Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना

Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना for exam preparation.

Std 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना

Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 2 सायकल म्हणते, मी आहे ना

सायकल म्हणते, मी आहे ना Question Answer

प्रश्न १.
चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः हा आत्मकथनात्मक पाठ असून, यात सायकल स्वतःच आपली माहिती सांगते. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने सायकल कशी हितकारक आहे ते या पाठातून समजते.)

(अ) मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात?
उत्तर: आईला दुकानातून साबण आणून देण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात. तसेच, सायकलवर स्वार होऊन बाजारातून भाजीपाला, कधीकधी दूध, तर कधी आजोबांच्या गोळ्या आणून देण्यासाठीही सायकलचा वापर करतात. अशी छोटी-मोठी कामे करण्यासाठी मुलांना सायकलचा उपयोग होतो.

(आ) सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, असे का म्हटले आहे?
उत्तरः
घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुप्फुसे अधिक कार्यक्षम होतात. मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो. प्रतिकारशक्ती वाढते आणि पायांचे स्नायू बळकट होतात. त्यामुळे, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.

(इ) सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला?
उत्तर:
फ्रान्समधील एम्. डी. सिव्हर्क यांनी १६९० मध्ये सायकलचा शोध लावला. तिला अधिक गती यावी, म्हणून एच्. जे. लॉसन यांनी १८७६ साली पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. त्यानंतर १८८७ साली जॉन बॉइड डनलॉप यांनी रबरी टायरचा शोध लावला, हे टायर बसवल्याने सायकलला वेग आला. आता सायकल बरीच आधुनिक झाली असून तिला गिअरही लागले आहेत. शर्यतीसाठी आणि पर्यटनासाठी तिची वेगवेगळी बांधणी केली जाते. अशाप्रकारे, सायकलच्या रूपात बदल होत गेला.

प्रश्न १.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

(अ) आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले, तर कोणकोणते फायदे होतील?
उत्तर:
आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले, तर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होईल, त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणही कमी होईल. इंधनाची बचत झाल्याने आपले पैसे वाचतील. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी परदेशात जाणारे आपले चलनही काही प्रमाणात वाचवता येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नफा होईल. त्या दिवसापुरता तरी पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याचबरोबर वाहन चालवण्याचे आपले कष्ट वाचतील.

(आ) तुमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
उत्तर:
सायकलच्या वापरामुळे आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे मी त्यांना समजावून सांगेन. इंधन वाचल्यामुळे आपले पैसे वाचतील तसेच, वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण टाळता येईल, हे पटवून देईन. सायकल वापरल्याने वाहतूक कोंडी, पार्किंगच्या जागेची समस्या आणि अपघात या प्रश्नांवरही मात करता येईल, हेदेखील मी समजावून सांगेन. ‘सायकल म्हणते, मी आहे ना!’ या पाठाच्या आधारे भित्तिपत्रक तयार करून परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चिकटवेन, ते वाचून लोक सायकलचा वापर करण्यास प्रवृत्त होतील. सोसायटीच्या कार्यक्रमांमध्ये तसेच, गणेशोत्सवातील कार्यक्रमांमध्ये मित्रांच्या मदतीने ‘सायकलचे उपयोग’ या विषयावरील पथनाट्य सादर करेन.

Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना

प्रश्न ३.
खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 12
उत्तर:
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 2

प्रश्न ४.
सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 5
उत्तर:
हँडल, पेडल, सीट, स्टँड, घंटी, हेडलाईट, टायर, ट्यूब, ब्रेक, गिअर ही सायकलच्या भागांची नावे आहेत.

प्रश्न ५.
सायकल शिकताना तुम्हांला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.
उत्तर:
गेल्या वर्षी आईने मला सायकल चालवायला शिकवले. सुरुवातीला सायकलचे वजन मला झेपते, की नाही हे पाहण्यासाठी ती मेला सायकल नुसती हातात धरून फिरवायला सांगत असे. त्यानंतर तिने मला एक पाय पेडलवर आणि दुसरा पाय जमिनीवर ठेऊन हळूहळू तोल सावरायला शिकवले. तोल सांभाळत पुढे जाताना मला खूप मजा येत होती. धाडस करून मी सायकलवर स्वार झाले आणि मग सायकल चालवता आल्याच्या आनंदात वेगाने पुढे जाऊ लागले; पण ब्रेक कसा लावायचा हे नीटसे माहीत नव्हते.

