Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत)

Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत) for exam preparation.

Std 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत)

Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 10 गोमू माहेरला जाते (गीत)

गोमू माहेरला जाते (गीत) Question Answer

प्रश्न १.
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत) 7
उत्तर:

कवितेचे कवी कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी कवितेची भाषा
ग. दि. माडगूळकर कोकण नाखवा, गोमू, गोमूचा नवरा कोकणची निळी खाडी, हिरवीगार झाडी, अबोलीच्या फुलांचा ताटवा, साधीभोळी माणसे, उंचच उंच माड, अवखळ वारा मराठी-कोकणी

प्रश्न २.
एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.

(अ) गोमूचे माहेर – _________
(आ) कोकणची माणसं – _______
उत्तर:
(अ) कोकण
(आ) साधी भोळी

Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत)

प्रश्न ३.
खालील आकृती पूर्ण करा.
(अ)
Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत) 5
उत्तर:
१. निळी खाडी
२. हिरवागार निसर्ग
३. साधीभोळी माणसे
४. उंच माडाची झाडे

(आ) खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

(अ) काळजात त्यांच्या भरली शहाळी → ________________
उत्तर:
कोकणातील माणसे स्वभावाने साधीसरळ व दिलदार मनाची आहेत. त्यांच्या हृदयात शहाळ्याच्या पाण्यासारखा गोडवा साठलेला आहे. अशा अर्थाने कवी कोकणातील माणसांचे वर्णन करत आहे.

(आ) झणी धरणीला गलबत टेकवा → ________________
उत्तर:
कोकणच्या सौंदर्याचे, तिथल्या माणसांचे वर्णन ऐकल्यानंतर गोमू व तिच्या नवऱ्याला लवकरात लवकर कोकण जवळून पाहता यावे यासाठी कवी नाखवाला गलबत किनाऱ्यावर आणण्याची विनंती करत आहे.

प्रश्न ४.
कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
‘गोमू माहेरला जाते’ या कवितेत कवी ग. दि. माडगूळकर यांनी कोकणचे निसर्गसौंदर्य, तिथली माणसे, खाडी यांचे सुरेख वर्णन केले आहे. कोकणच्या सौंदर्याचे, तिथल्या माणसांचे वर्णन ऐकल्यानंतर गोमू व तिच्या नवऱ्याला कोकण जवळून पाहता यावा याकरता कवी वाऱ्याला अवखळपणा सोडून शिडात शिरण्याची विनंती करत आहे.

चर्चा करूया

• शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते, याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा.
(टीप: खालील मुद्दयांच्या आधारे चर्चा करता येईल.)
मुद्दे : चवीला मधुर व तहान भागवणारे नैसर्गिक साखर, अनेक जीवनसत्वे, खनिजे इत्यादी घटकांचा समावेश – आदर्श पेय शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी उपयुक्त – डोळ्यांचे, केसांचे, त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गुणकारी औषध.

खेळूया शब्दांशी

(अ) कवितेतील योग्य जुळणारे शब्द लिहा.

(१) नाखवा
(२) खाडी
(३) भोळी
(४) साऱ्या
उत्तर:
(१) दाखवा, मापवा, टेकवा
(२) झाडी
(३) शहाळी
(४) वाऱ्या

(आ) खालील शब्दांचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.

(१) शीड
(२) माड
(३) खाडी
(४) शहाळी
(५) झणी
(६) गलबत
उत्तर:
(१) शीड – गलबताचे अवजार, वारा धरण्याकरता गलबतावर बांधलेले कापडाचे साधन
(२) माड – नारळाचे झाड
(३) खाडी – नदीत समुद्राचे पाणी जिथपर्यंत येते तो भाग
(४) शहाळी – कोवळा नारळ
(५) झणी – लवकर, झटकन, त्वरेने, ताबडतोब
(६) गलबत – शिडाची नाव / नौका, होडी

