Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 1 Question Answer जय जय महाराष्ट्र माझा for exam preparation.
Std 7 Marathi Balbharati Chapter 1 Question Answer जय जय महाराष्ट्र माझा
Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 1 जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा Question Answer
• ऐका वाचा ह्मणा
राजा बढे (१९१२-१९७७) : प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार. ‘माझिया माहेरा जा’, ‘हसले मनी चांदणे’, ‘क्रांतिमाला’, ‘मखमल’ इत्यादी गीतसंग्रह प्रसिद्ध; ‘गीतगोविंद’, ‘गाथासप्तशती’, ‘मेघदूत’ इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध.
प्रस्तुत गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सांगितली आहे.
शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांकडून समूहगीत तालासुरांत म्हणून घ्यावे. इतर समूहगीतांच्या ध्वनिफिती ऐकवाव्यात.
Class 7 Marathi Balbharati Chapter 1 जय जय महाराष्ट्र माझा Question Answer
पाठाधारित प्रश्नोत्तरे
प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा.
- भीमथडीच्या …….. या यमुनेचे पाणी पाजा। (घोड्यांना, पिल्लांना, तट्टांना)
- दरीदरीतून नाद गुंजला, ………. माझा । (महाराष्ट्र, देश, ध्वज)
- ………. मनगटे खेळती, खेळ जीवघेणी । (नाजूक, पोलादी, दमदार)
- दिल्लीचेही ……….. राखितो महाराष्ट्र माझा । (तक्त, राज्य, तेज)
उत्तर:
- तट्टांना
- महाराष्ट्र
- पोलादी
- तक्त
प्रश्न २.
चौकटी पूर्ण करा.
i. सहयाद्रीचा सिंह – _____
उत्तर:
शिव शंभू राजा
ii. देशगौरवासाठी झिजणारा- ____
उत्तर:
महाराष्ट्र
प्रश्न ३.
एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.
- मातीच्या घागरी कोणते पाणी भरतात?
- भीमथडीच्या तट्टांना कोणते पाणी पाजले जाईल ?
- कवीला कशाची भीती नाही?
- काळ्या छातीवर कसली लेणी कोरली आहेत?
उत्तर:
- एकपणाचे
- यमुनेचे
- गडगडणाऱ्या नभाची
- अभिमानाची
प्रश्न ४.
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
i. दारिद्र्याच्या उन्हात शिलाज
निढळाच्या घामाने भिजला
उत्तरः
महाराष्ट्रातील जनतेने गरिबीचे, दारिद्र्याच्या आगीचे चटके खाल्ले आहेत. येथील कष्टकरी जनतेच्या स्वकष्टाच्या, श्रमाच्या घामाने ही महाराष्ट्र भूमी भिजली आहे. वरील ओळींतून महाराष्ट्रातील लोकांची कठीण परिस्थितीवर मात करणारी, स्वत: च्या कष्टानेच मिळवण्याची, श्रम करण्याची वृत्ती कवीला दाखवायची आहे, असे मला वाटते.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- थडी =
- पाणी =
- नभ =
- जीभ =
- सिंह =
- नाद =
- छाती =
- घाम =
उत्तर:
- काठ, तीर
- जल, उदक, तोय, पय
- आभाळ, आकाश
- जिव्हा
- वनराज, केसरी, पंचानन, मृगेंद्र
- आवाज, रव
- ऊर
- स्वेद
प्रश्न २.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- राजा ×
- दारिद्र्य ×
- देश ×
उत्तर:
- रंक
- श्रीमंती
- परदेश
प्रश्न ३.
खालील शब्दांच्याआधी तो, ती किंवा ते लावून शब्दाचे लिंग लिहा.
- घागर
- महाराष्ट्र
- दरी
- ऊन
उत्तर:
- ती घागर – स्त्रीलिंग
- तो महाराष्ट्र – पुल्लिंग
- ती दरी – स्त्रीलिंग
- ते ऊन – नपुंसकलिंग
प्रश्न ४.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
शब्द | वचन ओळखा | वचन बदला |
जीभ | एकवचन | जिभा |
घागरी | अनेकवचन | घागर |
मनगटे | अनेकवचन | मनगट |
छाती | एकवचन | छात्या |
प्रश्न ५.
कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.
- गोदावरी
- नभा
- पाजा
- लेणी
- शिजला
उत्तर:
- घागरी
- जिभा
- राजा
- जीवघेणी
- भिजला, झिजला
प्रश्न ६.
हे शब्द असेच लिहा.
गर्जा, महाराष्ट्र, भद्रा, तट्टांना, सह्याद्री, दारिद्र्य, तक्त, जीवघेणी, सुलतानी, दिल्ली.
मुक्तोत्तरी प्रश्न
प्रश्न १.
