णन केले आहे बरे! हा श्रावण ऋतूच विलोभनीय, सुंदर आहे, म्हणून मला तो फार फार आवडतो.

श्रावणात सारी सृष्टी निसर्गसौंदर्याने बहरलेली असते. जिकडे पाहावे तिकडे – ‘हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे।’ असे रम्य दृश्य असते. पावसाच्या रिमझिम धारांमध्ये झाडेवेली अगदी चिंब भिजून गेलेली असतात. सर्वत्र अतिशय प्रसन्न वातावरण असते. आभाळात ऊन-सावलीचा लपंडाव सुरू असतो. त्यांच्या या खेळात ढगांआडून मध्येच सुंदरशी इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान डोकावते आणि आभाळाचे रूप खुलते.

श्रावणात डोंगरदऱ्या हिरवाईने नटतात. कडेकपाऱ्यांतून वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात. नदयानाले अगदी दुथडी भरून वाहत असतात. माळरानावर रंगीबेरंगी रानफुलांची चादर पसरलेली असते. मोगरा, चाफा, प्राजक्त अशा विविध सुवासिक फुलांचा मंदमंद गंध घेऊन वाऱ्याची झुळूक बागडत असते. पशुपक्षी आनंदाने इकडेतिकडे मुक्त संचार करत असतात.

या अनोख्या श्रावणरंगांत निसर्गासह आपणही रंगून गेलेलो असतो. या काळात विविध सण, उत्सवांची रेलचेलच असते. त्यानिमित्ताने विविध गोडाधोडाचे पदार्थ, नवे कपडे असा आपला थाट असतो. श्रावणी सोमवारी शिवाची पूजा केली जाते, तर मंगळागौरीच्या निमित्ताने नवविवाहित स्त्रिया, पोरीबाळी, आयाबाया मनसोक्त गाणी गातात, खेळ खेळतात. नागपंचमीच्या सणाला स्त्रिया नागपूजा करतात. त्यानंतर नारळीपौर्णिमेदिवशी सागराची पूजा केली जाते. याच दिवशी रक्षाबंधन असते. त्यानिमित्ताने भावाबहिणींची गाठभेठ होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून कौटुंबिक मायेचे खास क्षण अनुभवता येतात.

मग गोकुळाष्टमीचे वेध लागतात. यादिवशी दहीकाल्याची हंडी फोडण्याची आणि पांढरेशुभ्र, ताजे लोणी खाण्याची मजाच काही और असते. बैलपोळ्याला शेतकरी शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांचे लाड पुरवतात, त्यांना नटवतात.

असा हा सणासमारंभांचा, मनमोहक सृष्टिसौंदर्याचा, कोडकौतुकाचा, चांगलंचुंगलं खाण्यापिण्याचा श्रावण माझ्या खूप आवडीचा आहे.

२. आत्मकथनात्मक निबंध

एखादी सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच स्वतःच्या आयुष्यातील गोष्टींचे, आपल्या सुख-दुःखांचे कथन करत आहे, अशी कल्पना करून केलेले लेखन म्हणजे आत्मकथनपर लेखन होय. अशा प्रकारच्या लेखनाला मनोगत, आत्मनिवेदन, आत्मवृत्त, कैफियत असे निरनिराळे शब्दही वापरले जातात.

प्राणी, पक्षी, व्यक्ती, वृक्ष तसेच टेबल, खुर्ची, टि.व्ही. अशा विविध सजीव-निर्जीव गोष्टींचे मनोगत लिहिताना त्यांचे आयुष्य तपशीलवार लिहिणे गरजेचे नसते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे, ठळक प्रसंग, त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, व्यथा यांचा उल्लेख आवश्यक असतो. ते मांडताना त्यांचे उपेक्षित जगणे, जगण्यातील विसंगती स्पष्ट करावी. आलेले चांगले-वाईट असे दोन्ही अनुभव मांडावेत. त्यांच्या इच्छा, अपेक्षांचा उल्लेख करावा. निवेदक म्हणून आपणच त्यांचे विचार मांडत असतो; त्यामुळे भाषा नेहमीच्या व्यवहारातील वापरावी. आपल्या लेखनातून निवेदकाच्या भावभावनांशी एकरूप होण्यास वाचकाला भाग पाडावयास हवे.

लक्षात ठेवा.