विचार करा.सांगा

• तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर:
माझ्या आईचे गाव सावंतवाडीतील ‘देवसू’ येथे आहे. गाडीने गावाला जाताना वाटेत आंबोली घाट लागतो. घरी येणाऱ्या पाहुण्यांना मी येथे भेट दयायला लावेन. पावसाळ्यात तर या घाटाची शोभा अवर्णनीय असते. उंच दगडाच्या कपाऱ्यांमधून पडणारा शुभ्र धबधबा, पायाला गुदगुल्या करत वाहणारे नितळ थंडगार पाणी, आजूबाजूची हिरवीगार वनश्री सगळे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकणारे असते.
तसेच, वाटेत दाणोली बाजार लागतो. त्या बाजारात उत्कृष्ट चवीची भजी खाण्याचा आनंद लुटता येतो. जवळच साटम महाराजांचे देऊळ, त्या देवळातील तेजस्वी मूर्ती, मोकळा, स्वच्छ गाभारा, रांगोळ्यांनी सजवलेला मंदिराचा परिसर, पाण्याचा, कधीही न आटणारा झरा पाहण्यासाठी मी पाहुण्यांना नक्कीच हे स्थळ दाखवेन.

Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत)

माहिती मिळवूया

• आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.
• आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या, शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.
(वरील उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)

आपण समजून घेऊया

खालील परिच्छेद वाचा.

नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या अन् पावसाची रिमझिम सुरू झाली. आई नंदाला म्हणाली, “तू कांदे, बटाटे लसूण घे, तोपर्यंत मी भाजीपाला घेते.” आईने भाजीपाला खरेदी केला, शिवाय फळेही घेतली. नंदाने आईला विचारले, “आई, लसूण घेऊ की आले घेऊ?” आई म्हणाली, “दोन्ही घे; पण लवकर आवर, कारण जोराचा पाऊस सुरू होईल. पाऊस आला, तर आपण भिजू; म्हणून तुला ‘घाई कर’ असं सांगते आहे.’ नंदा म्हणाली, “कशाला एवढी चिंता करतेस ? आपण रिक्षा किंवा बसने घरी जाऊ, म्हणजे आपण पावसात भिजणार नाही.”

वरील परिच्छेदातील अधोरेखित शब्द दोन वा अधिक शब्दांना किंवा दोन वा अधिक वाक्यांना जोडण्याचे काम करतात, म्हणून या शब्दांना उभयान्वयी अव्यये म्हणतात.

‘उभय’ या शब्दाचा अर्थ दोन व ‘अन्वय’ या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे, हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे. आणि, शिवाय, की, पण, अथवा, अन्, परंतु, नि हे सर्व शब्द उभयान्वयी अव्यये आहेत.

• खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत) 6
उत्तर:
१. की – मी आईला सांगितले,की मी आज शाळेत जाणार नाही
२. म्हणून – मी खरे बोललो म्हणून मला खाऊ मिळाला.
३. पण – गौरव शहाणा मुलगा आहे; पण कधीकधी तो वेगळाच वागतो.
४. परंतु – रमाने नीनाला अभ्यासाकरता तिच्या घरी बोलावले; परंतु ती स्वतःच घरी नव्हती.
५. अथवा – बाबा आज खाऊ आणतील अथवा नाही आणणार.
६. म्हणजे – तू घरी आलास म्हणजे आपण सोबत जेऊ.

प्रश्न ७.
खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

(अ) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
(आ) आईने काटकसर केली; पण शिल्लक काही उरले नाही.
(इ) ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.
उत्तर:
(अ) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
(आ) आईने काटकसर केली; पण शिल्लक काही उरले नाही:
(इ) ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.

शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांना उभयान्वयी अव्ययांची विविध उदाहरणे देऊन अधिक सराव करून घ्यावा.