रस्त्यावरचा मोठा खड्डा चुकवता न आल्याने माझी सायकल थेट खड्ड्यात पडली. माझ्या हाताला – पायाला खरचटले होते; पण सायकल चालवता आल्याच्या आनंदात माझे दुखणे कुठल्याकुठे पळून गेले. खरचटल्याच्या जखमा बऱ्या झाल्यावर मी पुन्हा एकदा उत्साहाने सायकलवर स्वार झाले. ब्रेक, रस्त्यावरील खड्डे, चालणारी माणसे, गाड्या यांचा नीट अंदाज घेऊन आत्मविश्वासाने सायकल चालवू लागले. त्या दिवसापासून सायकल माझी मैत्रीण झाली.

प्रश्न ६.
संगणक तुमच्याशी बोलू लागला तर…. कल्पना करा व लिहा.
उत्तर:
नमस्कार मित्रांनो, मी संगणक बोलतोय! माहिती शोधण्यासाठी, विविध खेळ खेळण्यासाठी मी तुम्हांला नेहमी मदत करतो. अचूकता, कामाचा अतिप्रचंड वेग, न कंटाळता व न थकता अचूक काम करण्याची क्षमता, सातत्य आणि विश्वासार्हता ही माझी वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो, माझ्या मदतीने तुम्ही जगातील कोणतीही माहिती क्षणार्धात शोधू शकता. मी तुम्हांला नेहमीच मदत करत राहीन; पण त्यासाठी तुम्ही माझी नीट काळजीसुद्धा घेतली पाहिजे.

इंटरनेटच्या माध्यमातून कधीकधी व्हायरसच्या हल्ल्यामुळे माझ्यामध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना माझ्या सिस्टिममध्ये अँटिव्हायरस टाकायला विसरू नका. अजून एक सांगतो मित्रांनो, तुम्ही माझा उपयोग अभ्यासापेक्षा गेम खेळण्यासाठीच जास्त करता. अधिक वेळ गेम खेळल्यामुळे तुमचे डोळे खराब होऊ शकतात, म्हणून गेम खेळण्यासाठी माझा वापर थोडा वेळच करा. हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामुळे माझा वापर करून अधिकाधिक ज्ञानाचा खजिना मिळवा आणि हुशार व्हा. मी तुमचा खरा मित्र आहे. मग ऐकाल ना, तुमच्या या मित्राचा सल्ला!

प्रश्न ७.
सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळींत लिहा.
उत्तर:
(सायकल रस्त्याने व्यवस्थित चालली आहे, तेवढ्यात समोरून एक मोटारसायकल वेगाने तिच्या अंगावर येते.)
सायकल : ए, हळू चाल ना थोडी! एवढी काय घाई आहे गं तुला ? चेंगरले असते ना मी आता.
मोटारसायकल : एक नंबरची घाबरट आहेस तू! एवढी भीती वाटते, तर येतेस कशाला आमच्या रस्त्यावर?
सायकल : किती गं तोरा तुला ? तू आता कानामागून येऊन तिखट झालीस. तुझ्याआधी मीच घेऊन जायचे माणसांना इकडून-तिकडे. हं, पण आता ही माणसंच मला विसरली आणि माझ्यावर अशी एकटं पडायची वेळ आली. तरी बरं लहान मुलांना अजूनही मी आवडते. चालक परवाना मिळेपर्यंत का होईना, चालवतात मला.
मोटारसायकल : मग आहेच मी स्मार्ट आणि वेगवान !
सायकल : हो गं बाई! आहेस तू माझ्याहून वेगवान! पण तुला चालायला इंधन लागतं. माझ्या चाकांमध्ये एकदा हवा भरली की बस्स, मी अगदी तयार असते कुठेही जायला. तुझ्यामुळे प्रदूषण होतं, अपघात होतात. तुझी किंमतही जास्त, दुरुस्तीचा खर्चही जास्त, त्याचं काय?
मोटारसायकल : (नि:श्वास सोडून) हे मात्र अगदी खरं बोललीस तू. इंधन नसेल, तर मी अगदी बिनकामाची होऊन जाते. शिवाय प्रदूषणही होतं माझ्यामुळे हे पण खरंच आहे; पण तातडीच्या प्रसंगी आणि दूरच्या अंतरावर वेगाने प्रवास करायला मीच उपयोगी पडते ना!
सायकल : हो गं हो! बरोबर आहे तुझं, तातडीच्या प्रसंगी, दूरच्या अंतरावर तूच खरी उपयोगी पडतेस. मी तर फार हळूबाई आहे, इच्छा असूनही मी लोकांना वेगानं नाही नेऊ शकत..
मोटारसायकल : अगं, आपण दोघीही आपापल्या जागी बरोबर आहोत. तुझ्यामुळे लोकांचा व्यायाम होतो, प्रदूषण होत नाही, अपघात टळतात आणि मी लोकांचा वेळ वाचवते, दूरच्या ठिकाणी त्यांना वेगाने पोहोचवते.
सायकल : खरं आहे तुझं; पण तूसुद्धा फार वेगानं नको जाऊस वाहतुकीच्या नियमांचे पालन कर. शेवटी माणसांना सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर असते, हे लक्षात ठेव!
मोटारसायकल : हो गं, नक्की लक्षात ठेवेन. मी खूप आभारी आहे तुझी. आज तुझ्यामुळे माझे डोळे उघडले.