‘माझा महाराष्ट्र’ या विषयावर तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर:
गोविंदाग्रजांनी ‘मंगल देशा पवित्र देशा’ असे ज्याचे वर्णन केले आहे, तो महाराष्ट्र मला फार प्रिय आहे, कारण ही संत, पंत (पंडित), तंत (शाहीर) यांची भूमी आहे. या भूमीत स्वराज्याची पायाभरणी झाली, शिवरायांसारखा महान राजा मिळाला, हेच या भूमीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
येथील कष्टकरी व शेतकरी जनतेमुळे आपले भरणपोषण होत आहे, दगडासारखी कणखर, पराक्रमी बाण्याची व फुलांप्रमाणे कोमल, नाजूक मनाची येथील जनता महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावत आहे, म्हणूनच ‘माझा महाराष्ट्र’ आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करत आहे, असे मला वाटते. महाराष्ट्राची शान व मान उत्तरोत्तर वाढवण्यासाठी येथील पाणीप्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, शिक्षण व आरोग्याचे प्रश्न यांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या सर्व शिलेदारांनी वैयक्तिक व सामूहिक प्रयत्न करून महाराष्ट्र घडवण्यासाठी हातभार लावला पाहिजे असे मला वाटते.
आकारिक मूल्यमापन
मौखिक कार्य
प्रश्न १.
कवितेत कोणकोणत्या नदयांचा उल्लेख आला आहे?
प्रश्न २.
कवितेतील नदयांव्यतिरिक्त तुम्हांला माहीत असलेल्या पाच नदयांची नावे सांगा.
लेखी कार्य
प्रश्न १.
प्रत्येकी दोन-दोन नावे लिहा.
- महाराष्ट्रातील लेणी
- महाराष्ट्रातील शिखरे
- महाराष्ट्रातील पर्वतरांगा
- महाराष्ट्रातील किल्ले
- महाराष्ट्रातील खेळ
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थाने / तीर्थक्षेत्र रायगड, प्रतापगड
उत्तर:
- अजिंठा, वेरूळ
- कळसूबाई, साल्हेर
- सातपुडा, सह्याद्री
- रायगड, प्रतापगड
- कुस्ती, कबड्डी
- शिर्डी, पंढरपूर
उपक्रम / प्रकल्प
प्रश्न १.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत वर्गात तालासुरात साभिनय सादर करा.
प्रश्न २.
महाराष्ट्राची वैशिष्ट्ये दाखवणारा एक चित्रफलक तयार करून वर्गात लावा.
(हे उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)
जय जय महाराष्ट्र माझा कवितेचा भावार्थ:
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राजा बढे यांनी लिहिलेल्या गीतात महाराष्ट्राची थोरवी सांगितली आहे. प्रस्तुत कवितेत कवी महाराष्ट्राचा जयजयकार करत, सर्वांना ‘महाराष्ट्र माझा’ ची गर्जना करायला सांगत आहे. कवी म्हणतो, ‘रेवा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी या साऱ्या नदया महाराष्ट्रातील एकतेचे प्रतीक आहेत. त्यांचे पाणी एकच आहे. येथील मातीच्या घागरी जणू हे एकतेचे पाणी भरतात. भीमा नदीच्या काठावरील घोड्यांना महाराष्ट्राच्या शिलेदारांनी आता यमुनेचे पाणी पाजावे.’ म्हणजेच, या महाराष्ट्राच्या शिलेदारांनी यमुनेपर्यंत सत्ताविस्तार करावा.,
कवी पुढे म्हणतो, ‘आम्हा महाराष्ट्राच्या शिलेदारांना गडगडणाऱ्या आभाळाची मुळीच भीती वाटत नाही, कारण आम्ही अस्मानी (नैसर्गिक), सुलतानी (परकीय आक्रमणे) अशा कोणत्याही संकटांना तोंड देण्यास समर्थ आहोत. (कारण) सह्याद्रीच्या सिंहाच्या म्हणजेच शिव शंभू राजाच्या (शिवाजी महाराज) ‘महाराष्ट्र माझा’ या गर्जनेचा नाद येथील दऱ्याखोऱ्यांत घुमला आहे.
ज्याप्रमाणे काळ्या पाषाणात कोरलेल्या लेण्या इतिहासाचे आजीवन संगोपन करतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील निधड्या छातीच्या शिलेदारांचे अभिमान वाटावे असे पराक्रम महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आजन्म कोरले गेले आहेत. त्यांची मजबूत, कणखर अशी पोलादी मनगटे जीवावर उदार होऊन जीवघेणे खेळ खेळली आहेत. अशी ही महाराष्ट्राची भूमी दारिद्र्याच्या आगीत होरपळली आहे, येथील कष्टकरी जनतेच्या कपाळावरील घामाने ती भिजली आहे, देशाचा गौरव वाढवण्यासाठी झिजली आहे. दिल्लीचेही सिंहासनं प्राणपणाने राखणारा असा हा ‘महाराष्ट्र माझा’ आहे.’
जय जय महाराष्ट्र माझा शब्दार्थ
एकपणाचे | एकीचे |
गर्जा | गर्जना करणे, गडगडणे, मोठ्या आवाजात ओरडणे. |
गुंजणे | घुमणे |
घागर | माठ, घड्यासारखी मोठी कळशी |
जबाब | उत्तर |
झिजणे | इतरांच्या भल्यासाठी कष्ट करणे. |
तक्त | तख्त, राजगादी, सिंहासन |
तट्टू | लहान घोडा |
दारिद्र्य | गरिबी |
निढळ | कपाळ, ललाट |
भीमथडी | भीमा नदीचा काठ |
सुलतानी | परकीय आक्रमणे, दडपशाही, जुलूम |
जय जय महाराष्ट्र माझा टीप
रेवा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी | महाराष्ट्रातील काही नदया |