Students can find the best Marathi Balbharati Class 6 Solutions and Chapter 4 Question Answer गवतफुला रे गवतफुला (कविता) for exam preparation.
Std 6 Marathi Balbharati Chapter 4 Question Answer गवतफुला रे गवतफुला (कविता)
Maharashtra Board Solutions Class 6 Marathi Balbharati Chapter 4 गवतफुला रे गवतफुला (कविता)
गवतफुला रे गवतफुला (कविता) Question Answer
प्रश्न १.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) कवितेतील मुलाची गवतफुलाशी कुठे व कशी भेट झाली ?
उत्तर:
कवितेतील मुलगा आपल्या मित्रांसोबत माळावरती पतंग उडवत फिरत होता. तेव्हा त्या माळरानावरील गवतावर झुलत झुलत हसणाऱ्या, लहानशा गोजिरवाण्या गवतफुलाशी मुलाची भेट झाली.
(आ) गवतफुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला ?
उत्तर:
गवतफुलाला पाहून मुलगा आकाशात उडणारा पतंग आणि सोबतचे मित्र यांना विसरला.
(इ) कवयित्रीने गवतफुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर:
कवयित्री इंदिरा संत गवतफुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन करताना म्हणतात, “गवतफुलाच्या दोन्ही बाजूंना असणारी हिरवी पाने रेशमासारखी नाजूक आहेत. एक पाकळी निळ्या रंगाची आहे, तर गवतफुलाच्या तळाशी लाल रंगाची पाकळी खुलून दिसत आहे. ”
(ई) गवतफुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे?
उत्तर:
वारा लहान होऊन गवतफुलासह झोपाळ्याचा खेळ खेळायला आला आहे. त्याचबरोबर रात्रसुद्धा लहान होऊन गवतफुलासाठी अंगाई गीत म्हणत आहे. अशाप्रकारे, वारा आणि रात्र लहान होऊन गवतफुलाला भेटायला आले आहेत.
(उ) गवतफुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ?
उत्तरः
मुलाला गवतफुलाहून लहान होऊन घर, शाळा हे सारे विसरून त्याच्यासोबत राहायचे आहे. मुलाला गवतफुलाची सुंदर् भाषा शिकून, त्याला गोष्टी सांगायच्या आहेत. गवतफुलाचे खेळ मुलाला शिकायचे आहेत. त्याला जादू शिकवायची आहे. आभाळाकडे हट्ट करून गवतफुलासोबत खाऊ खायचा आहे. गवतफुलाचे रंगीत कपडे घालून फुलपाखरांना फसवायचे आहे. गवतफुलासोबत राहून मुलाला अशा विविध गोष्टी करायच्या आहेत.
प्रश्न १.
तुम्हांला फुलपाखरू भेटले, तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल? तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मला फुलपाखरू भेटले, तर मी त्याच्याशी मनमोकळा संवाद साधेन. त्याला म्हणेन, ए फुलपाखरा, थांब ना जरासा ! मला
बोलायचंय तुझ्याशी. या फुलावरून त्या फुलावर किती धावपळ करत असतोस? तुझे पाय आणि पंख दुखत नाहीत का? तू खातोस तरी काय? तुला इतके छान छान रंग कसे मिळतात? तू कुठे राहतोस ?
तू रात्री कोठे झोपतोस. तुला अंधाराची भिती नाही का वाटत? फुलं तुझ्याशी बोलतात का रे? तू मला खूप आवडतोस. तुझे रंगीबेरंगी आणि मनोहर पंख पाहून मला तुला पकडावंसं वाटतं; पण मला माहीत आहे, की तुझे पंख खूपच नाजूक आहेत. मी हात लावल्यास तुला इजा होऊ शकते, म्हणून मी नाही पकडणार तुला. मला तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल. मग, होशील ना तू माझा मित्र ?
प्रश्न ३.
खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) तुझे रंग पाहून मी स्वत:ला विसरून गेलो.
(आ) मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते.
(इ) तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या.
(ई) तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे.
उत्तर:
(अ) पाहुन तुजला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा!
(आ) मलाहि वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे
(इ) तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुजला सांगाव्या
(ई) तुझे घालुनी रंगित कपडे, फूलपाखरां फसवावे!
प्रश्न ४.
या कवितेत गवतफुलाचे वर्णन करताना कोणाला, कोणते रंग वापरले आहेत ते लिहा.