खेळूया शब्दांशी

(अ) खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या.
अ प्रचार व प्रसार
(आ) विश्वास व आत्मविश्वास
उत्तर:
(अ) प्रचार म्हणजे एखादी गोष्ट वारंवार सांगून जाणीवपूर्वक पटवून देणे. यामध्ये लोकांचे मन वळवण्याचा किंवा त्यांना आपल्या मताशी सहमत करण्याचा प्रयत्न केला जातो. (उदा. निवडणुकीचा प्रचार).
एखादी गोष्ट पसरवणे म्हणजे प्रसार प्रसारमाध्यमांद्वारे अनेक गोष्टींचा प्रसार केला जातो.
(आ) विश्वास म्हणजे खात्री किंवा निश्चिती. अनेक सकारात्मक गोष्टींवर आणि व्यक्तींवर आपण विश्वास ठेवतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वत:वर असलेला विश्वास. आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव होते, तेव्हा आत्मविश्वास येतो.

Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना

(आ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.

(अ) रखडत चालणे
(आ) धडा शिकणे
(इ) हातभार लावणे
उत्तर:
(अ) रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गाडी रखडत चालली होती.
(आ) परीक्षेला पोहोचायला उशीर झाल्याने मी लवकर उठण्याचा धडा शिकलो.
(इ) घरातील सर्व सदस्यांनी घरकामांना हातभार लावला, तर आईचे काम हलके होईल.

(इ) हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी, तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा.

(अ) कधीमधी
(आ) अवतीभवती
(इ) धामधूम
(ई) फेरफटका
(उ) साधेसुधे
उत्तर:
(अ) कधीमधी – कधीतरी किंवा कधीकधी.
(आ) अवतीभवती – आपल्या आजूबाजूच्या परिसरात, सभोवताली.
(इ) धामधूम धावपळ, गडबड, जल्लोष.
(ई) फेरफटका – जवळच्या अंतरावर फिरणे, भटकणे.
(उ) साधेसुधे – खूप साधे.

उपक्रम : तुमच्या गावातील सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीची भेट घ्या. सायकल दुरुस्तीच्या विविध कामांबाबत त्या व्यक्तीकडून माहिती मिळवा.

आपण समजून घेऊया.

वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. शब्दांची कार्ये विविध असतात. त्यांच्या विविध कार्यांवरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. त्यांना शब्दांच्या जाती म्हणतात. वाक्य होण्यासाठी शब्दांच्या रूपात आपण कधी कधी बदल करतो. काही शब्दांच्या रूपात बदल होतो, तर काही शब्द मुळीच बदलत नाहीत. ज्या शब्दांमध्ये बदल होतो ते ‘विकारी किंवा सव्यय शब्द’, तर ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही ते ‘अविकारी किंवा अव्यय शब्द’ होत. खालील तक्त्याचे निरीक्षण करा.

Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 13

• खालील वाक्य वाचा.

माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले.
वरील वाक्यांत सहा नामे आली आहेत. ती नामे लिहा.
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 9
तुम्ही वर लिहिलेली नामे एकाच प्रकारची नाहीत. त्यांमध्ये व्यक्तींची नावे, वस्तूंची नावे व मनातील भाव दर्शवणारे शब्द आलेले आहेत. अशा विविध प्रकारच्या नामांवरून नामांचे तीन प्रकार पडतात.
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 10

• खालील यादी पूर्ण करा.