भाषेचा नमुना

सामवेदी बोली

गावात झुजूकाका घारा पेपर यासा. तॉपान दोपारसॉ बारा वाजता. झुजूने पेपर उगडला आन पेपरराशी काळ्या अक्षरात लिवीलेली हेडलाईन जोराय वाशीली. ‘वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर स्कायलॅब पडणार.’ आत्ये या स्कायलॅबला पड्यादो वसयसा किनारों बरॉ दिखलॉ. पेपराशा या बातमीन्ये जकल्या गावाशे जकले घाभरे घुभरे झाले.

स्कायलॅब पड्यासा आन आपून जकले मरॅशे. मग का? आत्ये रेल्यात तोड्ये दि धमाल करॉन घ्याओं या कल्पनेने जकले मज्या करण्या कामाला लागले. लोकांना आजूबाजूला बग्यादो वेळूस नॉतो. जही जही १४ तारीख जवळ येतोती तही तही जकल्याई अवस्था घनी बिकट हॉत गेली. बबनशी गत पान तहीस होती. भाटात केळीऑ अंगाठो जरी मोडलो तरी त्याला वाट्यासा स्कायलॅब पडले हायदे आ? एकदासा चौदा जानेवारीओ दी उजाडलो. जॉहो उजाडलॉ ताँहो, तो मावळलॉ पान. पान स्कायलॅब पडताना कुनालास दिखला नाय; पान अजून रात बाकी होती.

कहेबहे जिवणे आटपॉन लोक खाट्येऑर पडलॉता पान निज भगून कुना डॉळ्यात येत नॉती. रात आस्ते आस्ते पुड्ये सरकातोती. घड्याळाये काट्ये कय दिखात नॉते, पान त्याई टिकटीक जोराय आयकॉ येतोती. आन एकदम भाँठो आवाज जाला. बायारशा खांबोरसा दिऑ विजलॉ. लाईट गेली. काळॉकिट. बबनने हळूहळू डॉळे उगडले. समोर त्याला त्याई बय बारझाड करताना दिली. समोर बय दिखलेऑर त्याला बरा वाटला. त्याने बयला हाक मारली. ‘बलो, स्कायलॅब आपल्यास घरोर पडला गा का?’ ‘रातसा कईस पडला नाय, पान पात्येराती शिशा झाड पडला.’

बरोबर साडेबारा टोल्याला पेपरवाला काका आला. त्याने टाकीलॅलो पेपर झुजूने टुक्याशा अगोदर बबनने टुकीलॉ, आन पेपरातशी हेडलाईन जकल्याना आयको जायदे ऑड्या जोरात वाशीली. ‘काल सकाळी दहा वाजून १० मिनिटांनी स्कायलॅब अरबी समुद्रात कोसळले. ‘ क्षणभर जकला शांत जाला, आन जमलेल्या जकल्यांने एकदम जल्लोश केला.

सिरील मिनेझीस (१९६५) : प्रसिद्ध लेखक. ‘धरायला गेलो एक’, ‘आभास’ इत्यादी मराठी एकांकिका; “मिंगॅरॅऽ ऽऽ’ हा कथासंग्रह प्रसिद्ध.
‘बबन’ या कथासंग्रहातून वरील उतारा घेतला आहे.

शोध घेऊया.

• कोकणी बोलीभाषेत साहित्यलेखन करणाऱ्या विविध लेखक व कवींची माहिती मिळवा.

शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांना बोलीभाषेतील वरील उतारा योग्य उच्चारांसह वाचून दाखवावा. उताऱ्यातील शब्दांचे अर्थ व भाषेचे वेगळेपण समजावून सांगावे.

Class 7 Marathi Balbharati Chapter 10 गोमू माहेरला जाते (गीत) Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न ३.
एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.