१. आत्मकथन करताना सजीव व निर्जीव घटकांचा सर्वसमावेशक विचार करावा.
२. आपल्या निरीक्षणशक्तीने त्यांच्या भावना, सुख-दु:खे, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध घ्यावा.
३. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करावी.
४. कल्पनाशक्तीच्या आधारे नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडावी.
५. संपूर्ण लेखन करताना प्रथमपुरुषी एकवचनी भाषेचा उपयोग करावा.

सरावासाठी काही नमुने

१. ‘गोधडीचे आत्मकथन’ या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा.
उत्तरः

‘गोधडीचे आत्मकथन’

“काय रे सुशांत, आलास ? झोप आली वाटतं? तुम्ही सर्व भावंडं माझ्याजवळ आलात, की कसं बरं वाटतं! तुमच्या किलबिलाटाने, दंगामस्तीने मी आनंदून जाते. नाहीतर दिवसभर मी आपली त्या कोनाड्यात पडलेली असते. रात्री झोपताना तुम्ही मला पांघरून झोपता, तेव्हा मला खूप बरं वाटतं. तुम्ही अंथरुणात नाचता, माझ्यावर खेळता, उठता-बसता, तेव्हा माझ्या मनात माया दाटून येते.

खरं तर, मला तुमचा सहवास खूप आवडतो. माझा जन्म तुम्हांला मायेची ऊब देण्यासाठी झाला आहे. माझी जन्मकहाणी ऐकशील, तर तुला गंमत वाटेल. मला तुमच्या आजीने फार प्रेमाने शिवलं होतं. तू जन्मलास तेव्हा तुझ्या आजीने तिची मऊ सुती साडी, आजोबांचं मऊ धोतर शिवून गोधडी तयार केली. त्यावर बाहेरच्या बाजूने पांढरंशुभ्र मलमलचं मऊशार कापड शिवून घेतलं. त्यावर एका बाजूला फुलं व फुलपाखरांची नक्षी, तर दुसऱ्या बाजूला चेंडूसोबत खेळणाऱ्या हत्तीचं देखणं पॅचवर्क केलं होतं. ते इतकं सुरेख होतं, की बघणारा प्रत्येकजण माझ्याकडे आकर्षित होई. एवढेच नव्हे, तर मी स्वत:देखील स्वत:च्याच प्रेमात पडले होते. तुला तर माझ्याशिवाय झोपच लागत नसे. तुझ्यासोबत तुझ्या भावंडांचंही बालपण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, त्यांच्यावरही माया केली. त्यांनाही शांत झोप लागावी, म्हणून मी माझ्या मऊशार हातांनी त्यांना कुरवाळलं.

पण, आता तुम्ही सर्व मोठे झालात. मीही जराशी जुनी झाले. तुम्ही माझा वापर कमी केला आहे. आता मला पूर्वीसारखे स्थान राहिले नाही. पूर्वी मला जवळ घेतलंस, की तुला स्वर्गसुखाची झोप लागायची. मग आता काय बरं झालं ?

मला माहीत आहे, की मी जरा विरले आहे. माझं कापड काही ठिकाणी थोडं थोडं फाटलं आहे; पण त्या ठिकाणी सुंदर नक्षीकाम केलेस, तर मी अजूनही तेवढीच देखणी दिसेन. तुम्हांला पुन्हा एकदा मायेची ऊब देण्यासाठी सज्ज होईन. आजारपणात तुमची सोबत करेन. काय रे, करशील ना एवढं?”

२. महापूरग्रस्त शेतकऱ्याचे आत्मकथन लिहा.
उत्तर:

मी महापूरग्रस्त शेतकरी बोलत आहे…

“काय मंडळी ? कसं काय चाललंय ? भिवा शेतकऱ्याचा रामराम तुम्हांला! यंदा पावसानं कहरच केलाय बगा ! ढगफुटीच झाली म्हणायची! समदं सोलापूर पाण्यात वाहवलं. यंदाला पाच एकरात ऊस लावला होता. कोपऱ्यातल्या तुकड्यावर थोडा भाजीपाला लावला होता. ध्यानीमनी नसतानाही असा चक्रीवादळाचा तडाखा बसला. पावसानं होतं नव्हतं ते सारं खेचून नेलं. अहो, माझी मुकी जनावरं खूप माया केली माझ्यावर त्यांनी – ती डोळ्यांदेखत पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. ते पाहताना जीव तीळतीळ तुटला. ऊसाचं पोटच्या पोरासारखं वाढवलेलं पीक डोळ्यांची पापणी लवते न् लवते तोच भुईसपाट झालं. हे सर्व पाहताना आभाळाच्या धारांत माझ्या डोळ्यांचा महापूर ओसंडून वाहून गेला.