उदा: रेशिम – पाती = हिरवी
(१) पाकळी
उत्तर:
निळी
(२) पराग
उत्तर:
पिवळे
(३) तळीची पाकळी
उत्तर:
लाल
प्रश्न ५.
गवतफुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा. त्यांमधील साम्य व भेद लिहा.
उत्तर:
गवतफुले आणि इतर फुले यांचे निरीक्षण केल्यावर त्यांच्यामध्ये पुढील साम्य व भेद दिसून आले.
गवतफुले व इतर फुले यांमधील साम्य :
- गवत फुले आणि इतर फुले दोन्ही सुंदर दिसतात.
- दोन्ही प्रकारची फुले विविध रंगांची असतात.
- दोन्ही प्रकारची फुले कोमल आणि नाजूक असतात.
गवतफुले व इतर फुले यांमधील भेद :
- गवतफुले आकाराने खूप लहान असतात. त्या तुलनेत इतर फुलांचा आकार मोठा असतो.
- गवतफुलांची लागवड करता येत नाही, तर इतर फुलांची लागवड केली जाते.
- गवतफुलाला सहसा सुवास नसतो, तर इतर फुलांना बरेचदा सुवास असतो.
प्रश्न ६.
‘सळसळ’ यासारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर:
कळकळ, खळखळ, जळजळ, मळमळ, वळवळ, हळहळ इत्यादी.
खेळूया शब्दांशी
(अ) समान अर्थाचे शब्द लिहा.
- गीत =
- रात्र =
- आभाळ =
- वारा =
उत्तर:
- गाणे
- रजनी, निशा
- अंबर, गंगन
- पवन, वायू, वात
(आ) रंगरंगुल्या, सानसानुल्या, नीळनिळूली यांसारखे शब्द शोधा व लिहा.
उत्तर:
- गोड गोजिरी
- लाजलाजरी
- सोनछकुल्या
- लाडलाडुली
(इ) गवतफुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा.
उत्तर:
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न १.
एखादया माळरानावर फिरताना तुम्ही गवतफुले पाहिली आहेत का? ती कोणकोणत्या रंगांची असतात? तुम्ही पाहिलेल्या गवतफुलाचे चित्र काढा व रंगवा.
प्रश्न २.
मंगेश पाडगांवकर यांची ‘मी फूल तृणातिल इवले’ ही कविता मिळवा व लिहा. कवितेला चाल लावून वर्गात सादर करा.
उत्तर:
(टीप : खाली दिलेली कविता वर्गात सादर करा.)
प्रकल्प : वृत्तपत्रांमधून विविध फुलांविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे मिळवा. या कात्रणांपासून चिकटवही बनवा.
कविता करूया.
केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा कापरा (मे.), ता. जि. यवतमाळ या शाळेतील सोनाली श्रावण फुपरे, हिने इयत्ता सहावीत असताना ‘झाड’ या विषयावर तयार केलेली कविता वाचूया.
• सोनालीप्रमाणे आपणही खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करूया.
१. माझी शाळा म्हणते खेळ खेळा
वेळ, काळ तुम्ही नियमित पाळा,
……………………………………………..
……………………………………………..
२. जाऊ जंगल सफरीला
पाहू आनंदे निसर्गाला,
……………………………………………..
……………………………………………..
उत्तर:
१. माझी शाळा म्हणते खेळ खेळा
वेळ, काळ तुम्ही नियमित पाळा,
बेशिस्तीचे तुम्ही वर्तन टाळा
मग कलागुणांचा पाहा सोहळा.
२. जाऊ जंगल सफरीला
पाहू आनंदे निसर्गाला,
विसरून येथे स्वत:ला
कवेत घेऊ सृष्टीला ।
Class 6 Marathi Balbharati Chapter 4 गवतफुला रे गवतफुला (कविता) Question Answer
संकलित मूल्यमापन
कवितेवर आधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
i. कवितेतील मुलगा गवतफुलाला कोणता प्रश्न विचारत आहे ?
उत्तर:
कवितेतला मुलगा गवतफुलाला ‘असा कसा मला तुझा लळा लागला?’, असा प्रश्न विचारत आहे.
ii. गवतफुलाच्या दोन्ही बाजूंस काय सळसळत आहे?
उत्तरः
गवतफुलाच्या दोन्ही बाजूंस हिरव्या रंगाची नाजूक अशी रेशमी पाती (मऊ पाने) सळसळत आहेत.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
समान अर्थाचे शब्द लिहा.