१. व्यक्तींची नावे : …………
२. गावांची नावे : …………
३. नयांची नावे गावांची नावे : …………
४. पर्वतांची नावे गावांची नावे : : …………
उत्तर:
१. व्यक्तींची नावे : पूजा, मानस, रवींद्र, प्रभाकर.
२. गावांची नावे : रामपूर, देवगड, पळस्पे, महाड, मोखाडा, कोल्हापूर.
३. नदयांची नावे : उल्हास, सावित्री, वासिष्ठी, तापी, पूर्णा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी, भीमा, प्रवरा, इंद्रायणी.
४. पर्वतांची नावे : सह्याद्री, गिरनार, विंध्य, सातपुडा, माऊंट आबू, मलयगिरी, हिमालय.

तुम्ही वर लिहिलेली सर्व नावे विशेषनामे आहेत, कारण ही नावे आपण ठरावीक वस्तू किंवा व्यक्तींना दिलेली नावे आहेत. त्यामुळे विशेषनामातून विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीचाच आपल्याला बोध होतो. व्यक्ती, गाव, नदी, पर्वत हे सर्व शब्द सामान्यनामे आहेत. कारण या शब्दांवरून ठरावीक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही, तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा, व्यक्तींचा बोध होतो. त्यांच्यात समान गुणधर्म, सारखेपणा जाणवतो.

• खालील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा.

सतलज, बाग, कविता, लाडू, आंबेगाव, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, प्राजक्ता, मराठी, आई, कापड, बंडू, , सह्याद्री.
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 14

उत्तर:

सामान्यनाम बाग, लाडू, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, आई, कापड.
विशेषनाम सतलज, कविता, आंबेगाव, प्राजक्ता, मराठी, बंडू, सहयाद्री.

• खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द पाहा.

१. मला सशाची चपळाई आवडली.
२. त्याची आई माझ्याशी आपुलकीने बोलली.
३. नीताच्या आवाजात गोडवा आहे.
४. कोणालाच गुलामगिरीत राहणे पसंत नसते.

वरील अधोरेखित शब्द भाववाचकनामे आहेत. हे शब्द वस्तू किंवा प्राण्यांची नावे नाहीत. भाववाचक नामांतून आपल्याला व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांच्यातील भाव, गुणधर्म व स्वभाववैशिष्ट्ये यांचा बोध होतो. त्या शब्दांतील भाव समजून घ्यावा लागतो. तो दृश्य स्वरूपात नसतो.

• खालील उतारा वाचा. त्यातील घटना क्रमाने सांगा.

मे महिन्याचा तिसरा आठवडा असावा. घरात बसवत नव्हते. प्रचंड उकाडा होता. शरीराची लाही लाही होत होती. सारखे पाणी प्यावेसे वाटत होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे आकाशात पक्षीही फिरकेनासे झाले होते. सर्वत्र शुकशुकाट होता. सूर्य पश्चिमेकडे हळूहळू कलू लागला. उन्हाच्या झळा कमी होऊ लागल्या. अचानक ढगांनी आकाशात गर्दी केली. जोराचे वारे वाहू लागले. झाडांची गळलेली पाने, कचरा, माती उडू लागली. गोलगोल फिरू लागली. वाऱ्याचे भोवरे तयार झाले. मी हे सगळे खिडकीतून पाहत होतो. सगळीकडे इतका धुराळा उडत होता, की बाहेरचे काही दिसत नव्हते.

अचानक विजा चमकू लागल्या. ढग एकमेकांवर आपटू लागले. विजांचा थयथयाट, ढगांचा गडगडाट अन् घोंगावणारा भयंकर वारा, वातावरण भयावह झाले. त्यात पावसाचे टपोरे थेंब घरांच्या कौलांवर, पत्र्यांवर आपटू लागले. निसर्गाचे हे रौद्र रूप पाहून मी हबकून गेलो. अचानक माझे लक्ष आकाशाकडे गेले. कोणाच्यातरी घराचे पत्रे चटईसारखे उडत आमच्या घराच्या दिशेने येत होते. मी खूप घाबरलो. तेवढ्यात ते उडत आलेले पत्रे आमच्या घराच्या मागच्या बाजूला कोसळले.

घरातील माणसे जोरात ओरडली. लहान मुले घाबरून रडू लागली. सगळे घाबरेघुबरे होऊन एका जागेवर खिळल्यासारखी बसून राहिली. हळूहळू वाऱ्याचा वेग मंदावला. पाऊस थांबला. आकाशही निरभ्र होऊ लागले. सगळे घराबाहेर पडू लागले. दीड-दोन तास निसर्गाच्या चाललेल्या या भयंकर खेळाविषयी जो तो आपल्या भावना व्यक्त करू लागला.