एक नोकरी गेली, तर दुसरी मिळेल. छप्पर उडालं, तर निवारा बांधता येईल; पण अख्खं जीवनच ज्या शेतावर अवलंबून, ते बहरलेलं शेत नासलं, तर वर्षभर काय करायचं, हो आम्ही ? मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं, नवी नवरी घरी आली होती. पहिला दिवाळसण आणि लग्नाचा खर्च दोन्ही भागवायचं, असा विचार होता मनात. ऊस चांगलाच तरारला होता शेतात. म्हटलं, ऊस विकला, की खर्च भागवून थोडी घरातल्या मंडळींची हौस फिटवता येईल; पण काय, आता ट्रॅक्टरखाली संसार थाटून घरातलं पाणी ओसरायची वाट पाहतोय. चार-पाच दिवस उघड्यावर भिजण्यातच गेले.

आता पूर ओसरला, की पुढारी येतील. त्यांचे पाहणी, दौरे सुरू होतील. आश्वासनांवर आश्वासनं दिली जातील. पंचनामे होतील, घोषणा दिल्या जातील; पण खरी मदत मिळेल? या भूमिपुत्राला खरा आधार मिळेल का हो? आमच्या या उद्ध्वस्त झालेल्या वाड्या-वस्त्या नव्या जोमाने आम्ही पुन्हा उभारू; पण बांधावरच्या नासलेल्या पिकाचं काय? हे वर्ष कसं काढायचं? पोटापाण्याचं काय?

पुढाऱ्यांना एवढंच सांगणं आहे, की ‘बाबांनो, नको तुमचे खोटे दिलासे! नको तुमची ती वरवरची मदत! आम्हांला आमच्या जमिनी पूर्ववत करण्यात मदत करा. आमच्या डोक्यावर वाढणाऱ्या कर्जाचं ओझं कमी करा. एकाही महापूरग्रस्त शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेऊ नका. मदतकार्य करताना ती मदत आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल याची व्यवस्था करा. त्यात वेळकाढूपणा आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा.

यंदा वाहनं खरेदी नका करू, नका करू इलेक्शनमध्ये पैशांची वारेमाप उधळपट्टी! तो पैसा आमचं प्रामाणिकपणे पुनर्वसन करण्यात घालवा. जगाच्या पोशिंदयाला जगवलंत, तर तुम्हीही जगाल. नाहीतर आम्ही आत्महत्या करून किंवा कर्जाच्या ओझ्याने मरणार आहोतच; पण तुमची कुटुंबंही रस्त्यावर येतील.

आज आम्ही पिकवलेलं धान्य ज्यांच्या ज्यांच्या ताटात पडतंय, त्यांनाही हेच नम्र निवेदन आहे, की ताटात अन्न फेकू नका. छोट्या शेतकऱ्यांकडून वस्तू, धान्य विकत घेताना घासाघीस करू नका. सणासमारंभांत अन्न वाया जाऊ देऊ नका. भुकेल्या पोटांना जेऊ घाला. आशीर्वाद मिळतील.

आणि हो, आयुष्यात फार काही करायला नाही जमलं, तरी एकदा शेती करण्याचा अनुभव घ्याच! तेव्हाच कळेल, शेतात . रक्ताचं पाणी करणं काय असतं ते! चला, येतो मी! ”

३. ‘मी वनवासी बोलतोय…’ या विषयावर निबंधलेखन करा.
उत्तरः

मी वनवासी बोलतोय …

“नमस्कार मंडळी, कसे आहात? मी वनवासी बोलतोय. आम्ही जंगलात राहतो, म्हणून तुम्ही आम्हांला ‘वनवासी’ म्हणता. खरंय ते! डोंगर, कडे, माळरान इथेच आमची वस्ती असते. आम्ही निसर्गाच्या कुशीत राहतो. जंगलातील वन्यप्राणी, पक्षी, कीटक जणू आमचे सगेसोयरेच असतात. आम्ही त्यांच्या संगतीत आनंदाने निसर्गात नांदतो. नदीचं पाणी पितो. मीठभाकर खातो; पण आम्ही आमचे जीवन सुखासमाधानाने जगतो.