  1. कोकणची खाडी
  2. अबोलीच्या फुलांचा
  3. झाडीचा रंग
  4. खोड्या करणारा

उत्तर:

  1. निळी निळी
  2. ताटवा
  3. हिरवागार
  4. अवखळ वारा

Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत)

प्रश्न ४.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

i. गोमू कोठे जात आहे?
उत्तर:
गोमू तिच्या माहेरी कोकणात जात आहे.

ii. कोकण कोणाला दाखवायचा आहे?
उत्तर:
गोमूच्या नवऱ्याला कोकण दाखवायचा आहे.

iii. कवितेत कोणत्या फुलांचा उल्लेख केला आहे?
उत्तर:
कवितेत भगव्या अबोलीच्या फुलांचा उल्लेख केला आहे.

iv. कवी वाऱ्याला कोणती विनंती करत आहे ?
उत्तर:
आपला अवखळपणा सोडून वाऱ्याने शिडात शिरावे अशी विनंती कवी वाऱ्याला करत आहे.

प्रश्न ५.
खालील अर्थाच्या ओळी कवितेत शोधून लिहा.

i. गोमूच्या नवऱ्याला गोमूचे माहेर दाखवा.
उत्तर:
गोमू माहेरला जाते हो नाखवा ।
तिच्या घोवाला कोकण दाखवा ।।

ii. गोमूच्या नवऱ्याला कोकणची निळी खाडी, हिरवी झाडी, अबोलीचा ताटवा दाखवा.
उत्तर:
दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा ।।

iii. कोकणच्या वाऱ्याने आपला खोडकरपणा सोडून आता शीड धरायला सुरुवात करावी.
उत्तर:
सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शीर रे अवखळ वाऱ्या ।।

प्रश्न ७.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

i. कोकणातील निसर्गसौंदर्याचे वर्णन कवी कसे करतो ?
उत्तर:
‘गोमू माहेरला जाते’ या ग. दि. माडगूळकर लिखित कवितेत कोकण, कोकणातील खाडी व तेथील निसर्गसौंदर्याचे सुरेख वर्णन केले आहे.
कोकण प्रदेशाला निळ्याशार खाडीचे, समुद्रकिनाऱ्याचे वैभव लाभले आहे. दोन्ही काठावर हिरव्यागार झाडीचे जंगल आहे. दारात भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा सुंदर ताटवा फुलला आहे. अशाप्रकारे, कोकणातील निसर्गसौंदर्याचे वर्णन करून कवी गोमूच्या नवऱ्याला कोकण दाखवण्यास सांगत आहे.

ii. कोकणच्या माणसांविषयी कवी काय म्हणतो?
उत्तर:
‘गोमू माहेरला जाते’ या कवितेत कवीने कोकणातील साध्या भोळ्या माणसांचे वर्णन केले आहे. कोकणातील माणसे स्वभावाने साधीसरळ व मोठ्या मनाची, दिलदार आहेत. त्यांच्या काळजात जणू शहाळी भरली आहेत, म्हणजेच त्यांच्या हृदयात शहाळ्याच्या पाण्यासारखा गोडवा भरलेला आहे. अशा शब्दांत कवीने कोकणातील माणसांचे वर्णन केले आहे.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. तीर =
  2. खोडी =
  3. अवखळ =
  4. धरणी =

उत्तर:

  1. काठ, थड, किनारा
  2. थट्टा
  3. खोडकर
  4. धरुती, जमीन, भूमी, धरित्री

प्रश्न २.
खालील शब्दांचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.

  1. घोव
  2. नाखवा
  3. ताटवा
  4. काळीज

उत्तर:

  1. घोव – नवरा
  2. नाखवा – मुख्य नावाडी
  3. ताटवा – फुलझाडांचा वाफा, मांडव
  4. काळीज – हृदय, मन

प्रश्न ३.
खालील चौकटींतील विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवून लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत) 3
उत्तर:

  1. माहेर × सासर
  2. अवखळ × शांत
  3. जवळ × लांब
  4. भोळी × लबाड

प्रश्न ५.
कवितेत एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेली उदाहरणे शोधून लिहा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

  1. निळी निळी
  2. हिरवी हिरवी

उत्तर:

  1. निळी निळी – आभाळाची निळी निळी छटा चित्रात रेखाटायला मला फार आवडते.
  2. हिरवी हिरवी – पावसाळ्यात संपूर्ण धरणी हिरवी हिरवी होऊन जाते.