शिक्षकांसाठी : नामांच्या विविध प्रकारांची उदाहरणे देऊन विदयार्थ्यांकडून उपयोजनात्मक सराव करून घ्यावा. वरील उताऱ्याचे स्वतः किंवा विदयार्थ्यांकडून प्रकट वाचन करून घ्यावे. उताऱ्यातील घटना क्रमाने सांगण्याची सूचना दयावी. घटनाक्रम सांगताना योग्य ते मार्गदर्शन करावे.

Class 6 Marathi Balbharati Chapter 2 सायकल म्हणते, मी आहे ना Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(वायू, फुप्फुसे, स्नायू, बळकट, माफकच)

i. घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने तुमची ……… अधिक कार्यक्षम होतात.
उत्तर:
फुप्फुसे

ii. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे …….. बळकट होतात.
उत्तर:
स्नायू

iii. माझी किंमत तशी ………, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात.
उत्तर:
माफकच

iv. वाहनांची संख्या वाढली, की ………. प्रदूषण वाढते.
उत्तर:
वायू

Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना

प्रश्न २.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. काही लोक सायकलला कोणत्या नावाने संबोधतात ?
उत्तर:
काही लोक सायकलला ‘दुचाकी’ या नावाने संबोधतात.

ii. लहान मुलांचे दुसरे वाहन कोणते ?
उत्तर:
सायकल हे लहान मुलांचे दुसरे वाहन असते.

iii. काय टाळण्यासाठी जगभर वाहतूक क्षेत्रात सायकलचा वापर होत आहे?
उत्तर:
प्रदूषण टाळण्यासाठी जगभर वाहतूक क्षेत्रात सायकलचा वापर होत आहे.

प्रश्न ३.
चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः हा आत्मकथनात्मक पाठ असून, यात सायकल स्वतःच आपली माहिती सांगते. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने सायकल कशी हितकारक आहे ते या पाठातून समजते.)

i. प्रदूषण टाळण्यासाठी पर्याय म्हणून सायकल कशी उपयोगी ठरते?
उत्तर:
वाहनांची संख्या वाढली, की वायू प्रदूषण वाढते. वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात या समस्या जीवघेण्या ठरतात. सायकलला इंधन लागत नाही. त्यामुळे, तिच्यामुळे वायू प्रदूषण होत नाही. अशाप्रकारे, प्रदूषण टाळण्यासाठी पर्याय म्हणून सायकल उपयोगी ठरते.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
‘आडरस्ता’ यासारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर:

  1. आडमार्ग
  2. आडवाट
  3. आडगाव
  4. आडवस्ती
  5. आडनाव
  6. आडवळण
  7. आडबाजू

प्रश्न २.
समानार्थी शब्द लिहा.

  1. संगत =
  2. कायम =
  3. गरज =
  4. अवघड =
  5. बळकट =
  6. अडचण =
  7. लाभ =
  8. वायू =

उत्तर:

  1. साथ, सोबत
  2. नेहमी, सतत
  3. आवश्यकता
  4. कठीण, बिकट
  5. मजबूत
  6. समस्या
  7. नफा, फायदा
  8. वारा, पवन, वात.

प्रश्न ३.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. सुखद ×
  2. कार्यक्षम ×
  3. बळकट ×
  4. दुरूस्त ×
  5. विकत ×
  6. परदेश ×
  7. सावध ×
  8. आवड ×

उत्तर:

  1. दुःखद
  2. अकार्यक्षम
  3. कमकुवत
  4. नादुरुस्त
  5. फुकट, मोफत
  6. स्वदेश
  7. बेसावध
  8. नावड

प्रश्न ४.
दिलेल्या शब्दांत लपलेले शब्द शोधा.

  1. दंततबकडी
  2. लाभदायक

उत्तर:

  1. दंत, तबक, बक, कडी, तबकडी, तडीत.
  2. लाभ, लायक, भला, भय, कला.

प्रश्न ५.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.

  1. धूम ठोकणे
  2. स्वार होणे

उत्तर:

  1. शाळा सुटताच मुलांनी घराकडे धूम ठोकली.
  2. मामाकडे चल म्हणताच राघवची स्वारी दुचाकीवर स्वार झाली.