दिवसा सूर्यप्रकाशात जंगलात जाऊन मध गोळा करणे, वनातील औषधी गोळा करणे, दूर रानात जाऊन भाजीपाला खुडणे इत्यादी आमची रोजची कामे असतात. तुम्हां शहरात राहणाऱ्या लोकांना या कामांची ओळख नसल्याने ती तुम्हांला कष्टदायक वाटतात; पण आम्हांला तर अशा कामांची सवयच झाली आहे.

याशिवाय, आम्ही कधीकधी कंत्राटदाराकडे मोलमजुरी करतो; पण कमी पैशांत ते जास्त राबवून घेतात, त्यांचं काम होतं. कोळशाच्या खाणीत काम करणं, कोणाच्या शेतावर मजूर म्हणून राबणं, रस्तेबांधणी, इमारतबांधणी अशा कामांसाठी आम्हांला ‘वेठबिगार’ म्हणून घेतलं जातं. कधी योग्य तो मोबदला मिळतो. कधी आमचे मेहनतीचे पैसे मिळवण्यासाठी आम्हांला झगडावे लागते; पण आम्ही कष्ट करणे सोडत नाही.

कोणतीही आपत्ती / संकट आलं, तरी हरून जायचं नाही, असं निसर्गानंच आम्हांला शिकवलं आहे. त्यामुळे, जरी दुष्काळासारखी नैसर्गिक आपत्ती आली, जंगलात वणवा लागला, तरी आम्ही आमच्या पूर्वजांनी त्यांच्या अनुभवातून जे शहाणपण आम्हांला शिकवलं, त्यानुसार मार्ग काढतो. आम्ही निसर्गराजाची मुले आहोत, आमचे पालनपोषण निसर्गावर होते, म्हणून कृतज्ञतापूर्वक आम्ही निसर्गातील घटकांना पुजतो. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता, प्रदूषण न करता निसर्गातील साधनसंपत्तीचा वापर करतो.

जीवन कितीही कष्टदायी असू दे, ते नेहमी आनंदात, मनापासून जगलं पाहिजे. म्हणून, आम्ही समूहाने ढोलाच्या तालावर नाचतो, गातो, चित्र काढतो. पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढतो. खायला, प्यायला काही असो नसो; पण निसर्गराजा कधी कोणाला उपाशी ठेवत नाही. त्याच्यामुळेच आम्ही इतक्या उत्साहानं आमचं जीवन साजरं करतो. कमी गरजा, साधी राहणी आणि नैसर्गिक जीवनपद्धती यांमुळे आमचे जीवन तुमच्यापेक्षा सुकर होते.

अरे बापरे, बराच वेळ झाला, रानात जायचंय, कंदमुळे गोळा करायला येतो मी. ”

३. कल्पनाप्रधान निबंध

वास्तवात जे कधी घडत नाही, ते घडले तर काय होईल याची कल्पना करणे व शब्दांत मांडणे म्हणजे कल्पनाप्रधान लेखन होय. या लेखनप्रकारात कल्पनेला खूप वाव असतो; परंतु कल्पना रंगवताना तिला लेखनाचे स्वरूप दयावे लागते; मात्र हे लेखन करताना एवढेच पथ्य पाळावे लागते, की त्या कल्पना असंभवनीय, हास्यास्पद, नकारात्मक अशा नसाव्यात. कल्पना करताना वाहवत जाऊ नये. लेखनाचा विषय व मुट्ट्यांचे भान ठेवूनच लेखन करावे. आपल्या कल्पनेचा विस्तार करताना मुद्देसूदपणा व सुसंगती असणे आवश्यक आहे आणि लेखनाच्या शेवटी कल्पनेतून बाहेर येणे अधिक महत्त्वाचे आहे.

लक्षात ठेवा.

१. ‘कल्पना करता येणे, हा कल्पनाप्रधान लेखनकौशल्याचा मूळ हेतू आहे.
२. निबंधाच्या शीर्षकावरूनच त्यातील मुख्य कल्पना लक्षात यायला हवी.
३. एका कल्पनेतून दुसरी कल्पना अशी कल्पनांची साखळी गुंफत लेखन करणे येथे अपेक्षित आहे.
४. कल्पना ही वास्तवाशी संबंधित किंवा गमतीदार असावी.
१. विषयाला अनुसरून सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा.