- गवत =
- लळा =
- पाते =
- पराग =
उत्तर:
- तृण
- माया
- पान
- पुंकेसर
प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- मित्र ×
- हसणे ×
- विसरणे ×
- ऊन ×
- रात्र ×
उत्तर:
- शत्रू
- रडणे
- आठवणे
- सावली
- दिवस
प्रश्न ३.
कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.
उत्तर:
- रंगरंगुल्या, सानसानुल्या
- गवतफुला
- लळा, रंगकळा, झोपाळा, शाळा
- माळावरती, गवतावरती
- फिरताना, हसताना
- सळसळती, झगमगती, रेशीम – पाती, तुझ्यासंगती
- तळी, पाकळी
- तुला, तुजला, उलागला
- सांगाव्या, शिकवाव्या
- तुझ्यासवे, फसवावे, रहावे
प्रश्न ४.
दिलेल्या शब्दांत लपलेले शब्द शोधा.
i. गवतफुला
उत्तर:
गवत, गत, वग, तग, लात.
ii. माळावरती
उत्तर:
माळा, मार, माती, वर, वरती, रव, रती, तीर.
iii. हट्ट करणे.
उत्तर:
रमेशने आईकडे नव्या छत्रीसाठी हट्ट केला.
प्रश्न ५.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
i. हरखून जाणे.
उत्तर:
झाडावर चमकणारे काजवे पाहून प्रिया हरखून गेली.
ii. भान हरपून जाणे.
उत्तर:
उन्हाने चमकणारी हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे पाहून पर्यटकांचे भान हरपून गेले.
प्रश्न ६.
‘गवतफुला रे! गवतफुला !’ या कवितेतील नामे शोधा व लिहा.
उत्तर:
गवत, फूल, मित्र, माळ, पतंग, नभ, पाकळी, पराग, ऊन, रंग, वारा, झोपाळा, रात्र, अंगाई, गीत, शाळा, घर, भाषा, गोष्ट, खेळ, जादू, आभाळ, खाऊ, कपडे, फुलपाखरू इत्यादी.
प्रश्न ८.
खालील विरामचिन्हे केव्हा वापरतात ते सांगा.
- पूर्णविराम – ( . )
- स्वल्पविराम (, )
- प्रश्नचिन्ह – ( ? )
- अर्धविराम – ( ; )
उत्तर:
- विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी अद्याक्षरापुढे
- एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, संबोधन दाखवताना
- प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.
- दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
‘गवतफुला रे! गवतफुला!’ या कवितेच्या शेजारील (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १२) चित्रामध्ये काय काय दाखवले आहे त्यांचे वर्णन करा.
प्रश्न २.
तुम्ही कोणकोणत्या रंगांची फुलपाखरे पाहिली आहेत ?
प्रश्न ३.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. १४ वर दिलेली ‘झाड’ ही कविता मोठ्याने वाचा.
लेखी कार्य
प्रश्न १.
गवतफुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा. त्यांमधील साम्य व भेद लिहा.
उत्तर:
गवतफुले आणि इतर फुले यांचे निरीक्षण केल्यावर त्यांच्यामध्ये पुढील साम्य व भेद दिसून आले.
गवतफुले व इतर फुले यांमधील साम्य :
- गवत फुले आणि इतर फुले दोन्ही सुंदर दिसतात.
- दोन्ही प्रकारची फुले विविध रंगांची असतात.
- दोन्ही प्रकारची फुले कोमल आणि नाजूक असतात.
गवतफुले व इतर फुले यांमधील भेद :
- गवतफुले आकाराने खूप लहान असतात. त्या तुलनेत इतर फुलांचा आकार मोठा असतो.
- गवतफुलांची लागवड करता येत नाही, तर इतर फुलांची लागवड केली जाते.
- गवतफुलाला सहसा सुवास नसतो, तर इतर फुलांना बरेचदा सुवास असतो.
प्रश्न २.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. १४ वरील दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न ३.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील ‘कास’ या पठारावर वर्षातील विशिष्ट कालावधीमध्ये विविध रंगांची असंख्ये रानफुले फुलतात. ही फुले पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होते. आंतरजालाच्या साहाय्याने ‘कास’ पठारावर फुलणाऱ्या फुलांची वैशिष्ट्ये वाचा आणि लिहा.