प्रश्न ७.
खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.

  1. आंबा व कैरी दोन्हीही खायला मला तितकेच आवडतात.
  2. तू अभ्यास करवा करूं नकोस, तुला आज बाहेर खेळायला मिळणार नाही, कारण बाहेर खूप ऊन आहे.
  3. क्रिकेटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला अन् क्षणार्धात आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.

उत्तरः

  1. आंबा कैरी दोन्हीही खायला मला तितकेच आवडतात.
  2. तू आज अभ्यास कर वा करू नकोस, तुला आज बाहेर खेळायला मिळणार नाही कारण बाहेर खूप ऊन आहे.
  3. क्रिकेटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला अन् क्षणार्धात आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.

Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत)

प्रश्न ८.
सूचनेप्रमाणे करा.

i. मी घर आवरले. गृहपाठही संपवला. (योग्य जागी ‘शिवाय’ वापरा.)
उत्तर:
मी घर आवरले शिवाय गृहपाठही संपवला.

ii. फुलपाखरू अलगद फुलावर येऊन बसले. भुरकन उडून गेले. (‘नि’ चा वापर करा.)
उत्तर:
फुलपाखरू अलगद फुलावर येऊन बसले नि भुरकन उडून गेले.

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
तुम्हांला माहीत असलेली कोकण प्रदेशातील अन्य वैशिष्ट्ये सांगा.
उदा. भात-मासे, दशावतार, शिमगा सण

प्रश्न २.
‘गोमू माहेरला जाते’ हे गीत तालासुरात वर्गात सादर करा.

गोमू माहेरला जाते (गीत) कवितेचा भावार्थ:

ग. दि. माडगूळकर लिखित ‘गोमू माहेरला जाते’ या गीतात कोकण, कोकणातील खाडी, तिथले निसर्गसौंदर्य, कोकणातील साधी भोळी माणसे यांचे समर्पक वर्णन केले आहे.

कवी गलबतावरच्या नावाड्याला उद्देशून म्हणतात, “ अहो नाखवा, गोमू ( मुलीचे नाव) माहेराला जात आहे, तिच्या नवऱ्याला कोकणचे सौंदर्य दाखवा.

त्याला कोकणातली निळी निळी खाडी, तिच्या दोन्ही कडेने असलेली हिरवीगार झाडी आणि फुललेल्या नाजूक अबोलीच्या फुलांची वाफा दाखवा.”

कवी कोकणच्या माणसांविषयी पुढे म्हणतात, “कोकणी माणसे स्वभावाने साधीसरळ, दिलदार मनाची आहेत. त्यांच्या काळजात, हृदयात जणू शहाळ्याच्या पाण्यासारखा गोडवा भरलेला आहे. जणू त्यांचे काळीज शहाळ्यासारखे गोड आहे. त्यांचा प्रेमळ पाहुणचार गोमूच्या नवऱ्याने घ्यावा आणि उंचच उंच माडांची उंची ‘जवळून’ मोजावी. ”

शेवटी कवी वाऱ्याला विनंती करतात, की ” अरे अवखळ, उनाड वाऱ्या, तुझ्या सर्व खोड्या सोडून तू आता जहाजाच्या शिडात प्रवेश कर. लवकरात लवकर गलबत जमिनीला टेकू दे. ”

गोमू माहेरला जाते (गीत) शब्दार्थ

Class 7 Marathi Balbharati Chapter 10 Question Answer गोमू माहेरला जाते (गीत) 1

गोमू माहेरला जाते (गीत) टिपा

खाडी नदी समुद्राचे पाणी जेथवर येते तो भाग.
माहेर मुलीचे लग्नाआधीचे म्हणजे आईवडिलांचे घर

Leave a Comment