सरावासाठी काही नमुने

१. ‘मी फुलपाखरू झालो / झाले तर….’ या विषयावर निबंधलेखन करा.
उत्तर:

मी फुलपाखरू झाले तर….

‘फुलाफुलांशी हासत खेळत
फिरती भवती पिंगा घालित
बघा दुरूनच त्यांची गंमत
दृश्य मनोहर खरे, फुलांवर उडती फुलपाखरे!’

किती सुंदर कविता आहे ना! ही कविता जेव्हा जेव्हा मी वाचते तेव्हा तेव्हा या फुलपाखरांचा मला हेवा वाटतो आणि मनात विचार येतो, मी फुलपाखरू झाले तर…..

किती मज्जा येईल ना! रांगोळीतले सारे रंग मी माझ्या पंखांवर घेऊन छान हवेत झेपावेन. माझे रंगीत पंख पसरून मी फुलांना हळुवार छेडेन. माझ्या आणि त्यांच्या रंगांची तुलना करून माझंच रूप मी मिरवेन.

मी फुलपाखरू झाले, तर मला छान बाग-बगिच्यांमध्ये, हिरवळीवर विहरता येईल. फुलांमागे दडत मुलांबरोबर लपाछपी खेळता येईल. लहानशी मुले मला स्पर्श करण्यासाठी संपूर्ण बागेत माझ्यामागे दुडुदुडु पळतील. मीही या फुलावरून त्या फुलावर उडत, बागडत त्यांना खेळवत राहीन. खेळता-खेळता भूक लागली, की एखादे छानसे फूल शोधून त्यातील मधुर रसाचा चट्टामट्टा करेन आणि भुर्रकन आकाशात उडेन; पण उडताना फुलांतील बिया पायांना चिकटतील, त्या घेऊनच उडेन. त्यामुळे, बीजप्रसार होऊन नवनवीन रोपे उगवतील. त्यांची झाडे होतील. फुलाफळांनी ती बहरतील. त्यामुळे, सृष्टी बहरून जाईल.

मी फुलपाखरू झाले तर मला कोठेही सहज जाता येईल. निसर्गाचा भरभरून आस्वाद घेता येईल. वेगवेगळी ठिकाणे फिरता येतील. मी नाचेन, बागडेन. अगदी मुक्तपणे गाईन ! मी फुलपाखरू झाले तर माझं आयुष्य लहान असेल; पण मला ते इतरांना आनंद देत, स्वत: ही आनंदाचा आस्वाद घेत जगता येईल. निरागस, भाबड्या लहानग्यांच्या गालांवर अलगद उमलणारं हसू हेच माझ्या जन्माचे सार्थक असेल.

Maharashtra Board Class 8 Marathi उपयोजित लेखन विभाग (रचना)

२. ‘मी अब्जोपती झालो तर… ‘ या विषयावर निबंधलेखन करा.
उत्तर:

मी अब्जोपती झालो तर …

एके सकाळी साखरझोपेत असताना मी पैशांच्या राशीत पडलो आहे, असे स्वप्न पडले. आजूबाजूला नोटाच नोटा ! त्या गोड स्वप्नातून जागे होताच मनात विचार आला ‘खरंच, मी अब्जोपती झालो तर…’

जर मी अब्जोपती झालो तर सर्वप्रथम मी देवाचे आभार मानेन; कारण त्याने मला ही सुंदर सुवर्णसंधी दिली. ज्यामुळे, मी समाजातील गरजू घटकांना सढळहस्ते मदत करू शकेन.

समाजातील ज्या घटकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा भागवणेही कठीण असते, अशा घटकांना मी आधार देईन. माझ्या परीने समाजातील वृद्ध, पीडित, अनाथ, विधवा, विदयार्थी अशा व्यक्तींना पाठबळ देईन. हे सर्व कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, कोणताही गाजावाजा न करता पार पाडण्याची माझी इच्छा यानिमित्ताने पूर्ण होईल.

शिवाय, माझ्या घरातल्या व्यक्तींना मला सुखात, आनंदात ठेवता येईल. माझ्या आई – वडिलांना माझ्यासाठी, कुटुंबासाठी रोज खस्ता खाव्या लागणार नाहीत. त्यांचे उपचार, औषधपाणी वेळेत करता येईल. त्यांची कामे पैशांवाचून अडून राहणार नाहीत. माझ्या भावंडांना उत्तम शिक्षणसंधीही मला उपलब्ध करून देता येईल. जेणेकरून ते शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील.