(टीप : वरील सर्व उपक्रम / प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
गवतफुला रे गवतफुला (कविता) कवितेचा भावार्थ
‘गवतफुला रे! गवतफुला!’ या कवितेत कवयित्री इंदिरा संत यांनी माळावर फुललेल्या गवतफुलाचे वर्णन केले आहे. . गवतफुलाला पाहून एका लहान मुलाला खूप आनंद होतो. तो गवतफुलाशी संवाद साधून त्याच्या रूपाचे वर्णन करतो, त्याच्यासोबत राहण्याची, खेळण्याची इच्छा व्यक्त करतो, याचे सुंदर चित्रण या कवितेत केले आहे.
आपल्या मित्रांबरोबर माळावर पतंग उडवत फिरताना एका लहानशा मुलाला गवतफूल दिसले. रंगीबेरंगी, लहानशा आणि गोजिरवाण्या गवतफुलाला पाहून त्याला खूप आनंद झाला. गवतफुलाला उद्देशून तो म्हणतो, “हे गवतफुला, मला तुझा लळा कसा लागला, ते सांग! माळावर मित्रांबरोबर पतंग उडवत फिरत असताना गवतावर हसत हसत झुलत असलेल्या तुला मी पाहिले. तुझ्या रंगछटा, इवलेसे रूप पाहून मी हरखून गेलो आणि आकाशातला पतंग विसरून गेलो.
एवढंच नव्हे, तर माझ्या मित्रांचाही मला विसर पडला.” फुलाचे वर्णन करताना मुलगा म्हणतो, “तुझ्या दोन्ही बाजूंना हिरव्या रंगाची नाजूक रेशमी पाती सळसळत आहेत. निळसर रंगाची एक पाकळी आणि पिवळ्या रंगाचे परागकण झगमगत आहेत. तुझ्या तळापाशी लाल रंगाची पाकळी खुलून दिसत आहे. उन्हामध्ये अधिक उजळून दिसणारे तुझे रंग बघून माझं भान हरपून गेलं आहे.”
फुलाचे लहानसे गोजिरवाणे रूप पाहून वारासुद्धा लहान झाला आहे. फुलासोबत वारा झोपाळ्याचा खेळ खेळू लागला आहे. रात्र लहान रूप घेऊन रानफुलासाठी अंगाई गीत गात आहे. हे पाहून मुलाला फुलाहूनही लहान व्हावेसे वाटत आहे. शाळा, घर हे सारंकाही विसरून नेहमी फुलाच्या सोबत राहावे असे त्याला वाटत आहे.
फुलांची गोजिरवाणी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात, त्याचे खेळ शिकावेत, त्याला जादू शिकवण्यात फुलाहून लहान होऊन आभाळाशी हट्ट धरावा, त्याच्यासोबत खाऊ खावा आणि फुलाचे रंगीबेरंगी कपडे घालून फुलपाखरांना फसवावे, असेही या लहान मुलाला वाटते. आपण फुलाचे रंगीत कपडे घातले, की फुलपाखरू आपल्याला फूलच समजेल, असे मुलाला वाटत आहे.
गवतफुला रे गवतफुला (कविता) शब्दार्थ
इवली | लहान |
गोजिरवाणी | सुंदर, छान, सुरेख, गोंडस |
झगमगणे | चमकणे |
झुलणे | डोलणे |
तळी | तळाशी, खाली |
तुजला | तुला |
तुझ्यासंगती | तुझ्यासोबत तुझ्यासह |
नभिचा | आकाशातील |
पराग | फुलातील रजःकण, पुंकेसर |
माळ | गवत आणि खुरट्या झुडपांचे आच्छादन असलेले पठार |
रंगकळा | रंगांच्या छटा |
रंगरंगुल्या | रंगीबेरंगी, विविध रंगांच्या छटा असलेले |
रेशिम-पाती | मऊ पाने |
लळा | माया, ममता, प्रेम, जिव्हाळा |
सदा | नेहमी, सदैव |
सानसानुल्या | लहानशा, पिटुकल्या, छोटयाशा |
गवतफुला रे गवतफुला (कविता) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
भान हरपून जाणे. | स्वत:ला विसरून जाणे. |
हरखून जाणे. | आनंदाने गुंग होणे. |
हट्ट करणे | आग्रह करणे. |
गवतफुला रे गवतफुला (कविता) टीप
अंगाई गीत | बाळाला झोपवताना आई म्हणते ते गीत. |