प्रश्न ६.
खालील वाक्यांत सहा नामे आली आहेत. ती लिहा.

i. माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले.
उत्तर:
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 3

ii. आफ्रिका खंडातील सहारा हे पृथ्वीवरील सर्वांत मोठे आणि सर्वाधिक उष्णता असलेले वाळवंट आहे.
उत्तरः
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 4

प्रश्न ७.
खालील वाक्यांमधील भाववाचक नामे शोधून लिहा.

  1. प्रामाणिकपणामुळे आपण लोकांचा विश्वास संपादन करू शकतो.
  2. रुग्णालयामध्ये शांतता राखणे आवश्यक आहे.
  3. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती नेहमीच मोठी असते. प्रामाणिकपणा शांतता
  4. गुलाबाच्या फुलांचे सौंदर्य सर्वांनाच मोहित करते.

उत्तर:

  1. प्रामाणिकपणा
  2. शांतता
  3. श्रीमंती
  4. सौंदर्य

Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना

प्रश्न ८.
खालील वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हे दया.

i. राजू विजय सीमा शाम आणि सरिता दररोज शाळेत जातात
उत्तर:
राजू, विजय, सीमा, शाम आणि सरिता दररोज शाळेत जातात.

ii. आजोबा म्हणाले जा दुकानातून माझी औषधं घेऊन ये
उत्तर:
आजोबा म्हणाले, “जा, दुकानातून माझी औषधं घेऊन ये.”

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. ६ वरील उतारा वाचा. त्यातील घटना क्रमाने सांगा.

लेखी कार्य

प्रश्न १.
खालील चित्रे पाहा. ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला आहे, त्यापुढे दिलेल्या चौकटीत ✓अशी खूण करा.
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २)
Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना 6
(टीप: हा प्रश्न विदयार्थ्यांनी स्वतः सोडवावा.)

उपक्रम / प्रकल्प

प्रश्न १.
तुमच्या गावातील सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीची भेट घ्या. सायकल दुरुस्तीच्या विविध कामांबाबत त्या व्यक्तीकडून माहिती मिळवा.

प्रश्न २.
सायकलचे विविध उपयोग या विषयावर भित्तिपत्रक तयार करून शाळेच्या नोटीस बोर्डवर लावा.
(टीप: हे उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)

सायकल म्हणते, मी आहे ना पाठाचा परिचय

‘सायकल म्हणते, मी आहे ना!’ हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे. अबालवृद्धांना वापरण्यास सोपे व सहज वाटणारे वाहन म्हणजे सायकल. आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक असलेली, कमी खर्चात मिळणारी व वापरण्यात सहजता असणारी हीच सायकल या पाठातून आपलीच माहिती स्वतः सांगत आहे.

Class 6 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer सायकल म्हणते, मी आहे ना

सायकल म्हणते, मी आहे ना शब्दार्थ

आडरस्ता अधिक वर्दळ नसलेला सामसूम रस्ता
ऑफिस कार्यालय
कार्यक्षम अधिक क्षमतेने कार्य करणारे
चलन पैसे
जन्मदाते जन्म देणारे
दुखापत इजा
तंदुरूस्त स्वस्थ
दुचाकी दोन चाकांवर चालणारे वाहन
माफक यथायोग्य, बेताची
मेद चरबी
लाभदायक फायदेशीर, उपयुक्त
सुखद सुख देणारे
संगत साथ, सोबत
हमखास नक्की, खात्रीने, जरूर


सायकल म्हणते, मी आहे ना वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

धडा शिकणे. नियम, शिस्त शिकणे.
धूम ठोकणे. वेगाने पट्टून जाणे.
रखडत चालणे. रेंगाळत चालणे.
स्वार होणे आरुढ, होणे, बसणे
हातभार लावणे मदत करणे.


सायकल म्हणते, मी आहे ना टिपा

चालक परवाना (लायसन) कार, बाइक आणि अन्य सर्व मोठी वाहने चालवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आर. टी. ओ.) काढावी लागणारी परवानगी.
दंततबकडी सायकलचे पेडल आणि मागील चाक यांवर साखळी बसवण्यासाठी लावलेले दातेरी चाक.
पेडल सायकल चालवण्यासाठी पाय ठेवण्याचे साधन.
फ्रान्स, पॅरिस फ्रान्स हा युरोपातील एक देश असून पॅरिस ही त्याची राजधानी आहे.

Leave a Comment