तसेच, मलाही या पैशांतून स्वयंरोजगार किंवा स्वत:चा व्यवसाय निर्माण करता येईल. ज्यामुळे परिसरातील गरजू लोकांना काम मिळेल. त्यांची घरेदारे सुखी राहतील. मला जे उत्पन्न मिळेल, त्यातून मी काही भाग स्वयंसेवी संस्थांना देत जाईन.

‘समर्थ असेल तोच जगेल’ या विचारापेक्षा असमर्थ असलेल्यांना समर्थ बनवून जगवण्यात खरे कर्तृत्व आहे, असे मला वाटते. म्हणून, मी जर अब्जोपती झालो तर मी मला मिळालेल्या सुवर्णसंधीचा सदुपयोग करून सकारात्मक काम करेन. सत्कार्य करेन. स्वतःचा स्वार्थ साधताना इतरांनाही मदत करेन, त्यांना आधार देईन; कारण ‘एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ!’

३. ‘घड्याळ नसते तर’ या विषयावर निबंधलेखन करा.
उत्तर:

घड्याळ नसते तर…

टिक्टिक्टिक्टिक् ! या आवाजावर संपूर्ण जग रोज धावत असते. तीन काट्यांच्या हा वेळ दाखवणाऱ्या घड्याळाने आपल्या जीवनाचा वेग किती बरे वाढवला आहे! रोज सकाळी उठणे असो, की रात्री निजणे असो! आपण घड्याळ्याच्या काट्यावर जगू लागलो आहोत. याचाच कधी कधी कंटाळा येतो आणि वाटते, हे घड्याळच नसते, तर किती बरे झाले असते!

घड्याळ नसते तर आपल्या धकाधकीच्या, रोजच्या धावपळीचा वेग खूप कमी झाला असता. रोजची सर्व कामे शांतपणे सूर्याच्या येण्याजाण्यानुसार पार पडली असती. रात्री गजर लावून झोपण्याची गरज नसती. कोंबड्याने बांग दिल्यावर किंवा आईच्या हाकेने जाग आली असती.

सूर्य डोक्यावर येताच शाळेला जायचे आणि सूर्य मावळतीला आला की, घरी यायचे असा आमचा दिनक्रम असता. गणितात घड्याळावरची गणिते शिकवली गेली नसती. तिन्हीसांज झाली, ते पाहून दिवेलागणीच्या वेळी प्रार्थना म्हणायला आम्ही स्वतःहून एकत्र जमलो असतो. रात्री रातकिड्यांच्या किरकिरण्यावरून आणि आकाशात चंद्राला पाहून झोपी गेलो असतो. पूर्वीचे लोक घड्याळाशिवाय जसे राहायचे, अगदी तसंच!

पण, घड्याळे नसती तर छान रंगीबेरंगी पट्ट्यांची, वेगवेगळ्या आकारांची छोटी घड्याळे आम्हांला मनगटावर लावता आली नसती. परीक्षेचा पेपर सोडवताना वेळ न कळल्यामुळे पेपर अर्धवट राहिला असता किंवा पेपर लिहिण्यासाठी वेळेची मर्यादाच नसती. सध्या टिव्हीवरच्या मिनिटामिनिटाला येणाऱ्या बातम्यांचा ओघ मंदावला असता. त्यामुळे, जगाच्या पाठीवर कुठे, काय, कधी घडतंय हे कळायलाच वेळ लागला असता.

रोजची कामं करताना कोणत्या कामासाठी किती वेळ गेला हे आपल्याला कळलेच नसते. ऑलिंपिक किंवा इतर क्रीडास्पर्धांमध्ये एखादया खेळाडूने किती वेळात स्पर्धा जिंकली, विश्वविक्रम केला का, ते कळायलाच मार्ग नसता.

खरंच, घड्याळ नसते तर असा काहीसा आपला गोंधळही उंडाला असता. त्यामुळे, घड्याळाचा आपल्या प्रगतीसाठी हवा तेवढाच वापर करणे योग्य; परंतु घड्याळाच्या काट्यालाच सर्वस्व मानून धावाधाव करणे अयोग्य आहे.

कुठे धावायचे आणि कुठे थांबायचे, हे कळले तर घड्याळ असेल काय किंवा नसेल काय, आपल्याला उत्तम जीवन जगता येईल.

Leave a Comment